साईनफेल्ड/seinfeld (1989-1998)

येडाफुफाटा's picture
येडाफुफाटा in जनातलं, मनातलं
6 Apr 2016 - 6:51 am

साईनफेल्ड(1989-1998)
काल एव्हरीबडी लव्हज रेमंड च्या लेखनानंतर दुसऱ्या काही sitcoms आठवल्या ज्यांना टाळून अनेक अमेरिचनां चे तरुणपण अपुरेच राहील. भारतात देखील प्रचंड लोकप्रिय असणारी सीटकॉम म्हणजे फ्रेन्डस्/FRIENDS. आजही फ्रेंड्स या मालिकेची पारायणे/ बिंज वाचिंग करणारे भरपूर लोक्स आहेत. खास करून 20 ते 45 वयातला गट. पण फ्रेन्डस् उत्तम आहे यात तिळमात्र शंका नाही. अस्मादिकांनीसुद्धा त्याचे 22 एपिसोड्स × 10 सीझन्स अशी 10 एक वेळेस तरी रिव्हिजन मारली आहे. इतकी कि त्यातील एपिसोड्स मधील कोणते पात्र कोणते वाक्य बोलते हे ठामपणे सांगु शकतो. तर सांगायचा उद्देश हा कि या फ्रेन्डस् भक्तीमुळे एक सर्वोत्तम सीटकॉम फार काही प्रसिद्धी न होता दुर्लक्षित राहिली... निदान भारतात तरी. ..... तिचे नाव साईनफेल्ड. (पहा why seinfeld is not so popular in India like friends https://www.google.co.in/url?sa=t&source=web&rct=j&url=https://www.quora...)

