आत्ता एका धाग्यावर हा उल्लेख वाचला
हा मोगाखान निदान जसा आहे तसा दाखवतो. त्याच्यापेक्षा मुंह में राम बगल में छुरी असले लोक जास्त डेंजरस. वरनं संभावितपणाचा आव आणतात आणि आपणच मिपाचे हितकर्ते म्हणून बोंबा मारतात. स्वतः डझनावारी आयडी काढणारे आणि त्याचे सार्वजनिक वाटप करून सहकारी तत्वावर वापरणारे लोक आहेत. ते सुद्धा डुप्लिकेट आयडींच्या नावाने शिमगा करतात. ही मोठी गंमत आहे. कुठे सगळ्यांना तुम्ही पुरे पडणार आहात की प्रशांत/नीलकांत पुरे पडणार आहेत?
हे वाचले आणि प्रसून जोशी चे भाग मिल्खा भाग मधले "जिंदा है तो" गाणे आठवले -
कोयला काला है, चट्टानोंने पाला है| अंदर काला बाहर काला पर सच्चा है साला.!!
हे गाणे ऐकल्यापासूनच वरील ओळ मनात घर करून बसली होती. काही गाण्यांमध्ये अश्या काही गाण्यापलिकडील कविता असते.
उदा. प्र. के अत्रे यांची स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी
किंवा आता आता चींटू मध्ये संदीप खरेने लिहिलेले मोठी होतात मुलं, आई मोठी होत नाही यातीलच काही.
मी याला कवितेपलिकडील कविता म्हणतो. मूळ कविता कितीही मोठी, किंवा छान असली, तरी या अश्या एक एक ओळी त्या कवितेपलिकडे जातात.
मग म्हणले मिपाकरांना विचारूया त्यांना अश्या कोणत्या कविता आठवतात, की त्या ज्या कवितेमधून आल्या आहेत, त्या कवितेच्या पलिकडे कधीच पोचल्या आहेत. अट एकच आहे, की तुम्हाला कवितेमधील एकच ओळ सांगता येईल, जिने मूळ कवितेची सीमारेषा कधीच ओलांडली आहे.
प्रतिक्रिया
10 Jul 2016 - 8:55 pm | यशोधरा
कोणाचा काय तर कोणाचं काय.. पण मस्त धागा :) आत्ता आठवलेली ओळ
बात कुफ्र की, की हैं हमने...
10 Jul 2016 - 9:10 pm | अभ्या..
चायला कुणाला कशावरून काय आठवेल सांगता येत नाही.
मला मात्र जिस्म मधली आवारापन बंजारापन गण्यातली एक ओळ अशीच क्लिक झाली.
"खंजरसे हाथोंपे लकीरे कोई भला क्या लिख पाया"
10 Jul 2016 - 9:13 pm | रातराणी
सुट सुट झालं मन, धरू कसं पार्याला.
11 Jul 2016 - 4:28 pm | तुषार काळभोर
लव लव करी पातं या कवितेतली ओळ न् ओळ घट्ट धरून ठेवण्यासारखी आहे.
11 Jul 2016 - 5:00 pm | जगप्रवासी
एकदम मनातलं बोललात.
12 Jul 2016 - 6:18 pm | राजाभाउ
+१ अगदी अगदी.
10 Jul 2016 - 10:00 pm | आ युष्कामी
फिटावीत जगण्याची जरा तरी देणी,
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी
मलाही अत्यंत आवडलेली ओळ
10 Jul 2016 - 10:39 pm | नीलमोहर
दिसभर आसावलो एका कवडशासाठी
सांज ढळता ढळता उन्ह पोचलं दाराशी
ऐलतीर गाठतांना आले ध्यानी गेला धीर
पार पोचताच झाला ऐलतीर पैलतीर
11 Jul 2016 - 6:01 pm | आनन्दा
संदीप खरे खरेतर आवडतो तो याच कारणासाठी.. सहज साध्या शब्दात बोलता बोलता तो असे काही बोलून जातो कि विचार करायला वेळ अपुरा पडावा.
हा तर मास्टरस्ट्रोक आहे.
