मिपाकरहो नमस्कार,
मिपा विडंबन स्पर्धा, या एका आगळ्यावेगळ्या आणि काहीशा अनवट स्पर्धेला अनेक मिपाकरांनी हिरिरीने प्रतिसाद दिलेला आहे. प्रेम, राजकारण, फजिती या तीनही विषयांवर आधारित विडंबनांच्या प्रवेशिकांचा ओघ उत्साहवर्धक असा होता. विडंबनपटूंनी रंगांची उधळण तर करून झालेली आहे; आता वेळ आहे कुठला रंग सगळ्यात उठून दिसतो ते ठरवण्याची. आणि ही जबाबदारी स्पर्धेच्या धाग्यात म्हटल्याप्रमाणे सगळ्या मिपाकरांची आहे.
मतदान ! आलेली एकापेक्षा एक सरस विडंबनं बघता, विडंबन करण्याइतकंच आव्हानात्मक हे मतदान असणार आहे. तेंव्हा सर्वप्रथम तीन विषयांकरिता असलेल्या तीन स्वतंत्र मतदान धाग्यांचा आस्वाद घ्या; हसा, वाहवा द्या, आणि सरतेशेवटी मतं द्या.
प्रवेशिका पाठवण्याची मुदत एक दिवस वाढवल्याने मतदान करण्याकरिता आता २५ तारखेपर्यंत वेळ आहे. मतदान करताना तीन क्रमांक निवडणे अपेक्षित आहे. (उदाहरणार्थ - क्रमांक १ - विडंबन क्र य, क्रमांक २ - विडंबन क्र क्ष, या प्रमाणे). मतांची मोजणी करून अंतिम विजेत्याची निवड होईल.
निकाल घेऊन ठरल्याप्रमाणे २८ तारखेला हजर होऊ.
पण तत्पूर्वी, विडंबनकार मिपाकरांचे कौतुक आणि आभार.
या धाग्यात 'प्रेम' या विषयाला धरून आलेली विडंबन काव्य दिलेली आहेत. इतर विषयांसाठी स्वतंत्र धागे खालीलप्रमाणे
विषय: राजकारण
विषयः फजिती
विडंबन क्र. १
मूळ काव्यः जेंव्हा तिची नि माझी
मंगेश पाडगावकर
जेव्हा तिची नि माझी चोरून भेट झाली
झाली फुले कळ्यांची, झाडे भरात आली
दूरातल्या दिव्यांचे मणिहार मांडलेले
पाण्यात चांदण्यांचे आभाळ सांडलेले
कैफात काजव्यांची अन् पालखी निघाली
केसांतल्या जुईचा तिमिरास गंध होता
श्वासातल्या लयीचा आवेग अंध होता
वेड्या समर्पणाची वेडी मिठी मिळाली
नव्हतेच शब्द तेव्हा, मौनात अर्थ सारे
स्पर्शात चंद्र होता, स्पर्शात लाख तारे
ओथंबला फुलांनी अवकाश भोवताली
विडंबनः
जेव्हा तिची नि माझी ठरवून भेट झाली
जेव्हा तिची नि माझी ठरवून भेट झाली
चाळीत होय गर्दी, दारी वरात आली
पोस्टात पत्रिकांचे गठ्ठेच मांडलेले
शब्दांत व्याकरणाचे सर्वार्थ गंडलेले
चौकात नववधूची अन् पालखी निघाली
चाळीस शांततेचे बलिदान मान्य होते
ढोलातल्या लयीचे आवेग धन्य होते
वेड्या प्रदर्शनाची वेडी दिठी मिळाली
नव्हतेच शब्द तेव्हा,गर्दीत लोक सारे
स्पर्शात चंद्र कुठला, स्पर्शात उष्ण वारे
अन् थांबला जनांचा ट्रॅफिक भोवताली
जेव्हा तिची नि माझी ठरवून भेट झाली
चाळीत होय गर्दी, दारी वरात आली
----------------------------------------------
विडंबन क्र. २
मूळ काव्यः लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा
समर्थ रामदास स्वामी
लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा ।।
वीषे कंठ काळा त्रिनेत्री ज्याळा।।
लावण्य सुंदर मस्तकी बाळा।
तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा ।। १
।।
जय देव जय देव जय
श्री शंकरा आरती ओवाळूं तूज
कर्पुरगौरा ।। धृ ।।
कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा ।।
अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा।।
विभुतीचे उधळण शितकंठ निळा ।।
ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा।। २ धृ ।।
देवी दैत्यप सागर मंथन पै केले ।।
त्यामाजी अवचित हळाहळ सापडलें।।
ते त्वा असुरपणे प्राशन केले ।। नीळकंठ
नाम प्रसिध्द झाले ।। ३ धृ ।।
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।।
पंचानन मनमोहन मुनीजन सुखकारी।।
शतकोटी बिज वाचे उच्चारी ।।
रघुकुळाटिळक रामदासा अंतरी।। जय ।।
४ धृ ।।
विडंबनः
लव्ह करणे तुजवरती
लव्ह करणे तुजवरती मजला हा चाळा
विष करतो तुजला मी व्हॅलेंटाइन डेला
लावण्याच्या तुझीया बसती किती झळा
वार्यावर कुंतल ते, उडती झुळझुळा ॥ १ ॥
सय येता, कळ भिडते, माझ्या हृदयाला,
दर्शन मात्रे कलीजा, खल्लास झाला, हे देवी हे देवी ॥ ध्रु० ॥
कर्पुरगौर काया, नयनीभाव भोळा,
अर्धाधोरुक* धारुनी केसांशी चाळा,
मेकपची उधळण, वर टिशर्ट नीळा,
ऐसी सुंदरी उठवी हृदयात कळा, ॥ २ ॥
मित्र मैत्रिणींनी, गॅदरींग केले
त्यामधे अवचित गाणे तु म्हटले
सगळ्यांनी मग तुजला डोक्यावर घेतले
कोकीलकंठी नाम प्रसिध्द झाले ॥ ३ ॥
अंबरी कुठल्याही सुंदर दिसशी तु नारी
रोज तुझे ग दर्शन वाटे सुखकारी
शंभरजणीं मध्ये दिसते लै भारी
वासुकुलतिलक नित्य तुजला स्मरी ॥ ४ ॥
कठीण शब्दांचे शुध्द मराठी मधे अर्थ
*अर्धोरुक – Half Pant
*अर्धाधोरुक Half of the Half Pant
----------------------------------------------
विडंबन क्र. ३
मूळ काव्यः प्रेम कर भिल्लासारखं
कुसुमाग्रज
पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाल्या तारा,
पुरे झाले नदीनाले, पुरे झाला वारा,
मोरासारखा छाती काढून उभा रहा,
जाळासारखा नजरेमध्ये नजर बांधून पहा,
सांग तिला,
तुझ्याच मिठीत स्वर्ग आहे सारा...
शेवाळलेले शब्द आणिक यमकछंद करतील काय ?
डांबरी सडकेवरती श्रावण इंद्रधनू बांधील काय ?
उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत राहशील फिरत,
जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत,
नंतर तुला लगीनचिठ्ठी आल्याशिवाय राहील काय?
म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ,
प्रेम नाही अक्षरांचा भातुकलीचा खेळ,
प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत राहणं,
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत जाणं..
प्रेम कर भिल्लासारखं,
बाणावरती खोचलेलं...
मातीमध्ये उगवून सुध्दा,
मेघापर्यंत पोचलेलं.
शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस,
बुरुजावरती झेंड्या सारखा फडकू नकोस
उधळून दे तुफान सगळं काळजामध्ये साचलेलं,
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं...
विडंबनः
प्रेम कर हरणीसारखं
पुरे झाले रमेश सुरेश, पुरे झाला पशा,
पुरे झाले अभ्या जब्या, पुरे झाला किशा,
नागिणीसारखी कात टाकून उभी रहा,
ज्योतीसारखी नजरेस नजर मिळवून पहा,
सांग त्याला,
तुझ्या मनी एक त्यालाच थारा...
