स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी
भारतात स्त्रीयांवर अन्याय क्ररण्याची परंपरा अतिप्राचीन काळापासून आहे. सीता व द्रौपदी यांचे उदाहरण सर्वांना माहीत असते. पण त्या पूर्वीही पार वेदकाळातही हे चालूच होते. बृहदारण्यकातली गोष्ट घ्या. गार्गी ही विद्वान ब्रह्मचारिणी. ऋषीमंडळात चालणार्या वादविवादात हिरीरीने भाग घेणारी. पण बिचारीवर एकदा दुर्धर प्रसंग ओढवलाच. याज्ञवल्काबरोबरच्या एका चर्चेत ती प्रश्न विचारत होती व याज्ञवल्क उत्तरे देत होता. तीचा शेवटचा प्रश्न होता "ब्रह्म कशात सामावते ?’ शिघ्रकोपी याज्ञवल्काने तिला दरडावले "गार्गी, अतिप्रश्न विचारू नकोस. डोक्याचे शंभर तुकडे होतील !" गार्गीला प्रश्नाचे उत्तर मिळाले नसले तरी गप्पच बसावे लागले माधवीची गोष्ट आपण मागे पाहिली आहेच. त्या काळी घरी पाहुणा आला व त्याने इच्छा प्रकट केली तर गृहीणीला पाहुण्याची शय्यासोबत करावी लागे ! तिची इच्छा असो वा नसो. पुराण कथांत तर हरिश्चंद्राच्या बायकोला आपल्या मुलाला, पोटच्या पोराला उखळात कांडाचे लागले
इतिहास काळात फरक पडलेला दिसत नाही. राजपुतान्यातील "जोहार " हे एक उदाहरण. आजही परिस्थिती फार बदलली आहे का ?
रोजच्या वर्तमानपत्रात एकतरी बातमी असते हुंडाबळी. सासरच्या माणसांनी, यात मुलाची आई
व बहीणही आली, सुनेला राकेल टाकून पेटवून दिले. नाही तर छळाला कंटाळून सुनेने स्वत:च अंगावर राकेल ओतून घेऊन स्वत: काडी ओढून जीव दिला. चला. एक सोय झाली. घरांत राकेल तरी असते. पण जेव्हा राकेल नव्हते तेव्हा काय ? अनाथ मुलीसमोर दोनच पर्याय होते. कोणी नसतांना विहीरीत उडी मारावयाची किंवा,,, तेही शक्य नसेल तर...घरच्या उंच गच्चीवरून उडी मारून जीव द्यावयाचा! गच्चीत आलेल्या मुलीच्या मनातील भावना काय असणार ? तिच्या चेहर्यावरील भाव कोणते असणार? पहिल्या प्रश्नाचे उत्तर देणे अवघड, नव्हे अशक्यच आहे. "जावे त्याच्या वंशा ..." तेव्हाच कळण्याची शक्यता. पण दुसर्या प्रश्नाचे उत्तर कोणाही चार पावसाळे पाहिलेल्या, सहृदय माणसाला लगेच मिळते. पुढील घटना त्याच्या डोळ्यासमोर तात्काळ उभ्या राहातात. या अटळ असलेल्या गोष्टीबद्दल त्याच्या मनातील तत्काळिक प्रतिक्रिया कोणती ?
आज आपण संवेदनशील कवींना काय वाटले ते पाहाणार आहोत. हे पार चौदाव्या शतकापासून ते विसाव्या शतकातील आहेत. काळाप्रमाणेच त्यांच्या धार्मिक, सामाजिक समजुतीत प्रचंड फरक आहे. समान आहे, सहृदयता, कळवळा, हताशपणा ! अभागिनीला आपण काही मदत तर करू शकत नाही ही असहाय्य जाणीव. काहींनी तिची समजूत घालायाचा प्रयत्न केला ,काहींनी धीर दिला तर काहींनी नरकाची भीतीही दाखवली. एकविसाव्या शतकातील (नव)कवीने तर ’हा वेडेपणा कसला करतेस ? चल, घराबाहेर पड, डान्स करून मन रिझव " असाही सल्ला दिला.
चला वाचा तर कवी काय सांगताहेत.
======================
गुलजार....
वो बरसों पुरानी ईमारत शायद
आज कुछ गुफ्तगू करना चाहती थी
कई सदियों से उसकी छत से कोई कूदा नहीं था.
और आज
उस तंग हालात परेशां
स्याह आँखों वाली उस लड़की ने
ईमारत के सफ़े जैसे खोल ही दिए
आज फिर कुछ बात होगी
सुना है ईमारत खुश बहुत है...
हरिवंश राय बच्चन...
किस उलझन से क्षुब्ध आज निश्चय यह तुमने कर डाला
घर चौखट को छोड़ त्याग चड़ बैढीं तुम चौथा माला
अभी समय है, जीवन सुरभित पान करो इस का बाला
ऐसे कूद के मरने पर तो नहीं मिलेगी मधुशाला
प्रसून जोशी साहेब...
जिंदगी की तोड़ कर
मरोड़ कर
गुल्लकों को फोड़ कर
क्या हुआ जो जा रही हो
सोहबतों को छोड़ कर
हन्नी सिंह....
