कबाली

समीर_happy go lucky's picture
समीर_happy go lucky in जनातलं, मनातलं
23 Jul 2016 - 11:36 pm

दक्षिण भारतीय चित्रपट तुम्ही बघता तेंव्हा एक तर ते बाय डिफॉल्ट नायक प्रधान असतात आणि कथा\पटकथा एक अतिशय जास्त "हे समजून घ्या, ते समजून घ्या" टाईपची असते. एखादी कथा नीट उलगडून सांगण्यात किंवा नीट एक्सप्लेन ऑन स्क्रीन करण्यात काय काठिण्य असते देव जाणे!! पण असं असते खरं. हे बहुतेक अति-जास्त नायकप्रधान वळण कहाणीला दिल्यामुळे असं होत असावं, अर्थात असं मला वाटते. कबाली हा सुपरस्टार (शब्दश:) रजनीकांत चा असल्यामुळे हा अपवाद असण्याचा प्रश्नच उठत नाही.

साध्या शब्दात "सब कुछ रजनीकांत" या तीन शब्दांत कबालीची कहाणी सांगता येते. पण लिंगा किंवा शिवाजी सारखी कहाणीची विशेष पातळी गाठणे लेखक/दिग्दर्शक प रणजित याना जमलेले नाही हे नक्की. आपला हिंदी कहाणी लेखक असता तर मलेशियातील स्थायिक भारतीयांच्या व्यथा/ चिनी घुसखोरीमुळे त्यांना मलेशियात होणारा त्रास\नायकाची प्रेमकहाणी\ त्याचा जीवनातील संघर्ष इत्यादी इत्यादी इत्यादी बाबीना एकमेकांत गुंतवत चार ते पाच हिंदी चित्रपटांच्या कहाण्या तयार होतील अशी कहाणी बनली असती. पण "सब कुछ रजनीकांत" हि कहाणी साकारणे जमले नसते.

सुपरस्टार रजनीकांत हा कबालीश्वरन या डॉन च्या मुख्य भूमिकेत आहे. प्रेक्षक हे फक्त त्याला बघण्यासाठीच गर्दी करणार याचा अंदाज आधीच असल्यामुळे त्याला प्रत्येक गोष्टीत अति-महत्व आहे. साधीशी गोष्ट सिनेमाच्या पहिल्याच पंधरा मिनिटात 25 वर्षे तुरुंगात घालवून तो बाहेर येतो अन या बाहेर येण्यात त्याचे जे स्वागत त्याच्या मंडळींकडून होते ते स्वागत अन त्याचे पार्श्वसंगीत याची पातळी अतिशय उच्चं असल्याचे बाकी चित्रपटभर बघताना जाणवून जाते. वयाच्या पासष्ठाव्या वर्षी त्याची नायकाची भूमिका\प्रेम वगैरे करण्याची इच्छा असेल असे मला तरी वाटत नाही पण चाहत्यांच्या आग्रहाखातर तो करत असावा आणि या हि वयात तो बरोबरीच्या इतरांना पुरून उरतो हे जगाला आपोआप जाणवत असेल. चिनी अभिनेत्यांसोबतची त्याची जुगलबंदी, या वयातीलहि फिजिकल फिटनेस वगैरे कौतुक त्याच्या बद्दल आहेच. त्याच्या वयाचा उल्लेख करण्यामागे त्याचा फिजिकल फिटनेस आणि सिनेमाच्या सुरवातीच्या श्रेय नामावलीत त्याचा उल्लेख "पदमविभूषण रजनीकांत" असं होतो हे मला विशेष वाटलं. आपली मराठमोळी राधिका आपटे त्याच्या पत्नीच्या भूमिकेत आहे पण जेवायला बसल्यावर भात-भाजी-पोळी असा सगळा जामानिमा ताटात असल्यावर कितीही व्यवस्थित कापलेला कांदा दिला तरी कुणी जेवल्यानंतर "किती सुंदर कापला कांदा" असा उल्लेख करतो का?? आणखी काय बोलावे!!!

