आपण यांना पाहिलंत का?

शेणगोळा's picture
शेणगोळा in काथ्याकूट
9 Jan 2009 - 12:23 am
गाभा: 

फार पूर्वी मुंबई दूरदर्शन केन्द्रावर आपण यांना पाहिलंत का हा कार्यक्रम दाखचायचे. तसे एक सदर मिपावर सुरू करत आहे.

आपण यांना पाहिलंत का?

नांव - रामलिंगम राजू.
व्यवसाय - माजी अध्यक्ष, सत्यम कम्प्युटर्स लिमिटेड.
बुधवार दि. ७ जानेवारीपासून बेपत्ता आहेत.

कुणाला आढळल्यास हैद्राबाद-पोलिस व सेबी यांच्याशी संपर्क साधावा.

प्रतिक्रिया

राहिली आहे.

आणि एक निरोप सुद्धा.

"प्रिय रामू, जिथे असशील तिथून घरी निघून ये.. तुझी आज्जी (अर्थव्यवस्था?) तुझ्यामुळे अंथरूणाला खिळली आहे. आम्ही तुला अजिबात रागावणार नाही.."
-तुझेच आई-बाबा (सेबी-सरकार)

अविनाशकुलकर्णी's picture

9 Jan 2009 - 1:10 am | अविनाशकुलकर्णी

सापडवुन किंवा माहिति दिल्यास सत्यम चे १००० शेअर्स दिले जातिल..इनाम म्हणुन..

अविनाश......सव्वा शेर

स्नेहश्री's picture

9 Jan 2009 - 1:29 pm | स्नेहश्री

Raju Raju sat on the wall
Raju Raju had a great fall
Balance sheet died
Shareholders cried
Raju Raju made a fraud

Raju Raju
Yes baba
Cheating us
No baba
Telling Lies
No baba
Open the balance sheet
HA HA HA

--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी

सत्यम चे CFO ला पण तितकेच जवाबदार नाहीत का ??
एकटा रामलिंगम राजू काहीच करु शकणार नाही त्यात CFO चा वाटा मोलाचा
~ वाहीदा

सत्यमच्या CFO साहेबांनी आत्महत्येचा प्रयत्न केला

सविस्तर बातमी इथे वाचवयास मिळेल : http://hindi.economictimes.indiatimes.com/articleshow/3955876.cms

मोठ्या चोराने चोरी कबूल केल्यावर लहान चोराला घाम फुटेल नाहीतर काय होईल :)
(सत्यमचा सध्या तोट्यात असलेला भागधारक) सागर

रेझर रेमॉन's picture

9 Jan 2009 - 4:21 pm | रेझर रेमॉन

प्रश्र्न कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा
विण्डो ड्रेस्ड बॅलन्सशीटचा... कोण करत नाही?
तुमच्या आय.टी. स्टेटमेण्टमध्ये विण्डो ड्रेसिंग नसतं?
पकडलं जात नाही तिथवर साव ही चोरच असतो.
नाव राजूज पॉइंट ऑफ व्ह्यू....
त्यांचा स्टेक कमी. केवळ ७-८ टक्के.. कुणी टेकओव्हर केली तर..?
हा फीअर फॅक्टर... म्हणून विण्डो ड्रेसिंग...
ओव्हर द इयर्स फंड डायव्हर्ट केला गेला असावा..
मुलाच्या कंपन्या टेकओव्हर करणं हा शेवटचा डेस्परेट अटेम्प्ट...
वास्तविक फ्रॉड समअप करण्यासाठी होता. जर मायटाजची बॅलन्सशीट खरी असेल तर या टेकओव्हर वर मामला स्क्वेयरअप झाला असता. शेवटी सर्व उपाय हरल्यावर राजू यांनी जे डिक्लरेशन दिलं ते तंतोतंत खरं मानायची गरज नाही. पाळंमुळं हळुहळू दिसतीलच.
सवाल एकच चिको!
फंडामेण्टल एनालिसिस ज्या बॅलन्सशीटला प्रमाण मानून होतो त्याच जर बनावट असतील तर गुंतवणूकीचे एकमेव वाहन बंद होईल आणि बाजार हा पूर्णपणे रतनखत्री होईल.
व्हेअर ओ व्हेअर इज सेबी? व्हेअर ओ व्हेअर इज पी?
सामबॉडी गो गेट देम चिको!
- रेझर रेमॉन

प्रभाकर पेठकर's picture

10 Jan 2009 - 12:09 am | प्रभाकर पेठकर

पकडलं जात नाही तिथवर साव ही चोरच असतो.

शब्द उलट-सुलट झाले आहेत का?

निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

रेझर रेमॉन's picture

10 Jan 2009 - 1:36 am | रेझर रेमॉन

थँक्स.
ते असं हवं-
पकडला जात नाही तोवर साव चोर्‍या करतच राहतो.
करेक्टेड.
-रेझर

तिमा's picture

9 Jan 2009 - 5:44 pm | तिमा

मिपावर " आपण यांना का पाहिलत?" असेही सदर सुरु करावे.

बट्टू's picture

9 Jan 2009 - 7:10 pm | बट्टू

काल हे एका फाईव्ह श्टार रेश्टॉरंटात बसून बेनामी मालमत्ता कशी वापरायची, आपलं नाव बाजुला करुन इतरांना कसं गोवायचं, देशातुन बाहेर पळ कसा काढायचा त्यावर गुफ्तगु करत होते.

सुहास's picture

10 Jan 2009 - 1:15 am | सुहास

नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार राजुंना अटक झाली आहे...

---सुहास (चिटकवले वाला नव्हे..!)