साईनफेल्ड ह्या सीटकॉमला बाकी 1990 नंतर आलेल्या सर्व सीटकॉमचा जनक मानतात. त्यांनी सीटकॉम क्षेत्रात प्रथमच वापरलेली तंत्रे :
. त्यांच्या 20 मिनिटाच्या एपिसोड्स मध्ये एखादा अजब/ सामाजिकरित्या awkward असलेला विषय हाताळलेला असतो. मग पुढच्या एपिसोडला नवीन विषय. एखादी थिम सोडता कॅंटीन्यूटी काही नाहीच. म्हणजे लक्षात आले का कि प्रेक्षकांच्या डोक्याला काहीही लक्षात ठेवायचा ताप नाही. त्या आधीच्या विनोदी मालिकांमध्ये ही कॅंटीन्यूटीन्यू जपण्याच्या नादात आणि प्रेक्षकांना गोडगोड एंडिंग पुरवण्याच्या नादात खूप तडजोडी केल्या जायच्या. प्रेक्षकाला uncomfortable वाटू नये म्हणून नायकाला कमीपण दाखवणे, त्याचे/तिचे दुर्गुण दाखवणे होत नसायचे. मग नायक मसीहा नाहीतर अवतार वाटायचा आणि पब्लिक त्याच्यावर फिदा असायची. (आपल्याकडे हे नायक पूजन अजूनही चालू आहे. पण दबंग नंतर काही प्रमाणात अँटी हिरो/ न-नायक ह्याच्या छटा दिसतायेत.) हे नायकाचे सामान्यपण का महत्वाचे आहे ते पाहू. कोणत्याही समाजातील लोक समाजातील लोक एक मसीहा शोधून त्याच्यावर त्यांच्या सगळ्या समस्यांची जबाबदारी टाकून मोकळे होतात. (उदा. प्रत्येक निवडणुकीत नाही का आपल्याला वेगळा नायकच पं प्र पदी योग्य आहे असे वाटते. मग आपल्या मनावर ठसवले जाते कि मागचा नायक काहीच नव्हता आताच्या नायकाची छाती पहा. वगैरें वगैरे).
साईनफेल्डचे दुसरे एक वैशिष्ट्य म्हणजे " no hugging no learning rule" म्हणजे थोडक्यात पात्रे कधीही "सुधारणार"नाहीत.( आठवतंय का men always will be men). त्या आधी कस व्हायचे माहितेय का कि पडद्यावरची पात्रे आपली चूक लक्षात आणून दिल्यावर चक्क सुधारायची म्हणजे एकतर नायकांत कोणता दोष नाही आणि वरून ते आपल्या स्वभावात कायम सुधारणा करत राहणार. हे थोडेसुद्धा पटनेबल नाही. कारण आपल्याला माहित आहे कि स्वभाव काही तरी अघटित/drastic घडल्याशिवाय बदलत नाही.(मृत्यू, लग्न,अपघात वगैरे. खरतर arrange marrige हा सुद्धा अपघातच मानावा काय?:):))( बाकी लीडरशिप प्रोग्रॅमवाले काहीही दावे करोत).
साईनफेल्ड ला "show about nothing " असे म्हटले जाते. कारण त्या शोमध्ये काही नवीन तत्वज्ञान सांगितलय किंवा उपदेशाचे डोस पाजलेत असे काही नाही. सगळे रोजमर्रा कि जिन्दगीशी निगडित. पण त्यात बदल हा कि त्यातली पात्रे स्वभावतःच स्वार्थी असल्याने ते प्रत्येक समस्या आपल्या पद्धतीने हाताळतात आणि विनोद घडत जातो.
आता थोडी पात्र ओळख :
जेरी साईनफेल्ड : 30-32 वय, कॉमेडीअन, निटनेटकेपणाशिवाय न जमणारा, ज्यू, लाईफ सिरियसली न घेणारा, सुपरमॅन चा फॅन,
जेरी कितीही संकटे आलि तरी टेन्शन घेत नाही. लाईफ फाट्यावरच मारलीय त्याने. Aha who cares? इथे कोणाला पडलीये असा स्वभाव. खर तर जेरीचे हीच non- caring काळ्जीमुक्त जीवनशैली अमेरिकन तरुण पिढीला भावली असावी. त्यामुळेच साईनफेल्ड एवढे प्रसिद्ध झाले असावे.
जॉर्ज कोस्टान्झा : 30-32 वय, बहुतेक वेळा बेरोजगार, टक्कल पडत चाललेले, बिनधास्त खोटे बोलणारा म्हणजे नोकरी नसताना देखील आहे म्हणून सांगणारा वगैरे, GF पटवण्यासाठी वेगवेगळ्या शकली लढवणारा, कंजूष, आई-वडिलांसोबत राहावं लागत असल्याने फ्रस्टेटेड असलेला,
जीवनातील बंधने ज्याला काही लोक मँनर्स असे पाचगल नाव देतात ते तो पळत नाही. उदा. वेटरला टीप देणे, GF ला ती आजारी पडल्यानंतर तिच्याशी break up न करणे, लहान मुलांशी न भांडणे. फक्त काही रुपये वाचविण्यासाठी तो लग्नपत्रिकांची जुनाट पाकिटे घेतो. त्या तोंडाच्या थुंकीने चिटकवायला जाऊन त्याच्या नियोजित वधूचे निधन होते तरीही त्याला वाईट वाटत नाही आणि दुसर्या पात्रांना देखील नाही.
GF ने nose job करावे असे तो आडून आडून तिला सुचवत राहतो कारण डायरेक्ट तोंडावर सांगणे बरोबर होणार नाही असे त्याला वाटते.

इलेन बेनेस: 30-32 वय, tomboy अर्थात लाजन मुरडण याचे वावडे असलेली, स्वतंत्र, स्वतःची ठाम मते असलेली, पुरुषांना काही वेळा फक्त सेक्स साठी वापरणारी, बुक ऑडिटर,
आपल्याला माहित आहे कि bimbo म्हणजे डोकं नसलेली सुंदर स्त्री. हे सरसकटीकरण चूक आहे पण इथे एलेन एका मंद पात्राला तो केवळ सुंदर आहे म्हणून date करते. पण शेवटी हर मानून सोडून देते. जेरी चा सुद्धा असा बिम्बो ला date करण्याचा प्रसंग असतो त्याला तो "war between his brain and penis" असे म्हणतो. तर george त्याला म्हणतो "बरोबरच आहे आणि 40 वर्षेपर्यंत तरी त्यात पेनिसच जिंकणार." मग साईनफेल्ड विचारतो"मग चाळीशीनंतर?" मग जॉर्ज म्हणतो" तेव्हा पण पेनिसच जिंकणार पण मोठ्या फरकाने नाही.

