मिपा परीवारात बरेच रॉयल एन्फ़िल्ड उर्फ़ बुलेट चे चाहते अन मालक आहेत, ह्या धाग्याचा हेतु कुठल्या ही दुसर्या ब्रॅंड च्या बाईक ची खिल्ली उडवणे, किंवा पातळी उतरुन टिका करणे हा मुळीच नाही, फ़क्त स्टॅंड अलोन बायकिंग करण्यापेक्षा , एक ऑर्गनाईझ्ड बायकींग एफ़र्ट म्हणुन हा लेखन प्रपंच, मोदक ह्यांनी प्रथम ह्या धाग्याची कल्पना मांडली...
इथे अपेक्षित काय आहे ??
आर .ई. उर्फ़ बुलेट मालक असाल तर आपले अनुभव, कथन, मेंटेनंस टिप्स, इत्यादी आदान प्रदान, नसाल अन रॉयल एन्फ़िल्ड मधे रस असेल तर इथे प्रश्नोत्तराची हक्काची जागा, विकत घेण्यात रस नसेल तर कुठे ह्या बाइक्स उत्तम कंडीशन मधे भाड्याने मिळतील, कुठ्ली एक्स्पिडीशन आर ई वर केली तर मजा , आराम अन ऍडव्हेंचर द्विगुणीत होईल ही चर्चा इथे आपण करुयात.
तर श्रीगणेशा स्वरुप, काही योगदान माझे (मोदक ह्यांनी मला, आर ई ची ३५० च का घेतली, एकंदरीत अनुभव काय इत्यादी कथन करण्याची विनंती केली त्याला अनुसरुन)
१. मी क्लासिक ३५० का घेतली ??
अ. उत्तम संगम, ३.५ रॉ ताकद अन त्यातल्यात्यात बरे माईलेज (माझ्या पेशात खुप फ़िरावे लागते)
ब. जरासा ओल्ड वर्ल्ड चार्म, सदरहु मॉडेल हे रॉयल एन्फ़िल्ड ह्या अगदी सुरुवातीच्या डीझाईन्स वर आधारीत आहे
क. रोबस्ट बिल्ड, कमी देखभालीचा खर्च
२. क्लासिक ३५० चे फ़ायदे ??
अ. मजबुत तरीही जास्त जड नसणे
ब. ट्रेडीशनल कार्ब्युरेटर टेक्नॉलोजी (बायकिंग मधे हे मला महत्वाचे वाटले, ई एफ़ आय मधे फ़्युल पंप वापरले जातात ते ही इलेक्ट्रॉनिक चिप्स ने कंट्रोल्ड, त्यात पेट्रोल ही जास्त जाते, अन आडवळणाला काहीही प्रॉब्लेम आला तर लोकल मेकॅनिक त्यात काहीच करु शकत नाही, ह्या उलट कार्ब्युरेटर असला तर अगदी मेकॅनिक नसला तरी जुजबी माहितीवर आपण स्वतः डॅमेज कंट्रोल करुन परत ती बाईक वर्कशॉप पर्यंन्त आणु शकतो)
क. स्पेयर पार्ट्स ची निट अवेलेबिलिटी अन सर्विस सुलभ असणे, ९० मिनिट एक्स्प्रेस सर्विस मधे शोरुम ला हिची व्यवस्थित निगा घेतली जाऊ शकते.
ड. उत्तम मायलेज (बायकींग ला हे असणे बरे असते)
ई. उत्तम ट्रॅक रेकॉर्ड, शिवाय मायलेज उत्तम असल्याने सायलेंसर चेंज अन इतर अस्थेटीक मॉडीफ़िकेशन्स (हॅंडल बार चेंज, रीम व्हिल्स ) नंतर ही खिशाला काही विषेश चाट बसत नाही
३. क्लासिक ३५० चे तोटे ??
१. जास्तच पॉवर हवी असल्यास ती नाही, "भारताची कल्ट हार्ले सम बाईक" असली तरीही ३५० सी सी आहे.
