✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मिपा आणा अभिव्यक्तीस्वातंत्र्य

ज
जेपी यांनी
गुरुवार, 02/11/2016 - 21:08  ·  लेख
लेख
नमस्कार, मिपावर लेखनाला आणी प्रतिसादाला काही बंधन नाही. पण"अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे याचा अर्थ स्वैराचार आहे असा घेऊ नये" प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे पण दुसर्याला हिणवण्याचा नाही.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
पाकक्रिया
वाङ्मय
बालकथा
चारोळ्या
मुक्तक
विडंबन
प्रतिशब्द
शुद्धलेखन
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
51450 वाचन

💬 प्रतिसाद (222)

प्रतिक्रिया

अरे व्वा.. दोन दिवसात लै राडा

मोदक
Tue, 02/16/2016 - 10:34 नवीन
अरे व्वा.. दोन दिवसात लै राडा झाला आहे की. डिट्टेल उत्तर द्यायची लै इच्छा होती पण पिराने बरेचसे मुद्दे कव्हर केले आहेतच. तुमच्याशी पंगा घेण्याबद्दल - तुम्ही तितकेही महत्वाचे नाही आहात हो. तुम्ही काय लिहित आहात ते तुमचे तुम्हाला कळत आहे का? आणि जे दावे करत आहात ते सिद्ध करू शकता का? सिद्ध करू शकत असाल तर करा, अन्यथा दावे करण्याचे बंद करा. इतकेच. बाकी तुमच्या जुन्या आयडीप्रमाणे तुम्हाला फाट्यावर मारण्याचे स्वातंत्र्य आम्हाला आहेच. ते घेत आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

+१

सुनील
Mon, 02/15/2016 - 09:43 नवीन
संकेतस्थळ जरी मोफत असलं तरी ते रिकाम्या स्टेजसारखं आहे. त्यावर दर्जेदार लेखन करणारे सदस्य नसतील तर नुसत्या रिकाम्या स्टेजला अर्थ नाही
एकेकाळच्या चांगल्या नांदत्या पण आता अगदीच ओस पडलेल्या एका संस्थळाची आठवण आली!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

अभिव्यक्तिस्वातंत्र्य वगैरे भ्रम आहे.

मुक्त विहारि
Fri, 02/12/2016 - 13:44 नवीन
मिपाच्या बाबतीत तरी बर्‍यापैकी अभिव्यक्ति स्वातंत्र्य आहे, असे माझे प्रामाणिक मत आहे. उगाच कुणाला तरी टार्गेट करणे, एखाद्या व्यक्तीबाबत अनावश्यक घालून-पाडून बोलणे, कंपूबाजी करणे आणि आपलेच प्यादे कसे पुढे राहिल ह्याची काळजी घेणे, ह्या गोष्टी जितक्या सहजतेने मायबोलीवर (इथे मायबोलीचे नांव घेणे भाग आहे, सामान्यतः मी मुद्दामहून मायबोलीचे नांव घेत नाही.पण इथे मुद्दा स्पष्ट करायला मायबोलीचे नांव घेतले आहे.संपादकांनी हा प्रतिसाद उडवलात तरी चालेल.) होतात, तितक्या सहजतेने इथे होत नाहीत. काही काही व्यक्ती परत परत वेगळी वेगळी नावे घेवून इथे येत असली आणि त्या व्यक्तीने परत्=परत तीच चूक केली तर आणि तरच मिपाचे संपादक मंडळ कारवाई करते. बादवे, तू वैयक्तिक टीका-टिपणी करत नाहीस, हे माहीत असल्याने आणि आपले मतभेद ह्या विषयापुरतेच मर्यादित असतील ह्याची खात्री असल्यानेच लिहीत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

उगाच कुणाला तरी टार्गेट करणे,

अभ्या..
Fri, 02/12/2016 - 13:50 नवीन
उगाच कुणाला तरी टार्गेट करणे, एखाद्या व्यक्तीबाबत अनावश्यक घालून-पाडून बोलणे, कंपूबाजी करणे आणि आपलेच प्यादे कसे पुढे राहिल ह्याची काळजी घेणे,
आपणास ह्या गोष्टींचा इथे अनुभव मिळाला नसल्याने अभिनंदन आणि शुभेच्छा. निरागस मैत्रीसाठी धन्यवाद. कळावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

लेस बांधून बसायची गरज नाही.