JERRY- "I have never been so repulsed by someone mentally and so attracted to them physically at the same time. It's like my brain is facing my penis in a chess game. And I'm letting him win."
GEORGE -"You're not letting him win. He wins 'til you're forty."
JERRY- "Then what?"
George- "He still wins, but it's not a blow-out."
क्रेमर: विक्षिप्त , अवलिया, जेरी च्या अपार्टमेंटमध्ये बिनदिक्कत वावरणारा , अंगविक्षेप करून हसविणारा

हि सगळी पात्रे प्रत्येक GF/BF मध्ये काही ना काही बारिकसरीक त्रुटी काढून तिला नकार देतात. उदा. तिचे नकोच मोठे आहेbig nose/ ती खूपच हळू आवाजात बोलते low talker/ तिला माणसासारखे हात आहेत Manhands इत्यादी.
अशी चित्र-विचित्र पात्रे बघण्याची मजा फक्त सांगून कळणार नाही. त्यासाठी ती मालिका पहावी लागेल. आणखी एक फ्रेन्डस् सारखे यात instant जोक्स सुरु होत नसल्याने मालिकेत रमण्यासाठी त्यातील विनोद कळण्यापूर्वी काही एपिसोड्स असेच पहावे लागतील. पण एकदा चटक लागल्यावर तुम्ही सगळे सीझन्स झाल्याशिवाय उठणार नाही याची खात्री बाळगा.
हि नवदीच्या काळातील मालिका असल्याने studio audience laughter track सहन करावे लागेल.
अवांतर: seinfeld vs fiends vs everybody loves remond
Seinfeld - 30+ वयोगट, अविवाहित 4 मित्र (1989- 1998)
Friends - 25+ वयोगट , अविवाहित 6 मित्र(1995-2005)
Everybody loves remond : 35+ वयोगट रेमंड व त्याचे वृद्ध आई वडील(1996-2005)
वरील तिन्ही सीटकॉम प्रचंड प्रसिद्द आहेत. पण त्यांनी एकमेकांच्या ऑडीएन्स वर कधी अतिक्रमण केले नाही. कारण ELR फॅमिली कॉमेडी असल्याने सासू- सून, आई-वडील मुलगा, नवरा बायको, sibling rivalry यासारखे विषय हाताळत असल्याने ती इतर दोघांच्या स्पर्धेत नव्हती. साईनफेल्ड फ्रेन्डस् एवढी ड्रॅमॅटिक नाही. कि त्यात बऱ्याच मोठ्या थिम नाहीत. प्रेक्षकांना साईनफेल्ड emotionally blackmail करत नाही. Oh! So sweet,nice असले क्षण साईनफेल्ड मध्ये नाहीत. उलट कधी मधी जर नायक परोपकार करण्याचा प्रयत्न करीत असेल तर तो त्याच्या अंगलट कसे येतो हे दाखवलय. उलट फ्रेन्डस् वाले 6 जिवलग मित्रांची गोष्ट सांगतात जे एकमेकांपासून कध्धी कध्धी अलग होत नाहीत. एकमेकांच्या मदतीला नेहमी धावून येतात. एकमेकांना "मी आहे कि तुझ्या मदतीला" "I'll be there for you असे सुचवितात. जे तारुण्याच्या भरात , मित्रांसाठी जण ओवाळून टाकण्याच्या काळात अपील होत राहते. पण मला वाटते कि ते विषफुल थिंकिंग असावे. कोणीही एवढे निःस्वार्थी नसते/नसावे किंवा केवळ फॅन्तसी मध्ये असावे(हे जोडीदाराला देखील लागू होते). त्यापेक्षा आपला स्वार्थ बघत कोणतीही कृत्रिम आपुलकी न दाखवता समाजातील शिष्टाचार न पाळल्याने होणाऱ्या गमती जमती दाखविणारा साईनफेल्ड शो मला जास्त भावतो. आणि हे महत्वाचे आहे कि मी फ्रेन्डस् फॅन झाल्यांनंतर साईनफेल्ड फॅन झालो.

कलाप्रकटन

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

6 Apr 2016 - 10:19 am | टवाळ कार्टा

बघायला हवा :)

अनुप ढेरे's picture

6 Apr 2016 - 11:01 am | अनुप ढेरे

साइनफेल्ड अत्यंत आवडते. फ्रेंड्स एक्दा बघितली की पुन्हा बघताना खूप बोर होते. साइन्फेल्ड कितीही वेळा बघितली तरी बोर होत नाही.

येडाफुफाटा's picture

6 Apr 2016 - 11:30 am | येडाफुफाटा

पण मला वाटते कि फ्रेंड्स पुन्हा पुन्हा पाहणारे जास्त लोक्स असावेत कारण त्यात भावूक करून शेवट गॉड करणारे प्रसंग भरपूर आहेत. याउलट साईनफेल्ड थोडा अस्वस्थ करणारी, टोचणारी कॉमेडी दाखवतो. आणि मुख्य म्हणजे तो गुडी गुडी बऱ्याच फ्रेन्डस् भक्तांना त्यामुळे ते पटत नाही

पिलीयन रायडर's picture

6 Apr 2016 - 12:45 pm | पिलीयन रायडर

उलट आहे माझं..

