मिळता नजरेस नजर
गोड्शी लाजलिस तु
पुन्हा भेट झाली
मधाळशी हसलिस तु,
विचारता नाव तुझे
किति बावरलीस तु
नावाने मारता हाक
किति खुललीस तु
चुंबिता अधर तुझे
पाकळी झालिस तु
घेता मिठित तुजला
रतिरुप झालीस तु
शब्द माझे होते
कविता झालिस तु
शब्द संपले होते,
मौनातुन संवाद्शी तु
पुर्णत्व आले पौरुषत्वाला
जशी अर्धांगीनि झालिस तु
@Avinash
प्रतिक्रिया
6 Jan 2009 - 1:15 am | संदीप चित्रे
आवडली...
>> विचारता नाव तुझे
किति बावरलीस तु
नावाने मारता हाक
किति खुललीस तु
>>
ह्या ओळी खूपच आवडल्या.
एक सूचना / प्रश्नः 'किति', 'तु', 'झालिस', 'मौनातुन' इ. र्हस्व / दीर्धाच्या चुका नजरचुकीने आहेत की वृत्त्तात बित्तात बसवण्यासाठी ?
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
6 Jan 2009 - 2:50 am | मीनल
मस्त आहे.
प्रत्येक सोज्वळ/सुसंस्कृत स्त्री चे वर्णन वाचायला मिळाले.
संपूर्ण कवितेतच सोज्वळता आहे.
कुठेही ती चावट/आंबट शौक पुरवणारी नाही.
तेच छान वाटलं.
तुमच्या कविता अतिशय साध्या,सोप्या तरीही भावपूर्ण, अर्थपूर्ण असतात.ग्रेट!
मीनल.
6 Jan 2009 - 7:51 am | शितल
मीनलताईंच्या प्रतिक्रीयेशी सहमत. :)
6 Jan 2009 - 4:32 am | धनंजय
साधी आणि प्रामाणिक कविता आवडली.
"चुंबिता ओठ तुझे" ऐवजी "ओठांचा मुका घेता"
"घेता मिठित तुजला" ऐवजी "घेता मिठीत तुला"
"मौनात संवाद्शी तु" ऐवजी "मौनात बोलतेस तू"
असे बरे वाटते का?
**साध्या पण गहिर्या कवितेच्या शेवटी संस्कृतप्रचुर मोठे-तत्त्वज्ञानातले-शब्द असलेले शेवटचे कडवे रुचले नाही. **