एका उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या महामानवाला कोटी कोटी प्रणाम

शान्तिप्रिय's picture
शान्तिप्रिय in जनातलं, मनातलं
13 Apr 2016 - 11:19 pm

१४ एप्रिल.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती. या महामानवास कोटी कोटी प्रणाम आणि विनम्र अभिवादन.

कर्मठ हिंदु समाजातील काही अतिकर्मठ लोक माणसा माणसांत भेद्भाव करुन रानटी पणे वागत असताना या जनतेला
त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी जीवाचे रान केले. त्यांच्या प्रयत्नामुळे महाड चे चवदार तळे सर्वांना खुले झाले. जिथे तिथे अस्प्रुश्यतेची माणुसकीहीन परंपरा चालू असताना त्यांनी तिथे तिथे एल्गार पुकारला.

याशिवाय भारतीय राज्यघट्ना तयार करण्या साठी त्यांनी अविश्रांत परिश्रम घेतले. त्या दिवसांत ते दिवसांतून १८ तास
काम करीत.

इतके असूनही त्यांनी कधीही हिंदु समाजातील मित्र मैत्रिणींबद्द्ल मनात आकस ठेवला नाही हे विशेष!
आचार्य अत्रे यांनी निर्मीलेल्या ज्योतिबा फुले या चित्रपटाची त्यांनी मुक्तकंठे स्तुती केली.

महात्मा गांधींसारख्या रुषीतुल्य व्यक्तिमत्त्वाबद्दल आदर बाळगुन त्यांचे तब्येतिची काळजी घेत दलितांसाठी वेगळा
मतदार संघ बनवणेचा निर्णय त्यांनी रद्द केला. हे उच्च संस्कार!

आजही महाड येथील चवदार तळे , नाशिकचे काळाराम मंदीर येथे आपण गेलो आणि हा हिंदू धर्माला कलंक लावणार्या
अस्प्रुश्यतेच्या परंपरांचा इतिहास आठवला की अंगावर शहारे येतात.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नामुळे हिंदू धर्म थोडा तरी सुधारला आहे. उत्तरोत्तर अशीच हिंदू धर्मात सुधारणा होवो ही
प्रार्थना!

आपण पुणेकर असाल किंवा पुण्यात आलात आणि सिंबोसिस जवळील आंबेड्कर संग्रहालय पाहिले नसेल तर वेळ न दवडता ते जरुर पाहा. आंबेड्करांच्या अनेक आठवणी, त्यांचे अनेक दुर्मिळ फोटो, हस्तलिखिते , त्यांच्या नियमित वापरातील वस्तु तेथे अतिशय उत्तम प्रकारे जतन केल्या आहेत. एक सुंदर संग्रहालय!

आंबेड्करांचे काहि सुविचार देऊन या महामानवास परत विनम्र अभिवादन करुन हा छोटा लेख संपवितो.
बाबासाहेबांचे विचार सगळीकडे पसरवणे हाच युवकांचा उद्देश असला पाहिजे.

माणसाला आपल्या दुर्गुणांची लाज वाटली पाहिजे. दारिद्र्याची नाहि .
I measure the progress of community by degree of progress of women in that community.

रेखाटनविचार

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

13 Apr 2016 - 11:51 pm | उगा काहितरीच

महामानवास अभिवादन !!!

बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन!

नुस्त्या उचापती's picture

14 Apr 2016 - 12:07 am | नुस्त्या उचापती

स्वतःसाठी सगळेच जगतात , पण आयुष्यभर वंचितांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या बाबासाहेब भारतरत्न भीमराव रामजी आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम . जगभरातील त्यांच्या सर्व अनुयायांना जयंतीच्या शुभेच्छा !

अभ्या..'s picture

14 Apr 2016 - 1:07 am | अभ्या..

शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर या भारताच्या आधुनिक ऋषिवर्याला कोटीकोटी प्रणाम.
आंबेडकरी विचारांच्या सच्च्या पाईकांना जयंतीच्या मनापासून शुभेच्छा.

नाखु's picture

14 Apr 2016 - 8:19 am | नाखु

आंबेडकरी विचारांच्या सच्च्या पाईकांना जयंतीच्या मनापासून शुभेच्छा.

नाखु

खटपट्या's picture

14 Apr 2016 - 1:38 am | खटपट्या

अभिवादन

रामपुरी's picture

14 Apr 2016 - 1:56 am | रामपुरी

"डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नामुळे हिंदू धर्म थोडा तरी सुधारला आहे"
ही पिन नक्की कशासाठी मारली आहे?

श्रीरंग_जोशी's picture

14 Apr 2016 - 2:08 am | श्रीरंग_जोशी

१२५व्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांना अभिवादन. या लेखनासाठी धन्यवाद.

पुण्यात सिंबॉयसिसजवळच्या संग्रहालयाबाबत ठाऊक नव्हते. संधी मिळताच तिथे जाईन.

