औरंग्याचे ठाणे खादाडी धागे पाहून पिंपरी चिंचवडमधील ठिकाणांसाठी पण धागा असावे असे वाटल्याने इथल्या काही ठिकाणांची भर टाकत आहे. पिंपरी चिंचवडचे मिपाकर अजून काही ठिकाणांबद्दल लिहितीलच.
१. नाशिककर कॅन्टीन - एच ए कॉलनीत,
ह्याचं फरसाण खूप जबरदस्त. वडापाव पूर्वी खूप छान होता पण हल्ली सोडा जास्त मारतो. सामोसा आणि त्याबरोबर देत असलेली खोबर्याची चटणी मात्र अत्युत्तम. गुलाबजामपण खूप उत्कृष्ट. सकाळी ८ ते संध्याकाळी ५.३० / ६ पर्यंत चालू असतं.
२. करमरकर - चापेकर चौक, चिंचवड
साबुदाणा खिचडी, कोथिंबीर वडी खूप छान, पोहे, उपमा, मिसळ वगैरे मिळतात. किंचित महागडं पण दर्जेदार
३. मयुर मिसळ - चिंचवड स्टेशन
पिंचिंमधली सर्वात चांगली मिसळ इथेच खाल्लीय. बाकी चिंचवडगावात नेवाळे ( हा तिखटाचे डबेच्या डबे ओतत असावा रश्श्यात इतकी तिखट), लिंक रोडवर दे धक्का, पिंपरीगावात निसर्ग, अतिथी, जनता, दिप्ती असे मिसळीचे ठेले आहेत.
४. कुदळेची भेळ - पिंपरीगाव, नवमहाराष्ट्र शाळेच्या मागे.
मटकी भेळेसाठी प्रसिद्ध. भेळेची ताटली अगदी भरगच्च देतो. त्यवार मटकी आणि लिंबाच्या रसात वाफवलेल्या हिरव्या मिरच्या. अफाट लागतात.
५. महादेव पॅटिसवाला - पिंपरी कॅम्प
सकाळी ह्याच्याकडे खास सिंधी पक्वान मिळतं. दाल पकवान. आणि संध्याकाळी रगडा पॅटिस (सिंधी स्टाईलचं). दोन्ही वेळा भरपूर गर्दी असते. दालवडा, मिरचीवडा, भजी ह्या अजून काही खासियती.
६. गीता स्नॅक्स सेंटर - निगडी
पावभाजी आणि कॉल्ड कॉफीसाठी फेमस
७. गणेश स्वीट मार्ट - पिंपरी कॅम्प.
ह्याच्यासारखी रसमलई अगदी चितळे बंधू, काका हलवाईकडे देखील मिळत नाही. माफक गोड आणि चवीला प्रचंड सुंदर.
८. यशवंत स्वीट मार्ट - चिंचवडगाव
गुलाबजाम, बाकरवडी आणि इतर पदार्थ. गुलाबजाम जवळपास नाशिककरसारख्याच चवीचे.
९. कलादीप स्वीट मार्ट - चिंचवडगाव.
इथला ढोकळा खूप भारी आणि त्याच्याबरोबर मिळणारी पुदिन्याची चटणीपण खूप भारी. खूप लवकर संपतो ढोकळा इथला.
हाटेलं वगैरे मुद्दामच दिलेली नाहीत, मिपाकर अजून भर घालतीलच.
प्रतिक्रिया
31 Aug 2016 - 4:50 pm | नाखु
नक्की कुठे आहेत?
जवळची खूण दिल्यास बरे होईल
अज्ञ नाखु
31 Aug 2016 - 4:58 pm | प्रचेतस
दुत्त दुत्त नाखुन चच्चा.
31 Aug 2016 - 5:21 pm | अभ्या..
दुत्त दुत्त प्रचेतसकाकाच.
आम्ही आल्यावर कुठलेतरी क्लब स्टाइल हाटेल हुडकून पनिरवाले आयटेम खाऊ घालतो. तेव्हा असले काही आठवत नाही त्याला.
31 Aug 2016 - 5:23 pm | प्रचेतस
एकतर येतोस रात्री ८ च्या पुढे. ही ठिकाणं तोवर बंद झालेली असतात.
31 Aug 2016 - 5:24 pm | महासंग्राम
हायला तुम्ही पुण्यात पण येता अभ्या शेठ
31 Aug 2016 - 5:25 pm | अभ्या..
ब्याट्या, धन्या वल्लया पशासाठी कायपण.
31 Aug 2016 - 5:28 pm | महासंग्राम
नेक्ष्ट टैम आले कि कळवा आम्ही बी आपले दर्शनाभिलाषी हौत देवा
31 Aug 2016 - 5:31 pm | अभ्या..
अवश्य मंदारराव. भेटूच आपण. ह्या वल्ल्याला फाडायचेय स्ट्रीट ट्रीटला.
31 Aug 2016 - 8:38 pm | कैलासवासी सोन्याबापु
आपला रम-यज्ञ सुद्धा ड्यु आहे बे!
31 Aug 2016 - 9:15 pm | अभ्या..
बापुसाठी कवापन, कुठपन, कसापन.