खोटी वचनं अन फसवे वायदे करतील काय ?
ईएमायवरती मजनू थ्री बीएचके बांधील काय ?
सावरीच्या कापसासारखी गावभर राहशील भिरभिरत,
जास्तीत जास्त काही आठवडे काढेल बाब्या प्रतीक्षेत,
नंतर तुला ब्रेकपचा मेसेज आल्याशिवाय राहील काय ?
म्हणून म्हणतो, सावर अजूनी जाण्याआधी वेळ,
प्रेम नाही लुटूपुटूचा उंदीर मांजराचा खेळ,
प्रेम म्हणजे शिकारी होऊन छळत राहणं,
प्रेम म्हणजे शिकार होऊन छळले जाणं...
प्रेम कर हरणीसारखं,
कपाळावरती गोंदलेलं...
धन्यापासून सुरू होऊन,
त्याच्यापाशी संपलेलं.
टवाळांच्या त्या भूलथापांना फसू नकोस,
जत्रेतील पिपाणीसारखी पँ पँ वाजू नकोस,
झटकून दे कन्फ्यूजन सारं मनामध्ये साठलेलं,
प्रेम कर हरणीसारखं कपाळावरती गोंदलेलं...
----------------------------------------------
विडंबन क्र. ४
मूळ काव्यः जिथे सागरा धरणी मिळते
पी. सावळाराम
जिथे सागरा धरणी मिळते, तिथे तुझी मी वाट पहाते
डोंगरदरीचे सोडून घर ते, पल्लव पाचूंचे तोडून नाते
हर्षाचा जल्लोष करूनी जेथे प्रीत नदीची एकरूपते
वेचित वाळूत शंख शिंपले, रम्य बाल्य ते जिथे खेळले
खेळाचा उल्हास रंगात येऊनी, धुंदीत यौवन जिथे डोलते
बघुनी नभीची चंद्रकोर ती, सागर हृदयी उर्मी उठती
सुखदुःखाची जेथे सारखी प्रीत जीवना ओढ लागते
विडंबनः
जिथे सागरा धरणी मिळते
जिथे सागरा धरणी मिळते,
तिथे तुझी मी वाऽट लावतेऽ वाऽट लावते,
जिथे सागर आऽ आऽ आ ||धृ||
आईबाबांचे सोडून घरटे,
आले तुजपाशी नशीबच फुटके,
वर्षाचा हिशोब गोळा करुनी येथेच करीन सगळे चुकते,
हो ऽ हो ऽ तिथे तुझी मी वाट लावतेऽ वाट लावते,
जिथे सागरा आऽ आऽ आ ||१||
वेचित वाळूत खडे शिंपले,
गम्य न मजला मी तुजवर फेकले,
प्रेमाचा आभास दावुनी मजला जिवाचे माझ्या तु केले खेळणे,
हो ऽ हो ऽ तिथे तुझी मी वाट लावतेऽ वाट लावते,
जिथे सागरा आऽ आऽ आ ||२||
बघुनी घेईन कोण सटवी पटली,
माझ्या हृदयी कळ ती ऊठली,
या दुःखाची मजलाच का सारखी ठेच लागते?