२. ८० किमी/ तास नंतर पुर्ण बाईक कंप पावते
३. कंपनी ने दिलेले टायर भंगार आहेत (बदलल्यावर काही प्रॉब्लेम नाही ड्राय अन वेट दोन्ही ट्रॅक्शन एन्वॉयरमेंट मधे)
४. कंपनी सायलेंसर साधा घेतला तर बरेचदा खड्ड्यातुन काढताना घासतो खालुन, ऑफ़ रोड घ्यावा तर कंपनी पॉलिसी मधे बाय बॅक किंवा एक्स्चेंज बसत नाही, दोन्ही बोकांडि बसतात सायलेंसर्स
५. कंपनी सायलेंसर चा आवाज ’बुले्ट आली बे’ अशी घोषणा करत नाही
६. फ़िटिंग्स अन बोल्ट्स मधे रस्टींग प्रॉब्लेम येतो ३-४ पावसाळ्यां नंतर
मला तरी मायलेज हा फ़ायदा इतर तोट्यापेक्षा मोठा वाटला सो मी घेतली, सद्ध्या ३-४ महिनेच झालेत, १५०० किमी झाले आहेत.
मोदक भाई, अन इतर , एकंदरीत हे फ़ायदे अन तोटे पाहुन मी क्लासिक ३५० घेतली आहे. :)
प्रतिक्रिया
30 Jul 2016 - 12:51 am | कैलासवासी सोन्याबापु
मी राजपुताना कस्टम्स रेकमेंड करेल डांगे साहेब! अर्थाचे हा फक्त एक सल्ला आहे देवा, तुम्ही अभ्या वगैरे आर्टिस्ट मंडळी आहात, तुम्हाला आस्थेटिक सेन्स,कलर डेप्थ वगैरे जास्त कळते, पण एक रॉयल एन्फिल्ड लवर म्हणून सांगतो, वर्दे गाडीचे "एस्सेन्स" बदलून टाकतात बुआ, म्हणजे रस्टीक ओल्ड स्कुल लुक अन फील जातो, उरतो तो एकदम लास वेगास टाईप भगभगाट, एकदम ग्लॉस असलेला ग्लास फिनिश पण साला त्यात मजा नाय वाटत, एन्फिल्ड म्हणजे कशी? कमीत कमी आस्थेटिक कामे, त्यातही पेंटजॉब रगेड हवा, मॅट ब्लॅक, वर्ल्ड वॉर 2 जर्मन लुक, किंवा मॅट ग्रीन (बॉटल ग्रीन मॅट फिनिश) हे आमच्या हृदयाचा ठोका चुकवतात, त्यात समोरचे लेग गार्ड मस्त मशीन रोल्ड दोर गुंडाळले (एपॉक्सी अधेसीव्ह मध्ये बुडवून लेगगार्ड वर मशीन ने दोर लपेटलेला असतो, इंडिकेटर कप्स ब्लॅक (गाडी ब्लॅक असल्यास) हेड लाईट अन टेल लॅम्प अन इंडिकेटर वर ब्लॅक मॅट फिनिश व्हर्टिकल जाळ्या! बास्सस, अन हो उर्वरित क्रोम बफिंग करकरून चककणारे, न सायलेन्सर बदलायचे लफडे (असलीच तर हौस, बॉटल नेक ग्लासवूल उत्तम वाटतो) न और कूछ!
राजपुताना वाले हे एस्सेन्स जपतात, अर्थात कस्टमरला हवं तसं ते पण मोडीफाय करून देतातच म्हणा
30 Jul 2016 - 3:11 am | खटपट्या
वा राव स्वप्नातील बुलेट उभी केलीत...
30 Jul 2016 - 11:16 am | अभ्या..
बापू परफेक्त.
वरदेची ला डेझर्ट लुकची मज्जा नाही. नेकेड बुलेट, मॅट कलर आणि क्रोम अथवा मॅट फिनिश. बस्स. इतना काफी है. त्यातल्या त्यात सिंगल सीट डिएस असली की बस्स.
30 Jul 2016 - 2:32 pm | कैलासवासी सोन्याबापु
आमच्या मागच्या सीट वर दावेदारीण आहे तुमची वहिनी, सिंगल सीट जमणार नाय देवा आम्ही गुपचिप 2 सीटाT ठेवतो
30 Jul 2016 - 9:56 am | महासंग्राम
वर्दे पेक्षा पुण्यात माझा एक मित्र आहे, कॉनन फर्नांडिस म्हणून भारी बाईक्स मॉडिफाइड करतो हा माणूस आहे. त्याच 'गॅब्रिएल मोटरसायकल्स' म्हणून वर्कशॉप आहे नांदेड सिटी जवळ. वर्दे पेक्षा निश्चितच स्वस्तात मॉडिफाइड करतो तो आणि स्वतः बाईक चा चाहता असल्याने जीव ओततो कामात.