यज्ञ नव्हे तर पुरोहित महत्वाचा.
1 Sep 2016 - 8:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आमचंबी नाव घ्या, पुण्यात आलो की वल्लीची गाडी घेऊन ही सर्व ठिकाणं पालथी घालणं आलं.
-दिलीप बिरुटे
31 Aug 2016 - 4:50 pm | महासंग्राम
तोंडाला पाणी सुटलं ना राव मटकी भेळ वाचून आमचा पॉईंट आहे तो .. आज येऊ का सांगा
निसर्गची शाखा आता चौकात पण सुरु झालीये
आणि प्रदीपचा सामोसा विसरला कि राव तुम्ही
31 Aug 2016 - 4:58 pm | प्रचेतस
उद्या जमवू. आज ८ पर्यंत हापिसातच :(
प्रदिपचा सामोसा चांगलाच आहे पण नाशिकक्र उत्कृष्ट.
31 Aug 2016 - 4:51 pm | महासंग्राम
आमचा विकी* पॉईंट आहे तो
31 Aug 2016 - 4:54 pm | कंजूस
व्वा!
31 Aug 2016 - 4:57 pm | कंजूस
म्याप हवाच .गुगल नको.साधा रोड लाइन आणि रे स्टे ,बस डेपो ,मोरया गणपती ,शाळा मार्क करून
31 Aug 2016 - 5:08 pm | ब़जरबट्टू
वडगाव गावालाच लागून (जुना मुंबई हायवे ) काही मटकी भेळची दुकाने आहेत. 2 माणसांना पण भरपेट होते. पींची वरून एक बाईक राईड काढून भटकंती करायला बेस्ट असते बघा.. :)
31 Aug 2016 - 5:11 pm | प्रचेतस
कुठेशी नेमके?
इष्टुर फाकड्याच्या समाधीजवळ का पंचमुखी हनुमानाजवळ?
31 Aug 2016 - 5:13 pm | महासंग्राम
लागल्या हाती थोडं समोर जावून बेडसे लेणी पण होतील पाहून
31 Aug 2016 - 5:15 pm | प्रचेतस
अगदी अगदी. :)
किंवा तळेगावचं पांडवांचं मंदिर आणि झोपलेली द्रौपदी. :)
31 Aug 2016 - 5:17 pm | महासंग्राम
तुम्ही जे म्हणाल ते या बाबतीत आमचा अभ्यास अगदीच कच्चा त्यामुळे तुमच्याकडून अधिक जाणून घ्यायला आवडेल.
1 Sep 2016 - 9:08 am | ब़जरबट्टू
एव्हढा अभ्यास नाही राव. वडगावचा बोर्ड दिसला की आजू बाजूलाच आहे हायवेच्या.
31 Aug 2016 - 5:22 pm | जिन्गल बेल
प्रदीप स्वीट्स आणि अरिहंत भेळ/मिसळ !!!
31 Aug 2016 - 5:32 pm | प्रचेतस
अरिहंत भेळ सांगली स्टाईलची आहे. सौम्य असते पण एकदम क्रिस्पी आणि चवीला छान. तिथे इडली/डोश्याबरोबर जी खोबर्याची हिरवी चटणी मिळते ती लै भारी.
5 Sep 2016 - 2:15 pm | Mrunalini
अरिहंत भेळ... माझ्या मित्राचे हॉटेल आहे ते. अमित भिलवडे. आम्हि दोघे हॉटेल मॅनेजमेंटच्या कोर्सला एकत्र होतो.
31 Aug 2016 - 5:29 pm | इल्यूमिनाटस
डी के ची भेळ , पाणीपुरी, कच्छी दाबेली (गणपती मंदिरासमोर)
चव फार विशेष नाही
तरी लहानपणापासून तिथेच खातो!
31 Aug 2016 - 5:31 pm | प्रचेतस
भेळ आणि फरसाण भेळ चांगली असते. बाकी साधारण.
31 Aug 2016 - 5:49 pm | मृत्युन्जय
१. प्रदीप स्वीट्स पण चांगले आहे एकुणच सगळ्याच पदार्थांसाठी.
२. भेळ चौकापासुन जवळ नॅचरल आइसक्रीम पाशी एक गाडीवाला असतो संध्याकाळी त्याच्याकडचे बदाम रबडी अगदी अप्रतिम.
३. पुर्वी वासुचा वडापाव (वरच्या गाडीच्या समोर) चांगला असायचा. आताचे माहिती नाही.
31 Aug 2016 - 11:53 pm | रुपी
वासु वडापाववाल्याचे आता हॉटेल आहे.. वडापावही मिळतो अजून.
31 Aug 2016 - 5:50 pm | गणामास्तर
लायनीनं देतो एक एक
1) वडापाव - निगडी प्राधिकरणात 'वासू वडापाव'. कॅम्प एजुकेशन जवळ एक काका हातगाडी लावतात त्यांचा वडापाव पण भारी आहे. दिवसा फत्तेचंद शाळे बाहेर आणि रात्री चापेकर चौकात मिळणारा दत्त्या चा वडापाव. लिंक रोड ला डॉमिनोज शेजारी हातगाडी लावतो तो सुद्धा ट्राय करून पहा चांगला आहे. थरमॅक्स चौकातून चिखली कडे जाताना डाव्या हाताला 'काका वडापाव' पण मस्त. फरसाण आदी पदार्थांसाठी गांधी पेठेतील परदेशी ला तोड नाही.
