अशावेळी तुम्ही काय कराल

कोंबडी प्रेमी's picture
कोंबडी प्रेमी in काथ्याकूट
29 May 2016 - 6:40 am
गाभा: 

शेजारी कम मित्र गावाला जातांना म्हणाला माझ्या सार्थी गाडीची किल्ली देईल ती ठेऊन घे प्लीज - अस्मादिक ओके म्हणाले
नंतर विचारले किती दिवस ? तर उत्तर आले ५-७ - हे हि ठीक

५-६ दिवसांनी सारथी फोन करता झाला,
सा : कल सुबह साहब अने वाले ही मै चाबी लेके जाऊंगा.
मी : ठीक है कब आओगे ?
सा : रात को ८ /९ तक
मी : ठीक, फोन करके आना
रात्रौ ८ वाजता
मी : कब आओगे ?
सा: मुझे देर होगी १० ११ बजेंगे
मी : १०:३० मै सो जाऊंगा जल्दी आओ
सा : नाही तो मै सुबह ४ बाजे आऊंगा
मी : आपका दिमाग खराब हुवा है क्या ? इतने सुबह मै सोता हुं
सा : हा हा हा

११३० ला मित्राला sms केला कि किल्ली अद्याप नेलेली नाही (उद्देश हा कि त्याने अन्य पर्याय तयार ठेवावा )
त्यानंतर रात्री १.३० ला डोर बेल वाजवली , मागून मोबाईल वर १:४२ ला फोन त्यानंतर इंटरकॉम वर फोन हाच प्रयोग २ ४० ला आणि सकाळी ४ वाजता,

मी कशालाच उत्तर दिले नाही

त्यात सकाळी ३ ला मित्राचा sms कि सारथ्याला ४ वाजता किल्ली दे म्हणून.

झोपेचे खोबरे आणि अत्यंत बेजबाबदार वर्तणुकीचा मनस्ताप.

अशावेळी तुम्ही काय कराल ?

प्रतिक्रिया

किल्ली हरवली असेही सांगितले तरी चालेल.

योगी९००'s picture

29 May 2016 - 7:53 am | योगी९००

उद्देश कळला पण लेखात बर्‍याच गोष्टींचा लिंक लागला नाही..

माझ्या सार्थी गाडीची किल्ली देईल ती ठेऊन घे प्लीज
किल्ली देईल असे म्हणले आहे मग मागायला कसा आला?


सा : कल सुबह साहब अने वाले ही मै चाबी लेके जाऊंगा.
मी : ठीक है कब आओगे ?
सा : रात को ८ /९ तक

कल सुबह आने वाले ही मै असे सारथी म्हणाला आणि त्याला तुम्ही विचारले केव्हा तर त्याचे उत्तर रात्री ८/९ वाजता ...हे जरा पटलं नाही.

पण किल्ली ठेवायला आला असेल तर दरवाजाबाहेर ठेव असे म्हणावे आणि मागायला आला असेल तर वॉचमनकडे देऊन ठेवावी. किंवा दोन्ही केसेस मध्ये वॉचमनला वापरावे.

अहो, त्यांनी रागानं लिहिलय हो, म्हणून तसे टंकायचे राहिले. सारथी आला, किल्ली देऊन गेला. त्यानंतर साहेब येण्याच्या आदल्या दिवशी त्याने किल्ली घेण्यासाठी फोन केला. तो रात्रीच किल्ली घेऊन जाणार होता व अर्ली मॉर्निंग साहेब येणार असतील त्याला तो सुबह म्हणाला.
वॉचमनची मदत घेण्याचा पर्याय पटला पण यात वॉचमनला डुलक्या काढायला मिळणार नसल्याने त्याने तो कितपत स्विकारला असता हा प्रश्न आहे. ;)