प रणजित यांचे दिग्दर्शन कबालीचे आहे. लिंगा किंवा गेला बाजार शिवाजी मध्ये राजनीकांतची ची की "लार्जर दॅन लाईफ" इमेज होती तशी इमेज निर्माण करण्यात कबाली कमी पडतो हे मात्र जाणवते. भलेही कहाणीला इतक्या विविध कोनांनी फिरवत प्रयत्न तसा केला असेल हे जाणवते पण तो प्रयत्न कमी पडतो हे मात्र नक्की. पण एक दिग्दर्शक हाच जेंव्हा लेखक असतो आणि कहाणीत नायकालाच महत्व द्यायचे आहे हि requirement त्याला अन निर्मात्याला क्लियर असते तेंव्हाच असे होत असावे. संतोष नारायणन यांचे संगीत कबालीचे आहे. दक्षिण भारतीय पद्धतीचे तीन किंवा चार गाणे आहेत पण या गाण्यांपेक्षा त्यांनी पार्श्वसंगीतात कमाल केलेली आहे. जिथे, जसे, जितके पाहिजे तसेच पार्श्वसंगीत आहे.

सुपरस्टार रजनीकांत हा एक अभिनेता म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून लोकांना आवडतच असेल. जर तीनही तास पडद्यावर कहाणी वगैरे इतर क्षुल्लक गोष्टींना नोटीस न करता त्याला बघण्याची तयारी असेल, तर तुमच्यासाठीच हा चित्रपट आहे. मी माझ्यातर्फे कबालीला 2* देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.

-समीर

चित्रपटसमीक्षा

प्रतिक्रिया

संदीप डांगे's picture

23 Jul 2016 - 11:39 pm | संदीप डांगे

हे 'प रणजित' म्हणजे रणजित पराडकर काय?

समीर_happy go lucky's picture

23 Jul 2016 - 11:45 pm | समीर_happy go lucky

हाहाहा, असेलही मोठा माणूस तो

सतिश गावडे's picture

23 Jul 2016 - 11:41 pm | सतिश गावडे

काहीही कथानक नसलेला अतिशय टुकार चित्रपट आहे हा. रजनीकांतचे चाहते लोकच हा चित्रपट पुर्ण पाहू शकतील.

चौकटराजा's picture

24 Jul 2016 - 10:49 am | चौकटराजा

मी सलमानचे फकस्त दोनच पिच्चर पायलेले आहेत. काटरिना, ऐश्वर्या, श्रीदेवी ( अपवाद फिरोज खाच्या हर किसीकी गाण्यात )
दीपिका यांचा एकही चित्रपट पाहिलेला नाही. रजनीकांत चा एक बी नाय राव !

सतिश गावडे's picture

26 Jul 2016 - 9:56 am | सतिश गावडे

हे सारे आमच्या जमान्याचे. तुमच्या जमान्यातील सिनेमे तुम्ही पाहीले असतीलच. :)

'दिग्दर्शन कबालीचे आहे', 'संगीत कबालीचे आहे' येथे कबालीचे की कमालीचे म्हणायचे आहे हे कळले नाही. बाकी कांद्याची उपमा आवडली.

समीर_happy go lucky's picture

23 Jul 2016 - 11:46 pm | समीर_happy go lucky

सॉरी बॉस, टायपो असेल अन आता एडिट होत नाही पण बारकाईने वाचल्याबद्दल धन्यवाद

रजनिकांत नव्हे रजिनिकांत.बाकी त्याचे चमत्कार प्रेक्षकांना आवडत असतील तर एकूण चित्रपटावर टीकाच व्यर्थ आहे.परवा अरोरा थिएटरबाहेर जो धुमाकुळ घातलाय चाहत्यांनी तो पाहून पटेलच.चार्ली चापलिनची नक्कल करून गल्ला गोळा करणारे सुपरस्टार हिंदीत आहेतच.रजिनिला डोक्यावर घेतात तसे इथल्या कोणत्याच मराठी हिरोबद्दल होत नाही हे आपली चूक असेल अथवा हिरो कमी पडत असेल.

