२०१६ हे वर्ष संपायला आता सध्याचा महिना धरुन ४ महिने बाकी आहेत्,आणि या ४ महिन्यात अनेक घडामोडी जागतिक स्तरावर पहावयास मिळतील.पुढीच्या ३ वर्षात जगाचे चित्र फार मोठ्या प्रमाणात बदलले असेल असा माझा अंदाज असुन आर्थिक संकटाचे मोठे स्वरुप पहायला मिळेल असे दिसते.
जगभरात नोकरी कपात होण्याचे प्रमाण लक्षणीय वाढलेले दिसले, यापुढे ते अजुन वाढेल असेही दिसुन येते.जगामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक अस्थिरता अनुभवायला मिळत असुन काही ठिकाणी भयानक अवस्था आहे ! उदा. व्हेवेज्युल्या मधे लोकांनी कुत्रे, मांजर, कबुतर तसेच अगदी प्राणि संग्रालयात जाउन प्राणी खाल्ले आहेत, स्वतःच्या पाळीव प्राण्यांना देखील त्यांना वार्यावर सोडावे लागले आहे,कारण स्वतःच्याच अन्नपाण्याची भ्रांत निर्माण झाली आहे.
कर्जात आकंठ बुडालेली अमेरिका ऑफिशली १९.५ ट्रिलीयनच्या कर्जात पोहचली असुन, मी हल्ली भिकारी अमेरिका असा उल्लेख करण्यास सुरुवात केली आहे. { http://www.usdebtclock.org }स्टुडंट लोन क्रायसिस, प्रॉपर्ट्री रेट कोलॅप्स,वांशिक अस्थिरता यातच अमेरिकेतील आउट स्टँडिंग ऑटॉ लोन्सनी १ ट्रिलीयना टप्पा पार केला ! अशा अवस्थेत तिथे निवणुका होणार असुन त्याचे परिणाम खरोखरच पाहण्या सारखे असतील.किंग डॉलर ३० सप्टेंबर २०१६ पासुन त्याची सद्दी संपताना पाहण्यास सुरुवात करेल अश्या काहीशा बातम्या जालावर वाचण्यात आल्या असुन यापुढे तुम्हाला जागतीक आर्थकारणात एसडीआर हा शब्द जास्त वेळा वाचायला मिळेल असे मला वाटते. फेड ची न्यूज आली कि मार्केट खाली पडते, ही गोष्ट नवीन राहिली नसुन त्यांनी स्वतःचे फेसबुक पे़ज काढुन स्वतःचेच जगभर हसे करुन घेतले आहे,त्यांच्या पानावरच्या प्रतिक्रिया अर्थातच वाचनिय आहेत.
सौदी अरेबिया बद्धल काही दुवे मी आधीच्या धाग्यांमध्ये दिले असुन त्यांची देखील चांगलीच पुंगी वाजली आहे, हल्लीच त्यांनी त्यांच्या देशातील १० हजार इमांमांना नोकरी वरुन काढुन टाकले.
रशिया मोठ्या प्रमाणात मिलेटरी ड्रिल्स करत असुन साउथ चायना सी मध्ये पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात ड्रिलस मध्ये सहभागी होत आहे, तसेच शीतयुद्धा नंतर पहिल्यांदा रशियाने ट्रेनचा वापर करुन टँक्स आणि इतर युद्ध विषयक सामुग्रीची मुव्हमेंट केल्याचे दिसुन आले.
चीन मध्ये आर्थिक स्थिती योग्य नसल्याचे स्पष्ट झाले असुन चीनी बँकांनी आत्ता पर्यंत २२ हजारांहुन अधिक कर्मचार्यांना नारळ दिला आहे,आणि या पुढेही विविध इंडस्ट्री मधुन मनुष्यबळ कमी केले जाईल.
आपलं म्हणाल तर निर्यात कमी आणि आयटी क्षेत्राला मोठा फटका अशी स्थिती असुन,डि़जिटल क्रांतीच्या गप्पा चालु आहेत. परंतु आपल्या इथे मिनिमम ब्रॉडबँड हा 512 Kbps असुन, हाच सगळ्यात मोठा विनोद आहे. जगात डिजिटल क्रांतीत टिकुन राहण्यासाठी मिनिमम २ एमबिपीस चा स्पीड असायलाच हवा अन्यथा इंडिया शायनिंगची जी गत झाली तीच डिजिटल इंडियाची होइल याची जाणिव सत्तेत असल्या मंडळींनी वेळीच झाली पाहिजे.
आधिचे भाग :-
जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-२ }
जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण
* संपादक मंडाळाला आधीच्या धाग्यात दिलेल्या व्हिडियोजची साईझ कमी करण्यासाठी मदत हवी आहे असा व्यनी केला होता, त्यावर अजुन देखील त्यांचे उत्तर आलेले नाही. याचा खेद वाटतो असे इथे नमुद करु इच्छितो.
प्रतिक्रिया
13 Sep 2016 - 1:25 pm | खेडूत
वेगळ्या धाग्यासाठी धन्यवाद.
हा धागा सर्वाधिक वाचायला आवदतो, कारण बदलत्या परिस्थितीचे आपल्यावर थेट परिणाम काय होतील याबद्दल विविध विषय आणि अवांतर वाचायला मिळते. जाणकारांनी थोडा वेळ देऊन आपले मत आणि माहिती द्यावी. नुसत्या दुव्यांपेक्शा कांही माहिती दिल्यास समजायला मदत होईल.
एकूण नकारात्मक चित्र दिसत असले तरी ते तितकेच नसते असा पूर्वानुभव आहे. जागतिक समस्या आपल्यासाठी संधी आणतात का हे पाहाणे महत्वाचे आहे. सामान्य माणसाने या परिस्थितीत काय करावे याचे मार्गदर्शन व्हावे...
13 Sep 2016 - 3:47 pm | श्री गावसेना प्रमुख
एकुणच उपासमारिचा काळ जवळ येतोय असे गृहीत धरावे काय.
13 Sep 2016 - 4:01 pm | माम्लेदारचा पन्खा
त्याला आभाळ पडलं म्हणण्यात काही अर्थ नाही....
15 Sep 2016 - 11:27 am | मदनबाण
साउथ कोरियाच्या Hanjin Shipping Co ने ३१ ऑगस्टला बँक्रप्सी फाईल केली आणि जागतीक बाजारात अस्थिरतेची अजुन एक लाट उसळली, कारण ही कंपनी जगातल्या सर्वात मोठ्या कंटेनर कॅरिअर मधील ७ व्या क्रमांकाची कंपनी आहे.सध्या या कंपनीची अनेक दैत्याकार जहाजे { जवळपास ८० } एकतर समुद्रातच हेलखावे खात उभी आहेत, काही विकली जात आहेत, काही सिल्ड करण्यात आली आहेत तर काहींचा बंदरात लागण्याचा प्रयत्न चालु आहे.जगातला जवळपास ८०% टक्के व्यापार हा समुद्र मार्गे होतो, त्यापैकी Hanjin चा ३% व्यापारी हिस्सा आहे. २० ते २५ हजार कंटेनर्स आठवड्याला मुव्ह करणार्या या कंपीनीची ही अवस्था झाल्यामुळे अर्थातच त्याचा जागतीक इंपोर्ट / एक्स्पोर्टवर परिणाम झाला असुन अमेरिकेच्या डोक्याला अजुन एका नव्या त्रासाची लागण झाली आहे.
संदर्भ :- Hanjin crisis brings new headache to U.S. importers; trailer shortage looms
काही दिवसांपूर्वी चीन मध्ये जी-२० बैठक झाली, आणि ती सुरु होण्या आधीच चीन ने त्याची खेळी खेळली, ती म्हणजे अमेरिकेचे ओबामा यांना त्यांच्या विमानातुन खाली उतरण्यासाठी शिडीच देण्यात आली नाही ! तसेच त्यांच्यासाठी रेड कार्पेट सुद्धा अंथरण्यात आले नव्हते.एअर फोर्स १ या त्यांच्या विमानाच्या मागच्या दरवाजाने त्यांना खाली उतरण्यास भाग पाडण्यात आले.
ज्या प्रमाणे युद्धाची तयारी दिसत आहे त्याच प्रमाणे पोलिटिकल वॉर सुद्धा जोरात असुन चीन ने हे जगाला दाखवुन दिले "थिस इज अवर कंट्री". चीन बरोबर इराण देखील हीच पद्धत वापरत आहे आणि अमेरिकेच्या युद्ध नौकांच्या अगदी जवळ स्वतःच्या छोट्या नौका नेउन त्यांची टिंगल करत आहे, यात अमेरिकेकडुन त्यांचे सौनिक सोडवण्यासाठी कॅश मधे पैसे घेणे, अमेरिकेच्या सौनिकांचे { बहुधा नौदलातील } रडतानाचे व्हिडियो शुट करुन रिलीज करणे इं उध्योगांचा समावेश आहे.
आपण सध्या ज्या काळात वावरत आहोत तो कमालीचा अस्थिरतेचा असुन आपण अमेरिकेची सर्वच बाबतीत अधोगती होताना पाहतो आहोत / पाहणार आहोत. वि आर विटनेसिंग कॉलॅप्स ऑफ अ एंपायर.
टेक्नॉलॉजी / आर्थीक / व्यापारी आणि मॉनिटरी शिफ्टचा काळ आपण पाहत असुन अमेरिकेच्या जागतिक दादागिरीची सद्दी संपताना आपण पाहणार आहोत.
येत्या ऑक्टोबर मध्ये २ मोठ्या घडणार आहे, त्या म्हणजे
१}आएमएफ { इंटरनॅशनल मॉनेटरी फंड} च्या रिझर्व्ह करंन्सीच्या बास्केट मधे चीनच्या Yuan ची ऑफिशली एंन्ट्री होइल !