कोंबडी प्रेमी's picture

29 May 2016 - 1:03 pm | कोंबडी प्रेमी

शब्दश: खरंय

रेवती's picture

29 May 2016 - 8:07 am | रेवती

असे हिंदी भाषिक लोकांशी मैत्री करण्याआधी तेलुगु लोकांशी मैत्री करावी. ते दिलेल्या वेळेच्या नंतर निवांत तीन ते चार तासानी उगवतात. स्वारी वगैरे म्हणत नाही. किंबहुना काही वावगे केलेय असे त्यांना वाटतच नाही. या लोकांची सवय करून घ्या. मग दुनियेतल्या कोणत्याही लोकांबद्दल तुम्ही तक्रार करू शकणार नाही. तुमच्या लेखनात कितीतरी चांगल्या गोष्टी आहेत. जसे, सारथ्याने गाडीची किल्ली घेऊन जातो म्हणून व येण्यास उशीर होईल म्हणून फोन तरी केले. एकदा किल्ली न्यायचीच असे ठरवल्यावर कोणताही पर्याय वापरायचा ठेवला नाही. तुम्ही डोअर बेलला सामोरे गेला असतात तर बाकीची रात्र झोप तरी झाली असती. त्यातल्यात्यात आपला फायदा पाहणे.
तात्पर्य- काही वेळा इलाज नसतो. तुम्ही पुढीलवेळी तंबी दिलीत तरी ते असेच वागणार असतात. आपल्या मनातून त्यांना दूर ठेवा. प्रवचन संपले. ;)

कोंबडी प्रेमी's picture

29 May 2016 - 1:04 pm | कोंबडी प्रेमी

हा तेलुगु अनुभवच आहे

अय्या! हा उपप्रतिसाद वाचायचा राहिला होता. धन्यवाद.
तुम्ही कोंबडी प्रेमी ऐवजी कोंबडा प्रेमी असा आयडी घेतला असतात तर पहाटेला उठताना इतका त्रास वाटला नसता असे विनोदाने सुचवते. ;)
तेलुगु व रात्र, अपरात्र यांचा काय संबंध आहे माहित नाही. आमच्या समोरील तेलुगु कुटुंब सगळे सण दारात रांगोळ्या घालून साजरे करतात (त्यास काही हरकत नाहीये) पण दरवेळी सत्राशे साठ लोक्स बोलावून, जेवणावळी घालून आलेल्या पाहुण्यांबरोबर रात्री बारा, साडेबारा अशा घराबाहेर गप्पा का मारतात कोणास ठाऊक? वैताग नुसता! उन्हाळ्यात असे लुंगीधारी गप्पांचे गट नेहमी दिसतात. हे झाले पुरुषांचे! समानतेच्या युगामुळे बायकाही यात मागे नाहीत. उन्हाळ्यात दररोज रात्री साडे दहा, अकरा वाजले की चार ते पाच तेलुगु महिला जोरजोरात गप्पा मारत वॉक घेतात. कित्येकदा झोप लागून तासभर झालेला असतो तर कधी झोपायला थोडा उशीर झाल्याने झोप लागता लागता जाग येते इतक्या मोठ्याने हसत जातात. अशावेळी काय करावे समजत नाही. बरे तर बरे या सगळ्या महिला आयटीत कामे करतात. या झोपतात कधी, उठतात कधी कोणास ठाऊक! चला आजची नावे ठेवून झाली. जाते.

मृत्युन्जय's picture

13 Jun 2016 - 2:35 pm | मृत्युन्जय

उन्हाळ्यात असे लुंगीधारी गप्पांचे गट नेहमी दिसतात. हे झाले पुरुषांचे! समानतेच्या युगामुळे बायकाही यात मागे नाहीत.

बायका लुंगी घालतात? असेल असेल. पण थोडे विचित्र दिसत असेल नाही?

टवाळ कार्टा's picture

13 Jun 2016 - 3:06 pm | टवाळ कार्टा

विचित्र कि आणखी कसे ते पहाणार्याच्या दृष्टीवर अवलंबून आहे ;)

लुंगी ड्यांसमध्ये ती दिपिका कशी दिसते तशा साधारणपणे सगळ्या दिसतात.
(करा चेष्टा गरिबाची!) ;)

तुम्ही पुण्यातले दिसता

मुक्त विहारि's picture

29 May 2016 - 10:35 am | मुक्त विहारि

हा किस्सा बायकोला पण सांगायचा आणि मग प्लॅन करायचा.

पुढच्यावेळी करायचे उपाय.