मी फ्रेन्ड्स अगणित वेळा पाहिलेलं आहे. सेन्फिल्ड सुद्धा थोडं पाहिलं आहे पण पारायणं करेन एवढं मला ते भारी वाटलं नाही.

मजा येते.. पण जनरेशन गॅप सारखं काहीतरी वाटतं.. एकदम जुन्या जमान्यातला हलकासा फील येतो मला तरी..

पण एकंदरीत छान आहे टाईमपास करायला..

येडाफुफाटा's picture

6 Apr 2016 - 5:24 pm | येडाफुफाटा

तेच सांगतोय कि फ्रेन्डस् पारायण करणारे माझ्यासाहित विशिष्ट पात्रासाठी (माझ्या बाबतीत chandler चे sarcastic रिमार्क) ऐकण्यासाठी वारंवार पाहत असतात. आता या मालिकेत tragedy नाहीच किंवा शेवट तरी गोड आहे त्यामुळे केव्हाही पहिले तरी मस्तच वाटते.
अवांतर: तुम्हाला महित आहे का? जसे बऱ्याच जणांना पु लं चे प्रत्येक पात्राचे संवाद पाठ असतात तसे अनेक फ्रेंड्स फॅन्स ना देखील ते पाठ आहेत. मग अशा वेळेला कोणता एपिसोड् आहे हे चटकन ध्यानात येऊ नये आणि म्हणूनच पुन्हा पुन्हा एपिसोड पहावे या हेतूने निर्माती/ लेखकानी प्रत्येक एपिसोड च्या नावाच्या आधी "the one with the" असे उपसर्ग लावले आहे. जेणेकरून नाव लक्षात ठेवायला कठीण जावे. यालाच म्हणतात हॉलीवुड व्यावसायिकता.

साधा मुलगा's picture

6 Apr 2016 - 1:43 pm | साधा मुलगा

newman
सिएन्फ़ेल्द मधले आणखी एक recurring character म्हणजे 'न्यूमन'. मी त्याची येण्याची वाटच बघत असतो, त्यांच्या शेवटच्या एपिसोड मधील त्याचे धमकीवजा आसुरी भाषण बघायला जाम मजा येते.
sienfeld आणि friends दोन्ही या दोन्ही मालिका मला अत्यंत आवडतात. दोन्ही बघताना बोर होत नाही.
दोघांपैकी कुठली चांगली हे मी सांगू शकत नाही.
पण मला वाटते कि फ्रेंड्स पुन्हा पुन्हा पाहणारे जास्त लोक्स असावेत कारण त्यात भावूक करून शेवट गॉड करणारे प्रसंग भरपूर आहेत. याउलट साईनफेल्ड थोडा अस्वस्थ करणारी, टोचणारी कॉमेडी दाखवतो.
याच्याशी सहमत ++
त्यामानाने HIMUM मात्र कधी कधी बोर वाटते. big bang theory चे पहिले ५-६ सीजन आवडले नंतर मग तोच तोच पण वाटू लागला. राज मुकाच बरा वाटत होता.
modern family लोकांना आवडते, मला तरी इतकी आवडली नाही.
'according to jim' म्हणून पण एक मालिका चांगली होती.
काल तुम्ही ज्याविषयी लिहिले ती 'everybody loves raymond' सुद्धा छान आहे. अतिशय हलकी फुलकी मालिका. भारतीय मालिका अश्या विनोदी अंगाने सासू सून मालिका का नाही बनवत ते कळत नाही. कदाचित कट-कारस्थाने यांना जास्त TRP मिळत असावा.
आणखी काही जुन्या मालिका म्हणजे एक 'third rock from sun'. ज्यात काही परग्रहवासी माणसाचे रूप घेऊन मानवी जीवन जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. ती सुद्धा छान आहे.
third rock from sun
नवीन मालिकांमधली माझी एक आवडती म्हणजे 'the exes', तिला एवढी प्रसिद्धी का मिळत नाही ते कळत नाही. तीन डिवोर्स झालेल्या नवर्यांना त्यांची वकील त्यांना alimony परवडत नाही आणि जीवनात स्थैर्य मिळावे, म्हणून एका छताखाली आणते. त्यातही आमचा ''न्यूमन'' आहेच!
the exes

फेरफटका's picture

6 Apr 2016 - 7:47 pm | फेरफटका

अ‍ॅकॉर्डिंग टू जिम चांगली होती, पण त्यात एक प्रकारचा तोच-तो पणा होता. शीर्षकात सुचवल्याप्रमाणे शेवटी कितीही चुका केलेला जिमच त्याच्या तोकड्या लॉजिक च्या जीवावर त्याच्या बायकोकडून (जिची भुमिका बरेच वेळा बरोबर असायची) त्याची आरती ओवाळून घ्यायचा. खूप टिपीकल अमेरिकन पुरूषप्रधान मालिका होती.

