ठाणे शहराचा स्मार्ट शहर योजने मध्ये समावेश करावा अस सरकार ने आताच ठरविले असले तरी पहिल्या पासून ठाणे कर (डॉक्टर असल्याने मुलुंडकर पण ) भलतेच स्मार्ट आहे , मिपाचे यशस्वी कट्टे करावेत तर ते ठाणेकराने च , असो
श्रीयुत टवाळ कार्टा ह्यांच्या एका धाग्याने ह्या स्मार्ट कट्टा आयोजनाची सुरुवात झाली , सुरुवातीलाच दिवाळी पाडवा असल्याने किती लोक येतील ह्याचा अंदाज नव्हता असो कट्टा मस्त झाला
मेतकूट :- मेतकूट हि जागा निवडणे म्हणजे खरोखर धाडसीपण होत , मिपावरील ऐतिहासिक पार्शवभूमी त्याला आहेच
अत्रन्गि पाऊस : - इतक्या सबाह्य सभ्य माणसाने हे नाव घेणं म्हणजे गंमत आहे आणि विशेष म्हणजे हे एक दिवस अगोदरच अर्रेचचा आवाज कट्टा नाही का म्हणून निघून गेले होते त्यामुळे येतील कि नाही सांगता येत नव्हते (बघा बघा किती उत्साह असतो एकेएकाला )
मदनबाण :- शिवसेनेच्या एखाद्या नाक्यावरच्या किल्ल्यातील उत्साही कार्यकर्ता म्हणून सहज खपून जाईल त्यात भर म्हणून गळ्यात रुद्राक्ष सदृश्य माळा घालून सर्वात प्रथम कट्यास हजार होते
डॉक्टर खरे :- सर्व मान्य लोकप्रिय व्यक्तिमत्व , मी ओळख करून देणार म्हणजे काजव्याने सूर्याची ओळख होईल असं काही ..
पाडव्यालाहि आलेले सर्व उत्साही मिपाकर्स :- खटपट्ये शेठ, , टका , अस्मादिक (माझीही शॅम्पेन ) , वरून मोहिते , डॉ खरे , अत्रन्गि पाऊस
घंटाळी मंदिर :- ठाण्यातील एक पुरातन मंदिर (नक्की माहित नाही पण दीडशे वर्षांपासून नक्कीच) इतर कट्टेकरी येई पर्यन्त मी , डॉ आणि मदनबाण ह्यांनी घंटाळी मंदिरात दर्शन घ्यायला गेलो , मदनबाण ह्यांनी फुल्लऑन दर्शन घेतलं (अगदी थाळी वैगरे घेऊन) मी चुकून सौ मदनबाण पण बरोबर तर नाहीत हे पुन्हा पुन्हा तपासून बघत होतो असो __/\__
तो पर्यंत जवळपास सर्व कट्टे करी आले होते (बोबो साहेब सोडून) जवळपास दोन मेतकूट आहेत एक जेवणाचं आणि एक नाश्त्याच , आमचं दुसरं होत
कट्टा सुरु होता होता अत्रन्गि पाऊस दबकत दबकत आले आणि पहिली फर्माईश "पुडीच्या वडे" अशी सोडली , असेही मिपाकर कोणालाही सहज पुडीत बांधू शकतील असं त्यांना अप्रत्यक्षपाने सांगायचं असेल
मग काय एका मागोमाग एक असे लजीज पदार्थ मागवले गेले , पदार्थ चविष्ट कि खमंग चर्चा असा प्रश्न होता , कट्ट्याचे विषय आणि त्याची रेंज पहिली असती एखादा नॉन-मिपाकर हादरून गेला असता सध्या आंतराष्ट्रीय बाजारात असलेली नावीन्यपूर्ण हत्यारे , नोकरी साठी मुलाखत कशी घ्यावी , आंतरराष्ट्रीय मंदी , द्रौपदीचे आणि कर्ण ह्यांचं सुप्त आकर्षण , बोली भाषा नि प्रमाण भाषा ह्यांचे वाद असे अनेक विषय चर्चेला आले
कट्ट्याचा शेवट अतिशय धक्कादायक बातमीने झाला आणि ती बातमी २०१७ मध्ये किंवा थोडी आधी सर्वांना कळेल अशी अशा आहे :)
असो चविष्ट गप्पा मारणारे आणि चविष्ट पदार्थ असतील तर कट्टा हमखास यशस्वी होतोच आणि झालंही तसाच
खादाडीचे फोटो
कुठलीशी कतली
कोथिंबीर वड्या
अळूच्या वड्या
पुडीच्या वड्या
मिक्स भजी
सर्व मिपा-करांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
प्रतिक्रिया
31 Oct 2016 - 6:27 pm | टवाळ कार्टा
अंजीर कतली आहे ती
31 Oct 2016 - 6:28 pm | टवाळ कार्टा
बाणाने आणलेले रातराणी अत्तर जब्रा होते
31 Oct 2016 - 6:37 pm | माम्लेदारचा पन्खा
उत्सुकता ताणली गेली आहे.....!
