कणकवली- सिंधुदुर्ग येथे ३१ जानेवारीला होणारया १० व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या २५ पानी अध्यक्षीय भाषणातील काही पाने काल आमच्या हाती लागली. त्या पानांचा गोषवारा तसेच तिथे मांडले जाणारे काही ठराव इथे देत आहे.
पान क्र. १.
आज दहाव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरुन बोलताना मला विशेष आनंद होत आहे. कष्टकरी समाज जो वंचित होता तो आता मुख्य प्रवाहात येण्यासाठी संघर्ष करत आहे. बाबासाहेबांच्या, फुल्यांच्या शाहूंच्या उपकारातून आपला समाज कधीच मुक्त होवू शकत नाही. आपण ज्या समाजातून वर आलो त्या कष्ट्करी समाजाचे प्रतीक म्हणून आपण ह्या संमेलनाचे उद्घाटन गाढव पूजनाने करतो. गाढव हे कष्टाचे प्रतीक आहे. ओझी वाहून ते पिचून गेले आहे. उच्चवर्णीयांची ओझी वाहताना आपले पूर्वज असेच पिचून गेले. त्याची आठवण आपल्याला सदा सर्वदा रहावी म्हणून आपण गाढव पूजनाने आपले संमेलन सुरु करतो.
त्यांच्या संमेलनाची सुरुवात ग्रंथ दिंडी तसेच दीप प्रज्वलनाने होते. आपल्याला ग्रंथ वाचायला मिळत नाहीत तसेच घरी खायला तेल नसते तर दिव्यात घालायल कुठून आणणार? त्यामुळे अश्या उच्चवर्णीय परंपरांचा हे संमेलन धिक्कार करत आहे…( टाळ्या…)
पान ५
संमेलन हा शब्द उच्च वर्णीयांच्या एका आता वापरात नसणारया भाषेतून आलेला आ्हे. त्यामुळे आपल्या वार्षिक समारंभाला संमेलन न म्हणता दुसरा शब्द सुचवा असे मी आपणा सर्वांना आवाहन करतो/ तसेच आपल्या लेखनात, बोलण्यात असे ह्या वापरात नसलेल्या, उच्चवर्णीयांनी ज्या भाषेत सगळे ज्ञान बंदिस्त करुन ठेवले त्या भाषेतील शब्द वापरु नयेत असे मी आपल्याला आवहन करतो.
विद्रोही चळवळीत अनेक लेखक कवी कादंबरीकार झाले आहेत. त्यांच्या लेखनातील असे ह्या भाषेमधून आलेले शब्द घालवून, त्याएवजी बोलीभाषेतील शब्द वापरुन, त्यांचे पुन्हा एकदा लेखन करण्याची गरज आहे. हे महान कार्य हाती घेण्यासाठी मी विद्रोही चळवळीतील तरुण लेखक-लेखिकांना हाक देत आहे.
पान ७
शुद्धलेखन म्हणजे काय? त्याचे नियम कोणी ठरवले? ते नियम आपण का पाळायचे? ह्याचा विचार करण्याची आता वेळ आली आहे. साजूक तुपातील शिरा खाता खाता, आपल्या घराच्या बागेत बसून ह्या उच्चवर्णीयांनी हे नियम बनवले. तेव्हा घराच्या खिडकीतून त्यांनी समोर नजर टाकली असता, त्यांना जेवढी काही पेठ , जिमखाना किंवा पार्क दिसला तेवढ्यांना समजेल असे नियम त्यांनी बनवले. ते आम्ही का शिकावे? शिकले तरी का पाळावे?
तेव्हा विद्रोही चळवळीच्या पुढ्च्या पिढीवर ही जबाबादारी मी अध्यक्षाच्या नात्याने टाकत आहे. तरुण पिढी असे नवीन नियम बनवेल आणि ते आपण अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी आंदोलन करु.
सध्या पुणेरी बोलीचा हिच प्रमाण भाषा बनवण्याचा एक कट शिजत आहे. बरेच लेखक इथं, तिथं, तिनं, त्यानं असे शब्द तसेच सागरनी केलं, मीनलनी सांगितलं असा जगावेगळा नी हा विभक्तीप्रत्यय आपल्या लेखनात वापरुन, ही पुणेरी बोली रुढ करु पहात आहेत. हा कट आपण हाणून पाडला पाहिजे.