कूद जा डार्लिंग क्या रखा है
जिंजर चाय बनाने में
यो यो की तो सीडी बज री
डिस्को में हरयाणे में
रोना धोना बंद!
तू कर ले डांस हनी के गाने में
रॉक एंड रोल करेंगे कुड़िये
फार्म हाउस के तहखाने में !!
रहीम...
रहिमन कभउँ न फांदिये छत ऊपर दीवार
हल छूटे जो जन गिरें फूटै और कपार
तुलसी...
छत चढ़ नारी उदासी कोप व्रत धारी
कूद ना जा री दुखारी
सैन्य समेत अबहिन आवत होइ हैं रघुराई
तुलसिदास दु:खी, उदास व रागावलेल्या बाईला विनंती करत आहे, " बाई गं, नको उडी मारूस. आताच ससैन्य रघुवर येत आहे बघ." ससैन्य कां बरे ? तिला वाचवावयला एकटा राम समर्थ नाही कां? असे तर नाही ना कीं त्याच्या डोळ्यासमोर दुर्दैवी सीतेला सोडवण्यास असमर्थ ठरलेला राम उभा राहिला ? सैन्य बरे; पोलिसी खाक्या दाखवून घरच्या लोकांना ठीक करतील !
कबीर....
कबीरा देखि दुःख आपने कूदिंह छत से नार
तापे संकट ना कटे , खुले नरक का द्वार''
मैथिली शरण गुप्त-
अट्टालिका पर एक रमिणी अनमनी सी है अहो
किस वेदना के भार से संतप्त हो देवी कहो?
धीरज धरो संसार में, किसके नही है दुर्दिन फिरे
हे राम! रक्षा कीजिए, अबला न भूतल पर गिरे।
काका हाथरसी-
गोरी बैठी छत पर, कूदन को तैयार
नीचे पक्का फर्श है, भली करे करतार
भली करे करतार,न दे दे कोई धक्का
ऊपर मोटी नार, नीचे पतरे कक्का
कह काका कविराय, अरी मत आगे बढना
उधर कूदना मेरे ऊपर मत गिर पडना।
श्याम नारायण पांडे
ओ घमंड मंडिनी, अखंड खंड मंडिनी
वीरता विमंडिनी, प्रचंड चंड चंडिनी
सिंहनी की ठान से, आन बान शान से
मान से, गुमान से, तुम गिरो मकान से
तुम डगर डगर गिरो, तुम नगर नगर गिरो
तुम गिरो अगर गिरो, शत्रु पर मगर गिरो।
गोपाल दास नीरज
हो न उदास रूपसी, तू मुस्काती जा
मौत में भी जिन्दगी के कुछ फूल खिलाती जा
जाना तो हर एक को है, एक दिन जहान से
जाते जाते मेरा, एक गीत गुनगुनाती जा
राम कुमार वर्मा
हे सुन्दरी तुम मृत्यु की यूँ बॉट मत जोहो।
जानता हूँ इस जगत का
खो चुकि हो चाव अब तुम
और चढ़ के छत पे भरसक
खा चुकि हो ताव अब तुम
उसके उर के भार को समझो।
जीवन के उपहार को तुम ज़ाया ना खोहो,
हे सुन्दरी तुम मृत्यु की यूँ बाँट मत जोहो।
खरी गम्मत पुढेच आहे. या कविता दिलेल्या कवींच्या नाहीत. नोंद अशी आहे
प्रसंग है एक नवयुवती छज्जे पर बैठी है, वह उदास है, उसकी मुख मुद्रा देखकर लग रहा है कि जैसे वह छत से कूदकर आत्महत्या करने वाली है।
विभिन्न कवियों से अगर इस पर लिखने को कहा जाता तो वो कैसे लिखते :
आपला हिन्दी कवितेशी फार परिचय नसेल तर यातली खुमारी थोडी कमी कळेल पण विभिन्न कवी एकाच प्रसंगावर कशी विभिन्न कविता लिहतील एवढे सहज लक्षात येईल.
मित्र हो आणि मैत्रीणींनी हो ( हल्ली महाराष्ट्रात हे असे लिहावेच लागते; जिथे शिगणापूर/कोल्हापूरचे दिग्गज शरण आले, तेथे मी किस झाड की पत्ती
माझी एक विनंती आहे. या प्रसंगावर मिपावरील कवी/कवीयत्रींनी आपल्या कविता लिहाव्यात व आम्हा रसिक वाचकांना आपल्या नवनवोन्मेषप्रज्ञाप्रतिभेचा आस्वाद घ्यावयाची संधी द्यावी.
शरद
प्रतिक्रिया
18 Apr 2016 - 5:40 pm | तर्राट जोकर
वाचता वाचता आलेच ध्यानात, ह्या मूळ कवींच्य कविता नाहीत ते. =))
18 Apr 2016 - 10:36 pm | नीलमोहर
भारी आयडियाची कल्पना,
सोचना पडेगा..
19 Apr 2016 - 10:47 am | आनन्दा
काही नाहीच राहिले
झाले सगळे भोगून
पार अंधारच सारा
ना कवडसा कुठून
नाही उरला मनात
रस आयुष्यात अश्या
प्रवासाला दिगंताच्या
मोकळ्या दाही दिशा
अवांतर -- "मोकळ्या दाही दिशा" साठी काय काय यमक जुळवावे लागले.. :)