काल सकाळी- सकाळी मोर्निंग वॉकला गेलो होतो गाडीवरून. अहो म्हणजे, गाडीवरून बागेत गेलो आणि तिथे मोर्निंग वॉक/योग केले.
तिथून घरी परत येत असताना एका गल्लीमध्ये गाडी नेली. तेव्हा तेथील एक कुत्रे जे खरे तर माझ्या वाटेवर नव्हते ते उगाच पळायला लागले. त्याची एवढी घाबरगुंडी उडाली की पळता-पळता ते बरोबर गाडीच्या समोर आले आणि आणखीन घाबरून जोरात पळू लागले.
वास्तविक पाहता मुळात कुत्र्याने माझी गाडी आली म्हणून पळण्याची गरज नव्हती कारण ते तसेही वाटेत येत नव्हते. मात्र नंतर त्याच्या चुकीच्या अस्वस्थतेमुळे ते विनाकारण गाडीसमोर (संकटासमोर ) धावू लागले.
ज्याप्रमाणे वरील प्रसंगात कुत्रे जर बाजूला जाऊन शांतपणे उभे राहिले असते तर त्याला घाबरण्याचे काहीच कारण नव्हते. तसेच असे असंख्य प्रसंग असतात जिथे आपण स्वत:हून संकटाच्या पुढे उडी मारतो आणि मग पळत सुटतो.
आयुष्यात बऱ्याचदा संकट आपल्यापाठीमागे नाही तर आपण संकटासमोर पळत असतो !!!
प्रतिक्रिया
7 Oct 2016 - 11:14 am | सतिश गावडे
सुंदर मौलिक विचार.
आपण स्वत:हून संकटाच्या पुढे उडी मारुन मग पळत सूटायला नको. तिथेच थांबून त्याचा सामना करायला हवा.
7 Oct 2016 - 5:29 pm | महेश_कुलकर्णी
धन्यवाद सतीशजी.
7 Oct 2016 - 4:08 pm | एस
पण संकट का पळत असते? एकाच जागी थांबायचे ना!
7 Oct 2016 - 5:27 pm | महेश_कुलकर्णी
आपण ज्याला बऱ्याचदा संकट समजतो ते आपल्यावर येणारे संकट नसतेच तर ते आपण घाबरून मनात तयार केलेले संकट असते.
जसे कुत्रासाठी मी काय संकट नव्हतो पण गाडी अंगावर येण्याच्या भीतीने ते विनाकारण पळत सुटले.
7 Oct 2016 - 7:05 pm | प्राची अश्विनी
:):)
7 Oct 2016 - 7:12 pm | आदूबाळ
सुंदर विचार आहेत.
7 Oct 2016 - 7:27 pm | जावई
पटलं.
7 Oct 2016 - 8:16 pm | बाजीप्रभू
कुत्रा घाबरून(च) गाडीच्या पुढे पळतोय असं कन्क्लुजन कसं काढलं?
मलाही रोज सायकलिंग करतांना एक कुत्रा मधेच येऊन मागे लागायचा. पण नंतर नंतर लक्षात आलं कि त्याला फक्त माझ्या पुढे जाण्यात इंटरेस्ट असायचा.
8 Oct 2016 - 12:27 pm | महेश_कुलकर्णी
ज्या पद्धतीने ते पळत होते त्यावरून त्याला स्पर्धा करणे हा हेतू नसून जीव वाचवणे हा हेतू आहे हे लक्षात येत होते.
7 Oct 2016 - 9:58 pm | योगी९००
बर्याच वेळेला हायवेवर कुत्रे मरून पडलेले पाहीलेत. असे काही पाहील्यावर मनात सर्वप्रथम ज्याने कोणी मारले त्या ड्रायव्हरसाठी शिव्याच आल्या.