चौथा कोनाडा's picture

24 Jul 2016 - 9:29 am | चौथा कोनाडा

नुकताच अस्तू सारखा सर्वांग-सुंदर संवेदनाशील सिनेमा पाह्यल्या त्यामुळे कबाली बद्दल काय मत व्यक्त करणार ?
त्याचा रोबोट पाहिला होता पण त्यातली व्हीफेक्स कलाकारी सोडली तर सो-सो च वाटला.
तुलनेत कमल हसन खुपच उजवा वाटतो.

बाकी रजनीकांतच्या वयाचे, त्याच्या भक्त चाहत्यांचे अतिशय कौतुक वाटते.

कैलासवासी सोन्याबापु's picture

24 Jul 2016 - 10:41 am | कैलासवासी सोन्याबापु

कमल हासन अन रजनीकांत तुलना होऊ शकत नाही असे आमचे मत आहे

अभिनयाच्या पातळीवर कमल हसन आणि रजनीकांत यांची तुलना होऊच शकत नाही असे आमचे मत.
कमल हसन बाप माणूस आहे. पण अलीकडे तोसुद्धा आशय कमी आणि मेकअप जास्त अश्या चक्रात अडकल्यासारखा वाटतो.

समीर_happy go lucky's picture

25 Jul 2016 - 9:48 pm | समीर_happy go lucky

पूर्ण सहमत

अस्तु चे परिक्षण द्या ना चौ को दादा

समीर_happy go lucky's picture

31 Jul 2016 - 10:27 pm | समीर_happy go lucky

चौ को???
(चौकस कोल्ह्या????)

समस्त कोल्हा प्रवर्गातर्फे निषेध करावा काय या विचारात पडलेला स्मायली कल्पावा :P

चांदणे संदीप's picture

31 Jul 2016 - 10:45 pm | चांदणे संदीप

"चौथा कोनाडा" असा आयडी आहे!

चौकस कोल्ह्या - कैच्या कै!

समीर_happy go lucky's picture

31 Jul 2016 - 10:50 pm | समीर_happy go lucky

हाहाहाहाहा बरं बरं

समीर_happy go lucky's picture

31 Jul 2016 - 10:51 pm | समीर_happy go lucky

आधी मला समजेना चौ अन को चा लॉन्गफॉर्म काय असेल ते
मग हा मी जनरेट केला :P

चांदणे संदीप's picture

31 Jul 2016 - 10:56 pm | चांदणे संदीप

आता बघा "चौकस कोल्हा" आयडी आठेक दिवसात हजर होतोय! :P

तिमा's picture

24 Jul 2016 - 2:33 pm | तिमा

कमल हासनचे 'अप्पूराजा' आणि मेयरसाब' हे दोन चित्रपट अफलातून होते. करमणूक +नावीन्य, हे दोन्ही बघायला मिळाले. त्याची तुलना रजनीकांतशी होऊच शकत नाही.

चांदणे संदीप's picture

24 Jul 2016 - 4:10 pm | चांदणे संदीप

यात "पुष्पक विमानम" हा चित्रपट ॲडवण्यास हरकत नसावी!

Sandy

मार्मिक गोडसे's picture

24 Jul 2016 - 4:41 pm | मार्मिक गोडसे

बालपणी अप्पूराजा बघितला आणि कमल हसनचा फॅन झालो. त्याचे जुने सिनेमे अजुनही बघतो. पुष्पक व मेयरसाब बघताना क्षणभरही कंटाळा येत नाही.

एकुलता एक डॉन's picture

24 Jul 2016 - 4:47 pm | एकुलता एक डॉन

विश्वरूपम पण बरा होता ,Indian

चौथा कोनाडा's picture

24 Jul 2016 - 5:11 pm | चौथा कोनाडा

अगदी सही !

कमल हसन एदुकेलिए पासुनच आपला आवडता अभिनेता होता. पुष्पक, अप्पुराजा, मेयरसाहब या सिनेमा नंतर तो अष्टपैलूपणाची खात्री पटली !

त्याचा हिंदुस्तानी जरा पसरत होता तरी आवडला होता !

सिरुसेरि's picture

26 Jul 2016 - 5:06 pm | सिरुसेरि

कमल हसन आवडता अभिनेता . +१ . कमल हसनचे "विरुमंडी " ,"तेनाली" , "सागर संगम" ," स्वाती म्रुथ्यम " , "अंबे सिवम" , "विलायधु वेट्टायडु" , "मायकेल मदन कामराजन" , "१६ वयानिधे" हे चित्रपटही उल्लेखनीय आहेत .

