व्यावसायिकतेला धरुन उत्तमोत्तम प्रयोग करणारे, काहिना काही वेगळं देण्याच्या प्रयत्नात असणारे दिग्दर्शक भारतात कमी आहेत पण आहेत. नावच घ्यायची झाली तर शूजित सरकार आहे, प्रवल रमण,निरज पांडे आहे ई...... त्यात एक नाव अजुन येतं....निशिकांत कामत. डोंबिवली फास्टपासुन त्याचा सुरु झालेला प्रवास ४०४ असेल, लय भरी असेल असे वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट करत पुढे जातोय. याच प्रवासातला त्याचा नविन चित्रपट म्हणजे मदारी...
मदारी...देश सो रहा है....
नावावरुन एक गोष्ट लक्षात येते चित्रपट बहुदा राजकिय वा शासकिय व्यवस्थेवर भाष्य करणारा असवा..मुळात तसच आहे. एका बापाची कथा ज्याचा मुलगा एका पुल कोळसल्याच्या दुर्घटनेत बळी गेलाय. त्याला त्या गोष्टीचा सुड नाही घ्यायचा आहे तर फक्त उत्तर हवय...हे का घडलं, कोणामुळे घडल आणि कसं घडल...बस या तीन प्रश्नांचं. याच्या उत्तरांसाठी त्याचा संघर्ष सुरु होतो..तो एक असा मार्ग निवडतो कि त्यामुळे अख्या देशाला आणि राजसत्तेलासुद्धा त्याच्या प्रश्न ऐकुन घ्यावी लागतात... संपूर्ण राजसत्ता हा बाप अशी फिरवतो जसा मदारी आपल्या माकडाला आपल्या इशर्यावर नाचवतो.. जसाजसा चित्रपट पुढे सरकत जातो तसं मदरी हेच नाव का योग्य पटु लागतं..ही सगळी कहाणी बस एका तत्वज्ञानावर फिरते ते म्हणजे,
"बाझ चुझे पे झपटा, उठा ले गया..कहानी सच्ची लगती है लेकिन अच्छी नही लगती....बाझ पर पलटवार हुआ, कहानी सच्ची नही लगती पर खुदा कसम बहुत अच्छी लगती है...."
जसा चित्रपट शेवटाकडे सरकतो हे ही तत्वज्ञान समोर येतं. शैलजा केजरीवलची कथा मुळात उत्तम, त्याची कल्पना वास्तवाला धरुन आहे. कथा समोर पाहताना तो आपल्यातलाच एक आहे यापेक्षा आपल्या मनात जे आहे तेच तो करतोय हे अधिक प्रभाव टाकणार आहे, यात कथा आणि कथाकाराच यश आहे. पटकथा आणि संवाद रितेश शाह यांनी
लिहिले आहेत. संवाद अतिशय उत्तम. कथेत जिव ओतण्याच काम संवाद करतात. पटकथेच्या बाबतीत प्रवाहीपणा जरा संथ होतो. जरासा वेग अधिक असला असता तर अजुन मजा आली असती. शहा यांची एक शैली आहे जी कहानी असेल वा ऐअरलिफ्ट जाणवते ती यातही आहे. विशाल भारद्वाजच संगीत आणि समीर फातपेकरच पार्श्वसंगीत आपापली जबाबदारी व्यवस्थित सांभाळतं.
अभिनय हा या चित्रपटाचा सर्वात महत्वाचा भाग.. निर्मलकुमार आणि रोहन गोस्वामी या दोघांभोवती हा चित्रपट आहे. बापाची अस्वस्थता, व्याकुळता दुसर्या क्षणी संघर्षाची असलेली जाणिव निर्मलकुमार साकारताना इरफान अतिशय उत्तम दाखवतो. त्याचं पात्र, त्याची एक विशिष्ट असलेली किनार इरफानच्या डोळ्यात दिसते. मुळात तो एक उत्तम अभिनेता आहे पण या चित्रपटातुन ते पुन्हा सिद्ध होतं. छोटा रोहन साकारताना विशेष बन्सल आपल्या वयानुसार ठिक काम करतो.. एकिकडे ग्रुहमंत्री म्हणुन तर दुसरीकडे बाप म्हणुन होणारी चलबिचल तुषार दळवीच्या अभिनयात दिसते.
