समाधान !

खेडूत's picture
खेडूत in जे न देखे रवी...
18 Jun 2016 - 1:18 pm

कविता हा आधीच औघड प्रकार, त्यात मीटर वगैरे सांभाळायचं म्हणजे कठीणच !
पण म्हणून कुणी प्रयत्न करूच नये की काय?
तरी जिलबी गोड मानून घ्यावी ही विनंती …!

***

होती अमुची प्रिया एक ती
आमची मंजे कंपनीची
सदैव वाटे तिजला कांही
नविन करावे प्रतिमासी

कधी कनेक्टे हार्ट आमुचे
कधी पॉलीस्यां अपडेटवी
तसा एकदा सर्व्हे केला
'समाधान सर्वेक्षण' म्हणुनि !

मनात नसता भाग घेउनि
सारे प्रतीसादून आले
सर्व्हे झाला पटपट आणिक
सार निघाले हो झटपट

स्वमनिचे निष्कर्ष घेऊनि
छान छान पी पी टी सजवून
आली हो ऐटीत पुण्याला
प्रिया विमानी त्वरित बसून

सगळ्यांना गोळा करूनि
पोपटपंची झाली करून
सगळे आपण कित्ती ह्याप्पी
दमली नाही सांगून सांगून

वेगवेगळे वयोगट ते
मुले मुली अन बाप्पेही
असोत अनुभवी वा नवखे
सारेच कसे ते ह्याप्पी-ह्याप्पी

विचारते झाले मग तिजला
अडचणीचे ते प्रश्न असे
सर्वे होता खराच न्युट्रल?
का मागितले लॉगिन असे ?

सांग आम्हाला हेतू आतले
कुणि बनविले प्रश्न यातले
असे प्रश्न का ज्याचे उत्तर
येईल तुझिया मनासारखे?

दमली बिचारी देऊन उत्तर
पळती झाली ट्याब घेऊनि
ल्लूलू ऊउऊऊउ ऊऊ.......!
''विल बी ब्याक टु यू'' म्हणूनि

तेच जाहले चेन्नईत अन
तसेच काही बंगळुरी
'कुठून केला सर्व्हे 'झाले
गेली वैतागूनि अगदी

फुडच्या म्हैन्यातच गेली
प्रिया बिचारी कंपनी सोडून
लीन्क्डीनवरती आता कळले
गेली ती तिथुनीही निघून

कंपनी शिकली एकच यातून
प्रकार असले बंद करून
समाधान जे मनी वसे ते
सर्व्हेने का येई कळून ?

(जिल्बूत) १८/६/२०१६

कविता माझीभूछत्रीरतीबाच्या कवितावाङ्मयशेतीकरुणसमाजजीवनमाननोकरीमौजमजा

प्रतिक्रिया

रातराणी's picture

18 Jun 2016 - 1:28 pm | रातराणी

भारीये! जिलबी म्हणवत नाही!

अभ्या..'s picture

18 Jun 2016 - 2:28 pm | अभ्या..

मस्तच जमलीय की,
ल्लूलू ऊउऊऊउ ऊऊ.......! करनारी प्रिया आवाडली. ;)

सस्नेह's picture

18 Jun 2016 - 2:45 pm | सस्नेह

प्रिया आज तुमची नसे सर्व्हे घ्याया...!!

पद्मावति's picture

18 Jun 2016 - 6:01 pm | पद्मावति

मस्तं!

एस's picture

18 Jun 2016 - 8:52 pm | एस

छानेय कविता! :-)

अत्रुप्त आत्मा's picture

19 Jun 2016 - 11:46 am | अत्रुप्त आत्मा

दमली बिचारी देऊन उत्तर
पळती झाली ट्याब घेऊनि
ल्लूलू ऊउऊऊउ ऊऊ.......! http://www.sherv.net/cm/emo/laughing/pointing-and-laughing.gif
''विल बी ब्याक टु यू'' म्हणूनि
http://www.sherv.net/cm/emo/laughing/yahoo-animated-laughing-smiley-emoticon.gif
बालिका आठवली!

वाचक आणि प्रतिसादकांचे आभार !
@रातराणी : धन्यवाद .
पहिलाच प्रयत्न असल्याने 'एकूण असा प्रकार झाला तर ' अशा प्रतिसादाचीही तयारी होती. :)
नवकवींची पावलं अडखळतच पडतात म्हणे.

अभ्याशेठ, ल्लूलू ऊउऊऊउ ऊऊ....ची पेर्णा गुर्जीकडून घेतली तरी खफवर केलेले दुत्त दुत्त हे आपले काव्य समोर होतेच.

टवाळ कार्टा's picture

19 Jun 2016 - 12:18 pm | टवाळ कार्टा

=))

नाखु's picture

21 Jun 2016 - 4:17 pm | नाखु

असा(ही) प्रकार झाला तर....

बाकी संप्रेरणा भारी आहे.

वाचक नाखु