अशी अनेक आव्हाने , विद्रोही चळवळीसमोर उभी आहेत. ती पेलण्यासाठी चळवळीतील सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे.
पान १७
अमेरिकेतील साहित्य संमेलनावर टीका करणे ही आता फॅशन झाली आहे. उच्च वर्णीय लेखकांनी ह्या संमेलनावर् टीका करुन प्रसिद्धी मिळवली. त्यांना खरेतर तिकडे जायचे होते. पण वयोमाना प्रमाणे जाउ न शकल्यामुळे आता टीका करुन ते प्रसिद्धी मिळवत आहेत. अश्या लोकांपासून सावध रहाण्याचा मी आपल्याला वडिलकीचा सल्ला देत आहे.
खरे तर अनेक उच्च वर्णीय लेखकांनी आपल्या लेकी- सुनांच्या बाळंतपणासाठीच्या तारखांप्रमाणे हे संमेलन ठरवले आहे. त्यासाठी शासनाच्या खर्चाने हे तिकडे जात आहेत. निमित्त मात्र संमेलनाचे आहे.
अश्या संमेलनासाठी २५ लाख देणारया शासनाचा हे संमेलन निषेध करत आहे.
पान २५
आपल्यासारखेच कष्टकरी जनतेतून वरती आलेले पण सध्या विद्रोही चळवळीशी फारकत घेतलेले प्रा. डॉ. आनंद यादव ह्यांची, त्यांच्या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होणे हा मी विद्रोही चळवळीचा विजय समजतो. ते फिरुन चळवळीत येतीलच ह्याची मला खात्री आहे.
जय साहित्य जय विद्रोह!
प्रा.डॉ.दंगाधर तानपावणे ह्यांना मी विनंती करतो की त्यांनी एक महत्त्वाचा ठराव मांडावा.
ठराव :
पाबळ येथे असलेली, मस्तानीची समाधी काही समाजकंटकांनी गुप्तधनाच्या अपेक्षेने उखडली. ह्या समाधीचे सरकारी खर्चाने पुन्हा बांधकाम करुन दिले जात आहे. मस्तानी म्हणजे शाहू महाराजांची सत्ता बुडवण्याचे कार्य करणारया उच्चवर्णीय राजाची प्रेयसी. अश्या उच्चवर्णीय राजाची एय्याशी त्याच्या मृत्यूनंतरही पुरवणारया शासनाचा हे संमेलन निषेध करत आहे.
जय साहित्य जय विद्रोह!
प्रतिक्रिया
24 Jan 2009 - 11:19 pm | आर्य
बाबासाहेबांच्या, फुल्यांच्या शाहूंच्या उपकारातून आपला समाज कधीच मुक्त होवू शकत नाही - या बाबत शंकाच नाही पण
यात मायावतींचा उल्लेख राहुन गेला, आजकाल यांचाही पुतळा याच रांगेत आहे.
आपण ह्या संमेलनाचे उद्घाटन गाढव पूजनाने करतो......हे नव्यानेच कळले, या विशेष माहिती बद्दल धन्यवाद.
बामसेफ चा अर्थ कोणी सांगु शकल का ?????? - मी हा शब्द फक्त भिंती वर वाचला आहे, मला याचा संबध लहानपणी झेंडूबामशी वाटायचा पण नंतर मी तो विद्रोही साहित्य संमेलनाशी लावला.
आपला अनभिज्ञ
28 Jan 2009 - 12:13 am | भास्कर केन्डे
पनवेलला २०००ते ०३ दरम्यान एक बामसेफ अधिवेशन झाले होते. उत्सुकतेपोटी व घराजवळच असल्याने मी त्याला आवर्जून हजेरी लावली होती. "शेंडी-जाणव्यावाले ढेरपोटे" हे विषेशन जवळपास प्रत्येक वक्त्याच्या तोंडी ऐकून व त्याच-त्याच द्वेषाधारित व मत्सरी भाषणांनी शेवटी कंटाळून काही प्रश्न उभे केले.
