तू गेलास... बरं झालं. आणि लवकर गेलास ते आणखीन बरं झालं.
नाही तरी रात्री पिऊन पडायचास.....काय उपयोग होता तुझा? लग्नानंतर तुझं पिणं कमी होईल या आशेनं आई-वडीलांनी मला घरात आणलं. पण आधी बाहेर पिणारा तू , घरीच बाटली घेऊन बसायला लागलास, का तर म्हणे चखण्याचा खर्च कमी होतो.
मुलं तुला घाबरायची पण एकदाच मी, तुझी पोलीसात तक्रार करुन, इन्स्पेक्टर बोक्यांना घरी बोलावलं. त्यांनी तुला असा काही झोडला आणि म्हणाले ‘फोकलीच्या, पोराबाळांवर आणि बायकोवर हात टाकशिल तर गोमूत्र पाजीन !’ तेंव्हापासनं तू फक्त शून्यात नजर लावून प्यायला लागलास.
कधेमधे स्वत:चं समर्थन करायला, `दारु औषधी असते, हृदयविकार दूर ठेवते' वगैरे सांगायचास. पण त्यावर तुला , ‘मग मी करु का सुरु ?’ विचारल्यावर तुझं बंद झालं....दारु पिणं नाही, स्वत:ला जस्टीफाय करणं.
कधीकधी तू सोडायचास सुद्धा. पण तुला किकची सवय लागल्यानं, ‘हल्ली लाईफमधे काही मजा येत नाही’ म्हणून पुन्हा सुरु करायचास.
तू गेल्यावर युएसमधल्या अदिती वन्सं, इतक्या वर्षांनी, वेळात वेळ काढून आल्या आणि आई-बाबांच्या गळ्यात पडून रडायला लागल्या. मी म्हटलं, ‘ मुलांना मी कसंही सांभाळीन पण यांची मला काळजी वाटते, पुढचं सगळं आयुष्य काढायच’.... तशी म्हणाल्या, तुझं ही खरंच आहे. आणि त्यांनी त्या पावली जाऊन इतिश्रीमधे फ्लॅट घेतला... म्हणाल्या, `पुण्याच्या धोरणी बिल्डर्सनी, काळाची पावलं वेळीच ओळखून, आमच्यासारख्या एनारायंची कायमची सोय केलीये. हे दोघं तिथं इतर समवयस्कांबरोबर जीव रमवतील, त्यांची मेडिकल केअरपण चांगली आहे'.
कुठे बहिण आणि कुठे भाऊ ? तू आई-वडीलांची जवाबदारी माझ्यावर टाकून बिनधास्त लास व्हायचास आणि वन्संनी लास वेगासहून इथे येऊन त्यांची सोय केली....शिवाय तुझं हॉस्पिटलचं बीलही भरुन टाकलं. याला म्हणतात समानता, नाही तर फक्त वाटणीच्या वेळी येतात बहिणी.. आरटीजिएस झाल्याचं कन्फर्म करुन सह्या करायला.
मी बोलून गेले खरी, पण मुलांची काळजी मी तरी कशी घेणार होते ? शेवटी मनाचा हिय्या करुन `सेकंड इनींग्ज मॅरेज' ब्यूरोत गेले. तिथे तर रेग्युलर पेक्षाही जास्तच झुंबड होती. माझी नजर स्थिरावल्यावर, तिथे एक उमदा मध्यमवयीन, निराश बसलेला दिसला. त्याच्याशी थोडी नेत्रपल्लवी साधल्यावर त्याच्या चेहेर्यावरचे भाव बदलायला लागले.
तशी मी विचारलं ‘तुम्ही इकडे कसे?’
‘म्हणजे तुम्ही मला ओळखता?’ तो चकित.
‘सम-दु:ख हीच आपली ओळख नाही का?’ या माझ्या हजरजवाबीवर तो खलासच झाला.
‘माझी बायको मला सोडून गेली’ तो म्हणाला.
कोणत्या वेळी काय प्रश्न विचारावा हे बायकांना नेमकं कळतं. मी उगीच, तुमचे नक्की काय मतभेद होते? वगैरे भलत्या चवकशा न करता सरळ म्हटलं, ‘ आणि मुलं तुमच्यावर टाकून?’
