(लेखाचा उद्देश्य कुणाच्या भावना दुखविण्याचा नाही. निखळ मनोरंजन म्हणून हा लेख वाचवा. )
संत कबीर दास यांनी म्हंटले आहे 'माया महा ठगनी हम जानी'. माया निरनिराळे मोहंक रूप घेऊन लोकांना ठगत राहते. सुवर्ण तर मायाचे सर्वात मोहक आणि भयंकर रूप. आपली सीता मैया बेचारी सुवर्ण मृगाच्या मोहात अटकली. बेचार्या रामाने कितीही समजावले तरी तिने ऐकले नाही (बायका कधी नवर्याचे ऐकतात का?). लंकेचा राजा रावण हि सोन्यासारखी सुंदर स्त्री अर्थात सीता मैयाला पाहून मोहित झाला. परिणाम सुवर्ण लंका जाळून खाक झाली. हजारोंच्या संख्येत राक्षस, वानर मारल्या गेले. रामाने हि राक्षसांच्या संहार करून परत मिळविलेल्या सीतेला वनात सोडून दिले. कुणाच्याच हाती काही लागले नाही. झाला फक्त विनाश.
अर्जुन रथारूढ होईन कुरुक्षेत्रच्या मैदानात उतरला. दूरवर पसरलेले शत्रू सैन्य दिसत होते. या सैन्याचा संहार करून अर्जुनाला सुवर्णजडित सिंहासनावर बसायला मिळणार होते. अर्जुनाने बाण धनुष्यावर चढविला, अचानक त्याच्या मनात विचार आला, खरंच सुवर्ण सिंहासन एवढे महत्वपूर्ण आहे कि ज्यासाठी आपल्याला बंधू-बांधव सहित अक्षोहणी सैन्याचा संहार केला पाहिजे. अर्जुनाची सद्विवेक बुद्धी जागृत झाली, तो मोहापासून दूर झाला. त्याने धनुष्य जमिनीवर ठेवले. द्वारकेचा राजा कपटी कृष्ण हा अर्जुनाचा सल्लागार होता. त्याने अर्जुनाला म्हंटले, राज्य मिळाले तर शरीरावर सुवर्ण हि धारण करायला मिळेल. सुवर्णासाठी आप्त असो वा बंधू त्यांना मारण्यात काहीच गैर नाही. भौतिक जगात सुवर्णच हे सत्य आहे. तू याच सुवर्ण धर्माचे पालन कर आणि पृथ्वीवर राजसी सुख भोग. अर्जुन पुन्हा सुवर्णाच्या मोहात अटकला. आपल्या तीक्ष्ण बाणांनी लक्षावधी शत्रू सैन्याला यमसदनी पाठविले. म्हणतात १८ अक्षोहिणी सैन्य युद्धात मारल्या गेल. शेवटी पांडव सुवर्ण परिधान धारण करून सुवर्णजडित सिंहासनावर आरूढ झाले. सुवर्णाच्या मोहापायी १८ अक्षोहिणी सैन्याचे रक्त पृथ्वीवर सांडले. लाखों स्त्रिया विधवा झाला. एका संपूर्ण पिढीचा विनाश झाला. भारतातील इतिहासातला महाभयंकर विनाश.
रामायण आणि महाभारत काळापासून हजारों वर्ष लोटली, तरीही आपण भारतीय अजूनही सुवर्णाच्या मोहातच अटकलेले आहोत. जगातील सर्वात जास्त सुवर्ण भारतातच आहे. या साचलेल्या सुवर्णापायीच विदेशी लुटेरे भारतात आले. अमानुष अत्याचार येथील जनतेवर केला. जर सुवर्ण नसते, तर लुटेरे इथे कशाला आले असते. एवढे असूनही आपला सुवर्ण मोह काही कमी होत नाही. प्रधान मंत्री म्हणतात, सुवर्ण बँकेत ठेवा, बँक व्याज हि देईल. तरी हि कुणी सुवर्ण बँकेत ठेवायला तैयार नाही. प्रत्येकांनी सुवर्ण आपल्या छातीशी कवटाळून धरले आहे. घरात चिल्ला-पिल्ल्याना प्यायला दूध नसेल, पण शरीरावर सुवर्ण पाहिजे.