२}अमेरिकेच्या इंटरनेट कंट्रोलचे हस्तांतरण
Yuan आयएमएफच्या एसडीआर { स्पेशल ड्रॉइंग राईट्स } बास्केट मध्ये १ ऑक्टोबर २०१६ पासुन ऑफिशिअली अॅड केले जाईल,चीन त्याच्या दिर्घकाळ चालणार्या खेळीसाठी आता तयार झाला असुन तो हळु हळु पद्धतीने डॉलरला रिप्ल्सेस करेल याची शक्यता आता बळावत जाईल आणि म्हणुनच किंग डॉलर ३० सप्टेंबर २०१६ पासुन त्याची सद्दी संपताना पाहण्यास सुरुवात करेल असे मी वरती म्हंटले आहे.ही तारिख पुढे डेथ ऑफ डॉलर म्हणुन ओळखली जाईल का ?
अमेरिकेच्या सरकारचा इंटरनेटच्या व्यवस्थित फंक्शन होण्यासाठी लागणार्या क्रिटीकल सिस्टीमचा IANA कडे गेले २० वर्ष असलेला कॉन्ट्रॅक्ट ३० सप्टेंबर २०१६ ला संपणार असुन त्याचा ताबा ICANN कडे हस्तांतरीत केला जाईल.
अमेरिकेत याला अर्थातच विरोध होत असुन त्यात Ted Cruz हे या विरोधात पुढे आहेत.
सध्या अमेरिकन मिडिया हिलरीच्या तब्येतीच्या चर्चेनी रंगुन गेलेला असताना तिकडे रशिया आणि चीन एकत्र लाईव्ह सी-ड्रील्स करताना दिसत आहेत.फेड रेट हाईक करेल का ? हिलरी मध्येच माघार घेइल का ? ट्रंम्प निवडुन येतील का ? निवडणुका होण्या आधी किंवा त्या नंतर किती काळ चालु असलेली सिस्टीम ज्याला अमेरिका इतके वर्ष रिकव्हरी { ग्रोथ नव्हे } म्हणत आली आहे ती कोलमडेल का ? आणि सर्वात महत्वाचे स्वतःचे एंपायर कोसळणे थांबवण्याच्या प्रयत्नात अमेरिका युद्धखोरी करेल का ? इराण / नॉर्थ कोरिया / रशिया / चीन या पैकी कोण अमेरिकेवर पहिला इएमपी हल्ला करेल का ?
या वरील सर्व प्रश्नांची उत्तरे अर्थातच आपल्याला आपल्या पुढे असलेल्या भविष्यकाळात मिळतील...
संदर्भ :-
Yuan’s Inclusion in SDR Currency Basket Bolsters Global Financial System
Yuan’s SDR Inclusion – Right Time, Right Place
Yuan’s inclusion in SDR likely to lead to capital flows of $31 billion for direct allocation
'Broader use of SDR can play role in reforming global system'
Replacing The U.S. Dollar with an SDR Note “Remains the Overriding Vision”
China calls for new global currency
आएमएफ एसडीआर :-
Special Drawing Right SDR
Q&As on the New SDR Basket that Comes into Effect October 1, 2016
इंटरनेट हँड ओव्हर :-
Tech Giants Urge US Congress to Speed Up Internet Handover to Int’l Agency
Fight over internet handover to ICANN goes right down to the wire
Cruz: Obama officials could face jail for internet ‘handover’
जाता जाता :- ९/११ होउन १५ वर्ष झाली, २८ क्लासिफाईड पेजेस रिलीक करण्यात आली,सेनेट ने सौदीला कोर्टात खेचण्यासाठी ओके म्हंटले, तरी सुद्धा शांतीचे नोबेल विजेता आणि सौदीला Weapons worth $115 का ऑफर करत आहेत ?ते व्हिटो वापरतील का ? सौदी फक्त पोकळ धमकी देउ शकतो कि अजुन काही अधिक ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- H2WOE India's Water Crisis: A Warning To The World
15 Sep 2016 - 11:49 am | सुबोध खरे
हानजिन शिपिंगचे दिवाळें वाजले आणि जागतीक बाजारात अस्थिरतेची अजुन एक लाट उसळली
पण बाल्टिक ड्राय इंडेक्स तर गेले अकरा महिने चढताच होता हे कसे?
http://www.economiccalendar.com/2016/09/13/baltic-dry-index-falls-after-...
15 Sep 2016 - 11:55 am | मदनबाण
बाल्टिक ड्राय इंडेक्स
या बद्धल मी आधीच्या धाग्यात दुवे दिलेले आहेत {परस्पर विरोधी }
बाकी तुमच्या प्रश्नाचे उत्तर इथे मिळते का ते पहा :-
About That "Surge" In The Baltic Dry Index
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- H2WOE India's Water Crisis: A Warning To The World
15 Sep 2016 - 12:04 pm | सुबोध खरे
ते पाहिलं होतं
पण ते एप्रिल मधील आकडे आहेत.
"डेड कॅट बाऊन्सिंग" यानंतरहि पाच महिने बाल्टिक ड्राय इंडेक्स चढताच राहिला आहे.
15 Sep 2016 - 1:13 pm | मदनबाण
ओक्के,जर यावर काही अधिक मिळाले तर नक्की देइथ इथे.
Iron Ore, Rebar Crash Into Bear Market, Baltic Dry Dead-Cat-Bounce Dies
Global Supply Chains Paralyzed After World's 7th Largest Container Shipper Files Bankruptcy, Assets Frozen
हानजिन शिपिंगचे दिवाळें वाजले असल्यामुळे मी जागतीक बाजारात अस्थिरतेची अजुन एक लाट उसळली आहे असे म्हंटले आहेत, याचे परिणाम अजुन समोर यायचे आहेत, अमेरिकेत काही काळाने सुट्ट्यांचा आणि खरेदीचा काळ येइल तेव्हा विकण्यासाठी इंपोर्ट ऑर्डर दिलेला तो माल पोहचला तर पाहिजे ना !
बादवे वॉलमार्ट ७००० लोकांना नारळ देण्याच्या तयारीत आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- H2WOE India's Water Crisis: A Warning To The World
15 Sep 2016 - 5:29 pm | तुषार काळभोर
अशा परिस्थितीत पुढचे साम्राज्य कोण होऊ शकते?
रशिया की चीन?
ईयु कडे ती क्षमता आहे/होती, पण सध्या तरी ईयु फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचे चित्र दिसतेय.
भारताच्या दृष्टीकोनातून अमेरिकेची जागा कोणी घेणे सर्वात फायद्याचे राहील?
15 Sep 2016 - 9:22 pm | मदनबाण
रशिया की चीन?
सध्या तरी चीन असे म्हणीन, कारण मला वाटतं जगातला सगळ्यात मोठा मँन्युफॅक्चरींग बेस चीन मधेच आहे.आजच्या घडीला अमेरिकेत मिळणारी पेन्सील सुद्धा मेड इन चायना आहे.
साल २००० पासुन अमेरिकेने त्यांचे ५ मिलिअन जॉब्स घालवले आहेत. अमेरिका इंडस्ट्री इकॉनॉमी मधुन पेपर इकॉनॉमी मधे गेला आहे. Detroit ही ग्रेटेस्ट मॅन्यूफॅक्चरिंग सिटी मधुन भयाण जागा अशी झाली आहे !
U.S. has lost 5 million manufacturing jobs since 2000
What caused the decline of Detroit?
Detroit Bankrupt: To See Detroit's Decline, Look at 40 Years Of Federal Policy
अगदी ताजं उदाहरण आजचच घ्या :-
Ford shifting all U.S. small-car production to Mexico
चीन सगळ्याच बाबतीत सध्या पुढे आहे, मग ती बुलेट ट्रेन असो वा जगातला सगळ्यात वेगवान सुपर कॉप्युटर. चीन कम्युनेकशन टेक्नॉलॉजी मध्ये सुद्धा प्रचंड पुढे गेला असुन ते आता स्वतःचे एअरक्राफ्ट इंजिन तयार करु लागले आहेत. एव्हढच काय पण त्यांनी जगातला पहिला क्वांटम सॅटेलाइट सुद्धा लॉन्च केला आहे ज्याने हॅक प्रुफ कम्युनेकेशन शक्य झाले आहे.
चीनची राजकिय ताकद प्रचंड वाढली असुन साउथ चायना सी वादाच्या निर्णयावर आलेल्या निकालाला त्यांनी सरळ फाट्यावर मारले आहे.युके ने चीनी अणुभट्ट्याना स्किक्युरिटीच्या नावावर टोलवण्याचा प्रयत्न केला होता त्याला आत्ताच काही वेळा पूर्वी अप्रुव्हल दिले आहे.
रशिया सुद्धा मागे नाही, डिफेन्स इक्विमेंट टेक्नॉलॉजी मधे ते फार पुढे आहेत.ते वर्ल्ड फुड हब होण्याच्या मार्गावर आहेत.
ईयु कडे ती क्षमता आहे/होती, पण सध्या तरी ईयु फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचे चित्र दिसतेय.
हॅहॅहॅ... जर्मनीचीच स्थिती पहा !
German Savers Lose Faith in Banks, Stash Cash at Home
Germans Wary of Banks Are Rushing to Buy Home Safes to Stash Cash
हीच स्थिती जपानची सुद्धा आहे.
