हेअर कलरींग - भाग - २

कविता१९७८'s picture
कविता१९७८ in जनातलं, मनातलं
26 Oct 2016 - 5:04 pm

चला आता सुरुवात करुया मेंदी ने .

१) दुकानातुन हातावर लावण्यासाठी वापरात येणारी मेंदी पावडर आणावी.

२) लोखंडाच्या कढईत आपल्या केसांच्या लांबी च्या प्रमाणात मेंदी घ्यावी.

३) पाण्यामधे चहा पावडर किंवा कॉफी उकळुन (मी कॉफी वापरते) त्यात मेंदी कमीतकमी दोन तास भिजवावी. अति पातळ भिजवु नये की जेणेकरुन लावताना सतत खाली ओघळत राहील.

४) केसांच्या पोषणासाठी आवळा पावडर , गवळा कचरी (नाव चुकत असेल तर सांगा प्लीज) , नागर मोथा, वाळा अशा हर्बल पावडरी मिसळणे,

आता मेंदी लावण्याची तयारी.

१) एक जुने फडके पाठीला गुंडाळाण्यासाठी म्हणजे मेंदी लावताना कपड्यांवर पडली तर रंगायला नको.

२) कापसाची मोठी लडी

३) शॉवर कॅप

४) मेंदी / डाय लावण्याचा ब्रश

५) जुना टॉवेल

६) कंगवा

७) आरसा

८) शक्य असेल तर अजुन एक आरसा मागचा भाग पाहण्यासाठी (ऑप्शनल)

९) रबरी हातमोजे

कृती : - (स्वतःच्या केसांवर स्वतः लावायची कृती - खुप लहान केसांसाठी (पुरुषांसाठी)

१) केसाला तेल लावले असेल तर मेंदी लावण्याच्या दिवशी केस स्वच्छ धुवुन घ्यावेत.

२) समोर आरसा ठेवावा.

३) जुना फडका पाठी मागच्या भागांवर गुंडाळावा.

४) पुर्ण केसांवर कंगवा फीरवुन गुंता काढुन घ्यावा.

५) रबरी हातमोजे घालावेत.

६) समोरुन सरळ भांग पाडावा.

.

७) भांगेच्या दोन्ही बाजुला ब्रश ने मेंदी लावावी.

८) डाव्या बाजुला आधी पाडलेल्या भांगाच्या शेजारि दुसरा भांग पाडावा , भांगेच्या दोन्ही बाजुला ब्रशने मेंदी लावावी.

.

९) अशा प्रकारे भांग पाडुन डाव्या बाजुला पुर्ण मेंदी लावुन घ्यावी.

१० ) आता उजव्या बाजुला ही अशाच प्रकारे मेंदी लावावी. उरलेली मेंदी केसांना सर्व बाजुंनी व्यवस्थित लावुन घ्यावी.

..

..

११) पुर्ण मेंदी लावली की हेअरलाईनला कापसाची लडी गुंडाळा जेणेकरुन मेंदी खाली ओघळणार नाही.

..

..

१२) डोक्याला शॉवर कॅप किंवा प्लॅस्टीकची पिशवी गुंडाळावी .

१०) साधारण दोन तास झाले की केस स्वच्छ धुवुन काढावेत. (लगेचच शाम्पु करु नये).

११) जुन्या टॉवेल ने पुसावेत आणि तोच टॉवेल गुंडाळुन ठेवावा नाहीतर केस सुके पर्यंत लालसर रंग कपड्यांना लागतो.

१२) दुसर्‍या दिवशी शाम्पु करु शकता.

कृती : - (स्वतःच्या केसांवर स्वतः लावायची कृती - मोठ्या केसांसाठी )

१) केसाला तेल लावले असेल तर मेंदी लावण्याच्या दिवशी केस स्वच्छ धुवुन घ्यावेत.

२) समोर आरसा ठेवावा.

३) जुना फडका पाठी मागच्या भागांवर गुंडाळावा.

४) पुर्ण केसांवर कंगवा फीरवुन गुंता काढुन घ्यावा.

५) रबरी हातमोजे घालावेत.

७) समोरुन सरळ भांग पाडावा.

८) डोक्याच्या मध्यभागावरुन थोडे केस कंगव्याने घेउन ब्रश ने मेंदी त्या केसांच्या सर्व गोलाकार बाजुंना मुळापासुन ते शेपटापर्यंत लावावी व त्या केसांची मध्यावर गुंडाळी बसवावी.

..

..

९) बाजुचे थोडे केस घेउन त्या केसांच्या सर्व गोलाकार बाजुना मुळापासुन ते शेपटापर्यंत लावावी व त्या केसांची गुंडाळी मध्यावर बसवलेल्या आधीच्या गुंडाळीचा कडेला फीरवावी / बसवावी.

..

१०) असे थोडे थोडे केस घेउन , मेंदी लावुन गुंडाळी करुन शेवटी केसांवर टोप बसवावा. उरलेली मेंदी व्यवस्थित सर्व बाजुंनी लावुन घ्यावी.

..

११) पुर्ण टोप झाल्यावर पुढच्या भागावर मेंदी ओघळुन समोर चेहर्‍यावर येउ नये म्हणुन कापसाची लडी बसवावी व पुर्ण डोक्यावर शाॅवर कॅप बसवावी.

..

१२) साधारण दोन तास झाले की केस स्वच्छ धुवुन काढावेत. (लगेचच शाम्पु करु नये).

१३) जुन्या टॉवेल ने पुसावेत आणि तोच टॉवेल गुंडाळुन ठेवावा नाहीतर केस सुके पर्यंत लालसर रंग कपड्यांना लागतो.

१४) दुसर्‍या दिवशी शाम्पु करु शकता.

कलामाहिती

प्रतिक्रिया

एस's picture

26 Oct 2016 - 6:06 pm | एस

धन्यवाद.

उपयुक्त माहिती! छान समजावून सांगितले आहे.
मला एक विचारायचे होते कि केसांना नेहेमी कलर करत असताना जर कधि मेंदी लावावीशि वाटली तर चालते का?नंतर कलर ला काहि प्रोब्लेम नाहि ना येत.