दिवाळी मिपाकट्टा - ३१ ऑक्टोबर - ठाणे

टवाळ कार्टा's picture
टवाळ कार्टा in भटकंती
27 Oct 2016 - 2:46 pm

दिवाळी मिपाकट्टा - ३१ ऑक्टोबर - ठाणे

तारीख - ३१ ऑक्टोबर
वेळ - सकाळी १० वाजता
ठिकाण - हॉटेल मेतकूट (राम मारुती रोड जवळ)
अपेक्षीत खर्च - १००-३५० प्रत्येकी

सालाबाद प्रमाणे यावर्षीसुद्दा ठाण्यात दिवाळी मिपाकट्टा असणार आहे...मी, डॉ.खरे, मामलेदाराचा पंखा, खटपट्या शेठ असे चौघे नक्की भेटत आहोत...भेटल्यावर गप्पा-टप्पा आणि खादाडी हा आणि हाच कार्यक्रम असेल याची इच्छूकांनी नोंद घ्यावी :)

ता.क. - कट्टा स्पॉन्सर करणाऱयांना वरील चौघांपैकी कोणाच्याही बाईकवर बसवून खादाडीच्या ठिकाणी नेण्यासाठी प्राधान्य मिळेल :D

प्रतिक्रिया

सूड's picture

27 Oct 2016 - 2:53 pm | सूड

शुभेच्छा!!

टवाळ कार्टा's picture

27 Oct 2016 - 3:04 pm | टवाळ कार्टा

कोणी सा.सं. आहेत का आत्ता...कट्ट्याचा दिवस ३१ ऑक्टोबर आहे....तेव्हडा बदल करून द्या =))

वेल्लाभट's picture

27 Oct 2016 - 3:06 pm | वेल्लाभट

डण

वेल्लाकाका सासं आहेत?

टवाळ कार्टा's picture

27 Oct 2016 - 3:19 pm | टवाळ कार्टा

हेच्च विचारतो

वेल्लाभट's picture

27 Oct 2016 - 3:20 pm | वेल्लाभट

होय

अत्रुप्त आत्मा's picture

27 Oct 2016 - 3:41 pm | अत्रुप्त आत्मा

कट्ट्याला हार्डिक शुभ इच्छा. ;)

तुमच्या टायपो मुळे धाग्याला भरभरुन प्रतिसाद मिळोत हीच रतिमदनाचरणी प्रार्थना!! =))

टवाळ कार्टा's picture

27 Oct 2016 - 4:46 pm | टवाळ कार्टा

रतिमदनाचरणी प्रार्थना!

=))

तरी नशीब एक अक्षर कमी आहे =))

सतिश गावडे's picture

1 Nov 2016 - 2:17 pm | सतिश गावडे

कोणते?

अत्रुप्त आत्मा's picture

27 Oct 2016 - 5:13 pm | अत्रुप्त आत्मा

@हीच रतिमदनाचरणी प्रार्थना!! ››› नीच प्रति साद! ;)

पिलीयन रायडर's picture

27 Oct 2016 - 7:02 pm | पिलीयन रायडर

रतिमदनाचरणी?????!!!!! =))

अशक्य बेक्कार वाईट्ट प्रतिसाद आहे!

बॅटमॅन's picture

30 Oct 2016 - 1:14 pm | बॅटमॅन

मेलो मेलो मेलो =)) =)) =))

(अनंगरंग आणि रिंग फॅन) बॅटमॅन.

माम्लेदारचा पन्खा's picture

27 Oct 2016 - 4:41 pm | माम्लेदारचा पन्खा

दिवाळी पाडव्याक कट्टो ठेवतंस....माजा काय होईल मायती हा तुका....?

माझीही शॅम्पेन's picture

27 Oct 2016 - 6:15 pm | माझीही शॅम्पेन

हा हा हा शेवटचा कट्टा , म्हणजे रावण दहन व्हायच पाडव्यालाच :)

टवाळ कार्टा's picture

27 Oct 2016 - 8:46 pm | टवाळ कार्टा

=))

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Oct 2016 - 5:06 pm | डॉ सुहास म्हात्रे

शुभेच्छा !

नाखु's picture

27 Oct 2016 - 5:08 pm | नाखु

आणि सचित्र सटीप वृत्तांत येऊ द्या....

अत्रुप्त आत्मा's picture

27 Oct 2016 - 5:24 pm | अत्रुप्त आत्मा

@हीच रतिमदनाचरणी प्रार्थना!! ››› नीच प्रति साद! ;)

औरंगजेब's picture

27 Oct 2016 - 6:32 pm | औरंगजेब

मला जमणार नसेल तेव्हाच कसा कट्टा ठेवता तुम्ही. २ अॉक्टोबरच्या कट्याच पण असच.एनी वे कृट्याला शुभेच्छा.