संदर्भ :-
China plans to produce its own aircraft engines
China Launches World’s First Quantum Satellite
China launches world's first quantum science satellite
China's quantum satellite enables hack-proof communications
China's Quantum Satellite Could Change Cryptography Forever
China’s new quantum satellite will try to teleport data outside the bounds of space and time
U.K. approves controversial Chinese-financed nuclear reactor despite fears over British vulnerability
China to build nuclear reactor in Essex after Hinkley deal approved
Russia set for record grain production in 2016 - UN
Russia seeks to become the world’s largest exporter of GMO-free foods
भारताच्या दृष्टीकोनातून अमेरिकेची जागा कोणी घेणे सर्वात फायद्याचे राहील?
आपण का घेउ नये ?
प्रश्न विनोदी वाटला का ? तशी महत्वाकांक्षा आणि तसे लक्ष्य आपण का ठेवू नये ?
पाकिस्तानचे कंबरडे कायमचे असे मोडुन टाकावे की पुढची १५० वर्ष त्यांच्या मनात आपल्या देशा विरुद्ध काणा डोळाच काय पण साधा विचार सुद्धा येउ नये. त्यांचे आपल्याशी चालले छुपे युद्ध कायमचे संपवुन टाकावे. न रहेगा बाँस न बजेगी बांसुरी !त्यांची कंबर आधीच आणि लवकरात लवकर मोडलीत तर चीन सुद्धा १० वेळा विचार करेल.
असो... तुमच्या प्रश्नाला सरळ उत्तर देतो. रशिया :- कारण आपले रशियाशी जसे संबंध आहेत तसे चीनशी नाहीत.
जाता जाता :- पाणी म्हणजे जीवन ! पाण्या शिवाय ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- H2WOE India's Water Crisis: A Warning To The World
15 Sep 2016 - 9:44 pm | मदनबाण
वरती दिलेली म्हण अर्धवट आहे, न रहेगा बाँस न बजेगी बांसुरी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- H2WOE India's Water Crisis: A Warning To The World
15 Sep 2016 - 9:56 pm | अमितदादा
उत्तम विश्लेषण. सध्या चीन अमेरिकेच्या पाठीमागे (GDP च्या दृष्टिकोनातून) जरी असला तरी वेगाने प्रगती करत आहे. खालील लिंक पहा ग्राफिकल रित्या दोन्ही अर्थव्यवस्थेतील फरक समजून सांगितलाय. चीन चे total reserve पहा डोळे विस्फारतील एव्हडा प्रचंड आहे.
http://www.visualcapitalist.com/china-vs-united-states-a-tale-of-two-eco...
22 Sep 2016 - 10:40 pm | मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Rare feat for DRDO: Hat-trick tests of Indo-Israeli missile successful
29 Sep 2016 - 9:49 am | मदनबाण
९/११ होउन १५ वर्ष झाली, २८ क्लासिफाईड पेजेस रिलीक करण्यात आली,सेनेट ने सौदीला कोर्टात खेचण्यासाठी ओके म्हंटले, तरी सुद्धा शांतीचे नोबेल विजेता आणि सौदीला Weapons worth $115 का ऑफर करत आहेत ?ते व्हिटो वापरतील का ? सौदी फक्त पोकळ धमकी देउ शकतो कि अजुन काही अधिक ?
{ थॅक्स टु झिरो हेज }
ओबामामांनी व्हिटो वापरला, पण हाउस ऑफ रिप्रेसेनटेटिव्हनी 348-77 असे व्हिटोच्या विरुद्ध मतदान केले म्हणजे JASTA { “Justice Against Sponsors of Terrorism Act” } हा आता कायदा झाला आहे.
याच अमेरिकेने हल्लीच सौदीला शस्त्रास्त्रे विकली आहेत, पॉर्न आणि वेपन या शिवाय आता बहुधा दुसरी कुठलीच इंडस्ट्री अमेरिकेत शिलक्क उरली नसावी कि ज्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळावे आणि मुख्य म्हणजे डिफेन्स इंडस्ट्रीला पैसे मिळुन तिथले जॉब जाउ नये !
JASTA मुळे ही पहिलीच वेळ आहे कि ज्यामुळे ओबामा यांच्या व्हिटोला कॉग्रेस ने ओव्हराईड केले.
आता सौदी अरेबियाकडे वळुया... तेल संपन्न देशाला पैश्याचे वांदे लागले आहेत हे सांगुन देखील विश्वास ठेववणार नाही,पण आपल्या समोर व्हेनाज्युअला सारखे दुसरे उदाहरण आहे. ४-५ दिवसांनपुर्वीच सौदी अरेबियाने कॅश क्रंच होउ नये म्हणुन ५.३ बिलियन डॉलर पंप केले आहेत, यावरुन त्यांच्या आर्थिक स्थितीचा अंदाजा यावा...तसेच सौदी अरेबियाने पब्लिक सेक्टर मधील बोनस कट केला असुन टॉप ऑफिशिअल्सच्या पगारात २०% कट केला आहे, तेलाच्या बाबतीत इराण हॅज अॅडव्हान्टेज ऑव्हर सौदी...यात वरील बिल पास होण्यामुळे पुढील घडामोडी कशा घडतील ते पाहणे रोचक ठरणार आहे.
आपली स्थिती अजुन तितकी वाईट दिसत नसुन ऑटोमोबाईल इंडस्ट्र्ने साउथ कोरियाला मागे टाकले असुन चायनिज मॅन्युफॅक्चरिंग बेस हळु हळु आपल्याकडे सरकताना दिसत आहे. सध्या चीन साउथ चायना सी मध्ये अडकला असुन अमेरिका सिरिया / युक्रेन आणि साउथ चायना सी मध्ये बिझी आहे, त्यामुळे हा काळ आपल्यासाठी अतिशय अनुकुल असुन योग्य वेळ मिळताच पाकिस्तानची चांगली पाचर मारली पाहिजे, जेणे करुन त्यांचे कंबरडे चांगले मोडले जाईल आणि चीनला त्यातुन योग्य संदेश दिला जाईल. चीनला संदेश जाणे अत्यंत महत्वाचे आहे, कारण आपण पाकिस्तान बाबतीत काय हालचाली करतोय त्यावर त्याची नजर असुन जर आपला विकनेस प्रकट झाला तर भविष्यात याची भयानक किंमत मोजावी लागेल असे वाटते.चीन काही दिवसांनपुर्वीच अरुणाचल प्रदेश मध्ये ४५ किलोमिटर आता येउन कँप्म लावुन बसला होता.
संदर्भ :-
CONGRESS REJECTS OBAMA VETO, SAUDI 11 SEPT BILL BECOMES LAW
Why Congress Supports Saudi Arms Sales
Saudi Arabia Injects $5.3 Billion Into Banks to Ease Crunch
Saudi Arabia's central bank to inject 20 billion riyals to boost financial stability
Saudi Arabia slashes pay for top officials by 20%
Chinese troops violate border in Arunachal
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल ले डूबा मुझको अराबिक आँखों में आज लूटा लूटा मुझको फ़रेबी बातों ने... :- AIRLIFT
29 Sep 2016 - 10:10 am | महासंग्राम
आपला लेख उत्तमच आहे पण एक गोष्ट समजली नाही ती विचारतो, आपण वर उल्लेख केलेल्या स्थितीचा आणि इंटरनेट स्पीड चा काय संबंध आहे. अथवा थेट संबंध कसा ??
29 Sep 2016 - 10:41 am | मदनबाण
आपण वर उल्लेख केलेल्या स्थितीचा आणि इंटरनेट स्पीड चा काय संबंध आहे. अथवा थेट संबंध कसा ??
आपल्या देशाची इकॉनॉमिक ग्रोथ आणि इन्फरमेशन टेक्नॉलॉजी आणि येउ घातलेलेल्या आयओटी { इंटनेट ऑफ थिंग}
हे मुद्दे डोक्यात ठेवुन तसे लिहले आहे, जिथे गुगल सारखी कंपनी आपल्या देशात स्टेशन पासुन मॉल पर्यंत सगळीकडे हात पाय पसरत आहे,आणि त्यातुन अर्थातच फायदा उचलत आहे तिथे आपले टेलिकॉम ऑपरेटर मात्र ग्राहकांना कसे लुटता येइल याकडेच डोळे लावुन बसलेले असतात, नाहीतर महिन्यात ३०-३१ दिवस असताना २८ दिवसांचे नेट पॅक डेव्हलप करण्यात काय उद्देश आहे ?
तुम्ही Impact of Internet on Economic Growth असा शोध जालावर घेतल्यास पुष्कळ माहिती मिळेल ! जेव्हा जगात ३ जी सर्र्रास वापरले जात होते तेव्हा आपण मागेच होतो आणि जवळपास १० वर्षांनी ते तंत्रज्ञान आपल्याकडे आले, हीच गत ४ जी ची सुद्धा झीली, ते आपल्याकडे अंदाजे ५ वर्षांनी आले ! जगात ५ जी असताना आपण अजुन ४ जी मारामारी करताना दिसत आहोत. रोटी- कपडा - मकान आणि इंटरनेट या आजच्या डिजीटल युगातल्या मुख्य गरजा असताना आपण फारच मागे आहोत.डिजीटल टेक्नॉलॉजी मधे टिकुन राहण्यासाठी आणि त्यातुन आर्थीक लाभ उचलण्यासाठी हायस्पीड इंटरनेट ही आता चैन नसुन गरज झाली आहे, असे सांगण्याचा माझा उद्देश होता / आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल ले डूबा मुझको अराबिक आँखों में आज लूटा लूटा मुझको फ़रेबी बातों ने... :- AIRLIFT
29 Sep 2016 - 10:48 am | महासंग्राम
धन्यवाद अगदी विस्ताराने डिटेल मध्ये कळले आणि सोप्या भाषेत सांगितले याबद्दल विशेष आभार
29 Sep 2016 - 11:17 am | वरुण मोहिते
आवडता धागा आहे हा .