11 Jul 2016 - 6:02 pm | आनन्दा
फक्त ते असे आहे
पैलतीर गाठतांना आले ध्यानी गेला धीर
पार पोचताच झाला पैलतीर ऐलतीर
11 Jul 2016 - 7:30 pm | नीलमोहर
गडबडीत शब्दांची अदलाबदल झाली.
संदीप खरेच्या कविता साध्या सहज शब्दांत असतात म्हणूनच आवडतात.
अजून काही ओळी,
'जन्म बोंबले सांगा सांगा,
मृत्यू म्हणतो सांगीन सांगीन'
'कचर्याला मोल नाही, कुणी कसे खोल नाही
कसे हात जुळतील, समईत तेल नाही.'
11 Jul 2016 - 6:58 am | चांदणे संदीप
मन की किताब से तुम मेरा नाम ही मिटा देना
गुण तो न था कोई भी अवगुण मेरे भुला देना
- शैलेन्द्र
12 Jul 2016 - 11:42 am | नाखु
गाण आणि नैनोंमे बदरा हे दोन्ही जीवन्गाणी आहेत... दिवसातून कितीही वेळा ऐकली तरी आठवणीम्ची लड लागत राहते आणि गाणं आणि आठवण नव्याने दिसू लागतात. इतकं गारूड आणि दोन गाण्यांनी केलय्,तुज संग प्रीत लगाई सजना आणि जिहाले मस्ती या गाण्याने..
स्म्दीपभौ धन्यवाद...
11 Jul 2016 - 7:51 am | जयन्त बा शिम्पि
माझ्या मनात घर करुन बसलेल्या , अनेक ओळी आहेत, त्यामुळे क्रमवारी लावणे कठीण आहे , पण त्यातल्या त्यात " कसा सूर्य अंधाराच्या, वाहतो पखाली " , " गे मायभूमी तुझे मी, फेडीन पांग सारे , आणिन आरतीला , मी सूर्य चंद्र तारे " , पीक करपलं, पक्षी दूर देशी गेलं , जळणार्या झाडांसाठी , मन ओथंबलं , 'घन ओथंबून आले.... या गाण्यातील " आडोशाला साजण छैल छबिला , घन होवून बिलगला " या खूपच आवडतात.
11 Jul 2016 - 8:12 am | स्रुजा
सुंदर धागा.. कशावरुन काय निघालं.. हाहा
अनेक आहेत अशा कविता:
वोह अफसाना जिसे अन्जाम तक लाना न हो मुमकीन
उसे एक खुबसुरत मोड देकर छोडना अच्छा...
दोन ओंडक्यांची होते सागरात भेट
एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ
सुटे आज माझ्या सुखाचा उखाणा .. सुखाचा उखाणा ही कल्पनाच फार बोलकी आहे.
It's when things seem worst that you must not quit. ही एका ईंग्लिश कवितेतली ओळ पण अशीच डोक्यात घर करुन बसलेली आहे.
11 Jul 2016 - 5:59 pm | आनन्दा
हो.. खरेतर पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा हीच एक कविता आहे. पुढे आहे तो फक्त कल्पनाविस्तार.
तसे मला ते "चढता सुरज धीरे धीरे ढलता है ढल जायेगा" हे वाक्य पण खूप आवडते. उरलेले सगळे गाणे हा नुसता त्याचा विस्तार.
11 Jul 2016 - 10:31 am | आनन्दा
धन्यवाद.. आत्ता अजून एक ओळ आठवली. कुसुमाग्रजांची "किनारा तुला पामराला"
11 Jul 2016 - 4:45 pm | वटवट
तेरा तुझे मै सोप दु... कुछ्भी नहि अब मेरा....
लगेच मनात आलेली ओळ
11 Jul 2016 - 5:30 pm | मराठी कथालेखक
शायद उनका आखरी हो ये सितम...हर सितम ये सोचके हम सह गये...
11 Jul 2016 - 6:15 pm | वटवट
क्या ब्बात है....