त्यावर तो आणखीच खचला, ‘नाही हो, एकच मुलगा आहे पण ती निर्दयपणे त्याला घेऊन गेली....मला मुलांचा इतका लळा आहे पण आता आयुष्यात काही नाही... नुसती पोकळी ’.
‘मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे’ मी पटकन सांगितलं.....माझे मिस्टर अतिरेकी मद्यपानानं आम्हाला कायमचे सोडून गेले.
तोही बराच प्रॅक्टीकल असावा. किती घ्यायचे? लग्नापूर्वी लक्षात नाही का आलं? वगैरे वायफळ प्रश्न न विचारता तो सरळ म्हणाला, ‘आपण एकमेकांचा आधार होऊ शकतो’.
मुलांना नवे आणि चांगले बाबा मिळाले. आता त्याच्या प्रशस्त फ्लॅटमधे आम्ही चौघं मजेत राहातो. लग्नापूर्वी मी त्याचा फ्लॅट बघायला गेले होते. त्यानी मला त्याचा पर्सनल बार दाखवला आणि म्हणाला ‘तुला चालेलना मी कधेमधे घेतली तर ?’
मी म्हणाले ‘मी अनेक चुका अनेक वेळा करते पण एकच चूक पुन्हा करत नाही’
यावर तो सर्दच झाला... ‘म्हणजे ?’
‘म्हणजे मी सुद्धा तुला कंपनी देईन !'
त्यावर त्याच्या कपाळातच गेल्या, `त्यानं काय होईल?'
`मग मला लिमीटमधे ठेवायला...तुला कायम लिमीटमधे राहवं लागेल!’ मी म्हणाले.
माझ्या या वाक्यावर तर तो इतका फिदा आहे की आता मित्रांचे फोन आले तरी तो, `आज मला वेळ नाही म्हणून सांगतो' आणि मग आम्ही दोघंच बैठक जमवतो.
मुलं मला विचारतात, आई तू इतकी कशी बदललीस?’
त्यावर मी त्यांना सांगते, ‘बाळांनो, हे सगळं मी फक्त तुमच्यासाठी करतेय. तुमचे पहिले बाबा गेले, आता हे बाबा मात्र मला सांभाळायला पाहिजेत.
प्रतिक्रिया
10 Feb 2016 - 12:41 am | अभ्या..
ही मात्र लालभडक चेरी आईस्क्रीमवरची. अल्टीमेट
10 Feb 2016 - 1:04 am | डॉ सुहास म्हात्रे
मुलं मला विचारतात, आई तू इतकी कशी बदललीस?’
त्यावर मी त्यांना सांगते, ‘बाळांनो, हे सगळं मी फक्त तुमच्यासाठी करतेय. तुमचे पहिले बाबा गेले, आता हे बाबा मात्र मला सांभाळायला पाहिजेत.
विठाजी हे मस्तंय ! ते बा़कीचं सोडून असं काहीतरी लिहित जा.
10 Feb 2016 - 1:06 am | स्रुजा
आवडलं. सुखांत. बहिणीचा ट्रॅक पण आवडला आणि त्यावरचं भाष्य देखील.
10 Feb 2016 - 1:08 am | सही रे सई
एकदम अनपेक्षित अस पत्र आहे हे. शीर्षकावरून वाटल होत की दुख: भरित वर्णन असेल. पण हे तर भलतच समोर आल. माझ्या एका नातेवाईकाची अशीच काहीशी कथा आठवली.
10 Feb 2016 - 1:13 am | उगा काहितरीच
याला म्हणतात पॉझिटीव्ह ॲटिट्युड ! एकच परिस्थिती पण टोटली डिफरंट ॲप्रोच . विवेकभौ आवडलं .
10 Feb 2016 - 1:13 am | आदूबाळ
अरे काय!
हे कायच्या काय आहे!
10 Feb 2016 - 1:23 am | स्रुजा
हो ते थोडं मला ही झेपलं नाही पण आउटलाईन समजली.
हे आधी केलं असतं तर पहिला नवरा वाचला असता ;) पण, त्यांचा मुद्दा बहुदा लिमिट मध्ये केलं तर मद्यपान पण वाईट नाही असा असावा.