प्र: गोखल्यांपासून ते सावरकरांपर्यंत बहुतांश सगळ्याच तथाकथित उच्चवर्णीय नेत्यांनी सुद्धा जातीभेद नष्ट करण्यासाठी अथक परिश्रम केले. तसेच अनेक सामान्य ब्राम्हणांनी बाबासाहेबांच्या चळवळीला सक्रीय पाठिंबा व मदत दिली. तरी पण तुम्ही एकटाक सर्व ब्राम्हणांना शिव्या का घालता?
उत्तर: तू दिलेली उदाहरणे ही अपवादात्मक होत. मात्र सरसकट त्यांच्या समाजानेच आपल्या अनेक पिढ्या उध्वस्त केल्या. शिवाय त्या बामनी नेत्यांचा त्यात स्वार्थ होता, राजकारण होते, म्हणून त्यांनी तो देखावा केला. त्यांना माहित होते की काही वर्षात त्यांचा पूर्ण पाडाव होणार आहे म्हणून त्यांनी हुशारीने अशा खेळ्या केल्या.
प्र: समजा तुमचे म्हणने ग्राह्य धरले तरी मला हा प्रश्न पडतो... समजा माझ्या दणकट भावाने गरीब शेजार्याचे घर लुटले व म्हणून त्या शेजार्याचे व माझ्या भावाचे भांडण सुरु झाले आणि मी जर त्या शेजार्याच्या न्याय्य बाजूने होऊन भावाशी भांडू लागलो. अशा परिस्थितीत अन्यायग्रस्त शेजार्याचे माझ्या भावाशी भांडणे नैसर्गिक वाटते पण मी स्वतःचा फायदा सोडून शेजार्याला मदत करणे म्हणजे माणुसकीचे लक्षण नव्हे का? मग तोच न्याय तुम्ही तथाकथित उच्चवर्णियांना का लावत नाही?
उत्तर: तू म्हणतोस ते उदाहरण येथे पूर्णपणे लागू होत नाही. मी तुला सांगितले तसे त्यांचा पाडाव होणार होता म्हणून त्यांनी धूर्तपणे अधिच आपले मोठेपण दाखवण्यासाठी धूर्त खेळ्या केल्या.
प्र: बरं इतिहासाचं जाऊ द्या. समजा मी एका तथाकथित उच्चवर्णीयाच्या घरात जन्मलो. मात्र आज शिवाजी महाराज व सावकरांप्रमाणेच आंबेडकरांनाही माझे दैवत मानत असेल तसेच जातीची ओळख द्यायची नसेल तर मला तुमच्या स्वप्नातल्या समाजात काय स्थान आहे? (प्रेक्षकांमधून - ये खाली बस. इच्यायला.. खाली बस ये... मायला याच्या वडा रं ह्याला)
उत्तर: आपल्याला त्यांच्या घरा-घरांत अशीच तर पिढी निर्माण करायची आहे.
प्र: पण जर आपणे येथे असे त्यांच्यावर आगपाखड करत सुटलो तर ते आपल्या जवळ कसे येतील? (प्रेक्षकांमधून एव्हाना प्रचंड आरडा ओरड सुरु झाली होती).
उ: ती त्यांची गरज आहे. व आपली शक्ति पाहून ते नक्कीच आपल्या आश्रयाला येतील.
प्र: बरे मला महितीत असलेल्या एकाही तथाकथित ब्राम्हणाला शेंडी नाहिये. जाणव्याचे माहित नाही आणि ढेर्या सुद्धा सर्वसाधारण इथे असलेल्या लोकांप्रमाणेच आहेत....
गोंधळामुळे पुढे प्रश्न विचारायला जमले नाही. एक दोन संजस कार्यकर्त्यांमुळे माझी सुखरुप सुटका झाली.
या दरम्यान माझी अलिबागेतल्या एका प्राध्यपकांशी ओळख झाली. ते दलित चळवळीत एक नेते/कार्यकर्ते आहेत. त्यांचे मागच्या वर्षी औरंगाबादला एका मोठ्या कार्यक्रमात भाषण झाल्याचेही ऐकले. आमचे एकमेकांकडे जाणे येणे सुरु झाले. एकदा त्यांच्या घरी मुक्काम पडला असता चर्चेत टिळकांचा विषय निघाला. त्यांचे अगाध ज्ञान आणि त्यावरचा अंधविश्वास पाहून मी थक्क झालो. टिळक कसे दलित अत्याचाराचे पुरस्कर्ते होते हे त्यांनी पटवून द्यायचा प्रयत्न केला. त्यांच्या मते टिळकांना स्त्रीयांचा नाद होता व त्यांनी त्यासाठी अमुक-अमुक अत्याचार केले.... अर्थात त्यानंतर मी अजून त्या सरांचे तोंड पाहिले नाही.
