संकुचीत विचार बाजूला ठेऊन उदात्त विचार करण्याची क्षमता असेल तर नास्तिकांनाही हिंदू जिवनपद्धतीचा अवलंब करता यावा. धर्मसंस्था थेअरी मध्ये उदात्त दिसतात पण दुर्दैवाने अनेकदा व्यवहारात संकुचितवृत्तीच्या धर्ममतावलंबीकडून धर्मसंस्थांना आक्रसून टाकले जाताना दिसते अगदी तसेच विवीध समाजघटकांनी हिंदू संस्कृतीत योगदान देऊनही त्यांना अव्हेरणे, नकारात्मक आणि अथवा विषम वागणूक देणे हे हिंदूंमध्येही दिसते यात नास्तीकांचेही योगदान नाकारले जाताना दिसते. जेव्हा भारतातील हिंदू कुपमंडूकवृत्त धारणकरुन नास्तीकांचे योगदान नाकारु इच्छितात तेव्हा ते योगदान हिंदूत्वाच्या नावे वर्ग करण्याचा आग्रह धरण्या पेक्षा नास्तीकांचे भारतातील योगदान असे म्हणणे रास्त होणार नाही का ?
त्यांच्या योगदानाचे मुल्य किती हे तर इतरेजन आणि काळ ठरवेल. या धाग्याचा उद्देश नास्तीक म्हणवले जाणार्यांच्या सकारात्मक योगदानाची नोंद घेणे आहे.
भारतीय नास्तीकांनी इतर विवीध क्षेत्रात योगदान केले आहेच पण चार्वाक, सांख्य, मिमांसा, अजिवीका, जैन, बौद्ध अशा विवीध तत्वज्ञानाच्या क्षेत्रातही नास्तीकांकडून भरीव योगदान झाले आहे.
विसाव्या आणि एकविसाव्या शतकात वि.दा. सावरकर, सत्येंद्रनाथ बोस, मेघनाद सहा, सुब्रमण्यम चंद्रशेखर, अमर्त्य सेन, अमोल पालेकर, श्रीराम लागू, बाबा आमटे, भगत सिंग, विजय तेंडूलकर अशी नावे दिसतात. अजूनही असतील अशा व्यक्ती आणि त्यांचे रचनात्मक कार्य यांची या धाग्याच्या माध्यमातून माहिती करुन घेऊ.
या धागा लेखाचा माझ्या व्यक्तिगत विश्वास आणि श्रद्धांशी संबंध नाही. केवळ व्यक्तिगत विश्वासावरुन कुणाचेही सकारात्मक योगदान नाकारले जाऊ नये, या धागा लेखाचा उद्देश नास्तीक व्यक्तींनी भारतात केलेल्या रचनात्मक योगदानाची आदरपुर्वक नोंद घेणे आहे या कार्यात सहभागी होण्यासाठी आभार.
प्रतिक्रिया
3 Apr 2016 - 1:18 pm | अशोक पतिल
महर्षी कर्वे यांचेही योगदान दुर्लक्षीत करुन चालनार नाही .
3 Apr 2016 - 1:27 pm | माहितगार
छान प्रतिसाद, आभार.
3 Apr 2016 - 1:27 pm | तर्राट जोकर
एक शंका: महात्मा फुले, आंबेडकर हे नास्तिक नव्हते काय?
3 Apr 2016 - 1:34 pm | माहितगार
आस्तीकता आणि नास्तीकता स्ब्जेक्टीव्ह टर्मीनॉलॉजी आहेत कड्डक व्याख्या केली तर कोणत्याही दोन पंथ अथवा परंपराम्चे विचार एक दुसर्याशी मिळणार नाहीत म्हणून ९९.९९ टक्के लोक नास्तीक असतील. उदाहरणार्थ वैदीक आणि बायबलाचे पालोवर एक्मेकांना कदाचित नास्तीक म्हणतील कारण एकजण बायबल मध्ये श्रद्धा ठेवत नाही दुसरा वेदात श्रद्धा ठेवत नाही, पण दोघेही -वैदीक आणि बायबलीक- इश्वरावर विश्वास ठेवतात हे लक्षात घेतले तर आस्तीक ठरावेत.
