युटा आणि अरिझोनाचे वाळवंट - भाग २

विद्यार्थी's picture
विद्यार्थी in भटकंती
15 Mar 2016 - 10:31 am

भाग १

ब्राईस कॅनियन, होर्शू बेंड आणि अन्टोलोप कॅनियन
आतामात्र माझे निसर्ग सौंदर्याबद्दलचे मत बदलायला सुरुवात झाली होती आणि ब्राईस कॅनियन राष्ट्रीय उद्यानात काय पाहायला मिळणार याची उत्सुकता मनाला लागली होती.
ब्राईस कॅनियन राष्ट्रीय उद्यान हे युटा राज्यात आहे. लाखो वर्षे बर्फ, पाऊस, ऊन आणि वारा याचा परिणाम होऊन येथील डोंगरांची झीज होऊन उंचच उंच सुया किंवा सुळके (Needles) झाले आहेत. शेकडो एकर परिसरात लालसर गुलाबी रंगाचे हे सुळके हजारो वर्षांपासून उभे आहेत. याशिवाय बाकीच्या डोंगरांची अशीच झीज सुरु असून नवीन नवीन सुळके तयार होत आहेत.

Bryce

Bryce

ब्राईस कॅनियनमधल्या खडकांच्या हजारो सुया

Bryce

Bryce

Bryce

Bryce

Bryce

Bryce

ज्यांची १५० ते २०० फुट खाली उतरून परत वर चढायची तयारी असते त्यांना या सुया पाहायला खाली उतरून आत सुद्धा जाता येते.

खाली उतरून आतून दिसणारी खडकांच्या सुया

Bryce

Bryce

लेखाच्या पहिल्या भागात लिहिलेली संध्याकाळच्या उन्हाची जादू ब्राईस कॅनियनमध्ये सुद्धा बघायला मिळते. सूर्यास्ताच्यावेळी या सुया म्हणजे शेगडीतले धगधगणारे निखारेच भासतात.

सूर्यास्ताला दिसणारे धगधगणारे निखारे (फायरी फर्नेस)

Bryce

Bryce

Bryce

होर्शू बेंड (घोड्याची नाल)
कोलोराडो नदी अरिझोना राज्यातल्या डोंगर दर्यांमधून वाहते. पेज या छोट्या शहराजवळ ती एका डोंगराला गोल वळसा घालते. उंचावरून पाहिल्यावर याचा आकार घोड्याच्या नालेप्रमाणे दिसतो. ही जागा होर्शू बेंडम्हणून प्रसिध्द आहे. होर्शू बेंड हा निसर्गाचा अजून एक चमत्कार म्हणावा लागेल. तशी ही जागा हल्ली हिंदी सिनेसृष्टीतही लोकप्रिय होत आहे. मध्ये वरुण धवनच्या कुठल्याश्या गाण्याचे चित्रीकरण झाले होते इथे.

HB

HB

HB

होर्शू बेंडचे आमचे फोटो फार काही चांगले न आल्याने हे फोटो गुगल फोटोवरून घेतलेले (उचललेले) आहेत.

अन्टोलोप स्लॉट कॅनियन
होर्शू बेंडपासून थोड्याच अंतरावर अन्टोलोप स्लॉट कॅनियन आहेत. जमिनीखाली ५० ते ६० फुट खोल या कॅनियन पाण्याच्या प्रवाहाने तयार खाल्या आहेत. या कॅनियन म्हणजे वाळू (Sand Stone), हवेचा दाब आणि पाण्याच्या प्रवाहाने तयार केलेल्या अतिशय सुंदर नैसर्गिक कलाकृतीच आहेत. कॅनियन पाहायला अरुंद जिन्याने ५०-६० फुट खोल उतरून जावे लागते. कॅनियन पाहताना जिथे थोडाफार सूर्यप्रकाश आत येतो तिथे अतिशय सुंदर रंगसंगती निर्माण होते.