29 Sep 2016 - 11:22 am | रंगासेठ
उत्तम धागा, वाखु साठवली आहे. सध्याच्या ऑटोमेशन च्या काळात आयटी क्षेत्रात पण नोकर्यांची संधी कमी होतील.
मला अमेरिकेला जायची संधी कदाचित पुढील वर्षी मिळू शकेल अशावेळी या धाग्यावरील चर्चा वाचून "डॉलरा डॉलरा" चे स्वप्न भंग होईल काय असं वाटायला लागलय. ;-)
29 Sep 2016 - 1:36 pm | मदनबाण
सध्याच्या ऑटोमेशन च्या काळात आयटी क्षेत्रात पण नोकर्यांची संधी कमी होतील.
ऑलरेडी होत आहेत.क्लायंट रिक्वारमेंट इतके सिलेक्टिव्ह आणि अॅग्रेसिव्ह झाले आहे की नविन प्रोजेक्ट मध्ये क्लायंट इंटरव्हु क्लिअर न-झाल्यास त्या रिसोर्ससाठी कंपनीला पेनल्टी लागु शकते अश्या अटी ठेवणार्या कंपन्यासुद्धा आहेत.
पण दुसर्या शक्यता / प्रोफाईल्स निर्माण होतील याची अपेक्षा सुद्धा आहेच की ! :)
मला अमेरिकेला जायची संधी कदाचित पुढील वर्षी मिळू शकेल अशावेळी या धाग्यावरील चर्चा वाचून "डॉलरा डॉलरा" चे स्वप्न भंग होईल काय असं वाटायला लागलय. ;-)
हा.हा.हा... त्या ऐवजी तिकडची सिलिकॉन व्हॅली आपण इकडे आणावी आणि तितकाच दणकुन पगार इथे मिळावा ! असे झाले पाहिजे बघा ! ;)
तसेही अमेरिका भिकारी आहे,काही काळाने तिकडचे हिंदुस्थानी लोक इथे स्थलांतर करुन परत आले तरी मला नवल वाटणार नाही.
असो...
जाता जाता :- ज्या Deutsche Bank ला मी वर्षभर ट्रॅक करुन इथे त्याचे सातत्याने अपडेट्स दिले ती बँक सध्या जर्मनीत आणि जागतिक अर्थविश्वात प्रचंड चर्चेत आहे. जालावर या विषयी अर्थातच चर्चा आहेतच. रिमेंबर अंशु जैन ? ज्यांच्या नावाचा उल्लेख मी बहुधा या बॅ़ंकेच्या संदर्भात केला होता,गेस व्हॉट ही इज रिटर्न इन न्यूज अगेन ! ;)
मी वर्षभर या बँकेवर माझा वेळ घालवला, टिंग टाँग घंटा वाजवत राहिलो, ते फुकट गेले नाही.
जस्ट वॉच द अनफोल्डिंग ड्रामा ऑफ जर्मनी अॅड द युरोझोन... वेटिंग फॉर इटली अॅज वेल.
संदर्भ :- Is Deutsche Bank the next Lehman Brothers? The denials certainly don't help suggest it's not
German government denies working on Deutsche Bank rescue plan – as it happened
Deutsche Bank adds to Angela Merkel's election year woes
DEUTSCHE DISASTER PLAN? Merkel 'preparing' emergency bailout for leading German bank
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल ले डूबा मुझको अराबिक आँखों में आज लूटा लूटा मुझको फ़रेबी बातों ने...AIRLIFT
29 Sep 2016 - 2:45 pm | रंगासेठ
Deutsche Bank बद्दल मागील वर्षी पण ऐकलं होतं. पण इकडे पुण्यात टेक्नॉलॉजी साइडला मोठ्या प्रमाणात भरती सुरु आहे. त्यामुळे तिथे काम करण्याबद्दल शंका आहेत.
सहमत. एक प्रोफाइल संपत आलं की दुसरं प्रोफाइल असतच, प्रयत्न केले तर. :-)
29 Sep 2016 - 3:33 pm | अनिरुद्ध.वैद्य
प्र्॑चंड हायरिंग सुरु आहे. कदाचीत मेजर रिस्ट्रक्चर होत असुन युरोप किंवा इतर ठिकाणचे जॉब्स इकडे हलवत असतील. ह्या कंपनीच सध्यातरी टाळावं
क्लायंट इंटरव्हअसुद्धा आजकाल सुरु आहेत, किंबहुना क्लायंटसाठीच हायर केलं जात. आधी तुमचा कंपनी इंटर्व्ह्यु अन मग क्लायंट इंटर्व्ह्यु. बाकी पेनल्टीची कल्पना नाही.
रच्याकने, आता जर युरोप अन अमेरिका जात्यात जाणार असतील तर ब्रिटनच मरण कितपत पुढं ढकललं गेलंय? की त्यांनी युरोपियन युनियन मधुन बाहेर पडुन शहाणपणा केला?
29 Sep 2016 - 3:25 pm | अनिरुद्ध.वैद्य
सध्याच्या ऑटोमेशन च्या काळात आयटी क्षेत्रात पण नोकर्यांची संधी कमी होतील.
ऑटोमेशन मुख्यःत्वे क्वालीटी अॅश्युरंस साठी वापरल जात असल्याने, मॅन्युअल टेस्टर्सची डिमांड कमी होईल. पण त्याचवेळी ऑटोमेशन डेव्हलप करणार्या लोकांची गरज भासेल. ऑटोमेशन्चा गवगवा जास्त होतोय, कारण त्याने मॅन्युअलमध्येच राहिलेल्यांची वाट लागु शकते, बाकी काही नाही.
आयटीमध्ये हे स्थित्यंतर नेहमीच चालतंय. दरवेळी नवनवे फ्रेमवर्क्स, दर ३ ४ वर्षांनी येणार्या नवनव्या प्रोग्रॅमींग लँगवेजेस ह्यामुळे त्यात काही नवे नाही, तर इट्स पार्ट ऑफ लाईफ.
जसे एकेक क्षेत्र सॅच्युरेट होत जाते, तस्तसे नवीन क्षेत्र उदयास येते. सतत बदल घडवुन घ्यायची सवय लावावी लागते फक्त बस.
29 Sep 2016 - 1:46 pm | मराठी_माणूस
काही वकीलांचे प्रतिसाद अपेक्षीत
30 Sep 2016 - 9:41 am | मदनबाण
Hedge funds pull business from Deutsche Bank
Deutsche Bank’s Clients Take Steps to Cut Exposure
Some Deutsche Bank Clients Reduce Collateral on Trades
Asian Markets Lower Amid Deutsche Bank Jitters
GERMAN GOVERNMENT PREPARE DEUTSCHE BANK RESCUE PLAN: DIE ZEIT
Deutsche Bank admits 'perception issue' as U.S. shares slide
Berlin faces Deutsche Bank bailout dilemma
Why is Deutsche Bank now the biggest worry in the financial world?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Google Turns Its Attention To India As It Completes 18 Years
2 Oct 2016 - 8:54 am | मदनबाण
येत्या ऑक्टोबर मध्ये २ मोठ्या घडणार आहे, त्या म्हणजे
१}आएमएफ { इंटरनॅशनल मॉनेटरी फंड} च्या रिझर्व्ह करंन्सीच्या बास्केट मधे चीनच्या Yuan ची ऑफिशली एंन्ट्री होइल !
२}अमेरिकेच्या इंटरनेट कंट्रोलचे हस्तांतरण
चीन :-
IMF Launches New SDR Basket Including Chinese Renminbi, Determines New Currency Amounts
China's yuan joins elite club of IMF reserve currencies
The Chinese yuan has officially joined the IMF’s elite currency club
Today, 1 October 2016, the IANA functions contract officially expired. As a result, the coordination and management of the Internet’s unique identifiers is now privatized and in the hands of the volunteer-based multistakeholder community.
पण चीन debt crisis च्या दिशेने वेगाने वाटचाल करतो आहे,हे विसरता कामा नये !
China’s Economy Is Headed for a Very Hard Landing
Fueled by real estate and shadow banking, China's total debt has nearly quadrupled, rising to $28 trillion by mid-2014, from $7 trillion in 2007. At 282 percent of GDP, China's debt as a share of GDP, while manageable, is larger than that of the United States or Germany.
इंटरनेट :-
US hands internet control to ICANNInternet handover is go-go-go! ICANN to take IANA from US govt
Last Minute Drama as U.S. Preps to Hand Over Internet Naming System
ICANN Blog
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- After Karachi, flight curbs over Lahore too
4 Oct 2016 - 11:21 am | अनिरुद्ध.वैद्य
कोण देतं?
4 Oct 2016 - 1:05 pm | तुषार काळभोर
माझ्या माहितीप्रमाणे:
देशातील जनता (प्रॉविडंड फंड, किसान विकास पत्रे)
देशातील बँका (बहुतेक एसएलआरद्वारे सरकारी बॉन्ड्स)
देशातील उद्योग (सरकारी बॉन्ड्स)
परदेशी बँका (सरकारी बॉन्ड्स)
परदेशी सरकारे (सरकारी बॉन्ड्स)
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसारख्या संस्था.
4 Oct 2016 - 2:52 pm | मदनबाण
ब्रिटनच मरण कितपत पुढं ढकललं गेलंय? की त्यांनी युरोपियन युनियन मधुन बाहेर पडुन शहाणपणा केला?
शहाणपणा ! पण खरंच ते कितपत आणि कशा हालचाली करत आहेत,ते पहावयास हवे !
हल्लीच Theresa May यांनी Article 50 विषयी हालचाली करण्याची तयारी दर्शवली आहे,मला वाटतं मार्च ची डेडलाईन आहे.