उदय टिकेकर नेहमीसारखेच तोचतोच वेगळेपणा दाखवतात. रोहनची आई आणि ग्रुहमंत्र्याची बायको म्हणुन होत असलेली फरफट आयेशा रझाच्या अभिनयात आहे. तिचा अभिनय नैसर्गिक आहे. छोटासं का होईना पण तिचं असणं दखल घ्यायला भाग पाडतं. अखेर राहतो तो जोईन कमिशनर नचिकेत अर्थात जिमी शेरगिल...त्याच्या अभिनयात बारच फरक पडलाय असं म्हणायला अजिबात हरकत नाही. अभिनय म्हणजे काय या पातळीपर्यंत तो आता पोचतोय हेही नसे थोडके..
निशिकांत कामत एक दिग्दर्शक म्हणून नेहमीच काहीतरी वेगळं देण्याच्या प्रयत्नात राहीलाय.. अगदी डोंबिवली फास्ट पासुन ते अगदी रोकी हँडसमपर्यंत.. हा ही चित्रपट त्याच्याच या विशिष्ट पठडीतला पण वेगळा. विषय अतिशय उत्तम असुनही कदाचित वेग मंदावल्यामुळे रटाळवाणं होतो. दोन शेवट दाखवण्याच त्याच्या प्रयोगाची दाद द्यावी हे उत्तम. जे काहीतरी रोकी हँडसममधेही बाकी होतं तेच निशिकांतच्या याही चित्रपटात जाणवतं.
तरिही, इरफानचा अभिनय आणि रितेश शहा यांचे संवाद यासाठी तरी पहावाच असा चित्रपट.
प्रतिक्रिया
12 Aug 2016 - 4:38 pm | एस
चांगला दिसतोय चित्रपट. पाहिला पाहिजे असे परीक्षण वाचून वाटतेय.
साहित्य संपादक, कृपया शीर्षकात दुरुस्ती करता येईल का?
12 Aug 2016 - 4:48 pm | यशोधरा
जिमी शेरगिलचा अभिनय चांगला नाही?
12 Aug 2016 - 5:42 pm | तुषार काळभोर
मोहब्बतें सोडला तर जिमि शेरगिल ने नेहमीच उल्लेखनीय अभिनय केलाय.
माचिस पासून ते स्पेशल२६ पर्यंत.
12 Aug 2016 - 5:47 pm | संदीप डांगे
जिमी आवडतोच, त्याचा वापर करता आला पाहिजे फक्त, बुलेट राजा, तनु वेड्स मनू, वेन्सडे फक्त त्याच्यासाठी पहातो,
"गलती करणा अच्छा लगता है" म्हणावा तर त्यानेच!
12 Aug 2016 - 7:30 pm | अंतु बर्वा
सहमत... त्याच्या अभिनयाला मर्यादा आहेत, एकट्याच्या बळावर टीआर्पी खेचणारा नट नसला तरी त्याचे साहिब बिबी और गँगस्टर, स्पेशल २६, तनु वेड्स मनु, अ वेन्सडे सारखे चित्रपट त्याची अभिनयक्षमता दाखवतात...
योगायोगाने कालच मदारी पाहिला. वेन्सडे सारखीच थीम आहे आणि पहिल्या अर्ध्या तासानंतर बर्यापैकी प्रेडिक्टेबल होउन जातो. इर्फान नेहमीप्रमाणे चांगला अभिनय करतो पण चित्रपटात नवीन काय याचे उत्तर बहुतांशी नाही असेच म्हणावे लागेल. अर्थात, माझे वैयक्तिक मत.
12 Aug 2016 - 6:10 pm | हेमन्त वाघे
मगाशी लगान मध्ये चित्रपट चोरी चा विषय निघालाच आहे तर
निशिकांत कामात चा डोंबिवली फास्ट हा मायकेल डग्लस च्या फॉलिंग डाऊन ची चोरी होती .
हा चित्रपट बाणतेवेळीच माझ्या एका चित्रपट सृष्टीत काम करणाऱ्या ( अभिनय नाही , इतर) मित्राला याबद्दल विचारणा झाली होती , त्यावेळेचे त्याने सांगितले होते कि फॉलिंग डाऊन वरून एक चित्रपट येत आहे .
पण चित्रपट आल्यावर मात्र हा विषय जेंव्हा मीडियात आला तेव्हा सर्वानी असा कोठलाही चित्रपट आम्हाला माहीतच नाही असे निवेदन दिल्याचे आठवते .... ;) - अर्थात हि तर "टिपिकल " भारतीय वृत्ती झाली !
https://en.wikipedia.org/wiki/Falling_डाउन
डोंबिवली फास्ट मध्ये बेसबॉल बॅट चाय बदल्यात ( मूळ चित्रपटातील) क्रिकेट ची बॅट वापरली आहे .
12 Aug 2016 - 7:02 pm | पगला गजोधर
सोचना पडेगा !