30 Jul 2016 - 10:36 am | कपिलमुनी
गॅब्रिएल मोटरसायकल्स एक तर अफाट महाग आहे.
दुसरा असा त्याचे बरेच पार्टस् कस्टम मेड असल्याने जर लॉंग टूरवर काही प्रॉब्लेम आला तर ते दुरुस्त होणार किंवा रिप्लेस होत नाहीत.
30 Jul 2016 - 12:31 pm | महासंग्राम
पण,वर्दे पेक्षा नक्कीच कमी महाग मुनिवर्य.
तुमचे म्हणणे खरे असले तरी माझ्या ऐकण्यात आता पर्यंत कोणालाही असा प्रॉब्लेम आला नाही
30 Jul 2016 - 12:33 pm | महासंग्राम
आणि शेवटी बुलेट आहे चांगलं काम पाहिजे असले तेवढे दाम पण मोजावे लागतील हाकानाका
30 Jul 2016 - 6:03 am | मुक्त विहारि
४५०
30 Jul 2016 - 10:33 am | कैलासवासी सोन्याबापु
30 Jul 2016 - 11:13 am | आनंदराव
आयो बाब्बौ!
30 Jul 2016 - 2:28 pm | अभ्या..
परफेक्ट कॅफे रेसर.
अॅसॉल्ट आहे ही. ३५० सीसी.कॉमवरच पाह्यली.
एक ३५० घेऊन आपण करु शकू अशी. बेस्ट ड्रीम प्रोजेक्ट. नायतर शेवटी काँटीनेंटल जीटी आहेच.
30 Jul 2016 - 3:05 pm | टवाळ कार्टा
कॅफे रेसरच हवी असेल तर ओरिजनल कॅफे रेसरच घे...जास्त पॉवर आहे इंजिनात
30 Jul 2016 - 3:26 pm | अभ्या..
असा लुक याया पाह्यजे बघ



निदान असा तरी
गेला बाजार हे बग.
कसंय? हाय का भारी काम?
करायचीच बघ. जरा पैशे आले की देख तमाशा ;)
30 Jul 2016 - 3:29 pm | अभ्या..
अर्र रेसर गंडल्या.



थांब.
30 Jul 2016 - 8:41 pm | खटपट्या
सगळं चांगलंय पण पाण्यातून गेल्यावर मागे अंगावर पाणी/चिखल उडेल....
30 Jul 2016 - 3:49 pm | कैलासवासी सोन्याबापु
ही वरची म्हणजे कॅफे रेसर अन बॉबरची क्रॉस ओव्हर आहे रे! बेस्ट ऑफ बोथ
14 Aug 2016 - 3:29 pm | अभ्या..
आरई जुना चेस्टनट कलर परत आणतेय. युट्युबवर सुरु आहेत डॉक्यु टाईप झैराती. शिवाय जुन्या हँड पेंटेड गोल्डन लाईन्सच्या आर्टिस्टची पण कलाकारी शो करतेय. नवीन सिल्व्हर क्लासिक वर कॉपर लाइनिंग आहे.
29 Aug 2016 - 12:07 pm | अनिरुद्ध.वैद्य
चि झैरात पाहिली. मस्त दिसतेय. पण हाईट खुप जास्त आहे.
30 Aug 2016 - 6:10 am | टवाळ कार्टा
जवळपास पल्सर इतकीच आहे की
30 Aug 2016 - 8:12 am | अनिरुद्ध.वैद्य
सुरुवातीचे मॉडेल बघितले होते, तेव्हा जास्त वाटली होती.
29 Aug 2016 - 11:17 am | गणामास्तर
रॉयल एन्फिल्ड रायडर मॅनिया 2016 च्या तारखा आलेल्या आहेत. 18 ते 20 नोव्हेंबर.
कुणी मिपाकर इच्छुक आहेत काय ?
29 Aug 2016 - 1:14 pm | मोदक
एका इंडीकेटरचा ब्लिंक रेट दुसर्या इंडिकेटरपेक्षा बराच वाढला आहे.
घरी काही करण्यासारखे आहे की मेकॅनिककडे जावे लागेल..?
29 Aug 2016 - 2:08 pm | कैलासवासी सोन्याबापु
वायरिंग चेक करा, रिपीटर रिले का कायसे असते एक डबी त्यात पाणी गेले असावे, ब्लोवर मारा ठीक होईल न झाल्यास mechanic!
29 Aug 2016 - 2:09 pm | मोदक
ओके.. धन्यवाद बापू..!!
