गीतगुंजन २३: बॅड, बॅड, लिरॉय ब्राऊन

प्रास's picture
प्रास in जनातलं, मनातलं
27 Oct 2016 - 6:31 pm

संगीत सृष्टीमध्ये साठच्या दशकाला एक वेगळंच वलय आहे. या काळात रॉक, ब्लूज, सोल, जॅझ, कंट्री असं भावनांच्या उत्स्फूर्त कल्लोळाला कवेत घेणारं संगीत तयार झालं, आणि त्याबरोबरच तयार झाले या संगीताला शब्द देणारे गीतकार. या संगीत प्रकाराला साजेशी गीतं लिहिणं हे खरं तर तसं कसबी काम पण हा काळच असा होता की या काळाला साजेसे गीतकार तर झालेच पण कित्येक संगीतकारांनी आपल्या संगीताला साजेशी गीतरचना करण्यास सुरूवात केली.

त्यापैकीच एक गीतकार संगीतकार गायक होता जीम क्रोस. जीम लहानपणापासून संगीतात रमणारा असला तरी कॉलेजात दाखल होईपर्यंत त्याने आपल्यातल्या संगीतकार-गीतकार आणि गायकाला फारसं मनावर घेतलं नव्हतं. पेनसिल्व्हानिया राज्यातल्या व्हिलानोव्हा विद्यापीठात मानसशास्त्राचं शिक्षण घेण्यासाठी जीम दाखल झाल्यानंतर तिथे त्याने समानशीलाच्या विद्यार्थ्यांबरोबर ग्रूप बनवून क्लब्स, कॉफी हाऊस अशा ठिकाणी कार्यक्रम करायला सुरूवात केली. लोकांना जे ऐकायचंय ते, म्हणजे सोल, कंट्री, जॅझ काय वाटेल त्या प्रकारातलं संगीत तो ऐकवायचा. त्या दरम्यानच त्याने स्वतः गाणी लिहिण्यास सुरूवात केली.

दरम्यानच्या काळात क्रोस काही काळासाठी सैन्यदलात होता. तिथे त्याला भेटला लिरॉय, अंगाने आडवातिडवा असलेला लिरॉय डोक्याने यथातथाच होता पण मनाने अगदी भोळा होता. जणू जीवनातले छक्केपंजे ठाऊकच नसावेत. त्याला सैन्यातली नोकरी काही मानवली नाही आणि एक दिवस त्याने स्वतःच स्वतःला सुट्टी दिली. तो आपल्या घरी निघून गेला. त्याचा महानपणा असा की महिन्याच्या शेवटी साहेब, आपला, जितके दिवस काम केले तितक्या दिवसाचा पगार घ्यायला पुन्हा कामाच्या जागी आले आणि सैन्याच्या नियमाप्रमाणे त्यांना हातकड्या घालून अटक झाली.

Jim Croce

जीमने तेव्हाच ठरवलं की आपल्या या मित्रावर एक गाणं करायचं. ते गाणं म्हणजेच जीमचं, "बॅड, बॅड, लिरॉय ब्राऊन." या लिरॉय ब्राऊनलाही गाण्यात पूर्वी नसलेलं ज्ञान मिळताना जीमने दाखवलंय. गाण्यातली ही गोष्ट फारच मजेशीर आहे. ती समजण्यासाठी आपल्याला हे गाणं ऐकलंच पाहिजे आणि त्याच्या अ‍ॅनिमेटेड विडीओसाठीसुद्धा.

जीमचं हे बिलबोर्ड यूएस काऊन्टडाऊनमधलं पहिलं, क्रमांक एकचं गाणं होतं.

गीत

Well the South side of Chicago
Is the baddest part of town
And if you go down there
You better just beware
Of a man named Leroy Brown

Now Leroy more than trouble
You see he stand 'bout six foot four
All the downtown ladies call him "Treetop Lover"
All the men just call him "Sir"

And it's bad, bad Leroy Brown
The baddest man in the whole damned town
Badder than old King Kong
And meaner than a junkyard dog

Now Leroy he a gambler
And he like his fancy clothes
And he like to wave his diamond rings
In front of everybody's nose
He got a custom Continental
He got an Eldorado too
He got a 32 gun in his pocket for fun
He got a razor in his shoe

And it's bad, bad Leroy Brown
The baddest man in the whole damned town
Badder than old King Kong
And meaner than a junkyard dog

Now Friday 'bout a week ago
Leroy shootin' dice
And at the edge of the bar
Sat a girl named Doris
And oo that girl looked nice
Well he cast his eyes upon her
And the trouble soon began
'Cause Leroy Brown learned a lesson
'Bout messin' with the wife of a jealous man

And it's bad, bad Leroy Brown
The baddest man in the whole damned town
Badder than old King Kong
And meaner than a junkyard dog

Well the two men took to fighting
And when they pulled them off the floor
Leroy looked like a jigsaw puzzle
With a couple of pieces gone

कलासंगीतप्रकटनआस्वाद

प्रतिक्रिया

झक्कास! टाईम इन अ बॉटलवर पण लिहायचं ना.
https://www.youtube.com/watch?v=AnWWj6xOleY

आणि स्पिन, स्पिन, स्पिन हेही.