येडाफुफाटा's picture

6 Apr 2016 - 9:43 pm | येडाफुफाटा

तुमच्या वर्णनावरून everybody loves remond शी पण साधर्म्य वाटते.

फेरफटका's picture

6 Apr 2016 - 9:49 pm | फेरफटका

साधर्म्य आहेच. रेमंड मधे कॅरेक्टर्स थोडे जास्त आहेत.

येडाफुफाटा's picture

7 Apr 2016 - 2:38 pm | येडाफुफाटा

येस मिनिस्टर/येस प्राइम मिनिस्टर हि मालिका हि उत्कृष्ट विनोदी मालिका म्हणता येईल पण ती सीटकॉम नाही आपण ती पाहोली आहे काय?

फारएन्ड's picture

7 Apr 2016 - 9:20 pm | फारएन्ड

जबरी आहेत. त्यातील कोट्स एरव्ही त्यासारख्या सिच्युएशन्स मधे कायम आठवतात. उदा: ऑफिस मधे कधी राजकारण चालू असताना - "खर्‍या" उत्तरापेक्षा "योग्य" उत्तर महत्त्वाचे असते. तेथे नेहमी मी ही लाईन फेकतो: :)
"I don't want the truth. I want something I can tell the parliament"

येडाफुफाटा's picture

7 Apr 2016 - 9:30 pm | येडाफुफाटा

अगदी. कोणत्याही राजकारणाला तंतोतंत लागू पडतील. यांचीसुद्धा बरिच पारायणे झाली आहेत. याचा रिमेक यशस्वी झाला नाही.पण थिक ऑफ इट हा ह्याचा ह्या जमाण्यातला succesor शो आहे.

फारएन्ड's picture

9 Apr 2016 - 9:44 pm | फारएन्ड

बद्दल ऐकले आहे आणि पाहायची आहे. हे तुम्हाला आवडले असेल तर एक चित्रपट पाहिला नसेल तर नक्की पाहा - "इन द लूप" ब्रिटिशच आहे. मी येथे मिपावर बहुधा लिहीले आहे त्याबद्दल.

सायकलस्वार's picture

6 Apr 2016 - 5:40 pm | सायकलस्वार

फ्रेंड्स = वपु
साईन्फेल्ड = पुलं
फ्रेझर = जीए

किंवा

फ्रेंड्स = थर्ड क्लास कंपार्टमेंट
साईन्फेल्ड = सेकंड क्लास कंपार्टमेंट
फ्रेझर = फर्स्ट क्लास कंपार्टमेंट

(तिन्ही शोज बघणारा)
सायकलस्वार

येडाफुफाटा's picture

6 Apr 2016 - 6:46 pm | येडाफुफाटा
येडाफुफाटा's picture

6 Apr 2016 - 6:46 pm | येडाफुफाटा
येडाफुफाटा's picture

6 Apr 2016 - 6:47 pm | येडाफुफाटा

पुष्कळांना एलेन पेक्षा रेचेल (जेनिफर अनिस्टन) जास्त सुंदर (हॉट) वाटते. :विंकः

कारण पुष्कळ लोक करमणुकीसाठी टीव्ही बघतात, अभ्यासू वृत्तीने नाही. जसे बरेच लोक भाषेचे सौंदर्य, लेखाच्या प्रतिभेची लांबी रुंदी, खोली, उंची अभ्यासण्या पेक्षा गोष्टीत पुढे काय होते, शेवट काय होतो हे बघायला पुस्तक वाचतात.
माझा एक मित्र फिजिक्स च्या पुस्तकात सुद्धा, भाषा, विषय समजावून देण्याची क्षमता इ. गोष्टींची चर्चा करायला बघायचा. शेवटी तो शास्त्र विषय सोडून भाषा शिकण्याकडे वळला.