10 Feb 2016 - 12:09 pm | अनिरुद्ध.वैद्य
दोघही आऊट्ट व्हायला लागले तर मग मात्र कठीणे. क्युंकी शराब चीज ही ऐसी है!
10 Feb 2016 - 1:48 am | नंदन
'बाबा'च्या जागी 'आयडी' हा शब्द घालून वाक्य वाचलं. बेतहाशा आवडलं! ;)
10 Feb 2016 - 2:08 am | अगम्य
जे लिहिले आहे त्यापलीकडचे हे असे दिसायला संजयाची दृष्टी, नीर क्षीर विवेक, ह्याबरोबरच सागराची गंभीरता असावी लागते.
10 Feb 2016 - 4:37 am | स्रुजा
महा लोल..
10 Feb 2016 - 4:51 am | आदूबाळ
=))
आणि पंचवीस शब्दांत दोनदा सर्द झाला हे वाचून बाबाजींना सर्दीचा त्रास असावा अशीही 'पुसट' शंका आली.
10 Feb 2016 - 9:29 am | पैसा
=))
10 Feb 2016 - 9:05 am | पिलीयन रायडर
=))
10 Feb 2016 - 9:08 am | अजया
=))))
10 Feb 2016 - 9:27 am | पैसा
एपिक! नंदन दिलकश लिहितो हे मी बेशर्त कबूल करते!
10 Feb 2016 - 9:32 am | टिवटिव
षटकार
10 Feb 2016 - 11:09 am | मराठी कथालेखक
हा हा..
दुसर्या सदस्याला तिसर्या साईटवर त्याचा आयडी कसा ब्लॉक होवू शकतो याची समज देणार्यावर ही वेळ.. अरेरे...
असो.
बाकी हा धागा तसा ठीक जमलाय (दुसर्या धाग्यावरुन प्रेरित असला तरी)
10 Feb 2016 - 1:02 pm | बॅटमॅन
अगागागागा =)) =)) =))
10 Feb 2016 - 3:21 am | चेक आणि मेट
रात्रीस खेळ चाले.
.
.
.
या नावाची मालिका येणार हाय.असे सांगायचे होते.
10 Feb 2016 - 7:14 am | स्पा
विलक्षण , बेजोड
भिकार लेखण
10 Feb 2016 - 9:07 am | अजया
=))'संक्षी'प्त सार लिखाणाचे!
10 Feb 2016 - 3:09 pm | होबासराव
;)
10 Feb 2016 - 7:17 am | कंजूस
समजुतदारपणा दोघांचा.
10 Feb 2016 - 7:48 am | कैलासवासी सोन्याबापु
सकाळ सकाळ काढून वाचलेन! अधिक काय बोलणे...
10 Feb 2016 - 8:26 am | क्रेझी
भारी आहे :D
10 Feb 2016 - 8:39 am | के.पी.
छान,आवडलं :)
10 Feb 2016 - 8:43 am | प्रमोद देर्देकर
मस्त आवडलं. स्पांडुब्ब्बा का इतका कावलाय.
10 Feb 2016 - 9:57 am | नाखु
अपेक्षाभंग आणि मग उपेक्षाभंग म्हणून !!!!
अगदी मोहीनी वगैरे मासीकात शोभणारी तरीही मिपाच्या (तथाकथीत सोज्वळ) मानाने (बोल्ड पक्षी धाडसी) आहे काय अशी आमच्या मध्यमवर्गीय मनास शंका वाटुन राहीली. निराकरणास पंच्म्भो जॉर्ज समर्थ आहेतच.
वाचक नाखु
10 Feb 2016 - 8:50 am | प्राची अश्विनी
छान, आवडलं.
10 Feb 2016 - 9:04 am | पिलीयन रायडर
चांगलं लिहीलय!
10 Feb 2016 - 9:10 am | पगला गजोधर
;)
10 Feb 2016 - 9:26 am | पैसा
एवढे लोक संस्कृतीला बुडवायाला निघालेले बघून एक मिपाकर म्हणून शरम वैग्रे वाटली!