अन्टोलोप कॅनियनच्या वर असणारा खडकांचा थर
Antelope Canyon

Antelope Canyon

अन्टोलोप स्लॉट कॅनियनचे काही फोटो

Antelope Canyon

Antelope Canyon

Antelope Canyon

Antelope Canyon

Antelope Canyon

Antelope Canyon

Antelope Canyon

Antelope Canyon

Antelope Canyon

Antelope Canyon

Antelope Canyon

Antelope Canyon

Antelope Canyon

Antelope Canyon

Antelope Canyon

Antelope Canyon

Antelope Canyon

Antelope Canyon

Antelope Canyon

Antelope Canyon

Antelope Canyon

Antelope Canyon

Antelope Canyon

Antelope Canyon

Antelope Canyon

Antelope Canyon

Antelope Canyon

Antelope Canyon

Antelope Canyon

Antelope Canyon

Antelope Canyon

Antelope Canyon

प्रतिक्रिया

चौकटराजा's picture

15 Mar 2016 - 11:37 am | चौकटराजा

मी अगोदरच्याच भागातील प्रतिसादात ग्रेन्ड कॅन्यनचे वर्णन प्लॅनेट चा मुकुट असे केले होते. सात आश्चर्यात खरा नम्बर ग्रॅन्ड कॅननचाच आहे असे माझे ठाम मत आहे. असा काहीसा भाग चीन व व्हेनेझुएला या देशातही आहे .पण हा रंग लाजबाब आहे. आपल्याला हे सगळे याचे देही याची डोळा पहायला मिळाले. आपला जन्म कारणी लागला . मस्त !

चौकटराजा's picture

15 Mar 2016 - 11:39 am | चौकटराजा

हॉर्स शू फोटोच्या वरचा एक फोटो मला चक्क त्रिमित दिसत आहे. इतरांचा काय आण्भव ?

इडली डोसा's picture

16 Mar 2016 - 2:00 am | इडली डोसा

सुर्यस्तावेळचा जो फोटो आहे तो त्रिमितीत असल्या सारखा वाटतो आहे.

चांदणे संदीप's picture

15 Mar 2016 - 12:14 pm | चांदणे संदीप

फोटो आवडले!

नाखु's picture

15 Mar 2016 - 12:24 pm | नाखु

विलक्षण आणि अफाट आहे.

आपल्याला हे सगळे याचे देही याची डोळा पहायला मिळाले. आपला जन्म कारणी लागला . मस्त !

+१११

ह्याची निर्मीती आणि रांजण खळग्यांची निर्मीती याच प्रकारे होते काय?

रांजण खळग्यांची चित्रफीत

जाणकारांनी माहीती द्यावी.

अज्ञ विद्यार्थी नाखु

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Mar 2016 - 12:42 pm | डॉ सुहास म्हात्रे

भन्नाट !

जगप्रवासी's picture

15 Mar 2016 - 12:53 pm | जगप्रवासी

सुंदर… अप्रतिम रंगसंगती साधली आहे निसर्गाने. अशा गोष्टी पाहिल्या की निसर्गापुढे माणसाच्या खुजेपणाची जाणीव होते. पुलेशु

अन्नू's picture

15 Mar 2016 - 1:45 pm | अन्नू

फोटो छान आहेत, पण ते एका महाकाय भुलभुलैयासारखं- दडपण आणणारं वाटलं. :(
आमच्यासारख्या माणसांचा रात्रीच्या वेळी जीव जायचा घाबरुन अशा ठिकणी.

राजेंद्र मेहेंदळे's picture

15 Mar 2016 - 2:04 pm | राजेंद्र मेहेंदळे

फोटो एकदम सहिच आलेत. उन्हामुळे खडकात तयार झालेली रंगसंगती.. पार्श्वभुमीला आकाशाची निळाई आणि पाणी...एकदम मस्त समीकरण जुळुन आलेय.

पियुशा's picture

15 Mar 2016 - 4:05 pm | पियुशा

केवळ अद्भुत आहे हे, खरच नशिब्वान आहात :)

रायनची आई's picture

15 Mar 2016 - 5:03 pm | रायनची आई

फोटो मस्त आहेत.. असे टर्किला पण आहे ना.. कापोदोकिया..आणि गोरेमे येथे? उटाह ला हवामान कसे होते? एकदम गरम?

विद्यार्थी's picture

15 Mar 2016 - 7:56 pm | विद्यार्थी

वसंत आणि शिशिर ऋतूमध्ये हवामान छान असते. वाळवंट असल्यामुळे सूर्यप्रकाशाची कमी नाही. स्वछ आणि निरभ्र आभाळ, मंद वारा आणि २० डिग्री असा सुंदर योग होता आम्ही गेलो तेव्हा. उन्हाळ्यात मात्र फार उष्णता आणि थंडी मध्ये अती थंडी असते.

प्रचेतस's picture

15 Mar 2016 - 5:13 pm | प्रचेतस

अद्भूत आहे हे सगळंच.

एस's picture

15 Mar 2016 - 10:45 pm | एस

सुंदर.

आनंदयात्री's picture

16 Mar 2016 - 1:51 am | आनंदयात्री

अत्यंत सुंदर फोटो, लेख आवडला. मागल्या लेखासारखी यावेळेसही माझी पुरवणी.