आपला,
(अजात) भास्कर
28 Jan 2009 - 8:26 pm | कपिल काळे
मोठ्या धीराचा हो तू भास्करा!!
वाघाच्या जबड्यात हात घालूनच परतलास.
26 Jan 2009 - 1:18 am | स्वामि
आपल्या समाजातील लोकांना जर ब्राम्हणांच्या तोडीचे बनवायचे असेल तर त्यांचा तिरस्कार करणे अथवा त्यांनी केलेल्या सर्व गोष्टी नाकारणे असा होत नाही.अशा ठरावांमुळे जातीय तेढ वाढण्याशिवाय काहीही साध्य होत नाही.ब्राम्हणी अहंकाराला तुम्ही अशा प्रकारे लढा देउ शकत नाही.प.महाराष्ट्रातील(विषेशत:सांगली-सातारा येथील)देशस्थ ब्राम्हणांचे उदाहरण येथे घेण्यासारखे आहे.ते सुध्दा बहुजन समाजाबरोबर गावगाड्यात अडकलेले होते.परंतु गांधीवधाची सर्वात मोठी किंमत या समाजाने चुकवली.घरदार,जमीनजुमला एका रात्रीत हिरावला गेला.त्या मानाने पुण्यातील ब्राम्हण समाज जो पेशवाई पासून पुढारलेला व बहुसंख्य कोकणस्थ(चित्पावन)होता,तो स.गो.बर्वे (तत्कालीन जिल्हाधिकारी)यांच्या कॄपेमुळे सुऱक्षित राहीला.पुढील ५० वर्षात या देशस्थ समाजाने पुण्यातील चित्पावनांचे आवश्यक तिथे अनुकरण करीत आपली प्रगती साध्य केली.आज हाच सामाज जो एकेकाळी त्याच्या मातीतून उखडून टाकलेला होता,पुण्यात चित्पावनांच्या तोडीस तोड बस्तान बसवून आहे.विद्रोही साहित्यिकांनी इतिहासापासून धडा घेउन आपल्या बांधवांना तिरस्काराच्या नव्हे तर आत्मसन्मानाच्या वाटेने जाण्याची दिशा दाखवली पाहीजे.
26 Jan 2009 - 6:25 am | llपुण्याचे पेशवेll
माझ्या एका मित्राचे वडील म्हणत 'गांधीहत्येच्यावेळेला जर गावाबाहेर पडलो नसतो तर आयुष्यभर कुलधर्म कुलाचारच सांभाळत बसलो असतो. कुलधर्म सांभाळणे वाईट आहे असे नाही पण त्याही पुढे काहीतरी आहे हे कळणे तेव्हा महत्वाचे होते.'
पुण्याचे पेशवे
Since 1984
26 Jan 2009 - 12:34 pm | कपिल काळे
पेशव्यांचा उल्लेख आल्यावर, पेशव्यांचा प्रतिसाद त्याला साजेसाच.
आर्य- बामसेफ ही संघटना आरक्षणातून भरती झालेल्या सरकारी सेवकांची असून ती कांशिराम यांनी स्थापन केली आहे.
स्वामी जी आपले म्हणणे पटले . लेखाचा उद्देश तुम्ही योग्य शब्दात सांगितला आहे. पण
<<ब्राम्हणी अहंकाराला तुम्ही अशा प्रकारे लढा देउ शकत नाही>>
म्हणजे काय? उलट र.धो कर्वे, गोपाळकृष्ण गोखले , फुल्यांना शाळेसाठी रहाता वाडा देणारे कोण होते? मग अहंकाराचे लेबल का बरे लावले जाते?
