नमस्ते,
मराठी चित्रपटसृष्टीतील एक मोठं नाव म्हणजे महेश कोठारे.अभिनेता+निर्माता+दिग्दर्शक अशा तिन्ही आघाड्यांवर
कार्यरत राहून स्वतःच मोठं अस्तित्व निर्माण केलय.
त्यांचे ते पाचअक्षरी धमाल चित्रपट अजूनही पहावेसे वाटतात.
पण हल्ली त्यांना नेमकं काय झालय तेच कळेना!
झी मराठीवर जय मल्हार ही त्यांचीच देण.त्यामध्ये कथानकाची पार वाट लावून टाकली आहे,आणि नारदाचं आख्यान महिना झालं तरी संपेना.इतकच नव्हे तर त्यांना अजून एक अचाट कल्पना सुचली,कलर्स मराठीवर "गणपती बाप्पा मोरया" म्हणून गणपतीची सिरियल चालू केली आहे,त्यामध्येसुद्धा कथानकाची पार वाट लावून टाकली आहे.हेवेदावे काय?टोमणे काय?वाद काय? सगळं कसं सासू-सूनेच्या सिरीयलसारखेच.
ट्यार्पी मिळवण्यासाठी अशा गोष्टींची खरच गरज आहे का??
महेश कोठारेंच्या अंगात एकता कपूर का शिरली आहे?
आणि महत्वाचा प्रश्न अशा मालिंकानाच ट्यार्पी कसा काय मिळतो?? अशा मालिका पाहणार्या प्रेक्षकांची मानसिकता कशी असते?
घरातील स्त्रीवर्ग/वयस्कर मंडळी ह्या मालिका लावतात त्यामुळे थोडेफार लक्ष जाते.
आणि पाहताना प्रचंड हसू+कीव येते.
(डोकं भणभणार्या धाग्यांपासून थोडासा रिलीफ म्हणून हा लेखन प्रपंच)
हं चालू करा आता श्या द्यायला.
-
-
खाली मुंडी पाताळ धुंडी
प्रतिक्रिया
26 Feb 2016 - 4:16 pm | मम्बाजी सर्वज्ञ
मी पयला!
26 Feb 2016 - 4:26 pm | प्रदीप साळुंखे
महेश कोठारेंनी प्रेक्षकांची नस बरोबर ओळखली आहे,
मोठ्या प्रमाणावर चालतात ग्रामीण भागात अशा मालिका!!
ज्याप्रकारे तुम्ही आता टीआरपी मिळवू पाहताय ना?अगदी त्याचप्रकारे.
हा शिक्षण आणि जडणघडण याचा मुद्दा आहे.
26 Feb 2016 - 4:28 pm | Anand More
(तळहातावर मूठ आपटत) "ड्याम इट... असे धागे पण सुरू झा.... आता तरी लेखक शोधलाच पाहिजे, या सिरीयल्स साठी"
26 Feb 2016 - 4:40 pm | चांदणे संदीप
याची गरज नाहीये! पण, जरा मालमसाला घालून, तिखटमिठ लावून, नर्मविनोदी किंवा खुशखुशीत करता आल असत की ओ!
संदर्भांसाठी हे आणि हे वाचा.
Sandy
26 Feb 2016 - 4:40 pm | चांदणे संदीप
याची गरज नाहीये!
26 Feb 2016 - 6:43 pm | उगा काहितरीच
मालिका चालू झाल्यानंतर पहिल्याच भागात ही किती भागांची मालिका आहे हे स्पष्ट करायला पाहिजे . म्हणजे दर्जेदार मालिका पहायला मिळेल. सध्या थाटामाटात मालिका सुरू करतात . चालली तर कशीही स्टोरीला ट्विस्ट देऊन वाढवतात. नाही चालली तर(च) बंद करतात. दर्शक पण च्युईंगम सारख्या चघळतात. का पहातात ते ही कळत नाही. आणी पाहणे बंदही करा वाटत नाही.