जॉर्ज कार्लीन - अधिभौतीकवाद, राष्ट्रीय गर्व, व्यंजना, गर्भपात.

निशांत_खाडे's picture
निशांत_खाडे in जनातलं, मनातलं
4 Mar 2016 - 2:43 am

जॉर्ज कार्लीन हे अमेरिकन स्टेन्डअप कोमेडीअन, लेखक व नट होते. न्यूयॉर्क टाइम्स, बीबीसी आणि आंतरजाल चित्रपट माहितीकोश (IMDB) येथे त्यांचा उल्लेख शतकातील सर्वोत्कृष्ट कोमेडीअन असा केलेला आढळतो.१९५६ ते २००८ पर्यंत तब्बल चोपन्न वर्षांच्या कारकिर्दीत ते त्यांच्या स्फोटक व विवादात्मक विधानांसाठी नेहमी चर्चेत असायचे. विविध संवेदनशील विषयांवर कार्लीन यांनी केलेले वक्तव्य हे जितके विनोदी होते तितकेच ते विचार करायला लावणारे आणि स्फोटक होते.
इंग्रजी भाषेवरचे प्रभुत्व व मानवी स्वभावाचे अत्यंत बारकाईने केलेले निरीक्षण हे त्यांचा प्रत्येक कृतीमध्ये प्रखरपणे दिसायचे. मिपाकरांना कार्लीन माहिती असतील, परंतु जास्तीत जास्त मिपाकारांपर्यंत हे व्यक्तिमत्व पोहोचावे म्हणून हि खटपट.
त्यांच्या तूनळीवर (या शब्दाचा शोध लावणाऱ्या महाशयांना दंडवत) उपलब्ध असलेल्या चित्रफितींचे काही दुवे व संदर्भ खाली दिले आहेत. कार्लीन हे काही तत्ववेते नव्हते त्यामुळे त्यांची विधाने हि शंभर टक्के तार्किक असतीलच असे नाही तसेच बऱ्याच लोकांना ते 'foul mouthed' व अश्लील बोलणारे वाटायचे, या दोन गोष्टींकडे थोडेसे दुर्लक्ष करून जर पाहिलेत तर नक्कीच विचार करायला लावणारे मुद्दे सापडतील.

अधिभौतीकवाद (Materialism)
हि चित्रफित कार्लीनबुवांच्या १९८१ साली आलेल्या 'Place for my stuff' या अल्बम मधून आहे.खूप प्रयत्न केला; पूर्ण दीड तासाचे भाषण काही सापडलेच नाही आंतरजालावर परंतु अमेझॉन डॉट कॉम वर डीवीडी उपलब्ध आहे. या चित्रफितीचे लिखित वर्जन येथे मिळेल.

राष्ट्रीय गर्व (National pride)
हि फीत 2007 च्या 'Life is worth losing...' या अल्बम मधले आहे. राष्ट्रीय आणि सांस्कुतिक गर्वाविषयी त्यांनी केलेल्या या भाषणामुळे बरेच वादळ उठले होते. लिखित वर्जन येथे आहे.

व्यंजना (Euphemisms)
'These poor people have been bullshitted by the system into believing that if you change the name of the condition, somehow you'll change the condition' हे कार्लीन यांचे गाजलेले वाक्य या चित्रफितीत आले आहे. 'Complaints and Grievances' या अल्बम मधला हा एक तुकडा आहे.लिखित वर्जन येथे आहे

जिवनाचे पावित्र्य आणि गर्भपात (Sanctity of life and abortion)
बरेच वर्ष अमेरिकेत चर्चेत असलेल्या 'Pro-Life' किंवा 'Anti-Abortion' Movement च्या पार्श्वभूमीवर कार्लीन यांनी केलेले हे भाष्य 'Complaints and Grievances' या अल्बम मधला हा एक तुकडा आहे.लिखित वर्जन येथे आहे

---------------------------------------------------------------

On a lighter note,
कार्लीन बुवांची काही मला आवडलेली वाक्ये

  • Intelligence tests are biased toward the literates
  • Property is theft. Nobody “owns” anything. When you die, it all stays here.
  • “When Will Jesus Bring the Pork Chops?” This title offends all three major religions, and even vegetarians!
  • Thou shalt keep thy religion to thyself.
  • What exactly is viewer discretion? If viewers had discretion most television shows would not be on the air.
  • Never underestimate the power of stupid people in large groups.
  • Religion is like a pair of shoes.....Find one that fits for you, but don't make me wear your shoes.
  • Scratch any cynic and you will find a disappointed idealist.
  • Never argue with an idiot. They will only bring you down to their level and beat you with experience
  • There's no present. There's only the immediate future and the recent past

 
कार्लीन बुवांना पडलेले काही प्रश्न.

  • Isn’t it a bit unnerving that doctors call what they do “practice”?
  • If 4 out of 5 people SUFFER from diarrhea…does that mean that 1 enjoys it?
  • If no one knows when a person is going to die, how can we say he died prematurely?
  • What year did Jesus think it was?
  • If all the world is a stage, where is the audience sitting?
  • If a turtle doesn't have a shell, is he homeless or naked?

धन्यवाद!

कलालेख

प्रतिक्रिया

तर्राट जोकर's picture

4 Mar 2016 - 2:49 am | तर्राट जोकर

खाडे सर, जॉर्ज कार्लिनवर लेख टाकल्याबद्दल तुमचे सगळे गुन्हे माफ! जाओ मज्जा करो.