10 Feb 2016 - 9:35 am | अगम्य
आवडलं.
10 Feb 2016 - 9:52 am | अजया
गोमुत्राबद्दल विशेष ममत्व आहे का लेखकाला? नाही म्हणजे इतक्यात बर्याचदा उल्लेख आढळला ;)
10 Feb 2016 - 9:59 am | नाखु
"गाय"(guy) लाच विचारावे लागेल.
10 Feb 2016 - 10:05 am | स्पा
त्या गेलेल्या णवर्याच नाव " राजेश" होते काय विठाभाय
10 Feb 2016 - 10:10 am | पैसा
नाय नाय. ते वायले.
10 Feb 2016 - 10:10 am | मुक्त विहारि
वास्तविक सत्य असे आहे की, नवरा-बायको दोघेही दारू प्यायला लागले की ७० ते ८०% घरांची राखरांगोळी होते.
इत्यलम...
10 Feb 2016 - 10:25 am | अगम्य
राम आणि सीता "मैरेय" का कसलसं मद्य पीत असत असे ऐकले आहे. खरे-खोटे इथल्या दिग्गजांना अधिक माहित असेल.
10 Feb 2016 - 10:46 am | मुक्त विहारि
रामाने रावणाचा वध केला आणि सीतेने नवर्याबरोबर वनवास पत्करला, हे गूण बघायचे की, .....
त्यांच्या इतर गोष्टी?
असो,
माणसांमधले गूणच आम्हाला जास्त भावतात.....
10 Feb 2016 - 11:49 am | अगम्य
राम आणि सीता ह्यांना प्रत्येक जण आपापल्या मतानुसार ७० ते ८०% मध्ये किंवा उरलेल्या ३० ते २०% मध्ये टाकेल. त्यातही मतभेद आलेच.
10 Feb 2016 - 10:27 am | नीलमोहर
'मग मी करु का सुरु ?’
=))
10 Feb 2016 - 10:30 am | मदनबाण
पिण्याबद्धल बायकोची पहिल्यांदा बेशर्त स्वीकॄती नव्हती, पण पहिला बाब्या ढगात गेल्यावर बाबीने "प्राक्टिकल" अॅप्रोच घेतला. तसेही संक्षि प्राक्टिकलच लिहतात म्हणे...
`मग मला लिमीटमधे ठेवायला...तुला कायम लिमीटमधे राहवं लागेल!’ मी म्हणाले.
तालिया... तालिया... तालिया. ;)
‘बाळांनो, हे सगळं मी फक्त तुमच्यासाठी करतेय. तुमचे पहिले बाबा गेले, आता हे बाबा मात्र मला सांभाळायला पाहिजेत.
नंदन आधीच सिक्सर मारुन गेला आहे ! ;)
आजची स्वाक्षरी :- FIIs pull out $2 bn this year, highest since 2008
10 Feb 2016 - 10:42 am | मारवा
हा लेख वास्तविक असुन सत्य घटने वर आधारीत आहे. या कथेतील पात्रांचे जिवीत वा मृत व्यक्तींशी साम्य
न आढळल्यास
न न न न न आढळल्यास
तो निव्वळ योगायोग वा भ्रम समजावा.
मिसळपाव एक रंगमच है बाबु मोशाय
हम सब रंगमंच की कठपुतलीया है.
कब कैसे किसकी डोर कट जाएगी
ये कोई नही जानता
आनंद मरा नही आनंद मरा नही करते
हा हा हा
हा हा हा
हा हा हा
10 Feb 2016 - 10:48 am | साती
एवढं सगळं छान छान चालू असताना पत्र लिहायला तरी पहिला नवरा का आठवला म्हणते मी?
एनी प्रॉब्लेम विथ द सेकंड गाय?
10 Feb 2016 - 10:54 am | मदनबाण
एनी प्रॉब्लेम विथ द सेकंड गाय?
बैल, बैल ,बैल.
आजची स्वाक्षरी :- FIIs pull out $2 bn this year, highest since 2008
10 Feb 2016 - 10:54 am | स्पा
तोही बैल निघाला
10 Feb 2016 - 11:15 am | अन्नू
नाही ओ बिच्चारा गाय आहे! ;)
बघा ना काय लिहिलंय ते-
"एनी प्रॉब्लेम विथ द सेकंड गाय?"
