‘मिसळपाव’चं रहस्य: भाग १: खबर

आतिवास's picture
आतिवास in जनातलं, मनातलं
15 Aug 2016 - 9:44 am

प्रेरणा: संदीप डांगे यांचा ‘प्रस्ताव: मिसळपाव बॅज’ हा धागा आणि कैक ‘कट्टा’ धागे
*****
“साहेब, भावड्या आलाय. बसवलंय मी त्याला. कधी आणू तुमच्याकडं ते सांगा.”
“पाटील, विचारपूस केलीत का तुम्ही?”
“होय साहेब, काहीतरी गडबड आहे असा मला सौशय होताच गेले काही महिने. तुम्ही पर्वानगी दिलीत तर लागतोच मागं. भावड्या सांगतोय ते माझा सौशय वाढवणारं आहे साहेब.”
“हं, बोलवा त्याला.”
*****
“रामराम, सायेब.”
“रामराम. बस भाऊ. काय नवीन?”
“काय न्हाई सायेब, परवा आपल्या त्या ह्या मॉलला गेल्तो.”
“मॉलला? पाटील, भाऊला मागच्या महिन्याच्या कामाचे पैसे दिलेत ना?”
“होय साहेब, तो हप्ता नाही चुकत.”
“भावड्या, भो**च्या, मॉलमध्ये जाऊन काही गडबड केलीस तर याद राख. **त लाथा घालेन तुझ्या..”
“नाय नाय सायेब. तसलं काय नाय बा. पाटीलसायेब पैशाला चुकत नाहीत. पाकिटमारीची लाईन कवाच सोडली की मी. शिक्युरिटी बी जबरी असतीया मॉलमंदी. पोरगी मोबाईलसाठी मागं लागलीया, म्हनूनशान गेल्तो बगाया. पर तिकडं लई म्हाग हैतं मोबाईल.”
“साहेब, पोरगी लई हुषारय भावड्याची. ९० टक्के घेतलेत तिनं धाव्वीला.”
“पाटील, भाऊला या महिन्यात दुप्पट पैसे द्या. मी बघतो काय करायचं ते. भाऊ, लेकीला शिकू दे चांगलं. आणि पैसे पोरीच्या मोबाईलसाठी देतोय हे लक्षात ठेव. बरं मग, काय कानावर आलं मॉलमध्ये? काय दिसलं?”
“सायेब, तितं दोन-तीन लोकं घुटमळत व्हते. चांगल्या कपड्यातले, जंटलमन वाटणारे लोकं व्हते सायेब. म्हागाचे मोबाईल व्हते त्यांच्या हातामंदी. कायतरी पहात होते. येणा-याजाणा-याला कायतरी इचारत व्हते. येकानं तर माज्या सुमीला बी इचारलं कायतरी. मी त्याच्याकडं रागानं पायल्यावर ‘सावरी’ म्हणत गेला निघून. मी बोलायच्या आत पळतच सुटला गडी.”
“कितीजण?”
“सायेब, म्या सुमीला पाटवून दिलो घरी आन मोबाईल हातात घिऊन येका गेटाशी आत हुबारलो. सायेब, पोरीबरोबर जायचं मॉलात म्हनूनशान मी बी जरा झ्याकप्याक गेल्तो. तर चार लोकांनी मला ‘मिसळपाव?’ म्हणून इचारलं. दुस-या गेटाशी गेलो तर तितंबी तसचं. कायबाय चांगल्या कपड्यातल्या बायाबी होत्या त्यांच्यांसंग. दोन लेकरंबी दिसली त्यांच्यासंगं सायेब.”
“अरे बाबा, आले असतील मिसळपाव खायला. कुठल्यातरी कंपनीचीं प्रमोशन स्कीम असेल. पोराबाळांना घेऊन आले होते, म्हणजे घरगुती टाईपचे लोक असतील. अहो पाटील, हेच तपासलंत का तुम्ही?”