ह्या सर्व देशांना लोन कोण देतं?
माझ्या माहिती प्रमाणे आयएमएफ आणि वर्ल्ड बँक
http://www.imf.org/external/np/exr/map/lending/
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- जोपर्यंत चंदू परतणार नाही, तोपर्यंत आजीच्या अस्थी विसर्जन नाही!
5 Oct 2016 - 12:01 pm | मदनबाण
Ericsson to lay off 3,000 in ‘large transformation’
ING announces 7,000 job cuts as unions condemn 'horror show'
Automation threatens 69% of jobs in India, 77% in China: World Bank
जाता जाता :- जगभरात विविध ठिकाणी मिलेटरी ड्रिल्स होताना आपणं पाहत आहोत / पाहणार आहोत, तसेच होणारी ड्रिल्स देखील येणार्या घटनांची चाहुल देणारी ठरावी असे वाटते. यात मुख्यत्वे सौदी अरेबिया आणि रशियाचा यांचा नंबर लागावा.
सध्या या दोन्ही देशांनी वेगवेगळी ड्रिल्स करण्यास सुरवात केली आहेत / करणार आहेत.सौदी सी-बेस्ड ड्रील करत असुन रशिया वर्ल्ड वॉर ३ च्या प्रिपेर्शन मध्ये आहे असे एकंदर त्याच्या हालचाली वरुन तरी दिसत आहे.
संदर्भ :-
Saudi Arabia checks war preparedness
Is Putin preparing for WW3? Russia begins evacuation of FORTY MILLION PEOPLE in huge drill
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Petition to White House seeking to declare Pakistan 'a state sponsor of terrorism' makes new record
5 Oct 2016 - 1:31 pm | डॉ सुहास म्हात्रे
Is Putin preparing for WW3? Russia begins evacuation of FORTY MILLION PEOPLE in huge drill
बर्याच कुतुहलाने आणि अविश्वानेच ही बातमी वाचली. चिमुटभर मूठभर मीठ टाकून या बातमीचा अर्थ लावणे जरूर आहे.
हे प्रमाणापेक्षा जास्त हाईप्ड आणि बेजबाबदार शीर्षक आहे कारण...
१. त्याच लेखात त्याबाबत खालील वाक्य आहे. "The ministry revealed 40 million civilians, 200,000 emergency rescuers and 50,000 units of equipment are involved in the war game, which is running from October 4 to October 7." याचा अर्थ "ज्या भूभागावर हा सराव होणार आहे त्यावर ४ कोटी नागरिकांची वस्ती आहे.
२. "चार कोटी नागरिकांना चार दिवसात" सुरक्षित जागी हलविण्याची (एव्हॅक्युएशन करण्याची) ताकद आज कोणातच नाही. किंबहुना इतक्या मोठ्या प्रमाणावरच्या सरावासाठी होणारा प्रचंड खर्च कॉस्ट-इफेक्टिव्ह नसेलच, पण त्याचा प्रत्यक्ष युद्धात फायदा होण्यावरही मोठे प्रश्नचिन्ह असेल. आजच्या घडीला हा खर्च परवडणारे राष्ट्र आतित्वात नाही.
याला आपण express.co.uk या संस्थळावरची सनसनाटी बातमी म्हणू शकतो.
5 Oct 2016 - 1:39 pm | मदनबाण
याला आपण express.co.uk या संस्थळावरची सनसनाटी बातमी म्हणू शकतो.
हरकत नाही दुसरीकडची वाचुन पहा :-
40 Million Russians To Take Part In "Nuclear Disaster" Drill, Days After US General Warns Of War With Moscow
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Petition to White House seeking to declare Pakistan 'a state sponsor of terrorism' makes new record
5 Oct 2016 - 2:00 pm | मदनबाण
Russian Ministry for Civil Defense :-
http://en.mchs.ru/mass_media/news/item/32915549/
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Petition to White House seeking to declare Pakistan 'a state sponsor of terrorism' makes new record
5 Oct 2016 - 2:08 pm | मदनबाण
बाकी रशियाने पहिल्यांदाच सिरिया {Tartus naval base} मधे S300 surface-to-air missile system बसवली आहे.
Russia deploys S-300 missile defense system to Syria
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Petition to White House seeking to declare Pakistan 'a state sponsor of terrorism' makes new record
5 Oct 2016 - 2:09 pm | मदनबाण
यावर अधिक इथे :-
Russia deploys S-300 missile defense system to Syria
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Petition to White House seeking to declare Pakistan 'a state sponsor of terrorism' makes new record
5 Oct 2016 - 2:40 pm | डॉ सुहास म्हात्रे
याला मी तरी "युद्धाची तयारी" नसून "युद्ध टाळण्यासाठी केलेली तयारी (डिटरन्स)" असे समजतो...
रशियासाठी सिरिया मध्यपूर्वेत आणि भूमध्य समुद्रात तडक उघडणारे द्वार आहे. ते बंद होणे किंवा अमेरिकेच्या वर्चस्वाखाली जाणे रशियाला परवडणारे नाही. तेव्हा, रशिया सिरियाचा बचाव अगदी आपला स्वतःचा प्रदेश आहे असाच करेल यात संशय नाही. पण, त्याच कारणासाठी तेथे अमेरिकेशी सर्वंकष युद्ध होणेही रशियाच्या फायद्याचे नाही.
जसे, आपण मेघालयात (व संपूर्ण उत्तरपूर्वेतच) सैन्यदल व वायुदलाची ताकद वाढवून चीनवरच्या हल्ल्याची तयारी करत नसून "भविष्यात चीनला तेथे हल्ला करण्याची उघड किंवा गर्भित धमकीही देता येऊ नये" यासाठी डिटरन्स तयार करत आहोत, अगदी तशीच ही सिरियातली डिप्लॉयमेंट आहे !
5 Oct 2016 - 2:45 pm | मदनबाण
ह्म्म... हो.फक्त इतकेच म्हणीन की जालावर अमेरिका आणि रशिया यांच्या संदर्भात जितके काही वाचले आणि समजले त्यातुन मी काढलेला निष्कर्ष असा आहे की भूतकाळातील शितयुद्धा पेक्षा सध्याची स्थिती ही अधिक बिकट वाटते.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Petition to White House seeking to declare Pakistan 'a state sponsor of terrorism' makes new record
5 Oct 2016 - 2:58 pm | डॉ सुहास म्हात्रे
या बाबत वरचाच मुद्दा परत... बरीच युद्धे खदखदत राहिली तर "बजेट व जागतिक पोश्चरिंगच्या" दृष्टीने फार उपयोगी असतात. पण अमेरिका-रशिया उघड युद्ध झाले तर दोन्ही देशांचे कंबरडे मोडेल हे नक्की, हे न जाणण्याइतके दोन्हीकडचे राजकिय-सामरिक सत्ताधारी मूर्ख नाहीत. त्यामुळे...
"दुध खदखदत रहावे इतकीच उष्णता द्यावी व येणारी साय खात रहावे; पण ते उतू जाऊ देण्याचा मूर्खपणा करू नये." यावर दोन्ही बाजूंचे एकमत असणारच. मात्र, माझ्या वाट्याची साय तुझ्या वाट्याच्या सायीपेक्षा जास्त असावी यासाठी चढाओढ चालूच राहील. :)
अवांतर : अमेरिका-रशिया युद्ध झाले तर चीन इतका आनंदी देश दुसरा कोणी नसेल. हे जितके अमेरिकाच जाणुन आहे तितकेच दक्षिण चीन सागरामध्ये चीनबरोबर संयुक्त संचलने करणारा रशियाही जाणुन आहे ;)
5 Oct 2016 - 3:12 pm | मदनबाण
बरीच युद्धे खदखदत राहिली तर "बजेट व जागतिक पोश्चरिंगच्या" फार दृष्टीने उपयोगी असतात. पण अमेरिका-रशिया उघड युद्ध झाले तर दोन्ही देशांचे कंबरडे मोडेल हे नक्की, हे न जाणण्याइतके दोन्हीकडचे राजकिय-सामरिक सत्ताधारी मूर्ख नाहीत.
ह्म्म, अमेरिकेची सध्य स्थिती पाहता ते कुठल्याही थराला जातील असे का कोणास ठावूक पण मला वाटते. ते मुर्खपणास उताविळ झाले आहेत असे वाटते.
असो...
माझ्या वाट्याची साय तुझ्या वाट्याच्या साईपेक्षा जास्त असावी यासाठी चढओढ चालूच राहील.
हा.हा.हा... :)
बाकी वेळ मिळाला कि पुतीन यांचे मी ऐकलेले भाषण इथे नक्की देइन. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Petition to White House seeking to declare Pakistan 'a state sponsor of terrorism' makes new record
5 Oct 2016 - 2:22 pm | डॉ सुहास म्हात्रे
"taking part" ("taking active part" नव्हे) आणि "evacuation" या शब्दप्रयोगांत असलेल्या फार मोठा फरक समजाऊन घ्यावा आणि त्याचा शीर्षकात जाणीवपूर्वक दिशाभूल करणारा चलाख उपयोग समजाऊन घ्यावा... याकडे माझा निर्देश होता.
बाकी, अमेरिका आणि रशिया हे एकमेकाचे राजकिय प्रतिस्पर्धी (स्पष्ट शब्दांत शत्रू) आहेत, यात वाद नाही. मात्र, या दोघांतील सद्यस्थितीतील युद्धे मुख्यतः राजकिय, आर्थिक व माध्यमांना वापरून केलेली छुपी युद्धे असणार आहेत... पारंपारिक सामरिक युद्धे नाही. शिवाय, इतक्या मोठ्या प्रमाणात नागरिकांची हलवाह्लव करण्याची गरज केवळ अणुयुद्ध झाले तरच होईल. या दोघांपैकी कोणीही त्याबद्दल विचार करणार नाही.
