अडगळीची खोली

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
7 Jan 2016 - 2:26 pm

कोंकणांतले एक लहान गाव
इरावती जोशी
पती सदाशिव जोशी.
कार्तिक व गणेश २ पाठची मुले.
मोठा कार्तिक वय ७ धाकटा गणेश ६ वर्षाचा..

४ एकर शेती..
मोठी वाडी.. मोठे जुन्या पद्धतीचे घर
पुढे अंगण ..तुळशी वृंदावन..
मागे पसरदार..उंबराचे झाड ..
राहत्या वाड्यात ६ खोल्या पण होत्या पूर्वी भाडेकरू राहतं असत..पण सदाने कारभार हाती घेतला अन भाडेकरू न ठेवण्याचा निर्णय घेतला..
नकोच ते भाडेकरू..भाड्यावरून ताणतणाव..लाइट बिल आदी...
सदाशिव गावातल्या शाळेत शिक्षक होता..
साधे संथ सरळ आयुष्य
.
कार्तिक खूपं शांत व आज्ञाधारक मुलगा..मात्र गणेश खूपं खोडकर..रोज शाळेतून तक्रारी..दादा ची हि वस्तू लपव.त्याला झोपताना लाथा मार..आई स्वयंपाक करत असताना तिथे तडमड अन त्रास दे..
एक ना अनेक खोड्या आईला वैताग आणत असायच्या..
मात्र कार्तिक व गणू चा एकमेकावर खुपा जीव असायचा..आई गणुला बोलली तरी कार्तिक त्याची बाजू घेत असे..त्याचे दोष आपल्या शिरी घेत असे..एकमेकांना नसे करमत एकमेकाशिवाय..
वाड्यात परसा च्या परिसरात एक अडगळीची खोली होती..
जुने फर्निचर..मोठी ठेवणीतली भांडी..सतरंज्या..जाजमे व अन्य अडगळीत गेलेल्या वस्तू तिथे ठेवल्या होत्या..खोलीत अंधार.. एक खिडकी ति पण बंद असायची..ति खोली वर्षानु वर्षे उघडण्याची वेळ आलेली नव्हती..
गणेश नी जास्त त्रास दिला की इरा त्याला दम द्यायची..गणू..बघ हं..वात्रट पणा थांबवला नाहीस तर त्या खोलीत डांबून ठेवीन...तिथे आत एक बागुल बुवा आहे..मग बघ....
गणेश मात्र हसायचा..त्यावर कार्तिक म्हणायचा..आई आपला गणू भारी आहे..बागुल बुवा च गणुला घाबरून पळून जाईल...
या वर मात्र इरा हसायची...
.
बाळ सिधये ..म्हणजे इराचा भाऊ..बाजूंच्याच गावत रहात असायचा...
तो ईराच्या गावात कामानिम्मित आला असलेल्याने बहिणीला भेटायला आलेला होता...
मामा आलेला समजताच कार्तिक धावत बाहेर आला व मामाच्या गळात पडला..."मामा मामा मला घेऊन चल ना ..मला छकु शी खेळायचाय अन मला २ दिवस सुट्टी पण आहे"
अरे ..ये,ना..मी सोडेन तुला २ दिवसांनी..पण आई हो म्हणाली तरच हं"...
कार्तिक ने आई कडे पाहिले व म्हणाली..जा ना पण नीट वागायचे..मामीला त्रास द्यायचा नाही...
कार्तिक शहाणा अन शांत मुलगा आहे..मात्र तुझा गणू वांड आहे..अग मागच्या वेळेला हा पठ्ठा विहिरींच्या काठावर उभा राहून आतले पाणी पाहत होता.. मी पाहिले अन काळजात धस्स झाले..पण प्रसंगावधान राखले अन गपचिप मागून जाऊन त्याला खाली उतरवले..पडला असता तोल जाऊन तर केव्हढ्यात पडले असते" मामा सांगत होता....