“नाय वो सायेब, मिसळपाव खायाला लोकं काय मॉलमंदी येतेत व्हय? बाया कशाला वळख नसलेल्या लोकांसंगं मिसळपाव खायला येतील? त्याबी जंटलमन बाया! कायतरी गडबड वाटली म्हणून मी मागंमागं गेलो त्यांच्या. धा, नाय बारा, नाय नाय सोळा लोकं व्हती. त्यात तीन बाया. नावंबी झंगाड व्हती सायेब. आता दुर्री, चमचा, विटीदांडू, डब्बा ऐसपैस.. असली काय मोट्या मानसांची नावं असतेत होय? कट्टा, आयडी, ड्वायडी असलं कायतरी बोलत व्हते समदे. सायेब, त्यांचा कायतरी गडबड करायचा बेत दिसतोय. कुणालातरी टेम्पोत बशिवणार हायेत ते. कोणच्यातरी खानाबद्दल आन सरांबद्दलबी बोलले. कोडवर्ड, पासवर्ड, ब्याच असलं बी कायतरी बोलत व्हते. ग्यांगमदली मेंबरं वळखता यावीत म्हणून कायतरी पलान चाललेला बगा त्यांचा. परदेशातून बी दोन-चार लोकांचे फोन आले सायेब त्यांना. आता कोंच्या देशातून ते कसं सांगणार? मराठीतच बोलत व्हते समदे. पुढची चर्चा इंटरनेवर करू म्हन्ले बगा सायेब ते. गणपतीच्या येळी कायतरी करायचं बोल्ले सायेब ते. दिपवाळीचा बी इषय झाला. समदं नाय ऐकू आलं मला. ती दोन लेकरंबी उगं बाकी लोकांना सौशय नको म्हनूनशान आन्ली असतील सोबत. मी पडलो आडानी. पर मला काई ते समदं बरं वाटलं न्हाय बगा. पाटील सायेब काय ते बराबर करतील म्हनून सांगाया आल्तो सायेब. तर ते मला तुमच्याकडं घिऊन आले.”
“हं. कोणता मॉल? कधी? किती लोक होते? सोळा लोक म्हणालास, नाही का? मोबाईलवर फोटो घेतलास का एखादा? शाबास! बघू.”
“पाटील, ब्लूटूथवरून फोटो घ्या. सगळे नाहीत त्या फोटोत, पण एक-दोन पुरेसे आहेत माग घ्यायला.”
“घेतलेत साहेब मी फोटो.”
“ये भाऊ आता. सांगत राहा असंच काही दिसलं तर. पाटील, चहा पाजा भाऊला. नाईकला बोलवा आणि तुम्हीही या लगेच.”
*****
“नाईक, गणपती जवळ आलेत. सगळीकडं लक्ष आहे ना आपलं? काही कुठून खबर तर नाही? हं! आज भावड्या सांगत आलाय. सायबरवाला कोण आहे आपल्याकडं? तो नवा पोरगा? त्याला जरा भावड्याने सांगितलेले त्या लोकांचे सगळे शब्द सांगा. काय ते आयडी, कट्टा, बॅज, डब्बा ऐसपैस वगैरे. मला दहा मिनिटांत सांग म्हणावं काय सापडतंय ते. पाटील त्याला फोटोही द्या. नको, असं करा, नाईक फोटो तुम्हीच बघा. ते बघून मला सांगा पंधरा मिनिटांत. फेसबुकवर बघा. आणि ते इन्स्टाग्राम वगैरे आहे का आपल्याकडं? अपडेट करत जा हो नाईक टेक्नॉलॉजी. त्या नव्या पोराकडून करून घ्या सगळं झटपट. आणि जरा इकडच्या तिकडच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर जॉइन व्हायला पाहिजे तुम्हा लोकांनी, कळतात ब-याच गोष्टी त्यातनं. पाटील, जरा सगळ्या मॉलवर लक्ष ठेवा. तुम्ही जातीनं लक्ष घाला. सोबत देतो मी आणखी चार लोक. जास्त गरज भासली तर सांगा. नाही, काळजी घेतलेली बरी. भावड्या बाकी कसाही असला तरी त्याची खबर पक्की असते असा आजवरचा अनुभव आहे.”
सांगितलेली कामं करायला पाटील आणि नाईक गेले.
*****
साहेबांनी नोटपॅड समोर ओढलं. मोठ्या अक्षरांत ‘मिसळपाव’ हा शब्द लिहिला. त्याच्यासमोर प्रश्नचिन्हं काढलं. शब्दाभोवती वर्तुळ काढलं.
साहेब विचारात पडले. साहेबांना काहीतरी आठवतं होतं .. पण काय ते स्पष्ट नव्हतं .....
*****
(NOT to be continued) ;-)

विनोदविरंगुळा

प्रतिक्रिया

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

15 Aug 2016 - 9:52 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

मी पहिला.

