मिपा परीवारात बरेच रॉयल एन्फ़िल्ड उर्फ़ बुलेट चे चाहते अन मालक आहेत, ह्या धाग्याचा हेतु कुठल्या ही दुसर्या ब्रॅंड च्या बाईक ची खिल्ली उडवणे, किंवा पातळी उतरुन टिका करणे हा मुळीच नाही, फ़क्त स्टॅंड अलोन बायकिंग करण्यापेक्षा , एक ऑर्गनाईझ्ड बायकींग एफ़र्ट म्हणुन हा लेखन प्रपंच, मोदक ह्यांनी प्रथम ह्या धाग्याची कल्पना मांडली...
इथे अपेक्षित काय आहे ??
आर .ई. उर्फ़ बुलेट मालक असाल तर आपले अनुभव, कथन, मेंटेनंस टिप्स, इत्यादी आदान प्रदान, नसाल अन रॉयल एन्फ़िल्ड मधे रस असेल तर इथे प्रश्नोत्तराची हक्काची जागा, विकत घेण्यात रस नसेल तर कुठे ह्या बाइक्स उत्तम कंडीशन मधे भाड्याने मिळतील, कुठ्ली एक्स्पिडीशन आर ई वर केली तर मजा , आराम अन ऍडव्हेंचर द्विगुणीत होईल ही चर्चा इथे आपण करुयात.
तर श्रीगणेशा स्वरुप, काही योगदान माझे (मोदक ह्यांनी मला, आर ई ची ३५० च का घेतली, एकंदरीत अनुभव काय इत्यादी कथन करण्याची विनंती केली त्याला अनुसरुन)
१. मी क्लासिक ३५० का घेतली ??
अ. उत्तम संगम, ३.५ रॉ ताकद अन त्यातल्यात्यात बरे माईलेज (माझ्या पेशात खुप फ़िरावे लागते)
ब. जरासा ओल्ड वर्ल्ड चार्म, सदरहु मॉडेल हे रॉयल एन्फ़िल्ड ह्या अगदी सुरुवातीच्या डीझाईन्स वर आधारीत आहे
क. रोबस्ट बिल्ड, कमी देखभालीचा खर्च
२. क्लासिक ३५० चे फ़ायदे ??
अ. मजबुत तरीही जास्त जड नसणे
ब. ट्रेडीशनल कार्ब्युरेटर टेक्नॉलोजी (बायकिंग मधे हे मला महत्वाचे वाटले, ई एफ़ आय मधे फ़्युल पंप वापरले जातात ते ही इलेक्ट्रॉनिक चिप्स ने कंट्रोल्ड, त्यात पेट्रोल ही जास्त जाते, अन आडवळणाला काहीही प्रॉब्लेम आला तर लोकल मेकॅनिक त्यात काहीच करु शकत नाही, ह्या उलट कार्ब्युरेटर असला तर अगदी मेकॅनिक नसला तरी जुजबी माहितीवर आपण स्वतः डॅमेज कंट्रोल करुन परत ती बाईक वर्कशॉप पर्यंन्त आणु शकतो)
क. स्पेयर पार्ट्स ची निट अवेलेबिलिटी अन सर्विस सुलभ असणे, ९० मिनिट एक्स्प्रेस सर्विस मधे शोरुम ला हिची व्यवस्थित निगा घेतली जाऊ शकते.
ड. उत्तम मायलेज (बायकींग ला हे असणे बरे असते)
ई. उत्तम ट्रॅक रेकॉर्ड, शिवाय मायलेज उत्तम असल्याने सायलेंसर चेंज अन इतर अस्थेटीक मॉडीफ़िकेशन्स (हॅंडल बार चेंज, रीम व्हिल्स ) नंतर ही खिशाला काही विषेश चाट बसत नाही
३. क्लासिक ३५० चे तोटे ??
१. जास्तच पॉवर हवी असल्यास ती नाही, "भारताची कल्ट हार्ले सम बाईक" असली तरीही ३५० सी सी आहे.
२. ८० किमी/ तास नंतर पुर्ण बाईक कंप पावते
३. कंपनी ने दिलेले टायर भंगार आहेत (बदलल्यावर काही प्रॉब्लेम नाही ड्राय अन वेट दोन्ही ट्रॅक्शन एन्वॉयरमेंट मधे)
४. कंपनी सायलेंसर साधा घेतला तर बरेचदा खड्ड्यातुन काढताना घासतो खालुन, ऑफ़ रोड घ्यावा तर कंपनी पॉलिसी मधे बाय बॅक किंवा एक्स्चेंज बसत नाही, दोन्ही बोकांडि बसतात सायलेंसर्स
५. कंपनी सायलेंसर चा आवाज ’बुले्ट आली बे’ अशी घोषणा करत नाही
६. फ़िटिंग्स अन बोल्ट्स मधे रस्टींग प्रॉब्लेम येतो ३-४ पावसाळ्यां नंतर
मला तरी मायलेज हा फ़ायदा इतर तोट्यापेक्षा मोठा वाटला सो मी घेतली, सद्ध्या ३-४ महिनेच झालेत, १५०० किमी झाले आहेत.