शेजारी किल्ली द्यायला आला की, त्याला आधी घरात घ्यायचे.

आपण : या.खूप दिवसांनी आलात.

शेजारी : मैं जरा बाहर जा रहा हूं.

आपण : अरे व्वा!!! मस्तच.कुठे? (त्याने कुठली भाषा वापरो.आपण मराठीची कांस सोडायची नाही.गरज त्याला आहे.आपल्याला नाही.)

शेजारी : तो झक मारत गावाचे नांव सांगेलच. उदा. बडोदा.

आपण : अरे मस्तच.बडोद्याला आमचा पण एक मित्र राहतो.बरेच दिवस त्याच्याकडे जाईन म्हणत होतो.बडोद्याला पेढे मस्त मिळतात. (तो आग्रा म्हणाला तर लगेच आग्र्याचे पेठे, मद्रास-हैद्राबाद म्हणाला तर साडी सांगावे.)

शेजारी : ती किल्ली ठेवायची होती हो.

आपण : हो....ठेवा की.पण एका अटीवर हां.आधी चहा घ्या आणि मग किल्ली ठेवा.नाहीतर तसे काही तुम्ही भेटत नाही.

शेजारी : पण थोडी घाइ आहे.

आपण : हे नाही चालणार.

असे म्हणून त्याला जबरदस्ती चहा प्यायला लावायचा.म्हणजे चहा होत आहे असे दाखवायचे आणि १० मिनिटात होणार्‍या चहाला १ तास लावायचा.चहात मुद्दाम साखर जास्त टाकायची.गोड-मिट्ट चहा बर्‍याच जणांना आवडत नाही.

चहा पिता-पिता एकीकडे, शेजारी जाणार असलेल्या शहरातील आपल्या मित्राचे आणि नातेवाईकाचे कौतूक करायचे.तो किती दिलदार आहे, असे सांगत रहायचे.त्याला पण तुम्हाला भेटायला आवडेल असे सांगायचे आणि चहा पिवून झाला की, किल्ली ठेवून घ्यायची.

दोन दिवसांनी आपण आपल्या नातेवाईकाला फोन करायचा आणि सांगायचे की तुमच्याकडील सगळी जूनी कापडे काढून ठेवा.मला एका मंडळांत दान करायची आहेत.माझा मित्र ती न्यायला येईल किंवा तुम्ही त्याला ती स्वतः नेवून द्या.पण एक मात्र सांगतो.तो सध्या ह्याच कामासाठी तुमच्या शहरात येत असल्याने, त्याच्याकडे वेळ कमी आहे.

हे सेटिंग झाले की, शेजार्‍याला फोन करून सांगावे की मित्राने भेटवस्तू तयार ठेवली आहे.ती एका आश्रमात दान द्यायची आहे.नक्की घेवून या.तुमची चावी अजून आमच्याकडेच आहे.कुणाला द्यायची आहे का?हे पण विचारावे.

आता ड्रायव्हरच्या फोनची वाट बघायची.तो फोन आला की ड्रायव्हर देइल त्या वेळेला होकार द्यायचा.लगेच शेजार्‍याला फोन करून तसे सांगायचे आणि पॅकेट मिळाले का विचारायचे.

आता त्याला पॅकेट मिळो की न मिळो.

बायको-मुलांना घेवून सरळ घर सोडायचे आणि बायकोच्या माहेरी ३-४ दिवस रहायला जायचे.

शेजार्‍याचा फोन आला की, सांगायचे, बायकोची तब्येत बरी नसल्याने, मी आणि ती बाहेर आहोत.इथे रेंज येत नाही.आल्यावर बोलू.

इकडे तो शेजारी आणि ड्रायव्हर बोंबा मारू देत.

पुढच्यावेळी तो परत कधीही तुमची मदत मागायला येणार नाही.

नूतन सावंत's picture

11 Jun 2016 - 9:32 pm | नूतन सावंत

हायला!मुवि,देव तुमच्या शेजारी लोक्सची काळजी घेवो.

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

29 May 2016 - 11:26 am | खालीमुंडी पाताळधुंडी

अशावेळी तुम्ही काय कराल ?

>> काहीही करेन पण असला टुकार लेख टाकणार नाही.