बाकी एवढी मिपाकर मंडळी एकत्र येणं तसाही संशयास्पद विषय आहे. मुवि ग्यांगच्या लोकांना आत टाकायला हवं. गुप्तं कट्टे करतात.

अजया's picture

15 Aug 2016 - 10:12 am | अजया

:)

यशोधरा's picture

15 Aug 2016 - 10:16 am | यशोधरा

भारी =))

कपिलमुनी's picture

15 Aug 2016 - 10:22 am | कपिलमुनी

लेख आवडला !!

पैसा's picture

15 Aug 2016 - 10:33 am | पैसा

=)) साहेब पण ओळखीचे निघायचे एखादेवेळी!

आदूबाळ's picture

15 Aug 2016 - 10:34 am | आदूबाळ

लौल!

जव्हेरगंज's picture

15 Aug 2016 - 10:41 am | जव्हेरगंज

त्यांचा कायतरी गडबड करायचा बेत दिसतोय. कुणालातरी टेम्पोत बशिवणार हायेत ते.

=))))

बेक्कार फुटलो !!!

सस्नेह's picture

15 Aug 2016 - 12:37 pm | सस्नेह

=)) =))

तिमा's picture

15 Aug 2016 - 12:43 pm | तिमा

मुवि गँगचं काही खरं नाही आता. लेखन आवडलं.

संजय पाटिल's picture

15 Aug 2016 - 2:17 pm | संजय पाटिल

कट्टा... आय इ डी बापरे !!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Aug 2016 - 3:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

=))

त्या ड्वायडींना खोपच्यात घ्येतलं सायबांनी तर मिपावर्चा अतिरेक लईच कमी होईल ;)
अतिवासतै, धाडा सांगावा सायबान्ला.

वाल्मिक's picture

15 Aug 2016 - 4:38 pm | वाल्मिक

कोण कोण ?

palambar's picture

15 Aug 2016 - 5:17 pm | palambar

:) जमलाय लेख, भारीच .

नूतन सावंत's picture

15 Aug 2016 - 6:19 pm | नूतन सावंत

:)

बाब्बौ! ह्येच्यापायी आपून कट्ट्या-फिट्ट्याला येत नाय का जात नाय. सायेबान्ला रामराम सांगा!

टवाळ कार्टा's picture

15 Aug 2016 - 6:57 pm | टवाळ कार्टा

=))

माम्लेदारचा पन्खा's picture

15 Aug 2016 - 10:50 pm | माम्लेदारचा पन्खा

ग्यांग कुठली आलीय... साधा भोळा शेतकरी माणूस तो !

आदूबाळ's picture

19 Aug 2016 - 12:13 am | आदूबाळ

साधा भोळा शेतकरी माणूस

अच्छा मुवि होय! मला वाटलं...

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Aug 2016 - 6:00 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

पत्ता द्या. कळीच्या शेतकऱ्याची 32 लक्षणे नावाचं पुस्तक पाठवून देतो.

माम्लेदारचा पन्खा's picture

19 Aug 2016 - 10:47 pm | माम्लेदारचा पन्खा

आणि फक्त ३२ लक्षणे ? कमी नाही का वाटत ?

रातराणी's picture

15 Aug 2016 - 10:54 pm | रातराणी

हा हा भारीये!

