१. फार पुर्वी सह्याद्री वाहिनीवर रात्री एक नाटक लागले होते. त्यात नीना कुलकर्णी आईच्या भुमीकेत होत्या. त्यात या आईच्या व्यक्तिरेखेचा आपल्या अंध मुलावरील प्रेमापोटी आंधळे होऊन व अती सुरक्षीत ठेवण्यासाठी त्याला त्याची स्पेस न देणे असा काहीसा प्लॉट होता.
हे नाटक कोणते आहे? कुठे मिळेल?
२. हे आत्ता आठवण्याचे कारण म्हणजे काही दिवसांपुर्वी सह्याद्री वाहिनीवर असेच एक नाटक लागले होते. तुषार दळवी आणि किशोरी शहाणे होते त्यात. एका लाडावलेल्या आणि उद्धट व्यक्तीची स्मॄती गेल्यानंतर त्याला नवे आयुष्य मिळते, जुने लोक त्याला खुप आठवुन द्यायचा प्रयत्न करतात, अनेक अनोळखी कुटुंब त्याच्यावर संपत्तीच्या लालसेपोटी हक्क सांगायला येतात व शेवटी एका अनाथ लहान मुलासोबत तो जातो असे कथानक आहे.
हे नाटक कोणते? आणखी माहिती कुठे मिळेल?
३. सह्याद्री वाहिनीवर हे असे रात्री उशीरा पर्यंत चालणारे नाटकं कधी लागतात? डीडीसह्याद्री.ईन वर काही मिळाले नाही, किंवा मीच नीट बघितले नसेल. ते पहिले नीना कुलकर्णी वाले नाटक रात्री १:३० पर्यंत चालले होते.
या दोन्ही नाटकांचे कथानक, अभिनय आणि ईतर गोष्टी खुपच चांगल्या होत्या.
सह्याद्रीवरील या नाटकांच्या कार्यक्रमाचे याचे वेळापत्रक आणि ही सगळी जुनी नाटकं कुठे मिळेतील?
धन्यवाद.
प्रतिक्रिया
27 Jan 2016 - 3:43 pm | पैसा
माहित नाही बुवा. दूरदर्शनच्या साईटवर काही माहिती नाही का?
27 Jan 2016 - 11:08 pm | अभिनव
http://ddsahyadri.in/ वर बघितले पण तिथे काही नाहीये.
27 Jan 2016 - 3:47 pm | कंजूस
तोच प्रॅाब्लेम आहे ना.कोणता कार्यक्रम लावायचा ते त्यांनाच अर्धातास अगोदर दिल्लीच्या प्रसारभारतीकडून कळते.दुपारी अकरा बाराचा सह्याद्रीच्या पाऊलखुणामध्ये काही अफलातून चित्रफिती दाखवतात.उदा० कुमार गंधर्व ,भिमसेनांचे तीस वर्षांपूर्वींचे रेकॅार्डिंग्ज.
27 Jan 2016 - 4:32 pm | आदूबाळ
हायला - हे कुठे जालावर आहे का?
28 Jan 2016 - 6:40 pm | कंजूस
नाही हो. सुधिर फडके,सुरेश भट यांच्याही रेकार्डही ऐकल्या आहेत.
27 Jan 2016 - 11:41 pm | निनाद मुक्काम प...
लहानपणा पासून मराठी दूरदर्शन ची मराठी नाटके खूप आवडायची
नुकतेच ज्वालामुखी नाटक तू नळीवर सापडले
सीमा देशमुख सह राजन भिसेने ने मस्त काम केले आहे.
27 Jan 2016 - 11:49 pm | निनाद मुक्काम प...
लीना भागवत व प्रदीप वेलणकर चे स्पर्श सुद्धा असेच सुंदर नाटक आहे.
28 Jan 2016 - 6:32 pm | सिरुसेरि
सह्याद्री वाहिनीवर पुर्वी मिश्किली , गजरा , द्विधाता , चाळवाचाळव , श्वेतांबरा हे कार्यक्रम खुप गाजले होते . श्री. आनंद भाटे यांनी लहानपणी गायलेल्या नाट्यगीतांचाही एक कार्यक्रम प्रसारीत झाला होता .