कार्तिक ला घेऊन मामा गावी निघाला....
.
गणेश बाहेरुन आला अन कार्तिक मामा कडे आपल्याला चुकवून गेला ते त्याला कळले..
तो जरा घुश्शातच होता..
पण बोलला नाही..
.
वेळ दुपारची होती..
इरा जरा लवंडली होती आतल्या खोलीत
एक तर मामाने आपल्याला नेले नाही म्हणून गणू नाराज होता..
तो स्वयंपाक गृहात गेला..काहीतरी शोधत असताना त्याचा हात लागला व भांडी धडधडा त खाली पाडली..व मोठा आवाज झाला बावचळलेला गणू घाबरला व त्याचा हात तेलाच्या बरणीला लागला व सारे तेल जमिनीवर सांडले...
आवाज ऐकताच इरा जागी झाली व स्वयंपाक गृहात आली...तो पसारा पाहताच ति गणुला पकडायला गेली अन तेलावरून तिचा पाय घसरला..मात्र जवळ कपाट असल्याने तिने दाराला धरले नाहीतर ति जोरात आपटलीच असती..
वैतागलेली व चिडलेल्या इरा ने गणूस पकडले व एक धपाटा घातला व हात ओढत त्याला अडगळीच्या खोली समोर आणले.." तू असा ऐकायचा नाही..थांब तुला त्या बाबा जी च्या खोलीत डांबते"..असे म्हणत तिने गणुला आत ढकलले व कडी लावली /लावत असतानाच..
इरा इरा अश्या घाब~या स्वरात बाजूंच्या राधाक्का तिला हाक मारत असल्याचे ऐकू आले
ति ओसरीवर आली..राधाक्का भारी तोंडाळ बाई...बाजूंच्या वाडीत चोर घुसले व मारहाण करत दरोडा घातल्याची बातमी राधाक्का सांगत होत्या
१० मिनिटे झाली तरी त्यांचे च-हाट संपेना..शेवटी इरा म्हणाली" राधाक्का मी उद्या येते तुमच्या घरी मग निवांत बोलू"
बोलू ग.. मला तरी मेलीला कुठे वेळ आहे? चार घरी बातमी सांगायची आहे व सावध करायचे आहे..अन हे काय मुले दिसत नाहीत??
मुले म्हणताच इराला गणुला कोंडल्याचे आठवले व ति राधाक्काचा निरोप घेत परस दारी आली तिने कडी काढली..व आत गेली..खोलीत अंधार होता..बंद असल्याने खोलीत कुबट वास येत होता..
तिने आजू बाजूला पाहिले..तर गणेश जमिनीवर निपचीत पडलेला दिसला..बहुदा खोलीत शुद्ध हवा नसल्याने गणुचा श्वास कोंडलेला असावा..
तिने गणुला उचलले व बाहेर आली..गणू बोलेना..हालेना.
तिने ओळखले ..गणुची प्राणज्योत अनंतात विलीन झाली होती..
इरा घाबरली..अजाणतेपणाने आपल्या हातून हे काय झाले या विचाराने तिचा श्वास जोरात चालू लागला..
सदाशिवाला बोलावले तो आला इराने त्याला सांगितले..
पत्नीच्या हातून विपरित घडले याचा ताण त्याच्या मनावर आला..सारेच चमत्कारिक झाले होते..व त्याचा पण प्राण त्या धक्क्याने गेला.
सदाशिव जमिनीवर कोसळला..
मामा व कार्तिक आला..
ति भावाला सांगत होती.." अरे गणू अडगळीच्या खोलीत लपून बसला..आतन कडी लावली व त्याचा
श्वास गुदमरला....आणी हे सारे पाहून हे पण धक्क्याने गेले...
इराला माहीत होते..आपण खोटे बोलत आहे..
मामाने सारे सांभाळले..

