झाडावर पाखरू बसलं : लावणी

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
28 Aug 2016 - 11:11 pm

झाडावर पाखरू बसलं : लावणी

पाडाशी आला आंबा बघुनी
आभाळ खुदू खुदू हसलं
चोच टोचण्यास पोपट बघतंय
टक लावून एकतार टपलं
कुणी तरी याssss गं
पोपट धराssss गं
माझ्या धीराचं अवसान खचलं
गं बाई माझ्याsssss
झाडावर पाखरू बसलं ...||धृ||

आडून येती, झाडून येती
चहुबाजूला थवेच दिसती
लगट करुनी झोंबाझोंबी
पानाच्या आडोशाला धसती
चोचटोचुनी चोची चरती
माझ्या फळांची खादल करती
कुणी तरी याssss गं
अलग कराssss गं
माझं काळीज चोळीत थिजलं
गं बाई माझ्याsssss
झाडावर पाखरू बसलं ...||१||

कलम लावली, खतपाणी दिधलं
कुंपण करुनी जिवापाड जपलं
कुणी ना आलं, पाणी घालाया
खतं टाकाया, कुणी न दिसलं
बहर बघुनी, लाळ गाळती
ताव माराया, अभय चळती
कुणी तरी याssss गं
गोफण धराssss गं
कच्च्या आंब्याला लई बाई पिडलं
गं बाई माझ्याsssss
झाडावर पाखरू बसलं ...||२||

                  - गंगाधर मुटे “अभय”
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

अभय-काव्यअभय-लेखनकविता माझीलावणीवाङ्मयशेतीशृंगारकविता

प्रतिक्रिया

अनुप ढेरे's picture

29 Aug 2016 - 11:00 am | अनुप ढेरे

१२ तास आणि एकही प्रतिसाद नाही?
पब्लिक आता घाबरतं बहुधा तुमच्या धाग्यांवर प्रतिसाद द्यायला मुटेकाका!

तुषार काळभोर's picture

29 Aug 2016 - 11:12 am | तुषार काळभोर

१२ तासात फक्त ६९ वाचनं आहेत. लोक्स यायला पण घाबरतेत भौतेक!

ह्ये जबरदस्त फेटेउडाऊ लावणी.
फक्त आमराई राखताना गोफण वापरतेत का म्हाइत नाही.

ज्ञानोबाचे पैजार's picture

29 Aug 2016 - 2:30 pm | ज्ञानोबाचे पैजार

है शाबास जोररदार लावनी हाय एकदम फक्कड
आवडली म्हणजे एकदम आवडलीच
पैजारबुवा,

पाटीलभाऊ's picture

29 Aug 2016 - 2:55 pm | पाटीलभाऊ

मस्त जमलीये लावणी..!

नाखु's picture

29 Aug 2016 - 3:30 pm | नाखु

लिखाण, एखादा चाल लावणारा सापडला तर ताल-लयीत घुमवील या लावणीला.

जुने जाणते प्रमोदकाकांनी लावली असती चाल.

अमितदादा's picture

29 Aug 2016 - 6:07 pm | अमितदादा

फर्मास लावणी...

गंगाधर मुटे's picture

29 Aug 2016 - 8:04 pm | गंगाधर मुटे

सर्वांना मनपूर्वक धन्यवाद!

अविनाशकुलकर्णी's picture

31 Aug 2016 - 5:51 am | अविनाशकुलकर्णी

मस्त..कडक

अत्रुप्त आत्मा's picture

31 Aug 2016 - 10:15 am | अत्रुप्त आत्मा

आज...उन्हात चांदण पडलं गं........ , ह्या गान्याची आटवन जाली ना जी.
बाकि लावनी लै ब्येक्कार कडक हाय. लै लै आवाडली बगा.

विशुमित's picture

31 Aug 2016 - 4:11 pm | विशुमित

जबरदस्त लावणी मुटे काका..!!
चाल वगैरे लावली आहे का?

जव्हेरगंज's picture

31 Aug 2016 - 5:55 pm | जव्हेरगंज

लैच जबरी!

आजून पाहिजे...

ज्योति अळवणी's picture

1 Sep 2016 - 11:11 am | ज्योति अळवणी

जबरदस्त.... फक्त एक प्रश्न...

दीधल... हा शब्द गावरान भाषेच्या लावणीत बसतो का?