काळा पहाड
Fri, 02/12/2016 - 14:37 नवीन
लेस बांधून बसायची गरज नाही. हे सत्य असेल तर त्यात काही चुकीचं नाही. केस झाली तर संस्थळाच्या मालकावर होवू शकते. मेंबरांवर नाही. तेव्हा मालक लोक काळजी घेणारच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

+१

पिलीयन रायडर
Fri, 02/12/2016 - 14:41 नवीन
+१ मुळात ते "मालक" आहेत.. तिथेच विषय संपतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

केस वगैरे वेगळ्या गोष्टी

बॅटमॅन
Fri, 02/12/2016 - 14:45 नवीन
केस वगैरे वेगळ्या गोष्टी झाल्या. इथे परीक्षानळीतील भांडणे होतात त्याबद्दलचा अण्भव पाहता...असोच्च...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

जे पी भाऊ चा रोख संदीप डांगे

पक्षी
Fri, 02/12/2016 - 13:34 नवीन
जे पी भाऊ चा रोख संदीप डांगे साहेबांच्या प्रतिक्रिये वर तर नाही ना???ह्या धाग्या वरील पहिली प्रतिक्रिया.
  • Log in or register to post comments

मिपा उत्तमच आहे. जगात लोक जसे

पिलीयन रायडर
Fri, 02/12/2016 - 14:05 नवीन
मिपा उत्तमच आहे. जगात लोक जसे वागतात तसेच इथेही नाना तर्‍हा दिसणारच. मला इतर संस्थळांचा अजिबात अनुभव नाही. पण आपण लिमिट मध्ये राहिलो की आपल्याला प्रचंड उद्वेगजनक वगैरे अनुभव येत नाहीत असे माझे मत बनले आहे. वाद होतातच, पुन्हा दोस्तीही होते.. गोष्टी तात्पुरत्या असतात.. रात गई बात गई म्हणुन सोडून द्यायच्या. आपल्याला वाटत असतं की लोक कंपु करतात, वैयक्तिक टिका करतात, जहाल भाषा वापरतात वगैरे वगैरे... आपणही अनेकदा ते करत असतोच.. कुणीही इथे धुतल्या तांदळासारखे पवित्र वगैरे नाहीये. (मुवि सोडुन.. ते फार निरागस आहेत! आय मीन इट मुवि!) तेव्हा संम वर टिका होणे... पुर्वीचे मिपा राहिले नाही असे कढ निघणे.. दर्जा खालावत चालला आहे अशा चर्चा होणे काही पहिल्यांदा होत नाहीये. ह्यालाच्च मिपा म्हणतात.. संमचे न पटणे शक्य आहेच.. ते ही सदस्य आहेत इथे. पण फायनली नीलकांत (सध्या प्रशांत) आहेत. तुम्हाला न सोसवल्यास त्यांच्याकडे जाण्याचा मार्ग नेहमी खुला असतोच. आणि नीलकांतच्या निर्णयावर (सुदैवाने) अजुन कुणाला शंका असल्याचे पाहिलेले नाही. समजा असतीलच तर "हे खाजगी संस्थळ...." वगैरे आहेच. मी काय म्हणते.. नाही आवडत.. नाही पटत.. जायची तयारी आहेच झालेली.. तर कशाला मुहुर्ताची वाट बघायची?! मिपा कुणाला आमंत्रणाच्या अक्षता घेऊन आले नव्हते.. आणि इथे रहाच असा आग्रह सुद्धा कुणी करत नसतं.. आणि तरीही अगदी छान चाललय की मिपाचं.. तेव्हा दोस्तहो... पुढचा धागा येउ द्यात!
  • Log in or register to post comments

मी काय म्हणते.. नाही आवडत..

