मी अगदी मजेत आहे

मोगॅम्बो's picture
मोगॅम्बो in जे न देखे रवी...
8 Jan 2009 - 6:33 pm

(हा एका इंग्रजी कवितेचा अनुवाद आहे. मूळ कवी कोण ते मला माहीत नाही. कविता कधी आणि कुठे वाचली ते सुद्धा आठवत नाही. पण आवडली म्हणून लगेच अनुवाद करून ठेवला होता. तो आज तुमच्यासाठी प्रसिद्ध करतोय. कसा वाटला, सांगा.)

वय बरंच झालंय तरी
मी अगदी मजेत आहे ॥ ध्रु ॥
संधिवातानं मी जखडलोय
बोलताना श्वास अखडतोय
नाडी झालीय मंद आणि रक्त कोमट आहे
पण माझ्या वयाच्या मानाने मी अगदी मजेत आहे ॥ १ ॥
म्हातारपण म्हणजे मजा (असं काही लोक म्हणतात)
पण झोपताना मात्र मला काही प्रश्न पडतात
माझी काठी कोप-यात, कपात माझे दात
कान माझे ड्रॉवरमधे आणि डोळे कपाटात
झोप लागता लागता मात्र मधेच मी दचकून जाय
आणखी एखादा पार्ट माझा ठेवायचा राहिला की काय ? ॥ २ ॥
रोज सकाळी मी उठतो, मनावरची धूळ झटकतो
रोजचा ताजा पेपर सर्वात आधी उघडतो
शोकसमाचारामधे माझे नाव नसते
मी जिवंत असल्याची मज डब्बल खात्री पटते
मग वळतो किचनकडे आणि करतो भक्कम नाश्ता
कधि किंचित पापही करतो, वियाग्राची साथ असता
अगदीच टिपेत नसलं तरी गाणं लयीत आहे
माझ्या वयाच्या मानानं मी अगदी मजेत आहे ॥ ३ ॥

कविताभाषांतर

प्रतिक्रिया

दत्ता काळे's picture

8 Jan 2009 - 6:42 pm | दत्ता काळे

मस्त जमवलीएत तुम्ही

म्हातारपण म्हणजे मजा (असं काही लोक म्हणतात)
पण झोपताना मात्र मला काही प्रश्न पडतात
माझी काठी कोप-यात, कपात माझे दात
कान माझे ड्रॉवरमधे आणि डोळे कपाटात
झोप लागता लागता मात्र मधेच मी दचकून जाय
आणखी एखादा पार्ट माझा ठेवायचा राहिला की काय ?

. . हे फार छान जमलंय

प्राजु's picture

8 Jan 2009 - 7:35 pm | प्राजु

छान जमला आहे अनुवाद. :)
ओरीजनल कविताही दिली असतं तर जास्ती मजा आली असती वाचताना.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Jan 2009 - 8:28 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

जमला आहे अनुवाद. म्हतारबा तसे मजेशीर आहेत!

अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

मोगॅम्बो's picture

8 Jan 2009 - 8:59 pm | मोगॅम्बो

बाळकराम, प्राजू आणि आदिती मनापासून धन्यवाद.

मनस्वी's picture

9 Jan 2009 - 11:02 am | मनस्वी

मस्त जमला आहे अनुवाद!

मदनबाण's picture

9 Jan 2009 - 1:50 pm | मदनबाण

मस्त अनुवाद... :)

(Mr.India)
मदनबाण.....

"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."

- Indian Armed Forces -

चन्द्रशेखर गोखले's picture

9 Jan 2009 - 7:35 pm | चन्द्रशेखर गोखले

मोगाँबो ने खुश किया !

चन्द्रशेखर गोखले's picture

9 Jan 2009 - 7:35 pm | चन्द्रशेखर गोखले

मोगाँबो ने खुश किया !

नितिन थत्ते's picture

9 Jan 2009 - 7:41 pm | नितिन थत्ते

:)) छान, सुंदर

मोगॅम्बो's picture

10 Jan 2009 - 7:48 pm | मोगॅम्बो

मनस्वी, मदनबाण, चंदूभाऊ आणि नितिन भाऊ.... सर्वांना खूप खूप धन्यवाद.
मोगॅम्बो खुश हुवा !!!

लवंगी's picture

10 Jan 2009 - 8:31 pm | लवंगी

मजा आली..

शितल's picture

11 Jan 2009 - 8:06 am | शितल

अनुवादीत कविता आवडली. :)

पंचम's picture

11 Jan 2009 - 5:20 pm | पंचम

झोप लागता लागता मात्र मधेच मी दचकून जाय
आणखी एखादा पार्ट माझा ठेवायचा राहिला की काय ?

हा पार्ट खूपच चांगला जमलाय;

पण प्राजुशी सहमत!