नास्तिकतेची व्याक्या काय यावर अवलंबून आहे. महात्मा फुले निर्मीकावर विश्वास ठेवत व्याख्या कड्डक ठेवली नाही तर ते आस्तीक ठरावेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आस्तीकते बद्दल इतर जाणकारच माहिती देऊ शकतील.
5 Apr 2016 - 12:35 pm | नाना स्कॉच
आंबेडकर नक्कीच नास्तिक नसावे (अभ्यास कमी आहे वाढवायला आवडेल), फुले नास्तिक नसावेत अन्यथा त्यांनी सत्यधर्मात "निर्मिकाची" चर्चा केली नसती असे वाटते.
3 Apr 2016 - 1:43 pm | तर्राट जोकर
तसेच प्रबोधनकार ठाकरे हे ही आजकाल विस्मृतीत गेलेले आहेत. बहुधा तेही नास्तिक असावेत. सोबतच पेरियार
हो, तुमच्यामते आधी नास्तिकतेची व्याख्या स्पष्ट होणे महत्त्वाचे. माझ्यामते कट्टर नास्तिकपेक्षा बुद्धीवादी, कर्मकांड, बुवाबाजीत विश्वास न ठेवणारे असे थोडे सुटसुटीत केले तर अजुन व्यक्ती येतील आणि भारतातले योगदानाच्या संबंधी अधिक माहिती मिळेल.
3 Apr 2016 - 1:55 pm | माहितगार
आपणास लेखाचा उद्देश लक्षात आला असावा तेव्हा आपणच सुचवावे
3 Apr 2016 - 2:15 pm | तर्राट जोकर
नक्की.
3 Apr 2016 - 2:35 pm | कंजूस
आस्तिकांना हिंदू जीवनपद्धती मनसोक्त आचरू देतात हेच भारतातल्या नास्तिकांचे योगदान ( कतृत्व ) आहे.
संदीप डांगे कुठे आहेत?
4 Apr 2016 - 12:11 am | संदीप डांगे
नमस्कार काका, आठवण काढलीत? बोला काय म्हणता?
4 Apr 2016 - 6:52 am | कंजूस
नमस्कार संदीप ,असे धागेआले की तुमचा प्रतिसाद हवाच.दुसरं एक कारण आठवणीचं ते म्हणजे उज्जैन कुंभमेळा २२ एप्रिल ते २ मे होत आहे.कुंभमेळ्यावर काही लिहा.
3 Apr 2016 - 2:39 pm | टवाळ कार्टा
कि फर्क पैंदा
4 Apr 2016 - 2:19 am | गामा पैलवान
तजो,
प्रबोधनकारांच्या लेखाचे हे संकेतस्थळ आहे : http://www.prabodhankar.org/
तिथले लेख पाहता ते नास्तिक नसावेत. ते कर्मसिद्धांत मानतात. म्हणूनच मला कर्मसिद्धांत मानणारा तो आस्तिक अशी व्याख्या करावीशी वाटते.
आ.न.,
-गा.पै.
4 Apr 2016 - 10:47 am | अर्धवटराव
नास्तीक समजल्या जाणारे पंथ/धर्म (बौद्ध वगैरे) आणि लोकं (सावरकर वा कुणीही इतर) यांना ते नास्तीक आहेत म्हणुन त्यांचं महत्व कुणी नाकारलय?
4 Apr 2016 - 11:19 am | माहितगार
नाकारणारे आहेत म्हणूनच तर हा धागा प्रपंच केला, केवळ नाकारणेच नाही तर आस्तीक असो वा नास्तीक परस्पर विरोधी विश्वास आणि विचारांच्या व्यक्तींना मनोविकारी ठरवू पहाणे डोक्यात जाते. एकमेकांचा सहभाग आणि योगदान सभ्यतेने समजून घेतले जावयास हवे किंवा कसे ?