रियो ऑलम्पिक मध्ये आपली नेमबाज कुमारी धनुष्यावर बाण चढवून सज्ज होती. नेम भेदला कि सुवर्ण मिळणार. अचानक अर्जुनाप्रमाणे तिची सद्विवेक बुद्धी जागृत झाली. तिच्या मनात प्रश्न आला, खरंच सुवर्ण जिंकणे महत्वपूर्ण आहे का? काय मिळणार हे सुवर्ण पदक जिंकून. आधीच भारतभूमीवर भरपूर सुवर्ण आहे. आणखीन जिंकून काय करायचे. सुवर्णापायीच युद्ध होतात. विनाश होतो. सुवर्ण पदकाच्या मोहात पडले नाही पाहिजे. या कलयुगात तिला पुन्हा सुवर्णाच्या मोहात पाडू शकेल, असा गीतोपदेश देणारा कृष्ण हि नव्हता. सामाजिक न्यायावर विश्वास करणाऱ्या भरतखंडात तिचे लालन पालन झाले होते. तिने विचार केला, या छोट्याश्या सुवर्ण पदकाची आपल्यापेक्षा इतर देशांना जास्त गरज आहे. तिने सुवर्णाचा मोह टाळला. एका स्थितिप्रज्ञ प्रमाणे जय-पराजया पासून ती विरक्त झाली. लोक म्हणतात तिचा नेम चुकला, तिला सुवर्ण पदक मिळाले नाही. तरीही आपली नेमबाज आनंदी होती. अर्जुनाप्रमाणे ती मोहात अटकली नाही. तिचाच आदर्श डोळ्यांसमोर ठेऊन, आपल्या स्थितिप्रज्ञ खेळाडूंनी सुवर्ण पदकांचा मोह टाळला. मोह आणि प्रसिद्धीच्या मायावी जाळ्यात ते अटकले नाही. असो.
माया महा ठगनी हम जानी
तिरगुन फांस लिए कर डोले
बोले मधुर बानी.
प्रतिक्रिया
17 Aug 2016 - 10:41 pm | बहुगुणी
पटाईतसाहेबांनी हे थोडंसं गंमतीत/उपहासाने लिहिलं असावं हे स्पष्ट आहे, नेहेमीप्रमाणे बोधकथेचा आधार घेउन त्यांचं लिखाण आलंय. ऑलिंपिक मधील पदकांविषयी इतर वाचक मतं व्यक्त करतीलच, पण मला वाटतं इतर गल्ली-लेव्हलच्या खेळात देखील हार-जीत असतेच, हे तर ऑलिंपिक आहे, जिथे स्पर्धकांच्या कित्येक वर्षांच्या तपस्येची ही परीक्षा असते; तेंव्हा स्पर्धा जीवघेणी असणारच. अगदी शोभा डें इतकी विखारी नसली तरी खेळाडूंची पुन्हा खेळण्याची जिद्दच नष्ट होईल अशी टीका करण्यापेक्षा आपण देश म्हणून आपल्या स्पर्धकांना काय सुविधा पुरवतो याचंही जरा आत्मपरीक्षण व्हायला हवं. नेमबाज आणि भारतीय पथकाचा नेता अभिनव बिंद्रा याचं ट्वीट या संदर्भात वाचनीय आहे.
18 Aug 2016 - 8:47 am | विवेकपटाईत
गमंत म्हणून वाचा. सहज गीतेवर कृष्ण आणि अर्जुनाचे फोटू पाहून भन्नाट कल्पना डोक्यात आली.
18 Aug 2016 - 10:32 am | अभ्या..
काय भन्नाट बिननाट नाही, फालतूपणा आहे. कुणाच्या प्रयत्नाना असे उपरोधिक हिणावने हेच पटलेले नाहीये.
18 Aug 2016 - 9:05 am | आतिवास
सोन्याचा मोह नसण्याचा विनोद दर एशियाड आणि ऑलिम्पिकच्या वेळी वाचायला मिळतो. ते एक असोच.
खरं तर बिंद्रा, दीपा, श्रीकांत, साईना, दत्तू .... या सगळ्या लोकांचं चुकलेलंच आहे. व्यवस्थेशी टक्कर देत चौथे येतात, पदक हुकलं म्हणून लाखो भारतीयांना हळहळ वाटायला लावतात.
निवांत आठ तास काम करून, माझ्यासारखं ऑफिसच्या वेळात ऑफिसचं इंटरनेट वापरून ऑलिम्पिक खेळाडूंवर चर्चा करायची सोडून काय तर म्हणे मेहनत करतात.
पटाईत काकांच्या भाषेत सांगायचं तर 'व्यर्थ गेली हो इतकी वर्ष'
गंमत आहे.
आंतरजाल हीच एक गंमत आहे.
18 Aug 2016 - 9:22 am | संदीप डांगे
कडकडून सहमत! लोकांना ह्याबाबतीत विनोद सुचणे हे माझ्या तरी कल्पनेपलीकडचे आहे, विनोदाच्या नावाखाली खेळाडूंचा उपहास करणे चुकीचेच, त्यापेक्षा ढिम्म बसून पदकांची अपेक्षा ठेवणाऱ्या जनतेवर विनोद का सुचत नाहीत?