राहिले माध्यमे वापरून "हवा तयार करणे" हे मात्र दोन्ही कडून भरपूर होत आहे आणि होत राहील. याची दोन महत्वाची कारणे अशी :
१. देशांतर्गत जनमत आपापल्या सामरिक व तत्सम बजेटच्या बाजूने उभे करणे.
२. "पोश्चरिंग ऑन द वर्ल्ड स्टेज" करून" जागतिक स्तरावर आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी व वाढवण्यासाठी आपल्या देशाची सामर्थ्यवान (व आक्रमक) प्रतिमा तयार करणे.
हे काहीसे आपल्या कंपनीचा स्टॉक मार्केटमधला भाव वाढवण्यासाठी किंवा प्रतिस्पर्धी कंपनीचा भाव पाडण्यासाठी चतुराईने "टिप्स" पेरण्यासारखेच आहे. फरक इतकाच की स्टॉक मार्केटमध्ये अश्या प्रकारांवर लक्ष ठेवायला काही बेसिक योजना तरी असते, जागतिक माध्यमयुद्धे "फ्री फॉर ऑल" असतात... वाचकाच्या हाती आपला स्वतःचा अभ्यास, सारासारविवेक व तर्क यापलिकडे काहीही नसते.
तेव्हा वर म्हटल्याप्रमाणेच, दोन्ही बाजूंच्या माध्यमांतल्या प्रचार-अपप्रचार (इन्फर्मेशन-डिसइन्फर्मेशन) युद्धाच्या बातम्या इतरांनी चिमुटभर, नव्हे मुठभर मीठ टाकून खाव्या, इतकेच माझे म्हणणे आहे.
5 Oct 2016 - 2:34 pm | मदनबाण
तेव्हा वर म्हटल्याप्रमाणेच, दोन्ही बाजूंच्या माध्यमांतच्ल्या प्रचार-अपप्रचार (इन्फर्मेशन-डिसइन्फर्मेशन) युद्धाच्या बातम्या इतरांनी चिमुटभर, नव्हे मुठभर मीठ टाकून खाव्या, इतकेच माझे म्हणणे आहे.
अर्थातच...यावर दुमत नाही !
मी फक्त जालावर जे वाचतो तेच इथे देतो, ते तसेच होइल असा कोणताच निष्कर्ष किंवा भाकित वर्तवण्याचा प्रयत्न करत नाही. रशिया आणि चीन यांनी मैत्री आणि अमेरिकेला हवी असणारी युद्धखोरी इतकेच सध्या तरी मला समजले आहे.काही काळा पुर्वी तुरकस्थान द्वारे रशियाचे फायटर प्लेन पाडुन आणि नंतर रेस्क्यु ऑपरेशनला गेलेल्या हॅलिकॉप्टरला देखील पाडुन अमेरिकेने रशियाला युद्धात खेचण्याचा प्रयत्न केला होता, कारण तुर्कस्थान नेटो / नाटो सदस्य असुन एका नेटो / नाटो सदस्य देशावर हल्ला हा संपूर्ण नेटो / नाटो देशांवर हल्ला समजला जातो. पुतिन यात अडकले नाहीत आणि नंतर सगळी समिकरणच बदलली...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Petition to White House seeking to declare Pakistan 'a state sponsor of terrorism' makes new record
5 Oct 2016 - 3:48 pm | मदनबाण
Guccifer 2.0 Hacked Clinton Foundation
https://www.rt.com/usa/361608-clinton-foundation-hacked-guccifer/
क्लिंटन फाउंडेशन बद्धल मध्यंतरी वाचत असताना एका कंपनीचे नाव माझ्या वाचनात आले होते, ते म्हणजे Uranium One त्यावर अधिक शोध घेतल्यावर रशियाच्या नावाने खडे फोडणार्या हिलरी समोर आल्या... ;)
Cash Flowed to Clinton Foundation Amid Russian Uranium Deal
अवांतर :- Putin Suspends Weapons-Grade Plutonium Deal With US
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Petition to White House seeking to declare Pakistan 'a state sponsor of terrorism' makes new record
5 Oct 2016 - 6:13 pm | अनिरुद्ध.वैद्य
वर ऑटोमेशनचा विषय निघालाचं आहे तर आज नवे काही त्याबाबत ऐकु आलं. World बँकेचे अध्यक्ष म्हणताहेत की भारतातले ६९ % अन चीन मधले ७७% जॉब्स ऑटोमेशन मध्ये जाणार! हे आकडे नेमके कसे काढले त्यावर काहिच भाष्य नाहिये. पण जर ही परिस्थीती खरच अवतरली तर परिणाम मोठे कठींण होतील.
ह्या लिंकवर एक टुल दिलंय पण ते प्रोबॅबिलीटीवर असल्याने, जरा समजावयास कठीण आहे. पण त्यातल्या त्यात, बरेचशी अकुशल कामं ऑटोमेट होतील असे ते म्हणताहेत.
http://www.worldbank.org/en/news/infographic/2016/01/27/occupation
7 Oct 2016 - 8:54 am | मदनबाण
वेळ काढुन अवश्य पहा...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- शराफ़त अली को शराफ़त ने मारा... :- अमृत
8 Oct 2016 - 1:53 pm | मदनबाण
Russia, China navy drills in 360
जाता जाता :-
Pentagon Hyping Test of Two Fake Nuke Bombs in Nevada Desert
US carries out two successful flight tests using mock nuke bombs
Top US General Warns Syrian “No-Fly” Zone Means War with Russia
“Washington, the War Criminal Capital of the World is Driving the World to Nuclear War”: Paul Craig Roberts
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Indhana Winva gaiti mori saiyaan... :- Falguni Pathak
14 Oct 2016 - 5:12 pm | मदनबाण
रशिया न्यूक्लिअर वॉरसाठी तयार होतोय या आशयाच्या बातम्या येत आहेत त्यात विविध नविन बातम्यांची भर पडत आहे.
Russian Television Warns of Nuclear War Amid US Tensions
Fears of a second cold war between Russia and the USA
World War 3 Update: Russia Launches Nuclear Missiles for US?
Russian Lawmaker Says Americans Should Vote Trump or Risk Nuclear War
Is Trump ready to go nuclear?
Russia’s Pacific Fleet: Nuclear Sub Test Fires Intercontinental Ballistic Missile
Nuclear war 'IMMINENT' as Russia tells citizens to find out where the closest bunkers are
Russian missile deployment across Polish border ‘inappropriate’: FM
West Rattled Over Russian Missiles on NATO Border
U.S. missiles in Europe can hit Russian ICBMs at long range, claims Russia
Russia Preparing For War: US Military Deploys Missile System In Europe
Russia transfers nuclear-capable missiles to Kaliningrad
या सगळ्या बातम्यात अजुन एक बातमी वाचावयास मिळाली ती म्हणजे अमेरिकन जेट्स रशियन कलर्स मध्ये पेंट केल्याचे पहायला मिळाले अशी बातमी एका कॅनेडियन पत्रकाराने ट्विटर वर ट्विट करुन पोस्ट केली. हे जर खरे असेल तर अमेरिका असे का करत आहे ? / केले आहे ?
US Jets Painted With Russian Colors Dropped Bombs On Syria?
Aggressor squadron? Pics of US jets painted in Russian colors spark Syria false flag conspiracy
ओबामा काय निर्णय घेतात ते आता पहावयास हवे...
Exclusive: Obama, aides expected to weigh Syria military options on Friday
मदनबाण.....
आजची स्वाक्षरे :- Boycotting our goods will damage ties, China’s state media warns India
14 Oct 2016 - 10:06 pm | मदनबाण
एक संपूर्ण भाषण :-
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Boycotting our goods will damage ties, China’s state media warns India
16 Oct 2016 - 9:52 am | मदनबाण
अमेरिकन सीआयए रशियावर सायबर अॅटॅक करण्याच्या तयारीत !
CIA Prepping for Possible Cyber Strike Against Russia
आपले देखील पाकिस्तान बरोबर सायबर वॉर सुरु असुन सध्याच्या काळात हे वॉर वाढताना दिसत आहे.उरी च्या भ्याड हल्ल्या नंतर या घटनांमधे वाढ झालेली दिसत असुन २ दिवसांनपूर्वीच हिंदूस्थान ने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा बदला म्हणुन पाकिस्तानी हॅकर्सनी हैद्राबाद मधील ५० आयटी कंपन्यांवर सायबर अॅटॅक केला आहे.तसेच काश्मिर मध्ये तणावात भर पडताना दिसत असुन पहिल्यांद्याच आंदोलनादरम्यान पाकिस्तानसोबत चीनचे झेंडे फडकावण्यात आले असून चीनने मदत करावी अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे.
तिकडे युरोपियन युनियन ने देखील युरोपियन इंन्फ्रास्ट्रक्चर सुरक्षित करण्यासाठी अभ्यास करण्याचे जाहिर केले असुन, हा आत्ता पर्यंतचा युरोप मधील सर्वात मोठा सायबर वॉर गेम चा अभ्यास असेल.
संदर्भ :-PRESS RELEASE :- Cyber Europe 2016: the pan-European exercise to protect EU Infrastructures against coordinated cyber-attack
Fifty Hyderabad IT firms hit by Pakistani hackers
धोक्याची घंटा….काश्मीरमध्ये पहिल्यांदाच फडकला चीनचा झेंडा
जालावर अमेरिका आणि रशिया यांच्या संदर्भात जितके काही वाचले आणि समजले त्यातुन मी काढलेला निष्कर्ष असा आहे की भूतकाळातील शितयुद्धा पेक्षा सध्याची स्थिती ही अधिक बिकट वाटते.