4 Apr 2016 - 11:22 am | अर्धवटराव
पण या नाकारण्यामागे त्यांचं नास्तिक्य कुठे आडवं आलं ?
4 Apr 2016 - 11:49 am | माहितगार
आपल्या प्रश्नाचे उत्तर ज्यांना इतरांचे (अस्तीक्य असो वा) नास्तीक्य आडवे येते त्यांनी द्यावे. मला कुणाचेही अस्तीक्य आणि नास्तीक्य दोन्हीही आडवे येत नाही. एक दुसर्यांचे विश्वास आडवे येणारी मंडळी असतात हे आपल्याला नाकारावयाचे आहे का ?
4 Apr 2016 - 11:21 pm | अर्धवटराव
तुम्ही धागा काढला ना नास्तिकांना त्यांचं ड्यु रेक्ग्नीशन मिळत नाहि म्हणुन ? अगदी नास्तिकांची उदाहरणं देखील दिली आहेत तुम्ही. त्या सगळ्या उदाहरणांत व्हिक्टीम्स ला त्यांची नास्तीकता कशी बाधक ठरली याबद्दल तुमचं स्वतःचं काहिच ऑब्जर्व्हेशन नाहि? मग धागा कशाच्या आधारे कढलात ?
5 Apr 2016 - 12:15 am | माहितगार
अर्धवटराव यांच्या चांगल्या कामाची दखल घेणे हा मुख्य उद्देश महत्वाचा आहे, उर्वरीत खल करण्यासाठी वेगळे धागे उपलब्ध आहेत असो.
5 Apr 2016 - 12:26 am | अर्धवटराव
आमच्या चांगल्या कामाची दखल घ्यायला खास धागा काढलात ?? धन्यवाद :प
चांगल्या कामाची दखल घ्यायला जर हा धागा असेल धाग्याच्या शिर्षकावरुन तसं वाटत नाहि. तुम्ही स्पेसिफिकली नास्तिक लोकांना त्यांच्या कार्याचं ड्यु क्रेडीट मिळत नाहि असा विषय बोर्डावर आणला आहे. असो. इत्यलम.
4 Apr 2016 - 10:58 am | गॅरी ट्रुमन
नास्तिक आणि आस्तिक म्हणजे नक्की कोण याच्या तुमच्या व्याख्या नक्की कोणत्या यावर बरेच काही अवलंबून राहिल. अनेकदा कर्मकांडे करणारा तो आस्तिक अशी अत्यंत बाळबोध व्याख्या अनेक लोक करतात.त्यामुळे आस्तिक म्हटले की एकतर पूजाअर्चा-उपासतापास करणारा किंवा अगदी अमक्यातमक्याच्या जयंतीच्या दिवशी रस्त्यावर लाऊडस्पीकर लाऊन धिंगाणा घालणारा असेही चित्र ही मंडळी उभी करतात.
मी स्वतः देवाचे अस्तित्व मानतो आणि त्याअर्थी आस्तिक म्हणायला पाहिजे.पण कोणत्याही प्रकारच्या कर्मकांडांना अजिबात थारा देत नाही.घरी देवाच्या मूर्ती आहेत त्यापण बायकोला हव्या आहेत म्हणून.माझ्या नातेवाईकांपैकी काही बरीच कर्मकांडे करतात.मी कधी आयुष्यात न ऐकलेल्या गोष्टीही ते करतात. उदाहरणार्थ दत्ताचा पवमान नामक यज्ञ माझ्या एका नातेवाईकाने केला होता.हा प्रकार मी त्यापूर्वी कधीच ऐकला नव्हता. अन्य एकाशी बोलताना 'दत्त्याचा पवमान' असे म्हटल्यामुळे मार खाता खाता वाचलो होतो :) आता मी तुमच्या मते आस्तिक आहे की नास्तिक?