11 Jul 2016 - 5:31 pm | मराठी कथालेखक
स्पर्शाचा वणवा का शब्दांशी अडला
11 Jul 2016 - 7:26 pm | बहुगुणी
हिंदीचं वावडं नसावं असं गृहीत धरून:
कैसर -उल -जाफरी यांच्या अनूप जलोटा, तलत अझीझ वगैरे अनेकांनी गायलेल्या "तुम्हारे शहर का मौसम बड़ा सुहाना लगे, मै एक शाम चुरा लूं अगर बुरा न लगे" या गझल मधील खालील दोन कडवी मला खूप भावतात
जो डूबना है तो इतने सुकून से डुबो
की आसपास की लहरों को भी पता न लगे
तुम्हारे बस में अगर हो तो भूल जाओ हमें
तुम्हें भुलाने में शायद हमें ज़माना लगे
11 Jul 2016 - 7:47 pm | नीलमोहर
मैंने दिल से कहा, ढूंढ लाना खुशी
नासमझ लाया गम, तो ये गम ही सही
कब मिली थी, कहाँ बिछड़ी थी, हमें याद नहीं
जिन्दगी तुझको तो बस ख़्वाब में देखा हमने
12 Jul 2016 - 3:31 am | एस
'तुका म्हणे होय मनाशी संवाद
आपुलाचि वाद आपणांसी...'
12 Jul 2016 - 12:41 pm | पैसा
मी माझा वैताग व्यक्त केला त्यातून तुम्ही तर छान धागा सुरू केलात! आवडली कल्पना.
माझी आवडती ओळ
"मरने की आरजूं में हम जी रहे हैं ऐसे
जैसे के लाश अपनी खुद ही कोई उठाए"
12 Jul 2016 - 12:46 pm | पांथस्थ
"आदमी" चित्रपटातील "आज पुरानी राहोसे..." ह्या गाण्यातील खालील कडवी -
----
जीवन बदला दुनिया बदली, मन को अनोखा ज्ञान मिला
आज मुझे अपने ही दिल में, एक नया इंसान मिला
पहुँचा हूँ वहाँ, नहीं दूर जहाँ,
भगवान भी मेरी निगाहों से...
---
अश्या अनेक सुगंधी शब्दांच्या आठवणी आहेत. इथे देईनच.
ह्या धाय्ग्याबद्दल अनेक धन्यवाद!
12 Jul 2016 - 12:55 pm | पांथस्थ
आरती प्रभू यांच्या कवितेच्या काही ओळी -
१. पाण्यांत ओंजळीच्या आला चुकून मीन
चमकून हो तसाच गाण्यांत अर्थ यावा
२. तारांवरी पडावा केव्हा चुकून हात:
विस्तीर्ण पोकळीचा गंंधार सापडावा.
३. आता मनाचा दगड घेतो कण्हत उशाला
होते कळ्यांचे निर्माल्य आणि पानांचा पाचोळा
............
12 Jul 2016 - 1:04 pm | एस.योगी
है मिठी उलझन बैरी अपना मन
अपनाही होके सहे दर्द पराये .....
__/\__
12 Jul 2016 - 1:12 pm | यशोधरा
| जो जे वांछील तो ते लाहो | प्राणिजात ...
12 Jul 2016 - 1:21 pm | स्पा
बुवाच्या अनेक कविता सकाळी आठवतात
12 Jul 2016 - 1:22 pm | धनंजय माने
मोठ्या लोकांचा त्रागा देखील कसा समाजाच्या हिताचा असतो पाहिलात ना मंडळी?
(मोठ्यांनी हलके घ्यावे)
12 Jul 2016 - 2:16 pm | सिरुसेरि
१. गेली सांगुन ज्ञानेश्वरी .. मानसापरास मेंढरं बरी..
२. चल रं वाघ्या रडु नको पाया कुनाच्या पडु नको ..