येडाफुफाटा's picture

6 Apr 2016 - 6:40 pm | येडाफुफाटा

एलेन ला स्टेरिओटाईप नाही केले साईनफेल्ड मध्ये. ती मुक्त opionated आहे. वरून कसलाही मेकअप अथवा चांगला पोशाख वगैरे दाखविलेले नाहीत. एलेन आपल्या खेळायला भिडू सारखी वाटत असल्याने मला हॉट वाटण्याचा प्रश्नच आला नाही. बाकी फ्रेंड्स देखील त्यातल्या विनोदासाठी बघत असल्याने आमची नजर 'त्या काळात' तरी 'तशी'वळली नाही.☺

साधा मुलगा's picture

7 Apr 2016 - 9:40 pm | साधा मुलगा

इलेन पण छान आहे हो ! एका एपिसोड मध्ये साडीत पण छान दिसत होती!

येडाफुफाटा's picture

6 Apr 2016 - 6:33 pm | येडाफुफाटा

मला न्यूमनचा गुबगुबीत लहान मुलासारखी शरीरयष्टी, काम झाल्यावर जाताना दुडूदुडू पळण्याची स्टाईल खूप मस्त वाटते.
बाकी न्यूमन आणखी दोन चित्रपटातल्या प्रसंगामुळे विशेष प्रसिद्ध आहे.कोणत्या ते सांगू शकाल काय?☺
फ्रेन्डस् मध्ये आवडू शकतील अशी फिबी सोडली तर सगळी पात्रे आहेत. साईनफेल्ड मधल्या पात्रांशी आपण relate होत नाही तर त्यांच्या परिस्थितीवर हसतो.
HIMYM हि मला फ्रेंड्स ची जवळपास नक्कल वाटत राहते.मी त्याच्याशी relate होऊ शकलो नाही. Himym चा premise बार मध्ये असल्यानेही असू शकेल. हाच प्रॉब्लेम cheers बघतानाही आला होता.
TBBT बाबत मम्हणायचं झाल तर मला त्याची सेटिंगच प्रचंड आवडलेली. सायन्स मधील जोक विलक्षण ब्रेनी वाटत. ते समजून घायला माजा येई. पण नंतर प्रत्येकाच्या वेंधळया स्वभाववरच जास्त विनोद यायला लागले. मग उग पाट्या टाकल्यासारखे वाटायला लागले.
According to jim, thurd rock from sun, exes पाहिलेले नाही परंतु तुमच्या सांगण्यावरून एकदा पाहुन बघतो.

अनुप ढेरे's picture

6 Apr 2016 - 9:24 pm | अनुप ढेरे

साईनफेल्ड मधल्या पात्रांशी आपण relate होत नाही तर त्यांच्या परिस्थितीवर हसतो.

एक्झॅक्टली उलट. साइन्फेल्डच्या प्रत्येक पात्राशी थोडं थोडं रिलेट करता येतं मला.

येडाफुफाटा's picture

6 Apr 2016 - 9:45 pm | येडाफुफाटा

जॉर्ज,क्रेमर,एलेन शी काय रिलेट करता बुवा.☺

अनुप ढेरे's picture

7 Apr 2016 - 2:41 pm | अनुप ढेरे

अनेक सिचुएशन्स मधलं त्यांच वागणं रिलेट करता येतं!

साईनफेल्ड ही एक आवडती मालीका आहे. मात्र त्याचा शेवट एकदमच विचित्र केला होता... काही अर्थच नाही. एका अर्थी "show about nothing" हे त्यांचे ब्रिदवाक्य त्यांनी पूर्णत्वास नेले.

या साईनफेल्डचा वापर एका अर्थशास्त्राच्या प्राध्यापकाने वर्गात अर्थशास्त्र शिकवण्यासाठी केला. त्याची हे गंमतीशीर संस्थळ:

http://www.yadayadayadaecon.com/

येडाफुफाटा's picture

7 Apr 2016 - 2:43 pm | येडाफुफाटा

हा हा☺ त्या शेवटाबद्दल त्यांना खूप शिव्या पण बसल्या आहेत. साईनफेल्ड फिनाले फियास्को. पण तसही ते पारंपरिक एन्ड दाखवूच शकले नसते कारण लोकांना भावनिक करणारी ती सिरीयल नव्हतीच. पण त्यांनी नुसता रिकॅप मारायला नको होता.

