Office मध्ये आल्या बरोबर मीपा ची site उघड्ली अन तात्याच्या क्रुपेने मधुबालाचे असीम सौंदर्य youtube वर पाहीलं !
आह को चहिये एक उम्र असर होने तक ...
कौन जिता है तेरे जुल्फ के सर होने तक !!
~ गालीब
खरे आहे रे बाबा गालीब ! आम्ही मुली असुन तीच्या चेहरयावरुन नजर नाही हलवु षकत तर मुलान्चे हाल काय म्हणावे !
प्रतिक्रिया
31 Dec 2008 - 6:12 pm | विसोबा खेचर
मधुबाला या सौंदर्यदेवतेस आमचाही सलाम..!
तिच्या विविध अदांतून घायाळ करणारं तिच देखणं रूप, मारून टाकणारं लाडिक, मधाळ हास्य अन्य कुठल्या नटीत अथवा बाईत आम्हाला आजपर्यंत तरी दिसलेलं नाही..
आजपर्यंत अनेक नट्या आल्या, अनेक येताहेत, अनेक येतील परंतु त्यातली एकही तिच्या जवळपासही नाही..!
'झाल्या बहू, होतील बहू..' असंच म्हणावं लागेल..!
आपला,
(मधुबालाभक्त) तात्या.
31 Dec 2008 - 6:37 pm | सुनील
मधुबालेवर पुरेशी चर्चा इथे पूर्वीच झाली आहे.
असो, अप्रतिम सुंदर चेहरा आणि मधाळ हास्य हाच सौंदर्याचा एकमेव निकष असावा काय, ह्या प्रश्नाचे उत्तर माझ्यामते तरी नाही असेच आहे.
अवांतर - झाल्या बहू, होतील बहू..
इथे, "बहू" म्हणजे पुष्कळ की सुन?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
31 Dec 2008 - 6:41 pm | प्रदीप
तर मधुबालेवर होतच राहतील, कारण नुसते तिचे सौंदर्यच नव्हे, तर तिचा अत्यंत उत्कट, सहजसुंदर अभिनयही. ते एक प्रकरणच वेगळे होते!!
31 Dec 2008 - 6:45 pm | विसोबा खेचर
तर तिचा अत्यंत उत्कट, सहजसुंदर अभिनयही. ते एक प्रकरणच वेगळे होते!!
सहमत आहे..!
31 Dec 2008 - 6:49 pm | सखाराम_गटणे™
----
सखाराम गटणे
© २००८,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
31 Dec 2008 - 7:28 pm | सोनम
1 Jan 2009 - 12:39 am | पक्या
मधुबालेचं नाक जरा जाड होतं (जे असिम सौदर्याच्या व्याख्येत बसत नाही) असं माझं वैयक्तिक मत आहे.
1 Jan 2009 - 1:19 am | वाटाड्या...
आईये मेहेरबां, बैठीये जानेजा...
शौकसे लिजीयेजी, इश्क के इंतहा...
असं म्हणणारी फक्त एकच मधुबाला....
1 Jan 2009 - 4:40 am | प्राजु
अच्छा जी मै हारी, चलो मान जाओ ना.. म्हणणारीही हीच अप्सरा..
सुरूवातीलाच.. खाली नजर ठेऊन अच्छाजी मै हारी असं म्हणत मान जाओ ना म्हणताना नजर जेव्हा वर करते.. तेव्हाच ................ बस्स!!!!!!!!!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
1 Jan 2009 - 4:45 am | बिपिन कार्यकर्ते
परत परत बघितली क्लिप!!!
बिपिन कार्यकर्ते
1 Jan 2009 - 10:26 am | राघव
लय भारी..
धन्यवाद प्राजु! :)
मुमुक्षु
1 Jan 2009 - 10:44 am | घाटावरचे भट
आणि देव आनंदला मेजरच माफ करा.....त्याचा एका एलईडी इतकाही प्रकाश पडत नाही मधुबालापुढे...
1 Jan 2009 - 11:20 am | विसोबा खेचर
खाली नजर ठेऊन अच्छाजी मै हारी असं म्हणत मान जाओ ना म्हणताना नजर जेव्हा वर करते.. तेव्हाच ................ बस्स!!!!!!!!!!
ओहोहो..! संपलो...!
प्राजू, जियो...
आपला,
(मधुबालाभक्त) तात्या.
15 Sep 2023 - 6:35 pm | चित्रगुप्त
हा छोटासा लेख आज योगयोगाने दिसला, आणि त्यातल्या प्राजु यांच्या प्रतिसादातील
... सुरूवातीलाच.. खाली नजर ठेऊन अच्छाजी मै हारी असं म्हणत मान जाओ ना म्हणताना नजर जेव्हा वर करते.. तेव्हाच ................ बस्स!!!!!!!!!!
हे वाचून, अनेकदा बघितलेले ते गाणे आज पुन्हा एकदा नव्याने बघितले आणि त्या पाच सेकंदातली मधुबालाची जादू बघून जीव (पुन्हा एकदा) वेडावला.
https://www.youtube.com/watch?v=kemGIpUHIec
3 Jan 2009 - 11:15 am | अविनाशकुलकर्णी
मधुबाला रति तर देव आनंद मदन होता