ऋतुराज चित्रे's picture

27 Jul 2016 - 12:08 pm | ऋतुराज चित्रे

" स्वाती म्रुथ्यम " सुंदर सिनेमा आणि कमल हसनचा अभिनयही तितकाच सुंदर. सदमाही छानच होता, कमल हसनचा अभिनयही सुंदर होता, परंतू तो सिनेमा कमल हसनपेक्षा श्रीदेवीचा म्हणून ओळखला जातो.

तुषार काळभोर's picture

24 Jul 2016 - 6:17 pm | तुषार काळभोर

?

मृत्युन्जय's picture

29 Jul 2016 - 1:25 pm | मृत्युन्जय

कमल हसन च्या चाहत्यांनी विश्वरुपम आणि अभय हे दोन चित्रपट देखील चुकवु नयेत ;)

समीर_happy go lucky's picture

31 Jul 2016 - 11:03 pm | समीर_happy go lucky

शाहरुख खान हा अभिनेता\व्यक्ती मला प्रचंड आवडतो पण माझ्या मते त्याची अन कमल हासनची तुलना होऊ शकत नाही. म्हणज बघा इंजिनियरिंग मध्ये M -3 टॉपर केला तर लगेच त्याची अन बॅकलॉग वाल्याची तुलना होऊ शकते काय?? अजिबात नाही अन करूही नये, नशीब असं पलटू शकते कि हाच बॅकलॉग वाला याच टॉपर चा बॉस बनून त्याला राबवू शकतो...

तर मतितार्थ काय? तर दोघेही आपापल्या जागी ठीकाय आणि त्यांची तुलना होऊ शकत नाही अन करूही नये

चौथा कोनाडा's picture

24 Jul 2016 - 8:35 pm | चौथा कोनाडा

आई शप्पत, सदमा ल्हायाचाच राहिला राव !

अन ' जरासी जिंदगी ' ?
( नाव नक्की नीट आठवत नाहीय आता )

चिनार's picture

25 Jul 2016 - 10:27 am | चिनार

समीर भाऊ..
कबाली वगैरे जाऊ द्या पण ह्यावेळी तुम्ही परीक्षणात जरा हात आखडता घेतलाय असा वाटते.

समीर_happy go lucky's picture

25 Jul 2016 - 9:49 pm | समीर_happy go lucky

राव, कन्फ्युज केलं तुम्ही, हे कौतुक कि उडवली??

तस नाही भाऊ..तूमचे परीक्षण उत्तम असते नेहमी...यावेळी जरा सपक वाटले.

महासंग्राम's picture

25 Jul 2016 - 10:41 am | महासंग्राम

कबाली....

इंटर्वल पर्यंत पिच्चर ला काहीच स्टोरी नाही...

पिच्चर मध्ये प्रूफ केलंय कि तुमच्या प्रगती मागे तुमचे मित्रच असता, अन तुम्हाला डुबवायला सुद्धा मित्रच कारणीभूत असतात..

एखाद्या पोरीने जर तुम्हाला जायला सांगितलं तर चूपचाप निघून जायचं,तिथं थांबल्यावर तुमच्या जीवाला धोका असतो, हे रजनीकांतला भी गोळया लागल्यावरच कळाल..

रजनीकांत अमर आहे असं मला वाटत, त्याला ४ गोळ्या लागल्या तरी त्यानं फक्त पट्ट्या लावल्या...

माणूस कितीभी म्हतारा झाला तरी हँडसम दिसू शकतो हे रजनीकांत ने प्रूफ करून दाखवलं, म्हणजे मला अजून लै स्कोप आहे भारी दिसायला....

मला पहिले वाटायचं फक्त भारतातले लोकच लुना वापरता, पण मलेशिया मशे सुद्धा लुना M80 आहे...

कोणतीही अनोळखी पोरगी जर तुम्हाला पप्पा म्हणली तर ती तुमची पोरगी नसते...

रजनीकांत भी जोर जोरात रडतो, तर अपूण तर लै तुच्छ आहे ओ....