वरती जो निष्कर्ष काढला त्याला आता खालील रेटींगचे बळ मिळाले आहे.
अमेरिकन मिलेटरीच्या DEFCON अलर्ट सिस्टीम नुसार ताजा अलर्ट रेटींग ३ चा झाला असुन जो न्यूक्लिअर थ्रेट इंडिकेट करतो.
संदर्भ :- http://defconwarningsystem.com/
This is the DEFCON Warning System. Alert status for 8 P.M., Thursday, October 13th, 2016. Condition code is Yellow. DEFCON 3.
Tensions between Russia and the United States have reached levels beyond the cold war in the recent week.
तसेच खालील बातमी नुसार रशिया अमेरिका आणि ब्रिटेनवर न्यूक्लिअर अॅटॅकचे मॉक ड्रील करणार आहे. { यावर जालावर मला अधिक माहिती मिळालेली नाही.}
Russia Prepares Mock Nuclear Attack On US And Britain
काही इतर बातम्या :- Kremlin Prepares for ‘Nuclear War’ As White House Considers ‘Cyber Attack’ as Middle East Hangs Between
Election Corruption Watch: White House Threatens War with Russia for Political Points
President Obama Threatens President Putin with Nuclear War
जाता जाता :- एक सुंदर वेब साईट इथे देत आहे, जी रशिया-भारत संवादाची { Russia & India Report } एक सुरेख माहितीपूर्ण वेब साईट आहे.
http://in.rbth.com/ किंवा http://hindi.rbth.com/ { हिंदी व्हर्जन }
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- छम छम छम... छम छम छम... ;) :- BAAGHI
19 Oct 2016 - 8:13 pm | भुमन्यु
Saudi Arabia to sell record $17.5 billion of bonds
9 Nov 2016 - 1:52 pm | मदनबाण
मागच्या धाग्यात लिहले होते...
हिलरी आणि ट्रम्प यांच्या पैकी कोण आले / येतील / त्यामुळे काय शक्यता आहेत ? त्याविषयी जालावर काही माहिती / मते वाचली / शोधली ती खाली देतो...
१} डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर येतील आणि त्यानंर मार्केट कोसळेल व त्याचा दोष ट्रम्प देण्यात येतील.
२} हिलरी जिंकेल आणि मोठ्या युद्धास सुरुवात करेल.
३} ट्रेम्प जिंकुनही ओबामा ऑफिस सोडणार नाही, अमेरिकेत मार्शल लॉ लागेल.
ट्रम्प सत्तेवर येतील या पहिल्या पर्यायातील अर्धा भाग आता खरा झाला आहे... आता मार्केट आणि फेडरल रिझर्व्ह म्हणजेच जेनेट येलनवर लक्ष ठेवायला हवे.इमेल लिक्स आणि एफबीआयची पाठराखण हिलरीला आत्ता पर्यंत मिळाली, पण यापुढे काय ?
तेलाचे राजकारण वेगात असुन सगळ्याच तेल उत्पादक देशांचे वांदे लागलेले दिसत असुन तेलाची प्रति बॅरल किंमत अजुन कमी झाल्यास त्याचे परिणाम कसे होतील ?
वेस्ट व्हर्सेस रशिया हा वॉर गेम काय ट्रर्निग पॉइंट दाखवतो येथेही लक्ष ठेवायला हवे.नाटो / नेटो यांच्या हालचाली वेगाने वाढताना दिसत आहेत.
आपलं म्हणाल तर निर्यात कमी आणि आयटी क्षेत्राला मोठा फटका अशी स्थिती असुन,डि़जिटल क्रांतीच्या गप्पा चालु आहेत.
आयटीची मोठी नोकरीकपात
Automation threatens 69% jobs in India: World Bank
संदर्भ :-
$30 Oil Or Worse If OPEC Fails
Feeling The Oil Crunch: Saudi Arabia Cancels $266 Billion In Projects
NATO announces largest troop deployments against Russia since Cold War
मदनबाण.....
आजची स्वाक्षरे :- अब कि बार नही, हर बार मोदी सरकार... ;)
28 Nov 2016 - 10:14 pm | मदनबाण
ब्रिकएक्स्झिट नंतर आता महत्वाचा घटनाक्रम आहे, तो म्हणजे इटालियन रेफरेंडम. जे ४ डिसेंबर २०१६ ला होणार आहे.
ज्याला सध्या ट्रंम्प इफेक्ट असे संबोधले जात आहे, ते इटलीत सुद्धा घडेल काय ?
म्हणजे नक्की काय होणार आहे ?
on 4 December, Italy will hold a referendum on a proposed constitutional reform approved by Parliament in April. The reform, which was designed in tandem with a new electoral law, aims to overcome Italy’s “perfect bicameralism” by changing the structure and role of the Italian Senate. It also changes the distribution of competences between the state and regions. After the shocks of Brexit and the US election, polls are now drifting towards a defeat of the government’s position in Italy.
संदर्भ :- The Italian referendum
फाईव्ह स्टार मूव्हमेंज जर जिंकली तर...
Five Star’s Luigi Di Maio, vice-president of the lower house, said that if the party achieves power, it would push for an advisory referendum on euro membership. Di Maio hasn’t been clear about what he would want to replace it, saying in an interview with Repubblica that he favors “a euro at two speeds or a national currency.”
आता सगळ्या जगाचे लक्ष या घटनेकडे लागले आहे...
त्यावर अधिक इथे :-
All you need to know about the upcoming referendum in Italy
What is the Italian referendum about? What are the people of Italy voting for?
Renzi faces pressure to stay in office as Italy referendum defeat looms
Renzi, reform and the paradox of Italy's referendum
There are fears that 8 Italian banks could collapse if Renzi's reforms are rejected
All Eyes Are on Europe as Italy's Referendum Looms
Populists Poised for Huge Win in Italian Referendum
Fears mount of multiple bank failures if Renzi loses referendum
Is Italy about to feel the Trump effect with Prime Minister Matteo Renzi’s referendum?
३० नव्हेंबर २०१६ ला व्हिएन्ना मध्ये ओपेक { Opec:- Organization for Petroleum Exporting Countries } बैठक होणार आहे. इथे सुद्धा काय घडते ते पहायला हवे !
Oil Investors Have $490 Billion Riding on Big OPEC Decision
OPEC makes last-ditch bid to save oil deal as tensions grow
अॅपलला १३ billion euros चा दंड ठोठावल्यावर एक आर्थीक युद्ध सुरु झाले...
या नंतर अमेरिकेने दुखर्या आणि कमकुवत जागी घाव घातला... तो म्हणजे डिओजे {U.S.DOJ :- U.S. Department of Justic } ने Deutsche Bank ला $14 billion चा दंड केला. आधीच गर्तेत सापडलेल्या या बँकेच्या वर्मावर घाव घातला.यावर Deutsche Bank अमेरिकेतली तिची ऑपरेशन्स कमी किंवा बंद करण्याचा निर्णय घेतला...त्याचा परिणाम म्हणजे तिकडचे जॉब जाणे.
संदर्भ :-
Deutsche Bank reportedly to slash US business
Mass exodus at Deutsche Bank as it plans to obliterate US jobs amid collapse fears
सध्या ट्रंम्प आणि यांच्यात रिकांउट वरुन जुंपली आहे... काय काय घडतय ते पाहणे अर्थातच रोचक आहे.
संदर्भ :-Trump Threatens To Prosecute Hillary Clinton If She Pursues An Election Recount
हिलरीचा पराभव झाल्या नंतर क्लिंटन फाउंडेशनच्या मदतीचा ओघ कमी किंवा बंद झाला आहे ! बाई जर समाजकार्य करत होता तर त्याला आता मदत का बर मिळेनाशी झाली आहे ? इथेही ट्रंम्प मागे लागला आहे असं कळतय ! ;)
Australia ceases multimillion-dollar donations to controversial Clinton family charities
Donations to Clinton Foundation fell by 37 percent
Trump to pressure foreign govts to investigate Clinton Foundation – report
आपल्या इथे demonetization चा ऐतिहासिक निर्णय आपल्या पंतप्रधानांनी घेतला, त्याची इतर धाग्यांवर चर्चा होत आहे, ती वाचनीय आहे.मोदींनी आता डिजिटल इकॉनॉमीच्या माध्यमातुन कॅशलेस इकॉनॉमीची कास धरण्यास मन की बात मधुन सांगितले... जालिय भाषेत यासाठी अनेक ठि़काणी वापरलेला शब्द आहे वॉर ऑन कॅश, जे आता जगभरात अनेक ठिकाणी घडत आहे.सध्या ऑस्ट्रेलिया आणि स्पेन बद्धल जालावर बातम्या येत आहेत.
आपल्याकडे वॉर ऑन कॅश जर मोदींनी जिंकले तर त्यांना अल्टिमेट पॉवर मिळेल, कारण त्यांना इकॉनॉमीमध्ये फ्लो होणारा डेटा पॉइंट मिळेल.या सगळ्या डेटाबेसचा आणि त्यावरुन मिळणार्या इंटलिजन्सचा सोर्स जो अल्टिमेट पॉवर पॉइंट असेल ! जे मोदींसाठी कंट्रोल मेकॅनिझम ठरेल.डि़जीटल म्हणजे प्राव्हसी नाही, कारण तुमचा सर्व व्यवहार अर्थातच मॉनिटर केला जाउ शकतो.शिवाय डेटा हॅक किंवा डेटा करप्ट किंवा डेटा लॉस हे इथे घातक ठरु शकते...
