ही कविता माझी नाही. कोणाची आहे ते ही नाही माहिति. मला आवडली म्हणून इथे देत आहे.
अफाट आकाश
हिरवी धरती
पुनवेची रात
सागर-भरती
पाचूंची लकेर
कुरणाच्या ओठी
प्रकाशाचा गर्भ
जलवंती-पोटी
अखंड नूतन मला ही धरित्री
आनंदयात्री मी आनंदयात्री
मेघांच्या उत्सवीं
जाहलों उन्मन
दवांत तीर्थांचे
घेतलें दर्शन
दूर क्षितिजाची
निळी भुलावण
पाशांविण मला
ठेवी खिळवून
अक्षयवीणाच घुमे माझ्या गात्री
आनंदयात्री मी आनंदयात्री
हलके कढून
कंटक पायींचे
स्वरांत विणिले
सर मीं स्वप्नांचे
हासत दु:खाचा
केला मी स्वीकार
वर्षिलें चादंणें
पिऊन अंधार
प्रकाशाचें गाणें अवसेच्या रात्रीं
आनंदयात्री मी आनंदयात्री
प्रतिक्रिया
22 Jan 2008 - 1:00 am | सुनील
मंगेश पाडगावकरांची तर नव्हे?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
22 Jan 2008 - 1:33 am | इनोबा म्हणे
मलाही असेच वाटतेय... कविता सुरेख आहे.
(काव्यप्रेमी) -इनोबा
(शाहिर साबळे यांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीशी निगडीत "माझी मैना गावाकडं राह्यली" हे गाणे अथवा त्यासंबंधी आणखी माहिती कोणाकडे असल्यास कृपया संपर्क साधावा.)
22 Jan 2008 - 1:01 am | प्राजु
काही कल्पना नाही
22 Jan 2008 - 2:02 am | चतुरंग
ही कविता त्यांचीच आहे.
काव्यसंग्रह बहुधा 'जिप्सी'.
चतुरंग
23 Jan 2008 - 12:19 am | बेसनलाडू
यांची ही कविता आहे.
(माहीतगार)बेसनलाडू
23 Jan 2008 - 6:17 pm | प्रकाश घाटपांडे
प्रकाश घाटपांडे
27 Jan 2008 - 3:23 pm | सुधीर कांदळकर
वरील कवितेचा काय संबंध?