रमन राघव २.०

अनिरुद्ध प्रभू's picture
अनिरुद्ध प्रभू in जनातलं, मनातलं
15 Jul 2016 - 4:35 pm

सामान्यतः समाजात चांगली आणि वाईट अशा दोन प्रव्रुत्तीची माणसं असतात असं मानतात. दोन्ही प्रव्रुत्तींचे रंग ही ठरलेले.....चांगल्यासाठी सफेद तर वाईटासाठी काळा. एवढ साध सरळ सोप असुनही आपण वर्गिकरण करण्यात चुकतो... बर्‍याच वेळा समोर असणारी व्रुत्ती ही फक्त चांगली वा वाईट एवढ्याच फरकात बसवता येत नाही किंबहुना ते ओळखणही खूप कठीण असतं. चांगला आणि वाईट, सफेद आणि काळा हे दोन्ही रंग जिथे एकमेकांना भिडतात तिथे अजुन एक छटा निर्माण होते....करडी(ग्रे शेड). कदाचित समोर दिसणारं करड्या छटेतलंही असु शकेल. काही प्रव्रुत्त्या, काही माणसं या ही छटेतली असतात...असु शकतात. समोर दिसणार तेवढच खर अस बर्‍याच वेळा नसतं. हेच पटवून देणारा चित्रपट.....रमन रघव २.०..
रमन राघव हा ७० च्या दशकातला एक सायको किलर. पण हा चित्रपट त्यावर नाही अशी स्पष्ट सुचना अगदी सुरुवातीलाच आपल्याला दिसते. रमन राघव हे नाव त्यात मिडिआने दिलेलं एक वलय आणि समोर ची सुचना...क्षणासाठी आपण गोंधळतो. तेवढ्यात चित्रपट सुरु होतो. ही कथा आहे ११ खूनांची, एका पोलिसाची आणि स्वतःला रमण म्हणनार्‍या एका माणसाची. आठ सलग भागांमधे ही कथा आपल्यासमोर येते. अगदी पहिल्या काही मिनिटांपासुन ते शेवटाच्या काही मिनिटांपर्यंत आपण भिती, चिड, राग, घ्रुणा या सगळ्याची सफर आपण या कथेबरोबर करतो. या रमणला त्याच्या राघवची तलाश असते. आठ भागात त्याचा राघवला शोधण्याचा आणि त्याला पोलिसांनी शोधण्याचा प्रवास आपल्यासमोर येतो. तस पाहिल तर त्या रमन राघवचा आणि या रमन काहिच संबंध नाही फक्त व्रुत्ती सोडली तर. पण ज्या पद्धतीनं अनुराग कश्यप आणि वसन बाला या द्वयींनी कथा- पटकथा बांधली त्याला पाहुन आपण काही काळ हे सर्व विसरुन जातो. कथेला एक वेग आहे आणी मध्यांतरापूर्वी आणि मध्यांतरानंतर त्याच वेगात ही कथा पुढे सरकते. त्यामुळे आपण नीट खिळुन असतो. दिग्दर्शक म्हणुन त्याला आपल्या लिखाणाचा फायदा झालाच आहे पण खरा प्रभाव चित्रपट पाहताना आपल्यावर जाणवतो. हे त्या द्वयींच यश आहे.
अभिनय या चित्रपटचा सगळ्यात मोठा महत्वाचा आणि प्रभाव टाकणारा भाग. हा चित्रपट कशासाठी पाहावा असा प्रश्न पडला उत्तर एकच...अभिनय. नवाझुद्दिन अभिनय करतो म्हणन्यापेक्षा तो प्रत्येक भूमिका जगतो हेच खर. रमनच ते सायको असणं त्याच्या डोळ्यात अक्षरशः दिसत. त्याच्या विरुद्ध पोलिसाच्या, राघवन च्या भूमिकेत असणारा विकि कौशल त्याला तगडी टक्कर देतो. लवशव ते चिकन खूराना किंवा मसान सारखे चित्रपट केल्यानंतर त्याच्या अभिनयत बदल जाणवतो. त्याला समांतर असणारी त्याची फिजिकल फ्रेंड सिम्मि शोभिता धुलिपला उत्तम उभी करते. या तिघांसोबत अम्रुता सुभाष असेल, अशोक लोखंडे असतिल, हर्श सिंग, राजेश जैस अगदी सगळे आपापल काम चोख बाजावतात. प्रत्येकात एक वेगळी अस्वस्थता अगदी चित्रपट संपेपर्यंत जाणवते..
अभिनय, कथा-पटकथेबरोबर संगीत हे सुद्धा एक महत्वाचं माध्याम या चित्रपटात मोठी भुमिका बजावतं. राम संपथच संगीत तेवढच भारदस्त. खिळवून ठेवणारं.. जो प्रभाव कदचित कथेनं वा पटकथेनं टाकला नसता तो संगीत आपल्यावर टाकतं. पार्श्वसंगीताचा प्रभाव आपल्यावर चित्रपटग्रुहातुन बाहेर पडल्यावरही काही काळ जाणवतो.यातच सर्व काही आलं. आरती बजाजची कात्री आणि जय ओझाचा कॅमेरा या दोघांकडे लक्ष द्यायला कथा-पटकथा आणि संगीत वेळच देत नाहीत.
एकंदरीत, काळ्या-सफेदातला फरक जो कदाचित आपण उघड्या डोळ्यानींसुद्धा पाहु शकत नाही पण तो आहे आणि हे सत्य आहे हेच हा चित्रपट सिद्ध करण्याचा उत्तम प्रयत्न करतो. त्याची सिद्धता ज्याच्या त्याच्या वैयक्तिक पातळीवर अवलंबुन आहे. फक्त अनुराग कश्यपचा आहे म्हणुन जर चित्रपट पाहत असाल तर तुमच्यासाठी हा चित्रपट आहेच पण तगडा अभिनय काय असतो, पटकथा-कथा-संगीत ही तिकडी काय परिणाम साधु शकतात हे पाहायचं असेल तर मात्र हा चित्रपट नक्किच पाहावा. अनुरागची रिस्क घेण्याची शैली आणि त्याच्यातला वेडेपणा हा चित्रपट पुन्हा एकदा सिद्ध करतो हे नक्की....