18 Aug 2016 - 9:45 am | एस
+२.
18 Aug 2016 - 9:51 am | मनीषा
+१
18 Aug 2016 - 10:24 am | प्रसाद_१९८२
सहमत...
18 Aug 2016 - 11:17 am | यशोधरा
अतिशय सहमत.
पटाईतकाका, रिओला जाऊन खेळाडूंकडे दुर्लक्ष करुन पार्ट्या करणार्या अधिकार्यांबद्दल आपले काय मत म्हणे?
आणि खेळाडू इकॉनॉमी क्लास मधून प्रवास करतात आणि हे अधिकारी वरच्या क्लासमधून, त्याबद्दल काय मत? त्यांच्यावरही एखादी रुपक कथा लिहावी.
18 Aug 2016 - 12:09 pm | नाखु
इथे लिहिले होते पुन्हा लिहित नाही.
जर खेळाडू जिंकल्यावर कौतुकात मिरवून घेतात तर दुखापतीत आणि अपयशातही पदाधीकारी आणि मंत्री-सचिवांनी स्वीकारून स्वतः जबाबदारी घ्यावी (मंत्री तरी पाच वर्षेच असतील) पण संघटनेचे धेंडे आणि मंत्रालयातील खाबू-बाबू वर्षानुवर्षे त्याच जागेवर असतात त्यांना तरी किमान लाज वाटली पाहिजे (असल्यास) आणि जर किमान आणि आवश्यक सुविधा देताना अडवणूक करण्याचा निर्लज्जपणा करीत असतील तर थेट कारवाई झाली पाहिजे.
लेख पटला तर नाहीच, पण हेटाळणी ती ही पंप्र कार्यालयाचा अनुभव (कागदी घोडे पेस्शल) असलेल्या व्यक्तीकडून, असे लिखाण अपेक्षीत नव्हते.
सुस्पष्ट नाखु
20 Aug 2016 - 8:16 am | विवेकपटाईत
पंतप्रधान कार्यालयात कार्य करणार्यांना विनोद बुद्धी नसावी का? घर द्वार विसरून कार्यालयात अधिकांश वेळ घाल्विनार्याना विनोदाची जास्त गरज असते. बाकी एवढा गदारोळ माजेल याची मला कल्पना हि नव्हती. सहज कृष्णार्जुनाची जोडी पाहून मनात आलेली कल्पना होती.
18 Aug 2016 - 6:29 pm | विवेकपटाईत
अवश्य
18 Aug 2016 - 10:30 am | क्षमस्व
अपडेट
साक्षी मलिकने पाहिलं कांस्यपदक मिळवलं।
18 Aug 2016 - 11:08 am | साधा मुलगा
काय योगायोग पहा काल हा लेख मिपावर आला आणि आज मेडल! अजून चार दिवस बाकी आहेत, येउद्या अजून असे लेख!
18 Aug 2016 - 11:11 am | मराठी_माणूस
चीड आणणारा उपहास
18 Aug 2016 - 12:19 pm | डॉ सुहास म्हात्रे
खेळाडूंना मिळणार्या सोईसवलती आणि वागणूकीचा दर्जा पाहता भारताला पदके मिळतात हेच आश्चर्य आहे ! बहुतेक सर्व पदकांची पार्श्वभूमी पाहिली तर ती सरकारी/संस्थांच्या मदतीमुळे नव्हे तर मदतीच्या अभावामध्ये आणि खेळाडूंच्या व्यक्तीगत प्रयत्न व आर्थिक बळावर मिळालेली आहेत.
जबाबदार देशांत, पदके मिळविण्यासाठी, केवळ खेळाडूंनाच नाही तर त्यांची चार वर्षे प्रत्यक्ष व्यवस्था बघणार्या अधिकार्यांना, त्यांच्या खेळाच्या संस्थेच्या पदाधिकार्यांना, सरकारी अधिकार्यांना आणि मंत्र्यांनाही जबाबदार धरले जाते.
या नियमांने अनेक भारतीय खेळसंस्थांचे अधिकारी, पदाधिकारी आणि मंत्री बरखास्त व्हायला हवे होते ! पण वस्तूस्थिती अशी आहे की वेळेअगोदर स्वतःसाठी खास ब्लेझर पटकावणारे, बिझनेस/पहिल्या क्लासने विमानप्रवास करणारे आणि स्पर्धेदरम्यान गैरहजर राहून टूर/पार्ट्या करणारे अधिकारी, पदाधिकारी आणि मंत्री मजेत असतात आणि पुढची "टूर" कुठे आणि कशी करावी याची सतत आखणी करत असतात. याविरुद्ध, खेळाडूंना खेळासाठी आवश्यक साधने (बूट इत्यादी नव्हे तर भारताचे नाव असलेले शर्ट्स) खेळ सुरु झाले तरी मिळत नाहीत, याकडे लक्ष द्यायला त्यांना सवड नसते ! :(
18 Aug 2016 - 12:40 pm | डॉ सुहास म्हात्रे
सद्याच्या प्रतिस्पर्धांतील खेळ इतके विकसित, तंत्राधिष्टित आणि स्पर्धात्मक झाले आहेत की...