2) साबुदाणा खिचडी,पोहे,उपमा, इडली चटणी साठी वल्ली नि सांगितल्याप्रमाणे चापेकर चौकातले करमरकर यांचे श्रद्धा स्नॅक सेंटर चांगले आहे. मोरया गोसावी मंदिराजवळ गपचूप वाड्यात सुद्धा हे सर्व अतिशय उत्तम चवीचे आणि वाजवी दरात मिळते. गपचूप कडे उपवासाची मिसळ सुद्धा लै भारी. बटाट्याचा चिवडा,उपासाचे पापड यावर साबुदाणा वडा कुस्करून दाण्याची आमटी घालतात. मस्त लागते. मोरया गोसावी मंदीरा समोरचं 'चिंतामणी' मध्य उपवासाचे थालीपीठ मिळते ते पण छान.
क्रमशः
31 Aug 2016 - 6:00 pm | प्रचेतस
दत्त्याचा वडापाव झकास आहे. डॉमिनोज म्हणजे तुझ्या इथेच रे. चक्कर टाकतो हापिसातन येता येता.
गपचुपाकडे अजून गेलोच नाही. उद्या गुरुवार. उपासाचे पदार्थ मिळतील. जाऊयात संध्याकाळी.
31 Aug 2016 - 6:19 pm | इल्यूमिनाटस
दत्त्या कधी कधी खारट वडा पाव देतो.
कालच एक नवीन वडापाव वाला /वाली सापडला/ सापडली. मोरया हॉस्पिटल समोर, कमला कॉर्नर च्या चौकात
चांगला होता वडापाव
आकुर्डीच्या संभाजी चौकात चाचा चा बर्गर मिळतो , म्याक डी पेक्षा लै वेळा भारी
31 Aug 2016 - 7:18 pm | सत्याचे प्रयोग
सहमत. बर्गर झकास चव असते.
7 Sep 2016 - 11:30 am | देवांग
दत्ताचा वडापाव फक्त फत्तेचंद शाळेजवळ मिळतो. गेल्या महिन्यात दत्ता वारला. चापेकरचौकात मिळतो तो त्याच्या भावाचा गिरधारीचा वडापाव. सध्या त्याचा मुलगा रुपेश गाडी चालवतो. फक्त 6 ते 9. 1000 वडापाव विकत असावा ... त्याच्याकडे थंड वडापाव देवालासुद्धा मिळणार नाही. वडापाव एकच नंबर
31 Aug 2016 - 6:09 pm | कपिलमुनी
मस्त्यप्रेमींसाठी इथे छान थाळी मिळते
पत्ता : डी वाय पाटील आकुर्डी कडून रावेत कडे येणार्या रस्त्याला डाव्या बाजूस .
बांगडा थाळी १५० , सुरमई : २०० असे रेट आहेत , तांदळाची गरम भाकरी , सुकटाची किंवा सोड्याची चटणी , रस्सा आणि रवा फ्राय असा बेत असतो .
( सोलकढी आवडली नाही)
31 Aug 2016 - 6:10 pm | संपत
गांधी पेठेतील बालाजी मिसळ, मोरया गोसावी जवळची कवी मिसळ पण छान. आजकाल कवी मिसळ जरा तिखट झाली आहे.. आणि आपल्याला नेवाळे मिसळ देखील आवडते बुवा.
लिंक रोड वरचा डोमिनोस जवळचा वडापाव देखील छान
रोज् वूड शाकाहारी जेवणं चांगले
चिंचवड मधून आल्यापासून चावडीत अनेकदा गेलो. तेही ठीक.. बाजूचे वाटिका हि आवडते
लिंक रोड वरचे कालिका मातेच्या देवळाजवळ साफारोन.. दोनदा गेलो.. दोन्हीवेळा खुप छान पंजाबी जेवण
जवळपास विसरलो होतो.. तंदुरी पदार्थ आणि बिर्याणी साठी सर्वात आवडते आणि सवयीचे चापेकर चौकातले KGN.
31 Aug 2016 - 7:36 pm | प्रचेतस
बालाजी मिसळ म्हणजेच कवी मिसळ.
मिसळीपेक्षा त्याचं वडा श्याम्पल भारी लागतं. गांधी पेठेत आहे ती नेवाळे. त्याच्याकडची बटाटा भजी आणि लाल तिखटाची चटणी मस्त.
3 Sep 2016 - 11:10 pm | संपत
सॉरी नेवाळे मिसळ गल्लीबाहेर एक हॉटेल आहे. बहुधा काळुराम ची मिसळ म्हणतात. मला ती मिसळ गांधी पेठेतली म्हणायची होती.
7 Sep 2016 - 11:34 am | देवांग
नेवाळेच्या बाहेर मशिदीच्या बाजूला शशीची मिसळ मिळते. मस्त असते. माझी फेव्हरेट.. ;)
7 Sep 2016 - 11:37 am | प्रचेतस
शशीची खाल्ली नाही. वीकांती जाईन तिथे.