मोदक भाई, अन इतर , एकंदरीत हे फ़ायदे अन तोटे पाहुन मी क्लासिक ३५० घेतली आहे. :)
प्रतिक्रिया
29 Jul 2016 - 9:13 am | भटकंती अनलिमिटेड
तुम्हांला हॉर्नेट१६० हा ऑप्शन आहे. सीबीआर१५० देखील मिळते, पण तिची किंमत १.२५-१.३० च्या आसपास असावी.
28 Jul 2016 - 5:20 pm | कबीरा
मध्ये एका अवलिया रायडर ची कथा वाचली. त्या दादूस नी आपल्या 10 वर्षाच्या मुलाला मागे बसवून टीव्हीस व्हिक्टर वर भारत भ्रमण केले.
28 Jul 2016 - 5:32 pm | टवाळ कार्टा
D i L i P B a m - hold a world record for being the first man in the world to ride across world's largest SAHARA desert
28 Jul 2016 - 5:45 pm | मोदक
सातार्याचे आहेत ते साहेब. त्यांचे एक पुस्तकही आहे या भ्रमणाबद्दल. पुस्तकाचा फोटो मिळाला की टाकतो.
29 Jul 2016 - 9:09 am | भटकंती अनलिमिटेड
काय बाईक बाईक करते नी भाऊ... काय बाईक बाईक करते. जरा हिक्डे बघ ना ... नरेंदर भाई.
29 Jul 2016 - 9:44 pm | खटपट्या
लैच भटक्या दीसतात हे...
28 Jul 2016 - 6:06 pm | मुक्त विहारि
४०० साठी थोडी भर...
28 Jul 2016 - 7:22 pm | कैलासवासी सोन्याबापु
ह्या हातभाराबद्दल काकांचा सत्कार करावा म्हणतो, माझ्या ३५० वर पिलीयन रायडर म्हणून कोकण ट्रिप अन धारावी लेदर मार्केट मधून एक करकरीत झकास रायडिंग जॅकेट
28 Jul 2016 - 8:24 pm | मुक्त विहारि
डन
28 Jul 2016 - 7:29 pm | प्रसाद_१९८२
बरिच नवनविन माहीती मिळतेय. :)
29 Jul 2016 - 9:55 am | कबीरा
करिझ्मा-R चे जुने मॉडेल परत रिलाँन्च करणारेत? खरंय का?
29 Jul 2016 - 10:17 am | भटकंती अनलिमिटेड
नविन करिझ्मा मॉडेल कैच्याकै बकवास करुन ठेवले होते. हीरो मोटोकॉर्पला करिझ्मा नंतर परफ़ॉर्मन्स बाईक्स काढणे जमले नाही. इम्पल्स बेक्कार फ़्लॉप झाली. ऑफरोडिंगसाठी काढली आणि चिल्लर १५०सीसी इंजिन लावलं.
इम्पल्स आता २३३सीसी इंजिन घेऊन पुन्हा येणार आहे म्हणे. पण त्यांचं रेप्युटेशन पाहता अजून दोन वर्षे काय बाजारात उतरवत नाहीत. डिसेंबर२०१४ मध्ये ऑटो एक्स्पोला दाखवलेली HXR250 परत एकदाची दाखवली नाही.
29 Jul 2016 - 10:49 am | स्पा
वर अनेक सुपर बाइक्स चा वोशय निघालाच आहे तर अजून एक पर्याय आहे
बेनेली TNT ३००
https://www.zigwheels.com/newbikes/DSK-Benelli/TNT-300
29 Jul 2016 - 11:05 am | भटकंती अनलिमिटेड
टीएनटी ३०० ड्युअल सिलिंडर असल्याने तिचं बजेट फार पुढं जातं. अंदाजे साडेतीन लाख. पण अर्थात ड्युअल सिलिंडरमुळे व्हायब्रेशन्स एकदम गॉनच ना भाऊ. आणि एकदम पॉवरबाज. पण बेनेलीला एबीएसचं वाकडं का आहे ते अजून झेपलं नाही.
अवांतर: बेनेलीला इटालियन कोर्टानं दिवाळखोर म्हणून जाहीर केलंय.