गणुच्या अपघाती मृत्यू नंतर इराने अडगळीची खोली मोठे कुलूप लावून बंद केली व एक्स आकाराच्या ए लाकडी पट्ट्या चौकटी वर ठोकल्या..
.

पति व पुत्राच्या अपघाती निधनाने इरा पार खचली..
एक तर आपल्या चुकीचा भार तिच्या मनावर होता..त्यांतून ति पापभीरू स्त्री त्या खोट्याचा भार सहन करू शकत नव्हती..
काही वेळा इरा रात्रीची दचकून उठायची..शरीर घामाने ओलेचिंब झालेले असायचे..तिला हा पापाचा भार सहन करणे कठिण जात होते..
मनात जीवानं संपवण्याचा विचार तिच्या मनात बळावत असे.पण कार्तिक कडे पाहिले की ति मनाला आवर घालत असे..
.
काळ हे अनेक जखमांवर उत्तम औषध आहे..
काळ पुढे सरकत होता..
कार्तिक मोठा होत होता..
जखमा ब~यापैकी भरत आलेल्या होत्या..
कार्तिक बुद्धिमान मुलगा होता..
मात्र एकदा १० वित असताना त्याने आईला विचारले.."आई अडगळीच्या खोलीची कडी आटून गणून बंद केली होती तर मग दार उघडले कसे??
या प्रश्नावर इरा गडबडली..व म्हणाली "अरे जुनी दारे पुढेमागे जोरात धक्के दिले अन उघडली
व पुढे म्हणाली कार्तिक हा विषय परत काढायचा नाही मला फार त्रास होतो.." समजले?
कार्तिक हो म्हणाला खरा पण त्याच्या मनात अनेक शंका होत्या..प्रकरण फक्त आईलाच माहीत होते व त्याचा उलगडा तिच करणार होती..पण आईशी वाद घालायची हिंमत कार्तिक मध्ये नव्हती..
.
गानू गेल्यानंतर बाजूच्या चिन्मय शी कार्तिक ची दोस्ती जमली दोघेही एकाच वर्गात होते..
चिनु कार्तिक चा पक्का मित्र होता..
.
कार्तिक पुण्याला इंजिनीअरिंग चे शिक्षण घेण्या साठी गेला..
जाताना चिनु ला आईची काळजी घेण्यास सांगितले.
.
इंजिनिअर झाला कार्तिक अन त्याला लगेच एक चांगली नोकरी मिळाली..नोकरी करत असतानाच त्याला अमेरिकेत नोकरी करण्याची संधी मिळाली.
कार्तिक २ मनांत होता ..आई वृद्ध..एकटी..जावे की नाही ? मात्र संधी खूप छान होती..
गावाला आला कार्तिक आईशी चर्चा करण्यासाठी...
आई चिन्या व कार्तिक बोलत होते..
इरा म्हणाली "संधी सोडू नको..मला येणं शक्य नाही घर शेत सारी जोखमीची कामे आहेत..शिवाय चिन्या असतोच येऊन जाऊन..माझी काळजी सोड..यशस्वी हो..नाव काढ.."