विकास's picture

6 Apr 2016 - 8:07 pm | विकास

साईनफेल्डचा कोक्रिएटर लॅरी डेव्हीड हे एक अजब रसायन आहे. असे म्हणतात की त्याच्या स्वभावावरून त्यानेच जॉर्जची कॅरेक्टर तयार केली. या लॅरी डेव्हीडचा एचबिओ शो होता - Curb Your Enthusiasm. हा पण बघण्यासारखा आहे. फक्त तो अचानक अंमळ "प्रौढांसाठी" असल्याप्रमाणे होतो एव्हढे लक्षात ठेवून बघा! :)

येडाफुफाटा's picture

6 Apr 2016 - 9:59 pm | येडाफुफाटा

Curb your enthusiasm असे भयावह नाव वाटणारी सिरीज साईनफेल्डचीच पुढची आवृत्ती आहे. ओरिजिनल साईनफेल्ड NBC वर रिलीज झाल्याने फॅमिली ऑडीएन्स जपण्यासाठी त्यांना प्रौढ विषय हाताळता येत नव्हते. सेक्स सीन्स, शिव्या, रेसिस्ट टिपण्या वगैरे दाखवता येत नव्हते. म्हणून साईनफेल्ड नंतर curb काढला गेला. हि मालिका क्रिटिकची आवडती असली आणि त्याची क्वालिटी दर्जेदार असली तरी ती जास्त लोकप्रिय होऊ शकला नाही. पण त्याचा स्वतःचा एक चाहता वर्ग आहे. त्यात मीपण आलो.
आणि जॉर्ज चे पात्र शंभर टक्के लॅरी वरूनच घेतले आहे. त्यांनी बऱ्याच एपिसोड्स मध्ये तसे सूचित पण केले आहे. बाकी curb मधील लॅरीचे पात्र म्हणजे त्याचेच अतिशयोक्त रूप आहे. लॅरी म्हणतो कि माझे पात्र म्हणजे मी जर सगळे सामाजिक नियम पाळले नसते तर होणारे पात्र आहे.
तो अंमळ प्रौढांसाठी असल्याने साईनफेल्ड पेक्षा विशेष आहे. खासकरून मला आठवणारा आणि आवडलेला एपिसोड् म्हणजे "Crazy eyed killah" ह्यात एक आफ्रो अमेरिकन रॅप करणारा लॅरी ला विचारत असतो कि "Are you my nigger larry?".

बोका-ए-आझम's picture

6 Apr 2016 - 9:32 pm | बोका-ए-आझम

बोचरा आणि उपरोधिक विनोद आहे. Friends मला कधीच बघावीशी वाटली नाही. लोक त्याचं कौतुक करतात पण मला एक एपिसोडही बोअर होतो.

येडाफुफाटा's picture

7 Apr 2016 - 9:34 pm | येडाफुफाटा

जास्त ड्रामा वाटत असेल तुम्हाला. पण बाकी बरेच विनोद दर्जेदार क्वालिटीचे आहेत.

द हाऊस आॅफ कार्ड्स, कॅसल, २४, अमेरिकन क्राईम स्टोरी, द मेंटॅलिस्ट, प्रिझन ब्रेक, हसल, लाॅ अँड आॅर्डर या आवडत्या मालिका. येस मिनिस्टर आणि येस प्राईम मिनिस्टर या अभिजात विनोदी मालिका आहेत. विनोदी मालिकांमध्ये त्याच जास्त आवडल्या आणि अर्थातच साईनफेल्ड.

येडाफुफाटा's picture

9 Apr 2016 - 6:07 pm | येडाफुफाटा

येमि/ येप्रामि दर्जेदार खर्याच ते त्यांच्या दर्जेदार राजकीय/ प्रशासकीय निरीक्षणामुळे, साईनफेल्ड:सामजिक संकेतांना मोडीत काढल्यामुळे, त्याचप्रकारे फ्रेन्डस्: सहा प्रकारच्या मित्रातील स्वभावाचे अगदी व्यवस्थित निरीक्षण केले आहे आणि विनोद अर्थातच आहे या सगळ्या मालिकांमध्ये.
बाकी वरच्या तिन्ही मालिकांचा आजच्या जमान्यातील दुर्गुण म्हणजे स्टुडिओ ऑडीएन्स लाफ्टर ट्रॅक.
24 आणि प्रिसन ब्रेक मस्त पण 2-3 सिझननंतर खूपच ट्विस्ट वाढवतात राव. जरा manipulate केल्याची भावना येते.
हाऊस ऑफ कार्ड्स आवडतेच.
हसल पाहिली पण ओशन सिरीज बरोबर तुलना केल्याने एवढी पसंत पडली नसावी.
बाकी नाही पहिल्या. पण अमेरिकन क्राइम सिरीज चान्गले असे ऐकले आहे.