चित्रपटसमीक्षा

प्रतिक्रिया

रामण्णाची डोळ्यांभोवती तळवे दुर्बिणीसारखे ठेवून बघायची style आणि राघवचा डोळ्यांवरून कधीही न उतरणारा चष्मा - हा खतरनाक प्रकार आहे.

तिमा's picture

15 Jul 2016 - 6:13 pm | तिमा

रामन राघव घटना आम्ही त्यावेळी रोज वर्तमानपत्रातून वाचली होती आणि इतर सामान्य माणसांप्रमाणेच त्याला अजून पोलिस कसे पकडू शकत नाहीत, याची आम्हाला चीड असे. मराठी पेपरांत तरी 'रामन राघव' असेच नांव छापून येत असे.
हा चित्रपट आल्यावर त्या सर्व स्मृती जाग्या झाल्या. फक्त एक गोष्ट कळत नाही. चित्रपटांत व त्याच्या परीक्षणांत ज्या पोलिस इन्स्पेक्टरने त्याला पकडले ते वेगळेच नांव येत आहे. आमच्या आठवणीनुसार त्यावेळी मटा मधे इन्स्पेक्टर वाकटकरांचा फोटो आला होता व त्यांनीच रामन राघवला पकडले, असे ठळक छापून आले होते. मग आता त्यांचा उल्लेखही का नाही ?

अनिरुद्ध प्रभू's picture

15 Jul 2016 - 7:30 pm | अनिरुद्ध प्रभू

रमन राघव हा ७० च्या दशकातला एक सायको किलर. पण हा चित्रपट त्यावर नाही अशी स्पष्ट सुचना अगदी सुरुवातीलाच आपल्याला दिसते.