भारतातल्या बाया कोणालापन खुन्नस देऊ शकता, मग तुम्ही डॉन का असेना...

पिच्चरात रजनीकांतची पोरगी दिसायला लै भारी होती, पण माझी शिट्टी वाजवायला काय हिम्मतच झाली नाही, भीती होती की रजनी भौ थेटर मधून बाहेर निघून मारू नये म्हणजे झालं...

माय बापाच्या भांडणात पोराचा जेव्हडा रोल राहतो तेवढाच रोल फक्त राधिका आपटेचा आहे...

कटप्पान बहुबलीला का मारलं पुढल्या वर्षी तरी कळण पण जर्किन वाल्यान रजनीकांतला मारलं कि नाही हे कोण सांगणार...

पिच्चरची स्टोरी काय आहे विचारणाऱ्याला हाणला पाहिजे. रजनीकांत आहे पिक्चरमंदी, मग आता स्टोरी कशाला पाहिजे.

समीर_happy go lucky's picture

25 Jul 2016 - 9:43 pm | समीर_happy go lucky

हाहाहाहाहा

योगी९००'s picture

26 Jul 2016 - 8:51 am | योगी९००

कटप्पान बहुबलीला का मारलं पुढल्या वर्षी तरी कळण पण जर्किन वाल्यान रजनीकांतला मारलं कि नाही हे कोण सांगणार...
कबाली = कट्टप्पा + बाहूबली

मराठमोळा's picture

26 Jul 2016 - 5:17 am | मराठमोळा

कबाली काय किंवा शिवाजी काय.. पण अशा सिनेमांचे परीक्षण लिहिण्यात/करण्यात काय हशील? रजनीकांतच्या सिनेमातून आणखी काय अपेक्षित असते? त्याच्या सिनेमाची तुलना करण्याचही प्रयोजन समजले नाही. :)

अगदी अगदी, आमीबी कबाली बघायला म्हणून गेलोच नव्हतो, नवीन इ स्क्वेअर कसे आहे ते पाह्यलं. बाकी पिक्चर बोगस आहे. एक तर सगळा पिक्चर मलेशियात, तिथल्या ग्यानग्स अन पब्लिक हे अनाकलनीय सब्जेक्त. रजनीआण्णा आता लैच ओल्ड ग्रॅण्डपा झाले. मेकअप जास्त नाहीये वापराया. सो त्यांचा प्रेझेन्स काय एव्हडा भारी वाटत नाही. आपटेबाई जवळपास पूर्ण पिक्चर प्रेग्नन्ट दाखवल्यात. काबालीकाकांची पोरगी मात्र डाव आहे. म्युझिक मोरटल कॉम्बॅट प्लस डॉन चे. ते जीवा कॅरेक्टर भलतंच ऍक्टिव्ह दाखवलय. इतर काही सांगण्यासारखे नाही.

मुक्त विहारि's picture

27 Jul 2016 - 12:38 pm | मुक्त विहारि

पण एक मात्र आहे.

इतर लोकांना पब्लीक सुट्टीच्या वेळेत सिनेमा प्रदर्शित करायला लागतो, तर रजनीकांतचा सिनेमा ज्या दिवशी असतो, त्या दिवशी सुट्टी जाहीर केल्या जाते.

समीर_happy go lucky's picture

27 Jul 2016 - 11:21 pm | समीर_happy go lucky

सुट्टी होती MNC त पण बदल्यात शनिवार-रविवार दोन्हीही दिवस सहा सहा तास राबवून घेतलं अन नाईट शिफ्ट वाल्याना कोणतीही सवलत नव्हती, लोकांना काज जाते म्हणे सुट्टी होती असं म्हणायला
-इति एक मित्र चेन्नई

चौथा कोनाडा's picture

29 Jul 2016 - 12:15 pm | चौथा कोनाडा

करेक्ट.

MNCs असल्या बाबतीत स्मार्ट अर्थातच चालू असतात.
कुठली तरी क्रेझ बघुन त्या वर राईड व्हायचे,
अन काही तरी मोठे दिल्याचा आव आणायचा.