फारएन्ड's picture

9 Apr 2016 - 9:42 pm | फारएन्ड

हाउस ऑफ कार्ड्स मला एक राजकीय नाट्य असलेली सिरीज म्हणून खूप उथळ वाटते. वेस्ट विंग सारखे इतक्या वरच्या लेव्हलच्या राजकारणाचे, त्यांच्या जबाबदार्‍या, दैनंदिन कामकाज वगैरे चे सखोल चित्रण यात नाही. मी पाहायचो ते केविन स्पेसी जबरदस्त आवडतो म्हणून. दुसर्‍या तिसर्‍या सीझन मधे जाम बोअर झाली. आता चौथा सीझन चांगला आहे म्हणे.

हसल कोठे मिळेल? ओशन सिरीज माझी ऑल टाईम फेवरिट आहे. विशेषतः ११ आणि १३.

बबलु's picture

7 Apr 2016 - 2:45 am | बबलु

माझी पारायणे:-
Two & A Half Men: 2 times.
Friends: 4 times.
Seinfeld: 2 times.
Fraiser: 2 times.
How I met Your Mother: 2 times.

फारएन्ड's picture

7 Apr 2016 - 5:18 am | फारएन्ड

पण फ्रेण्ड्स ला तोड नाही. मी सहसा असे पाहिले आहे की फ्रेण्ड्स सुरू व्हायच्या आधी (१९९४ च्या आधे) ज्यांनी साइनफेल्ड पाहिली त्यांना ती जास्त आवडते. नंतर पाहणार्‍या बहुतेकांना फ्रेण्ड्स. मला तरी असे वाटते की फ्रेण्ड्स मधले विनोदाची रेंज खूप मोठी आहे - साधे 'फजिती' टाइप विनोदापासून ते खूप दर्जेदार कॉमेण्ट्स असलेले धमाल विनोद सगळे त्यात आहे. मी अनेक पारायणे केली आहेत पण अजूनही कधी कधी एखाद्या भागात आधी हुकलेले काहीतरी सापडते. त्यात त्याची 'डीवीडी' व्हर्जन ही अनेक एपिसोड थोडे जास्त मोठे असलेली आहे, पण नेटवर्क चॅनेल वर दाखवता येणार नाहीत असे अनेक धमाल विनोदी सीन्स्/संवाद तेथे आहेत.

फ्रेण्ड्स अजूनही अमेरिकेतसुद्धा जबरदस्त लोकप्रिय आहे. अनेक चॅनेल्स वर त्याचे रीरन्स सतत सुरू असतात. अमेरिकेचे उदाहरण या करता की इथे ती २००४ साली संपली. भारतात सलग कधी दाखवली गेली माहिती नाही.

येडाफुफाटा's picture

7 Apr 2016 - 2:36 pm | येडाफुफाटा

तुम्ही hbo वरचा the wire हा शो बघितला आहे काय? एकदम मस्त शो आहे. यावर रविवारी पोस्ट टाकतो

फारएन्ड's picture

7 Apr 2016 - 9:15 pm | फारएन्ड

नाही पाहिलेला अजून, पण खूप ऐकलेले आहे त्याबद्दल. अमेरिकेत अ‍ॅमेझॉन प्राइम वर आहे बहुधा. चेक करतो. पोस्ट जरूर आवडेल वाचायला. जरा रेडी संदर्भही मिळेल बघण्याआधी.

अंतु बर्वा's picture

7 Apr 2016 - 8:53 pm | अंतु बर्वा

Curb Your Enthusiasm आवडणार्यांनी लुई सीके पहावा असे सुचवेन. पण काही जोक्स १८+ असल्याने मुलांसोबत पाहु नये :-)

येडाफुफाटा's picture

7 Apr 2016 - 9:25 pm | येडाफुफाटा

ऐकलेले होते. आता पाहून बघतो. धन्यवाद.

विकास's picture

7 Apr 2016 - 9:45 pm | विकास

कुठे असतो हा शो?

अंतु बर्वा's picture

8 Apr 2016 - 11:01 pm | अंतु बर्वा

अमेरीकेत नेटफ्लिक्सवर मिळेल. थोडा स्टँडअप कॉमेडी, थोडा लुईचं पर्सनल लाईफ असं मिक्स्चर आहे.