27 Jan 2009 - 3:18 pm | मृगनयनी
गाढव हे कष्टाचे प्रतीक आहे. ओझी वाहून ते पिचून गेले आहे. उच्चवर्णीयांची ओझी वाहताना आपले पूर्वज असेच पिचून गेले. त्याची आठवण आपल्याला सदा सर्वदा रहावी म्हणून आपण गाढव पूजनाने आपले संमेलन सुरु करतो.
=)) =)) =))
हा शुद्ध गाढवपणा आहे!
हे विद्रोही... त्यांना रोज लागणारे दूध ही कदाचित त्यांच्या पूर्वजांचेच वापरत असावेत!
मस्तानी म्हणजे शाहू महाराजांची सत्ता बुडवण्याचे कार्य करणारया उच्चवर्णीय राजाची प्रेयसी. अश्या उच्चवर्णीय राजाची एय्याशी त्याच्या मृत्यूनंतरही पुरवणारया शासनाचा हे संमेलन निषेध करत आहे.
=)) =)) =)) =))
हे अतिइइइइइ होतंय!
आणि यांचं असंच जर म्हणणं असेल, तर शाहू महाराजांचे दुर्मिळ लिखाण, सम्भाजी राजांची दुर्मिळ कागदपत्रे वर्षानुवर्षे जपुन ठेवलेल्या "भान्डारकर प्राच्यविद्या इन्स्टीट्यूट" वर भेकड हल्ला करुन इतिहासाचे अतोनात नुकसान करणार्या तथाकथित शिवधर्मी, बी-ग्रेडी उपटसुम्भांबद्दल या "विद्रोही" जनांचे काय मत असू शकते? :-?
जय रामदास समर्थ ! जय दादोजी कोन्डदेव ! जय शिवराय !
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
27 Jan 2009 - 11:38 pm | भास्कर केन्डे
तथाकथित शिवधर्मी, बी-ग्रेडी उपटसुम्भांबद्दल या "विद्रोही" जनांचे काय मत असू शकते?
-- विद्रोही साहित्य संमेलनात वा बामसेफात मी कधीही यांच्याबद्दल वा मराठा समाजाबद्दल काही आगपाखड ऐकलेली नाही. मला वाटते "३% आपले काय वाकडे करणार" या अलिखित नियमानुसार त्यांची आगपाखड असते.
27 Jan 2009 - 5:24 pm | ऍडीजोशी (not verified)
ह. ह. पु. वा.
27 Jan 2009 - 6:24 pm | आम्हाघरीधन
जय रामदास समर्थ ! जय दादोजी कोन्डदेव ! जय शिवराय !
यात नेमका जयघोष तुम्हाला कुणाचा करायचा आहे ?
शिवरायान्चा नाही केलात तरी चालेल. इतर दोघान्चा जोराने चालु ठेवा. कारण सुर्य दाखवावा लागत नसतो.
दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.
28 Jan 2009 - 10:24 am | मृगनयनी
जय रामदास समर्थ ! जय दादोजी कोन्डदेव ! जय शिवराय !
यात नेमका जयघोष तुम्हाला कुणाचा करायचा आहे ?
शिवरायान्चा नाही केलात तरी चालेल. इतर दोघान्चा जोराने चालु ठेवा. कारण सुर्य दाखवावा लागत नसतो.
:-? "समर्थ रामदास स्वामी" आणि "दादोजी कोन्डदेव" हे दोघेही शिवरायांचे गुरुवर्य असल्याकारणाने, या तिघांचाही एकत्र जयघोष होणे, अपरिहार्य आहे.
आणि गोब्राह्मणप्रतिपालक क्षत्रियकुलावतंस बहुजनोद्धारक शिवराय हे संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत आहे. त्यामुळे खर्या इतिहासाला साक्षी ठेऊन "शिवरायांचा" जयघोष हा "समर्थ रामदास" आणि "दादोजी कोन्डदेव" या गुरुवर्यांबरोबर चिरंतन होत राहील.
दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.
»
आपण "मनाचे श्लोक" नित्यनेमाने वाचावेत, म्हणजे आपल्या दिसण्या आणि असण्यातील अंतर कायमचे नष्ट होईल. आणि "सूर्याचा" लख्ख, तेजस्वी प्रकाश आपल्याही डोळ्यांपर्यंत पोचू शकेल.
