दंगा कथा - एक अनुभव- छोटे शैतान

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
7 Mar 2016 - 8:02 pm

मला आठवते तो ऑगस्टचा महिना होता. त्या दिवशी रविवार होता. रविवारी चांदनी चौक बंद राहत असले तरी लाल कुआँ या परिसरातील सर्व दुकाने उघडी होती. चांदनी चांदनी चौक बाजाराच्या मागच्या बाजूला एक रस्ता हौजकाजी पर्यंत जातो. त्या भागाला लाल कुआँ असे म्हणतात. ऑगस्टचा महिना हा दिल्लीत पतंगबाजीचा मौसम. लाल कुआँ हा बाजार पतंग आणि मांजा साठी संपूर्ण दिल्लीत प्रसिद्ध होता. गोटूला मांजाच्या काही चरख्या विकत घ्यायच्या होता. मांज्याच्या १०० गजाच्या एका चरखीत १२५ गज मांजा असतो. १५-२० गज सुट्टा मांजा विकून त्याला काही पैसा कमवायचा होता. गोटू चा उल्लेख मागे हि एका गोष्टीत केला होता. (एक आठवण - गोटू आणि क्रिकेटचा चेंडू)

सकाळची ११ एक वाजले असतील, आम्ही दोघेही लाल कुआँच्या बाजारात पोहचलो. भरपूर भीड होती. का आणि कुणास ठाऊक अचानक दगडफेक सुरु झाली. दंगा हो गया एकच ओरड सुरु झाली. होणारी दगडफेक पाहून आम्ही जाम घाबरलो. तेथून पळ काढला. मुख्य रस्ता सोडून आम्ही एका नागमोड्या अरुंद गल्लीत शिरलो. हि गल्ली थेट चांदनी चौकला निघत होती. गल्ली अरुंद अर्थात ७-8 फूट रुंद असली तरी सर्व घरे ५०-६० फूट एक सारखे उंच. गल्लीत काही पाऊले पुढे गेलो असूच कि अचानक दोन-चार दगड आमच्या पुढ्यात येऊन पडली, थोडक्यात बचावलो. हळूच मान वरून बघितले, ११-१२ वर्षांची २ मुले दगडांचा वर्षाव करीत होती. आम्ही बघतो आहे, हे पाहताच ती मुले गच्चीच्या कठड्या पासून दूर पळाली. हराम खोर, शैतान म्हणून गोटूने जोरदार शिवी दिली. पण तिथे थांबून, त्या घरात शिरून, जाब विचारण्याची हिम्मत नव्हतीच. जीव मुठीत घेऊन पळत -पळत ४-५ मिनिटांत आम्ही दोघे चांदनी चौकला पोहचलो. इथे सर्व काही शांत होते. मागे लाल कुआँच्या भागात काय सुरु आहे, कुणालाही माहित हि नसेल. १२-१३ वर्षांचे असलो तरी थोडी अक्कल होतीच. दोघांनी आज काय घडले कुणाला सांगायचे नाही हे ठरवले. (घरी सांगितले असते तर वडिलांनी आधी जाब विचारला असता, एवढ्या दूर उनाडकी करायला कुणी सांगितले होते. शिवाय चांगली धुलाई पण झालीच असती). गोटूला त्या छोट्या शैतानांचा भयंकर राग आलेला होता. त्या शैतानांची माहिती काढून त्यांना अद्दल घडविण्याचा त्यानी निश्चय केला होता.