बॅटमॅन
Fri, 02/12/2016 - 14:15 नवीन
मी काय म्हणते.. नाही आवडत.. नाही पटत.. जायची तयारी आहेच झालेली.. तर कशाला मुहुर्ताची वाट बघायची?!
हे मिपामालकांनी सांगायचं असतंय, इतरांनी पचकायचं काम नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

"निघा" असं लिहीलय का कुठे

पिलीयन रायडर
Fri, 02/12/2016 - 14:40 नवीन
"निघा" असं लिहीलय का कुठे त्यात? मला तर मी एक प्रश्न विचारलाय असं दिसतय...नाही म्हणजे तुम्ही विद्वान, नसलेले अर्थ चांगले सापडतात तुम्हाला. म्हणुन विचारलं.. आणि प्रश्न साधा सरळ सोपा आहे. तुम्हाला उद्देशुन लिहीलेलाही नाही.. तुम्हीच स्वतःवर ओढवुन घेताय.. बाकी इथे नीलकांत सोडून कुणीच मालक नाही.. तरी लोकांनी "अमुक करा.. तमुक करु नका" टाईप प्रतिसाद दिलेत, हो की नै? माझाच प्रतिसाद, तुम्हालाच का झोंबला? असोच.. आपल्या "चर्चांचा" अनुभव तुम्हालाही आहे.. आणि मलाही.. तेव्हा मला तुमच्याशी बोलण्यात रस नाही.. तुम्हालाही नाहीचे.. माहितीये.. जय महाराष्ट्र!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

छाण पचकू प्रतिसाद, कसं गं बाई

बॅटमॅन
Fri, 02/12/2016 - 14:43 नवीन
छाण पचकू प्रतिसाद, कसं गं बाई जमतं असं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

कसचं कसचं... तुमचं बघुन बघुन

पिलीयन रायडर
Fri, 02/12/2016 - 14:49 नवीन
कसचं कसचं... तुमचं बघुन बघुन शिकतेय बै! सांभाळुन घ्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

खरं म्हणतील कुणीतरी, बाकी

बॅटमॅन
Fri, 02/12/2016 - 14:53 नवीन
खरं म्हणतील कुणीतरी, बाकी ग्रूपिझम शिकावा तो आपल्याकडूनच. यात कै शंका नाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

हे असं असतं.. मी एकटी इथे

पिलीयन रायडर
Fri, 02/12/2016 - 14:58 नवीन
हे असं असतं.. मी एकटी इथे बोलतेय... पण तुम्ही पोहचलात ग्रुपिझम वर!! मी जनरल लिहीतेय.. मी पर्सनल होताय..!! मी मत मांडतेय.. तुम्ही "पचकते" म्हणताय..!! सग्ग्गळं जग विखारी आहे.. तुम्हीच तेवढे निरागस हो! उगी उगी!! (बरं आता माझ्याकडुन प्लिझच! रामराम)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

तुम्ही* पर्सनल होताय

पिलीयन रायडर
Fri, 02/12/2016 - 15:00 नवीन
तुम्ही* पर्सनल होताय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

ठीक आहे, तुमचंच खोटं.

बॅटमॅन
Fri, 02/12/2016 - 15:02 नवीन
ठीक आहे, तुमचंच खोटं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

पिलीयन ताई

रिम झिम
Sat, 02/13/2016 - 08:44 नवीन
मला राहुन राहुन एका म्हणीची उगिचच आठवण येतीय.. "अगं अगं म्हशी, मला कुठे नेशी.." घर सोडुन तर जायचे नसते, पण .. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

मुवि सोडुन +१

काळा पहाड
Fri, 02/12/2016 - 14:39 नवीन
मुवि सोडुन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

सहमत

गॅरी ट्रुमन
Fri, 02/12/2016 - 14:53 नवीन
अरे पिराताईंचा हा प्रतिसाद आधी वाचला असता तर माझे टंकण्याचे कष्ट वाचले असते :) संपूर्ण प्रतिसादाशी सहमती आहे हे वेगळे लिहायलाच नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

गॅरी भाउ थॅन्क्यु!