"स्पर्धेतिल यश केवळ खेळाडूंच्या अथक श्रमावर अवलंबून नसते तर त्यासाठी जरूर ती सजग व्यवस्था व विकसित साधने वर्षानुवर्षे पुरवावी लागतात"
...इतके अल्प ज्ञान जरी लोकांना झाले तरी खरा दोष कोणाला द्यायचे हे कळून येईल.
18 Aug 2016 - 12:20 pm | अंतरा आनंद
’खेळाडू मुद्दाम चुका करतात किंवा चटावरलं श्राद्ध उरकून टाकावं तसं खेळतात’, असं म्हणायचंय का तुम्हाला? अजिबात आवडलेला नाही लेख. मैदानी खेळ, मैदाने हे इतिहासजमा करत चाललेल्या या भारतात हे खेळाडू अतिशय मेहनतीने, असुविधांचा डोंगर पार करून ऑलिंपिकच्या पात्रता फेरीत पोहोचतात. आपण केवळ कळफलक बडवण्याची कामगिरी करणार आणि त्यांना नावं ठेवणार. गंमत म्हणून वाचण्याइतकाही लेख आवडलेला नाही. कश्याची गंमत करावी याचंही भान असावं. असा गंमतवजा लेख त्या खेळाडूंच्या जीवावर आपली पोळी भाजून घेणार्या क्रिडाअधिकार्यांवर टाका की.
पटाईतकाका, खेळाला काहिही महत्व न देणार्या आणि खेळाडू जिंकला की त्याला डोक्यावर घेऊन नाचणार्या, हरला की पायाखाली तुडवणार्या लोकांची खरे खुरे प्रतिनिधी शोभता.
तुमचे लेख बरेचदा आवडत नाहीत पण त्यातला भाबडेपणा जाणवल्याने (उगाच तिखट) प्रतिक्रिया देत नाही पण इथे रहावलं नाही.
लेख नाही पण सगळे प्रतिसाद आवडले.
18 Aug 2016 - 12:34 pm | एकनाथ जाधव
लेख नाही पण सर्व प्रतिसाद आवद्ले.
18 Aug 2016 - 12:45 pm | माम्लेदारचा पन्खा
मग करा लेको...चैन करा...आणा रोज पदकं !
18 Aug 2016 - 3:14 pm | तर्राट जोकर
18 Aug 2016 - 3:28 pm | रायनची आई
अत्यन्त आचरट व सुमार लेख.
18 Aug 2016 - 3:42 pm | तर्राट जोकर
हा लेख व त्यामागचे विचार काय किंवा शोभा डे चे ते अवदसा ट्विट काय, दोन्ही बघता ही काय विचारसरणी आहे हा प्रश्न पडतो. ऑलिम्पिकमधे जाणे म्हणजे 'गावच्या जत्रे'ला जाण्याइतके सोपे असते काय? ऑलिम्पिकमधे सिलेक्शन होतं, पात्रता फेरी सिद्ध करावी लागते. अनेक छोट्या मोठ्या स्पर्धा गाजवाव्या लागतात. त्यासाठी अथक प्रयत्न करावे लागतात. अनेक ठिकाणी गोल्ड मिळवावं लागतं. सातत्याने, रोज न थकता, कंटाळता तासंतास सराव करावा लागतो. अनेक लढाया लढून 'जिंकाव्या' लागतात. कित्येक खेळाडू दहा दहा वर्षे ह्याची तयारी करत असतात. तयारी म्हणजे कागदपत्रांची जुळवाजुळव नव्हे. तिथे पोचण्यापर्यंत अनेक स्पर्धा, अडथळे, उणीवा यांच्यावर 'यशस्वी' मात करुन जावं लागतं. भारतीयांची कुजकी अज्ञानी मानसिकता म्हणजे त्यांना जणू असं वाटत असतं की "ऑलिम्पिकमधे प्रत्येक देशाचा जणू कोटा ठरलेला असतो, त्यात अमूक इतके खेळाडू पाठवायचे असा काही नियम असतो त्यानुसार इकडले राजकारणी लोक आपल्या मर्जीतल्या लोकांना तिकडे पाठवतात." नै हो. ऑलिम्पिकचं टिकिट फ्री नसतं मिळत. लै घासायला लागते. तेही अशा देशात जिथं तुम्ही राष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू असा, कोण काळं कुत्रं तुम्हाला विचारत नाही. दहावीला किती पडले इतकं मात्र कुजकट्पणे विचारतात न चुकता. ऑलिम्पिकमधे हरलात की असे कुत्सित टोमणेही मारतात, तेही न चुकता.