29 Jul 2016 - 11:56 am | सुबोध खरे
बेनेली चालवून पाहीली. फक्त भरपूर पॉवर आहे. ब्रेक्स भिकार आहेत. युनिकॉर्नचे ब्रेक्स तिच्या पेक्षा चांगले आहेत. टर्निंग रेडियस फारच जास्त आहे. सस्पेन्शन हार्ड आहे. बसायची सीट स्पोर्टी आहे. अजिबात आवडली नाही.
बाकी कार आणि बाईक्स च्या मॅगझीन वर भरवसा ठेवून कुणीही वाहन विकत घेऊ नये या निष्कर्षप्रत आलो आहे.
कोणत्याही गाडीचे अवगुण सहज सांगत नाहीत. यांचे लॉन्ग टर्म रिपोर्ट ४-५ हजार किमीचेच असतात जेंव्हा फक्त गाडी किती ऍव्हरेज देते हे बरोबर सांगू शकतात. खऱ्या कटकटी १०-१५००० किमी नंतरच चालू होतात. त्यामुळे जरा जुन्या झालेल्या गाडूयांचे "मालक" हेच खरे भरवशाचे.
29 Jul 2016 - 1:50 pm | टवाळ कार्टा
+११११११११११११
29 Jul 2016 - 11:29 am | कबीरा
किती ही त्रास दिला/देत असली तरी बुलेट वाले आपलंच घोड (हत्ती/गरुड) पुढे रेटणार.
29 Jul 2016 - 11:30 am | संदीप डांगे
हौसेला मोल नसतं,
29 Jul 2016 - 12:04 pm | अनिरुद्ध.वैद्य
बुलेट हाय न ती! इट्स कल्ट बाईक.
29 Jul 2016 - 1:21 pm | भटकंती अनलिमिटेड
असं म्हणतात की रॉयल एन्फिल्ड इस बॉट विथ हार्ट ओव्हर ब्रेन. अनुभवलंय ते. पण आता ब्रेनकडे पारडं झुकतंय.
29 Jul 2016 - 2:16 pm | महासंग्राम
तरीच ब्लॅक पँथर चालवतोस दादा तू :P
29 Jul 2016 - 2:38 pm | भटकंती अनलिमिटेड
ऑरेंज डेव्हिल खुणावतोय. ब्लॅक पॅंथरही ठेवेन त्या वेळी. बघू नशीब आणि अकाउंट कसं साथ देतंय.
29 Jul 2016 - 3:54 pm | जगप्रवासी
तुमच्या चित्त्याचा फोटो पाहिलाय चेपुवर, या ब्लॅक पँथर चा फोटू तरी दाखवा.
29 Jul 2016 - 4:02 pm | भटकंती अनलिमिटेड
इथे आणि इथे.
आणि बाकी हत्यारं
29 Jul 2016 - 4:28 pm | जगप्रवासी
सांगितल्यावर लगेच फोटो अडकावल्याबद्दल. बाकी चित्त्याला अशा प्रकारे पार्क केलेलं पाहून डोळे पाणावले.
29 Jul 2016 - 4:37 pm | भटकंती अनलिमिटेड
मग कसा करायचा ओ?
20 Oct 2016 - 2:25 pm | जगप्रवासी
गाडी अर्धी बाहेर आलीये कंपाउंडच्या म्हणून म्हटलं
29 Jul 2016 - 4:06 pm | भटकंती अनलिमिटेड
इथे
इथे
आणि
इथे
29 Jul 2016 - 1:20 pm | ब़जरबट्टू
बुलेट म्हणजे राजा गाडी आहे भाऊ.. च्यामारी ते धड धड ऐकून लोक बघायला लागली का माणूस अजूनच कणा पिळगाळत अक्सेलेटरचा ..
पण, शेवटी अव्हेंजरच घेतली, :) कारण :-
1) बुलेटचा रॉयल लूक एव्हढा आवडला नाही, ते चौकोनी डिजाईन पाहून कसेसे होते..
2) एकदा बाइक घेऊन झोपलो आहे, त्यात मी सहसा 80 च्या खाली नसतोच स्पीडमध्ये. हे धूड अंगावर पडले तर काय होणार..
3) अव्हेंजर आवडली, टी तिच्या बुटक्या लूक मुळे. सीट खाली असल्यामुळे रोडला धरून चालते, आणि क्रोम्स तर किलर आहेत. आताही बाजूला दुसरी अव्हेंजर आली का मान वळतेच. वर सांभाळायला सोप्पी आहे.. आज जवळपास 6 वर्षे झालीत पण त्रास नाही..