केले एखादे शेजार्याचे काम काय फरक पडतो?

असल्या फाटक्या स्वभावाने तुमचे जगणे कठिण होईल

कानडाऊ योगेशु's picture

29 May 2016 - 12:24 pm | कानडाऊ योगेशु

केले एखादे शेजार्याचे काम काय फरक पडतो?

+१
एकदम सहमत.
हा प्रतिसाद नंतर पाहीला. माझा प्रतिसाद खाली दिला आहे.

केले एखादे शेजार्याचे काम काय फरक पडतो?

असल्या फाटक्या स्वभावाने तुमचे जगणे कठिण होईल

कविता१९७८'s picture

29 May 2016 - 1:03 pm | कविता१९७८

नाहीतर काय,मदत करायची तर पुर्ण मनाने करायची नाहीतर आधीच सान्गायचे आम्ही घरी नाही आहोत किन्वा आम्ही गावी चाललोत. उद्या तुम्हाला गरज लागली, उशीरा घरी आलात अन शेजार्‍याचे दार ठोठावे लागले तर?

तुम्हाला म्हणजे धागाकर्त्याला

मला नाही वाटत हा फाटका स्वभाव आहे किंवा त्यांची (लेखक) मदत करायची तयारी नाहीये.
तसे असते तर त्यांनी किल्ली ठेऊन घेण्यासच नकार दिला असता.
त्यांचा कंसर्न हा आहे कि मदत घेणार्‍याने पण मदत करणार्‍याची थोडी सोय बघावी.
(हा सरळ साधा शिष्टाचार आहे).

किल्ली तुमच्याकडे आल्यावर गाडी बाहेर घेऊन जा ..ठोका..आल्यावर सॉरी म्हणा..इशुरंस आहे का विचारा..असल्यास भरपाई कंपनी कडुन घ्यायला सांगा..नसल्यास इशुरंस नसल्यामुळे मला दंड भरावा लागला ..यावर लेक्च

कानडाऊ योगेशु's picture

29 May 2016 - 12:21 pm | कानडाऊ योगेशु

काही वेळेला अश्या अडनिड्या वेळेला केलेली मदत एखादा चांगला मित्र मिळवुन देऊ शकते.! कधी कधी वुई हॅव टू गिव इट अ चान्स.!

स्पा's picture

29 May 2016 - 12:24 pm | स्पा

हल्ली तोच प्राँब्लेम झालाय, शक्यतो मदत करणे कसे टाळता येईल यावर लोकांचा कल झालाय, सल्ले पण तसलेच मिळतायेत, चालायचंच
कालाय तस्मॆ नम:

मुक्त विहारि's picture

29 May 2016 - 12:45 pm | मुक्त विहारि

माझ्या शेजार्‍यांच्या घराच्या किल्ल्या माझ्याकडेच असतात.

पण म्हणून ते काही रात्री-बेरात्री त्रास देत नाहीत.

कधी-कधी गाडी चुकल्यामुळे किंवा लेट होत असेल तर, तसे आधीच फोन करून सांगतात.

समंजस शेजारी असेल तर ठी़ पण तसा तो नसेल तर, त्याच्या भाषेतच त्याला उत्तर दिलेले उत्तम.

भले तर देवू कांसेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी.

कोंबडी प्रेमी's picture

29 May 2016 - 1:09 pm | कोंबडी प्रेमी

मदत करण्याची इच्छा होतीच आणि कृतीही तशीच होती.
रात्री ११ पर्यंत किल्ली घेऊन जा असे सांगितले असतांना खुशाल १.३० वाजता फोन वर फोन, घराची घंटी वाजवणे आणि ह्यात कुठलीही चूक आहे ह्याची कणमात्र खंत तर सोडाच पण जाणीवही नाही हे डोक्यात जाणारे आहे.
११३० वाजता मित्राला केलेला फोन आणि sms चे उत्तर पहाटे ३ वाजता ? काय अपेक्षा ? मी रात्रभर जागा राहू ??