31 Oct 2016 - 6:45 pm | खटपट्या
माझा फोटो लय खराब आलाय
31 Oct 2016 - 6:53 pm | कंजूस
ठाणे मेट्रो वृतान्त!!
31 Oct 2016 - 6:56 pm | रेवती
खटपट्याजी, तुम्ही भारतात जाणार होता हे आधी सांगितले नाहीत. आपली प्रथा आहे ती! नुसतं बुकिंग झालं की ब्यांडबाजा असतो. इथे तुम्ही जाऊन पोहोचलात, कट्ट्याला गेलात म्हणून समजतेय. असो, बघून घेतले जाईल.
बाकी कट्टा वृत्तांत आवडण्यात आल्या गेला आहे.
31 Oct 2016 - 6:56 pm | रेवती
धक्कादायक बातमीचा अंदाज आला आहे.
31 Oct 2016 - 8:30 pm | स्रुजा
मला पण :प
31 Oct 2016 - 7:38 pm | खटपट्या
आय माय सॉरी...घाइ जाहली.
31 Oct 2016 - 6:58 pm | पिलीयन रायडर
टक्याच लग्न ठरलं का? ह्याच बातमीकडे डोळे लावुन आक्खं मिपा बसलं आहे... काय असेल तो सस्पेन्स फोडा.. ;)
फायनली ते बोबो भेटलेच नाहीत का? अरेरे... कट्टा अगदी दणक्यात झालेला दिसतो. मिस केला की त्यांनी.
31 Oct 2016 - 7:40 pm | माम्लेदारचा पन्खा
टकाशी संबंधित असणार काहीतरी बहुतेक....
31 Oct 2016 - 6:58 pm | माझीही शॅम्पेन
चुकून कुंती झाल आहे ते द्रौपदी करता येईल का ?
31 Oct 2016 - 8:25 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
बदल केलाय.
बाकी स्मार्ट शहर वगैरे मुंबईसाठी आहे, ठाणे डोंबोलीसाठी नव्हे. =))
31 Oct 2016 - 8:29 pm | मदनबाण
बाकी स्मार्ट शहर वगैरे मुंबईसाठी आहे, ठाणे डोंबोलीसाठी नव्हे. =))
चूक :- Thane, Kalyan-Dombivli among 5 in state to make it to smart city list
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ब्लॉकबस्टर... ;) :- Sarrainodu
31 Oct 2016 - 8:34 pm | अभ्या..
फर्स्ट राउंडात आम्ही हाव. ;)
31 Oct 2016 - 8:37 pm | मदनबाण
चाललं की... आमी बी जास्त मागे नाय ! ;) तसही ठाणे टॉवर सिटी आणि मॉल सिटी म्हणुन प्रसिद्ध पावलीच आहे. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ब्लॉकबस्टर... ;) :- Sarrainodu
1 Nov 2016 - 12:21 pm | माझीही शॅम्पेन
धन्यवाद , लिहिण्याच्या ओघात चूक झाली भलताच अर्थ निघत होता :)
31 Oct 2016 - 7:00 pm | यशोधरा
छोटेखानी वृत्तांत आवडला. खटपट्याभाऊंना "ती" चा ९ वा भाग टाकायची आठवण केली की नाही कोणी?
31 Oct 2016 - 7:05 pm | अभ्या..
जुन्या पिक्चरात नायतर नाटकात मागे बाल्कनीचा सेट लावतात तसा का लावलाय?
बाकी कट्टा ठिक. मेनु पुळचट. अर्थात गप्पा रंगल्या असल्याने त्याकडे लक्ष नसावेच कुणाचे. ;)
धक्कादायक बातमी म्हणजे ट्रम्पकाका फिक्सींग मारले की काय? की मदनबाणाने जागतिक महायुध्दाचे भविष्य वर्तवले?
31 Oct 2016 - 7:21 pm | गवि
दुपारी येऊन चक्कर टाकली असता कट्टा समाप्त झाल्याचे दिसले.
फोटो न दिसल्याने जळजळ नाही.
पुढील कट्ट्यांना शुभेच्छा.
यापूर्वी तिथेच समोर पुरेपूर कोल्हापूरमधे कट्टा झाला होता.
31 Oct 2016 - 8:07 pm | नूतन सावंत
कट्टा छान झालेला दिसतोय.
31 Oct 2016 - 8:14 pm | कपिलमुनी
श्री.टकारावांचे अभिनंदन !