तुमच्यासाठी __/\__
जॉर्जभाऊ कार्लिनसाठी अनंत सलाम...जॉर्ज कार्लिन जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा.

आपल्याला चार जॉर्ज माहित आहेत, त्यातले तीन भन्नाट आवडतात. एक राहुल गांधींचं अमेरिकन वर्जन आहे. ओळखा फाहू.

निशांत_खाडे's picture

4 Mar 2016 - 3:03 am | निशांत_खाडे

ते चार जॉर्ज म्हणजे वाशिंग्टन, क्लुनी, बुश आणि कार्लीन हे आहेत काय?
बाकी राहुल गांधीचे अमेरिकन वर्जन म्हणजे बुशच असणार.

तर्राट जोकर's picture

4 Mar 2016 - 3:09 am | तर्राट जोकर

नै हो. ऑरवेल, बर्नाड शॉ, कार्लिन. क्लुनी अ‍ॅडवू, नो प्रोब्स. बाकी बुश, और कौन.

श्रीरंग_जोशी's picture

4 Mar 2016 - 3:09 am | श्रीरंग_जोशी

या अवलिया माणसाबद्द्ल आज प्रथमच कळले.
त्याची विधाने व प्रश्न एकाहून एक आहेत.
व्हिडिओजचा आस्वाद निवांत वे़ळ मिळाला की घेतो.

या लेखासाठी खूप धन्यवाद.

अर्धवटराव's picture

4 Mar 2016 - 5:03 am | अर्धवटराव

There's no present. There's only the immediate future and the recent past

एकदम चोक्कस.

समाजात ढोंगीपणा जेवढा अधिक तेवढा विनोदविरांना वाव अधिक.

बोका-ए-आझम's picture

4 Mar 2016 - 6:58 am | बोका-ए-आझम

Never underestimate the power of stupid people in large groups.

आणि

Never argue with an idiot. They will only bring you down to their level and beat you with experience

हे एकदम perfect. हा माणूस नक्कीच मिपासारख्या इंग्लिश संस्थळाचा संपादक, निदान सदस्य असणार. धन्यवाद खाडेसाहेब!

हा पण सुंदर आहे.... माझी आणि कार्लिन ची ओळख याच्यामुळे झाली.... त्यामुळे मला तो खूप प्रिय आहे...... https://youtu.be/gPOfurmrjxo

निशांत_खाडे's picture

4 Mar 2016 - 11:14 am | निशांत_खाडे

हा तुकडाही उत्तम आहे. 'पीके' आणि 'ओह माय गोड' या चित्रपटात याच तुकड्यातील काही विचार विस्तारित करून सांगण्यात आले आहेत, हे चित्रपटांचे क्रेडीट टायटल्स पाहिल्यावर कळले..

स्वधर्म's picture

4 Mar 2016 - 11:31 am | स्वधर्म

God is omnipresent, all powerful, there is nothing impossible for him. Only one small problem - he can’t manage money……. Please give!
अशा अर्थाचे काही वाक्य भन्नाट होते.

निशांत_खाडे's picture

4 Mar 2016 - 11:39 am | निशांत_खाडे

'Religion is bullshit' मधले हे विधान आहे ते.

Religion has actually convinced people that there's an invisible man living in the sky who watches everything you do, every minute of every day. And the invisible man has a special list of ten things he does not want you to do. And if you do any of these ten things, he has a special place, full of fire and smoke and burning and torture and anguish, where he will send you to live and suffer and burn and choke and scream and cry forever and ever 'til the end of time!

But He loves you. He loves you, and He needs money! He always needs money! He's all-powerful, all-perfect, all-knowing, and all-wise, somehow just can't handle money!

स्वधर्म's picture

4 Mar 2016 - 11:44 am | स्वधर्म

हाच तो परिच्छेद. पटकन अाठवणीतून लिहीले. नेमका संदर्भ दिल्याबद्दल धन्यवाद.

पिलीयन रायडर's picture

4 Mar 2016 - 11:47 am | पिलीयन रायडर

मस्तच की!!

सुमीत भातखंडे's picture

4 Mar 2016 - 2:38 pm | सुमीत भातखंडे

..

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Mar 2016 - 2:54 pm | डॉ सुहास म्हात्रे

:)

नीलमोहर's picture

4 Mar 2016 - 12:57 pm | नीलमोहर

* Never underestimate the power of stupid people in large groups.

* Never argue with an idiot. They will only bring you down to their level and beat you with experience

- हा हा, अगदी !!

सुमीत भातखंडे's picture

4 Mar 2016 - 2:46 pm | सुमीत भातखंडे

माझी असंच तुनळीवर फिरता-फिरता ह्या साहेबांशी ओळख झाली.
ह्या लेखाच्या निमित्ताने परत आठवण झाली.

डेव अ‍ॅलन हा पण असाच एक दिग्गज स्टँडअप कॉमेडिअन. त्याच्या शो मध्ये सुद्धा "धर्म" हा महत्वाचा भाग असायचा.

निशांत_खाडे's picture

4 Mar 2016 - 11:06 pm | निशांत_खाडे

डेव अ‍ॅलन ची "I'm an Atheist...thank God", "A good storyteller never lets the facts get in the way" हि विधाने आवडली होती.

रातराणी's picture

4 Mar 2016 - 9:50 pm | रातराणी

लेख आवडला !

निशांत_खाडे's picture

4 Mar 2016 - 10:45 pm | निशांत_खाडे

धन्यवाद