पण एकदा डोळ्यासमोर एक कुत्रा मरताना बघीतला आणि गैरसमज दुर झाला. गणपतीपुळ्याच्या आरे-वारे रोडवर सकाळी ७ वाजता असाच चालत होतो. दुरून एक कुत्रा उगाचच माझ्यावर भुंकला. मी घाबरून रस्त्याच्या कडेला उभा राहीलो. त्याच वेळी एक टेंपो रस्त्यावर आला. कुत्रा तसा रस्त्याच्या साईडलाच होता. जसा टेंपो जवळ आला तसा काहीही कारण नसताना कुत्रा भुंकत भुंकत त्या टेंपोच्या समोर गेला आणि चाकाखाली आला. अर्थात मला वाईट वाटले पण त्याच वेळी त्या कुत्र्याचा रागपण आला. हेच जर टेंपोऐवजी रिक्षा किंवा स्कुटर असती तर ती त्या कुत्र्यामुळे त्यांना अॅक्सींडेंट पण झाला असता.
7 Oct 2016 - 10:04 pm | चित्रगुप्त
कुत्र्यांकडूनही बरेच काही शिकते येण्यासारखे आहे, हे वाचून गहिवरून आले.
7 Oct 2016 - 11:32 pm | माम्लेदारचा पन्खा
संकटाऐवजी बैल मागे लागलाय असं समजा...मग आपोआप पळायला जोर येईल !
8 Oct 2016 - 12:30 pm | महेश_कुलकर्णी
बैल मागे लागला हे संकटच आहे ना भौ
8 Oct 2016 - 2:41 pm | माम्लेदारचा पन्खा
जागेवर उभे राहिलो तर तिथेच स्मारक नाही का उभारलं जाणार आपलं.....!
8 Oct 2016 - 2:47 pm | महेश_कुलकर्णी
बैल मागे लागला असेल तर तिथे का उभे राहायचे???
8 Oct 2016 - 2:47 pm | महेश_कुलकर्णी
बैल मागे लागला असेल तर तिथे का उभे राहायचे???
8 Oct 2016 - 2:47 pm | महेश_कुलकर्णी
बैल मागे लागला असेल तर तिथे का उभे राहायचे???
8 Oct 2016 - 3:08 pm | महेश_कुलकर्णी
बैल मागे लागला असेल तर तिथे का उभे राहायचे???
8 Oct 2016 - 3:32 pm | माम्लेदारचा पन्खा
अभिनंदन !
8 Oct 2016 - 3:09 pm | महेश_कुलकर्णी
माझी वरील प्रतिक्रिया ४ वेळा आली, असे का झाले माहिती नाही.
7 Oct 2016 - 11:54 pm | रातराणी
:)
8 Oct 2016 - 9:17 am | नाखु
उत्तम विचार आणि अम्ही केलेले संकलन.
या बाबत त्या कुत्र्याचे काय विचार आहेत ते पाहणे रोचक व विचारप्रवर्तक ठरेल...
जर तुम्ही भाजपाचे असाल तर ते कुत्रे राष्ट्रवादी/आपचे असावे,तुम्ही आपचे असाल तर ते भाजपा/कॉन्ग्रेसचे असावे,तुम्ही राष्ट्रवादीचे असाल तर ते सेनेचे/भाजपाचे/कॉन्ग्रेसचे असावे जर तुम्ही सामान्य असाल तर तेही सामन्यच (पक्षविरहित असावे).
ही कुत्र्यांच्या रस्त्यावर फिरण्याच्या मूलभूत हक्कांवर गदा आहे,जर फिरण्यावरच बंदी आणली तर त्यांनी तंगडे वर करायचे कुठे? आणि हल्ली फारसे खांबही दिसत नाहीत शहरात.
8 Oct 2016 - 12:29 pm | महेश_कुलकर्णी
लैच राजकीय विनोदी राव तुम्ही
8 Oct 2016 - 12:43 pm | सिरुसेरि
बरेचदा काल्पनीक संकटाच्या भीतीने मनुक्श आधीच हातपाय गाळुन बसतो . खुप वर्षांपुर्वी पॄथ्वीवर स्कायलॅब कोसळणार या भीतीने सगळेच घाबरुन गेले होते .
8 Oct 2016 - 12:57 pm | महेश_कुलकर्णी
बरोबर,अगदी हेच मला जाणवले.
8 Oct 2016 - 1:02 pm | हेमन्त वाघे
भू भू
भाव भाव
मियाव मियाव