7 Sep 2016 - 12:42 pm | नाखु
कारण तोच मनुक्ष्य भजी-पाव पॅटीसचा गाडा लावतो तिथेच.
31 Aug 2016 - 6:19 pm | प्रशांत
वाचनखुण साठवण्यात आली.
31 Aug 2016 - 6:29 pm | डॉ सुहास म्हात्रे
हे असं नुसतं तोंडाला शाब्दीक पाने पुसू नका. पिंचीमध्ये एक झक्कास कट्टा आयोजित करा आणि लेखात सगळं खर्र खर्र लिहीलं आहे हे सिद्ध करा. :)
31 Aug 2016 - 6:31 pm | अभ्या..
ह्ये परफेक्ट एक्काकाका.
वल्ल्या नुसता बोलबच्चन आहे.
31 Aug 2016 - 7:27 pm | कपिलमुनी
कधी करायचा सांगा ! पिंचीवाले पुणेकरांसारखे टांगारू नाहीत
31 Aug 2016 - 7:32 pm | प्रचेतस
अगदी अगदी.
आणि ठाणे डोंबोलीकरांसारखे जाहिरातबाजही नाहित.
31 Aug 2016 - 8:35 pm | डॉ सुहास म्हात्रे
एक तारीख ठरवून धागा टाका लगोलग !
31 Aug 2016 - 10:41 pm | प्रचेतस
लवकरच तारीख ठरवून धागा काढतो.
1 Sep 2016 - 10:23 am | अनिरुद्ध.वैद्य
प्रतिक्षेत!
31 Aug 2016 - 8:46 pm | मुक्त विहारि
ते पुणेकर आणि पिंचिकरच येणार-येणार म्हणून जाहीरात बाजी करतात आणि येत नाहीत.
अंबरनाथचा महादेव साक्षीला आहे.
31 Aug 2016 - 10:43 pm | प्रचेतस
यायचंय हो खरंच.
अंबरनाथच्या महदेवानं बोलावणं नाही धाडलं अजून :)
31 Aug 2016 - 11:25 pm | बोका-ए-आझम
महाकट्टा केला, दोन्ही धाग्यांना २०० प्रतिसाद घेतले. मुंबई ती मुंबई! बाकीचे नुसती अजरामर जांभई! (चला पळा!)
31 Aug 2016 - 11:27 pm | प्रचेतस
=))
1 Sep 2016 - 9:30 am | महासंग्राम
आझम राव जसं पुण्यात नदी पल्याड पुणे संपते, तसेच खाडीपूल सोडला कि मुंबई सम्पली. तेव्हा म्हाकट्टा नवी मुंबईत झाला होता, मुंबईत नाही (आता पळतो>>>>>> ).
1 Sep 2016 - 11:32 pm | बोका-ए-आझम
सर्व नद्या शेवटी समुद्रालाच मिळतात तसं. पुणे हे मुंबईचं सर्वात मोठं उपनगर आहे हे माझं मत आहे.
2 Sep 2016 - 9:30 am | महासंग्राम
देवा आता तुमच्या सारखे लोकं म्हमईत राहतात म्हंटल्यावर पुणेकर येणारच ना
1 Sep 2016 - 10:27 am | प्रमोद देर्देकर
अहो मुवी आपल्या ठाण्याच्या कट्ट्याला तुम्ही तिघांनी टांग दिलीच की. मग तुम्ही सुध्दा येणार येणार म्हणता पण येत नाहीत. तलावपाळीचा कौपीनेश्वर साक्षीला आहे.
1 Sep 2016 - 1:32 pm | मुक्त विहारि
द्या...द्या...द्या...आम्हाला घरचा आहेर...
पम्या, लेका, अरे बाबा त्यावेळी खरोखरच मह्त्वाचे काम ऐनवळी निघाले.
असो,
तुझा त्रागा मी समजू शकतो.
1 Sep 2016 - 3:41 pm | मृत्युन्जय
ठाण्याच्याच कशाला शोरबा, सिंहगड रोड, पुणे या कट्ट्ञाला देखील मुविंनी टांग मारली होती
1 Sep 2016 - 2:55 pm | प्रभाकर पेठकर
मी २५ तारखेला येतो आहे पुण्यात.
1 Sep 2016 - 10:22 am | अनिरुद्ध.वैद्य
पन आमाले सांगजा.
31 Aug 2016 - 8:24 pm | गणामास्तर
मागील पानावरुन पुढे चालू..
मिसळ - नेवाळेची मिसळ बरेचं लोक खाऊ शकत नसले तरी मला ती आवडते. अजिबात तिखट न झेपणाऱ्या लोकांनी त्या वाटेला न गेलेलंच बरं. त्याची बटाटा भजी मात्र अतिउत्तम. त्या क्वालिटीची भजी अजून तरी मी कुठे इतरत्र खाल्ली नाहीत. कवीची मिसळ चवीला बरी असते, ज्यांना बेडेकरची आवडते तसल्या लोकांसाठी.कवी चतुर्थीला उपवासाची मिसळ पण देतो. बाकी वर उल्लेख आल्याप्रमाणे निसर्ग,जनता आणि मयूर सुद्धा उत्तम. अरिहंत गंडलेलं आहे असे माझे मत.