हो ऽ हो ऽ तिथे तुझी मी वाट लावतेऽ वाट लावते
जिथे सागरा आऽ आऽ आ ||३||
नणंद दिराचे घालीन लोणचे,
सासुचे सासर्यांकडे नंतर बघते,
परिणामाची न पर्वा मजला मी मुक्त झाले,
हो ऽ हो ऽ तिथे तुझी मी वाट लावतेऽ वाट लावते
जिथे सागरा आऽ आऽ आ ||४||
----------------------------------------------
विडंबन क्र. ५
मूळ काव्यः देहाची तिजोरी
जगदीश खेबुडकर
देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा
उघड दार देवा आता उघड दार देवा
पिते दूध डोळे मिटूनी जात मांजराची
मनी चोरट्याच्या का रे भिती चांदण्यांची
सरावल्या हातांनाही कंप का सुटावा
उजेडात होते पुण्य, अंधारात पाप
ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप
दुष्ट दुर्जनांची कैसी घडे लोक सेवा
स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरी
आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी
घडोघडी अपराध्यांचा तोल सावरावा
तुझ्या हाती पांडुरंगा तिजोरी फुटावी
मुक्तपणे भक्ती माझी तुझी तू लुटावी
मार्ग तुझ्या राऊळाचा मला आकळावा
भलेपणासाठी कोणी बुरेपणा केला
बंधनात असुनी वेडा जगी मुक्त झाला
आपुल्याच सौख्यालागी करील तो हेवा
विडंबनः
काय करू देवा ?
नेहा'ही' कमजोरी, भक्तीचाही हेवा
काय करू देवा आता काय करू देवा?
झाले प्रेम डोळे मिटूनी, जात मजनूची
मनी आता माझ्या का रे भिती लग्नाची?
धजावल्या विचारांनाही संप का सुचावा?
उजेडात होते प्रेम, अंधारात अहंह्हख्हख्खख्खी
ज्याच्या त्याच्या हाती आहे विख्खीवुख्खूविख्खी
चोर चावटांसी कैसे मिळे हा गोड मेवा?
बाप जणू रस्त्यावरचा मामा सरकारी
आपुलाच असला तरीही आपल्याला मारी
घरोघरी असल्यांचा तोल का सुटावा?
तुझ्या दारी पाडुंरंगा पोरगी पटावी
सहजपणे ती श्रीमंताची तूच मला द्यावी
मार्ग माझा भविष्याचा सरल सुकर व्हावा
लग्नासाठी ज्याने हा प्रेमखेळ केला
बंधनात अडकूनी तो फुका बळी गेला
आपुल्याच मुक्तीसाठी करील मग तो धावा
----------------------------------------------
----------------------------------------------
प्रतिक्रिया
19 Mar 2016 - 10:30 pm | एस
विडंबन क्र. १
(एकच मत द्यायचेय ना?)
20 Mar 2016 - 6:12 am | वेल्लाभट
मिपाकरांनी तीन क्रमांक निवडणे अपेक्षित आहे. (उदाहरणार्थ - क्रमांक १ - विडंबन क्र य, क्रमांक २ - विडंबन क्र क्ष, या प्रमाणे). मतांची मोजणी करून अंतिम विजेत्याची निवड होईल.
20 Mar 2016 - 8:21 am | एस
अच्छा!
२. विडंबन क्र. ५
३. विडंबन क्र. २
19 Mar 2016 - 10:42 pm | रेवती
एक मत द्यायचं असलं तर विडंबन क्र. १ ला आहे.
क्र. २ व तीनही ठरवायचे असल्यास कळवणे.
आणखी दोन धाग्यांसाठीही एक एक द्यायचेय की तीन?
20 Mar 2016 - 7:19 am | रेवती
क्र. २ लव्ह करणे.
क्र. ३. हरिणीसारखे प्रेम करणे.
20 Mar 2016 - 7:20 am | रेवती
क्र. २ लव्ह करणे.
क्र. ३. हरिणीसारखे प्रेम करणे.
20 Mar 2016 - 12:10 am | आदूबाळ
क्र2
20 Mar 2016 - 12:26 am | प्रदीप साळुंखे
क्र.2
20 Mar 2016 - 12:37 am | निशांत_खाडे
क्र.२
20 Mar 2016 - 5:06 am | जुइ
क्र.२
इतरही क्रमांक देयायचे आहेत ते कसे द्यावेत?
20 Mar 2016 - 8:12 am | जुइ
क्र २
क्र ४
क्र ३
20 Mar 2016 - 6:33 am | यशोधरा
क्र १ - लव्ह करणे तुजवरती
क्र २ - प्रेम कर हरणीसारखं
क्र ३ - जिथे सागरा धरणी मिळते
20 Mar 2016 - 9:35 am | जव्हेरगंज
क्र १ - लव्ह करणे तुजवरती
क्र २ - प्रेम कर हरणीसारखं
एवढंच आवडलं. त्यामुळे तिसरे मत देत नाही . चालेल का?