29 Jul 2016 - 1:52 pm | टवाळ कार्टा
प्लेन हायवेला अॅव्हेंजर म्हणजे मर्सीडीझच्या तोडीचा कंफर्ट आहे :) पण जर टिपिकल भारतीय स्टँडर्डच्या रस्त्यावर चालवत असाल तर पाठीची हालत खराब होते
29 Jul 2016 - 2:10 pm | स्पा
जुन्या अवेंजर चा अनुभव अतिशय वाईट आहे
नवीन कलेक्शन चालवून पाहिलेले नाही
29 Jul 2016 - 3:03 pm | टवाळ कार्टा
माझ्याकडे २०१४-२०१५ मध्ये होती २२० वाली
29 Jul 2016 - 4:12 pm | ब़जरबट्टू
आता बापूंचा धागा हायजॅक केल्यासारखा होतोय .. :)
अव्हेंजर हायवेला मक्खन आहे, 80-90 ला कसली स्मूथ चालते राव. पण याच स्पीड ला ब्रेक मारला का गोड्या कपाळात.. हॅन्डल लॉक होते सरळ, दुसरे डोके खाते ते हमखास कुठे पण घासणारे सायलेन्सर.. लो ग्राउंड क्लियरन्स असल्यामुळे ऑफ रोड ला मारा खातेच,
पण टका,
बुलेट तरी कुठे चांगली आहे कंट्रोल आणि सस्पेन्शनला ? :)
29 Jul 2016 - 4:20 pm | भटकंती अनलिमिटेड
या धाग्याचं नाव बदलून "चर्चा बाइकांच्या" असं करावं या मताचा मी आहे. फारच जेनेरिक आणि सगळ्या ब्रॅंड्सबद्दल चांगली चर्चा होते आहे. नवनवीन माहिती मिळते आहे.
29 Jul 2016 - 5:30 pm | टवाळ कार्टा
+११११११११
+११११११११
याबाबत माहीत नाही
29 Jul 2016 - 9:53 pm | खटपट्या
नशीब :)
29 Jul 2016 - 2:17 pm | जगप्रवासी
२.५ वर्ष वापरतोय अव्हेंजर पण अजूनही काही त्रास झाला नाही (लॉन्ग ड्राइव्ह + घर ते ऑफिस). घ्यायची बुलेट होती पण तेव्हा खिशाला परवडणारी नव्हती म्हणून सध्या तरी दुधाची तहान ताकावर भागवतोय.
बुलेट घेण्याच्या विचारात असलेला जगप्रवासी
29 Jul 2016 - 5:51 pm | संदीप डांगे
29 Jul 2016 - 5:53 pm | संदीप डांगे
लोक्स, दुसऱ्या दुचाकीच्या चर्चा करायला टका ने पेशल धागा काढलाय, तिकडं जावा की....
29 Jul 2016 - 5:59 pm | कैलासवासी सोन्याबापु
जाऊ द्या डांगे साहेब, आम्ही एक नवा एक्सकलुसिव्ह एन्फिल्डर्स धागा काढावा म्हणतो, ओन्ली फॉर सर्विस अँड अदर टिप्स एक्सचेंज, टूर अनुभव शेयर करायला वगैरे :)
29 Jul 2016 - 6:56 pm | टवाळ कार्टा
=))
29 Jul 2016 - 7:04 pm | मोदक
बरोबरै...
उगाच अनधिकृत बांधकामे नियमीत करायला नकोत. आहे हे असेच असूदे आणि नवीन ठिकाणी आणखी डिट्टेलमध्ये बोलूया :)
29 Jul 2016 - 9:54 pm | खटपट्या
काढाच बापूसाहेब. त्या धाग्यावर फक्त आणि फक्त बुलेटचीच चर्चा होइल. टीकाही चालेल पण फक्त बुलेटबद्दल.
29 Jul 2016 - 9:58 pm | टवाळ कार्टा
=))
29 Jul 2016 - 7:40 pm | मितभाषी
30 Jul 2016 - 12:11 am | गणेश उमाजी पाजवे
Military Green Royal Enfield Bullet 500cc by Rajputana Custom Motorcyclehttp://350cc.com/military-green-royal-enfield-bullet-500cc-rajputana-cus... वरून साभार








30 Jul 2016 - 12:16 am | संदीप डांगे
मु.....आ!!!
30 Jul 2016 - 5:58 pm | अनिरुद्ध.वैद्य
त्या आवारा हु ने घाण केली ... अन्यथा मस्त जमलंय.
20 Oct 2016 - 3:16 pm | पाटीलभाऊ
झक्कास...!
30 Jul 2016 - 12:18 am | संदीप डांगे
आपण घेतली की पहिले वर्दे साहेबांकडे देऊन टाकणारे