पिलीयन रायडर
Fri, 02/12/2016 - 15:04 नवीन
गॅरी भाउ थॅन्क्यु! जेव्हा कारवाई होते तेव्हा १००% एकच बाजु चुक किंवा बरोबर असा निर्णय घेता येत नसतो. पण संम जेव्हा असे निर्णय घेतात तेव्हा त्यांना तसा अधिकार मालकांनी दिलेला आहे हे विसरता येणार नाही. म्हणजे मालकांची त्या निर्णयांना संमती असणार. स्वतः मालक येतात तेव्हा तर आपण तसेही बोट दाखवु शकत नाही. पण एका पार्टीने आपली काही चुक नव्हतीच.. इथे अन्यायच झाला आहे.. इ इ बोलुन सतत मिपाला दुषणे दिली तर त्यातुन फक्त वातावरण बिघडण्याशिवाय काय निष्पन्न होणारे? जे मुद्दे असतील ते मालकांसमोर मांडायला हवेत. असो.. जाणारे गेले तरी काय फरक पडतो.. कित्येक गेले.. मिपा काही थांबलं नाही.. उगाच लोकांना भ्रम असतात स्वतःविषयी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

धागा कालचा आहे.

जेपी
Fri, 02/12/2016 - 15:07 नवीन
धागा कालचा आहे. रात गई बात गई.
  • Log in or register to post comments

बरं मग ते तुमचे पन्नास झाले

पिलीयन रायडर
Fri, 02/12/2016 - 15:40 नवीन
बरं मग ते तुमचे पन्नास झाले म्हणुन मी सत्कार केला तर चालेल का? जेपींच्या "उडवला तरी चालेल" कॅटेगरीतल्या धाग्याने पन्नाशी गाठल्याबद्दल अगोदरच बांधलेली लेस असणारे बुट आणि "जन पळ भर म्हणतील हाय हाय" ह्या गाण्याची सीडी देऊन "सत्कारसमितीतनवीन्सांभाळुन्घ्या" समिती तर्फे सत्कार करण्यात येत आहे!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

'रेग्युलर' आयुष्यातल्या

मम्बाजी सर्वज्ञ
Fri, 02/12/2016 - 16:44 नवीन
'रेग्युलर' आयुष्यातल्या मानापमानापेक्षा आजकाल वर्चुअल आयुष्यातले मानापमान महत्वाचे वाटायला लागले आहेत. आभासी जगाची एवढी नशा? यात 'भावना दुखावलेले' जे आहेत ते प्रत्यक्षात बाकीच्या मिपा सदस्यांना किती वेळा प्रत्यक्षात भेटले आहेत?
  • Log in or register to post comments

'भावना दुखावलेले' जे आहेत......

मुक्त विहारि
Fri, 02/12/2016 - 17:24 नवीन
....ते प्रत्यक्षात बाकीच्या मिपा सदस्यांना किती वेळा प्रत्यक्षात भेटले आहेत?" ह्याला अनुसरून माझा वैयक्तिक अनुभव... मिपाकर सुनिल आणि मी, आमचे काही वैचारिक (वैयक्तिक नाही) मतभेद होते."ऐसी अक्षरेच्या" कट्ट्याच्या वेळी, आम्ही दोघांनीही त्या मतभेदावर समोरासमोर चर्चा करुन, योग्य तो तोडगा काढला.(अद्यापही सुनिलचे आणि माझे मतभेद होतातच.पण सुनिलही ते तेव्हढ्यापुरतेच ठेवतो.) असो, नळावरच्या भांडणाने इतर चाळकर्‍यांची फुकट करमणूक होते.इथे बरेच नळ रुपी धागे आहेत.पाणवठ्यावर गावगप्पा पण होतात आणि भांडणे पण होतात.आपण आपापल्या रिकांम्या घागरीत ज्ञानाचे ४-५ थेंब टाकावेत.जमल्यास आपल्या ज्ञानाचे २-३ थेंब इतरांना द्यावेत. वरील वाक्य हे एकदम सामान्य आहे.जास्त मनावर घेवू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मम्बाजी सर्वज्ञ

स्पॉट ऑन!!! समोर समोर

मम्बाजी सर्वज्ञ
Fri, 02/12/2016 - 18:54 नवीन
स्पॉट ऑन!!! समोर समोर होणार्या चर्चे ला बीट नाही! आणि कित्येकदा समोर समोर चर्चा झाली कि लक्षात येते समोरचा माणूस आपल्या आभासी जगातल्या माणसापेक्षा फार वेगळा आहे. म्हणून तर फोन आणि पत्रातून महत्वाच्या गोष्टी समोरच्याला सांगणे जास्त कठीण आहे. माझी कॉमेंट कुणालाही वैयक्तिक टोमणा नवता, मला एवढेच म्हणायचे होते कि दिवसातून १० मिनिटे जिथे वेळ घालवतो तिथली आभासी दुनिया सिरीयसली घेण्यासारखी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

समोर समोर होणार्या चर्चे ला बीट नाही!