भेळ - अन्नपूर्णा च्या चौका अलीकडे 'चौपाटी' मध्ये चाट चांगले आहेत. थंड पाण्याची पाणीपुरी मिळते, चवीला एकदम मस्त.
प्राधिकरणात भेळ चौकाच्या थोडेसे पुढे 'ओम शिव स्वादिष्ट' मधली भेळ,पाणीपुरी आणि रगडा पुरी भारी आहे.
पावभाजी,पराठे आणि इतर - गीता स्नॅक सेंटर, शर्मा, नायडू आणि पिंगारा हे तिघे निगडी प्राधिकरणात जवळ जवळ आहेत.पावभाजी सगळ्यांकडे चांगली आहे, गीता मध्ये मस्तानी पण चांगली मिळते. शर्मा कडे मटका कुल्फी आवर्जून खावी अशीचं. पिंगारा मध्ये चीज पराठा सुद्धा आवर्जून खावा असाचं तो हि फक्त 70 रुपयांत. भरपूर चीज भरून देतो. आकुर्डी स्टेशन समोरचं बरेचं प्रसिद्ध असे 'शहाजी पराठा' आहे (तेचं ते लक्ष्मी रोड वाले) पराठे, दही भल्ला,लस्सी एकदम कडक.
त्याचे दर मात्र लक्ष्मी रोडच्या शाखे पेक्षा इथे बरेचं जास्त आहेत.त्याच्या बाजूलाचं शवर्मा किंग आहे. उत्तम शवर्मा आणि बर्गर बनवतो तो. पिंपरी मधले छाया पराठा सुद्धा चांगले आहे. अतिशय स्वस्त आणि मस्त पराठे. 50-60 रुपयांत व्हेज आणि 90 रुपयांत चिकन, खिमा पराठा मिळतो. सोबत बटर,दही आणि ग्रेव्ही सुद्धा येते.
स्वीट मार्ट - जिलेबी साठी गांधी पेठेतील यशवंत. यांच्याकडे बाकरवडी पण छान मिळते. प्रदीप स्वीट्स च्या पिंचि मध्ये भरपूर शाखा आहेत. एकंदरीत सर्वचं पदार्थ उत्तम क्वालिटीचे मिळतात.निगडी चौकातले गोकुळ स्वीट्स मध्ये देशी शुद्ध तुपातली जिलेबी आणि इमरती मिळते, गुलाबाच्या पाकळ्या आणि गुलाबजल वगैरे टाकून. जबरदस्त लागते. चखणा आयटम घ्यायचे असतील तर 'बंधन स्वीट्स' शाहूनगर बागेजवळ. एकापेक्षा एक भारी प्रकार मिळतात. पिंचि मध्ये येत नसले तरी एका स्वीट मार्टचा उल्लेख केल्याशिवाय राहवत नाही ते म्हणजे परिहार चौक,औंध इथले 'मिठास'. काय जागा आहे राव. ड्राय फ्रुट बासुंदी, सीताफळ रबडी खावी तर इथेचं. बंगाली मिठाईचे तर इतके प्रकार आहेत कि बास्स. खीर कदम आणि संदेश चे भयानक सुंदर प्रकार मिळतील. ते आवर्जून खावेचं, राहिलचं तर कमल भोग आणि घेवर पण लै भारी. एका भेटीत समाधान होण्यासारखे नाहीचं हे ठिकाण. मला घरापासून साधारण दहा किमी पडते तरी मी या गोष्टींसाठी तिथे बऱ्याचदा जातोचं जातो.
31 Aug 2016 - 10:59 pm | प्रचेतस
रच्याकने ते यशवंत लै लै जुनं आहे हं.
स्थापना १९४१
31 Aug 2016 - 8:51 pm | मुक्त विहारि
स्टेशनजवळ (मुंबईच्या भाषेत आकूर्डी-वेस्ट.) मद्रासी (की केरळी...कुणी का असेना लुंगीवाले) हॉल समोर, मटण थाळी उत्तम मिळते.
मस्त गरमागरम भाकर्या आणि हवा तितका तांबडा-पांढरा रस्सा.
शिवाय वेटर पण मागे उभा नसतो.
स्वगत : च्यामारी टोपी, ह्या गणपतीत आकुर्डीलाच जावे म्हणतो.
31 Aug 2016 - 8:56 pm | अभिदेश
वेगळा धागा काढलात , नाहीतर लोक पिं. चिं. ला पुण्यात धरत होते आणि पुणे खाद्ययात्रेचा धागा हायजॅक करत होते.
31 Aug 2016 - 8:58 pm | gogglya
पाया सूप पण उत्तम असते.
31 Aug 2016 - 9:18 pm | गणामास्तर
बिर्याणी आणि इतर नॉन व्हेज -
चिंचवड मध्ये टाटा मोटर्स च्या मेन गेट कडून मटेरियल गेट कडे जाताना डाव्या हाताला 'पथिक' म्हणून हॉटेल लागते. नेहमीच्या बिर्याणी पेक्षा थोडी वेगळी आहे पण चवीला फारचं उत्तम. दम मसाला वगैरे वेगळा सुद्धा आणून देतो.