खटपट्या's picture

16 Aug 2016 - 1:21 am | खटपट्या

लोळ

अनन्त अवधुत's picture

16 Aug 2016 - 1:41 am | अनन्त अवधुत

मस्त लिहिलंय :)

एक एकटा एकटाच's picture

16 Aug 2016 - 6:46 am | एक एकटा एकटाच

:-)

भाग्यश्री कुलकर्णी's picture

16 Aug 2016 - 7:01 am | भाग्यश्री कुलकर्णी

मस्तच

प्रीत-मोहर's picture

16 Aug 2016 - 7:34 am | प्रीत-मोहर

भारी!!

अरुण मनोहर's picture

16 Aug 2016 - 7:47 am | अरुण मनोहर

मिसळपाव ट्रायाड गॅंग !

इशा१२३'s picture

16 Aug 2016 - 8:02 am | इशा१२३

भारी :)

इशा१२३'s picture

16 Aug 2016 - 8:02 am | इशा१२३

भारी :)

खेडूत's picture

16 Aug 2016 - 8:18 am | खेडूत

हे हे...मस्त!
:)

vcdatrange's picture

16 Aug 2016 - 8:42 am | vcdatrange

नाशकात आहे का हो कट्टा?

संत घोडेकर's picture

16 Aug 2016 - 9:53 am | संत घोडेकर

मिपावर गँगवार?
बापरे! टोळीयुद्धात अडकलो बहुतेक.

पैसा's picture

16 Aug 2016 - 10:02 am | पैसा

मिपावर गँगवॉर कुठले! बादलीयुद्धे होतात फक्त. त्यात कोणीतरी बादलीत डुबकी मारतो. कोणीतरी दुसर्‍याच्या बोडक्यावर बादली उपडी करतो. झालं युद्ध. =)) =))

नीलमोहर's picture

16 Aug 2016 - 10:23 am | नीलमोहर

=))

स्मिता_१३'s picture

16 Aug 2016 - 10:52 am | स्मिता_१३

ही ही ही ;)

प्रसाद_१९८२'s picture

16 Aug 2016 - 10:56 am | प्रसाद_१९८२

भारी!!

आतिवास's picture

18 Aug 2016 - 9:31 am | आतिवास

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार.

नाखु's picture

18 Aug 2016 - 9:37 am | नाखु

आयडी शोधा रे !

जेपी सन्यासाला आणि टक्या आंग्लदेशात गेलाय आता हे काम कुणाला द्यावे एक तर पम्या नाहीतर आपले सर्वांचे लाडके जागतीक माहीती पुरवणी केंद्र संचालक लाटकर साहेबांना सांगावे काय?

अखिल मिपा वैचारीक वाचक चळवळ आणि डु आयडी चा खरा आय डी ओळखा संघटनेची संयुक्त मागणी

संदीप डांगे's picture

18 Aug 2016 - 9:38 am | संदीप डांगे

जबरदस्त लिहिलंय! पुढचा भाग लौकर टाका!

पिशी अबोली's picture

18 Aug 2016 - 9:52 am | पिशी अबोली

=))
लोल.. भारी

सविता००१'s picture

18 Aug 2016 - 10:32 am | सविता००१

भन्नाट

उडन खटोला's picture

18 Aug 2016 - 10:54 am | उडन खटोला

असं कनेक्शन आहे तर...

प्रभाकर पेठकर's picture

19 Aug 2016 - 3:51 am | प्रभाकर पेठकर

बरं झालं गेला भला मोठा काळ मी मिपापासून लांब आहे. नाहीतर गँगचे कनेक्षन आखाती देशांपर्यंत पोहोचले असते.

नमकिन's picture

19 Aug 2016 - 6:08 am | नमकिन

म्हणावं! तरी म्या म्हणलंच व्हतं उगं लय बोभाटा करत जाऊ नगा!
चांगलं मऊसोत पाव तोडायचं सोडून आता आली का पाळी खडी फोडायची.
घेणं ना देणं अन् कंदील लौन येणं असं का करतंय त्यानं येड्या भोकाचं भावड्या?

संतोषएकांडे's picture

19 Aug 2016 - 8:18 am | संतोषएकांडे

भारी....च

Vishvnath Shelar's picture

19 Aug 2016 - 12:35 pm | Vishvnath Shelar

Lai...Bhaari..