10 Feb 2016 - 11:18 am | अजया
Guy वासरु नका विसरु.
10 Feb 2016 - 1:28 pm | बोका-ए-आझम
वेगळा विदर्भ झालाच पाहिजे
- बबन - ए - आझम
10 Feb 2016 - 1:29 pm | _मनश्री_
वेगळा बबन झालाच पाहिजे
विदर्भ....
10 Feb 2016 - 11:04 am | _मनश्री_
नाही आवडलं
अनलिमिटेड असो वा लिमिटेड पण दारू प्यायचीच कशाला ?
दारू म्हणजे काय ऑक्सिजन आहे का ? ज्याच्याशिवाय माणूस जगूच शकत नाही
बायकोला लिमिट मधे ठेवायला नवरा लिमीट मधे राहणार हे लॉजिक अजिबात पटले नाही
आणि नवरा बायको दोघही लिमिटच्या बाहेर गेले तर पोरांनी काय करायचं
आई आणि बाप दोघंही अनलिमिटेड ढोसून खपले तर पोरांनी अनाथ होऊन रस्त्यावर भीक मागायची का ?
का आई बापांना लिमिट मधे ठेवायला पोरांनी पण ग्लास घ्यायचा हातात
कारण मग मुलांना लिमिट मधे ठेवायला आई बापांना लिमिट मधे रहावच लागेल
मस्तच बैठक जमेल
10 Feb 2016 - 11:56 am | अभ्या..
एवढा बोल्ड प्रतिसाद,
. बी नॉर्मल यार
10 Feb 2016 - 1:29 pm | बोका-ए-आझम
ते पितात म्हणजे नक्कीच सज्ञान असावेत. सोडून द्या.
10 Feb 2016 - 4:37 pm | अभ्या..
हेहेहेहेहेहे. आपला पिण्याविषयी एक मिलीचा पण आक्षेप नैय्ये.
सगळा प्रतिसाद बोल्ड फाँटात लिहीलाय. शाई किती वाया जातीय. काय हाय का नाय राष्ट्राचा इचार. आँ...
10 Feb 2016 - 11:06 am | मन१
:)
10 Feb 2016 - 11:48 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लिमिट मधे राहून बाबांनी सांभाळायला हवं.
-दिलीप बिरुटे
मी नेहमीच म्हणतो
10 Feb 2016 - 12:04 pm | विवेक ठाकूर
प्रथम मूळ कल्पनेबद्दल धुरंधारांच्या सरांचे आभार ! सर्व प्रतिसादकांना धन्यवाद आणि हा उपसंहार :
__________________
एकदा माझ्या सवतीला पण हळदी कुंकवाला बोलावणारे...एकदम डोहाळे जेवणाला ती काही येणार नाही. म्हणजे तिला कळेल की माहेर तालेवार आहे आणि नोकरी आहे म्हणून, ऊठली की निघाली, असा संसार होत नाही. आणि एकदा कडेलोट केला की पुन्हा माघारी येता येत नाही. तिला ओटी भरतांना सांगणारे, मुक्तीवादे, मुक्ती म्हणजे विभक्ती नाही. असल्या विचारनं विमुक्त आणि भटकी होशिल. संगतीनं उपभोगलेलं स्वातंत्र्य हीच खरी मुक्ती.
आणि तुझा नसला तरी माझा पुनर्जन्मावर विश्वास आहे. या आयुष्यात केलेलं फेडायला, तुला पुन्हा यावं लागेल. पण येशील तेंव्हा आमच्या सुखी संसारात, माझ्या पोटी ये. म्हणजे तुला `लिमिटमधे राहून किती मजा करता येते ते बालपणापासूनच कळेल. नवर्यानं बायकोशी कसं वागावं आणि असा नवरा असला की बायको कशी साथ देते हे तू बघशिल.
मग कधी मिपावर आलास तर म्हणशिल :
`डिबी, ड्रींक्सचं प्रमाण किती असावं?.... वेगास नियंत्रण दिलं की लास न होता क्लास जगता येतं. आणि एकदम आकाशात न जाता, जमीनीवर राहून पण तरंगता येतं.'