20 Mar 2016 - 12:08 pm | सर्वसाक्षी
क्र १ - लव्ह करणे तुजवरती
क्र २ - जिथे सागरा धरणी मिळते
क्र ३ - प्रेम कर हरणीसारखं
खरे तर १ क्र खूप आवडली पण विषयाला अनुसरुन नाही. लग्न हा विषय असता वा केवळ विडंबन स्पर्धा असती तर उत्तम विडंबन आहे
20 Mar 2016 - 1:41 pm | विश्वजित रामदास जाधव
१. विडंबन क्र. १ (ठरवून भेट झाली ) माझ्यामते "शब्दांत व्याकरणाचे सर्वार्थ गंडलेले" हि एकमेव विनोदी ओळ. आणि हि ओळ धरून सर्व, एक खरा अनुभव वाटावा अशी सुरेख कविता! भारीच!
२. विडंबन क्र. ५ (काय करू देवा) विख्खीवुख्खूविख्खी!! मजा आली!
अंधारात काय होते ते नीट कळाल नाही पण!! :-D
३. विडंबन क्र. २ (लव्ह करणे तुजवरती) सुंदर _/\_
20 Mar 2016 - 3:19 pm | भाते
१) विडंबन क्र. ३
२) विडंबन क्र. ५
३) विडंबन क्र. २
20 Mar 2016 - 6:17 pm | अजया
१.२
२.१
३.३
20 Mar 2016 - 8:53 pm | मित्रहो
१. ३
२. १
३. २
21 Mar 2016 - 12:40 am | सूड
वि क्र १ व २ यांना अनुक्रमे पहिला व दुसरा क्र्मांक
21 Mar 2016 - 1:09 am | डॉ सुहास म्हात्रे
क्र १ : २
क्र २ : ४
क्र ३ : ५
21 Mar 2016 - 9:28 am | नाखु
क्र १ - लव्ह करणे तुजवरती
क्र २ - जिथे सागरा धरणी मिळते व प्रेम कर हरणीसारखं. समान
21 Mar 2016 - 11:00 am | भरत्_पलुसकर
क्र 1 - प्रेम कर हरिणीसारखं
क्र 2 - जेव्हा तिची न माझी
क्र 3 - लव करने तुजवरती
21 Mar 2016 - 11:23 am | अभ्या..
फकस्त ३ नंबर.
हरणीसारखी कविता. त्यात बी माझं नाव आलंय म्हणून जास्त पाठिंबा.
.
.
आता वाजिवतो पिपाणी धुळवडीला. ;)
21 Mar 2016 - 4:01 pm | स्वामी संकेतानंद
क्र 1
क्र 3
बाकी गंडल्या आहेत असे मत आहे. म्हणजे वृत्तामध्ये नसल्याने अडखळतो आपण.
21 Mar 2016 - 7:39 pm | अनन्न्या
१) १
२) ३
३) २
21 Mar 2016 - 11:23 pm | रातराणी
१ - लव करने तुजवरती
२- प्रेम कर हरिनॆसारख
३ - काय करू देवा
24 Mar 2016 - 12:02 am | पैसा
१
४
२
24 Mar 2016 - 10:52 am | sagarpdy
४
३
२
24 Mar 2016 - 11:10 am | दमामि
१
3
2
24 Mar 2016 - 6:50 pm | लालगरूड
2
3
1
24 Mar 2016 - 8:48 pm | स्रुजा
माझे मतः
१
५
२
याच क्रमाने
25 Mar 2016 - 11:10 am | वेल्लाभट
मतदानाचा आजचा शेवटचा दिवस !
26 Mar 2016 - 1:10 am | मधुरा देशपांडे
विडंबन क्रमांक 1, 5, 3