31 Aug 2016 - 4:38 pm | भटकंती अनलिमिटेड
एका दिशेच्या दोन इंडिकेटरपैकी (पुढला किंवा मागला) एक (किंवा त्याचा फ्युज) गेला असावा, म्हणून जो शिल्लक आहे तो डबल स्पीडने ब्लिंक करतो.
12 Sep 2016 - 3:28 pm | मोदक
हाच्च प्रॉब्लेम आहे. मागचा इंडिकेटर बंद पडला आहे.
12 Sep 2016 - 2:55 pm | पी. के.
#brotherhood day#avenger FLG टॅग लाइन विडिओ मध्ये बजाज अव्हेंजरला रॉयल एन्फ़िल्डचा भाऊ दाखवायचा प्रयत्न केलाय ज्याची चेहरा पुस्तक वर जॅम खिल्ली उडवली जातेय. या दोन गाड्यात काय साम्य आहे का?
बजाज अशी जाहिरात करू शकतो का?
12 Sep 2016 - 3:28 pm | टवाळ कार्टा
both are highway tourers
12 Sep 2016 - 3:38 pm | कपिलमुनी
दोन्ही गाड्या कित्ती वाईट्ट आहेत ते सांग ना
12 Sep 2016 - 3:51 pm | टवाळ कार्टा
जे काही म्हणायचे आहे ते सग्गळे वरच्या वाक्यात लिहिलेले आहे ;)
12 Sep 2016 - 5:26 pm | अनिरुद्ध.वैद्य
मी पण खुप हसुन घेतलं. किमानपक्षी थंडरबर्ड तरी घ्यायची होती.
क्लासिकसे कंपॅरिझन म्हणजे हाईट्ट्ट्ट!!!
12 Sep 2016 - 4:42 pm | अमर विश्वास
बजाज अव्हेंजर आणि रॉयल एन्फ़िल्ड या दोन्ही गाड्या क्रुझर बाईक आहेत.. एवढेच साम्य..
फरक खुप आहे... पण जर यातिल कुठलीच गाडी वापरली नसेल तर अव्हेंजर चान्गली आहे...
एकदा रॉयल एन्फ़िल्ड वापरली तर मग कुठली गाडी हा प्रश्नच उरत नाही
12 Sep 2016 - 10:15 pm | सत्याचे प्रयोग
13 Sep 2016 - 12:37 am | जिन्क्स
सध्या थंडर्बर्ड ५०० आणि डेसर्ट-स्टॉर्म मधे जाम कन्फ्युस आहे. वापर आणि ergonomics पाहता थंडर्बर्ड ५०० सगळ्यात उत्तम आहे. पण डेसर्ट-स्टॉर्मच्या लुक्स वर जाम फिदा झालोय.
13 Sep 2016 - 12:51 am | खटपट्या
जबरी आहे घ्याच.
13 Sep 2016 - 1:22 am | कपिलमुनी
डेझर्ट स्टॉर्म घ्या!
13 Sep 2016 - 10:33 am | अनिरुद्ध.वैद्य
भाड्यानं घ्या चांगलं १०० १०० पळवुन बघा. अन ठरवा कोणती सुट होते ते?
मला स्वतःला डेझर्टस्टॉर्म प्रचंड आवडायची. पण शेवटी थंडरबर्ड घेतली.
५०० सीसी विषेश आकर्षण? की निव्वळ दामटायची आहे? कारण ३५० इज मोअर दॅन इनफ.
13 Sep 2016 - 10:58 am | जिन्क्स
पुर्वी थंडर्बर्ड ३५० वापरुन पाहिली आहे २००९ च मॉडेल. एकदा ५०० सी सी चालवली की रानटी टॉर्कचं व्यसन लागत.
13 Sep 2016 - 10:30 am | अनिरुद्ध.वैद्य
अहो हौस करायची तर खिशाकडं बघायचं नाय मालकं!
हॅप्पी रायडींग!
13 Sep 2016 - 8:27 am | कैलासवासी सोन्याबापु
सायलेन्सर कुठला बेस्ट असेल हो मंडळी????
माझ्या गरजा
१. अर्थातच दणदणीत आवाज
२. कमी किंमत (अध्याहृतच आहे ते)
३. शक्यतो ऑफ रोडिंगला त्रास देणार नाही असे डिझाईन
माझ्या माहिती असलेले काही सायलेन्सर
१. पंजाब (गुरप्रीत एग्जोस्ट)
२. इंदौर
३. मेगाफोन
४. ग्लासवूल
ह्यांच्यातील कुठला बेस्ट आहे ते सांगा. ह्या शिवाय काही ऑप्शन असली तर ती ही सांगा.