मुक्त विहारि
Fri, 02/12/2016 - 19:03 नवीन
"मला एवढेच म्हणायचे होते कि दिवसातून १० मिनिटे जिथे वेळ घालवतो तिथली आभासी दुनिया सिरीयसली घेण्यासारखी नाही." सेम हियर... माझेही मत तुमच्यासारखेच असल्याने, तुमच्या प्रतिसादाच्या खाली त्याला टाकले. गैरसमज झाला असल्यास, आमच्याकडून पांढरा झेंडा आणि बिनशर्त माफी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मम्बाजी सर्वज्ञ

मूवी शेठ. माफी वगरे मागू नका

मम्बाजी सर्वज्ञ
Fri, 02/12/2016 - 22:22 नवीन
मूवी शेठ. माफी वगरे मागू नका हो. माझा गैरसमज वगरे नाही. आणि झालाच, तर ती चूक माझीच असायला हवी न! मी जनरल स्टेटमेंट केले होते. आज काल मिपा काय फेसबुक वर पण लोक जीवावर उठतात कधी कधी. आमिर च्या स्टेटमेंट वर मी त्याला विरोध करणाऱ्या पोस्टर ला लाईक केलं म्हणून माझ्याशी न बोलणारे 'मित्र' आहेत आणि 'नातेवाईक' सुधा. गम्मत म्हणजे तेही देशाबाहेर असतात आणि मी सुधा. आता काय बोलणार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

नाही म्हणता म्हणता ५४

वेल्लाभट
Fri, 02/12/2016 - 18:25 नवीन
नाही म्हणता म्हणता ५४ प्रतिसाद झाले की !
  • Log in or register to post comments

हा घ्या ५५ वा

अरुण मनोहर
Sat, 02/13/2016 - 08:21 नवीन
हा घ्या ५५ वा
  • Log in or register to post comments

मिपा आणि सिलेक्टिव

शब्दबम्बाळ
Sat, 02/13/2016 - 16:09 नवीन
मिपा आणि सिलेक्टिव अभिव्यक्तीस्वातंत्र्य असे काहीस म्हणायचं होत का आपल्याला? कसय ना, बरेच महिने मोगा, हितेश आणि नाकी अनेक आयडीना किती आणि कुठल्या भाषेत प्रतिसाद दिले जात होते हे आपणही तेव्हा पहिले असेलच. माझे त्यांच्या विचारला समर्थन नाहीच पण त्यांना विरोध करणाऱ्यांची भाषा त्यावेळी कोणाला आक्षेपार्ह वाटली नाही. चिखलफेक धाग्यामध्ये काही "विचारवंत" देखील इतरांना मतीमंद वगैरे लेखायला कमी करत नाहीत पण तेव्हा देखील असे धागे येत नाहीत किंवा त्यांचा निषेध होत नाही, एखादे अनुमोदन मात्र मिळते!(ज्याचा त्याचा कंपू शेवटी) हा धागा देखील नक्की कोणाच्या तरी प्रतिक्रियेनंतरच आला असणार. असो, तेव्हा थोडक्यात काय हे सगळ आधीपासून होत आणि पुढेही राहणार... साहित्यिक धाग्यामध्ये या गोष्टी अभावानेच होतात पण काथ्याकुट सुरु झाली कि लगेच भाषा बदलते!
  • Log in or register to post comments

साहित्यिक धाग्याला प्रतिसाद

अभ्या..
Sat, 02/13/2016 - 16:21 नवीन
साहित्यिक धाग्याला प्रतिसाद देणे जीवावर येते. तिथे एकट्याने सादर केलेली कलाकृती असते. काकू हिरीरीने अन बहुतांशी कंपूने लढवला जातो. काही मेंबर फक्त त्यासाठीच येतात. टीआरपी पाहिजे हेच धोरण ठेवल्यास हळूहळू काथ्याकूटातील तुच्छ्तावाद अन कंपूशाही सार्वत्रिक होणारच. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ

अत्यंत योग्य निरिक्षण !