कानडाऊ योगेशु's picture

29 May 2016 - 2:59 pm | कानडाऊ योगेशु

प्रत्येक सेलिब्रिटीला एक ठराविक प्रशन विचारला जातो कि तुम्हाला ३ A.M असा कुणी मित्र आहे का? (अमिताभला विचारला होता हे आठवते आहे त्याने सांगितले होते कि एक दोघेजण आहेत ज्यांना मी कधीही फोन करु शकतो.). त्यादृष्टीने तुम्ही तुमच्या मित्राचे ३ A.M मित्र आहात. मुळात जर तो तुम्हाला रात्री ३ वाजता बिनदिक्कतपणे फोन करु शकतो तर तुम्हीही त्याला ही तुमची तक्रार बिनदिक्कतपणे सांगु शकता.

नूतन सावंत's picture

11 Jun 2016 - 9:34 pm | नूतन सावंत

हे मात्र पटलं.

नूतन सावंत's picture

11 Jun 2016 - 10:07 pm | नूतन सावंत

वरचा प्रतिसाद मुवि आणि कानडाऊ योगेश दोघांसाठी आहे.

प्रसाद_१९८२'s picture

29 May 2016 - 12:23 pm | प्रसाद_१९८२

मलाही कोंबडी खुप-खुप आवडते.
खायला!

जयन्त बा शिम्पि's picture

29 May 2016 - 1:01 pm | जयन्त बा शिम्पि

भीड भिकेची बहीण ! ! स्पष्ट बोलावे हे बरे ! च्यायला , नस्ता डोक्याला ताप ! !

रमेश भिडे's picture

29 May 2016 - 1:17 pm | रमेश भिडे

शेजारी चांगला आहे पण चालक बेजबाबदार आहे असं काही झालेलं दिसतंय.

त्रास एकदाच झाला, त्यावर विचार करुन त्याला भूमितिश्रेणीने आपण वाढवतो. ते टाळावं

असंका's picture

29 May 2016 - 5:52 pm | असंका

तुम्हाला टोचणी लागलेली दिसतीये किल्ली न दिल्याने.

ड्रायवरला दिड ला किल्ली देउन टाकली असतीत तर पुढे तरी निवांत झोप झाली असती. न्याय निवाडा करायला पुढचा दिवस होताच की.

चलत मुसाफिर's picture

30 May 2016 - 12:38 pm | चलत मुसाफिर

सारथी: रात को ८ /९ तक

मी: ठीक, फोन करके आना. और ९ के पहले आना. नही तो दरवाजा खोलेगा नही मै. फिर सुबहच आना ७ का बाद.

इषय समाप्त!! नाही का?

मराठी कथालेखक's picture

8 Jun 2016 - 11:06 am | मराठी कथालेखक

तुमच्या शेजार्‍याचा स्वभाव नेमका कसा आहे याचा तुम्हाला अंदाज असेल ना ?
मी उगाच कुणाला लगेच डोक्यावर बसवत नाही, पण 'एकमेका सहाय्य करु' चे तत्व पाळतो. मदतीची निकड असेल तेव्हा मी व माझी पत्नी शेजार्‍यांना मदत करतो पण कुणाशी किती अघळपघळ व्हावे हे हळूहळू समोरच्याचा रागरंग पाहून ठरवतो.
स्वतः दुसर्‍यांच्या मदतीला न जाणार्‍या व्यक्तीला थोडे दूरच ठेवतो त्यामुळे असा प्रसंग येत नाही पण जर समोरची व्यक्ती चांगली असेल तर तिच्याकरिता थोडा त्रास झाला तरी काही वाटत नाही.

१. "स्वतः दुसर्‍यांच्या मदतीला न जाणार्‍या व्यक्तीला थोडे दूरच ठेवतो त्यामुळे असा प्रसंग येत नाही पण जर समोरची व्यक्ती चांगली असेल तर तिच्याकरिता थोडा त्रास झाला तरी काही वाटत नाही."
वरील वाक्याशी सहमत आहे. मला ही एकदा रात्री किल्ली ठेवुन घेण्याचा अनुभव झाला. पण शेजारी समंजस होते. रात्रि १:३० वाजता सॉरी म्हणतच किल्ली ठेवण्याचे कारण थोड्क्यात स्पष्ट केले. पुन्हा ४ वेळा आम्हाला दिलेल्या त्रासा बद्दल सॉरी म्हणाले. मग आम्ही पण चावी ठेवुन घेतली. ( मनात आले की आपल्याला कधी अशी रात्री मदतीची गरज आली तर आठवणीने शेजारी मदत करतील)

२." मदत घेणार्‍याने पण मदत करणार्‍याची थोडी सोय बघावी." हे ही अगदी खर आहे.