:)
जय रामदास समर्थ ! जय दादोजी कोन्डदेव ! जय शिवराय !
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
27 Jan 2009 - 7:47 pm | नाना बेरके
म्हणे, आपल्याला ग्रंथ वाचायला मिळत नाहीत तसेच घरी खायला तेल नसते तर दिव्यात घालायल कुठून आणणार?
- दररोज रात्री नवटाक लावायला ह्या डांबीसाकडे पैशे मोप असत्येत, म्हणे तेल कुठून आणणार ?
उच्चवर्णीयांची ओझी वाहताना आपले पूर्वज असेच पिचून गेले.त्याची आठवण आपल्याला सदा सर्वदा रहावी म्हणून आपण गाढव पूजनाने आपले संमेलन सुरु करतो.
- संमेलनाची सुरवात अध्यक्श्यांच्या पुजेनी कर. तो एक गाढवच बनला आहे, तुमच्यात येऊन. आणि संमेलन झाल्यावर तो तुमच्यावर दुगाण्याच झाडणार आहे, फोकलीच्यान्नो.
आपल्या वार्षिक समारंभाला संमेलन न म्हणता दुसरा शब्द सुचवा असे मी आपणा सर्वांना आवाहन करतो.
- अगोदर "आवाहन" ह्याला दुसरा शब्द तु सुचवून दाखव बोंब्ल्या ! मग संमेलनाचं बोल.
साजूक तुपातील शिरा खाता खाता, आपल्या घराच्या बागेत बसून ह्या उच्चवर्णीयांनी हे नियम बनवले.
- आता तू आपल्या घरातल्या हागनदारीत बसून * खाता-खाता सोताचे नियम बनंव, म्हन्जे तुला लई भारी ढेकर यील गड्या.
मस्तानी म्हणजे शाहू महाराजांची सत्ता बुडवण्याचे कार्य करणारया उच्चवर्णीय राजाची प्रेयसी.
- उकिरडे फुंकता, फुंकता विचाराचे काय दिवे लावतोय बघा. संमेलनाची सुरवात ह्याच्याच पुजनाने व्हायला पाहीजे.
27 Jan 2009 - 9:32 pm | कपिल काळे
ह्या लेखाचा उद्देश विद्रोही चळवळीचा , द्वेषाधारित आणि डळमळीत वैचारिक पाया दर्शवणे हा होता. मी कोणत्याही प्रकारे ह्या चळवळीशी संबंधित नाही. तसेच हा लेख मी २४ जाने ला लिहिला आहे. त्यात ३१ जाने ला होउ घातलेल्या संमेलनातील (काल्पनिक )भाषणाचा गोषवारा दिला आहे. एक विद्रोही संमेलन मी जवळून पाहिले होते. तेव्हा तेथील चर्चा ठराव कसे असतात ह्याची एक झलक दाखवणे एवढाच हेतू ह्या लेखनामागे आहे.
कळत नकळत कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास माफी चाहतो.
सगळ्या प्रतिसादकांना धन्यवाद.
27 Jan 2009 - 9:44 pm | स्वामि
कपिल काळे साहेब,आपण जी उदाहरणे दिलीत ती लोकोत्तर पुरुषांची दिलीत.सर्व अभिजन समाज हा कर्वे अथवा गोखल्यांसारख्या अद्वितीय विचारसरणीचा असेल अशी समजुत करुन घेणे हा भाबडे पणा किंवा एकांगी विचार झाला.अभिजन समाजात अशा नरपुंगवांची असंख्य उदाहरणे सापडतील कि जे आपण ह्या असामान्य पुरषांच्या जातीत जन्माला आलो(किंवा "ते" आपल्या जातीत जन्मिले)या एकमेव गुणविशेषावर आयुष्यभर इतरांना तुच्छ लेखतात.
27 Jan 2009 - 10:02 pm | कपिल काळे
गोखल्या कर्व्यांच्या व्यतिरिक्तही अनेक असे लोक आहेत की ज्यांनी बहुजन समाजासाठी तितकेच महान कार्य केले आहे. तुम्ही म्हणता ते काही अंशी सत्य असले तरी त्याचे सार्वत्रीकीकरण ( मराठीत जनरायलेझशन)करणे कितपत योग्य?