आम्हाला सोपं पडेल मग वेळ ठरवायला....।

बोका-ए-आझम's picture

27 Oct 2016 - 7:19 pm | बोका-ए-आझम

फोटो टाकायला विसरू नका. कट्टा नाही झाला तर आपापले घरातले फोटो टाका! ;)

कऊ's picture

27 Oct 2016 - 8:36 pm | कऊ

मी येऊ शकते का

टवाळ कार्टा's picture

27 Oct 2016 - 8:45 pm | टवाळ कार्टा

या की

अत्रन्गि पाउस's picture

27 Oct 2016 - 8:46 pm | अत्रन्गि पाउस

+१

बोका-ए-आझम's picture

28 Oct 2016 - 12:45 am | बोका-ए-आझम

पाऊसकाका ब-याच दिवसांनी आले.

कऊ's picture

27 Oct 2016 - 8:49 pm | कऊ

येते ...

पैसा's picture

27 Oct 2016 - 10:52 pm | पैसा

मजा करा! वृत्तांत लिहायला विसरू नका.

पण धाग्यात काय थ्रिल नाय ब्वा. छे:! पूर्वीचं मिपा र्‍हायलं नाय!

कपिलमुनी's picture

28 Oct 2016 - 1:54 am | कपिलमुनी

मापं आला तर फोटो टाक शेप्रेट !

माम्लेदारचा पन्खा's picture

28 Oct 2016 - 7:26 am | माम्लेदारचा पन्खा

कुठं लावायचाय ? आँ?

माम्लेदारचा पन्खा's picture

29 Oct 2016 - 12:46 pm | माम्लेदारचा पन्खा

धाग्याचे दुकान झाले बंद ???

माझीही शॅम्पेन's picture

29 Oct 2016 - 7:27 pm | माझीही शॅम्पेन

का रे बाबा आहे की नाही कट्टा , किती लोक फिक्स येता आहेत ? दोन्ही कडून उपाशी राहायला लागायाच नाहीतर

सुबोध खरे's picture

29 Oct 2016 - 8:00 pm | सुबोध खरे

मी, डॉ.खरे, मामलेदाराचा पंखा, खटपट्या शेठ असे चौघे नक्की भेटत आहोत.
यात शलभ आणि वरून मोहिते यांनीही येणार असे कळवले आहे.
सकाळी बायको कडून मालिश बिलीश करवून घ्या आणि मग या.

मी, डॉ.खरे, मामलेदाराचा पंखा,
सुबोध खरे - Sat, 29/10/2016 - 20:00
मी, डॉ.खरे,

तुम्ही स्वतःचा उल्लेख मी, डॉ. खरे असा करता? =))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

29 Oct 2016 - 9:04 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

कापी पेष्ट हाये की ओ ते.

यशोधरा's picture

29 Oct 2016 - 9:10 pm | यशोधरा

आँ? असं झालयं व्हय?
.
.
खरंच की! तरी मी म्हनलं की डाँ असं काय लिहायलेत..!

टवाळ कार्टा's picture

29 Oct 2016 - 8:22 pm | टवाळ कार्टा

कणीक तिंबून म्हणायचे आहे का?

क्रुपया माझा उल्लेख खटपट्या "शेठ" असा करु नका. गरीब हाये मी.

मी-सौरभ's picture

30 Oct 2016 - 8:25 am | मी-सौरभ

शुभ दिपावली!!

एक दिवस उशीरा असता तर आम्ही पण आलो असतो सहकुटुंब सहपरिवार आप्तेष्टांसह ;)
कट्ट्याला शुभेच्छा!

मी आजच जाऊन 15 20 मिनिटे वाट बघून आलो...

असो उद्या भेटूच

भेटण्याचे ठिकाण कोणते? कि हॉटेल मेतकूटलाच भेटणार आहेत?

सुबोध खरे's picture

31 Oct 2016 - 8:21 am | सुबोध खरे

व्हय महाराज

मला 10.40 am होतील पोहोचायला.फार उशीर तर नाही ना? मी ओळखणार कसं मिसळपावकरांना?

संदीप डांगे's picture

31 Oct 2016 - 10:41 am | संदीप डांगे

कट्ट्याला शुभेच्छा! आमच्याकडून बडडे पार्टी समजून कट्टा करा.. ;) =))

मी पोहोचलो. पण इथे कुणी नाही. हॉटेल 12ला उघडणार म्हणे

मी मेतकूट हॉटेलच्या बाहेर आहे. बेत कॅन्सल झाला की ठिकाण बदललंय?

