दिवाळी मिपाकट्टा - ३१ ऑक्टोबर - ठाणे
तारीख - ३१ ऑक्टोबर
वेळ - सकाळी १० वाजता
ठिकाण - हॉटेल मेतकूट (राम मारुती रोड जवळ)
अपेक्षीत खर्च - १००-३५० प्रत्येकी
सालाबाद प्रमाणे यावर्षीसुद्दा ठाण्यात दिवाळी मिपाकट्टा असणार आहे...मी, डॉ.खरे, मामलेदाराचा पंखा, खटपट्या शेठ असे चौघे नक्की भेटत आहोत...भेटल्यावर गप्पा-टप्पा आणि खादाडी हा आणि हाच कार्यक्रम असेल याची इच्छूकांनी नोंद घ्यावी :)
ता.क. - कट्टा स्पॉन्सर करणाऱयांना वरील चौघांपैकी कोणाच्याही बाईकवर बसवून खादाडीच्या ठिकाणी नेण्यासाठी प्राधान्य मिळेल :D
प्रतिक्रिया
1 Nov 2016 - 12:19 am | अभ्या..
बोबो तुम्ही याचा सूड घ्या.
नुसते पुण्याच्या अमृततुल्यमध्ये किंवा नवनाथ रसपानगृहात कट्टा आहे असे सांगा आणि जाऊन बसा कुठल्यातरी खोपच्यात.
हिंडू दे हुडकत मिपाकरांना. ;)
1 Nov 2016 - 9:18 am | नाखु
सूड सोबत असल्याने आणि पुण्यातच कट्टा असल्याने तो नक्की यशस्वी होईल.
चिंचवडहून कोल्हापुरला फक्त कट्ट्यासाठी गेलेल्या पाच मिपाकरांपैकी एक नाखु
1 Nov 2016 - 3:50 pm | सूड
कोल्हापूर कट्टा परत कधी?
1 Nov 2016 - 12:22 pm | असंका
=))
31 Oct 2016 - 10:37 pm | पैसा
आता लवकरात लवकर बोबोंसाठी दुसरा कट्टा आयोजित करा आणि तो मेतकुटात नको. =))
1 Nov 2016 - 12:03 am | सुबोध खरे
दुर्दैवाने बोबो साहेबांनी मला खरड 11.05 वाजता पाठवली.पण सतत मोबाईल तपासण्याची मला सवय नाही मित्रांच्या बरोबर गप्पा मारताना तर नाहीच.
बोबो साहेबांना परत जावे लागले याबद्दल मी त्यांची माफी मागतो.
1 Nov 2016 - 12:22 am | टवाळ कार्टा
हेच ते, कट्टा सुरु असताना मोबल्याकडे लक्षच जात नाही, दिलगीर आहोत
1 Nov 2016 - 9:36 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
आँ. काल तर कटटा चालु असताना तु फोन उचललेलास की बे.
1 Nov 2016 - 12:39 pm | टवाळ कार्टा
फोन आला तर"च" उचलतो
1 Nov 2016 - 9:41 am | कंजूस
याच मेतकुटावर मागे धागा आला होता ना?
1 Nov 2016 - 9:58 am | नमकिन
येता येता बोबोच्या प्रतिसादाने घरीच थांबलो
1 Nov 2016 - 10:06 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फोटो आणि वृत्तांत छान....!
-दिलीप बिरुटे
1 Nov 2016 - 2:15 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
१०० झाले का फायनली टक्कुमक्कुशोनुचे?
एक मेतकुटाची पुडी (नं उघडलेली), एक पाकिट चकली वं इच्छुकांचा अल्बम देउन टकाचा सत्कार करणेत येत आहे.
सत्कारोत्सुक अखिलमिपाधरधागाकीपाडजिलबी संघटना, चिमण हटेला गँग संचालित.
1 Nov 2016 - 3:49 pm | सूड
बोबो यांना संस्मरणीय कट्ट्याच्या अपार शुभेच्छा!! =))