डिजीटल व्यव्हारांबरोबर डिजीटल करन्सी आणि डिटीजल टेक्नॉलॉजी एडव्हान्समेंट हे सुद्धा आर्थीक विश्वात वेगाने दिसुन येत आहे. मध्यंतरी डिजीटल करन्सी बद्धल / बिट कॉइन आणि Satoshi Nakamoto यांच्या बद्धल जालावर वाचत असताना ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी बद्धल माहिती समजली होती. आपल्याकडे या टेक्नॉलॉजीचा वापर करुन पाहणारी आयसीआयसीआय बँक ही देशातली पहिली बँक ठरली आहे. इंटरनेट टेक्नॉलॉजीच्या आविष्कारा नंतर ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी हा बिगेस्ट टेक्नॉलॉजीकल चेंज आहे असे काही तज्ञांचे मत आहे.
संदर्भ :-
Analysts call for Australia's $100 note to be scrapped
Citi's Australian bank branches go cashless
‘Less-cash’ first, ‘cashless society’ next: PM Narendra Modi appeals in ‘Mann ki Baat’ radio address
ICICI Bank executes India’s first banking transactions on blockchain in partnership with Emirates NBD
Blockchain
blockchain-3048696.html">ICICI Bank executes India’s first transaction on blockchain
आपल्याकडची अजुन एक पण सगळ्यात वाईट बातमी...Larsen & Toubro या हिंदूस्थानातल्या सगळ्यात मोठ्या इंजिनेअरिंग कंपनीने त्यांचा १४००० हजार कर्मचारी वर्गाला नारळ दिला ! हा आत्ता पर्यंतचा देशातला सगळ्यात मोठा ले ऑफ ठरला असुन हे अत्यंत चिंताजनक परिस्थितीचे ध्योतक आहे. ऑइल / आयटी बरोबरच आता ही घटना धडकी भरवणारी ठरली आहे, देशात रोजगार निर्माण होण्या ऐवजी, जर असे होणार असेल तर येणारा काळ हा फारच कठीण दिसतो !
संदर्भ :- India’s Biggest Ever Layoff: L&T Terminates 14,000 Employees In A Single Go!
In one of India's biggest-ever layoffs, L&T sheds 14,000 employees from its workforce
जाता जाता :- चायनीज युद्धपोत पाकिस्तानच्या ग्वादर बंदरात ? आपल्यासाठी चिंतेचे मोठे कारण !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- गुलाबो... जरा इत्र गिरा दो... ;) :- Shaandaar
1 Dec 2016 - 7:39 pm | मदनबाण
३० नव्हेंबर २०१६ ला व्हिएन्ना मध्ये ओपेक { Opec:- Organization for Petroleum Exporting Countries } बैठक होणार आहे. इथे सुद्धा काय घडते ते पहायला हवे !
The surprise OPEC oil deal that was 2 years in the making
OPEC in first joint oil cut with Russia since 2001, Saudis take 'big hit'
Italy referendum वर काही व्हिडियो... २ डेज टू गो...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तेरे गीतों कि में दिवानी...ओ दिलबर जानी.तुने कही और मैंने मानी...ओ दिलबर जानी. :- Prem Geet
2 Dec 2016 - 11:26 pm | मदनबाण
रशियाच्या इशार्याला न जुमानता युक्रेन ने क्रिमिया जवळ मिसाइल परिक्षण केले !
रशियाने आपले युद्धपोत क्रिमिया जवळ तैनात करुन ठेवले आहे. याच बरोबर इयु ने बेल्जियम मध्ये जॉइंट ड्रील्स सुरु केले आहेत.
यात भरीस भर म्हणुन तुर्कस्तान ने आसाद ची राजवट संपवण्यासाठी सिरियात घुसवण्याच्या बातम्या आल्या, नंतर पुतिन यांच्याशी फोनवर बोलणी झाल्यावर शब्द बदलले....
संदर्भ :- Erdogan backtracks on Syria goals after call with Putin, says terrorists are only target
जाता जाता :- जर समजा चुकुन युद्धाची वेळ आलीच... तर माझी बेट अर्थातच रशियावर राहिल, सिरियातल्या युद्धाचा उत्तम अनुभव त्यांना लाभला आहे तसेच नेव्ही, एअर फॉर्स तसेच आर्टीलरीचा वापर रशियाने व्यवस्थित केला आणि करत आहे. मला आवडलेले रशियाचे काही जुने व्हिडियो इथे देउन जातो.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- उड़े दिल बेफिक्रे... ;) :- Befikre
6 Dec 2016 - 4:30 pm | मदनबाण
जे अपेक्षित होते तेच झाले... ब्रिकएक्झिट नंतर घडलेली महत्वपूर्ण घटना !
नो व्होट्स ची सरशी झाली आणि आता इटलीचे पीएम Matteo Renzi सिनेटने २०१७ चे बजेट पास केले की पदत्याग करतील असे दिसते.
आता या घटने नंतर विशेषतः इटालियन बँक Monte dei Paschi च्या बाबतीत काय घडामोडी घडतात ते पहाणे रोचक ठरणार आहे.स्टेट बेल आउट होइल अश्या सध्या बातम्या आहेत.युरोप आता अस्थिरतेकडुन वेगवान अस्थिरतेकडे जाताना दिसत आहे.
संदर्भ :-
EU Elites Panic As Italian PM Renzi's Failed Referendum Could Lead To ""Italexit"
Will Impact of Italian Referendum Spread?
Italian Prime Minister's defeat plunges EU into uncertainty
Why Italian Instability Could Derail The Global Economy
Global Financial Markets Plunged Into Chaos As Italy Overwhelmingly Votes “No”
Italy’s Banca Monte dei Paschi to Meet Eurozone Banking Regulator
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- China-Pakistan axis threatens India’s geopolitical landscape
6 Dec 2016 - 5:17 pm | खेडूत
हम्म..!
आणि ग्रीसला कठोर अर्थिक उपाययोजना न केल्यास इयू सोडण्याचा इशारा जर्मनीने दिलाय..
9 Dec 2016 - 2:29 pm | मदनबाण
2016 marked the end of the biggest bull market of our lifetimes
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- DJ Snake (ft. Justin Bieber) - Let Me Love You | Tum Hi Ho (Vidya Vox Mashup Cover)
23 Dec 2016 - 7:39 pm | मदनबाण
आता या घटने नंतर विशेषतः इटालियन बँक Monte dei Paschi च्या बाबतीत काय घडामोडी घडतात ते पहाणे रोचक ठरणार आहे.स्टेट बेल आउट होइल अश्या सध्या बातम्या आहेत.
Italian government rides to rescue of stricken bank Monte dei Paschi
५४४ वर्ष जुनी असलेली / जगातली सगळ्यात जुनी आणि इटली मधली ३ री सगळ्यात मोठी बँक बेल- आउट केली गेली आहे ! इटलिची इकॉनॉमी युरोझोन मध्ये ३री सर्वात मोठी इकॉनॉमी आहे, यावरुन येत्या काळात काय होणार आहे याचा अंदाजा यावा. जर्मनी आणि फ्रान्सच्या बँकां काही प्रमाणात इटलीला एक्स्पोझ आहेत. जर्मनी म्हंटले Deutsche Bank चे नाव यावेच लागेल, ७.२ बिलियन मध्ये डिओजे बरोबर मांडवली केली आहे. कुठल्या भानगडी या बँकेने केल्या नाहीत असे नाही, हल्लीच डार्क पुल केस मध्ये ३७ मिलियना फटका कबुल केला आहे. ग्रीस नंतर बेरोजगारीच्या बाबतीत इटलीचा नंबर लागतो.आपल्याला इटलीचा बँकिंग क्रायसिस उलघडताना येत्या काळात दिसेल.
या बँका बद्धल इधिक इथे :-
Italian government rides to rescue of stricken bank Monte dei Paschi
Monte dei Paschi di Siena tries to keep €5bn rescue plan alive
Monte dei Paschi di Siena: a brief guide to the world’s oldest bank
EUROPE
Italy’s Political Instability Threatens the Eurozone Economy
Monte Dei Paschi: The Agony Of Italy's Oldest Bank
Deutsche, Credit Suisse to pay billions over mortgage bonds
Deutsche Bank to pay $37m penalty to settle investigations related to its dark pool trading
SEC Settles $37M Charges With Deutsche Bank Over Order Router Lapse
तिकडे अमेरिकेत फेड ने रेट हाईक जाहिर केली, वर्षापुर्वी रेट हाईक केल्यावर ही २री रेट हाइक आहे, पुढील वर्षात ३ रेट हाईक देण्याचा त्यांचा मानस आहे.सध्या सीआयए, फेक न्यूज ,पिझ्झा गेट , रशिया / पुतिन यांच्या द्वारे निवडुकीचे हँकिंग झाले इं आणि अशा स्वरुपाच्या बातम्या वाचनात आल्या... मेन स्ट्रीम मिडिया फेक न्यूजच्या गप्पा मारतो हाच मोठा विनोद आहे ! ;) याहुन मोठा विनोद म्हणजे इंटरनेटला कनेक्टेड नसलेली अमेरिकेची व्होटिंग मशिन्स रशियाने हॅक केली ! ;) रशिया तंत्रज्ञानात इतका पुढे गेला ? ;)
चीनच्या जोरदार वेगाने युएस ट्रेजरीच्या डंप करण्याच्या बातम्याही येत आहे... अलेप्पो... आणि बरच काही.
जाता जाता :- नेक्स्ट स्पेन ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- DJ Snake - Let Me Love You ft. Justin Bieber
23 Dec 2016 - 7:48 pm | मदनबाण
एक राहिलेच...
डिजिटल इंडिया ? हे काय असतयं ?
उत्तर :- India 96th in download speed, behind Nepal, Bangladesh
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- DJ Snake - Let Me Love You ft. Justin Bieber