आपली पोरं तिथं चौथे येत असतील तरीही हे त्यांचं स्वतःचं निर्विवाद यशच आहे. हा त्यांचा मोठेपणा की ते आपलं यश ह्या नाकर्त्या सव्वाशे कोटींबरोबर वाटून घेत आहेत. कोणत्याही आधाराशिवाय ऑलिम्पिक गाजवणार्या मुलामुलींचे कौतुक करणार्या किंवा हेटाळणी करणार्या तमाम भारतीयांना मी विचारु इच्छितो की आपल्या मुलांच्या दहावी-बारावी-आयआयटी-सिईटी क्लासेस वर लाखो रुपये खर्च करायला अजिबात विचार करत नाही पण मुलाने-मुलीने खेळायला चांगले शूज, चांगला ट्रॅकसूट, चांगला कोच, चांगली अॅकेडमी मागितली तर तितकाच खर्च करायची तयारी दाखवता की त्यावेळी सरकार, व्यवस्था, राजकारण ह्यावर बोटं मोडून पोराला अभ्यासाकडे लक्ष दे असं दरडावता. असं दरडावत असाल तर ना तुम्हाला ह्या ऑलिम्पिक खेळाडूंच्या यशाबद्दल अभिमान वाटून घेण्याचा अधिकार आहे ना त्यांची हेटाळणी करण्याचा.
धन्यवाद.
18 Aug 2016 - 3:56 pm | अभ्या..
हाण्ण्ण्ण्ण तिज्यायला.
एकदम परफेक्ट.
वेल्कम आणि असल्या पथ्थरफोड प्रतिसादाबद्दल म्हणाल तिथं पार्टी.
18 Aug 2016 - 5:32 pm | उडन खटोला
आम्ही सुद्धा सहभागी होऊ.
18 Aug 2016 - 11:24 pm | सचु कुळकर्णी
तजो एकदम सडेतोड मांडलस... अतितिव्र सहमत.
तेही अशा देशात जिथं तुम्ही राष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू असा, कोण काळं कुत्रं तुम्हाला विचारत नाही. दहावीला किती पडले इतकं मात्र कुजकट्पणे विचारतात न चुकता. ऑलिम्पिकमधे हरलात की असे कुत्सित टोमणेही मारतात, तेही न चुकता.
ह्याला तर ______/\_____
18 Aug 2016 - 4:25 pm | बाप्पू
तर्राट जोकर साहेब
- तसे तर मी आपल्या कोणत्याही प्रतिसादावर विचार करण्याचे कष्ट घेत नाही.. पण आज पहिल्यांदा आपला प्रतिसादाशी 101 % सहमत..
शोभा डे आणि अश्याच सो कोलॅड विचारजंतांना दणकून उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद.
18 Aug 2016 - 4:57 pm | अप्पा जोगळेकर
पटाईत काका,
सरकारी बाबूपणा सिद्ध केलात. वाईट वाटले.
तुमच्यासारखे पदाधिकारी आहेत, तोपर्यंत लढाई दूरची आहे.
18 Aug 2016 - 5:00 pm | असंका
हा लेख वाचून हबकून गेलो होतो... प्रतिसाद वाचून बरं वाटलं.
हीच वेळ आहे जेव्हा आपल्या हिरोंना एक समाज म्हणून आपल्या आधाराची गरज असू शकते. त्याच वेळी जर अशी पाठ फिरवली आपण, तर चार वर्षांनी परत एकदा हाच लेख लिहायची वेळ येइल.
18 Aug 2016 - 5:05 pm | Sanjay Uwach
Try try but never cry
18 Aug 2016 - 5:21 pm | तर्राट जोकर
http://qz.com/760053/indias-olympians-deserve-a-medal-just-for-putting-u...
वरिल बातम्यांतल्या मानसिकतेवर, चीड आणणार्या ह्या प्रकारांबद्दलही कुणीतरी लिहावं.
18 Aug 2016 - 6:42 pm | सुबोध खरे
वरिल बातम्यांतल्या मानसिकतेवर, चीड आणणार्या ह्या प्रकारांबद्दलही कुणीतरी लिहावं.
मेरी कोमवरील सिनेमा पहा म्हणजे हे सर्व कसे होते ते समजून येईल. कुणी तरी लिहून काही फरक पडणार नाही.