( कृ. आहेरामधे रिंग आणू नये)
31 Oct 2016 - 8:20 pm | मदनबाण
बरेच दिवस पल्याडला कट्टे ठरत आणि मला त्याला काही हजर राहता येत नव्हते... यावेळी ते जमले ! :) मी मापं आणि इतर मंडळी ज्यांनी मला मागच्या सर्व कट्यांना विचारणा केली होती त्यांचे आभार मानतो आणि या कट्ट्याला त्यांना मिस केले हे देखील नमूद करु इच्छितो. मेतकूटला मिपा इतिहास असल्या कारणाने आणि इथे जावुन पहावयास हवे होते असे म्हंटले होते ते या कट्ट्याने पूर्ण झाले. टक्याला दोनदा फोनवले आणि योग्य मेतकूट असलेल्या जागी पोहचलो.वेळेच्या आधी पोहचण्याची खोड असल्या कारणाने आधीच हजर झालो होतो... मग डॉक आणि सर्व मंडळी हजर झाली.
खादाडीची सुरुवात अंजीरकतलीने झाली. :)
काय मागवायचे याची चर्चा झाल्यावर सर्व पदार्थांची ऑर्डर देण्यात आली. कोथिंबीर वडी बरोबर अळुवडी सुद्धा सांगा अशी माझी आवड सांगितली. :) डाविकडे पेंटिंग लावले आहे तिथे माझी नजर गेली... म्हंटल काय आहे ते जरा पाहुया !
असेच एक अजुन सुंदर पेंटींग दिसले तेही टिपले...
कोथिंबीर वडी आणि अळुवडी काही वेळातच हजर झाल्या...
पदार्थ झटपट पोटात जात होते आणि चर्चेला जोरदार रंग चढत होता... डॉक यांना कायाकल्प सिद्धी वश आहे असे जे नेहमी म्हणतो तेच परत रिपीट मारतो. :) रिंगां पासुन आयटी पर्यंत "सर्व" विषयावर माहितीपूर्ण चर्चा झाली ! ;)
मग झाली भजीयों पे चर्चा... :)
घरला पाहुणे मंडळी येणार असल्याने आणि मस्त ताव मारुन पोट भरल्याने मी लवकर सटकलो...
सर्वांना भेटुन फार आनंद वाटला... असेच कट्टे होत राहोत. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ब्लॉकबस्टर... ;) :- Sarrainodu
31 Oct 2016 - 10:56 pm | माम्लेदारचा पन्खा
भारी फोटो आणि माहिती ....
1 Nov 2016 - 12:18 pm | माझीही शॅम्पेन
अप्रतिम फोटो बाण राव
मूळ लेखात राहूनच गेलं कट्ट्याच्या सुरुवातीलाच तुम्ही आणलेले मृदगंध आणि रातराणी असे दोन अत्तर खूप छान होते
2 Nov 2016 - 1:37 pm | किसन शिंदे
ठाण्याच्या मासुंदा तलावाचे आहे.
31 Oct 2016 - 8:21 pm | सुबोध खरे
बातमीचा टकाच्या लग्नाशी काहीही संबंध नाही.
31 Oct 2016 - 9:03 pm | पिलीयन रायडर
अरेरे.. मिपा आता लग्नघर होणार अशी आशा होती..
1 Nov 2016 - 12:22 pm | माझीही शॅम्पेन
+ १००
ह्याही बातमीचे पडसाद मिपा वर्तुळात नक्की उमटणार , फक्त काही दिवस थांबा
1 Nov 2016 - 12:29 pm | संदीप डांगे
काय रहस्यमय कट्टा होता की काय?
1 Nov 2016 - 6:53 pm | सूड
नवीन संस्थळ सुरु करताय का चंपाग्ने?
31 Oct 2016 - 9:06 pm | अजया
भारी झालेला दिसतोय कट्टा.
31 Oct 2016 - 9:50 pm | बोबो
31 Oct 2016 - 9:50 pm | बोबो
31 Oct 2016 - 9:50 pm | बोबो
31 Oct 2016 - 9:51 pm | बोबो
31 Oct 2016 - 9:51 pm | बोबो
31 Oct 2016 - 9:52 pm | बोबो
शेम टू शेम नाव असून वर एकाच एरियात असणारी हॉटेल्स यापुढच्या कट्ट्यांसाठी टाळावीत, असे आग्रहाचे णिवेदण. मला अर्धातास एकाच जागी उभा पाहून रोडच्या समोरच्या बाजूला उभे असलेले पो.मामा माझ्याकडे संशयाने पाहू लागले होते.अखेरीस अर्ध्या तासाने माझ्याबद्दल पूर्ण खात्री होऊन ते मला हटकण्यासाठी (की फटकवण्यासाठी? कोण जाणे)माझ्या दिशेने येऊ लागले तसा मी इकडेतिकडे सहज पाहात असल्याप्रमाणे हळूच तिथून काढता पाय घेतला.