विवेक ठाकूर
Sat, 02/13/2016 - 19:27 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

नेमके.

राही
Sat, 02/13/2016 - 22:24 नवीन
'तुच्छतावाद'- नेमका शब्द. आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

टीआरपी पाहिजे हेच धोरण

बॅटमॅन
Mon, 02/15/2016 - 14:39 नवीन
टीआरपी पाहिजे हेच धोरण ठेवल्यास हळूहळू काथ्याकूटातील तुच्छ्तावाद अन कंपूशाही सार्वत्रिक होणारच. असो.
त्यात सिलेक्टिव्ह हेडमास्तरकीचे धोरण अ‍ॅडवले तर मग बहारच येणार एक नंबर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अभिव्यक्ति स्वातंत्र्य वगैरे

नाना स्कॉच
Sun, 02/14/2016 - 09:44 नवीन
अभिव्यक्ति स्वातंत्र्य वगैरे नाहीये मिपावर, साधारण ३ महीने अगोदर आयडी घेतला, त्याच्या अगोदर सहा महीने वाचनमात्र होतो, त्यावर हा निष्कर्ष बेतलेला आहे आमचा. आयडी घेतल्यावर सहज काही काथ्याकूट धाग्यावर प्रतिसाद देता जी काही उत्तरे मिळाली ती उत्साहवर्धक तरी म्हणवली जाऊ नयेत, कारण माझी मते संबंधितांपेक्षा वेगळी होती. तस्मात् मिपा वर अभिव्यक्ति स्वातंत्र्य नाहीये पण शेवटी हे एक खासगी संस्थळ आहे हे ही खरे अन बाकी ठिकाणपेक्षा इथे बरं आहे त्यातल्या त्यात, दगडापेक्षा वीट मऊ प्रमाणे. (लेखन कला नसलेला अन प्रतिसाद मात्र) स्कॉचनाना
  • Log in or register to post comments

अभिव्यक्ती स्वातन्त्र्य हे

विजुभाऊ
Sun, 02/14/2016 - 10:00 नवीन
अभिव्यक्ती स्वातन्त्र्य हे दोन्ही बाजूने असते. तुम्ही जर कोणाला कानाखाली हाणायची परवानगी असेल तर त्यालादेखील तुम्हाला बदडायची परवानगी असते हे लक्षात असू द्या.
  • Log in or register to post comments

=)) Classic!

पिलीयन रायडर
Sun, 02/14/2016 - 10:13 नवीन
=)) Classic!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

:)

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 02/14/2016 - 20:24 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

असं कै नसतं. इथे फक्त काही

बॅटमॅन
Mon, 02/15/2016 - 14:42 नवीन
असं कै नसतं. इथे फक्त काही जणांनाच ते महद्भाग्य लाभलेले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे

अभ्या..
Mon, 02/15/2016 - 14:51 नवीन
अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे तुलनेने आधुनिक मूल्य झाले. पुढे दिलेले उदाहरण मध्ययुगीन द्वंद्वाचे झाले. दोन्ही क्लासिक वाटत असेल तर हरकत नाही. इथलाच विचार करायचा असेल तर आयडी एके आयडी असा विचार करावा मग. जुना आयडी आहे, स्त्री आयडी आहे, अनुभवी आयडी आहे, अधिकारी आयडी आहे असे विषेषाधिकारांचे कवच घेण्याला अर्थ नसतो मग. त्यालाच पार्शिलिटी म्हणतात आणि मुख्यत्वे विरोध त्यालाच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