जाताजाता-- हा लेख तिकडे टाकलात तर अगदी प्रतिक्रियांचा पाऊस पडेल.
4 Apr 2016 - 11:22 am | माहितगार
या धागा लेखाचा उद्देश नास्तीक व्यक्तींनी भारतात केलेल्या रचनात्मक योगदानाची आदरपुर्वक नोंद घेणे आहे
4 Apr 2016 - 11:27 am | गॅरी ट्रुमन
वर अधोरेखित केलेला शब्द-- नास्तिक म्हणजे नक्की कोण?
4 Apr 2016 - 12:15 pm | माहितगार
मी वर तजोंनाही तेच म्हटलय आपल्याला धागा लेखाचा उद्देश लक्षात आला असेल तर आपणच सुचवावे हे अधिक योग्य, या धागा चर्चेसाठी खालील किमान निकष उपयूक्त असतील
१) जे इश्वराचे अस्तीत्व नाकारतात
आणि/किंवा
२) जे जन्मदत्त + आणि इतर कोणतेही धर्मविचार नाकारतात
आणि/किंवा
३) त्यांच्या स्वतःच्या कसोटीनुसार स्वतःस नास्तीक जाहीर करतात
आणि/किंवा
४) त्यांचा स्वतःचा जन्मदत्त धर्म अथवा समुदाय त्यांना नास्तीक जाहीर करतो.
हे चार निकष एक्झॅक्ट असतील असे नव्हे त्यामुळे इतरांनी सुधारणा सुचवावयास हरकत नाही. पण धाग्याचा मुख्य उद्देश केवळ आस्तीक कोण अथवा नास्तीक कोण या चर्चेत गुंतून जाणे नाही तर सकारात्मक/रचनात्मक योगदानांची नोंद घेणे आहे. रचनात्मक कामाची सकारात्मक नोंद घेताना एखादी व्यक्ती प्रत्यक्षात नास्तीक निघाली नाही/ अथवा नास्तीक नाही असे वाटले तर त्यात फारसे बिघडण्यासारखे नसावे. चुकुन एखाद्या आस्तीक किंवा नास्तीक असे चुकीचे वर्गीकरण केल्याने अंगाला भोक पडत नाही त्यांचे रचनात्मक कामाचे मुल्य कमी होत नाही हेच तर या धागा चर्चेतून निदर्शनास आणावयाचे आहे.
4 Apr 2016 - 2:04 pm | आनन्दा
माझ्यामते तरी तीव्र इहवादी म्हणजे नास्तिक.. अर्थात
१. जो कोणतीही अमूर्त शक्ती नाकारतो.
२. जो कोणतेही पारलौकिक जीवन नाकारतो
३. ज्याचा पुनर्जन्मावर विश्वास नाही
तो नास्तिक. मग त्याचा धर्म कोणताअही असो.
4 Apr 2016 - 3:01 pm | गॅरी ट्रुमन
तरी नास्तिक म्हणजे तुम्हाला नक्की कोण अभिप्रेत आहे याची स्पष्टता यायला नको का? अनेकदा आस्तिक = कर्मकांडवाले आणि नास्तिक = कर्मकांडाला विरोध असणारे अशी सोयीस्कर व्याख्या केली जाते.तुमची पण तीच व्याख्या आहे की नाही हे मला माहित नाही.