पिळुन वसुली करुन घेतात.
इतर फालतू गोष्टीवर पैसे खर्च करतात (ज्याचा आर्थिक काही फायदा नसतो) अन कर्मचारी लोकाना स्साध्या साध्या सवलती देताना रड दाखवतात.

मृत्युन्जय's picture

29 Jul 2016 - 1:44 pm | मृत्युन्जय

कबाली हा सर्वार्थाने आणि परिपुर्ण असा रद्दी चित्रपट आहे. चित्रपटाला कथा नाही असे म्हणवत नाही. कथा आहेच. पण ती अतिशय रद्दी आहे आणी किमाण १०० चित्रपटांमध्ये वापरुन झाली आहे.

चित्रपटाला लॉज्जिक नाहिच. चित्रपटातली सगळीच पात्रे केवळ रजनीकांतची नातेवाईक मंडळी असल्याने जिवंत राहतात अन्यथा त्यांच्या जिवंत राहण्याचे काहीही समर्थन नाही. स्वतः रजनीकांत ४ गोळ्या लागुन सुद्धा नंतर लिमलेट च्या गोळ्या खाल्ल्यासारखा निवांत बसलेला असतो. गॉडझिलाला भाले फेकुन मारल्यावर त्याला जेवढी मोठी बँडेड लावावी लागेल त्यापेक्षा थोडे छोटे बँडेज लावुन तो थोड्याच वेळात खदाखदा हसतो. तो हिरो असल्याने आणी बेसिकली तो रजनीकांत असल्याने इतपत चालुनच जायला हवे म्हणा.

चित्रपट अपेक्षेप्रमाणे आणि दाक्षिणात्य चित्रपटांच्या प्रथेला जागुन अतिशय बटबटीत आहे. शिवाय अतिशय रटाळ आणि संथ सुद्धा आहे. खरे सांगायचे तर चित्रपटात रजनीकांत वगळता काहिच नाही. अगदी राधिका आपटेला सुद्धा वाया घालवले आहे. इतकी "टॅलेंटेड"अभिनेत्री ती खरे म्हणजे पण पुर्ण निराशा करते. :)

थोडक्यात केवळ "पांडु"या थाटार "रजनी"असे ओरडायचे असेल किंवा देवघरात रजनी अण्णांचा फोटो लावलेला असेल किंवा ३ तास एसीत आणी अंधारात बसुन काही करायचे असेल (म्हणजे झोप काढणे, वामकुक्षी वगैरे वगैरे) किंवा जगातले सर्वात रद्दी चित्रपट बघायचेच असा पण केला असेल किंवा पैसे खुप वर आले असतील तर चित्रपट बघण्याचा कर्मदरिद्रीपण करण्यास हरकत नाही.

मग एक फर्मास परिक्षण लिहू शकाल का?

म्हणजे नाव चुकलंय म्हणा की...कबाडी पायजे होतं.

संदीप डांगे's picture

29 Jul 2016 - 3:41 pm | संदीप डांगे

रजनीकांत म्हणजे मूर्तिमंत स्टार व्हॅल्यू, पिरियड.

वेल्लाभट's picture

29 Jul 2016 - 4:16 pm | वेल्लाभट

देअर इज रजनी,
अँड देअर आर अदर्स.
- रजनीपंखा

पण बघीन की नाही ठाऊक नाही. वेळेअभावी दॅट इज. नो अदर रीजन.

कानडाऊ योगेशु's picture

30 Jul 2016 - 1:36 pm | कानडाऊ योगेशु

रजनी चे चित्रपट थेटरमध्ये जाऊन पाहणे हा दाक्षिणात्यांच्या बाबतीत एक स्टेटस सिम्बॉल कम एक फॅड झाले आहे. आणि सध्याच्या मार्केटींगच्या जमान्यात अश्या प्रकाराला इवेंटमध्ये बदलावयाला बरेच कमर्शियल फॅक्टर अगदी एका पायावर तयार असतात. हेच रजनीचे फॅन टी.वीवर फ्रिमध्ये रजनीचा एकतरी चित्रपट पाहतील का ह्याची शंकाच आहे. पण त्याच चित्रपटासाठी थियटरमध्ये गर्दी नक्कीच करतील.