२-३ आठवड्यानंतर गोटू पुन्हा भेटला. त्याला विचारले, काही पत्ता लागला का? कोण होते ते छोटे शैतान. गोटू म्हणाला गेल्या रविवारी त्या गल्लीत गेलो होतो. पण घर ओळखता आले नाही. कदाचित मी त्या वेळी जाम घाबरलो होतो. अश्या परिस्थितीत कुठे लक्ष्यात राहणार, कुठल्या घराच्या गच्ची वरून दगडफेक झाली होती. पण एक गोष्ट कळली. त्या गल्लीत कुणाचे तरी डोके फुटले होते. पोलीस त्या माणसाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली होती. थोडक्यात बचावला म्हणे. बाद में पुलिस गली के कुछ बदमाश लौंडों को पकड़ कर थाने ले गयी. मी अडन्यासारखे विचारले, आपल्याला खर काय ते माहित आहे, पोलिसांना सांगितले पाहिजे. तो हसत म्हणाला, मूरख पोलीस आधी विचारतील तुम वहां क्या कर रहे थे, चक्की पीसनी पडेगी, समझे क्या? खर्या दाहक जगाचे ज्ञान निश्चित गोटूचे माझ्यापेक्षा जास्त होतेच. तरीही मी विचारले, पण ज्यांना पकडले त्यांचे काय झाले. होना क्या था, पुरा मोहल्ला पहुँच गया था, थाने में. पुलिसने अच्छी-खासी धुलाई की उन बदमाशों लौंडों की. मग मिस्किलपणे माझ्या कड़े बघत म्हणाला, बाद में दक्सिना लेके छोड़ दिया, पंडितजी. वैसे भी पंडतो और पुलिस में ज्यादा फर्क नहीं है, दोनों हि लुटते हैं. (मी ब्राह्मण आहे, त्याला चांगलेच माहित होते, फिरकी घेण्याचा मौका का सोडणार).

दंगे-धोप्यांच्या अधिकांश घटनांमध्ये सुक्या बरोबर ओल आज हि जळतोच. पण त्या वेळी पोलीस ठाण्यातच अधिकांश मामल्यांचा निपटारा होत असे. क्वचितच मुकदमें बाजीची नौबत यायची. कारण त्या वेळी आज सारखा मिडीया नव्हता किंवा तिळाचे ताड करायची पद्धत हि नव्हती. छोट्या-छोट्या घटनांचा राजनीतिक फायदा घेण्याची प्रवृत्ती हि नव्हती.

कथाआस्वाद

प्रतिक्रिया

तुमच्या आठवणी तुमच्या शैलीत वाचायला आवडतात.

शलभ's picture

7 Mar 2016 - 9:09 pm | शलभ

+१
तुमचे PMO चे किस्से पण सांगा ना.

विवेकपटाईत's picture

7 Mar 2016 - 10:20 pm | विवेकपटाईत

राजदरबारातले किस्से अंगाशी येणाची संभावना असते. तरीही प्रयत्न करील.

बोका-ए-आझम's picture

7 Mar 2016 - 8:17 pm | बोका-ए-आझम

ही साधारण कोणत्या वर्षीची गोष्ट आहे?

विवेकपटाईत's picture

7 Mar 2016 - 10:19 pm | विवेकपटाईत

या ७२ ते ७५च्या काळातल्या आहेत. कथेच्या उद्देश्य एवढाच. दंग्यात पकडल्या जाणारे सर्व लोक दंगेखोर नसतात. जिथे दंगा होतो, त्या भागातल्या सर्व गुंडांना पोलीस पकडतेच. पोलिसांना हि आपण काही केले, हे दाखवायचे असतेच.

मी प्रत्यक्ष डोळ्यांनी छोट्या मुलांना दगड फेकताना बघितले आहे. त्यातला बहुतेकांना तर माहिती हि नसेल, काय करतात आहे ते.

विषय वेगळा असला तरी आत्ताचेच बघा दादरी - lफक्त अद्दल घडवायची होती. पण १५-२० लोक जर कुणाची धुलाई करतील तर त्याचे भयंकर आपण पहिलेच आहे. भीड मधले काही नुसते बघे असतील, पण त्या वेळी ते चुकीच्या जागेवर होते. पण म्हणतात ना, कुणावर होणारा अत्याचार चुपचाप पाहणे सुद्धा अपराधच असतो. परिणाम भोगावा लागतो.

कुणालाही दगड मारण्याचा आधी परिणामाचा विचार केला पाहिजे.

श्रीरंग_जोशी's picture

7 Mar 2016 - 10:25 pm | श्रीरंग_जोशी

सत्यकथा उत्तम लिहिली आहे.
कथेचा आशय नवा नसला तरी वाईट वाटायला लावण्याचे सामर्थ्य या कथेत आहे.