वर मी माझ्याच विषयी लिहिले आहे--माझा देवाच्या अस्तित्वावर विश्वास आहे पण कोणत्याही प्रकारच्या कर्मकांडावर नाही.त्यामुळे मी दोन्ही बाजूंकडून शिव्या खातो-- जे स्वतःला अस्तिक म्हणवतात त्यांच्या मते मी नास्तिक आहे आणि जे स्वत:ला नास्तिक म्हणवतात त्यांच्या मते मी आस्तिक आहे :) त्यामुळे अस्तिकता-नास्तिकता हा विषय बराच निसरडा आहे. हा विषय निसरडा आहे हे अधिक स्पष्ट करायला लिहितो. तुम्ही वर तात्याराव सावरकरांना नास्तिकांमध्ये गणले आहे. पण तात्यारावांच्याच जयोस्तुते गाण्यात स्वतंत्रतेला एखाद्या देवीची उपमा दिली आहे आणि आपल्याला यश मिळावे म्हणून त्याच देवीला वंदन करावे (यशोयुताम वंदे) असे तात्यारावांना वाटत होते. म्हणजे माणसापेक्षा मोठी कुठलीतरी शक्ती आहे आणि त्या शक्तीला वंदन करावे असे त्यांनाही वाटत होते असे म्हटले तर? या कारणाने मी म्हणतो की तात्याराव आस्तिक होते. त्यांचा सर्व कर्मकांडांना प्रखर विरोध होता हे तर स्पष्टच आहे.या कारणावरून त्यांना नास्तिक म्हणणारेही आहेतच.
तेव्हा अशा निसरङ्या विषयाविषयी चर्चा असेल तर तुमची जी काही व्याख्या आहे ती-- तुम्हाला नक्की काय अभिप्रेत आहे हे कळल्याशिवाय अधिक चर्चा व्हायची कशी?
उद्या समजा मी चर्चाविषय काढला-- भारताच्या जडणघडणीत/प्रगतीत झोंबी लोकांचे योगदान.आता मुद्दलात झोंबी म्हणजे कोण हेच स्पष्ट नसेल (किंवा त्याविषयी अनेक मतेमतांतरे असतील) तर या विषयावर चर्चा होणार कशी?
4 Apr 2016 - 3:09 pm | तर्राट जोकर
मग नास्तिक न म्हणता बुद्धीवादी आणी अज्ञेयवादी यांचे योगदान म्हणावे काय? नास्तिक ही एक निसरडी संज्ञा आहे.
4 Apr 2016 - 3:20 pm | माहितगार
ठिक आहे आनन्दा म्हणतात तसे तुम्ही 'तीव्र इहवादी' लोकांच्या योगदानापासून चालू करा.
* अलिकडे प्रा. शेषराव मोरे यांचा लोकसत्तातील भारतीय सांस्कृतिक ऐक्याचे पहिले सूत्र हा लेख वाचण्यात आला. लेखाच्या शेवटी
अशा शब्दात स्वतःला नास्तीक जाहीर केले आहे, शेषराव मोरे यांच्या योगदानाची दखल या धाग्या खाली घ्यावयास नको का , घ्यावयाची असेल तर त्यांच्या कार्यातील रचनात्मक आणि सकारात्मक भागाची नोंद कशी घ्यावी.
4 Apr 2016 - 5:34 pm | गामा पैलवान
एकंदरीत स्वतःला नास्तिक म्हणवतो तो नास्तिक असं दिसतंय.
-गा.पै.
5 Apr 2016 - 12:29 pm | नाना स्कॉच
मला वाटते तांत्रिकदृष्टीने तुम्ही "अग्नोस्टिक" म्हणवले जाल, म्हणजे कुठल्यातरी एक हायर ऑर्डरला मानणारा पण त्या ऑर्डर ला पूजायसाठी असलेल्या कर्मकांडावर विश्वास नसणारा असा माणुस
4 Apr 2016 - 11:45 am | एकांतप्रेमी
जाईल त्या संस्थळावर हेत्च दळण चालू आहे...
:)
जणू सर्व आस्तिक झाले किंवा सर्व नास्तिक झाले की सारे प्रश्न चुटकीशरशी सूटणार आहेत?
4 Apr 2016 - 12:17 pm | माहितगार
+१ तेच तेच दळण नको म्हणूनच ह्या धागा लेखातून जरा वेगळा रचनात्मक कामाची नोम्द घेण्याचा उद्देश ठेवला आहे.