पिंपरी मार्केट ला 'कराची' मध्ये मटन पॅटिस मिळते, त्याचे वर्णन करायला शब्द पुरेसे नाहीत.
मटण खिमाचे बनवलेले पॅटिस आणि वरून खिम्याचाचं घातलेला थोडा घट्ट असा रस्सा, सोबतीला कांदा आणि पुदिन्याची चटणी. जबरा चव एकदम. थोडे कळकट हॉटेल आहे परंतु बाहेरून रागरंग बघून परत फिरू नका नाही तर एका चांगल्या अनुभवाला मुकाल. त्याच्याकडे बिर्याणी आणि चिकन नवाबी मस्त मिळते. चिकन नवाबी हा भाजलेले चिकन तुकडे आणि ऑम्लेट एकत्र करून केलेला प्रकार आहे.
हिंजवडी मधले हैद्राबाद बिर्याणी बहुतेक लोकांना माहित असेल त्यामुळे त्याबद्दल जास्त लिहीत नाही.
हिंजवडी मध्ये मेझा नाईन समोर नवीन चालू झालेले 'मुघल महाल' एकदम सरस.
अत्युकृष्ट अशी 'मुघलाई बिर्याणी' बनवणारा पुण्यातला एकमेव माणूस असावा.एक बिर्याणी तिघांना आरामात पुरते.
तिथले स्टार्टर जीवघेणे आहेत. चिकन लेग पीस मॅरीनेट वगैरे करून त्याला चिरा देऊन आत मध्ये खिमा भरून
भाजला होता. खत्तरनाक प्रकार आहे तो.
पिंपळे सौदागर मध्ये कोकणे चौकात 'काबील-ए-तारीफ' आहे. सर्व मुघलाई पदार्थांची चव एकंदरीत छान आहे.
तिथे आवर्जून खावे म्हणजे मुर्ग कलमी मसाला आणि मुर्ग मुसल्लम. कलमी मसालात एका डिश मध्ये तीन भाजलेले
लेग पीस विथ खिमा मिक्स ग्रेव्ही असे येतात. थोडासा तिखट बनवायला सांगितलं तर उत्तम लागतो हा प्रकार.
कोल्हापुरी थाळी खायची असेल तर थरमॅक्स चौकातलं 'राजवर्धन' ब्येष्ट. एकदम परफेकट चवीचा तांबडा आणि पांढरा रस्सा. ना जास्त तिखट ना एकदम फिका.चिकन/मटन मसाला आणि फ्राय सुद्धा चवदार.
महत्त्वाचं म्हणजे तो बोकडाचं मटन देतो. नाही तर इकडे बऱ्याचं ठिकाणी बोल्हाई मिळते.
बोल्हाई खायचं असेल तर वाल्हेकरवाडीतलं 'समाधान' चांगलं आहे. खेड जवळ 'बंडू भाऊंचा' ढाबा आहे.
तिथली मटन भाकरी सुद्धा भारी आहे. तिथे कुठलाही पदार्थ मागवला तरी रस्सा हा बाय डिफॉल्ट अनलिमिटेड आहे.
एक पातेलचं आणून ठेवतात समोर.
कंदुरी चिकन/मटन खायचं असेल तर विशालनगर कडून हिंजवडी कडे येताना डाव्या हाताला 'मराठवाडा' हॉटेल आहे.
तूर्तास इतकेचं. अजून वेळ मिळेल तशी भर घालतो.
31 Aug 2016 - 9:42 pm | अभ्या..
गणा, गणा, अरे गणा, मला भेटल्यावर त्यावेळी तुझे हे ज्ञान कुठे तांबडा पांढरा वरपायला गेलते रे दुश्टा.
तू पन्नास रावाच्या बैठकीतील हायस राव.
31 Aug 2016 - 10:41 pm | गणामास्तर
तू लगा अचानक उगवणार रात्रि अपरात्री मग काय करणार.
पुढच्या टायमाला लवकर येणे करावे जेणेकरून आपल्याला
"साग्रसंगीत कार्यक्रम" करता येईल :)
31 Aug 2016 - 10:45 pm | अभ्या..
व्हय महाराजा,
आपण आमच्या गावी येऊन दिलेली टांग लक्षात आहे पण कौटुंबिक कारणासारख्या नाजूक बहाण्याला माफ केलेलं आहे.
नेक्स्ट टाईम पींची कट्टा.
31 Aug 2016 - 10:46 pm | प्रचेतस
पक्षीदरीत का? :)
31 Aug 2016 - 10:58 pm | अभ्या..
नको, ते बोगस आहे. वरून झगमग न आतून भगभग आहे.
साधं हुडका पण चवीला भारी हुडका.
31 Aug 2016 - 10:59 pm | गणामास्तर
ए टांग बिंग दिली नव्हती बे. स्पष्ट सांगून गेलतो तसं.
ते जाउदे तू ये आता इकडं. गेल्या वेळी अभक्ष्य भक्षण चालणारे/न चालणारे आणि ईतर बरेचं वर्गीकरण करून सर्वांच्या सोयीचे ठिकाण ठरवले होते.