आगाऊ आभार
अवांतर:-
गाडीची वॉरंटी संपली आहे तस्मात आता राणी मनाला येईल तशी सजवणार, वर्ल्ड वॉर २ थिम मॅट ब्लॅक रंग द्यायचं चालू आहे डोक्यात, त्यासोबत बार हँडल (स्लान्टेड बॉबर इअर्स टाईप) अन सायलेन्सर
13 Sep 2016 - 9:10 am | मोदक
राणीच्या मेकअपचे स्टेजवाईज फोटो काढून ठेवा आणि नंतर आठवणीने एक धागा काढा.
13 Sep 2016 - 9:28 am | कपिलमुनी
Sorry for English!
Considering Performance and long ride noise , glass wool is very good ! I have tried dholki, indori but glass wool is perfect
13 Sep 2016 - 5:16 pm | कैलासवासी सोन्याबापु
कमु, मोदक शेठ
ग्लासवूल ने मायलेज वर काय फरक पडतो ??? किती उतरते, किती स्टेबल राहते, काही ठिकाणी वाचले होते की ग्लासवूल (का इंदोरी, नीट आठवत नाही) मुळे इंजिन ब्लॉकला चरे पडतात (scratches) , ते खरे आहे का? नाहीतर आवाजाचा शौक हजारोत पडायचा !! =)) =))
माझं मन बसलंय पंजाब वर, ८००₹ ला मिळतोय, घ्यावा काय? ग्लासवूल ची रेंज काय आहे, मला गाडीचा आवाज उगा हर्ले टाईप करायचा नाहीये, तर जितका ओल्ड स्कुल बुलेट टाईप खणखणीत असेल तितका करायचा आहे, त्या हिशोबाने सल्ला द्या ही विनंती, भटकंती अनलिमिटेड वाले भाऊ असतील तर त्यांनीही सल्ला द्यावा
आपल्याच ब्रदरहूडचा आभारी
बापु
14 Sep 2016 - 2:42 pm | मोदक
ग्लासवुलबद्दल मनरावचा एक प्रतिसाद आहे, शोधून देतो.
..बाकी सायलेन्सर बदलण्याचा मानस नसल्याने याबाबत माहिती काढलेली नाही.
21 Sep 2016 - 2:37 pm | भटकंती अनलिमिटेड
जरा उशीर झाला त्यामुळे क्षमस्व. चीता घेऊन हंपीत शिकारी करत होतो. आलो काल.
सुंदर baasy आवाज आणि कमीत कमी परफॉर्मन्सवर परिणाम यासाठी गोल्डस्टार ग्लासवूल मी सुचवीन. साधारण २२००-२५०० किंमत आहे. कुठल्या तरी मेकॅनिककडे जिथे सगळे ऑप्शन उपलब्ध असतील तिथे जाऊन लावून बघा. युट्यूबवर आवाजाजेही व्हिडिओ आहेतच.
21 Sep 2016 - 3:01 pm | पी. के.
वा,
हंपी भटकंती धागा येऊदे लवकर.
वाट बघतोय.
22 Sep 2016 - 9:21 am | भटकंती अनलिमिटेड
हे अवांतर आहे खरं तर.
हंपीचा धागा मी लिहू शकेन की नाही माहित नाही, कारण एकसंध लिहिण्याची आमची हातोटी नाही. पण जसे जमेल तसे फोटो पेजवर टाकतोय, सोबत जसे मला जोडता येतील तसे शब्दही जोडतोय. फोटोदेखील जसे पाहिले त्या क्रमाने जमत नाहीत प्रोसेस करायला. जेव्हा जी फ्रेम आवडेल ती घ्यायची, संस्करण करायचे आणि अपलोड करायचा असा अजागळ कारभार आहे माझा.
23 Sep 2016 - 4:36 pm | मोदक
एक काम करा मग... एक साधा धागा टाका. कुठून कुठे गेलात आणि किती वेळ लागला वगैरे वगैरे...
नंतर प्रतिसादात सवडीने एक एक फोटो अपलोड करा...
30 Sep 2016 - 5:07 pm | महासंग्राम
इ ना चोलबे... चेपू वर पाहिलंय लिखाण तुमचं देवा