नमस्कार मंडळी,
(पहिल्यांदाच लिहतोय त्यामुळे बारीकसारीक त्रुटींकडे दुर्लक्ष करा.)
तर मुद्दा असा कि,
डेविड हेडलीची साक्ष वगैरे घेण्याचं काम सुरू आहे,आणि त्याने एक मोठा खुलासा केला आहे कि इशरत जहां ही सुसाईड बाॅम्बरच होती.ती लष्कराची महिला आतंकवादी होती.
तर इशरत प्रकरणावरून पूर्वी बराच वाद झाला होता,त्यामध्ये गुजरात पोलिस आणि मोदी,शहांच्या नावाने बरेच स्वयंघोषित सेक्युलर खडे फोडत होते.तथाकथित ढोंगी सेक्युलर म्हणत होते कि ती निर्दोष होती म्हणे!!!
दुसरा मुद्दा असा कि JNU म्हणजे जवाहरलाल नेहरू युनिवर्सिटीमध्ये ते वामपंथी का काय ते विद्यार्थ्यांनी म्हणे काश्मिरच्या स्वातंत्र्याबद्दल कार्यक्रम घेतला आणि 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा दिल्या.
तर मला असे म्हणायचे कि जे राष्ट्रीय संवेदनशील मुद्दे आहेत त्या मुद्यांना हात घालायची खाज या अति लिबरल विद्यार्थांना का सुटते म्हणे??
आता हे सगळं लिहल्यावर काहीजण मला मोदीभक्त म्हणतील.पण असो दुर्लक्ष करणे.
तर हे दोन महत्वाचे मुद्दे मी मांडले आहेत,अजून अशा बर्याच गोष्टी सांगता येतील कि जिथे तथाकथित सेक्युलरांचा ढोंगीपणा उघडा पडतो.
तिकडे हाफिज सईदने ट्वीट करून त्या JNU च्या पाकप्रेमींना पांठिबा दर्शविला आहे.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मोदीसरकार नसते तर या सेक्युलरखाजाड्या मंडळींनी असे कार्यक्रम घेतले असते का??
(सेक्युलर आणि उदारमतवादी असणं हे चांगलंच आहे,पण ढोंगी सेक्यलरपणा हा देशासाठी विघातक आहे.काय म्हणता??)
प्रतिक्रिया
4 Mar 2016 - 2:57 pm | श्री गावसेना प्रमुख
4 Mar 2016 - 2:09 pm | lakhu risbud
त्यांची जळाली/जळणार हे कळून तुमची पण का जळते/जळणार ?
4 Mar 2016 - 2:24 pm | तर्राट जोकर
नै हो. विद्यार्थी विद्यार्थी करुन र्हायलेत. म्हणून म्हटलं. काय रुततंय ब्वा इत्कं?
4 Mar 2016 - 8:15 pm | श्रीगुरुजी
माझं काहीच रूतत नाही हो. आधीच सांगितलंय हे. तुम्हाला का त्रास होतोय ते मात्र अजून समजलं नाही.
4 Mar 2016 - 8:35 pm | नाना स्कॉच
तुमचे काही रुतायचे नाही हो "तुम्हाला" रुतण्याबद्दल बोलत आहेत काहीतरी
4 Mar 2016 - 8:45 pm | श्रीगुरुजी
पुन्हा तेच. किती वेळा सांगायचं मला काहीही रूतत नाहीय्ये ते.
4 Mar 2016 - 8:58 pm | नाना स्कॉच
मी कुठे काय म्हणले आहे ?? त्यांचे काय म्हणणे होते जे मला आकलन झाले तितके फ़क्त मांडले! तुम्हाला टोचो ण टोचो तुम्ही टोचो आमचे काय जाते आहे ! उगाच किंचाळु नका!!
4 Mar 2016 - 9:08 pm | श्रीगुरुजी
असं झालं होय. त्यांना आम्ही योग्य ते प्रतिसाद देत आहोतच आणि तेही प्रत्तुत्तर देत आहेत. पण आमच्या सुसंवादात तुम्ही मध्येच जे लिहिलं - "तुमचे काही रुतायचे नाही हो "तुम्हाला" रुतण्याबद्दल बोलत आहेत काहीतरी" - ते वाचून तुम्ही त्यांची वकिली सुरू केली की काय असं मला वाटलं. पण तुमचं काही जात नाहीय्ये ना. मग ठीक आहे.
4 Mar 2016 - 9:12 pm | नाना स्कॉच
आम्ही वकिली करीत नाही अन आम्हाला वकिलांची गरजही नसते! असो! मी जे बोलतो मी त्याला जबाबदार असतो, तुम्हाला काय कळते त्याची जबाबदारी माझी नाही!