तुमच्या मेतकुटापायी जीव पार मेटाकुटीला आला भौ.
31 Oct 2016 - 10:42 pm | टवाळ कार्टा
=))
31 Oct 2016 - 10:55 pm | अत्रन्गि पाउस
वसई स्वारी च्या वेळेला चिमाजी अप्पांनी वसवलेले इतके जुने मंदिर आहे असे आम्ही लहानपणापासून ऐकतो.
आज ह्या निमित्ताने औरंगाबादच्या कट्ट्यची (आम्हीच बोलवून ऐत्या वेळी न जाऊ शकल्याचा ) खंत आमच्या पुरती थोडीशी शमली ...
कालच्या अनुभवावरून थोडा दबकत गेलो हे खरच ....
सगळ्यांनाच भेटून फार बरे वाटले ...
1 Nov 2016 - 3:53 pm | सूड
टक्क्याला शुभेच्छा!!
1 Nov 2016 - 4:16 pm | नीलमोहर
म्हणजे आम्हाला गोग्गोड बातमी आणि लाडू मिळणार तर ... लौकरच,
बाकी कट्टा वृत्तांत भारी,
1 Nov 2016 - 4:49 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
फक्तं बातमी. लाडु बिडुला वेळ लागेल.
1 Nov 2016 - 5:02 pm | टवाळ कार्टा
उलट सुलट पण करु शकतो मी =))
1 Nov 2016 - 6:32 pm | अत्रुप्त आत्मा
टक्कूमक्कूशोनू Ssssssssssssss =))
लब्बाड.. . =)) कोण रे ती?
.
.
.
.
.
ह्या गावची का त्या गावची! =))
4 Nov 2016 - 4:04 pm | मृत्युन्जय
कोण रे ती?
नक्की का? नाही म्हणजे बातमी धक्कादायक असल्याने विचारतो ;)
4 Nov 2016 - 4:49 pm | टवाळ कार्टा
हि पाचवी ;)
1 Nov 2016 - 5:16 pm | सूड
लाडूच रे, नंतर पेढे देतात.
1 Nov 2016 - 6:49 pm | अत्रन्गि पाउस
आणि उभ्या उभ्या 10-15 मिनिटे बोलणे झाले
ओरिगामी वर एक कार्यशाळा घेणेसंबंधी एक स्वतंत्र चर्चात्मक धाग्याची गरज आहे ...
2 Nov 2016 - 1:39 pm | किसन शिंदे
भारी कट्टा झालेला दिसतोय. बाकी तिथून पाच मिनिटाच्या अंतरावर असलेल्या रांगोळी प्रदर्शनाला भेट दिली असतीत तर तुमच्या कट्ट्याला चार चांद लागले असते.
आमचे एक दादरकर मित्र त्या कोथिंबीर वडीला पीठलं वडी म्हणतात. =))
2 Nov 2016 - 2:43 pm | माझीही शॅम्पेन
अरेच्चा तुम्ही आद्य कट्टेकरी मंडळी कुठे होतात !!
कुठेशी होत हे रांगोळी प्रदर्शन ?
2 Nov 2016 - 2:54 pm | किसन शिंदे
विष्णू नगरला, १९ नंबर शाळेत.
2 Nov 2016 - 3:05 pm | सस्नेह
छान वृ. तेवढा काही स्मार्ट नाही वाटला कट्टा ! अनाहिता कट्टे यापेक्षा स्मार्टर असतात, असे खेदाने णमूद करते :(
4 Nov 2016 - 11:58 am | माझीही शॅम्पेन
ओके पण खेदाने का आनंदाने नमूद करा कि , अनाहिता कट्टे कसेही होत असले तर ते फक्त अनाहिता साठीच असतात ना :) (जंगल मी मोर नाचा ..... )
आमचं तस नाही सर्वे सुखिनः संतु टाईप्स :)
4 Nov 2016 - 12:24 pm | टवाळ कार्टा
=))
हे मोठ्या साहेबांच्या वक्तव्यासारखे वाटले..."सर्जीकल स्ट्राईक आमच्यावेळेसही होत होते" टाईप =))
4 Nov 2016 - 12:32 pm | सुबोध खरे
ळॉळ
4 Nov 2016 - 3:52 pm | पैसा
अनाहिता कट्ट्याला लोकाना मेटाकुटीला आणत नै बै आम्ही.
2 Nov 2016 - 3:12 pm | वरुण मोहिते
दरवर्षी असतं तिथे रांगोळी प्रदर्शन ..पुढच्या वर्षी तुम्ही या कट्ट्याला आपण पाहू एकत्र