12 Jul 2016 - 5:19 pm | जयन्त बा शिम्पि
साहिर लुधियानवी च्या रचनेत ही ओळ मला फारच आवडते
" वो अफसाना जिसे अंजामपर , लाना ना हो मुमकिन,
उसे एक खुबसुरत मोड , देकर भूलना अछ्छा ,
चलो एक बार फिरसे , अजनबी बन जाये हम दोनो "
यातील खुबसुरत मोड ही कल्पनाच एव्हढी भन्नाट आहे कि,आपल्या दोघांना वेगळं व्हावे लागणार असेलच , तर कोणतीही कटुता न येता , आहे त्या वस्तुस्थितीला सामोरे जात वेगळं होवू या ! आणि प्रत्यक्ष गाणे कानावर येते ,तेंव्हा त्याची नजाकत तर आणखीच छान आहे.
12 Jul 2016 - 7:04 pm | मराठी कथालेखक
गाणं चांगल आहे पण दुर्दैवाने ते महेंद्र कपूरच्या आवाजात ऐकावं लागतं
12 Jul 2016 - 9:29 pm | जयन्त बा शिम्पि
महेन्द्रकपूरच्या आवाजात हे दुर्दैव कसे , हे समजले नाही , क्रुपया समजावून सांगाल काय ? आभारी राहीन.
13 Jul 2016 - 5:09 pm | मराठी कथालेखक
आता त्यात न समजण्यासारखे काय आहे ? अत्यंत वाईट आवाज या तथाकथित गायकाचा , बी आर चोप्रा , मनोजकुमार यांना हा गायक मात्र भलताच आवडायचा म्हणा.
12 Jul 2016 - 11:03 pm | चांदणे संदीप
ऐकायचय/वाचायचय, का ते?
Sandy
12 Jul 2016 - 6:50 pm | राजाभाउ
मस्त धागा. मला नेहमीच आश्चर्य वाटत या कवी लोकांच कि नेहमी बघण्या, बोलण्यातल्या गोष्टींमध्ये यांना काहीतरी नविनच दिसतं म्हणजे उ.दा. संदिप खरेंच्या या ओळी
याच्या पाण्याची वाफ किमान चारदा तरी आकाशाला भिडुन आलेली
आता लाटाच नव्हे तर पाणीसुद्धा नव आहे कदाचित
तरीहि सरोवराला जुन्याच नावान ओळखतायत सारे.
दुस्री संदिप खरेंचीच "अजुन उजाडत नाही ग" मधील काही ओळी (हि पुर्ण कविताच मला खुप आवडते).
क्षणात विरती अवघे पडदे, लख्ख काहि चमचमते ग
ती कळ वितरे हुरहुर उरते, अन पिकण्याची घाई ग
वरवर सारे लिंपुन काही आतुन उमगत नाही ग
त्यातिल ते "अन पिकण्याची घाई ग" हे जाम भारी आहे
12 Jul 2016 - 11:27 pm | नीलमोहर
दशकामागून सरली दशके
अन् शतकाच्या गाथा ग!
ना वाटांचा मोह सुटे वा
ना मोहांच्या वाटा ग!
पथ चकव्याचा, गोल,सरळ वा
कुणास उमगत नाही ग
प्रवास कसला? फरफट अवघी!
पान जळातून वाही ग...
कधी वाटते 'दिवस'-'रात्र' हे
नसते काही असले ग
त्यांच्यालेखी रात्र सदाची
ज्यांचे डोळे मिटले ग
स्पर्श आंधळे. गंध आंधळे. भवताली वनराई ग
तमातली भेसुर शांतता... कानी कूजन नाही ग...
अजुन उजाडत नाही ग!
अजुन उजाडत नाही ग!
13 Jul 2016 - 5:26 pm | पुंबा
अहाहा...! इतकं छान लिहून सुद्धा संदीपच्या नशिबी प्रस्थापीत कवी आणि सो कॉल्ड उच्च्भ्रूंकडून अवहेलनाच का आहे ते कळत नाही.. कदाचीत लोकप्रिय असण्याची किंमत त्याला चुकवावी लागत असावी. त्याच्याच 'मी हजार चिंतांनी हे डोके...' या कवितेतील, मी डाव रडीचा खाअत जिंकतो अंती, तो स्वच्छ मोकळ्या मुक्त मनाने हरतो ही ओळ अशीच कवितेच्या अवकाशाला ओलांडून अधिकच उदात्त होते.