ब्राईस कॅनियन-

ब्राईस कॅनियन पार्कच्या वावात जरी 'कॅनियन' असले तरी हे नदीने कोरलेले कॅनियन नाहीत तर वातावरणाने झीज झालेली दरी आहे.
ब्राईस कॅनियन मधल्या नीडल्स तिथले स्थानिक 'हुडू' (hoodoo) या नावाने ओळखतात. पहिल्यांदा पाहिले तेव्हा वाटले हे कॅनियन आपल्याकडे असते तर शिवलिंग म्हणुन पूज्य ठरले असते :-). मोटर टुरिंग बरोबर इथल्या छोट्या मोठ्या ट्रेल्स हुडुंच्या मनोहारी जादुई विश्वात फिरवून आणतात, सनराईज आणि सनसेट पोईंट ला योग्य वेळी पोचलात तर खरोखर मंत्रमुग्ध करणार नजारा दिसतो, आधीच्या लेखात एका प्रतीसादाकाने म्हटल्याप्रमाणे 'इट इज अनादर वर्ल्ड'.
इतक्या सुंदर ठिकाणाबद्दल लोककथा नसेल तर नवलच, तिथल्या म्युजिअम मध्ये वाचलेल्या गोष्टीचे हे स्वैर भाषांतर -

फार फार शतकांपूर्वी, हिमायुगानंतर थोड्या काळने या भागात 'टु-व्हेन-एन-अंग-वा' लोक रहायचे. खरे तर 'टु-व्हेन-एन-अंग-वा' खूप वेगवेगळ्या प्रकारचे होते, त्यांच्यापैकी काही पक्षी होते तर काही प्राणी होते तर काही चक्क सरपटणारे प्राणी होते ! 'टु-व्हेन-एन-अंग-वा' मुळात माणसं नव्हतीच, त्यांच्याकडच्या जादुई शक्ती वापरून ते फक्त माणसांसारखे दिसायचे.

वर्षानुवर्षे तिथे राहून 'टु-व्हेन-एन-अंग-वा' बेदरकार झाले होते, त्यांचे वागणे उन्मत्त होते. निसर्गाने दिलेल्या मर्यादीत अन्न पाण्याची ते उधळपट्टी करत होते. वसंतात सगळ्या झर्यांचे पाणी ते पिउन टाकत आणि बाकीचे प्राणी तहानलेलेच राहत, पानगळीच्या ऋतूमध्ये ते सगळे पाईन नट्स खाउन टाकत, त्यामुळे बाकी प्राण्यांना हिवाळ्यात तग धरणे मोठे अवघड होई.

वर्षानुवर्षे त्यांची ही मनमानी सहन केल्यावर शेवटी सगळ्या प्राण्यांनी तिथे रहाणार्या लांडग्याला शरण जायचे ठरवले. हा लांडगा साधा नसून काळ्या जादूचा मोठा जादुगार होता. लबाड लांडग्याने त्यांना जरा कल्पकतेने शिक्षा द्यायचे ठरवले. त्याने एक मोठी मेजवानी जाहीर केली आणि असे निमंत्रणात असे सांगितले की सगळ्यांना दिवसभर खाता येईल इतके अन्न मेजवानीला असणार आहे. युटासारख्या वाळवंटी आणि दुष्काळी भागात अश्या मेजवानीची दवंडी ऐकून सगळे 'टु-व्हेन-एन-अंग-वा' मोठे खुश झाले. झाडून सगळे 'टु-व्हेन-एन-अंग-वा' त्यांचे उत्तमोत्तम रंगेबीरंगी पोशाख घालून हजर झाले. मोकळ्या आकाशाखाली मेजवानीची जय्यत तयारी होती. हीच संधी योग्य समजून लांडग्याने त्याचे मायाजाल फेकले आणी सगळे 'टु-व्हेन-एन-अंग-वा' तत्क्षणी दगडाचे झाले. ते आजही तिथे तसेच उभे आहेत. वार्या पावसाने त्यांची झीज झालीये, चेहरे आकार अस्पष्ट झालेत, पण ते अजून तिथेच उभे आहेत.
----
*एंटेलोप केन्यन च्या गोष्टी पुन्हा कधीतरी.

विद्यार्थी's picture

16 Mar 2016 - 2:55 am | विद्यार्थी

गोष्ट मस्त आहे यात्रीबुवा!!!

इडली डोसा's picture

16 Mar 2016 - 2:03 am | इडली डोसा

खूप सुंदर फोटो आहेत.

सुबोध खरे's picture

16 Mar 2016 - 12:24 pm | सुबोध खरे

अप्रतिम

विवेक ठाकूर's picture

16 Mar 2016 - 2:32 pm | विवेक ठाकूर

मस्त वर्णन आणि भारी फोटोज .

जुइ's picture

17 Mar 2016 - 6:54 pm | जुइ

हा होर्शू बेंड/ लेक पॉवेल पाहायचे बर्‍याच वर्षांपासून मनात आहे.