10 Feb 2016 - 1:36 pm | पिलीयन रायडर
आँ?? टोटल लागेना. सवत म्हणजे कोण? दारु? तालेवार माहेर आणि नोकरी कुठुन आली? मुक्ती? कुणाची? कशापासुन?
सर, समजावुन सांगा ना!
(ढ विद्यार्थिनी) पिरा
10 Feb 2016 - 1:52 pm | अगम्य
त्यांच्या लेखातल्या वरील वाक्याचा तो विस्तार आहे. सवत म्हण्जे नवविधवेच्या दुसऱ्या नवऱ्याला सोडून गेलेली त्याची पहिली बायको. (स्वगत) आता पॉपकॉर्न घेऊन येतो.
10 Feb 2016 - 3:00 pm | पिलीयन रायडर
ओके.. हे लॉजिकल वाटतय..
पण मग केवळ "माझी बायको मला सोडुन गेली" ह्या एका वाक्यावर विठांनी एवढी कल्पना भरारी मारली.. मुक्तीवादी काय.. भटकी काय... सॉल्लीडच हां!!
नवर्याला सोडुन गेलेली बाई म्हणजे स्त्री मुक्ती संघटनेची भटकी बयाच असणार.. प्रश्नच नाही...!
10 Feb 2016 - 2:37 pm | तुषार काळभोर
सवत्=दुसर्याची पहिली बायको
तालेवार माहेर=दुसर्याच्या तिसरीच्या पहिलीच्या (पहिल्या एकुलत्या)बापाचं घर
नोकरी= पहिल्याच्या दुसर्याच्या दुसरीचं पहिलीचं उपजीविकेचं साधन
10 Feb 2016 - 2:45 pm | अन्नू
कैच कळलं नै.
10 Feb 2016 - 3:23 pm | _मनश्री_
कशाला बोलावणार आहे ,टेंभा मिरवायला का ?
आणि माहेर तालेवार असलं आणि नोकरी असली कि बाई लगेच नवऱ्याला सोडून देते कारण ती स्त्री मुक्तीने पछाडलेली एक भटकी असते
आणि नवऱ्याला सोडण हे एवढ महान पाप आहे कि एका जन्मात त्याची फेड होत नाही म्हणून पुनर्जन्म घ्यावा लागतो
वा वा !!!! काय महान निष्कर्ष आहेत
`लिमिटमधे राहून किती मजा करता येते ' ह्याच ट्रेनिंग बालपणा पासूनच देणार का ?
10 Feb 2016 - 2:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
`डिबी, ड्रींक्सचं प्रमाण किती असावं?.... वेगास नियंत्रण दिलं की लास न होता क्लास जगता येतं. आणि एकदम आकाशात न जाता, जमीनीवर राहून पण तरंगता येतं.'
_/\_
-दिलीप बिरुटे
11 Feb 2016 - 3:37 am | यशोधरा
अरे काय आहे हे! कसले भन्नाट प्रतिसाद! हहपुवा! =))
नंदनचा प्रतिसाद म्हंजे महान आहे!!!
11 Feb 2016 - 11:18 am | विवेक ठाकूर
नायिका तिच्या नव्या पतीबरोबर खुष आहे आणि आपल्या सवतीला (दुसर्या नवर्याच्या पहिल्या पत्नीला) आपल्या आनंदात सहभागी होण्यासाठी हळदी कुंकवाला बोलवत आहे. तिला पुनर्विवाहातून दिवस जाऊन डोहाळे लागण्याची सुद्धा शक्यता आहे, पण सवतीला एकदम डोहाळे जेवणाचं निमंत्रण देणं कितपत रुचेल याबद्दल ती साशंक आहे.
अर्थात, स्रीयांच्या ममत्वाला तोड नसते. नायिकेला आपल्या गत पतीनं, आपल्याच घरात जन्म घ्यावा म्हणजे त्याला या जन्मी तरी सुख मिळेल, अशी इच्छा आहे. त्याचा दुसरा फायदा असा की त्याला बालवयातच लिमिटचं महत्त्व कळेल आणि त्याचं आयुष्य मजेत जाईल.