यावेळी आपल्या टाइपचा स्पेशल कट्टा करू :)
1 Sep 2016 - 8:18 am | कैलासवासी सोन्याबापु
मास्तरांच्या सामिष व्यासंगास आमचा साष्टांग दंडवत! तळेगाव हॉस्टेलला parasite राहत असताना दारू प्यायला अन मटण खायला तळेगाव ते भक्तीशक्ती (पुणे गेट हॉटेल) बोंबलत यायचे (ते ही थंडीच्या दिवसात बाईकवर) दिवस आठवले! मास्तर
1. पदमजी पेपरमिल समोर आदित्य बिर्ला कडून डांगे चौक जाताना डाव्या बाजूला एक नवे जंगी कोल्हापुरी हॉटेल उघडले होते म्हणे, ते कसे आहे?
2. नाशिक फाट्याजवळ कुठंतरी एक अप्रतिम अहमदनगरी मटण अन "मटण अळणी" देणारे हॉटेल आहे म्हणतात,ह्या दोन्ही बद्दल जमल्यास सांगा
1 Sep 2016 - 9:19 am | नाखु
नाशीक फाट्याजवळचं (ते नंतर ऊड्डाण पोलाच्या रस्ता रुंदीत ऊडालं अता पुढे कुठेतरी आतल्या बाजूला आहे (कासारवाडीला)
खेडशिवापुरनंतर गरमागरम तांदळाची/ज्वारीची भाकरी इथेच खाल्ली आहे, मी अट्टल शाकाहारी असल्याने इथे गेल्यावर झुणका/मसूराची उसळ्/वाटाण्याची आमटीची चव चाखली आहे.माहोल अगदी एखाद्या टपरी वजा (ष्टांण्दाशेजारच्या हाटेलाचा) पण चटणी भाकरी आणि बर्याचदा दहीकांदा एकदम फर्मास त्याच्याकडे एकदा हुलग्याचे शेंगोळेही खाल्ले आहेत.
आधिच्या कंपनीत गणामास्तरसारखा अस्सल खवय्या (बाहेरून झकपक नाही तर अट्टल चवीची ठिकाणे शोधणारा) मित्र होता त्याच्या बरोबर सगळ्या समीष हाटेलास भेटी दिल्या आहेत.
साध्या खोपटात असलेले हटेल एम्पायर ईष्टेटच्या जवळाच्या पंपाजवळ हे मांसाहारी हाटेल आणि मारुतीराया मंदीरात जवळ जवळ होते.
रस्ता रुंदीत मारुतीराया ऊड्डाण रस्त्या पलीकडे गेले आणि हे हाटेल शाहुनगरला केसएबीपासून्च्या रस्त्यावर गेले. हाटेल्चे नाव जगुबाई
शाकाहारींसाठी सावलीही चांगले ठिकाण आहे तसेच रसोईसे (मुलांना जास्ती आवडले) पेशवाई ठीक ठाक (म्हणजे मी शाकाहारी असल्याने समिष वाल्यांना चवदार वाटत असावे ,बरीच गर्दी दिसली म्हणून अंदाज)
पिंगारा ९जे पुर्वी आकुर्डी ह्चौकातून प्राधिकरणात गेले तेही ठीक्ठाक्च वाटले त्याच्या शेजारी असलेले अतिथी चांगले होते.
जयश्री मिसळ (बजाज टेंपोसमोर) चवीला चांगली आहे पण आधीच तयार करून ठेवत असल्याने चिखल-अनुभव येतो.
मयुरला तोड नाही पण पिंपरीतील जनता आणि निसर्गही आप्ला आब राखून आहेत.
किर्स्पी भज्यांसाठी चिंचव्ड एम आय डीसी हाफीसमोरचा परदेशीचा गाडा मस्त्,त्याच्याच बाजूला दोन स्वीट मार्ट आहेत एकात हातपापडी चांगली मिळते,जवळच असलेले शीतल एके काळी जबरा होते मध्यंतरी मालक खांदेपालट झाल्यावर रया गेली होती,अता जरा पुर्वपदावर येत आहे.
स्टेशनच्या मल्हारचा बाजार उठला पण त्या पुर्वी जवळचे भागयश्री डाय्नीम्ग हॉल चांगले होते,माल्काला जागा वाढ्वायची (कु)बुद्धी झाली आणि जागा वाढली आणि गुणवत्ता घटली नंतर बंदच झाले.
लस्सी साठी दोन्ही बहिरवाडे चांगले एक बँकेसमोर आणि दुस्र्या पो स्टेशनच्या पिछाडीला.
पण अस्सल भज्यांसाठी जयश्री थिअएटराचा बाहेर एक गाडी लावीत असे (अता लावतात का ते माहीत नाही) पुर्वी कंपनीतून चालत जायच्या अंतरावर असल्याने सायंकाळी भजी अग्निहोत्र व्हायचेच.
वाल्हेकरवाडी रस्त्याला बरीच हाटेले आहेत सगळीच्या सगळी समिष असल्याने कधी जेवायला गेलो नाही,फक्त एक्दा रानमळ्यात मुनीवर,मोदक आणि सौरभला भेटायला गेलो होतो.