बोका-ए-आझम's picture

16 Jul 2016 - 10:28 am | बोका-ए-आझम

पकडण्यासाठी जो task force बनवला होता त्यात होते, किंबहुना त्याचे प्रमुख होते. पण मी स्वतः वाकटकरांच्या दक्षता मध्ये छापून आलेल्या लेखात इन्स्पेक्टर फियालोंनी रामन राघवना प्रत्यक्ष पकडलं हे वाचलंय. पुढचं interrogation वाकटकरांनी केलं असंही त्यात आहे. त्यावेळी मानवत हत्याकांडाचा छडाही वाकटकरांनीच लावला होता. हा लेख या दोन्ही प्रकरणांवर आहे. मानवतची समिंदरी आणि रामन राघव असं त्या लेखाचं शीर्षक होतं.

जयन्त बा शिम्पि's picture

15 Jul 2016 - 6:44 pm | जयन्त बा शिम्पि

चित्रपट पाहिला नाही , पण त्यावेळी सर्वत्र कशी घबराट निर्माण झाली होती ,त्याचे स्मरण झाले. लोखंडाच्या हुकने तो त्या वेळी बळी कसा घेत असावा , आणि तो सापडत कसा नाही याचीही आम्ही मित्रांमध्ये चर्चा करीत असू.

पद्मावति's picture

15 Jul 2016 - 11:58 pm | पद्मावति

मस्तं आहे परीक्षण.

मुक्त विहारि's picture

16 Jul 2016 - 9:46 am | मुक्त विहारि

मस्त.

भम्पक's picture

16 Jul 2016 - 10:38 am | भम्पक

खरे तर चित्रपट पाहतानाच मी या सिनेमाला का आलो हा प्रश्न पडला होता.परंतु संपल्यावर मात्र चित्रपटाने गरुड केले. नवाझ चा अभिनय अंगावर येतो. त्याच्या थंड आणि भेदक कृतीने आपणच दडपून जातो. त्याला जोड विकी कौशलची. पाहिल्यानंतर 2-3 दिवस मी चित्रपटाचाच विचार करीत होतो. खरे तर काहीच सुसूत्रता नाही , कश्याचा कश्याला ताळमेळ नाही परंतु नवाझ ची अन पोलिसांची मानसिकता सगळे भाग जोडून ठेवते.
खोलीतून सुटल्यावर भुकेला नवाझ जेव्हा एक बाईला स्वयमपाक करताना पाहतो तेव्हा तिला ठेचण्यासाठी दगड ज्या सहजतेने उचलतो अन खूप माणसे पाहिल्यावर दगड टाकून निघून जातो , निव्वळ लाजबाब.
राघव भेटल्याचा खुशीत आपणही राघव सारखा चष्मा घालावा म्हणून भरपूर पैसे देऊन पोरकट चष्मा रामन खरीदतो.
बहिणीचा नवरा सहज बोलता बोलता म्हणतो की बहिणीने तुझ्याबद्दल सांगितले आहे , तेव्हा हा त्याला परत परत तेच विचारतो काय सांगितले आहे तेव्हा मात्र अंगावर शहारा येतो.
असे एक ना अनेक वेग वेगळे भाग अंगावर अक्षरशः आदळत असतात आणि आपण त्याखाली गुदमरतो.
खरे तर असे प्रकार कोणीही हाताळत नाही पण अनुरागला दाद द्यावी लागेल .

जगप्रवासी's picture

16 Jul 2016 - 11:32 am | जगप्रवासी

पण परीक्षण लिहिताना चित्रपटातील एखाद्या सीन बद्दल किंवा डायलॉग बद्दल सांगून चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवू शकता जस भम्पक यांनी आपल्या प्रतिसादात लिहिलंय. बाकी नवाझच काम बघून अक्षरशः वेड व्हायला होत, हा माणूस ती भूमिका जगतो. त्याच्या डोळ्यातून, बोलण्यातून ती विचित्र झाक दिसत राहते, तो तोंडाने कमी आणि डोळ्याने, चेहऱ्याने जास्त बोलतो.

अनिरुद्ध प्रभू's picture

20 Jul 2016 - 9:43 am | अनिरुद्ध प्रभू

प्रतिक्रिया आणि सुचनांबद्दल धन्यवाद!!!

(नम्र)
अनिरुद्ध