12 Jul 2016 - 6:54 pm | पद्मावति
अतिशय सुरेख धागा. वाचायला मस्तं वाटतंय.
12 Jul 2016 - 11:11 pm | समीर_happy go lucky
अतिशय सुरेख धागा. वाचायला मस्तं वाटतंय (+1)
12 Jul 2016 - 11:37 pm | राघव
मस्त धागा..!!
अनेक ओळी आहेत.. काही कवितांमधल्या.. काही गाण्यांतल्या.. काही कोट्स..
- "नाही चिरा नाही पणती.."
- "कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी.. सदियों रहा है दुष्मन दौर-ए-जनां हमारा"
- "प्रभाते मनी राम चिंतीत जावा.."
- "ग्लास अर्धा भरला आहे असंही म्हणता येतं.."
- "मनांतले सल रुजून आता त्यांचा झाला मरवा रे.."
- "पर्दा नही जब कोई खुदासे बंदोंसे पर्दा करना क्या.."
- "ये मेरे सपने यही तो है अपने.. मुझसे जुदां ना होंगे इनके ये साएं.."
- "स्वप्नांतल्या सुखांचा स्वप्नीच वेध घ्यावा.."
- "ज्योतीकलश छलके..."
- "ये वो बदकिस्मत मां है जो बेटों के सेज पे लेटी है.."
- "Simplicity is the most complicated thing to achieve.."
- "Start from where you are, with whatever you have, make something of it & never be satisfied!"
- "मीही तोच तीच तूही.. प्रीती आज ती कुठे.." & "वाळल्या फुलांत व्यर्थ गंध शोधतो पुन्हा.."
- "टूंटा जिस तारे पे नजर थी हमारी.."
- "मै जानतां हूं के तू गैर है मगर यूंही..."
- "तुम कहो तो मांग लू मै आज कुछ रब से.."
असे अनेक.. आणखी आठवलेत की सांगतो.. :-)
- "नाही चिरा नाही पणती.."
- "कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी.. सदियों रहा है दुष्मन दौर-ए-जनां हमारा"
- "प्रभाते मनी राम चिंतीत जावा.."
- "ग्लास अर्धा भरला आहे असंही म्हणता येतं.."
- "मनांतले सल रुजून आता त्यांचा झाला मरवा रे.."
- "पर्दा नही जब कोई खुदासे बंदोंसे पर्दा करना क्या.."
- "ये मेरे सपने यही तो है अपने.. मुझसे जुदां ना होंगे इनके ये साएं.."
- "स्वप्नांतल्या सुखांचा स्वप्नीच वेध घ्यावा.."
- "ज्योतीकलश छलके..."
- "ये वो बदकिस्मत मां है जो बेटों के सेज पे लेटी है.."
- "Simplicity is the most complicated thing to achieve.."
- "Start from where you are, with whatever you have, make something of it & never be satisfied!"
- "मीही तोच तीच तूही.. प्रीती आज ती कुठे.." & "वाळल्या फुलांत व्यर्थ गंध शोधतो पुन्हा.."
- "टूंटा जिस तारे पे नजर थी हमारी.."
- "मै जानतां हूं के तू गैर है मगर यूंही..."
- "तुम कहो तो मांग लू मै आज कुछ रब से.."
असे अनेक.. आणखी आठवलेत की सांगतो.. :-)
13 Jul 2016 - 12:28 am | पद्मावति
खींच दो अपनी खून से ज़मीं पर लकीर
इस तरफ़ आने पाये ना रावण कोई
तोड़ दो हाथ अगर उठने लगे
छूने पायेना सीता का दामन कोई
राम तुम तुम्हिहो लक्ष्मण साथियों
अब तुम्हारे हवाले वतन साथीयों
13 Jul 2016 - 12:34 am | पद्मावति
सॉरी...
हा धागा कावितेचाच आहे बहुतेक...मी हिंदी सिनेमागीत टाकलं चुकुन:(
माझं आवडतं गाणं आहे म्हणून उत्साहाच्या भरात लिहिलं...