नूतन सावंत's picture

11 Jun 2016 - 9:54 pm | नूतन सावंत

कोंबडीप्रेमी, एका शेजारी व्यक्तीची एकदा किल्ली ठेवली तर तुम्हाला इतके त्रासदायक वाटले.मला आमचे एक शेजारी आठवले.त्यांच्याकडे इमारतीतील सर्व सदस्यांच्या किल्ल्या तर असतच, त्या घरातील सदस्य पण कधीही,कोणत्याही वेळी येत असत.शिवाय फोन करून त्या काकूंना मोलकरणीला घर उघडून द्या,ग्यासचे बटण बंद करायला विसरलेय,प्लीज बंद कराल का? अशा प्रकारच्या मदतीची मागणी करत असत.त्या काकूंनी आता मुंबई सोडून २१ वर्षे झाली आहेत.पण अजूनही त्यांचे सगळ्यांशी संबंध आहेत.
धन्य त्या काकूंची!

"तुम्ही सुटीनिमित्त बाहेर जात असाल तर कील्ल्या येथे स्विकारल्या जातील" अशा आशयाचा एक बोर्ड बनवीन म्हणतोय. प्रत्येक कील्लीचे एका दीवसाचे १० रू. घरात चोरी झाल्यास आम्ही जबाबदार नाही वगैरे अन्य बोर्ड बनवावे लागतील...

टवाळ कार्टा's picture

13 Jun 2016 - 1:44 pm | टवाळ कार्टा

=))

नाखु's picture

13 Jun 2016 - 2:51 pm | नाखु

१.घरात चोरी झाल्यास आम्ही जबाबदार नाही
२.नक्की किती दिवस जाणार तसे सांगणे व वाय्दा केलेल्या तारखे अगोदर येऊन (तात्पुर्त्या राहणार्या निवाश्याची) पंचाईत करू नये.
३.घरात खाण्या-पिण्याचे पदार्थ किमान तरी ठेवावेत, अगदी सन्याष्याच्या मठीसारखे मोकळे कफल्लक ठेऊ नये.
४.वाण सामान,भाजी ई. संपल्यास उगा कटकट करून नये तर कुणामुखीच पडले म्हणून आनंद मानावा.
५.सोसायटीत ज्यांच्याशी आपले सतत वाजते त्यांनी उठा-"बसायला" आप्ल्या सदनिकेची किल्ली मागीतल्यास आम्ही भीडेखातर देणार नाही असे समजू नये. शेजार धर्म महत्वाचा (तुम्ची किली ठेऊन घेतली तसी त्यांची सोय करणे हाही शेजारधर्मच आहे.)
६.सबब अटी मान्य सलयाचे ५० रुप्यांच्या ष्टांप पेपरवर लिहून देणे (ष्टांप पेपर स्वतःचा स्वतः आणणे इथला हवा असल्यास फक्त सत्तर रुपये द्यावेत सत्तर रुपये मिपावर फार प्रसिद्ध आहेत म्हणून सत्तर अन्यथा आम्ही "९०"च घेतो.

खटपट्या भौ आणखी काही हवे का ते कळविणे म्हणजे अंतिम फलक बनविता येईल.

नाखु बेडेकर

मृत्युन्जय's picture

13 Jun 2016 - 2:39 pm | मृत्युन्जय

मी काय म्हणतो, किल्ली वॉचमन कडे देउन ठेवली असती किंवा पहिल्या घंटेला दीड वाजता चार शिव्या देत डाय्वर ला किल्ल्या दिल्या असत्या तर पुढचा मनस्ताप टळला असता की नाही? तुम्हाला आता कदाचित माहिती असेल की उशीर का झाला पण त्या वेळेस काही इमर्जन्सी असली असती तर तुमच्या मित्राला किती मनस्ताप झाला असता?