चिनू पण म्हणाला "काकूची जबाबदारी माझ्यावर.शिवाय आता फोन स्कायपी आहेच आपण कायम संपर्कात असूच..."हे ऐकल्यावर कार्तिक ला बरे वाटले.
.
कार्तिक अमेरिकेस गेला..
अमेरिका त्याला आवडली..काम व पैसा पण मनासारखा होता..
कधी कधी मनात येई इथेच स्थायिक व्हावे..पण घर शेत आईचा विचार येताच तो काळजीत पडे..
.
"आई खूप आजारी आहे " चिन्याचा फोन आला..
तू तिला बेस्ट हॉस्पिटल मध्ये ठेव पैशाची काळजी नको करूस..मी पहिल्या फ्लाईट ने येत आहे..कार्तिक म्हणाला.
.
कार्तिक आला अन त्याने ते दृश्य पाहिले..आईला पांढ-या कपड्यात गुंढाळले होते..चिनु उदास चेहे-याने बसलेला होता..
चिनुने सारा वृत्तांत त्याला दिला."नाही वाचवू शकले डॉक्टर" चिनु म्हणाला.
.
स्मशान कार्ये उरकल्या नंतर कार्तिक व चिनु बोलत बसले होते..
कार्तिक म्हणाला.."चिन्या काय नेमके करावे ते कळत नाही..अमेरिकेत राहावे की गावात परत यावे की शेती व घर विकावे? अमेरिकेत राहिलो तर घर शेती कोण बघणार याची चिंता...."
तू अमेरिकेत जा ..राहिला प्रश्न शेती व घराचा.त्याची काळजी मी घेईन..विकायचा विचार मनातून काढून टाक.निदान सद्ध्या तरी.." चिनु म्हणाला.
कार्तिक विचार करत होता..ठीक आहे मला एक दिवस दे..मी पण विचार करतो..उद्या बोलू..
उद्या तर तू जाणार आहेस ना? गाडी पण बुक केली आहे..चिनू..
कार्तिक काहीच बोलला नाही.
.
चिनू गेला..दुपारचे १२ वाजून गेले होते..भूक लागली नव्हती..
कार्तिक आईच्या खोलीत गेला देवघर काही पोथ्या होत्या..व जवळच एक बॉक्स होता..
त्याने बॉक्स उघडला आत त्याचा व गणुचा लहानपणाचा फोटो होता व एक किल्ली..
गणुचा फोटो बघताच त्याला भडभडून आले..बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या अन गणुचा अपघाती मृत्यू पण आठवला.
तो किल्ली घेऊन तडक अडगळीच्या खोलीकडे आला..
जीर्ण झालेल्या लाकडी पट्ट्या त्याने उचकटल्या व कुलूप उघडले..खोलीत अंधार..कुबट वास..त्याने बाजूची खिडकी उघडली..आत जाजमे मोठी भांडी होती...
तेव्हढ्या त्याला लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आला..आवाजाच्या दिशेने तो गेला..
मोडक्या खुर्ची वर बसलेला एक लहान मुलगा रडत असल्याचे त्याला दिसले..
"कोण आहेस तू? अन इथे काय करत आहे??"
"दादा मला नाही ओळखले मी गणु..बघ ना आईनं मला इथं कोंडल आहे...ति आकृती म्हणाली..
अरे पण तूच या खोलीत लपला होता ना आपण हून>??कार्तिक म्हणाला..
"नाही रे दादा..मी दंगा करतो म्हणून आईने कोंडले..व बाहेरुन कडी लावली तिने..दादा मला बाहेर काढ ना मला श्वास घेता येत नाही इथे...आईला सांग ना मी शहाण्या सारखा वागेन म्हणून...अन हळूहळू ति आकृती अदृश्य झाली.
कार्तिक चक्रावला होता... शरीर घामाने भिजले होते...
बरेच वर्ष सतावत असलेल्या प्रश्नच उत्तर त्याला मिळाल होत...
.
तो आईच्या खोलीत आला..
आईच्या फोटोवत डोके टेकवत तो रडत म्हणाला.."आई असे का केलं?असे कसे झाले तुझ्या हातून.."
.
कार्तिक...चिन्मयच्या हाकेने तो भानावर आला.
बाहेर ओसरीवर आला..
"मी अमेरिकेत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे..शेत वाड्याची देखभाल तू कर..
कंपाउंड ची भिंत बांधून घे..कळव किती खर्च होतो ते ...पैसे पाठवेन...
अन हो..महत्त्वाचे अन न विसरण्याजोगे..मागे अडगळीची खोली आहे..त्यात जुने सामान भांडी आहेत..त्यातले तुला हवे ते ठेव बाकीचे विकून टाक... खोली पाडून टाक व तिथे छोटेसे गणेश मंदिर बांध..मात्र हे न विसरता कर.."
नक्की अन तू काळजी सोड मी योग्य ति काळजी घेईन..चिनू म्हणाला.
.
चिनु ने वाड्याला कुलूप लावले.. बॅग कार मध्ये ठेवली....
कार्तिक ने वाड्याकडे डोळे भरून पाहिले.....
कार मुंबईच्या दिशेने मार्ग कापू लागली

कथा

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

7 Jan 2016 - 2:53 pm | विजुभाऊ

कथा तीन चार वेळा वाचली.
चांगली आहे.
पण कथेतून लेखकाला काय सांगायचे आहे ते कळाले नाही

उगा काहितरीच's picture

7 Jan 2016 - 3:25 pm | उगा काहितरीच

कथा चांगली आहे. काहीशी अपूर्ण वाटते. तरीही आवडली.

राजेंद्र मेहेंदळे's picture

7 Jan 2016 - 7:55 pm | राजेंद्र मेहेंदळे

काहीतरी पुराणकथा नव्या स्वरुपात सांगायचा प्रयत्न आहे. पण नंतर कथा भरकटत गेली आणि ट्रॅक सुटत गेला.
असो. कथा म्हणुन आवडली.