+११११

नीलमोहर
Mon, 02/15/2016 - 15:20 नवीन
'आयडी एके आयडी असा विचार करावा' - सगळीकडेच, सर्वच बाबतीत. "त्यालाच पार्शिलिटी म्हणतात आणि मुख्यत्वे विरोध त्यालाच आहे." - अगदी, सगळ्यात जास्त डोकं उठतं ते पार्शलिटीमुळे, एकतर घरीदारी, ऑफिसात, समाजात ते अनुभवायला मिळत असतेच, इथेही तेच म्हटल्यावर अवघड आहे. "हळूहळू काथ्याकूटातील तुच्छ्तावाद अन कंपूशाही सार्वत्रिक होणारच" - आत्ता सार्वत्रिक नाही का ते, धाग्यावर म्हणा खफवर म्हणा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

सहमत आहे विजुभाऊ, फ़क्त ही

नाना स्कॉच
Sun, 02/14/2016 - 10:16 नवीन
सहमत आहे विजुभाऊ, फ़क्त ही हाणामारी ज्याने मारले अन ज्याला मारले त्यांच्यात असावी, वरती अभ्या हा आयडी म्हणाला तशी कंपुशाही नसावी, काय मत पड़ते बघा. नाहीतर विरोधी मत मांडतो एक अन त्याला झोड़पायला किमान पाच सहा जण धावून येणार हे चुक नसेल का??
  • Log in or register to post comments

जे पी

नाखु
Mon, 02/15/2016 - 09:57 नवीन
लिहितो कमी पण जे लिहीतो ते शॉलेट असते !!!
प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे पण दुसर्याला हिणवण्याचा नाही.
आणी हिणवत नाही असा आवही आणू नये (कारण तो मुखवटा फार काळ टिकत नाही!) मिपा सदस्याच्या सुमारे ७वर्षातील सुरवातीची ५ वर्षे वाचनमात्र असलेला मिपाकर नाखु
  • Log in or register to post comments

आणा की आणि?

आतिवास
Mon, 02/15/2016 - 10:02 नवीन
धाग्याच्या शीर्षकावरून (आणा) काही कळलं नव्हतं, प्रतिसाद वाचून कळलं.
  • Log in or register to post comments

शीर्षक बरोबरे.

अभ्या..
Mon, 02/15/2016 - 14:53 नवीन
शीर्षक बरोबरे. इथे काहीजणांचेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य बंद्या रुपयाचे आहे बाकीचे आण्याचे सदस्य आहेत. ;) (जुन्याकाळी चाराणे सदस्य ही काँग्रेस - गांधी सन्दर्भातली कन्सेप्ट होती ब्वा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

जेपी म्हणतायंत :

विवेक ठाकूर
Mon, 02/15/2016 - 17:37 नवीन
मिपा, आणा अभिव्यक्तीस्वातंत्र्य !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