प्रचेतस's picture

31 Oct 2016 - 11:33 am | प्रचेतस

भेटले का नाही ठाणेकर अजून?

नाही. अजून कुणीच फिरकलं नाही.

यशोधरा's picture

31 Oct 2016 - 11:36 am | यशोधरा

भेटून घरी गेले असतील!

यशोधरा's picture

31 Oct 2016 - 11:50 am | यशोधरा

फाश्टम फाश्ट संपवली असेल!

मी आताच खरेंशी बोललो. ते मेतकूट मधेच बसलेले आहेत.
कट्टा चालू आहे.

प्रचेतस's picture

31 Oct 2016 - 11:48 am | प्रचेतस

पुणेकरांनी निदान सर्वाना वैयक्तिकरित्या फोन करून कळवलं होतं कट्टा कॅन्सल म्हणून. मुंबईकरांमध्ये निदान तितकेही सौजन्य दिसत नाही असे खेदाने म्हणावेसे वाटते.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

31 Oct 2016 - 11:58 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

पाडव्याचा जोरदार रगडा पडलेला दिसतो म्हणुन "विसावा" घेत असावेत.

कट्टा पुण्यालाचं होउ शकतो. ठाणे बिणे सब झुठ.

(इनोपुडी) कॅजॅस्पॅ.

अाणि तोही एका अामंत्रणाच्या धाग्यावर. उगाच मुंबईला नावं ठेवू नका.

अत्रुप्त आत्मा's picture

31 Oct 2016 - 11:40 am | अत्रुप्त आत्मा

अरेरे! काय हे ठाणे कर! ;)

प्रचेतस's picture

31 Oct 2016 - 11:49 am | प्रचेतस

नैतर काय.
दिवाळीचे दिवशी फशिवतात मेले.

टवाळ कार्टा's picture

31 Oct 2016 - 2:05 pm | टवाळ कार्टा

आरारा, ठाण्यात २ मेतकूट आहेत, एकमेकांपासून २ मिनिटांच्या अंतरावर, कट्टा घंटाळी मंदिराच्या समोरच्या मेतकूटमध्ये झाला

यशोधरा's picture

31 Oct 2016 - 2:31 pm | यशोधरा

इन मिन ४-५ लोक, त्यातही नियोजन नाही! छ्या! =))

प्रचेतस's picture

31 Oct 2016 - 2:37 pm | प्रचेतस

नायतर काय.
लोक टीचभर, धागा हातभर

नाखु's picture

31 Oct 2016 - 4:23 pm | नाखु

और काथ्याकुट पाच साक्षात गब्बरही वैतागला असता तर आम्ही मिपाकर का नाही?

मिपा सांबाचा मित्र कालिया नाखुवाला

टवाळ कार्टा's picture

31 Oct 2016 - 4:49 pm | टवाळ कार्टा

पुण्याच्या परिघावर राहून स्वतः पुणेकर असल्याचे दाखवण्याची कित्ती ती हौस =))

कपिलमुनी's picture

31 Oct 2016 - 6:00 pm | कपिलमुनी

कोण पुणेकर ?
पिंचिचे कट्टे सर्वाअत फाश्ट होतात , कदीपन आव्वाज द्या ! १० टाळकी गाड्या काडून येत्यात
-----------------------------------------------------------

असंका's picture

1 Nov 2016 - 12:03 pm | असंका

तुमी पिंचिंकर काय ओ?

टवाळ कार्टा's picture

1 Nov 2016 - 12:42 pm | टवाळ कार्टा

तुमचे काही पिंचिकर काही ठरावीक जागी येण्यास बिचकतात म्हणे...भुतांची भीती वाटते त्यांना

नाखु's picture

1 Nov 2016 - 1:19 pm | नाखु

तू कधी पासून स्वतःला भूत सम्जायला लागलास ते ?

मुनीवर, आपली बिब्बा असलेली काळी बाहुली तयार आहे तू नाहीतर मीसौरभ घेऊन जा.

यशोधरा's picture

31 Oct 2016 - 6:04 pm | यशोधरा

टक्कू मक्कू शोनू, नाखुंनी म्हटलेय का तसे काही? उग्गा आपलं कायतरी, मेन पॉईंट बा़जूलाच आणि.. =))

नाखु's picture

31 Oct 2016 - 4:24 pm | नाखु

और काथ्याकुट पाच साक्षात गब्बरही वैतागला असता तर आम्ही मिपाकर का नाही?