१९५६ साली आय ए एस अकॅडेमी मध्ये भाषण देताना तेथील आय ए एस करणाऱ्या अधिकाऱ्यांना अर्थमंत्री श्री चिंतामणराव देशमुख म्हणाले होते.
"तुम्ही जगातील एका सर्वात सुरक्षित अशा नोकरीत पदार्पण करीत आहात. तुम्ही जर दिवसा ढवळ्या खून केलात तरीही त्याबद्दल तुम्हाला शिक्षा होणार नाही. फारतर तुमची बदली होईल. ती सुद्धा बऱ्याच वेळेस बढतीच्या पदावर."
"अशा सुरक्षित नोकरीत असताना आपण सामान्य जनतेसाठी काय करू शकतो याचा विचार करून तुम्ही काम केले पाहिजे."
दुर्दैवाने हा दुसरा भाग सनदी नोकरांना ऐकूच आला नाही असे वाटते.
18 Aug 2016 - 7:24 pm | बोका-ए-आझम
हा लेख वाचून तुम्हाला पटाईतकाका असं म्हणण्याची इच्छा झाली नाही. टिपिकल बाबू प्रतिक्रिया आहे ही. :(
18 Aug 2016 - 10:00 pm | Sanjay Uwach
मला वाटते श्री .विवेक पटाईत यांनी लिहलेले विचार हे संघाला सुवर्ण पदक न मिळाल्या मुळे, आलेल्या निराशे पोटी व्यक्त केलेले असावेत . त्यांचा खेळाडूंच्या वर राग असेल असे कांही वाटत नाही . भारताची एखादी वनडे मॅच पाहण्या साठी आपण बऱ्याच वेळेस आपली महत्वाची कामे सोडून घरी थांबतो .मॅच एकदम बहरात अली असते .आपली पहिलीच जोडी छक्के ,चौक्के मारून मॅच जिंकण्याची आशा मनात पल्लवीत करीत असते. याच उत्साहात आपण दोन मिनिटा साठी लघुशंकेला जातो काय आणि परत येऊन पाहतो, तर काय दोन तीन खेळाडू बाद झालेले असतात . अशा वेळी नकळत " हे लोक काय करतात " ते अगदी त्यांच्या जाहिरातीच्या कमाई पर्यंत आपण पोहचतो . हे क्षणिक निराशे पोटी असते . यामुळे भारतीय खेळाडूंच्या वर असणारे प्रेम कधीच कमी होत नाही .दुसरी गोष्ट यशस्वी माणसाची कधीच तक्रार नसते . जर्मन मध्ये झालेल्या ऑलिम्पिक मॅच मध्ये, जानी कधी मॅट ,बूट या सारख्या गोष्टी अनुभवल्या देखील नाही अशा श्री .माणगावे यांनी रेसलिंग मध्ये कास्य पदकाची कमाई केली होती . श्री . पटाईत यांना एक भारतीय म्हणून सर्व खेळाडूंचा निश्चितच सार्थ अभिमान वाटत असावा. त्यांची हि मानसिकताच आहे असे गृहीत धरून त्यावर लेख लिहणे हे पण योग्य ठरणार नाही .(त्यांनी या पूर्वी लिहलेले अनेक चांगले लेख आपण वाचले आहेत) . त्यांनी आपल्या लेखा बद्दल नंतर दुरुस्ती करून प्रतिक्रिया हि देखील दिली आहे . भारतीय संघ या ऑलिम्पिक पासून बरेच कांही शिकेल व पुढील सामन्यात अनेक पदक मिळवेल यात शंका नाही .
18 Aug 2016 - 10:09 pm | साधा मुलगा
आपल्याला श्री. खाशाबा जाधव म्हणायचे आहेत का? त्यांनी हेलसिंकी येथे कांस्य पदकाची कमाई केली होती.
18 Aug 2016 - 10:37 pm | लालगरूड
Euuuuu पी व्ही सिंधूने अजून एक पदक निश्चित केले......
18 Aug 2016 - 10:43 pm | गणेश उमाजी पाजवे
या लेखावर चर्चा झडत असताना...आपण दोन पदके मिळवली सुद्धा :)नारीशक्तीचा विजय असो :)मला वाटत आता तरी तुमचे मत बदलेल खेळाडूंबद्दल.साक्षी आणि सिंधू तुमचे हार्दिक अभिनंदन. वाघिणीसारख्या भिडलात समोरच्याला :)
18 Aug 2016 - 10:50 pm | अभ्या..
अं, अं,...समोरचीला ;)
18 Aug 2016 - 10:53 pm | लालगरूड
जिस देश में 125 करोड़ लोग मिल कर एक बेटी की इज्जत नही
बचा पाते।
उसकी दो बेटी ने 125 करोड़ देशवासियो की इज्जत बचा
ली।
Congratulation sakshi malik and PV sindhu. You
make india proud.....