18 Jul 2016 - 5:33 pm | आनन्दा
नाही. मी दिलेली उदाहरणे तर सिनेमातीलच आहेत. पण त्या गाण्यातील काही भाग त्या गाण्याच्या कक्षेपलिकडे जाऊन काहीतरी सांगायला लागतो, आणि मगे ते शब्द त्या गाण्यापेक्षा मोठे होतात.
अशी गाणी आणि असे शब्द मी शोधत आहे.
13 Jul 2016 - 12:59 am | जयन्त बा शिम्पि
ये साथ गुज़ारे हुए लम्हात की दौलत
जज़्बात की दौलत ये ख़यालात की दौलत
कुछ पास न हो पास ये सौगात तो होगी
बीते हुए लम्हों की ...
13 Jul 2016 - 1:14 am | मोदक
जगी घाण अन चिखलची सारा.. म्हणो कितीही कुणी शहाणा
पदोपदी मज कमळ घालते.. गुणगंधाचा नवा उखाणा.
बाकीबाब.
__/\__
13 Jul 2016 - 1:43 am | हेमन्त वाघे
Kill one man, and you are a murderer.
Kill millions of men, and you are a conqueror.
Kill them all, and you are a god
Original from Jean Rostand - Used in a song
-----------------------
We are all just prisoners here of our own device
Eagles - Hotel California
-----------------------
You lock the door
And throw away the key
There's someone in my head but it's not me.
Pink Floyd - Song Brain Damage from Dark Side Of The Moon
-------------------------
And if the band you're in starts playing different tunes
I'll see you on the dark side of the moon
Pink Floyd - Song Brain Damage from Dark Side Of The Moon
-----------------------------------------
Nothing Else Matters
Metallica
-----------------------
Dreaming in Colour Living in Black and White
Billi Ray Cyrus
------------------------------
The ringing of the division bell had begun
Pink Floyd - The Division Bell
--------------------
Well, it seems like I've been playing your game way too long
And it seems the game I've played has made you strong
Bruce Springsteen - Trapped
------------------------------
But it was only a fantasy
The wall was too high as you can see
No matter how he tried he could not break free
Pink Floyd - Hey You
------------------
if life is just a highway, then the soul is just a car
And objects in the rear view mirror may appear closer than they are
Meatloaf
-------------------
Turn around, I'll be two steps behind you
Def Leppard - 2 steps behind
---------------------
Let's get rocked !
Def Leppard
------------
We will we will rock you !
Queen
----------------------
Sometimes I feel I'm gonna break down and cry, so lonely
Nowhere to go, nothing to do with my time
I get lonely, so lonely, living on my own.
Sometimes I feel I'm always walking too fast, so lonely
And everything is coming down on me, down on me, I go crazy
Oh so crazy, living on my own.
Queen - living on my own
----------------------
Comfortably Numb
Pink Floyd
----------
Your lips move but I can't hear what you're saying
Pink Floyd - Comfortabaly Numb
-----------------
And silence that speaks so much louder than words
Pink Floyd - The Division Bell
13 Jul 2016 - 5:19 pm | पुंबा
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे.. ही भय इथले संपत नाही या ग्रेस यांच्या कवितेतील ओळ आपण म्हणालात त्या प्रकारची वाटते.
13 Jul 2016 - 5:30 pm | पुंबा
अदम गोंडवी यांची 'आप केहते है सरापा, गुलमहर है जिंदगी' या कवितेतील खालील ओळ...
चार दिन फूटपाथ के सांये मे रहकर देखीये
डूबना आसान है आंखो के सागर मे जनाब..
14 Jul 2016 - 2:26 pm | जयन्त बा शिम्पि
अछ्छा , असे आहे तर ? जावू द्या , शेवटी " पसंद अपनी अपनी , खयाल अपना अपना " विषय संपला.
18 Jul 2016 - 9:08 pm | सस्नेह
..कुछ रीत जगतकी ऐसी है, हर एक सुबहकी शाम हुई
तू कौन है क्या है नाम तेरा, सीताभी यहाँ बदनाम हुई..