मिपा सांबाचा मित्र कालिया नाखुवाला

अत्रुप्त आत्मा's picture

31 Oct 2016 - 6:02 pm | अत्रुप्त आत्मा

@लोक टीचभर, धागा हातभर››› आग्गागागागागा! http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-047.gif पार मार्केटयार्ड उठलं!

अत्रन्गि पाउस's picture

31 Oct 2016 - 12:58 pm | अत्रन्गि पाउस

आत्ताच घरी आलो

यशोधरा's picture

31 Oct 2016 - 1:02 pm | यशोधरा

बोबो भेटले का?

बोबो साहेबांनी कोणालाच फोन का नाही केला?

की बोबो साहेब पुण्याचे आहेत आणि मुद्दाम ठाणे कट्टा झालाच नाही असा कांगावा करत आहेत? :)

यशोधरा's picture

31 Oct 2016 - 5:56 pm | यशोधरा

अपांनाही माहित नव्हते की!

टवाळ कार्टा's picture

31 Oct 2016 - 5:58 pm | टवाळ कार्टा

अपा भेटले ओ

खटपट्या's picture

31 Oct 2016 - 5:59 pm | खटपट्या

अपा = अत्रंगी पाउस. ते तर आले होते.

यशोधरा's picture

31 Oct 2016 - 6:06 pm | यशोधरा

प्रथम ३० लाच गेले ना!

ते त्यांच्या चूकीमुळे ३० ला गेले...

टवाळ कार्टा's picture

31 Oct 2016 - 6:49 pm | टवाळ कार्टा

चूक नाही ओ, उत्सुकता

यशोधरा's picture

31 Oct 2016 - 6:50 pm | यशोधरा

ह्या, ह्या, ह्या =)) बघा! काय सांगायचे ह्यातही सुसूत्रता नाही! =))

टवाळ कार्टा's picture

31 Oct 2016 - 7:06 pm | टवाळ कार्टा

क्काय फरक पडतो? ठाण्यातल्या कट्ट्यांना मिपाकर उत्साहाने २-२ दिवस येतात, पुण्यात तर ठरलेल्या दिवशी येतो असे सांगून ऐनवेळी टांग मारतात

बोबोंना तुम्ही ठाणेकरांनी मारली तशी?

फोन नंबर नाही माझ्याकडे कुणाचाच.

अहो,फोन नंबर नाही माझ्याकडे कुणाही मिपाकराचा

माझीही शॅम्पेन's picture

31 Oct 2016 - 6:10 pm | माझीही शॅम्पेन

कट्ट्याचा वृत्तांत टाकला आहे :)

http://www.misalpav.com/node/37893

शेम टू शेम नाव असून वर एकाच एरियात असणारी हॉटेल्स यापुढच्या कट्ट्यांसाठी टाळावीत, असे आग्रहाचे णिवेदण. मला अर्धातास एकाच जागी उभा पाहून रोडच्या समोरच्या बाजूला उभे असलेले पो.मामा माझ्याकडे संशयाने पाहू लागले होते.अखेरीस अर्ध्या तासाने माझ्याबद्दल पूर्ण खात्री होऊन ते मला हटकण्यासाठी (की फटकवण्यासाठी? कोण जाणे)माझ्या दिशेने येऊ लागले तसा मी इकडेतिकडे सहज पाहात असल्याप्रमाणे हळूच तिथून काढता पाय घेतला.

तुमच्या मेतकुटापायी जीव पार मेटाकुटीला आला भौ.

टवाळ कार्टा's picture

31 Oct 2016 - 10:29 pm | टवाळ कार्टा

=))
मलापण आजच समजले की ठाण्यात २ मेतकूट आहेत, ती सुद्धा एकमेकांपासून अगदी २ मिनिटे पायी चालत जाण्याइतकी जवळ

आदूबाळ's picture

31 Oct 2016 - 10:31 pm | आदूबाळ

अरे पण एकालाही दोन मिनिटांवरच्या दुसर्‍या मेतकुटात जाऊन अन्य चुकल्या कट्टेकर्‍यांना शोधून आणावं असं वाटलं नाही का?

सुबोध खरे's picture

31 Oct 2016 - 11:55 pm | सुबोध खरे

दुसऱ्या बंद मेतकूट मध्ये कोण कशाला जाईल? आणि असे कोणी अनवधानाने करेल हा विचार कोणाला का सुचावा?

आदूबाळ's picture

1 Nov 2016 - 12:05 am | आदूबाळ

अच्छा बंद होतं होय!