चाकणची मल्हार मिसळची घराजवळच्या चौकात नवीन शाखा उघडली आहे कशी आहे माहीत नाही (पण गर्दी अस्ते,पिंचिंमिपाकरांबरोबर एक्दा चाखून पाहू यात.)
1 Sep 2016 - 9:43 am | विनटूविन
द मराठा, आता फ्लायओव्हर क्रॉस करून पिंपळे गुरवकडे गेले की लागते.
इथे सुकी मेथी भाजी, पिठले, भाकरी, काळ्या तूराची उसळ इ. मराठी आयटम छान मिळतात. थोडे पंजाबी (जिरा राईस) वैगरे कॉम्बो करून मस्त जेवण होते.
1 Sep 2016 - 9:48 am | गणामास्तर
'द मराठा' प्युअर व्हेज आहे हो. बापू मटणा बद्दल विचारत आहेत.
1 Sep 2016 - 10:23 am | नाखु
हॉटेलच नाव महाराष्ट्र खानावळ असेच होते
1 Sep 2016 - 9:46 am | गणामास्तर
मला कसला दंडवत घालताय बाप्पू ! सामिष खायचं म्हणलं कि आम्हाला हाटेलं धुंडाळणं भाग आहे.
'पुणे गेट' सुरुवातीच्या दिवसात चांगलं होतं पण आता बरचं बिघडलंय. त्याच्या मागेच ट्रान्सपोर्ट नगर मध्ये 'जगुबाई मटण खानावळ' आहे. तिथे गेला असतात तर कधी फिरून पुणे गेट ला गेला नसतात. तीर्थ मिळत नाही तिथे पण ट्रान्सपोर्ट वाल्यांचा एरिया असल्यामुळे आजूबाजूला ढिगानी पर्याय उपलब्ध आहेत.
पदमजी पेपर मिल जवळचे तुम्ही म्हणताय ते 'पुरेपूर कोल्हापूर'. कोल्हापूरच्या नावानी निघालेल्या इतर बऱ्याच
ठिकाणांसारखे हे पण गंडलेले आहे.
नाशिक फाट्या जवळ कुठले म्हणताय ते शिल्पा गावरान आहे. 'मटण अळणी" भारीचं आहे तिथले शिवाय
तिखट रस्सा वाटी पण एकदम झकास. 'बसणाऱ्या' लोकांसाठी खास जागा आहे ही.
1 Sep 2016 - 10:27 am | अनिरुद्ध.वैद्य
शिल्पा गावरान लै ऐकुन आहे. जावच म्ह्णतोय एक्दा.
1 Sep 2016 - 9:52 pm | चाणक्य
पदमजी जवळ आहे ते पुरेपुर कोल्हापूर नव्हे. 'लई भारी कोल्हापुरी' आहे. बाकी ते गंडलंय याच्याशी बाडीस.
3 Sep 2016 - 6:04 pm | बोका-ए-आझम
दादरचं पण धन्यवाद आहे. पैसे वाया! :(
1 Sep 2016 - 4:15 pm | अमरप्रेम
मोरवाडी चौकातून जवळच कोर्टाकडे जानाऱ्या रोडवर डाव्या हाताला 'जय मल्हार' मध्ये मस्त मटण-भाकरी थाळी मिळते. तिखटाशी ज्यांच जुळत नाही अश्यांनी विचारही करू नये.
31 Aug 2016 - 9:20 pm | आजानुकर्ण
जरा ठिकाणाच्या जवळपासच्या खुणाही सांगा. नुसतं अरिहंत म्हटल्यावर काय कळणार? आमचे मित्र मनोबा यांनी मोरया गोसावी मंदिरासमोर थालीपीठ खायला घातले होते. आम्ही गेल्यावर पीठ थापून केलेले गरमागरम थालीपीठ एकदम मस्त.
(पिंचिंकर) आजानुकर्ण
31 Aug 2016 - 10:39 pm | प्रचेतस
अरिहंत म्हणजे मोरया हॉस्पिटलजवळ. केशवनगर काळेवाडी रोडच्या जस्ट सुरुवातीला.
7 Sep 2016 - 11:35 am | देवांग
अरिहंत हि बकवास जागा आहे
7 Sep 2016 - 11:38 am | प्रचेतस
अरिहंतची सांगली भेळ खूप छान मिळते. पोहे, उप्पीट पण छान आहेत. मिसळ थोडीशी गंडलेली आहे मात्र.
7 Sep 2016 - 2:23 pm | देवांग
तुम्ही बिजलीनगर (गिरीराज जवळ) येथे असलेल्या राजश्री शाहू उद्यान समोर "सागर भेळ" खाऊन बघा ...एक्दम झकास
7 Sep 2016 - 2:37 pm | गणामास्तर
तिथेचं बाजूला सावंतच्या गॅरेज शेजारी ओल्या नारळाच्या करंज्या मिळतात. कधीही जा गरमचं मिळतील.
ते चितळे वगैरे स्वीटमार्ट वाल्यांना वर्षभर पुरवतात. डायरेक्ट तिथून घेतल्या तर बऱ्याचं स्वस्त पडतात.
7 Sep 2016 - 2:38 pm | प्रचेतस
हायला.
जाउयात.