डेविड हेडलीची साक्ष,JNU, आणि ढोंगी फेक्युलर

चेक आणि मेट's picture
चेक आणि मेट in काथ्याकूट
11 Feb 2016 - 11:01 am
गाभा: 

नमस्कार मंडळी,

(पहिल्यांदाच लिहतोय त्यामुळे बारीकसारीक त्रुटींकडे दुर्लक्ष करा.)

तर मुद्दा असा कि,
डेविड हेडलीची साक्ष वगैरे घेण्याचं काम सुरू आहे,आणि त्याने एक मोठा खुलासा केला आहे कि इशरत जहां ही सुसाईड बाॅम्बरच होती.ती लष्कराची महिला आतंकवादी होती.
तर इशरत प्रकरणावरून पूर्वी बराच वाद झाला होता,त्यामध्ये गुजरात पोलिस आणि मोदी,शहांच्या नावाने बरेच स्वयंघोषित सेक्युलर खडे फोडत होते.तथाकथित ढोंगी सेक्युलर म्हणत होते कि ती निर्दोष होती म्हणे!!!
दुसरा मुद्दा असा कि JNU म्हणजे जवाहरलाल नेहरू युनिवर्सिटीमध्ये ते वामपंथी का काय ते विद्यार्थ्यांनी म्हणे काश्मिरच्या स्वातंत्र्याबद्दल कार्यक्रम घेतला आणि 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा दिल्या.
तर मला असे म्हणायचे कि जे राष्ट्रीय संवेदनशील मुद्दे आहेत त्या मुद्यांना हात घालायची खाज या अति लिबरल विद्यार्थांना का सुटते म्हणे??
आता हे सगळं लिहल्यावर काहीजण मला मोदीभक्त म्हणतील.पण असो दुर्लक्ष करणे.
तर हे दोन महत्वाचे मुद्दे मी मांडले आहेत,अजून अशा बर्याच गोष्टी सांगता येतील कि जिथे तथाकथित सेक्युलरांचा ढोंगीपणा उघडा पडतो.
तिकडे हाफिज सईदने ट्वीट करून त्या JNU च्या पाकप्रेमींना पांठिबा दर्शविला आहे.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मोदीसरकार नसते तर या सेक्युलरखाजाड्या मंडळींनी असे कार्यक्रम घेतले असते का??

(सेक्युलर आणि उदारमतवादी असणं हे चांगलंच आहे,पण ढोंगी सेक्यलरपणा हा देशासाठी विघातक आहे.काय म्हणता??)

प्रतिक्रिया

त्या ढोंगी लोकांना सेक्युलर मुद्दाम म्हटले जाते, खर्‍या व देशभक्त सेक्युलरांना दाबायला.

रमेश भिडे's picture

12 Feb 2016 - 9:26 pm | रमेश भिडे

हेडलीचा प्रकरण आताच उकरून काढण्यामागे मोदींचा डाव आहे.
त्यांच्या इतक्या अमेरिका दौर्‍याचा मागे हेच षडयंत्र होता.
इतके दिवस साक्ष द्यायला नकार देणारी अमेरिका अचानक हेडलीच्या साक्षीला तयार होते.
आणी ठरवून तेच प्रश्न विचारले जातात ज्यांची उत्तरे पढवलेली आहेत. यावरून हेच सिद्ध होते की हा सरळ सरळ एक कट आहे.
या डबल एजंटची साक्ष कोर्ट ग्राह्य धरणार आहे का ? आणि ती कितपत विश्वासार्ह आहे ?
पण देशांर्तगत पुरावे सापडले नाहीत म्हणून हा फार्स उभा केलेला आहे.
देशामधल्या (वेमुलासारख्या)अंर्तगत समस्यांवरून लक्ष विचलीत करण्याचा हा प्रयत्न आहे.

मी-सौरभ's picture

14 Feb 2016 - 7:43 pm | मी-सौरभ

शक्यता नाकारता येत नाहीये

वेल्लाभट's picture

11 Feb 2016 - 11:11 am | वेल्लाभट

दम नाही हो आपल्या देशात. त्यामुळे जे जे होईल ते ते पहावे....

अगदी, देशात राहायची भीती वाटते म्हणणार्‍यांना एव्हाना, "बाबा रे, कोणत्या देशात जायचंय सांग" असं विचारुन पार्श्वभागावर रट्टा मारुन हाकलून द्यायला हवं होतं.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

12 Feb 2016 - 6:44 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

हल्ली माझा जेन्युइन आणि सारकास्टिक प्रतिसादांमधे गोंधळ उडायला लागलेला आहे. डोकं तपासुन घ्यायला हवं :(!!!

मी-सौरभ's picture

12 Feb 2016 - 6:29 pm | मी-सौरभ

चिंतेचा विषय आहे हा चिमणराव.... ;)

अनुप ढेरे's picture

12 Feb 2016 - 8:31 pm | अनुप ढेरे

हेच्च बोल्तो. काल एका धाग्यावर मृत्युंजयरावांनी डांगे सायबांना दिलेल्या एका प्रतिसादाबद्दल शंका उत्पन्न झाली म्हणून तसं विचारलं. खाली धुळवड दिसल्यावर कळाल काय ते.

याॅर्कर's picture

11 Feb 2016 - 11:32 am | याॅर्कर

सेक्युलरखाजाड्या

ह्यो शब्द काळजाला भिडला बर का!

विजय पुरोहित's picture

11 Feb 2016 - 11:35 am | विजय पुरोहित

JNU म्हणजे जवाहरलाल नेहरू युनिवर्सिटीमध्ये ते वामपंथी का काय ते विद्यार्थ्यांनी म्हणे काश्मिरच्या स्वातंत्र्याबद्दल कार्यक्रम घेतला आणि 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा दिल्या.
अतिशय अस्वस्थ करणारं आहे हे...

संदीप डांगे's picture

11 Feb 2016 - 11:35 am | संदीप डांगे

पॉपकॉर्न प्लीज.

(मेगाबायटीप्रतिसादसन्यस्त खडग)

चेक आणि मेट's picture

11 Feb 2016 - 11:42 am | चेक आणि मेट

ओ साहेब,
मुद्दे गंभीर आहेत,पाॅपकाॅर्न काय मागताय??
मी काय या जिल्ब्या टाकलेल्या नाहीत.

संदीप डांगे's picture

11 Feb 2016 - 12:09 pm | संदीप डांगे

मुद्दे गंभीर आहेतच. नाही कुणी म्हटलंय?

चांदणे संदीप's picture

11 Feb 2016 - 12:13 pm | चांदणे संदीप

अशातच पाॅपकाॅर्न खायला मज्जा येते! ;)

चेक आणि मेट's picture

11 Feb 2016 - 12:19 pm | चेक आणि मेट

मग तुमचे अनमोल मत मांडा कि राव!
नेमकं या आशयाच्या विरूद्ध धागा असता!तर बेंबीच्या देठापासून, आतडी पिळवटून, पोटतिडकिने मुद्दे मांडले असते तुम्ही!काय म्हणता??
(तुमचे मत केव्हा कुठे मांडायचे याचे स्वातंत्र्य तुम्हाला आहेच)

कैलासवासी सोन्याबापु's picture

11 Feb 2016 - 12:28 pm | कैलासवासी सोन्याबापु

माफ़ करा मला,

खरेतर हा मुद्दा तुमच्या अन डांगे साहेबांच्या मधला आहे त्यामुळे मी बोलणे उचीत ठरणार नाही तरीही एक निरिक्षण आगाऊपणे नोंदवतो, ते म्हणजे तुम्ही डांगे ह्यांना स्टीरियोटाइप केलेले दिसते आहे! त्यांचा प्रतिसाद काय असेल अन कसा असेल असे आडाखे जर तुमच्या मनात पक्के असतील तर डांगे काहीही बोलो तुम्हाला वाकडेच लागेल! तस्मात् ते बोलत नाहियेत तेच बरे असे मत पड़ते आहे

नथिंग पर्सनल जस्ट एन ऑब्जरवेशन

हे वरील ठळक वाक्यांतुन जाणवले

नेमकं या आशयाच्या विरूद्ध धागा असता!तर बेंबीच्या देठापासून, आतडी पिळवटून, पोटतिडकिने मुद्दे मांडले असते तुम्ही!काय म्हणता??

संदीप डांगे's picture

11 Feb 2016 - 12:30 pm | संदीप डांगे

नेमकं या आशयाच्या विरूद्ध धागा असता!तर बेंबीच्या देठापासून, आतडी पिळवटून, पोटतिडकिने मुद्दे मांडले असते तुम्ही!काय म्हणता??

केव्हाचं काय म्हाइत नै पण आता तरी एवढंच म्हणतो की चड्डीत र्‍हा ना भाऊ.

भाषा जपून वापरा माझ्याबद्दल, माझ्यासोबत. ही पहिली आणि शेवटची सूचना.

चेक आणि मेट's picture

11 Feb 2016 - 12:40 pm | चेक आणि मेट

डांगेसाहेब,
ओघाच्या भरात थोडं जास्तीच बोल्लो,त्याबद्दल क्षमस्व.
.
.

पण हा पाॅपकाॅर्न चघळत बसण्याचा धागा आहे का??
हे कृपया सांगावे.
तुम्ही पाॅपकाॅर्न हा शब्द वापरल्यामुळे राग आला.
बाकि आम्ही चड्डी एका विशिष्ट वेळेलाच काढतो.एरवी चड्डीतच असतो.
बोलणं लागलं असेल तर परत एकदा I AM SORRY.

संदीप डांगे's picture

11 Feb 2016 - 12:53 pm | संदीप डांगे

इट्स ओके नाऊ. राग बाजुला ठेवा. त्याचा इथे मिसळपाववर काहीही उपयोग नाही. त्यापेक्षा तर्क, विचार आणि मुद्दा ह्यातून प्रतिपक्षाला बेजार करण्यात प्राविण्य मिळवा. राग प्रतिपक्षाला यायला हवा, तुम्हाला नाही.

राहिला पॉपकॉर्नचा प्रश्न तर असं आहे की तुमचा धागा विस्तृतपणे काहीही सांगत नाही. म्हणजे प्रतिसादांमधूनच घटना, पार्श्वभूमी, कारणे, परिणाम उलगडत जाणार. त्यासोबत लोकांचे बायस उघडे पडत जातील आता ते वाचायचे म्हणजे पॉपकॉर्न लागतीलच. काय म्हणता?

मृत्युन्जय's picture

11 Feb 2016 - 12:56 pm | मृत्युन्जय

तुम्ही लिहा ना विस्तृतपणे. बर्‍याचदा धाग्यांपेक्षा तुमचे प्रतिसाद अजुन विस्तृत असतात. बर्‍याच गोष्टी कळत जातात त्यामुळे.

अनुप ढेरे's picture

11 Feb 2016 - 1:21 pm | अनुप ढेरे

तारिफ अधिक टोमणा?

तसं वाटलं तरी. खखो देव जाणे.

अनुप ढेरे's picture

11 Feb 2016 - 10:05 pm | अनुप ढेरे

हॅहॅहॅ... खालची हाणामारी वाचायच्या आधी हे वाचलेलं. म्हणून संभ्रम

चेक आणि मेट's picture

11 Feb 2016 - 6:12 pm | चेक आणि मेट

राहिला पॉपकॉर्नचा प्रश्न तर असं आहे की तुमचा धागा विस्तृतपणे काहीही सांगत नाही. म्हणजे प्रतिसादांमधूनच घटना, पार्श्वभूमी, कारणे, परिणाम उलगडत जाणार. त्यासोबत लोकांचे बायस उघडे पडत जातील आता ते वाचायचे म्हणजे पॉपकॉर्न लागतीलच. काय म्हणता?

मी धाग्यातच लिहलयं,कि पहिल्यांदा लिहतोय म्हणून.
घटना,पार्श्वभूमी,कारणे इ सर्व सांगत बसणे म्हणजे मिपाकरांच्या ज्ञानावर संशय घेण्यासारखे आहे.
आणि राहिला मुद्दा पाॅपकाॅर्नचा,जे लिहले आहे ते थोडके आणि वास्तव आहे,नेहमी फाफटपसारा करून लिहूनसुद्धा त्यातून काही साध्य होत नसतं कैकवेळा.
तुम्हाला पाॅपकाॅर्न लागणार असतील,तर याहून अधिक ते काय बोलणे,काय म्हणता?

कैलासवासी सोन्याबापु's picture

11 Feb 2016 - 11:38 am | कैलासवासी सोन्याबापु

(सेक्युलर आणि उदारमतवादी असणं हे चांगलंच आहे,पण ढोंगी सेक्यलरपणा हा देशासाठी विघातक आहे.काय म्हणता??)

+१०००००००००००० म्हणतो

मी सहसा टोकाच्या भूमिका घेणे टाळतो पण माझ्यामते जे एन यु आपल्या स्थापनेमागे असलेला एकही विचार साध्य करत नाहिये! ही यूनिवर्सिटी बंद करुन टाकायला हवी आहे !!!

मृत्युन्जय's picture

11 Feb 2016 - 12:50 pm | मृत्युन्जय

नेहरुंच्या नावाची युनिव्हर्सिटी बंद करण्याची या देशात कुणाची टाप लागुन राहिली आहे? सोन्याबापू यु टु ना...

कैलासवासी सोन्याबापु's picture

11 Feb 2016 - 12:56 pm | कैलासवासी सोन्याबापु

ह्या बाबतीत ही यूनिवर्सिटी साक्षात् नेहरूंच्याच् "वोकेशन बेस्ड एजुकेशन" ला सुरुंग लावते आहे मृत्युंजय भाऊ!! मागे एकदा डोक्यात हिस्ट्री मधे पीएचडी करायचे खुळ घुसले होते तेव्हा जेएनयु जवळून पाहिली आहे! कम्युनिस्ट यूटोपिया ची अशक्य स्वप्ने पाहात अन दाखवत ही यूनिवर्सिटी राख झाली आहे! च्यु** लोकं आहेत नुसती, धनुष अन सोनम कपूर च्या रांझणा चित्रपटात जी गत दाखवली आहे जेएनयुची ती शतप्रतिशत बरोबर आहे!! अन त्याच्यामुळे त्यांचा ताबा सुटला आहे!! मरू दे!! भिकार** साले

मृत्युन्जय's picture

11 Feb 2016 - 12:57 pm | मृत्युन्जय

कंट्रोल बापू कंट्रोल.

कैलासवासी सोन्याबापु's picture

11 Feb 2016 - 1:01 pm | कैलासवासी सोन्याबापु

हुश्श्!!! आज ज़रा बरे वाटते आहे! कधी नव्हे ते मनातले भडाभडा बोललो

बोका-ए-आझम's picture

11 Feb 2016 - 5:42 pm | बोका-ए-आझम

DU आहे ना. DU चं Department of History तर जबरदस्त आहे. JNU चा International Relations Course चांगला आहे. बस - JNU च्या फक्त या कोर्सबद्दल जरा चार चांगले शब्द ऐकलेले आहेत. बाकी तो since inception कम्युनिस्टोंका अड्डा था और अभीभी है!

कैलासवासी सोन्याबापु's picture

11 Feb 2016 - 5:54 pm | कैलासवासी सोन्याबापु

हो डीयु उत्तम आहे म्हणून तर जेएनयु चा नाद सोडला (सुदैव माझे) पण मी जेव्हा विचार करत होतो तेव्हा इतकी कल्पना नव्हती, त्याकाळी होता डोक्यात कीड़ा! आता पुर्ण बिस्किट मुरले!

जे एन यू वाले एक नंबर भिकारचोट आणि तितकेच येडझवे आहेत. त्यांना लाथाच घातल्या पाहिजेत.

माहितगार's picture

11 Feb 2016 - 1:14 pm | माहितगार

मी सहसा टोकाच्या भूमिका घेणे टाळतो पण माझ्यामते जे एन यु आपल्या स्थापनेमागे असलेला एकही विचार साध्य करत नाहिये! ही यूनिवर्सिटी बंद करुन टाकायला हवी आहे !!!

मला वाटते घटनात्मकदृष्ट्या शिक्षण हा संघराज्य (संघराज्य=केवळ युनियन गव्हर्नमेंट अर्थाने -हे आजकाल स्पष्ट करणं गरजेच झालय ;) ) आणि राज्यसरकार यांच्या जॉईंट लिस्ट मधला विषय असला तरीही संघराज्य (केंद्रसरकारची) भूमिका सहसा युजीसी पर्यंत मर्यादीत असावयास हवी, सर्वसाधारणपणे राज्यस्तरावरील विद्यापिठे जे करू शकतात त्यासाठी केंद्रीय विद्यापिठांची आणि संघराज्याच्या सरळ भूमिकेची गरज आहे का ? आणि खासकरून राष्ट्रीय एकात्मतेचे तत्वज्ञान रुजवता येत नसेल तर राष्ट्रीय विद्यापिठास काय भूमिका आहे ? ज्या बादात जे एन युचे आले आहे त्या वादात बहुधा काश्मिर विद्यापिठाचेही नाव आले नसेल. आणि आलेतरी बातमीत येण्याची शक्यता कमी, जे एन युत असे उद्योग करण्याचा उद्देश जागतीक स्तरावरील बातम्यात विषय आणून भारताची बदनामी साधण्याचा असू शकेल का अशी साशंकता वाटते

(सेक्युलर आणि उदारमतवादी असणं हे चांगलंच आहे,पण ढोंगी सेक्यलरपणा हा देशासाठी विघातक आहे.काय म्हणता??).

सहमत आहे, ढोंगी सेक्यलरपणामुळे खर्‍या सेक्युलॅरीझमचे आणि खर्‍या उदारमतवादाचे खूपमोठे नुकसान होते.

अनुप ढेरे's picture

11 Feb 2016 - 11:42 am | अनुप ढेरे

व्रिंदा करात यांनी उद्घाटन केलेलं याचं २०११मध्ये.
a

आणि हा कालच्या प्रोटेस्टचा व्हीडो. शब्द हे आहेत.

कश्मीर की आजादीतक जंग रहेगी, जंग रहेगी
भारतकी बरबादीतक जंग रहेगी, जंग रहेगी

कैलासवासी सोन्याबापु's picture

11 Feb 2016 - 11:48 am | कैलासवासी सोन्याबापु

हा कार्यक्रम (क्लिप) जेएनयुचा आहे का हे डिस्प्यूटेड आहे जेएनयु चा कार्यक्रम दिवसाउजेडी झाला होता अन ह्यपेक्षा कट्टर भाषा होती असे खुद्द तिथल्या ओपन लर्निंग सेण्टर मधे शिकणाऱ्या ऐकाने मला सांगितले होते, तसेच ही क्लिप कश्मीर मधली आहे असे एक जम्मू कश्मीर पोलिस मधील मित्राने सांगितले होते

खखोदेजा

एक सामान्य मानव's picture

12 Feb 2016 - 8:51 am | एक सामान्य मानव

शेवटच्या भागात जे एन यु व लाल सलाम इ. शब्द ऐकू येतात..त्यावरुन ही क्लिप जे एन यु मधीलच असावी.

कैलासवासी सोन्याबापु's picture

12 Feb 2016 - 9:29 am | कैलासवासी सोन्याबापु

कदाचित जेएनयु मधील अगोदर झालेल्या कार्यक्रमाची असावी

अद्द्या's picture

13 Feb 2016 - 12:21 pm | अद्द्या

बापू

क्लिप त्या दिवसाची नसेल हि . किंवा आणखी कुठलीही असेल .
पण त्याने काही फरक पडतो का ?

मुद्दा हाच कि त्या लोकांनी देश विरोधी घोषणा दिल्या .

कैलासवासी सोन्याबापु's picture

13 Feb 2016 - 12:58 pm | कैलासवासी सोन्याबापु

जेएनयु चा कार्यक्रम दिवसाउजेडी झाला होता अन ह्यपेक्षा कट्टर भाषा होती

हा मुद्दा आहे माझा मेन, म्हणजे जितके वाटते त्यापेक्षा इंटेंस अन राष्ट्रद्रोही प्रकरण आहे हे (सिस्टेमेटिक राष्ट्रद्रोह) असे म्हणायचे आहे मला. जेएनयु तसेही बर्बाद आहे राजे. थोडक्यात तुम्ही म्हणता आहात तेच मी पण म्हणतोय

चेक आणि मेट's picture

11 Feb 2016 - 11:51 am | चेक आणि मेट

▶इशरत मेल्यावर तिचा फोटो लष्करच्या वेबसाईटवरही शहीद म्हणून झळकला होता.यातच सगळं आलं.
पण इशरतची बहीण ती निर्दोष होती असे म्हणते.
याकुब मेमन बाबतही हेच चाललं होतं,तो निर्दोष होता म्हणे?मग न्यायालयाने फाशीची शिक्षा का दिली?

काय टिवल्याबावल्याचा खेळ चालू आहे??

कैलासवासी सोन्याबापु's picture

11 Feb 2016 - 12:03 pm | कैलासवासी सोन्याबापु

एक इशरत जहां अन दूसरी बेस्ट बेकरी वाली ज़हिरा शेख का कोण होती त्या दोघींनी लैच वैताग आणला होता, ज़हिरा ने तर इतके स्टेटमेंट्स बदलले की शेवटी बहुतेक न्यायालयानेच तिला दंड ठोठावला अन तिची साक्ष अग्राह्य ठरवली होती असे वाचल्याचे स्मरते

मदनबाण's picture

11 Feb 2016 - 12:01 pm | मदनबाण

हेडली रॉ चा माणुस आहे ! इती :- हरामी कांगावाखोर पाकडे !
इशरत जहां अतिरेकी होती असं सिद्ध झाल्याचे कुठेतरी वाचल्याचे स्मरते, तसे असेल तर तिच्या नावाने शिमगा करणारे तिला सपोर्ट करणारे देशद्रोही ठरतात का ? देशद्रोही लोकांना / अतिरेक्यांना सपोर्ट करणार्‍या आणि त्यांच्या अंत्ययात्रेला "अलोट गर्दी " करणार्‍यांना नक्की कोणत्या प्रकारे वठणीवर आणता येइल ?
२६/११ च्या आधी १ वर्ष देखील असाच प्लान आखण्यात आला होता त्याची माहिती आपल्याला होती का ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Birds-of-Paradise Project Introduction

कैलासवासी सोन्याबापु's picture

11 Feb 2016 - 12:10 pm | कैलासवासी सोन्याबापु

इशरत जहां अतिरेकी होती असं सिद्ध झाल्याचे कुठेतरी वाचल्याचे स्मरते, तसे असेल तर तिच्या नावाने शिमगा करणारे तिला सपोर्ट करणारे देशद्रोही ठरतात का ?

तांत्रिक (कायदेशीर दृष्ट्या) माहीती नाही पण भावनिक दृष्ट्या होय ते सगळे अव्वल देशद्रोही आहेत असे म्हणावे वाटते

देशद्रोही लोकांना / अतिरेक्यांना सपोर्ट करणार्‍या आणि
अंत्ययात्रेला "अलोट गर्दी " करणार्‍यांना नक्की कोणत्या प्रकारे वठणीवर आणता येइल ?

पोटा टाडा मकोका सारखे कायदे पुनर्जीवित करून अधिक बलशाली करणे, अध्यादेश काढून एनसीटीसी त्वरीत स्थापन करणे हे एकदम लकाकलेले दोन मुद्दे आहेत डोक्यात.

२६/११ च्या आधी १ वर्ष देखील असाच प्लान आखण्यात आला होता त्याची माहिती आपल्याला होती का ?
इंटेलिजेंस चं मॅटर आहे मला कल्पना नाही

चेक आणि मेट's picture

11 Feb 2016 - 12:14 pm | चेक आणि मेट

ही पाकिस्तानची कायमची बोंब आहे,काही झालं कि RAW ला मध्ये आणायचं.
काही बाबतीत RAW कूटनितीचे डाव टाकत असते,पण हे असलं नीच काम करेल का??

तिला सपोर्ट करणारे देशद्रोही ठरतात का ? देशद्रोही लोकांना / अतिरेक्यांना सपोर्ट करणार्‍या आणि त्यांच्या अंत्ययात्रेला "अलोट गर्दी " करणार्‍यांना नक्की कोणत्या प्रकारे वठणीवर आणता येइल ?

यांना सामुहिक समुपदेशनाची गरज आहे.
वठणीवर येत नसतील तर नाईलाज आहे,मग एक जहाल पर्याय आहे तो सर्वस्वी निंदनीय ठरेल.
क्या सोच रहे हो पार्थ,उठाओ धनुष्य.

कैलासवासी सोन्याबापु's picture

11 Feb 2016 - 12:22 pm | कैलासवासी सोन्याबापु

महासत्तेचे लोभस अन हवेहवेसे स्वप्न पाहताना एकदम जाणवते की "सामूहिकरीत्या धनुष्य उचलणे" हे परवडण्यासारखे नाहिये!! समुपदेशन अन घेटो तोडणे हे काही अंशी ठीक आहे पण जे ऑलरेडी डोकी फिरून वाया गेले आहेत त्यांचे समुपदेशन म्हणजे "गाढ़वापुढे वाचली गीता अन कालचा गोंधळ बरा होता" प्रकार ठरेल! एकंदरित अवघड जागचे दुखणे आहे!!.

चेक आणि मेट's picture

11 Feb 2016 - 12:29 pm | चेक आणि मेट

बघुया आता सरकार हे सगळं कसं हँडल करतयं.
या अशा केसेस मुळे रोहित वेमुलाबाबत असणारी सहानुभूती किंचित कमी झाली राव!

viraj thale's picture

11 Feb 2016 - 12:04 pm | viraj thale

tya awhad la Facebook var jaam shivya padat ahet.

मदनबाण's picture

11 Feb 2016 - 12:20 pm | मदनबाण

tya awhad la Facebook var jaam shivya padat ahet.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना ‘तोयबा’ची अतिरेकी इशरत जहां ही ‘साध्वी’ वाटते व तिच्यासाठी ते ढसाढसा रडतात, पण तेच आव्हाड शिवशाहीर पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दिल्यास महाराष्ट्र पेटवण्याची भाषा करतात, हे शरद पवारांना कसे चालते?
संदर्भ :- रोखठोक : महाराष्ट्र कोण बुडवत आहे?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Birds-of-Paradise Project Introduction

श्रीगुरुजी's picture

11 Feb 2016 - 2:34 pm | श्रीगुरुजी

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना ‘तोयबा’ची अतिरेकी इशरत जहां ही ‘साध्वी’ वाटते व तिच्यासाठी ते ढसाढसा रडतात, पण तेच आव्हाड शिवशाहीर पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दिल्यास महाराष्ट्र पेटवण्याची भाषा करतात, हे शरद पवारांना कसे चालते?

हे असलेच पवारांना चालते. दस्तुरखुद्द पवारांनीच इशरत जहाला निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र दिले होते व तिची भलामण केली होती. आव्हाडच्या आधी राष्ट्रवादीच्याच वसंत डावखरेंनी सुरवातीला तिच्या कुटुंबियांना १ लाखाची मदत दिली होती. ती मुलगी मध्यरात्री मुंब्र्यापासून खूप दूर गुजरातमध्ये एका कारमध्ये आपला धर्मांतरीत नवरा व इतर दोन पाकिस्तानी तरूण यांच्याबरोबर नक्की काय करत होती हा प्रश्न ना तिच्या घरच्यांना पडला ना या अतिरेक्यांना पाठिंबा देणार्‍या राष्ट्रवादीच्या नालायकांना? एनकाऊंटरमध्ये ते चौघे मारले गेल्यावर त्या दोन पाकड्यांची प्रेते न्यायला सुद्धा कोणीही फिरकले नव्हते. या असल्या मुलीकरता हे राष्ट्रवादीचे नालायक सुतक पाळतात.

http://www.ndtv.com/india-news/ishrat-jahan-innocent-muslims-cant-be-bla...

बादवे, आता वागळेही अपेक्षेप्रमाणे हेडलीवर विश्वास कसा ठेवायचा असे ट्विट करून अजूनही इशरत जहा निर्दोष असल्याच्या भूमिकेला चिकटून आहे.

आता सगळेच मोंदींना चर्चेत / किंवा इतर ठिकाणी खेचुन टिआरपी खेचत आहेत, तर मी देखील एक प्रयत्न करुन बघतो ! ;)
दस्तुरखुद्द पवारांनीच इशरत जहाला निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र दिले होते व तिची भलामण केली होती.या असल्या मुलीकरता हे राष्ट्रवादीचे नालायक सुतक पाळतात.
मोदी साहेब तर म्हणतात की पवार साहेब त्यांचे चांगले मित्र आहेत, ते अधुन मधुन त्यांचा सल्ला घेत असतात. यालाच राजकारण म्हणतात काय ? ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Birds-of-Paradise Project Introduction

श्रीगुरुजी's picture

11 Feb 2016 - 10:19 pm | श्रीगुरुजी

मोदी साहेब तर म्हणतात की पवार साहेब त्यांचे चांगले मित्र आहेत, ते अधुन मधुन त्यांचा सल्ला घेत असतात. यालाच राजकारण म्हणतात काय ?

आपण एखाद्याच्या घरी गेलो किंवा एखाद्याच्या सत्कारसमारंभाला उपस्थित असलो किंवा आपण एखाद्याबरोबर एकाच व्यासपीठावर असलो तर त्या व्यक्तीबद्दल चार शब्द बरे बोलणे हा शिष्टाचार आहे. त्यापेक्षा त्यात काहीही जास्त नसतं. त्यामुळे मोदी किंवा जेटली किंवा अलिकडे सोनिया गांधींसकट अनेकांनी पवारांवर जी स्तुतीसुमने उधळली त्यात शिष्टाचार यापलिकडे फारसे काही नाही.

आता सल्ल्याचं म्हणाल तर, मोदी असा कोणाचा सल्ला घेत असतील आणि तेसुद्धा पक्षाबाहेरील एखाद्या व्यक्तीचा सल्ला घेत असतील अशी शक्यता कितपत आहे? पवारांकडे असे कोणते गुण आहेत जे मोदींकडे नाहीत व त्यासाठी ते पवारांचा सल्ला घेतात? पवारांना राष्ट्रीय राजकारणात शुल्लक महत्त्व आहे. महाराष्ट्रात त्यांना आपल्या पक्षाला कधीही सत्तेवर आणता आले नाही. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांच्या पलिकडे त्यांचा पक्ष वाढला नाही. महाराष्ट्रात त्यांच्या पक्षाला कधीही एक चतुर्थांश जागा सुद्धा मिळालेल्या नाहीत. केंद्रात त्यांच्या पक्षाच्या खासदारांची संख्या कायम एक आकडीच राहिली. त्यामुळे अशा व्यक्तीचा मोदी कशासाठी सल्ला घेतील?

मी त्यांचा सल्ला घेतो असे म्हणणे हा केवळ शिष्टाचार होता. त्यापलिकडे त्यात काहीही गम्य नाही.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

20 Feb 2016 - 7:56 am | निनाद मुक्काम प...

लोकसत्तेची जाहिरात व त्यांचा जोक्स सध्या जालावर फिरत आहे त्यात सुळे ताई म्हणतात की
माझ्या बाबांना विचारा , त्यांना सगळे माहिती आहे

पिलीयन रायडर's picture

11 Feb 2016 - 12:25 pm | पिलीयन रायडर

डिस्क्लेमरः- ह्या विषयांवर जास्त माहिती अथवा वाचन नाही.

भारतात जर कुणी भारतविरोधी भाषणे अथवा नारे देत असेल तर त्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक करता येते का?

चेक आणि मेट's picture

11 Feb 2016 - 12:31 pm | चेक आणि मेट

हो,अटक करता येते,
पण ढोंगी फेक्युलर आंदोलन करून अटक होऊ देत नाहीत.

कैलासवासी सोन्याबापु's picture

11 Feb 2016 - 12:32 pm | कैलासवासी सोन्याबापु

ताई राजकीय इच्छाशक्ति असल्यास अन सत्ताधारी पार्टीला प्रॅक्टिकली शक्य असल्यास तर मागील उदाहरण लाहता व्यंग्यचित्रकार असलेल्या असीम त्रिवेदी वर सुद्धा देशद्रोह केल्याचे कलम लावले गेले होते! तेव्हा

"केल्याने होतची आहे रे आधी केलेची पाहिजे"

हे सत्य वाटते,

संदीप डांगे's picture

11 Feb 2016 - 12:37 pm | संदीप डांगे

अटक कशाला? थेट रणगाडे चालवले ह्या हरामखोरांवर तरी बेहत्तर!

भारतविरोधी नारे कु ठ ल्या ही परिस्थितीत स्विकारार्ह नाही. मग ते काश्मिरी नालायक कार्टी असो वा फेसबुकचा हरामखोर अ‍ॅण्डरसन.

चुकीला माफी नाही हेच धोरण असावे.

मृत्युन्जय's picture

11 Feb 2016 - 12:51 pm | मृत्युन्जय

थेट रणगाडे चालवले ह्या हरामखोरांवर तरी बेहत्तर

नक्की का? नक्की ना?

संदीप डांगे's picture

11 Feb 2016 - 1:15 pm | संदीप डांगे

मृत्युन्जय सर,

तुम्ही मला कदाचित अजूनही खरोखर ओळखलं नाही म्हणून असा प्रतिसाद दिलात.

भारतविरोधी घोषणा, कारवाया, विचार, प्रचार, कृती हे अजिबात सहन न करणे व तसं मत व्यक्त करणे ह्यात 'नक्की का' विचारण्यासारखे काय आहे? आपले राजकिय विचार, तात्त्विक मतभिन्नता आपल्या ठिकाणी. एक भारतीय म्हणून मी असले चाळे सहन करु शकत नाही, ह्यात प्रश्न करण्यासारखे नक्की काय आढळले तुम्हाला?

तुम्हाला नक्कीच 'मोदीविरोधकफोबिया' झाला आहे असे जाणवतंय. इतकी की कोणी (तुमच्यामते मोदीविरोधक) अस्सलपणे देशप्रेम व्यक्त करतोय तिथेही तुम्ही त्यावर शंका घेताय. तुमचे असे वागणे अपमानजनक आहे असे माझे मत आहे. भारत = भारतीय सरकार = नरेंद्र मोदी हे समिकरण तुम्ही बनवून टाकलंय. तो तुमचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पण कुणाही भारतीयाच्या देशप्रेमाबद्दल शंका घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही हे कधी सगळे चष्मे काढून, 'शुद्ध विवेक' ठेवून विचार केलात तर तुमच्या लक्षात येईल.

धन्यवाद!

मृत्युन्जय's picture

11 Feb 2016 - 2:22 pm | मृत्युन्जय

तुम्ही नब्नन वाचता आणी विचार न करता प्रतिसाद कसे देता याचे उत्तम उदाहरण आहे हे.

प्रत्येक प्रतिसादात तुम्हाल मोदी दिसतात,, काहिही करुन मोदींना मध्ये आणुन राळ कशी उडवायची याच्यासाठीच तुमचे प्रयत्न चालु असतात की काय असे वाटायला लागले आहे. मी मोदी, भारत सरकार, तुमचा मोदी विरोध याबद्दल काहिही बोललेलो नसताना तुम्ही या सगळ्या गोष्टी मध्ये आणला याचा अर्थ तुम्हाला तरी किमान "मोदी फोबिया" झाला आहे हे नक्की.

तुम्ही मला कदाचित अजूनही खरोखर ओळखलं नाही म्हणून असा प्रतिसाद दिलात.

तुम्हाला ओळखायला मी तुम्हाला ना कधी भेटलो ना मिपा व्यतिरिक्त कधी चर्चा केली. पण तुम्हाला ओळखण्याचा आणि या धाग्याचा कहिही संबंध नसताना तुम्ही असे प्रतिसाद देत आहात हे बघुन थोडा थोडा ओळखायला लागलो आहे.

भारतविरोधी घोषणा, कारवाया, विचार, प्रचार, कृती हे अजिबात सहन न करणे व तसं मत व्यक्त करणे ह्यात 'नक्की का' विचारण्यासारखे काय आहे?

तुम्ही अर्धवट वाचता आणि उत्तर देता याचा हा अजुन एक जिवंत पुरावा मिळाला. तुमच्या प्रतिसादातच्या "थेट रणगाडे चालवले ह्या हरामखोरांवर तरी बेहत्तर" या वाक्याला बोल्ड करुन मी तो प्रशन विचारला होता. "भारतविरोधी नारे कु ठ ल्या ही परिस्थितीत स्विकारार्ह नाही.". या वाक्यावर मी कुठलाही प्रश्न विचारला नव्हता. तुम्ही उतावीळपणे प्रतिसाद करताना बरोब्बर ज्या वाक्यावर प्रश्न विचारला नाही त्याच वाक्याचा संदर्भ घेता आहात आणि ज्या वाक्यावर प्रश्न विचारला त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहात. सिलेक्टिव्ह रिडींग आणि दुटप्पीपणाचे उत्तम उदाहरण आहे हे. किती तो आक्रस्ताळेपणा.

आपले राजकिय विचार, तात्त्विक मतभिन्नता आपल्या ठिकाणी. एक भारतीय म्हणून मी असले चाळे सहन करु शकत नाही, ह्यात प्रश्न करण्यासारखे नक्की काय आढळले तुम्हाला?

तुम्ही चाळे सहन करण्याबद्दल मी काहिच लिहिलेले नाही प्रशन कशावर केला आहे ते बघा तर जरा.

आणि एकीकडे तुम्ही "राजकिय विचार, तात्त्विक मतभिन्नता आपल्या ठिकाणी" वगैरे भारी भारी वाक्ये लिहिता आणी गरज नसताना मोदी वगैरेना मध्ये आणता यातच् तुमचा वैचारिक गोंधळ दिसुन येतो.

तुम्हाला नक्कीच 'मोदीविरोधकफोबिया' झाला आहे असे जाणवतंय. इतकी की कोणी (तुमच्यामते मोदीविरोधक) अस्सलपणे देशप्रेम व्यक्त करतोय तिथेही तुम्ही त्यावर शंका घेताय.

मला कुठला फोबिया आहे की नाही ते माहिती नाही पण तुम्हाला नक्कीच मोदीफोबिया झाला आहे. इतका की एखादा माणूस कवठे महांकाळ मधल्या सांडपाण्याची समस्या आणि उंदराचा सुळ सुळाट या विषयावर बोलु लागला तरी तुमचा मोदी विरोध जागृत होतो. मी मोदी, मोदी विरोध याबाबत काहितरी बो ललो होतो का? मोदी विरोधक म्हणजे देशद्रोही असे कही बोललो का? मोदी विरोधी तर सोन्याबापू पण आहेत. परवाच धाग्यता जाहीरपणे मी त्यांच आद्दर करतो म्हणुन लिहुन आलो. इथे मोदी वि रोधाचा आणि देशप्रेमाचा संबंध काय? तुम्ही च उगाच पराचा कावळा करत आहात. इथे तर परा पण नही.

तुमचे असे वागणे अपमानजनक आहे असे माझे मत आहे.

माझे कसे वागणे आणी कोन्णला अपमानजनक आहे तेच कळाले नाही. तुम्हाला प्रत्येक गोष्टीत अपमान वाटत असेल तर तो तुमचा प्रश्न आह. त्याला मी करु शकतो?

भारत = भारतीय सरकार = नरेंद्र मोदी हे समिकरण तुम्ही बनवून टाकलंय.

असे मत तुम्ही का बनवले देव जाणे. मी असे विधान कधीही केलेले नाही. कावीळ झालेल्या माणसाला सगळे जग पिवळे दिसते तसे तुमचे झालेले आहे. तुम्हाला सगळीकडे मोदी द्वेष दिसतो. उद्य एखाद माणूस मोदीं जॅकेट चांगले अहे असे म्हणाले तर तो मा णूस तुमच्या मते मोदी भक्त होइल आणि टीकेस पात्र होइल. जरा विवेकी सरासर विचार करुन मत प्रदर्शन करा की. धागा का य तुम्ही बोलता का? धगाक्कर्त्याने म्हटल्याप्रमाणे विषयावर बोलायचे सोडुन तुम्ही मोदींना मध्ये आणले आणि चर्चा भरकटवली. मूळ मुद्दा राहिला बाजूलच. अश्याने धागाकर्त्याचे तुमच्याबद्दलचे मत (की उलट्या वि षयांवर धागा असला असता तर तुम्ही कंठशोष करुन गिगाबायटी विरोधी प्रतिसाद दिले असते) अजुन पक्केच होइल. तुम्हाला कळकळीची विनंती की तुम्ही धाग्याला अनुषंगुन चर्चा करा, आपले चुकीचे म्हणणे रेटु नका , एकतर्फी वाद घालु नका, नसलेले वाद उकरुन काढु नका, नीट वाचुन प्रतिसाद द्या, दुसर्‍यावर विनकारण अरोप लावु नका.

पण कुणाही भारतीयाच्या देशप्रेमाबद्दल शंका घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही.

मी तुमच्या देशप्रेमाबद्दल कुठलीही शंका घेतलेली नसताना तुम्ही असली विधाने करणे दुर्दैवी आहे. तुम्ही तुमची वाक्ये माझ्या तोंडात कोंबत आहे हे नक्कीच खेदजनक आहे. एक मिपाकर म्हणुन आज मला शरम वाटली. अर्रे कुठे नेउन ठेवलाय मिपा माझा.


हे कधी सगळे चष्मे काढून, 'शुद्ध विवेक' ठेवून विचार केलात तर तुमच्या लक्षात येईल.

चष्मे काढण्याची गरज तुम्हाल असताना, सिलेक्टिव्ह रिडींग तुम्ही करत असताना, चुकीचे अर्थ तुम्ही काढत असतामी, मी जे लिहिलेच नाही ते लिहिले आहे असे तुम्ही भासवत असताना, अर्थाचा अनर्थ तुम्ही काढत असताना, अर्थ न समजता तुम्ही लिहित असताना, पराचा कावळ तुम्ही करत असतना, आक्रस्ताळेपणा तुम्ही करत असतान, एकतर्फी आरो प तुम्ही करत असताना तुम्ही मला चष्मे बदलायल सांगणे आणि विवेकाने विचार करयाला सांगणे म्हणजे हिटलरने गांधीजींना अहिंसेचा उपदेश देण्यासारखे आहे.

धन्यवाद.

अर्रे आणी हो तुम्हाला न समजलेल्या किंव तुम्ही समजुन न समजल्यासारखे केलेल्या वक्याबद्दल :

तुम्ही म्हणत होता "थेट रणगाडे चालवले ह्या हरामखोरांवर तरी बेहत्तर " . मागे तुम्हीच म्हणाला होता ना की हातपाय कापणे वगैरे अघोरी मध्ययुगीन प्रथा आहेत म्हणुन? मग रणगाडे फिरवणे काय आहे? लोकशाहीभिमुख भारतीय न्यायव्यस्थेला, भारतीय नागरि,, मग ते कितीही चुकीचे वागले तरी युद्धस्थिती नसताना त्यांच्यावर रणगाडे फिरवणे मान्य नाही. तुम्ही आधी तुम्हीच घेतलेल्या भूमिकेला छेद देणारे वक्तव्य केले म्हणुन मी गंमतीने तुम्हाला एक प्रशन विचारला तर तुम्ही इतका कांगावा केलात ? कदाचित तुमची स्वतःचीचे वक्तव्ये तुम्हाला आठवत नसावीत किंवा तुमच्या दोने वक्तव्यातली विसंगती तुम्हाला नेहमीप्रमाणे दिसतच नसावी किंवा तुमची मते बदलली असावीत. काहिह्ही असु शकेल पण मग त्याला संयतपणे प्रतिसाद द्या ना? नसत्या गोष्टी कशाला मध्ये घुसडता आणि उगाच आक्रस्ताळेपणा कशाला करता ?

त्रिवार धन्यवाद

संदीप डांगे's picture

11 Feb 2016 - 3:33 pm | संदीप डांगे

तुम्ही नब्नन वाचता आणी विचार न करता प्रतिसाद कसे देता याचे उत्तम उदाहरण आहे हे.

हा हा. दोन शब्दात खोचकपणे मारलेल्या टोमण्यात नक्की काय वाचायचं आणि किती विचार करायचा ह्याची तुमच्याकडे शिकवणी लावावी म्हणतो. :-)

प्रत्येक प्रतिसादात तुम्हाल मोदी दिसतात,, काहिही करुन मोदींना मध्ये आणुन राळ कशी उडवायची याच्यासाठीच तुमचे प्रयत्न चालु असतात की काय असे वाटायला लागले आहे. मी मोदी, भारत सरकार, तुमचा मोदी विरोध याबद्दल काहिही बोललेलो नसताना तुम्ही या सगळ्या गोष्टी मध्ये आणला याचा अर्थ तुम्हाला तरी किमान "मोदी फोबिया" झाला आहे हे नक्की.

सदर विषयावर आपल्या नेहमीच झालेल्या चर्चेवरुन प्रस्तुत वर्णन तर मला तुमचेच आहे की काय असे वाटते. कारण जिथे नको तिथेही मोदी तुम्हीच उकरुन काढले होते असे स्मरते. बाकी, राळ उडवायचीच असेल तर त्यासाठी मला मोदींची तरी गरज नाही.

बाकीच्या प्रतिसादाबद्द्लः नेहमीच्या पद्धतीने कोलांट्यामारू प्रतिसाद. एवढा मेगाबायटी लिहिण्यापेक्षा आधीच तुम्हाला अपेक्षित दोन ओळी लिहिल्या असत्या तर तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे हे लक्षात आले असते. तुम्ही माझी कोणकोणती विधाने लक्षात ठेवताय आणि कुत्सितपणे टोमणे मारतांना तुमच्या डोक्यात काय चाललंय हे मला समजायला तुमचा मेंदु काय बीएसई सेन्सेक्स आहे असे तुम्हाला वाटलं का मृत्यूंजय सर?

यानंतर आपल्याला काय अपेक्षित आहे तेवढंच नीट प्रतिसादात लिहायचे कष्ट घ्याल तर बरे होइल असे वाटते. अन्यथा गरज नाही हो असल्या टुकार टोमण्यांची. तुमच्याकडेच ठेवा.

मृत्युन्जय's picture

11 Feb 2016 - 4:04 pm | मृत्युन्जय

हा हा. दोन शब्दात खोचकपणे मारलेल्या टोमण्यात नक्की काय वाचायचं आणि किती विचार करायचा ह्याची तुमच्याकडे शिकवणी लावावी म्हणतो. :-)

लावाच. पण त्याहुन जास्त शब्दांचे अर्थ समजुन घेण्याची शिकवणी लावायची तुम्हाला गरज आहे.

सदर विषयावर आपल्या नेहमीच झालेल्या चर्चेवरुन प्रस्तुत वर्णन तर मला तुमचेच आहे की काय असे वाटते.

मी सदर विषयावर चर्चा करतो तेव्हा सदर विषयावरच चर्चा करतो. नॉर्मंडीच्या लढाईचा विषय चालु असताना गुजरातच्या दंगलीमधल्या मोदींच्या भूमिकेवर चर्चा करण्याचा नतद्रष्टपणा मला जमत नाही. या धाग्यावर तुम्हीच मोदी उकरुन काढलेत. मी तर त्या प्रश्नात मोदींचा म देखील लिहिला नव्हता. "न" चा "मो" करण्याच्या तुमच्या वृत्तीला आणि तद्नंतरच्या कांगावखोरपणाला आम्ही काय बोलणार? आणी वर तुम्ही मलाच मोदी उकरुन काढले म्हणताय होय?

कारण जिथे नको तिथेही मोदी तुम्हीच उकरुन काढले होते असे स्मरते.

तुम्ही माझ्या कुठल्या प्रतिसादांना अनुसरुन असली भडकाऊ विधाने करत आहात आणि तुम्ही माझी कोणकोणती विधाने लक्षात ठेवताय आणि असे विचित्र बडबडताय आणि तुमच्या डोक्यात काय चाललंय हे मला समजायला तुमचा मेंदु काय बीएसई सेन्सेक्स आहे असे तुम्हाला वाटलं का ? हा प्रश्न आता तुम्हाला विचारु का डांगे काका?

तुम्ही काहिही स्मरुन प्रतिसाद द्याल हो. तो माझ्या विचारसरणीला अनुसरुन असेल तर गोष्ट वेगळी. पण इथे तर तुम्ही कश्यात काय आण्बि फाटक्यात पाय अशी अवस्था करुन घेतली. मुळात मी जिथे तिथे मोदी आणत नाही. असे असताना तुम्ही असले इनोदी प्रतिसाद देताय. हसुही येत नाही. जरा सारासार विचार करुन लिहा की.

बरे या प्रतिसादाचा आणि मोदींचा लांबलांब संबंध नाही. तुम्हाला झेपले नसेल तर विचारावे. तुम्हाला डायरेक्ट मोदी आठवले म्हणजे एक तर तुम्हाला मोदींच्या नावची कावीळ झाली असावी किंवा विनाकारण वाद उकरुन काढण्याची तुम्हाला हौस असावी किंवा मुळातच तुम्ही कुठल्याही गोष्टीचा उलटा अर्थ लावत असावात. यापैकी काय ते मला माहिती नाही पण उगा काड्यासारु प्रतिसाद द्यायचे म्हणजे हद्द झाली. ४ शब्दांच्या निरागस प्रतिसादा वर तुम्ही किती आक्रस्ताळेपणा केलात तो. किती तो कांगावा. मूळ मुद्दा पडला बाजूल्लाच आणि मोदी मध्ये आणलेत. हद्द झाली राव.

तुम्ही माझी कोणकोणती विधाने लक्षात ठेवताय आणि कुत्सितपणे टोमणे मारतांना तुमच्या डोक्यात काय चाललंय हे मला समजायला तुमचा मेंदु काय बीएसई सेन्सेक्स आहे असे तुम्हाला वाटलं का मृत्यूंजय सर?

मी विधाने नाही तर विचार लक्षात ठेवतो. उपयोगी पडतात. विधाने अनुषंगाने येतातच मग. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या प्रतिसादात तुम्हाला टोमणा कुठे दिसला ? बर दिसला तर दिसला, असतो एकेकाचा स्वभाव म्हणुन सोडुनही दिले असते पण माझ्या मागच्याच प्रतिसादात तुम्हाला कळाले नाही किंवा जाणुन घ्यायची इच्छा नाही म्हणुन तुम्हाला मी योग्य मुद्द्यावर आणायचा प्रयत्नही केला पण तुम्ही आंगणच वाकडे म्हणुन धरुन बसला आहात त्याला मी काय करावे? तुम्हाला सगळीकडे टोमणे का दिसतात?


बाकी, राळ उडवायचीच असेल तर त्यासाठी मला मोदींची तरी गरज नाही
.

ते कळाले आहेच आत्तापाबेतो. तुम्ही कुठल्याही गोष्टीवरुन राळ उडवु शकता. पण त्यामुळे नक्की काय साध्य होते हो? कंटाळा येत नाही का रोज रोज असले काही करुन?

बाकीच्या प्रतिसादाबद्द्लः नेहमीच्या पद्धतीने कोलांट्यामारू प्रतिसाद.

कसल्या कोलांट्या मारल्या ब्वॉ? तुम्हाल कळत नाही त्याचे खापर माझ्यावर का फोडता ? तुम्ही सिलेक्टिव्ह रिडींग तुम्ही करत असताना, चुकीचे अर्थ तुम्ही काढत असतामी, मी जे लिहिलेच नाही ते लिहिले आहे असे तुम्ही भासवत असताना, अर्थाचा अनर्थ तुम्ही काढत असताना, अर्थ न समजता तुम्ही लिहित असताना, पराचा कावळ तुम्ही करत असतना, आक्रस्ताळेपणा तुम्ही करत असतान, एकतर्फी आरो प तुम्ही करत असताना तुम्ही मला कोलांट्या उड्या मारतो असे म्हणणे म्हणजे रिकी पाँटिंगने राहुल द्रविडला वाचाळ म्हणण्यासारखे आहे.

एवढा मेगाबायटी लिहिण्यापेक्षा आधीच तुम्हाला अपेक्षित दोन ओळी लिहिल्या असत्या तर तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे हे लक्षात आले असते.

मी चार शब्दच लिहिले होते. मेगाबायटी प्रतिसाद तुम्ही दिला. आणि वर मलाच विचारताय होय? चोर त चोर वर शिरजोर.

यानंतर आपल्याला काय अपेक्षित आहे तेवढंच नीट प्रतिसादात लिहायचे कष्ट घ्याल तर बरे होइल असे वाटते.

मी तेच करतो. यापुढे प्रतिसाद देताना सिलेक्टिव्ह रिडींग न करता , चुकीचे अर्थ न काढता, वाद उकरुन काढण्याचा प्रयत्न न करता, दुसर्‍याचे म्हणणे नीट वाचुन, अर्थाचा अनर्थ न करता, अर्थ न समजता प्रतिसाद न देता, राईचा पर्वत न करता, आक्रस्ताळेपणा बाजुला ठेउन, कांगावखोर पणा न करता, प्रत्येक ठिकाणी मोदींना मध्ये न आणता, समंजसपणे प्रतिसाद दिलात तर खुप उपकार होतील (स्वतःवरच)


अन्यथा गरज नाही हो असल्या टुकार टोमण्यांची. तुमच्याकडेच ठेवा.

मला तर तुमच्या इथल्या अस्तित्वाचीच गरज नाही हो . मी तुमच्या आरत्या ओवाळाल्या तरी तुम्हाला तो टोमणेच वाटतील (अर्थात तुमच्या आरत्या ओवाळण्याचा नत द्र ष्टपणा मी करणार नाही ही गोष्ट वेगळी) असे वाटते. तुम्हाला काय टोमणे मा रायचे आणि? काहिही हा डांगेश्री.

संदीप डांगे's picture

11 Feb 2016 - 4:19 pm | संदीप डांगे

तुम्ही लिहिलेल्या प्रतिसादात किती व्यक्तिगत झाला आहात ते तुम्हीच नीट एकदा वाचुन आणि जमत असेल तर समजून घ्या.

(तुम्हाला आठवत नसेल, ट्रुमन यांच्या जोकवर मी केलेला विनोद मोदींसंबंधी नव्हता तरी त्या एका साध्या वाक्यावरुन तुम्ही मोदी आणून राळ उडवली होती, तिथे तुम्हाला "प्रतिसाद देताना सिलेक्टिव्ह रिडींग न करता , चुकीचे अर्थ न काढता, वाद उकरुन काढण्याचा प्रयत्न न करता, दुसर्‍याचे म्हणणे नीट वाचुन, अर्थाचा अनर्थ न करता, अर्थ न समजता प्रतिसाद न देता, राईचा पर्वत न करता, आक्रस्ताळेपणा बाजुला ठेउन, कांगावखोर पणा न करता, प्रत्येक ठिकाणी मोदींना मध्ये न आणता, समंजसपणे प्रतिसाद " हे आठवले नव्हते.)

बाकी शुभेच्छा. अशा फालतू चर्चांमधे मला काडीमात्र स्वारस्य नाही.

मृत्युन्जय's picture

11 Feb 2016 - 5:49 pm | मृत्युन्जय

व्यक्तिगत प्रतिसादाला तुम्हीच पहिल्यांदा सुरुवात केली डांगे अण्णा. मी नाही. तुम्ही कुठली गोष्ट कुठे नेली. कुठल्याही माणसाला संताप येण्या सारखीच गोष्ट आहे ती. पण तरीही संयम राखुन प्रतिसाद दिले आहेत. तिथेही (ट्रुमन चा धागा)आणि इथे तर नक्कीच तुम्ही सगळ्या गोष्टींचे नक्कीच चुकीच्चे अर्थ काढले आहेत आणि वर कांगावखोरपणे प्रतिसाद दिलेत. तरीही तिथे मी वाद संपवला होता. तेव्हाही मीच वाद संपवला होता हे कदाचित तुम्हाला आठन्सेसेल. ४ शब्दांमागे तुम्हाला पुर्ण ब्रह्मांडांचे अर्थ दिसायला लागले तर तो माझा दोष नाही. आणि तरीही वादही तुम्हीच वाढवत आहात तो दोष देखील माझा नाही.

बाकी शुभेच्छा. अशा फालतू चर्चांमधे मला काडीमात्र स्वारस्य नाही.

मला तर कधीच नव्हता, तुम्ही फालतू आरोप करुन काड्या सारल्या नसत्या तर उगा कळफलक बडवायला लागलाच नसता. असल्या चर्चा करायला मला स्वारस्यही नाही आणि वेळ तर नाहिच नाही.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

12 Feb 2016 - 6:56 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

aaaaaa

एवढी गिगाबायटी प्रतिसादस्पर्धा वाचायचे ७० रुपये पडतील.

बॅटमॅन's picture

12 Feb 2016 - 12:49 pm | बॅटमॅन

असेच म्हणतो. संदीप डांगे सरांच्या लिखाणाला अप्पर ऐवजी लोवर लिमिट असावी बहुधा.

मृत्युन्जय's picture

11 Feb 2016 - 12:48 pm | मृत्युन्जय

अजुन २ महिन्यांनी हेडली जेव्हा "मी दबावाखाली असे (खोटे) विधान केले होते आणि असे (खोटे) विधान करण्यासाठी माझ्यावर भारतीय सरकारकडुन दबाव आला होता (डायरेक्टली अँड / ऑर इनडायरेक्टली)" असे म्हणेल तेव्हा सगळ्यांच्या प्रतिक्रिया कश्या असतील?

कपिलमुनी's picture

11 Feb 2016 - 1:08 pm | कपिलमुनी

तू रॉ मधे असावास असा संशय येतोय =))

मृत्युन्जय's picture

11 Feb 2016 - 1:13 pm | मृत्युन्जय

तुम्हाला आयएसआय म्हणायचे आहे का?

कैलासवासी सोन्याबापु's picture

11 Feb 2016 - 1:17 pm | कैलासवासी सोन्याबापु

काही दिवसांनी पाक , आयएसआय सुद्धा रॉ एजेंट असल्याचे बोंबलत फिरेल ह्याची गारंटी आहेच! तस्मात् ही शक्यता विचारात घ्यायला हरकत नसावी असे सुचवतो :D :D

नाखु's picture

11 Feb 2016 - 2:11 pm | नाखु

कोण रॉ आणि कोण पोचलेला तेच कळेना !!!!!!!

गप गुमान वाचक नाखु

विवेकपटाईत's picture

13 Feb 2016 - 9:55 pm | विवेकपटाईत

रिलेटीव अंड वाईफ असोसिएशन असे म्हणतात ....

अनिरुद्ध.वैद्य's picture

11 Feb 2016 - 7:28 pm | अनिरुद्ध.वैद्य

ते सदगृहस्थ सध्या RA&W च्या हॉटेलात असल्यासारखेच बोललात आपण!

उगा काहितरीच's picture

11 Feb 2016 - 3:03 pm | उगा काहितरीच

लेखापेक्षा प्रतिक्रिया जड !

बोका-ए-आझम's picture

11 Feb 2016 - 3:26 pm | बोका-ए-आझम

Because they want to - या विधानावर विश्वास होताच. आता तो दृढ व्हायला लागलेला आहे. मृत्युंजयभौ आणि डांगेअण्णा - मला ज्यांच्याबद्दल आदर वाटतो असे तुम्ही दोघे आहात. कृपया असे भांडू नका, कारण त्याने फक्त कटुता वाढते. या संस्थळावर मोदींच्या बाजूने किंवा विरोधी मत दिल्याने मोदींना किंवा त्यांच्या राजकीय विरोधकांना काही फरक पडत असेल असं वाटत नाही. तस्मात व्यक्तिगत वाद प्लीज घालू नका.

कपिलमुनी's picture

11 Feb 2016 - 3:32 pm | कपिलमुनी

अहो त्ये वैचारीक देवाणघेवाण करत आहेत , करू द्या

भंकस बाबा's picture

11 Feb 2016 - 6:10 pm | भंकस बाबा

वैचारिक देवानघेवान होती काय, मला वाटले????

काय पण, रंणगाडे चालवायला पाहिजे! ते इसिस मधले कुत्रे पकडले आहेत ते बिरयानी खात आहेत मजेत
ते काय देशसेवा करायला गेले होते. किती शिक्षा होईल त्यांना? आपले अतिरेक्याविरुद्ध हेच धोरण राहिले तर सन्देश के जाईल माहीत आहे. पकड़े गए तो मुफ़्त का खाना, दसपंधरा साल तो सुकून, ओर मारे गए तो जन्नत में ७२ हूर है ही।
रच्याकने ते बाई आंतकवादी मरतँ ते तिला काय मिलतं वो? कोणी जाणकार खुलासा करेल काय?
एक हाय आपल्याकडे, पण फारच इनोदि बाबा.

संदीप डांगे's picture

11 Feb 2016 - 3:37 pm | संदीप डांगे

ओके बोकाभाऊ, आपली बिनशर्त माघार.

पण सरकारी धोरणांवर एक नागरिक म्हणून टिका करणारच. ती टिका मोदींबद्दल होते आहे असे वाटून घेणार्‍यांबद्दल नाइलाज आहे. गॉड ब्लेस देम टिल इटर्निटी.

अहो पण त्यांनी कुठे मोदींना मध्ये आणले आहे?

संदीप डांगे's picture

11 Feb 2016 - 3:52 pm | संदीप डांगे

डिस्क्लेमर समजा मोदकभौ, ब्लँकेट स्टेटमेंट.

मी जेव्हा सरकारवर टीका करतो तेव्हा ती मोदींबद्दल आहे असं समजणार्‍यांबद्दल आहे ते. कुणाही आयडी-विशेषला उद्देशून नाही. लपून छपून टोमणे मारणे माझ्या स्वभावात नाही. जे आहे ते थेट बोलतो.

मोदक's picture

11 Feb 2016 - 4:05 pm | मोदक

एक मिनीट.

मी जेव्हा सरकारवर टीका करतो तेव्हा ती मोदींबद्दल आहे असं समजणार्‍यांबद्दल आहे ते.

मुळात तुम्ही सरकारवर टीका कुठे केली आहे? तुम्ही देशद्रोही लोकांवर टीका केली आहे. तेच ते रणगाडे वगैरे..

लपून छपून टोमणे मारणे माझ्या स्वभावात नाही. जे आहे ते थेट बोलतो.

बोला हो.. बिन्धास्त बोला. आपलेच मिपा आहे. फक्त विषयाला धरून आणि सुसंगत बोला इतकेच.

संदीप डांगे's picture

11 Feb 2016 - 4:23 pm | संदीप डांगे

मी इथल्या वादाबद्दल नै हो बोलत. ते माझं जनरल स्टेटमेंट आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

12 Feb 2016 - 7:06 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

मृत्युंजयांचे प्रतिसाद वाचले पण त्यांनी मोदींचं नावचं घेतलेलं नाही डांगे अण्णा. काहितरी गैरसमज होतोय तुमचा. मागे एका धाग्यावर तुम्हीचं हातपाय कापणे वगैरे अघोरी मध्ययुगीन प्रथा आहेत म्हणुन काहीतर साडेबारा एम.बी. (बी कॅपीटल) दिलेलात ना त्यामुळे हा वैचारिक बदल कशामुळे झाला असावा अश्या अचंब्यात ते, मी आणि इतर बहुसंख्य मिपाकर पडलेत. म्हणजे ह्या एका वाक्याने आजपर्यंतचे ह्या विषयावरचे सगळे प्रतिसाद वाया गेले की तुमचे.

असो. रणगाडे फिरवले पाहिजेत ह्या तुमच्या एका वाक्याशी सहमत. थाळीची चाळणी करणार्‍यांना क्षमा केली नाही पाहिजे.

सुबोध खरे's picture

11 Feb 2016 - 3:51 pm | सुबोध खरे

डांगे भाऊ
मृत्युंजय यांच्या

थेट रणगाडे चालवले ह्या हरामखोरांवर तरी बेहत्तर

नक्की का? नक्की ना?

या प्रतिसादात "मोदीविरोधकफोबिया" कुठे आला ते समजले नाही. आणि त्यावर तुम्ही एकदम

तुम्हाला नक्कीच 'मोदीविरोधकफोबिया' झाला आहे असे जाणवतंय. इतकी की कोणी (तुमच्यामते मोदीविरोधक) अस्सलपणे देशप्रेम व्यक्त करतोय तिथेही तुम्ही त्यावर शंका घेताय. तुमचे असे वागणे अपमानजनक आहे असे माझे मत आहे. भारत = भारतीय सरकार = नरेंद्र मोदी हे समिकरण तुम्ही बनवून टाकलंय. तो तुमचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पण कुणाही भारतीयाच्या देशप्रेमाबद्दल शंका घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही हे कधी सगळे चष्मे काढून, 'शुद्ध विवेक' ठेवून विचार केलात तर तुमच्या लक्षात येईल.
असा प्रतिसाद देण्याचे कारण समजले नाही.

त्यावर त्यानी
तुम्ही म्हणत होता "थेट रणगाडे चालवले ह्या हरामखोरांवर तरी बेहत्तर " . मागे तुम्हीच म्हणाला होता ना की हातपाय कापणे वगैरे अघोरी मध्ययुगीन प्रथा आहेत म्हणुन? मग रणगाडे फिरवणे काय आहे? लोकशाहीभिमुख भारतीय न्यायव्यस्थेला, भारतीय नागरि,, मग ते कितीही चुकीचे वागले तरी युद्धस्थिती नसताना त्यांच्यावर रणगाडे फिरवणे मान्य नाही. तुम्ही आधी तुम्हीच घेतलेल्या भूमिकेला छेद देणारे वक्तव्य केले म्हणुन मी गंमतीने तुम्हाला एक प्रशन विचारला तर तुम्ही इतका कांगावा केलात ?

असे स्पष्टीकरण दिलेले असताना त्याच्या खालील टोकदार भाषा असलेला प्रतिसाद कसा काय दिलात हे पाहून आश्चर्य वाटते
असो

संदीप डांगे's picture

11 Feb 2016 - 3:54 pm | संदीप डांगे

डॉक्टरसाहेब, मलाही असेच आश्चर्यदग्ध करणारे काही प्रश्न पडतात, पण असो.

कपिलमुनी's picture

11 Feb 2016 - 4:05 pm | कपिलमुनी

सेक्युलर =not connected with religious or spiritual matters.

कोणत्याही जातीधर्माशी संबंध नसलेला / ना पाळणारा / त्यावर आधारीत भेदभाव ना करणारा

असा अर्थ होतो .
हिंदुत्ववाद म्हणजेच राष्ट्रवाद !
आता लेखाकडे वळू या
लेखकाने सेक्युलर म्हणजे देशद्रोही असे ठरवून लेख लिहिलेला दिसत आहे.
सेक्युलर हा कडवा देशाभिमानी असू शकतो हेच आजकाल मान्य दिसत नाही.

"मी सेक्युलर आहे .सर्वधर्मसमभाव पाळतो . प्रत्येक धर्माचा आदर करतो आणि माझ्या देशावर माझे प्रेम आहे त्याविरूद्ध एकही शब्द एकही कारवाईला मी समर्थन देणार नाही"

अशी भुमिका असू शकते . पण आजकाल प्रत्येक गोष्टीचा ध्रुवीकरण झाले आहे . वास्तविक पाहता या लेखात मोदींचा नाव यायचे काहीच कारण नव्हते.

JNU आणी इशरत जहान च्या विरोधात बोललात तर काहीजण तुम्हाला देश प्रेमी म्हणतील ! मोदीभक्त का बरे म्हणतील?
लेखकाच्या लिहिण्याचा सूर मोदीवादी, भाजपेयी किंवा हिंदुत्ववादी फक्त देशभक्त किंवा जो जो देशाच्या बाजूने बोलतो तो मोदीभक्त असा आहे.

मोदक's picture

11 Feb 2016 - 4:07 pm | मोदक

असहमत.

लेखकाच्या लिहिण्याचा सूर मोदीवादी, भाजपेयी किंवा हिंदुत्ववादी फक्त देशभक्त किंवा जो जो देशाच्या बाजूने बोलतो तो मोदीभक्त असा आहे.

हे कशावरून?

कपिलमुनी's picture

11 Feb 2016 - 4:31 pm | कपिलमुनी

त्यांनी दोन मुद्दे उपस्थित केले आहेत १. दहशत्वाद आणि दुसरा जेऐनयू मधे पाकीस्तान च्या बाजून घोषणा !
कोणत्याही देशप्रेमी माणसाचा या दोन्ही गोष्टींना विरोध असेलच
पण लेखकाचे म्हणणे असे आहे की या गोष्टी पटलावर मांडल्यावर त्याला मोदीभक्त म्हणतील ?
का बॉ ?
या गोष्टीला फक्त मोदीभक्तच विरोध करतात का ?

मोदीवादी, भाजपेयी किंवा हिंदुत्ववादी फक्त देशभक्त

तुमच्या मते या चार उपमा एकाच अर्थाच्या आहेत का?

कपिलमुनी's picture

11 Feb 2016 - 4:51 pm | कपिलमुनी

हे सुद्धा देशभक्त असू शकतात पण फक्त हेच नाही.

मोदक's picture

11 Feb 2016 - 5:12 pm | मोदक

सहमत.

कपिलमुनी's picture

11 Feb 2016 - 5:25 pm | कपिलमुनी

इतक्या लौकर सहमत असशील तर आमी नाय खेळणार !

थांब रे.. म्येन म्याच संपूदे.

(बादवे - माझा प्रतिसाद शेवटचा..!!)

कैलासवासी सोन्याबापु's picture

11 Feb 2016 - 5:33 pm | कैलासवासी सोन्याबापु

जल्ला तुमाला वशाडी येऊ!

(मोदक भाऊ क्लासिक ३५० क्या बोलती??)

मोदक's picture

11 Feb 2016 - 5:48 pm | मोदक

क्लासीक ३५० मस्त..!

११ हजार किमी झाले. आता या महिन्यात एक कोकणदौरा करायचा आहे.

येताय का?

कपिलमुनी's picture

11 Feb 2016 - 4:10 pm | कपिलमुनी

अर्धवट प्रसिद्ध झाला वाटत !
फक्त हिंदुत्ववाद म्हणजेच राष्त्रवाद असे लोका समजतात ते चुकीचा आहे.

असे वाचावे

चेक आणि मेट's picture

11 Feb 2016 - 6:29 pm | चेक आणि मेट

लेखकाने सेक्युलर म्हणजे देशद्रोही असे ठरवून लेख लिहिलेला दिसत आहे.
शेवटचं वाक्य वाचा लेखामधील.
ढों आणि गी
म्हणजे ढोंगी असं मी म्हटलं आहे.
लेखकाच्या लिहिण्याचा सूर मोदीवादी, भाजपेयी किंवा हिंदुत्ववादी फक्त देशभक्त किंवा जो जो देशाच्या बाजूने बोलतो तो मोदीभक्त असा आहे.

हळहळू श्वास घ्या,हं आता सोडा,शांतपणे डोळे झाका,श्वासोच्छवासाची क्रिया चालू ठेवा,आता डोळे उघडा आणि थोडासाच लेख आहे तो परत वाचा.
धन्यवाद.

संदीप डांगे's picture

11 Feb 2016 - 4:26 pm | संदीप डांगे

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मोदीसरकार नसते तर या सेक्युलरखाजाड्या मंडळींनी असे कार्यक्रम घेतले असते का??

ह्या वाक्याचा नेमका अर्थ शोधतोय. "प्रतिसाद देताना सिलेक्टिव्ह रिडींग न करता , चुकीचे अर्थ न काढता, वाद उकरुन काढण्याचा प्रयत्न न करता, दुसर्‍याचे म्हणणे नीट वाचुन, अर्थाचा अनर्थ न करता, अर्थ न समजता प्रतिसाद न देता, राईचा पर्वत न करता, आक्रस्ताळेपणा बाजुला ठेउन, कांगावखोर पणा न करता, प्रत्येक ठिकाणी मोदींना मध्ये न आणता, समंजसपणे प्रतिसाद देणारे" कुणी इथे असतील तर जरा मदत करा बॉ.

कैलासवासी सोन्याबापु's picture

11 Feb 2016 - 4:59 pm | कैलासवासी सोन्याबापु

:D :D

@मृत्युंजय भाऊ, माफ़ करा पण तुम्ही क्लियर कट डांगे साहेबांचा स्टीरियोटाइप केला आहात! ही अपेक्षा तुमच्याकडून तरी ख़ास नव्हती, अन हो तुम्हा दोघांनाही (आमचे डांगे ब्वा पण अन तुम्ही पण) मी अतिशय उत्तम मित्र मानतो माझे, त्याच हक्काने हा प्रतिसाद टंकतो आहे, कारण मैत्री फ़क्त गोड बोलणारी नसते प्रसंगी मित्रांनी मित्रांच्या नेमक्या जागी लाथ घालुन सावरायचे असते! (अधिक उणे असल्यास मलाही घाला लाथ) म्हणून अजुन एक गोष्ट सांगतो, तुम्ही जो प्रतिसाद लिहिला आहे त्यातली भाषा तुमच्या हातून शोभतं नाही अतिवैयक्तिक आहे ते , तुमचे मुद्दे रास्त आहेत का नाही हे पहायच्या आधी कोणालाही फर्स्ट रीडिंग मधे ते जाणवेल भाऊ!

असो! बहुदा माझे मिपावरील दिवस भरत आले असतील असे वाटू लागले आहे हल्ली. :(

जुन्या जाणत्या आणि मिपावर प्रसिद्ध अशा आयडीकडून अशा अपेक्षा नव्हत्या!! असो.... पाॅपकाॅर्न बद्दल वर गमतीने बोललो होतो...ते दुर्दैवाने तसेच घडले! :)

आणि पदार्पणात हे असले धागे काढत राहून टीआरपी मिळवणार्यांबद्दल मला अतोनात राग आहे! हे विधान कोणत्याही परिस्थितीत बदलले जाणार नाही! अरे, इन मीन तीन दिवसांचा सदस्यकाळ दिसतो आहे धागकर्त्याचा!

मिपावर(नव्हे, कुठेही!) चांगले वाचावे...चांगले विचार मांडावे...चांगल्या ओळखी निर्माण कराव्या, त्या वाढवाव्या...ते राहिले बाजूला.... साहेब आले नि मांडला मुद्दा, देशप्रेम-देशद्रोह वगैरे... त्याआधी आपली जरा ओळख सांगता का धागाकर्ते?? कुठुन आलात? काय करता? देशासाठी आपले योगदान काय??

आणी विशेष महत्वाचे मणजे इथे मिपावरही अशा लोकांना एण्टरटेन करणारे लोक्स आहेत! हे सर्वात दुर्दैव! अनुल्लेखाने सहज मारता येत की हो अशा धाग्यांना आणि लोकांना! पण मेगाबायटि परतीसादाच फ्याड लय वाईट! हा आजचा माझा पहिला आणि बहुतेक शेवटचा!

राहता राहील धागा आणि त्याच्या विषयाच्या गांभिर्याबद्दल.....
डेव्हिड हेडली.....इशरत जहां.....गुजरात पोलिस आणि मोदी.....शहा....सेक्युलर....जवाहरलाल नेहरू युनिवर्सिटी वामपंथी....पाकिस्तान.... हाफिज सईद.... हे सगळ 'मिपा'च बघणार का यापुढे?? कायदा आणि सुव्यवस्था बघणार्या सर्व संस्था बंद करायच्या?? राज्यघटना बासनात गुंडाळून ठेवायची?? पीएमओ सल्लागार समिती आणि युनो वगैरेचे सदस्य हे मिपाकरच हवेत असे कायद्याने ठरवून घ्यायचे?? काय करायचं नेमक??

(मिपाच्या काथ्याकूटान्ना आणि फालतू चर्चांना विटलेला)
Sandy

उगा काहितरीच's picture

11 Feb 2016 - 5:55 pm | उगा काहितरीच

संदिप भाऊ , जाऊद्या दुर्लक्ष करा.

इन मीन तीन दिवसांचा सदस्यकाळ दिसतो आहे धागकर्त्याचा!

हे नाही कळालं एखादा नवीन सदस्य असेल तरी तोही तितक्याच प्रौढपणे आपले मत मांडू शकतो की ! एखाद्या व्यक्तीचा सदस्य काळ पाहून त्याची कुवत ओळखणे कसं काय शक्य आहे ?

राहता राहील धागा आणि त्याच्या विषयाच्या गांभिर्याबद्दल.....
डेव्हिड हेडली.....इशरत जहां.....गुजरात पोलिस आणि मोदी.....शहा....सेक्युलर....जवाहरलाल नेहरू युनिवर्सिटी वामपंथी....पाकिस्तान.... हाफिज सईद.... हे सगळ 'मिपा'च बघणार का यापुढे?? कायदा आणि सुव्यवस्था बघणार्या सर्व संस्था बंद करायच्या?? राज्यघटना बासनात गुंडाळून ठेवायची?? पीएमओ सल्लागार समिती आणि युनो वगैरेचे सदस्य हे मिपाकरच हवेत असे कायद्याने ठरवून घ्यायचे?? काय करायचं नेमक??

(मिपाच्या काथ्याकूटान्ना आणि फालतू चर्चांना विटलेला)
Sandy

इथे पण असहमत , तुम्हाला चर्चा आवडत नाही तर नका ना वाचू ! शिर्षक वाचून लांब रहा झालं . मला तर वैयक्तिक आवडतात अशा चर्चा कारण यात पूर्णपणे वेगळे विचार करणारे लोक आपापले मुद्दे तितक्याच प्रभावीपणे मांडतात. त्यामुळे एकाच घटनेचे वेगवेगळे पैलू कळतात .

आणी विशेष महत्वाचे मणजे इथे मिपावरही अशा लोकांना एण्टरटेन करणारे लोक्स आहेत! हे सर्वात दुर्दैव! अनुल्लेखाने सहज मारता येत की हो अशा धाग्यांना आणि लोकांना! पण मेगाबायटि परतीसादाच फ्याड लय वाईट!

॑ का बुवा विरोध मेगाबायटी प्रतिसादांना ? ज्यांना वेळ ,इच्छा आहेत ते लिहीतात. ज्यांना वेळ, इच्छा आहे ते वाचतात. ज्यांची इच्छा नाही त्यांनी वाचू नये. आणी काय नवीन लेखक असला तर अनुल्लेखाने मारणार का प्रोत्साहन देणार ?

मिपावर(नव्हे, कुठेही!) चांगले वाचावे...चांगले विचार मांडावे...चांगल्या ओळखी निर्माण कराव्या, त्या वाढवाव्या.

याच्याशी सहमत!
रच्याकने एवढे लिहून मी माझा किलोबायटी प्रतिसाद संपवतो.
जय हिंद ! जय महाराष्ट्र !!

चेक आणि मेट's picture

11 Feb 2016 - 6:37 pm | चेक आणि मेट

धागा न वाचण्याचा आणि पाॅपकाॅर्नची प्रतिक्रिया न देण्याचा पर्याय होता तुमच्याकडे.
मिपावर असा काथ्याकूट होणारच!!
हे काय काव्य संमेलन नाही तुमच्या कविता ऐकायला.
आणि मुद्यांची गांभीर्यता तुम्हाला कळते काय??
देशासाठी माझं योगदान विचारताय,तुम्ही काय कारगिल युद्ध खेळून आलात कि काय?
काथ्याकूट मध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मुद्दयांबद्दल काही लिहायचे नाही काय?
अहो तुम्ही कोठून आलात?काय करता?
चला हवा येवू द्या

उगा काहितरीच's picture

11 Feb 2016 - 7:19 pm | उगा काहितरीच

थोडं थंड घ्या मालक !

मृत्युन्जय's picture

11 Feb 2016 - 6:13 pm | मृत्युन्जय

तुमच्या विचारांचा आदरच आहे सोन्याबापू. पण दुर्दैवाने त्यावर सहमती दाखवु शकत नाही त्याबद्दल क्षमस्व.

मी संदीप डांगेंचा ४ शब्दात स्टिरियोटाइप कसा केला ते नाही कळाले. मी एक खुप साधा प्रश्न विचारला होता. तिथुन धागा मोदी, माझा मोदीविरोधकफोबिया, डांग्यांचे देशप्रेम, माझे अपमानकारक लेखन, विवेकहीन विचार, माझे पुर्वग्रहदुषित विचार, माझे अधिकार यावर कसे पोचले हे मला अजुनदेखील कळालेले नाही. माझ्या पहिल्या प्रतिसादात एकही वैयक्तिक टीकेसदृश्य वाक्य नसूनही संदीप डांगे माझ्याबद्दल उपरोल्लेखित बेछूट वैयक्तिक विधाने करत सुटले हे कदाचित तुमच्या नजरेतुन सुटले आहे. " नक्की का ? नक्की ना?" केवळ या दोन प्रश्नातुन खालील वरील गोष्टी कश्या प्रतीत होतात?

असो. तरीही तुमच्या मताचा आदरच आहे. खासकरुन तुम्ही आम्हाला तुमचे मित्र मानता तर तुमच्या प्रतिसादाचा मी नक्कीच विचार करेन. नुकत्याच घडलेल्या सियाचिन घटनेनंतर तर सैनिकांबद्दलचा आदर अजुन वाढलाच आहे. तुम्ही मला मित्र समजता या गोष्टीचा मला मनापासून आनंद आहे. मतमतांतरांचा विषय बाजूला सारुन आपली मैत्री अशीच वृद्धिंगत होत राहो हीच सदिच्छा.

याचा अर्थ खालीलप्रमाणे झालेल्या अन्य घटनांसाठी जसे वेमुला केस मध्ये निषेध करणारे कार्यक्रम केले तसे का केले गेले नाहीत ? (आं जा वरून साभार)

http://picsture.com/12-year-old-dalit-girl-raped-and-murdered-in-bareill...
http://www.abplive.in/videos/12-year-old-dalit-girl-raped-and-murdered-i...
http://www.uniindia.com/girl-raped-and-murdered-in-bareilly/states/news/...

http://timesofindia.indiatimes.com/city/patna/60-dalit-students-from-Bih...
http://www.thehindu.com/news/national/other-states/60-dalit-students-in-...

http://zeenews.india.com/news/maharashtra/my-son-was-murdered-because-he...

सगळे निषेध कार्यक्रम मोदी सरकार विरोधीच का असतात ? तथाकथित सेक्युलरांचा निवडक राजकीय विरोध हा मुद्दा आहे. (जुनाच आहे)

संदीप डांगे's picture

11 Feb 2016 - 5:39 pm | संदीप डांगे

सागरजी प्रश्न रास्त आहे तुमचा. पण धागाकर्त्याचा रोख काय आहे नेमका?

रोहित वेमुला वा इतर देशांतर्गत पक्षीय राजकारणी कुरघोड्या व जेएनयुतला कार्यक्रम ह्या दोहोंना एकाच पातळीवर घेऊ नये असे वाटते. कारण रोहित वेमुला निषेधप्रकरण हे स्पष्ट मोदीविरोधी-संघविरोधी-भाजपविरोधी कारस्थान होते. जेएनयुतला कार्यक्रम देशविरोधी कार्यक्रम आहे. त्याचा केंद्रात कोणत्या पक्षाचे, विचारांचे सरकार आहे ह्याच्याशी संबंध नाही.

अनिरुद्ध.वैद्य's picture

11 Feb 2016 - 7:32 pm | अनिरुद्ध.वैद्य

पण त्ये वेमुला परकरण ज्येयेन्यू हूनच झालत न?
सब फसाद की जड?

चेक आणि मेट's picture

11 Feb 2016 - 6:44 pm | चेक आणि मेट

मोंदीना काय समजतात लोक ते देवच जाणे.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मोदीसरकार नसते तर या सेक्युलरखाजाड्या मंडळींनी असे कार्यक्रम घेतले असते

काही दुमत?
खरेच आहे हे.
मोंदीना विरोध करायला जाऊन आपण नकळत देशविघातक कार्य करत आहोत.
हे ढोंगी फेक्युलर लोकांना समजत नसते,म्हणजे त्यांचा त्या गोष्टीशी संबंधच नसतो म्हणा ना!त्यांना फक्त राजकारण करायचं असतं.
आणि आपण इथे चकाट्या पिटत परत मोंदीवरच घसरतो
काय म्हणता?

मार्मिक गोडसे's picture

11 Feb 2016 - 5:26 pm | मार्मिक गोडसे

डेविड हेडलीची साक्ष २६/११ च्या हल्ल्यासंदर्भात घेतली जात आहे. इशरत प्रकरण हे त्या आधीचे आहे. हेडलीला साक्ष देताना तीचे नाव आठवत नव्हते, त्याने तीन महिलांच्या नावाचे ऑप्शन मागीतले,आपल्या वकिल साहेबांनी तीन महिलांची नावे सांगितली त्यात इशरतचेही नाव होते.ते नाव हेडलीला ओळखीचे वाटले व त्याने त्यावर शिक्कामोर्तब केले. त्या तीन ऑप्शनमध्ये आपल्या वकिलानी इशरतचे नाव घेतले नसते तर? सगळंच संशयास्पद वाटतय. -

एवढे मोठे नेटवर्क. त्यात कुणा कुणाचे नाव लक्षात राहणार बिचार्‍याच्या. ;)

बोका-ए-आझम's picture

11 Feb 2016 - 5:37 pm | बोका-ए-आझम

बातमीनुसार त्याला नूरजहाँ, इशरत आणि मुमताजमहल अशी तीन नावं ऐकवण्यात आली होती आणि त्याने इशरत जहाँ हे नाव घेतलेलं आहे. पण मग कोर्टात त्याच्या वकिलाने Suggestion या मुद्द्यावर objection घ्यायला हवं होतं, जे घेतलं गेलेलं नाही. कायद्यानुसार हेडली कोर्टात under oath साक्ष देत असल्यामुळे जोपर्यंत त्याची साक्ष निखालस खोटी ठरवणारा पुरावा कोर्टासमोर येत नाही तोपर्यंत कोर्ट हीच साक्ष ग्राह्य धरेल.

मार्मिक गोडसे's picture

11 Feb 2016 - 5:46 pm | मार्मिक गोडसे

पण मग कोर्टात त्याच्या वकिलाने Suggestion या मुद्द्यावर objection घ्यायला हवं होतं, जे घेतलं गेलेलं नाही

म्हणुनच संशयास्पद वाटतय.

चेक आणि मेट's picture

11 Feb 2016 - 6:50 pm | चेक आणि मेट

इशरतचा एन्काउंटर झाल्यावर तीचा फोटो लष्कर-ए-तोयबा च्या वेबसाईटवर शहीद म्हणून झळकला होता.

अनिरुद्ध.वैद्य's picture

11 Feb 2016 - 7:34 pm | अनिरुद्ध.वैद्य

.

सुबोध खरे's picture

11 Feb 2016 - 8:34 pm | सुबोध खरे

गोडसे अण्णा,
दहशतवादी समोर हातात बंदूक घेऊन उभा असेल तेंव्हा त्याला संशयाचा फायदा देत येत नाही.
इशरत जहान गुजरात मध्ये गरबा खेळायला गेली होती का? डेव्हिड कोलने अमेरिकन कोर्टात इशरत जहान दहशतवादी होती आणि ती श्री मोदींना मारण्यासाठी गुजरातला गेली होती हे कबुल केलेले आहे. तेथे दिलेला कबुली जबाब भारतीय कोर्टात चालत नाही म्हणून हि व्हिदिओ कॉन्फरन्स आहे.
तिला मारल्याबद्दल या सुडोसेक्युलर माणसांनी मोदिजीना खूनी ठरवून टाकले होते. सर्वच्या सर्व न्यायालयात श्री. मोदी निर्दोष सुटले एवढेच नव्हे तर उपलब्ध असलेले सर्व पुरावे इशरत जहानच्या विरोधात आहेत.
तरीही आपण त्यांना संशयाचा फायदा देऊ पाहत आहात? कोणत्या आणि किती विश्वासार्ह माहितीवर? आपण त्यांचे वकील आहात का आणि आपल्याला अशी खास माहिती आहे?
जर असेल तर इथे मांडा. नसेल तर निदान हवेत बाण मारू नका.
धन्य आहे.

मार्मिक गोडसे's picture

11 Feb 2016 - 11:46 pm | मार्मिक गोडसे

सर्वच्या सर्व न्यायालयात श्री. मोदी निर्दोष सुटले एवढेच नव्हे तर उपलब्ध असलेले सर्व पुरावे इशरत जहानच्या विरोधात आहेत.

डॉ.साहेब आपला प्रचंड गैरसमज झालेला आहे.
माझा भारतीय न्यायव्यवस्थेवर १०० % विश्वास आहे.भारतीय न्यायालयाने निर्दोष ठरविलेल्या व्यक्तीचा मी द्वेषही करत नाही किंवा दोषी ठरवलेल्या इशरतला निर्दोषही मानत नाही.
आपल्या सरकारी वकिलावर हेडलीच्या वकीलाचा केवढा तो विश्वास? समजा आपल्या वकीलाने हेडलीला जाळ्यात पकडले असते व त्यात हेडली अडकला असता आणी त्याने इशरतच्या ऐवजी दुसर्‍या कोणत्या महीलेचे नाव घेतले असते तर इशरत निर्दोष ठरली असती का? हेडली म्हणतो म्हणून ढोल बडवणारे आपल्या न्यायव्यवथेचा अपमान करत आहेत.
दुसरा संशय हा Quid pro quo प्रकारचा आहे. योग्यवेळी त्यासंबंधी लिहीन,इथे नको.

गामा पैलवान's picture

12 Feb 2016 - 7:19 pm | गामा पैलवान

डॉक्टरसाहेब,

तुमचा मुद्दा पटला. मात्र एक विधान दुरुस्त करायला हवंय.

>> सर्वच्या सर्व न्यायालयात श्री. मोदी निर्दोष सुटले ....

कुठल्याही न्यायालयाने मोदींना निर्दोष म्हणून जाहीर केलेले नाहीये. कारण की कुठल्याही न्यायालयात मोदींवर आरोपपत्र दाखल नाहीच्चे मुळी!

आ.न.,
-गा.पै.

चेक आणि मेट's picture

11 Feb 2016 - 8:16 pm | चेक आणि मेट

1)डांगेसाहेबांचा पहिला प्रतिसाद
पाॅपकाॅर्न
म्हणजे धागाकर्त्याचे लिखाण क्षूद्र आहे.
बर चला लेखन मुद्देसूद नाही,
धाग्याचा आशय काय आहे?मी कोणविरूद्ध आगपाखड केली आहे का? केली आहे तर ती ढोंगी लोकांवर
मी ढोंगी सेक्युलर असाही शब्द वापरलाय.
बरं यातून माझं लिखाण भाजपेयी आहे असं वाटत का?
2)डांगे साहेबांचा तिसरा प्रतिसाद
मी स्टोरिओटाईप प्रतिसाद दिल्यावर खवळले,
आणि प्रतिसाद आला तोही धमकीवजा सूचना असाच होता.म्हणजे चड्डीत रहा वगैरे,आणि पहिली आणि शेवटची सूचना.अशी सूचनावजा धमकी.
मग मी मोठं मन करून माफी मागितली.
3)चौथा प्रतिसाद
मी माफी मागितल्यावर लेखन कसे असावे हा उपदेश त्यांनी केला.
4)पाचवा प्रतिसाद
त्यामध्ये ते असे म्हणतात,
थेट रणगाडे चालवले ह्या हरामखोरांवर तरी बेहत्तर
मुद्देसूद,विचारनीय,तर्कशुद्ध लेखन करणारा माणूस अशी प्रतिक्रिया कशी देईल?हा प्रश्न मनात आला.आणि त्यामुळे
त्यांनी असे उपहासात्मक म्हणलं असं न राहवून वाटलं.
कदाचित मला डांगेफोबिया झाला असेल.

त्यानंतर त्यांची आणि मृत्युंजयसाहेबांची जुगलबंदी चालू झाली.

बरं मी धाग्यात दोनदा मोदींचा उल्लेख केला आहे
1)

तर इशरत प्रकरणावरून पूर्वी बराच वाद झाला होता,त्यामध्ये गुजरात पोलिस आणि मोदी,शहांच्या नावाने बरेच स्वयंघोषित सेक्युलर खडे फोडत होते.तथाकथित ढोंगी सेक्युलर म्हणत होते कि ती निर्दोष होती म्हणे!!!

मुद्दा रास्त आहे.
अल्पसंख्यांक तुष्टीकरण करण्यासाठी हे स्वयंघोषित ढोंगी सेक्युलर काहीवेळेस दहशतवाद्यांच्या विरूद्ध सुद्धा तोंड उघडायला घाबरतात.
दहशतवाद्यांच्या नावापुढे 'श्री' लावतात.
ते फक्त आणि फक्त राजकारण करतात.
प्रश्न असा आणि तो फार महत्वाचा आहे,कि दहशतवाद हा राजकारण करण्याचा मुद्दा आहे का?
दहशतवादाची झळ अजून आपल्यापर्यंत पोहचली नाही.

2)

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मोदीसरकार नसते तर या सेक्युलरखाजाड्या मंडळींनी असे कार्यक्रम घेतले असते का??

इथेही मी मोदींचा उल्लेख केला आहे.
आणि हाही मुद्दा रास्त आहे,अगदी 100%
मी मोदीभक्त नाही,तरीही तटस्थपणे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मोदी आल्यापासून दांभिक सेक्युलरांचा सुळसुळाट वाढला आहे कि नाही??
उत्तर हो असं आहे,वाढला आहे.

बरं आता चर्चा शांतपणे होणे गरजेचे होते,पण चर्चा निष्प्रभ ठरवण्याचा प्रयत्न झाला.

chandnesandeep यांनी तर मला जिल्बिवालाच ठरवून टाकलं
तुमचे देशासाठी योगदान काय म्हणे?कोण आहात?काय करता?वगैरे वगैरे.
मिसळपाव हे फक्त आणि फक्त कविता सादर करायचे संस्थळ आहे का?
चांगले वाचावे,चांगले विचार मांडावे असे ते म्हणतात,
मी काय वाईट विचार मांडले हे कोणीतरी सांगा.
आणि ही चर्चा तर एकदम सरळ आहे,
मी देशद्रोही,धर्मविरोधी,भडकाऊ,असे काही लिहले आहे का?

तसे असेल तर आमचे मिपावरील सक्रीय सभासद म्हणूनचा प्रवास संपवतो.आणि आम्ही वाचनमात्र म्हणूनच राहतो.
चांदणेसाहेब,सोन्याबापू तुमची मिपाला गरज आहे,तेव्हा कृपया कायमचे गमन करू नका ही विनंती.
तुम्ही छान लिहता.

...धन्यवाद

कैलासवासी सोन्याबापु's picture

11 Feb 2016 - 8:52 pm | कैलासवासी सोन्याबापु

पहिले म्हणजे ज़रा गार व्हा,

दूसरे म्हणजे स्वतःचे मुद्दे मांडायमागे तुमची काय भूमिका होती ती मांडा. डांगे ह्यांना जर तुमचा रोख चुकीचा वाटला तर त्याचा प्रतिसाद करा, हे असे "आम्ही नाय जा" "आम्ही चाललो मिपा सोडुन" हाच का तो काथा कुटायचा बाणा? इतके मनावर घेऊ नये पब्लिक फोरम!

बाकी आम्ही नवे होतो तेव्हा आमची ही हुर्यो उडाली आहे इथेच "ह्या धाग्यावर!"

हे मिपा आहे देवा! ज्यांनी माझी आडमाप टंगड़ी ओढ़ली होती ती माणसे आज चांगले मित्र आहेत माझे , आले काय गेले काय असं नसतं,अन वाचन मात्र रहाणे वेगळे पड़ते स्वतः लिहिण्यापेक्षा! बघा विचार करा काय ते!

शुभेच्छा

सोन्याबापू, तुम्ही सैन्यात असल्याने मिपावर माझ्यासकट सगळेच तुम्हांला थोडा अधिक आदर देतात. सैन्यातल्या व्यक्तीने तो आदर कमावलेलाही असतो, पण गेले काही दिवस आपले प्रतिसाद बघता थोडे आश्चर्य वाटते. इथे चेक आणि मेटना आपण योग्य सल्ला दिलेलाच आहे, पण http://www.misalpav.com/comment/802860#comment-802860 ह्या आणि अशाच अनेक प्रतिसादांवर आपला मित्रत्वाचा सला का दिसला नाही, ह्याचे मला खरेच मनापासून आश्चर्य वाटून राहिले आहे. सैनिक देशाचा हो, फक्त प्रांताचा नव्हे, खरे ना?

कैलासवासी सोन्याबापु's picture

11 Feb 2016 - 10:18 pm | कैलासवासी सोन्याबापु

काकांचा धागा आत्ता वाचला हो! बाकी कुठल्या धाग्यावर कुठे काय बोललो नाही ते बयाजवार सांगाल का जरा ताई ? माझी चुक (कळत केलेली नकळत झालेली) कुठलीही असो ती दुरुस्त करायला मला लाज नव्हती/नाही/नसेल अशी मी इथे लिखित ग्वाही देतो इथे,

बाकी ते "एका प्रांताचा" वगैरे वाचुन मनःपूर्वक वाईट वाटले इतके नोंदवतो, इतका उथळ मी निश्चित नाही पण अर्थात तशी इमेज झाली असेल तर माझेच दुर्दैव म्हणावे लागेल. तुमच्या माहीती करता मी मुळचा सातार चा, आई सांगलीची,लहानाचा मोठा विदर्भात झालो अन नोकरी भारतभरात करतोय तस्मात् मी सगळीकडला अन सगळ्यांचाच आहे इतके सांगतो भरोसा ठेवणे न ठेवणे तुमची इच्छा

उरला प्रश्न तुम्ही आदर देण्याचा अन मी तो कमवण्याचा तर तो कमवला आहे की नाही हे मला माहीती नाही मी , मला २ गोष्टी माहीती आहेत

१ मिपा परिवाराने (तुम्ही सुद्धा) खुप भरभरुन आदर नक्कीच दिलाय मला

२ तो आदर टिकवणे अन पचवणे हा खरोखर एक अग्निदिव्य असतो पब्लिकली तो आदर एक्सेप्ट करायचा असेल तर प्रसंगी एकट्यात आरश्यासमोर उभे राहून स्वताडन सुद्धा करावे लागते, कारण आदर म्हणजे भरोसा असतो तो लोकांचा तो जगणे कठीण असते पण तितकाच तो जॉब सैटिस्फैक्शन सुद्धा देतो

बाकी आपण सुज्ञ आहात अन ज्येष्ठ सुद्धा, ताई म्हणतो मी तुम्हाला तेव्हा त्या हक्काने घड़ाघड़ा बोललो

कमी अधिक लागले असेल तर माफ़ी मागतो

(व्यथित) बाप्या

चेक आणि मेट's picture

11 Feb 2016 - 10:35 pm | चेक आणि मेट

बापूसाहेब व्यथित होऊ नका,
दुसरा व्यनि केलाय रिप्लाय द्या कि राव.
ताईंच्या बोलण्याचे व्यर्थ वाईट वाटून घेताय तुम्ही.
बर तुम्ही डांगेसाहेबांना समजावून सांगितलय का?
याबाबत सोयीस्कररित्या मौन बाळगले आहे तुम्ही.
"हो मी त्यांना समजावून सांगितलं आहे"अशा आशयाचे शब्द ऐकण्यासाठी कान आतुरले आहेत.

बाकी सगळे ठीकच आहे, पण कुठेच तुम्हांला मी आत्ता उदाहरणादखल दिल्या सरखे प्रतिसाद दिसले नाहीत म्हणता, मग दाखवून तरी काय उपयोग नाही का? :) पण हरकत नाही, आता जे उदाहरण दिलेय त्याबद्दल काय मत नोंदवता?

कैलासवासी सोन्याबापु's picture

11 Feb 2016 - 10:47 pm | कैलासवासी सोन्याबापु

नाही तसे नाही, दाखवले तर बोलताही येईल, दाखवायला मी सुद्धा तसेच प्रतिसाद दाखवु शकेल पण ही टोटल एक्सरसाइज माझ्या चूका रेक्टिफाय करायची आहे इतर कोणाच्या हाईलाइट करून स्वतःच्या चुका रेशनलाइज करायची नाही म्हणून मी प्रतिवाद करणार नाही ! चुक सांगा मी करेक्ट करतो, बाकी

काकांची पोस्ट पहाल, ती पोस्ट आली तेव्हा मी जेवत होतो हो! अन नंतर गुरुजींच्या धाग्यावर लिहित होतो, वाचल्याबरोबर तिकडे मत नोंदवले आहेच अर्थात हे तुम्हाला पटने न पटने तुमचा मुद्दा असेल पण तुम्ही सांगितले म्हणून मी उपचार म्हणून तिकडे बोललो असे नाही तर खरेच मला पटले नाही म्हणून बोललो ! बाकी काय सांगणार?

_/\_

ठीके हो सोन्याबापू, तुम्ही सैन्यात आहात म्हणून तुम्हांला पेडेस्टलवर ठेवून आम्ही (निदान मी तरी) पहातो, तेव्हा असे कसे, असे वाटले म्हणून पोस्ट प्रपंच. नपे़क्षा आपको कुछ कहनेकी मेरी क्या जुर्रत. आपण व आपल्यासारखे सैनिक आहात म्हणून आम्ही सिविलियन्स आहोत.

कैलासवासी सोन्याबापु's picture

11 Feb 2016 - 10:57 pm | कैलासवासी सोन्याबापु

ताई तुमची परवानगी असल्यास व्यनि करू का एक?

यशोधरा's picture

11 Feb 2016 - 11:07 pm | यशोधरा

करा की.

एन डी टि व्ही ची २०१३ ची बातमी

Intelligence Bureau's letter to CBI: 'David Headley told FBI Ishrat Jahan was a suicide bomber'

New Delhi: When officers of India's National Investigating Agency (NIA) were allowed to interrogate David Coleman Headley in a jail in Chicago in 2010, the Pakistani-American allegedly told them that Ishrat Jahan, a college student shot dead by the Gujarat Police in 2004, had terrorist links.
....

NDTV has learnt that in March 2010, the FBI had independently warned India's Intelligence Bureau that in his questioning by US investigators, Mr Headley had said that Ishrat and her associates were planning terror strikes on Gujarat temples including the Akshardham temple in Gandhinagar.

२०१३ म्हणजे युपिएच्या अच्छे दिनांचा काळ... त्यावेळेस हॅडली म्हणला तर एन डी टीव्ही ला काही ठसका लागला नव्हता... गंमत म्हणजे सरकारने माध्यमांना दिलेल्या कागदपत्रांमधे तो भाग गाळला होता तरी देखील... सरकारने तो भाग त्यावेळेस का गाळला असेल? अर्थातच निवडणुकांच्या आधीचा काळ होता त्यामुळे साहजीकच होते म्हणा... असो.

अर्धवटराव's picture

12 Feb 2016 - 4:52 am | अर्धवटराव

काय हो.. चांगलं दळण-कांडण-पॉपकॉर्न सेवन चाललं असताना नेमका रसभंग करणं कसं सुचतं तुम्हाला ?? :प

विकास's picture

12 Feb 2016 - 6:00 pm | विकास

"आपणासी जे जे ठावे, ते ते दुसर्‍यांसी सांगावे, (शहाणे सगळेच आहेत म्हणून) इन्फॉर्म्ड करावे सकल जन"

असा आमचा उदात्त हेतू आहे... ;)

चौकटराजा's picture

12 Feb 2016 - 9:37 am | चौकटराजा

राका, भाजपा, का, इ इ इ च्या प्रवक्त्याना वन्दन करून त्यांचे ठराविक वाक्य इथे वापरतो " सध्या प्रक्रण न्यायप्रविस्ट असल्याने त्याबाबत बोलने उचित नाही"

मोगा's picture

12 Feb 2016 - 11:05 am | मोगा

नथुलाही तीन ऑप्शन द्यायला हवे होते. त्यांचा खून करायला कुणी सांगितले ?

ऑप्शन्स..

काका

तात्या

नाना

काल टी.व्ही. सरकारी वकीलांवर "कौन बनेगा करोडपती" खेळल्याची कॉमेंट ऐकली आणि एका चर्चा सत्रात काँग्रेस प्रतीनिधीने गांधी हत्येच्या संदर्भात माफीच्या साक्षीदाराचा पण उल्लेख केलेला ऐकला.
हेडलीला जर तीन नावे विचारली होती, तर तो यापैकी एकही नाही असे म्ह्णू शकला असता ना? की अ‍ॅड. निकमांनी , "नाही, तू नाव सांगीतलेच पाहीजेस" अशी जबरदस्ती केली होती ?

मोगा's picture

12 Feb 2016 - 4:22 pm | मोगा

हेडलीला नावच सांगायचे असते तर त्याने ते स्वतःच सांगितले असते.

पर्याय द्यायची गरज काय होती ?

पण मग पर्याय दिल्यावर नेमके त्याने तेच नाव का निवडले. इतरही पर्याय होते. किंवा माहीत नाही हाही पर्याय होता.

मोगा's picture

12 Feb 2016 - 7:14 pm | मोगा

३ पर्यायातला एक त्याने निवडला तरी त्याचे पुरावे लागतीलच की.

भंकस बाबा's picture

12 Feb 2016 - 11:23 pm | भंकस बाबा

जे बोलायचे ते स्पष्ट लिहा ना, तुम्ही मिपावर काय गाण्याच्या भेंडया खेळायला येता?
ती कॉंग्रेसची आणि राष्ट्रवादीची येडं राजकीय फायदा मिळावा म्हणुन सेक्युलर बनतात,तुम्ही काय म्हणुन? पुढच्या वेळी निवडणुकीला उभे रहायचे आहे काय? उगाच्च गुळमुळीत बोलत राहु नका, सपष्ट बोला की इशरत जहां देशसेवक होती, ती गुजरातमधे अनाथ मुलांची सेवा करायला चालली होती,या चांगल्या कामासाठी तिने दोन अतिरेक्यांचे मनपरिवर्तन देखिल केले होते.
र्च्यामारि तिच्याबरोबर सापडलेले अतिरेकी होते हे सिद्ध झाले म्हणुन हे सेक्युकर थोडे चेकाळले नाहीतर राजघाटावर तिची कब्र बांधा असे सांगायला पण यानी मागे पुढे पाहिले नसते.

काळा पहाड's picture

12 Feb 2016 - 2:31 pm | काळा पहाड

लग्नाचं नक्की वय काय असतं?
१. ६ वर्षे
२. ९ वर्षे
३. ५३ वर्षे

lakhu risbud's picture

12 Feb 2016 - 9:39 pm | lakhu risbud

ओ ...तुम्ही आधी तुमची बायको सांभाळा

काड्या मग लावा

चेक आणि मेट's picture

12 Feb 2016 - 12:11 pm | चेक आणि मेट

सर्व प्रतिसादकर्त्यांचे धन्यवाद.

मालोजीराव's picture

12 Feb 2016 - 12:19 pm | मालोजीराव

चर्चा मनोरंजक आहे…डेव्हिड हेडली सारख्या डबल एजंट वर विश्वास ठेवण कितपत योग्य ? आय पी एस राजेंद्रकुमार ने सुद्धा हेडली कडून हे वदवून घेतलय फार पूर्वीच आणि तेव्हाच NIA ने हेडली चा हा दावा फेटाळला होता. हा राजेंद्रकुमार स्वताच या इशरत च्या केस मध्ये अडकलेला

अनुप ढेरे's picture

12 Feb 2016 - 12:33 pm | अनुप ढेरे

हेडली २६/११ ISI ने स्पाँन्सर केलं म्हणतोय. त्यात पाकिस्तानी अतिरेकी होते असही म्हणतोय. त्यावर पण अविश्वास ठेवायचा का? खोटं बोलून त्याला काय फायदा? तो एनीवे ३५ वर्ष तुरुंगात असणारे.

नितीनचंद्र's picture

12 Feb 2016 - 4:32 pm | नितीनचंद्र

जाऊ द्या हो इशारत दशहतवादी होती हे मोदी विरोधी लोकांनाही माहित होते आणि ती नकटी सेस्टा कायतरीवाड तीलाही माहित होते. मुस्लीम मते मिळवण्यासाठीचा चुनावी जुमला होता.

शहासाहेब लई हुशार ! त्यांनी केंद्र सरकारचे नियंत्रण असलेला रॉ चा अधिकारी साक्षीला ठेऊन तीला अल्लासदनी पाठवले. कारण ती येणार आहे हा संदेश रॉ चाच होता. कॉग्रेसचे हात दगडाखाली सापडले. मग त्यांनी ती हाकामारी सेस्टा तिलसवाढ उभी केली.

सुबोध खरे's picture

12 Feb 2016 - 7:34 pm | सुबोध खरे

भाऊ तोरसेकरांच्या ब्लोग वरून साभार
माफ़ीचा साक्षीदार होऊन डेव्हीड कोलमन हेडली काय सांगणार, त्याबददल कोणाला फ़ारशी उत्सुकता नव्हती. कारण जी माहिती आता बाहेर येत आहे, त्यात नवे असे काहीच नाही. प्रामुख्याने त्यात इशरत जहान या फ़िदायिन मुलीविषयीची माहिती नवी नाही. कारण जेव्हा हेडलीला अमेरिकेत अटक झाली व तिथेच त्याच्यावर खटला भरला गेला, तेव्हाच त्याची भारतीय अधिकार्‍यांनी जबानी घेतली होती. त्याविषयी तेव्हाही गवगवा झालेला होता. त्यात इशरत फ़िदायिन असल्याचे त्याने कबुल केल्याची माहिती उजेडात आलेली होती. मात्र त्याबद्दल इथलेच तात्कालीन युपीए सरकार गोपनीयता पाळत होते. इशरत पाकिस्तानची हस्तक असल्याची माहिती हाताशी असताना, तेव्हाचे मनमोहन सरकार व त्यातले गृहमंत्री लपवाछपवी कशाला करत होते, हा मुद्दा खरा चर्चेचा किंवा चिंताजनक आहे. कारण इशरत बिहारची बेटी म्हणून तेव्हा नितीशकुमार अश्रू ढाळत होते आणि राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तिला मुलीसारखी ठरवून रडत होते. पवाराचेच दोन निकटवर्तिय इशरतच्या कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून आकाशपाताळ एक करत होते. त्यांनी इशरतच्या कुटुंबाला लाखांचे चेक देण्यात पुढाकार घेतला होता. पण त्यालाही स्थानिक राजकारणातला उतावळेपणा म्हणता येईल. त्याकडे दुर्लक्ष अरता येईल. पण इशरत लष्करे तोयबाची हस्तक असल्याची माहिती भारत सरकारचे गृहमंत्री कशाला लपवत होते, हा गहन प्रश्न आहे. कोणाला आठवत नसेल, तर तेव्हाच्या गाजलेल्या बातम्या काढून तपासायला हरकत नाही. इशरतला निरपराध ठरवण्यासाठी तिच्या चकमकीत गुंतलेल्या अधिकार्‍यांना गजाआड टाकण्यासाठी आटापिटा चालला होता. त्याच्याही पुढे जाऊन भारतीय गुप्तचर खात्याच्या वरीष्ठ अधिकार्‍याना खुनी ठरवण्यासाठी सीबीआयला कामाला जुंपलेले होते. अशा सर्वांच्या अब्रुची लक्तरेच आता हेडली वेशीवर टांगतो आहे. आज अनेकांना नेहरू विद्यापिठात उजळमाथ्याने घातपाती जिहादी अफ़जल गुरूच्या उदात्तीकरणाचे नवल वाटते, त्याची सुरूवात इशरत चकमकीतून झाली हे विसरता कामा नये.

इशरत तोयबाची हस्तक होती आणि तरीही तिला निरपराध ठरवून अधिकार्‍यांनाच गजाआड ढकलण्यात धन्यता मानली गेली. त्यासाठी जीतेंद्र आव्हाड पत्रकार परिषदा घेत होते आणि तीस्ता सेटलवाड न्यायालयीन आघाडी संभाळत होती. पण ते भारत सरकारचा घटक नव्हते आणि इशरत फ़िदायिन असेल, तर तिला शिक्षा देणे वा गुन्हेगार ठरवणे ही सरकारची जबाबदारी होती. पण ती पार पाडण्यापेक्षा भारत सरकारच आपल्या हाती आलेली हेडलीची जबानी लपवून आपल्या अधिकार्‍यांना गुन्हेगार ठरवण्याचे उद्योग करीत होती. ही बाब अतिशय गंभीर आहे. सेक्युलर वा पुरोगामी असण्यासाठी पाकिस्तानी हस्तक वा घातपातींना पाठीशी घालण्यापर्यंत तात्कालीन सेक्युलर सरकारने किती भयंकर निर्णय घेतले, त्याचा पर्दाफ़ाश हेडलीच्या साक्षीने झाला आहे. त्यात नवे काही नाही. पण हे आधीच हेडलीने सांगितले असताना तेव्हाच्या भारत सरकार वा सत्ताधार्‍यांनी देशाच्या सुरक्षेसाठी काय केले, हा गंभीर प्रश्न आहे. तेव्हाचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे किंवा पंतप्रधान मनमोहन सिंग या विषयात काय करत होते? हेडलीची कबुली हाताशी असताना त्यांनी विचारणा झाली तरी इशरत दोषी असल्याची माहिती कशाला लपवली होती? ती लपवून आपण देशाचा घात करतोय, एवढेही त्यांच्या लक्षात आले नसेल काय? इशरतचे उदात्तीकरण थांबवून तिला गुन्हेगार ठरवणे दूर राहिले. उलट इशरतचा निकाल लावणार्‍या अधिकार्‍यांनाच आरोपी बनवण्यात तेव्हा सीबीआय गर्क होती. एकामागून एक अर्धा डझन अधिकारी त्यात गोवले गेले होते आणि दिर्घकाळ खितपत पडलेले होते. त्याचे कारण नरेंद्र मोदी इतकेच होते. मोदी या व्यक्तीला गुजरातमधून सत्ताभ्रष्ट करणे आणि भारतीय राजकारणातून उखडून टाकणे, यासाठी जे सेक्युलर कारस्थान बारा वर्षे शिजवले गेले, त्याचाच लाभ इशरतच्या उदात्तीकरणाला झालेला होता. त्यासाठी मग आयबीचे अधिकारी राजेंद्रकुमार यांनाही इशरत चकमकीत गुंतवण्यापर्यंत गृहखात्याने मजल मारली. थोडक्यात पाकिस्तानी हेरखात्याला हव्या असलेल्या गोष्टी भारताचेच गृहखाते करीत होते.
हेडलीने तेव्हाच दिलेली कबुली कुठून तरी बाहेर आलेली होती. पण त्यामुळे इशरत प्रकरणात मोदींना सुटका मिळेल म्हणून तितकीच जबानी लपवण्यात धन्यता मानली गेली. हेडलीच्या कबुलीविषयी जी माहिती देण्यात आली, त्यातला इशरतविषयीचा भाग खोडून पाठवण्यात आला. जेणे करून इशरत फ़िदायिन आहे, याला दुजोरा मिळू नये. याचा अर्थ असा, की भारताचे तेव्हाचे गृहखाते एका तोयबा फ़िदायिनला संरक्षण देण्यासाठी झटत होते. दुसरीकडे नेहरू विद्यापिठ किंवा तत्सम सेक्युलर अड्ड्यांवर अफ़जल गुरू किंवा इशरत यांच्या उदात्तीकरणाच्या जोरदार मोहिमा चालविल्या जात होत्या. त्यासाठी माध्यमातील हस्तकही जुंपले होते. यातल्या अनेकांना आपण पाकिस्तानला व तिथल्या जिहादी घातपात्यांना अपरोक्ष मदत करतोय याचेही भान नव्हते. इशरतची हत्या अमानुष असल्याचा दावा करून आक्रोश करणार्‍यांना आता सत्य समोर आल्यावर आपली चुक कबुल करण्याची हिंमत आहे काय? तेव्हाच्या युपीए सरकारने तर इशरतसाठी आपल्या ज्येष्ठ गुप्तचर खात्यालाच खुनाच्या गुन्ह्यात गुंतवण्याचे प्रयास चालविले होते. इशरतचा खुन मोदींच्या माथी मारण्यासाठी हा सगळा खटाटोप चालू होता. त्यासाठी सेक्युलर ‘दूर’बुद्धी किती आश्चर्यकारक शोध लावत होती, त्याचे नमूने तात्कालीन लेख व बातमीदारीतही सापडू शकतील. मुद्दा इतकाच होता, की मोदींना संपवायला युपीए वा कॉग्रेस थेट तोयबा वा पाक घातपात्यांनाही हाताशी धरायला तयार होती. अर्थात आजही त्यात बदल झालेला नाही. भारत-पाक मैत्रीसाठी सत्तेवरून मोदींना हटवावे लागेल, असे आवाहन आजही मणिशंकर अय्यर पाकिस्तानात जाऊन करू शकतात. नेहरू विद्यापिठात अफ़जल गुरूचा उदो उदो चालतो. आणि सत्ता हातात असताना इशरतविषयी हेडलीने केलेला खुलासा लपवला जातो. हा सेक्युलर वा पुरोगामी राजकारणाचा खरा चेहरा आहे. देशाचे वा समाजाचे नुकसान वा हानी याच्याशी पुरोगामीत्वाला कशी फ़िकीर नाही, त्याची ग्वाही हेडली आपल्या साक्षीतून देतो आहे. त्यासाठी पाकिस्तानच्या नावाने बोटे मोडण्याची गरज नाही. आपल्यातले गद्दार उघड्या डोळ्यांनी ओळखण्याची गरज आहे.

आपल्या साक्षीतून भारतात पाकिस्तानचे हस्तक कुठल्या मोक्याच्या जागी जाऊन बसले आहेत आणि किती सहजगत्या भारतीयांची दिशाभूल शत्रू करू शकतात, त्याचे पुरावेच हेडली सादर करतो आहे. ज्यांना हिंदूत्ववादी किंवा प्रतिगामी ठरवले आहे, त्यांना नामशेष करायला वा पराभूत करायला इथले पुरोगामी पाक वा देशाच्या अन्य कुठल्याही शत्रूशी हातमिळवणी करू शकतात, इतकाच हेडलीच्या साक्षीचा अर्थ आहे. इशरत जहानविषयी त्याचे वक्तव्य याचा सज्जड पुरावा आहे. कारण त्यात नवे काही नसून त्याविषयी तात्कालीन गृहमंत्री, व सरकारांनी काय कारवाई केली होती, त्याची चौकशी आवश्यक आहे. इशरतच्या समर्थनार्थ पुढे सरसावलेल्यांचे हेतू व त्यांच्या अन्य हालचालींची कसून तपासणी व्हायला हवी आहे. राष्ट्रीय एकात्मतेच्या हेतूने सुरू करण्यात आलेल्या व त्यासाठी कोट्यवधी रुपयांचे सरकारी अनुदान उधळणार्‍या नेहरू विद्यापिठातले विद्यार्थी राजरोस देशद्रोही अफ़जल गुरूचे उदात्तीकरण करतात. त्याचा अर्थ इतकाच होतो की पाकिस्तानला भारतविरोधी कारवाया करण्यासाठी बाहेरून हस्तक पाठवण्याची गरज नाही. पैसाही खर्चायची गरज नाही. सेक्युलर व पुरोगामी भुमिकेच्या नावाखाली भारतविरोधी कारवायांना भारत सरकारच अनुदान देवू शकते. कारण अशा केंद्रीय नेहरूवादी विद्यापिठांचा कब्जा प्राध्यापक वा बुद्धीमंत होऊन देशाच्या शत्रूंनी घेतलेला आहे. म्हणूनच हैद्राबाद विद्यापिठात याकुबच्या फ़ाशीचा निषेध करणार्‍या रोहितला हिरो बनवले जाते. संसदेवरील हल्ल्यातल्या अफ़जलला शहीद म्हणून पेश केले जाते. त्याला आक्षेप घेण्याला अविष्कार स्वातंत्र्याची गळचेपी म्हटले जाते. तोयबाच्या हस्तकाला चकमकीत मारणे गुन्हा ठरवला जातो आणि संसदेच्या सुरक्षेत असलेल्या सैनिकांचा बळी घेणार्‍या अफ़जलला शहीद बनवला जातो. ह्या गोष्टी आपल्या समोर येतात, तेव्हा एकाच प्रश्नाचे उत्तर आपण शोधणे भाग असते, अन्य कुठलाही विषय वा प्रश्न दुय्यम होऊन जातात. तुमचा देश महत्वाचा की तुमची विचारसरणी? आमचे उत्तर सोपे सरळ आहे,

इशरत जहानचे अच्छा, हिंदूस्तान हमारा

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

12 Feb 2016 - 9:04 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

वाचतेय. काही पडलेले प्रश्न-
१) ह्या चकमकीत भाग घेतलेले गुजरात पोलिसचे डी.पी.वंजारा गेले ८ वर्षे जेलमध्ये होते. दुसर्या एका खोट्या चकमकीसाठी तुरुंगात होते.
२)ईशरत एल.ई.टी.साठी काम करत होती, ह्याचा कोणता पुरावा गुजरात पोलिस वा आय.बी.ने सादर केला?
३)२००९ साली अहमदाबाद नगर न्यायालयाने ही चकमक खोटी होती असे सांगितले होते.
४)२०१३ मध्ये सी.बी.आय.नेही हेच सांगितले.
५) हे विकिपिडिया वरून-
Tamang's report said the Crime Branch police kidnapped Ishrat and the others from Mumbai on 12 June 2004 and brought them to Ahmedabad. The four were killed on the night of 14 June in police custody, but the police claimed that an "encounter" took place the next morning on the outskirts of Ahmedabad. Rigor mortis had set in between 11 pm and midnight the previous night, indicating that the police had later shot bullets into Ishrat's body to substantiate the encounter theory
६)जिवंत पकडून पुरावे दिले असते तर पाकिस्तानला उघडे पाडता आले नसते का? (जसे २६-११ मध्ये कसाबला पकडले होते)
७)On 21 November 2011, the SIT told the Gujarat High Court that the Ishrat Jahan encounter was not genuine.
एस.आय.टी चे सदस्य, न्यायाधीश तमंग व तत्कालीन सी.बी.आय.अधिकारी कॉन्ग्रेससाठी काम करत होते असा दावा असेल तर विषयच संपला.

याॅर्कर's picture

12 Feb 2016 - 9:36 pm | याॅर्कर

Breaking News::
प्रदीर्घ विश्रातीनंतर माईसाहेबांचं पुनरागमन.

गामा पैलवान's picture

13 Feb 2016 - 1:26 am | गामा पैलवान

माईसाहेब,

जर १२ तारखेला इशरतचं अपहरण झालं होतं, तर तिच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार का नोंदवली नाही? मी एके ठिकाणी वाचल्याप्रमाणे १३ तारखेला तिने घरी फोन लावला होता.

आ.न.,
-गा.पै.

बोका-ए-आझम's picture

13 Feb 2016 - 9:22 am | बोका-ए-आझम

असा आरोप आता विरोधी पक्ष असलेले काँग्रेसचे लोक करत आहेत. काँग्रेस सरकारमध्ये असताना CBI निःपक्षपाती होती आणि भाजप सरकार आल्यावर पक्षपाती झाली असं आपलं म्हणणं आहे का?
तमंग हे मॅजिस्ट्रेट आहेत. त्यांच्या रिपोर्टमध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की इशरत गरीब घरातली होती आणि ट्यूशन्स घेऊन घरखर्चाला हातभार लावत होती आणि जावेद शेख (जो या एन्काउंटरमध्ये मारला गेला)त्याच्याकडे ₹३००० एवढ्या पगारावर काम करत होती आणि ती निर्दोष आहे. एवढा महत्वाचा निर्णय एवढ्या तुटपुंज्या पुराव्यावर? इशरत कमीतकमी collateral damage आणि जास्तीतजास्त एक सुईसाईड बाँबर असू शकते. ती त्या लोकांबरोबर काय करत होती याचं उत्तर तिच्या घरातले लोक अजूनही देत नाहीयेत.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

13 Feb 2016 - 11:39 am | माईसाहेब कुरसूंदीकर

ती कामानिमित्त गेली होती असे वाचले होते. एन्काऊंटर करणारे वंजारा खोट्या चकमकीसाठी तुरुंगात जाउन आले आहेत त्याबद्दल काय मत आहे?ज्यांनी मारले त्यांनी पुरावा नको का द्यायला ?२००८ मध्ये रॉ चे माजी बी.रामन ह्यांनी लेख लिहिला होता ह्यावर-त्यांनीही हाच संशय व्यक्त केला होता. गुजरात पोलिसांचे वर्तन कमालीचे संशयास्पद असल्याचे मत त्यांनीही व्यक्त केले होते.
ती काय करत होती,तक्रार का नोंदवली नाही.. हे दुय्यम आहे.

श्रीगुरुजी's picture

13 Feb 2016 - 2:24 pm | श्रीगुरुजी

नानासाहेब,

वंजारांना जामीन न मिळाल्याने ते तुरूंगात होते, खोटी चकमक सिद्ध झाल्याने नव्हे. कॉंग्रेसचे लक्ष मोदी होते, वंजारा नव्हे. त्यामुळे इशरत जहाचे निमित्त करून वंजारा व इतर अनेक अधिकार्‍यांना या खोट्या प्रकरणात काँग्रेसने अडकवले. त्यांच्या माध्यमातून शेवटी मोदी व शहांच्या आदेशानुसार ही खोटी चकमक घडवून आणली हे वंजारा व इतरांकडून वदवून घ्यायचे होते व ते वदवून शेवटी मोदींना यात अडकविण्याची योजना होती. त्यासाठी गुप्तचर खात्याच्या काही अधिकार्‍यांनाही अडकविण्यात आले. काँग्रेसच्या दुर्दैवाने मोदी किंवा शहा यात अडकले नाहीत कारण तसे काही पुरावेच नव्हते.

भारताच्या दुर्दैवाने अतिरेक्यांना मदत करणारे सरकार सलग १० वर्षे सत्तेत होते. सत्तेवर राहण्यासाठी मुस्लिमांचे लांगूलचालन करणे, त्यासाठी अतिरेक्यांना समर्थन देणे व मोदींसारख्या विरोधकांना संपविण्यासाठी सरकारी तपास यंत्रणात भांडणे लावून देणे अशी नीच कृत्ये काँग्रेसने १० वर्षे केली.

ती काय करत होती,तक्रार का नोंदवली नाही.. हे दुय्यम आहे.

कसा काय दुय्यम? तोच तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. एक तरूण मुलगी आपल्या घरापासून इतक्या लांब दुसर्‍या राज्यात पहाटे ३ वाजता ३ तरूणांबरोबर (त्यातले २ पाकिस्तानी होते) कारमध्ये एकटी नक्की काय करत होती? नक्की कोणत्या कारणासाठी ती आपल्या घरापासून इतक्या दूर मध्यरात्री आली होती? तिच्याबरोबर असणारे ते दोन पाकिस्तानी नक्की कोण होते? हे सर्वजण गुजरातमध्ये नक्की काय करणार होते? ती बेपत्ता झाल्यावर अनेक दिवस तिच्या घरच्यांनी पोलिसांकडे तक्रार का नोंदविली नाही? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अनुत्तरीत आहेत व हेच सर्वात महत्त्वाचे प्रश्न आहेत.

२००४ मध्ये ती मारली गेल्यावर लष्कर-ए-तोयबाच्या संकेतस्थळावर ती आमचीच अतिरेकी होती अशी कबुली दिली गेली होती. त्यांच्याच नवाझ टाइम्स या मुखपत्रातून देखील हीच कबुली दिली होती. २०१० मध्ये हेडलीने एनआयए ने केलेल्या चौकशीत अगदी हेच सांगितले होते आणि त्याने २०१६ मध्ये देखील हेच सांगितले आहे. लष्कर-ए-तोयबा व हेडलीची भूमिका याबाबतीत कायम सातत्याची राहिली आहे. २००४ पासून ते सातत्याने हेच सांगत आहेत.

भारताच्या दुर्दैवाने अशा अतिरेक्यांचा उमाळा येणारे पक्ष व नेते भारतात आहेत. बाटला हाऊस चकमकीत एक वरीष्ठ पोलिस अधिकारी व अलिगढ मुस्लिम विद्यापीठात वास्तव्य करणारे २ अतिरेकी मारले गेल्यावर त्या अतिरेक्यांच्या मृत्युच्या बातमीने सोनिया गांधींच्या डोळ्यात अश्रू तरळले असे दस्तुरखुद्द सलमान खुर्शिद यांनी ऑन रेकॉर्ड सांगितले आहे. इशरत जहाच्या कुटुंबियांना आधी वसंत डावखरे व नंतर जितेंद्र आव्हाडने १ लाखाची मदत दिली. तिच्या नावाने शहीद इशरत जहा नाव दिलेली अ‍ॅम्ब्युलन्स काढली. तिचा भाऊ जितेंद्र आव्हाडच्याच कार्यालयात नोकरी करतो. "इशरत जहा निष्पाप होती व अतिरेकी हल्ले केल्याबद्दल मुस्लिमांना दोष देता येणार नाही" असे दस्तुरखुद्द शरद पवारांनी जाहीर सभेत सांगितले होते. जेएनयू मध्ये ज्या देशद्रोही घोषणा दिल्या गेल्या व त्यामुळे तिथल्या विद्यार्थी नेत्याला अटक झाल्यावर राहुल गांधींनी नाराजी व्यक्त केली आहे.

भारताचं दुर्दैव असे नेते व पक्ष भारतात आहेत.