18 Aug 2016 - 11:12 pm | समाधान राऊत
फक्त लेख उडवुन प्रतिसाद शिल्लक ठेवता येतील का हो
18 Aug 2016 - 11:30 pm | बहुगुणी
[असं काही धाग्यांच्या बाबतीत होतं खरं! अति-निराशेच्या (किंवा अति-उत्साहाच्या) भरात एरवी चांगलं लिखाण करणार्या आय डीं कडून भान सुटून कै च्या कैच लेख पाडले जातात, पण त्यांवरील काही प्रतिसाद मात्र वाचनीय असतात....]
20 Aug 2016 - 2:00 am | अभिजीत अवलिया
लेख अजिबात आवडलेला नाही.
भारतासारख्या देशात जिथे खेळाला नेहमी दुय्यम स्थान मिळते, खेळासाठी लागणारी संसाधने जवळपास नाहीत (क्रिकेट सोडून) अशा परिस्थितीत ऑलिम्पिक पर्यंत पोचणे ही देखील फार मोठी कामगिरी आहे.
20 Aug 2016 - 8:33 am | विवेकपटाईत
सर्व प्रतिसाद वाचले. थोडासा विनोद हि सहन होती नाही एवढी असहिष्णुता अंतर्जालावर हि आहे. स्वत: वर हसणेही आपल्याला जमत नाही.घर द्वार विसरून अधिकांश वेळ कार्यालयात काम करताना, विरंगुळा म्हणून विनोद हाच एकमेव उपाय असतो. (तूर्त सध्या मी तिथे कार्यरत नाही).
बाकी भारतीय संघातल्या सर्व खेळाडू सरकारी नौकरीत आहे. दुसर्या देश्यांमध्ये त्यांना नौकरी मिळते का? माझाच अनुभव आहे, माझा लहान भाऊ दिल्लीच्या टीम (खेळाचे नाव सांगत नाही, दुसर्याच्या व्यक्तिगत जीवनात दखल देण्यासारखे होईल) राहून चुकला आहे. पण एका सरकारी खात्यात नौकरी लागल्यावर त्याच्या खेळात पुढे अधिक प्रगती झाली नाही. राष्ट्रीयस्तरावर नाव झाले नाही. प्रतिभेला योग्य न्याय दिला नाही, हे मला नेहमीच वाटले आहे. त्या खात्याची खेळ प्रबंधनाची व्यवस्था हि त्याचे एक प्रमुख कारण होते. पण भविष्य सुरक्षित असल्यामुळे जिद्द हि कमी होते. हे हि सत्य आहे. खेळातील राजनीती, इत्यादींवर पुढे कधीतरी विस्तारपूर्वक लिहेल.
20 Aug 2016 - 8:44 am | यशोधरा
विनोद अस्थानी झाला पटाईतकाका.
20 Aug 2016 - 12:08 pm | तर्राट जोकर
थोडासा विनोद हि सहन होती नाही एवढी असहिष्णुता अंतर्जालावर हि आहे.
>> चुकीच्या वेळी, चुकीच्या ठिकाणी, चुकीच्या संदर्भातला विनोद कोणासही सहन होत नाही.
स्वत: वर हसणेही आपल्याला जमत नाही.
>> स्वतःवर हसतच आलोय आपण भारतीय. पण त्या हसण्याचा कंटाळा येऊन काहीतरी करुन दाखवणार्यांवर हसणे योग्य नव्हे. (मुळात भारतीय स्वतःवर नाही तर दुसर्यावर हसतात. जेव्हा भारतीय एखाद्या तद्दन भारतीय बाबीवर हसत असतो तेव्हा तो स्वता:ला सोयिस्कर वगळून घेतो.)
घर द्वार विसरून अधिकांश वेळ कार्यालयात काम करताना, विरंगुळा म्हणून विनोद हाच एकमेव उपाय असतो. (तूर्त सध्या मी तिथे कार्यरत नाही).
>> हा संदर्भ इथे कशापायी?? बाकीचे सगळे काय पोरासोरांसोबत, मजेत वेळ घालवत काम करत असतात काय? नेहमी नेहमी काय त्या घरदार सोडून कार्यालयात काम चा टेंभा मिरवायचा? जगात काय फक्त तुम्हीच काम करता आणि बाकीचे तंगड्या पसरुन फुकट खातात असे वाटते का तुम्हाला?? कार्यालयात काम करायला जाता की असले फाल्तू विनोद करुन टाईमपास करायला जाता?
बाकी भारतीय संघातल्या सर्व खेळाडू सरकारी नौकरीत आहे. दुसर्या देश्यांमध्ये त्यांना नौकरी मिळते का?
>> नोकरी देऊन उपकार नाही करत सरकार... प्लीज. अशी भाषा आणि हे विचार मांडून तुम्ही स्वतःची प्रतिमा अधिकाधिक खालवत चालला आहात. दुसर्या देशांमधे काय मिळते आणि नाही मिळत ह्याची जंत्री मांडली तर तोंड लपवून बसावे लागेल...
माझाच अनुभव आहे, माझा लहान भाऊ दिल्लीच्या टीम (खेळाचे नाव सांगत नाही, दुसर्याच्या व्यक्तिगत जीवनात दखल देण्यासारखे होईल) राहून चुकला आहे. पण एका सरकारी खात्यात नौकरी लागल्यावर त्याच्या खेळात पुढे अधिक प्रगती झाली नाही. राष्ट्रीयस्तरावर नाव झाले नाही.
>> तुमचा भाऊ सरकारी नोकरीकडे डोळा ठेवून खेळत असेल तर तो खेळाडू नव्हे व्यापारी आहे. असल्यांचे नाव राष्ट्रीय स्तरावर व्हावे अशी अपेक्षा तरी कशी करताय?
पण भविष्य सुरक्षित असल्यामुळे जिद्द हि कमी होते. हे हि सत्य आहे.
>> काही ही हां साहेब, खेळाडू भविष्य सुरक्षित होण्यासाठी खेळतात ही तुमची मानसिकता पुरेशी द्योतक आहे तुम्ही खेळ आणि खेळाडूंबद्दल किती समज आणि अनुभव ठेवून आहात हे सांगण्यासाठी. ज्यांचे भविष्य सुरक्षित आहे त्यांची कामगीरी आपण बघितलेली दिसत नाही बहुधा किंवा ज्यांचे भविष्य सुरक्षित नाही त्यांनीच (अमेरिका, चीन) पदके मिळवण्यात पुढाकार घेतलेला आहे असे म्हणावे लागेल. आपल्या पिंकांना 'सत्य' मानणे अतिदुर्लभ आहे बुवा!
खेळातील राजनीती, इत्यादींवर पुढे कधीतरी विस्तारपूर्वक लिहेल.
>> बाबू लोकांच्या मानसिकतेवर कधी लिहतांना बघितले नाही तुम्हास. तिथे बाबू लोकांवर काही विनोद घडत नाही का तुमच्या कार्यालयात? त्यावर लिहाना... घसरलेले पॉइन्ट्स थोडेसे वर येतील.
20 Aug 2016 - 12:15 pm | मार्मिक गोडसे
चाबूक प्रतिसाद
20 Aug 2016 - 12:42 pm | अभ्या..
पटाइतांचे "लेख टाका पण खुलासे आवरा" म्हणायची वेळ आलीय.
20 Aug 2016 - 12:46 pm | उडन खटोला
तर्राट जोकर यांनी त्वरित व्यासपीठामागे येऊन भेटून आपले पाकीट ताब्यात घ्यावे.
संध्याकाळी श्रमापरिहाराला उपस्थिती लावण्याबाबत अभ्या कडून पत्ता घ्यावा.
22 Aug 2016 - 8:25 am | नाखु
भेंडी आपण फ्यान आपले..
अगदी "रुस्तुम्/ओ माय गॉड" मधला कोर्ट सीन याद येईल असा जवाब दिलात .
अभ्या पत्ते देतो ही एक नवीनच बातमी आहे मला !
20 Aug 2016 - 12:47 pm | बोका-ए-आझम
त्याचा आता काय उपयोग? जो बूंद से जाती है, वो हौद से नही आती! तुमच्या खुलाशांचंही दुर्दैवाने असंच झालेलं आहे.
22 Aug 2016 - 2:19 pm | अप्पा जोगळेकर
भविष्य सुरक्षित असल्यामुळे जिद्द हि कमी होते. हे हि सत्य आहे.
काका, तुम्हाला पेन्शन आहे ना ? मग तुमच्या काम करण्यात जिद्द आहे की कमी झाली ?
20 Aug 2016 - 2:26 pm | विनायक प्रभू
आमच्या काकांना उगाच बोलायचे काम नाही. ते त्याच्या राजधानी स्थित गेटेड कम्युनिटी ऑलंपिक मधे चमचा लिंबू,संगित खुर्ची, गाढवाला शेपटी लावणे (शिणियर शिटीझन) इत्यादी पारंपारिक अॅथेलेटीक्स च्या स्पर्धांमधे कायम गोल्ड मेडल आणतात.
20 Aug 2016 - 6:24 pm | अभिजीत अवलिया
पटाईत साहेब,
तुम्ही जे लिहिले आहे त्याला विनोद म्हणत नाहीत. अपमान करणे म्हणतात.