4 Mar 2016 - 9:17 pm | श्रीगुरुजी
बरोबर आहे ना. मग त्यांना काय सांगायचे आहे ते त्यांच्याकडूनच येऊ देत ना. तिसर्याकडून ते आले की लगेच वकीलपत्राचा संशय येतो.
4 Mar 2016 - 9:21 pm | तर्राट जोकर
वडील बेडरिडन आहेत व जो २८ वर्षांचा असून अजूनही "विद्यार्थी"च आहे,
>> ह्याबद्दल कुतुहल आहेना तुम्हाला? म्हणून पीचडी स्टुडंट आहेत का कोणी ओळखीचे, वय विचारुन घ्या म्हणलं. आता जे एन यु म्हणजे पुण्याची मंडई नाही कोनीही यायला-जायला. किंवा तिथे काय डाव्या विचारांचे असणे म्हणजे प्रवेश पक्का असेही नाही. मग त्याच्या विद्यार्थी असण्यावर तुम्हाला कुतुहल काय ह्याबद्दल माझे कुतुहल जागले, मला त्रास होतोय असं कुठं म्हणलंय. काही ही हां श्री!
बाकी तुम्हाला काय रुततंय ते मला बरोब्बर माहीत आहे.
4 Mar 2016 - 9:25 pm | श्रीगुरुजी
आहेत ना, म्हणून तर कुतुहल वाटलं.
मला का कुतुहल वाटलं याबद्दल तुम्हाला का कुतुहल वाटतंय याचंच कुतुहल वाटतंय.
काय सांगताय! अभिनंदन. तुम्हाला काय रूततंत्य ते मला पण बरोब्बर माहित आहे.
4 Mar 2016 - 9:26 pm | श्रीगुरुजी
त्यांना प्रतिसाद दिला की तुम्ही उत्तर देताय आणि तुम्हाला प्रतिसाद दिला की ते उत्तर देताहेत. काहीतरी गडबड वाटतीये.
4 Mar 2016 - 11:35 am | नाना स्कॉच
धन्यवाद.
4 Mar 2016 - 1:22 pm | चेक आणि मेट
कन्हैयाच्या कुटूंबाचा चरितार्थ प्रतिमास 3000 रूपयात चालतो असे तो भाषणात म्हणाला.
पण याच्या अंगावर तर कायम लेदर जॅकेट्स असतात.
आणि कालचे भाषण उत्तम केले त्याने,सरकारविरोधी मुद्यांबाबत काहीही दुमत नाही.
पण एका घोषणेचा अर्थ काय कळाला नाही
"फासीवाद से आजादी"
काय असेल या घोषणेचा अर्थ???
आणि शेवटी उमरबाबत सहानुभूतीही दाखवली.
4 Mar 2016 - 1:59 pm | तर्राट जोकर
फॅसिस्ट, फॅसिझम.
4 Mar 2016 - 2:38 pm | चेक आणि मेट
ओक्केच,
फासीवाद म्हणजे काय?जालावर शोधलं,
फॅसिस्ट, फॅसिझमला विरोध असेल तर मग काय हरकतच नाही.
माझ्या हिंदीच्या अपुर्या ज्ञानामुळे मला काही वेगळाच अर्थ वाटून गेला.
4 Mar 2016 - 8:19 pm | श्रीगुरुजी
मग? तुमची का जळते?
मग? तुमची का जळते?
4 Mar 2016 - 9:25 pm | तर्राट जोकर
याच्या अंगावर तर कायम लेदर जॅकेट्स असतात >> विवेक पटाईत आहेत दिल्लीत, जॅकेटबद्दल ते सांगू शकतील.
4 Mar 2016 - 9:28 pm | तर्राट जोकर
झालंच तर स्वामी संकेतानंदही आहेत.
4 Mar 2016 - 2:34 pm | नाना स्कॉच
आमचा प्रश्न अनुत्तरीतच राहिला की हो!
असो!.
4 Mar 2016 - 2:43 pm | चेक आणि मेट
शिल्पी तिवारी
4 Mar 2016 - 4:06 pm | नाना स्कॉच
नुसता आरोप केला म्हणून ट्विटर हैंडल डिलीट केले :O (कर नाही तर डर कश्याला ही म्हण आठवली. असो!)