प्रतिसाद

विवेक ठाकूर
Mon, 02/15/2016 - 15:26 नवीन
..... म्हणजे तुम्ही माझ्या वैयक्तिक अनुभवाविषयी टिपण्णी करत आहात का? नाही. ते जनरल स्टेटमंट आहे आणि त्या क्षेत्रात ती प्रूवड फॅक्ट आहे. तुम्ही उगीच स्वतःवर ओढून घेतायं तुम्ही ज्या काही थिअरीज मांडत आहात त्या कितीही म्हणलं तरी अखेर कल्पनेच्या भरार्‍याच आहेत. दोन कारणांसाठी तुम्हाला विषयाची काहीही माहिती नाही, हे तुमचे दोन्ही मुद्दे दर्शवतात. पाहा : १. स्त्री देह आणि त्याची प्रणयतृप्ती ह्यावर तुम्ही फक्त "ओबझर्व्हर" म्हणुनच बोलु शकता. प्रत्यक्षात त्या देहाची अनुभुती तुम्हाला अजिबात शक्य नाही. त्यामुळे त्यातली गुंतागुंत तुम्हाला समजण्यापेक्षा मला समजण्याचे चान्सेस नेहमीच जास्त असतील. तेव्हा तुम्ही मला मल्टिपल ऑरगॅझम आणि नो ऑरगॅझम वगैरे सांगु नका. तो असतो की नसतो की "समोरच्याला वाटतं असतो.. पण खरं तर नसतोच"... वगैरे प्रकार तुमच्यापेक्षा निश्चितच मला जास्त ठाऊक आहेत. काळजी नसावी. हे बेछूट विधान आहे. ऑरगॅजमचा अनुभव प्रत्येक पुरुषाला, प्रत्येक प्रणयात येतोच. पण प्रत्येक स्त्रीला तसा अनुभव येत नाही. तुमच्या माहिती करता, पुरुषाच्या ऑरगॅजम सदृश स्त्रीला आलेला अनुभव ही फार दुर्मिळ घटना आहे, त्यामुळेच तर प्रणयविश्वात त्याची चर्चा आहे. आणि स्त्रीच्या ऑरगॅजमचा अनुभव `ऑबजर्वर' म्हणून यायला पॉर्न पाहाणं पुरेसं आहे. तो `पार्टनर' म्हणून असेल तर इतका प्रत्यक्ष असतो की तुम्ही दोन्हीकडून, त्याची उघड ग्वाही देऊ शकता. त्यासाठी फालतू डेटा वगैरे गोळा करण्याची गरज नसते. २. हा मुद्दा मी अगणित वेळा आधी मांडलेला आहे. परत मांडते. आणि ह्यावेळेस नाईलाजाने काही बोलावे लागणार आहे. संक्षी तुमचा डेटापॉईंट एक आणि एकच आहे. त्यापेक्षा जास्त तुमच्या अनुभवाच्या कक्षा नाहीचेत. तुम्ही मागे एकदा तुमच्या मुल होतानाच्या अनुभवाविषयी लिहीले होते तेव्हा साधारण हेच मुद्दे आले होते. तुम्ही कदाचित तेव्हा बरेच वाचन केले असेल. काही प्रयत्नही केले असतील. तुम्हाला मुलगा झाला. तुम्हाला तुमच्या मेथडवर विश्वास बसला असेल. पण दुर्दैवाने तेच समस्त स्त्री जमातीला लागु करण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात असे वाटते. तेव्हा तुम्हाला आलेला अनुभव सार्वत्रिक आहे असे मानणे हा ही एक कल्पनाविलासच आहे. अर्थात, अपत्यप्राप्तीसाठी मी केलेलं अफाट वाचन, स्त्री देहाचा, तिच्या मानसिकतेचा आणि भावविश्वाचा विविध अंगांनी केलेला अभ्यास, प्रणय आणि जनन प्रक्रियेची सखोल माहिती, हा माझा बेसिक डेटा नाही, फर्स्ट-हँड एक्स्पिरियंस आहे. आणि तो सार्वत्रिक का आहे याचं स्पष्टीकरण मी इथे देऊ शकत नाही. पण याबाबतीत माझे प्रतिसाद पुरेसे जोरकस आहेत यावरनं तुम्ही अनुभवाच्या सत्यतेचा आदमास लावू शकता. धागा काढण्याइतपत काही शिल्लक असेल आता तर काढा. (मला तसं काही आता बोलायला असेल तुमच्याकडे असं वाटत नाही हा भाग वेगळा...) तुम्ही तुमचे गैरसमज कायम ठेवा. सुखी राहाल. ______________________ शासकांसाठी : त्यांनी प्रश्न विचारलेत म्हणून, नेहमी प्रमाणे सभ्यतेच्या सर्व मर्यादा पाळून मी उत्तर दिलं आहे. धोरणात बसत नसेल तर त्यांचा आणि माझा दोन्ही प्रतिसाद निस्सरित करावेत.
  • Log in or register to post comments

कमाल आहे

गॅरी ट्रुमन
Mon, 02/15/2016 - 16:19 नवीन
ऑरगॅजमचा अनुभव प्रत्येक पुरुषाला, प्रत्येक प्रणयात येतोच. पण प्रत्येक स्त्रीला तसा अनुभव येत नाही.
तुम्ही स्वतः स्त्री नसतानाही असे विधान बेधडकपणे कसे करू शकता हो विठाकाका? (विठाकाकांना काका म्हणू की काकू म्हणू अशी शंका पडलेला) ट्रुमन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

तुम्ही पुरुष असाल तर माझ्या विधानावर

विवेक ठाकूर
Mon, 02/15/2016 - 16:25 नवीन
साशंकता व्यक्त करणं हे आश्चर्य आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा