ठाणे पश्चिम परिसरात शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी चांगला गुरु अथवा चांगली संस्था असल्यास सुचवावे, स्वानुभवावरून सुचविल्यास अगदी उत्तम
सविस्तर माहिती : मला स्वतासाठी शिकवणी हवी आहे आणि आधी ३ वर्ष शास्त्रीय संगीतात शिक्षण घेतले आहे सध्या घराजवळच शिकवणी हवी असल्याने माहितीसाठी विनंती
प्रतिक्रिया
1 Mar 2016 - 10:53 am | मुक्त विहारि
Swaratrishna Music Academy
Music School
Address: Near Majiwada and Shrirang society, Shrirang society, Vrindavan Society, Thane West, Mumbai, Maharashtra 400601
Phone:098336 58012
वैयक्तिक अनुभव नाही.
आम्ही गाणे शिकायचा प्रयत्न केला होता.संगीतशिक्षक गाव सोडून पळाले.
1 Mar 2016 - 11:07 am | उमेश पाटील
आपल्या प्रतिसादासाठी आणि माहितीसाठी धन्यवाद
1 Mar 2016 - 11:02 am | अत्रन्गि पाउस
मला
1 Mar 2016 - 3:24 pm | वेल्लाभट
वरदा धारप गोडबोले या गायिका रहातात. स्वानुभव नाही पण जवळच्या व्यक्तीचा अनुभव आहे.
एक्सलंट.
4 Mar 2016 - 11:09 am | वेल्लाभट
पंडित सुरेश बापटही प्रथितयश आहेत.
3 Mar 2016 - 2:02 pm | उमेश पाटील
शास्त्रीय संगीत शिकवणीबाबत माहिती दिल्या बद्द्ल आभारी
3 Mar 2016 - 3:58 pm | मुक्त विहारि
तालासुरात शिकायला वेळ लागत नाही.
पण एखादा राग आत्मसात करायला एक जन्म पण अपूरा असतो.
(कानसेन) मुवि
3 Mar 2016 - 4:37 pm | उमेश पाटील
३ वर्षात बर्यापैकी शिकलो आहे, पुढचे कळवीनच
3 Mar 2016 - 5:13 pm | मुक्त विहारि
परंतू सध्या कुणाचे शिष्यत्व पत्करले आहे?
ते पण सांगीतलेत तर उत्तम.
4 Mar 2016 - 1:29 am | खटपट्या
तलावपाळी जवळ संगीत वाद्यांचे दुकान आहे. नाव "वेव". त्यांच्याकडे विचारणा केल्यास तुम्हाला बरेच पर्याय मीळू शकतील.
6 Mar 2016 - 7:59 am | Rahul D
आमचे तात्या अभ्यंकर उत्तम गातात.
7 Mar 2016 - 10:38 am | उमेश पाटील
सध्या पाटणकर सरांकडे (ठाणे परीवहन कार्यालयाजवळ) बोलणी चालू आहेत लवकरच शिकवणी चालू होईल.