बाकी त्यांच्या नियुक्तिबद्दल नवेच कळले
आभार
4 Mar 2016 - 3:03 pm | श्री गावसेना प्रमुख
सारखा error का येतोय,प्रतिक्रिया अर्धवट प्रकाशित होताहेत।
4 Mar 2016 - 11:39 pm | जानु
आता कन्हैयाच्या भाषणाने या खेळात मजा येणार. तो भाऊ आता कुठे मैदानात आलाय. आजपर्यंत त्याने अनिर्बंध पणे विचार व्यक्त केले असतील किंवा करणार्या लोकांकडे दुर्लक्ष केले आहे, त्यांची मदत केली आहे. मा. न्यायालयाने जे मुद्दे मांडले आहेत त्याबद्दल कोणाचेही दुमत नाही. तसे नसते तर आज अखेर त्याविरोधात आवाज आला असता. आता तो भाषणे आणि मुलाखती देत आहे. त्यात त्याला आपले म्हणणे मा. न्यायालयाच्या आदेशामुळे का होईना संसदीय भाषेत मांडावे लागेल. मुळात खरे तर सर्वसामान्यांचीही तिच अपेक्षा असते, पण डाव्यांना कोण समजावणार? (याचा व्यत्यास ही तितकाच खरा आहे.) कन्हैया जसे जसे त्याचे मुद्दे मांडणार त्यानुसार विरोधक त्यावर हल्ला करणार आणि तसे तसे त्यातील फोलपणा समोर येणार. कालच्या भाषणातील आणि एबीपी वरील मुलाखतीत काही मुद्दे जरी बरोबर असले तरी काही अगदीच कुचकामी आहेत. सरळ मोदींवर हल्ला करणे ही धोकादायक खेळी ठरण्याची शक्यता फार मोठी आहे असे मला वाटते. एक दोन दिवसात भगवी फौज मैदानात उतरल्यावर बघुया काय होते ते.
5 Mar 2016 - 12:15 am | अर्धवटराव
डाव्या बाजुने प्रतिकेजरीवाल उभा करणे हि भाजपाची गरज आहेच :)
5 Mar 2016 - 12:48 pm | श्रीगुरुजी
आता सिनिअर केजरीवाल चिंतेत पडले असतील. कारण सगळा प्रकाशझोत आता बाल-केजरीवालांवर गेलाय आणि हे अंधारात गेलेत. काहीतरी विचित्र मर्कट चाळे करून सिनिअर केजरीवाल परत प्रकाशझोतात येण्याचा प्रयत्न करतील. मोदींवर टीका करून स्वतः परिस्थितीचा बळी असल्याचा कांगावा करणे हा त्यांच्यासाठी पुन्हा एकदा प्रकाशझोतात येण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.
5 Mar 2016 - 12:57 pm | श्री गावसेना प्रमुख
केला ना ,पत्रिका समूहाच्या कार्यक्रमात केजरीवाल म्हणाला मोदी तुम्हाला सबसिडी सोडायला लावून अंबानीच्या घशात घालतो म्हणे,मीच एक मर्द ज्याने त्याच्यावर केस केली,आणि त्या मोदिनें acb काढून घेऊन केस कमजोर केली।
5 Mar 2016 - 12:26 am | तर्राट जोकर
आता डावे विरूद्ध उजवे असा सरळ सामना होणार असल्याने तर्राट जनतेने सुटकेचा निश्वास टाकला आहे. आता प्रत्येकाला देशभक्त-देशद्रोही असले सर्टीफिकेट देणे, ज्यात-त्त्यात सीमेवरच्या सैनिकांना ओढुन घेणे, ह्या दोन पार्टींच्या अधेमधे नसलेल्या नागरिकांना दोघांपैकी एकाची बाजू घ्यायला भाग पाडणे बंद होईल ह्याचा जास्त आनंद आहे.
बनिया-ब्राह्मण पार्टी, दलित-पिछडा पार्टी, किसान-मजदूर पार्टी, ह्या आपआपसात लढो, गोंधळ घालो. ह्यांच्या लढाया ह्या जनसामान्यांसाठी नाहीत हे तर निश्चित होईल.
अपुन मस्त मचली फ्राय करके देसी का खंबा लाके धुत्त रय्गा भाय! थोडा भांग-धत्तुरा मारनेका बिचमें.
पर कसमसें, राजनीतीका नशा सबसे गहरा.
-तर्राट जोकर.
5 Mar 2016 - 12:51 pm | श्रीगुरुजी
मोदींवर ते फॅसिस्ट आहेत, सर्वत्र भगवेकरण सुरू आहे, ते संघाच्या आदेशाखाली काम करतात, इ. इ. जातीय टीका सुरु झाली की अंतिमतः ती मोदींनाच फायदेशीर ठरते. कन्हैय्याकुमारने नेमक्या याच मुद्द्यांवर टीका सुरू केली आहे.
5 Mar 2016 - 5:56 pm | अभ्या..
अर्रर्रर्र. अशी गेम हाय व्हय.
हरकत नाही. ये भी सही.