उगा काहितरीच's picture

14 Apr 2016 - 2:20 am | उगा काहितरीच

आपण पुणेकर असाल किंवा पुण्यात आलात आणि सिंबोसिस जवळील आंबेड्कर संग्रहालय पाहिले नसेल तर वेळ न दवडता ते जरुर पाहा. आंबेड्करांच्या अनेक आठवणी, त्यांचे अनेक दुर्मिळ फोटो, हस्तलिखिते , त्यांच्या नियमित वापरातील वस्तु तेथे अतिशय उत्तम प्रकारे जतन केल्या आहेत. एक सुंदर संग्रहालय!

याबद्दल धन्यवाद ! रच्याकने नेमके कुठं आहे हे संग्रहालय? पुण्यात सिंबी बर्याच ठिकाणी आहे ना चतुःशृंगीपासुन नळ स्टॉपला जो रस्ता आहे त्या सिंबीच्या जवळ आहे का ?

श्रीरंग_जोशी's picture

14 Apr 2016 - 2:29 am | श्रीरंग_जोशी

सेनापती बापट मार्गावर पारपत्र कार्यालयाच्या विरुद्ध बाजूस आहे असे दिसते.

अधिक माहिती.

उगा काहितरीच's picture

14 Apr 2016 - 2:34 am | उगा काहितरीच

धन्यवाद ... ४-५ महिन्याअगोदर रोजचाच रस्ता होता हा.

अर्धवटराव's picture

14 Apr 2016 - 3:11 am | अर्धवटराव

महामानवाला कोटी कोटी प्रणाम.
माझ्या आयुष्यावर डायरेक्ट सकारात्मक परिणाम करणारा हा पुरुष. मनापासुन धन्यवाद हो बाबासाहेब.

सत्याचे प्रयोग's picture

14 Apr 2016 - 9:05 am | सत्याचे प्रयोग

मनपूर्वक अभिवादन

सुबोध खरे's picture

14 Apr 2016 - 11:42 am | सुबोध खरे

बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन!
डॉक्टर बाबासाहेबांची एकच शोकांतिका.
त्यांच्या मागून त्यांच्या एक दशांश उंचीचा सुद्धा नेता होऊ शकला नाही. आचार्य अत्रेंच्या भाषेत आहेत ती फक्त या "सूर्याची" किरणे, जी फक्त स्वतःची पोळी भाजून घेण्यात धन्यता मानतात.
काय पण एकाचढ एक नमुने आहेत. बाबू जगजीवन राम, बहनजी मायावती काय किंवा आपले कविवर्य काय?
कुणीतरी पैसे खाउन भरती केल्यासारखे.

नीलमोहर's picture

14 Apr 2016 - 2:44 pm | नीलमोहर

बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन.

महेश-मया's picture

14 Apr 2016 - 11:47 am | महेश-मया

नव्ह्ता तो कोन्या एका जाति धर्माचा!
होता तो सर्व भारतियांचा!!
ज्याच्यापुधे झुकतो माथा सर्वांचा !
असा होता भिमरव ज्ञानि सम्राट भारताचा!!

सर्व भारतियांना जयंतिच्या खुप सार्या शुभेच्या

उभं आयुश्य सनातनी सत्येशी लढा देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म म्हणजे बाभळीच्या झाडाला हापूस आंबा यावा असा सामाजिक चमत्कार होता. दलितांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम बाबासाहेबांनी केले. असहिष्णुतेच्या विरोधात सातत्याने संघर्ष केला. कार्यकर्त्यांना शिका संघटीत व्हा व संघर्ष करा हा मूलमंत्र दिला. धर्मापेक्शा माणुसकी महत्वाची आहे हे मूल्य आपल्या आचार विचाराने समाजात रूजवले. मूक समाजाचे कैवार घेवून त्यांना जगण्याचे व संघर्ष करण्याचे बळ दिले, अशा महामानवास विनम्र अभिवादन !

उध्दरली कोटी कुळे
भीमा तुझ्या जन्मामुळे.

मितभाषी's picture

14 Apr 2016 - 1:39 pm | मितभाषी

जय भीम

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Apr 2016 - 2:11 pm | डॉ सुहास म्हात्रे

बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन!

सुधीरन's picture

14 Apr 2016 - 2:17 pm | सुधीरन

महामानवास अभिवादन!

टुकुल's picture

14 Apr 2016 - 2:36 pm | टुकुल

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम.

पैसा's picture

14 Apr 2016 - 11:24 pm | पैसा

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन. अशा उंचीचे नेते पुन्हा तयार व्हावेत.

mugdhagode's picture

15 Apr 2016 - 11:13 am | mugdhagode

अभिवादन .

विवेकपटाईत's picture

15 Apr 2016 - 7:39 pm | विवेकपटाईत

बाबा साहेबांना नमन. केवळ नमन करून काम चालणार नाही, आपल्या घरात हि सामाजिक समरसता आणली पाहिजे. सर्व जातीच्या लोकांचा स्वीकार हि आपल्या घरात आपल्यला करता आला पाहिजे.