नुकतीच माझी बदली शहरात झाली होती . त्या दिवशी मी मला कंपनीकडून मिळालेल्या घरात रहायला गेलो. घर दिसायला मोठे होते त्यामध्ये अनेक सुविधा होत्या .पण माझ्यावर तुम्ही विशवास ठेवा न ठेवा , मला त्या घरात जो अनुभव आला तो अलौकिक होता.
आणि मी कधीही आशा अनुभवाची अपेक्षा माझ्या बाबतीत मला नव्हती.
त्या घरा जवळ शेजारी म्हणुन कोणी नव्हते. मी घरात प्रवेश केला तेव्हा घरातील सर्व वस्तू व्यवस्थित होत्या. खिडक्या , दरवाजे , जिना आणि इतर सर्व काही सुविधा.
मला नक्की वेळ माहिती नाही पण सायंकाळची वेळ होती, मी किचनमध्ये लाईट आॅन केली व किचन ला लागून असलेल्या बाथरुम मध्ये लाईट लावून पाहिले, सर्व व्यवस्थीत होते. मी बाथरूमची लाईट आॅफ करून मी फिरलो अचानक किचन मधील लाईट बंद झाली.
मी हाॅलकडे परत आलो पण तेथील ही लाईट बंद झाली होती ती मी काही मिनिटा अगोदर घरात प्रवेश करताच लावली होती.
कदाचीत स्विच जुने असतील म्हणून त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले.
मी हाॅल मधील लाईट आॅन करून माझ्या जवळच्या खुर्ची वर बसणारच होतो तोपर्यंतच माझ्या लक्षात येते की, किचनमध्ये लाईट आॅफ झाली होती.
बाहेर बराच काळोख झाला होता, त्या किचनमध्ये मला कोणाचीतरी पुसट सावली दिसली. मी घाबरलो . बहुतेक मला होणारा भास आसेल असे वाटले.
बहुतेक इलेक्ट्रॉनिक बिघाड असेल आशी मनाची समजूत घातली. मी पुन्हा लाईट आॅन केल्या.
सरळ जिन्यावरून बेडरूम कडे जाऊ लागलो. माझी या घरात पहिलीच रात्र असल्याने मी बेडरूमचा दरवाजा उघडा ठेवला व बेडवर बसलो.
तेवढ्यात खालून खट. .खट. .. अवाज येतो. माझे लक्ष तिकडे जाते व मी बेडरूमच्या बाहेर येतो. नक्कीच आवाज किचनमधून येत होता. नंतर तो हाॅल मधुन येऊ लागला . मला वाटले कोणितरी प्राणि असेल नाहीतर कोणि चोर?
अचानक किचनमधून लाईट आॅफ होते व त्या पाठोपाठ हाॅल मधील ही लाईट आॅफ होते. मी घाबरलो पण स्वतःला सावरलो. मी जिन्यावरून हळु हळु खाली उतरून हाॅलकडे जाऊ लागतो .
मी हाॅल मध्ये येतो व अचानक बेडरूम मधुन खट.....खट. .. असा आवाज येतो. मी बेडरूम कडे पाहतो बेडरूम मधील लाईट अचानक बंद होते.
सर्वत्र काळोख पाहून मी घाबरलो व जोरात ओरडलो.
मी कसातरी हाॅल मधील लाईट आॅन केली पण कोण नव्हते , किचनमध्ये लाईट आॅन केली पण तेथे ही कोण नव्हते.
सर्व लाईट लावून मी बेडरूम मध्ये गेलो.
हीच तर माझी चूक होती.
रात्री मला कधी झोप लागली मला कळाले ही नाही. जेव्हा मला दुसर्या दिवशी सकाळी जाग आली तेव्हा घरातील सर्व लाईट्स बंद होत्या. मी आश्चर्याने पाहु लागलो. अचानक माझ्या हाता पायाला खाज सुटली व मी खाजवायला लागलो आणि पाहतो तर माझ्या हाता पायावर कोणितरी चिमटे घेतल्या सारखे व खरचटले सारखे चट्टे पडले होते. मी घाबरलो . प्रथम सगळ्या लाईट्स आॅन करू लागलो, पण हे काय घरातील प्रत्येक लाईट बल फुटलेला होता. मी आणखीनच घाबरलो. मी घराबाहेर येऊन आजुबाजूला पाहू लागलो पण कोणीच दिसले नाही, दुरवर हायवे रस्त्यावरील वहाणे दिसत होती. मला नक्की खात्री पटली की या घरात माझ्या व्यतिरिक्त आणखी कोणितरी नक्कीच असणार.
त्या दिवशी मी ड्युटी वर गेलो, घडलेला प्रकार मी कोणालाच सागितला नाही. घरी जाताना मी लाईट्स बल विकत घेतले, तसेच एक चाकू ही सुरक्षा साठी विकत घेतला.
आज पुन्हा मला या भयानक प्रसंगाचा सामना करावा लागणार की काय याची मला भिती वाटू लागली. मी कधीही या अगोदर रात्री लाईट आॅन करून झोपत नव्हतो. आता मला भिती वाटत होती म्हणून मी पुन्हा सर्व लाईट्स आॅन करून झोपलो.
जवळ जवळ पहाटेचे दिड दोन च्या दरम्यान तो आवाज येऊ लागला पण अगदी जोरजोरात जसे कि कोणितरी माझ्या पाठीमागे वाजवत असावे. मी झटकन उठून पाठीमागे पाहीलो पण कोण नव्हते आवाज ही बंद झाला. मी हळुच माझ्या उशी खालील चाकू हातात घेऊन उठलो.
हळुच वाकून बेड खाली पाहिले पण कोणीच नव्हते. बेडवरून उठून मी बेडरूम बाहेर गेलो , अचानक जोराचा खट.....खट....आवाज झाला व मी भितीने मागे उडी मारली.
स्वतःला सावरत मी हातात चाकू घेऊन जिना उतरत हाॅलकडे चाललो हाॅल मधील लाईट बंद होती. जिन्याच्या मध्यावर गेलो व अचानक बेडरूम मधुन खट. ...खट. .. आवाज झाला व बेडरूम मधील लाईट आॅफ झाली, मी वरती पाहीले व चपळाईने जोरात जिना चढून बेडरूम मध्ये गेलो आणि लाईट आॅन केली. खिडकी जवळ तो उभा असलेला मला दिसला. तो माझ्या कडे पाहत होता.
क्रमशः
प्रतिक्रिया
9 Dec 2015 - 9:28 pm | अभ्या..
वेलकम मोजी
लै वाट पाहायला लावली
9 Dec 2015 - 9:32 pm | अद्द्या
अय्यो मोजी आले परत
आता वाचतो कथा
9 Dec 2015 - 9:34 pm | संदीप डांगे
'मोजिनो' किंवा 'नोमोजि'
(टच हरवलाय अशी सगळे ओरड कंरतील आता..)
ते लॅब्ररी चं काय झलं पुढे... अर्धवट सोडून देताय.. काय सगळ्य अकथा..?
9 Dec 2015 - 9:36 pm | अद्द्या
आता "लाईट बल " आलाय .
हैत कुठं ?
9 Dec 2015 - 11:05 pm | आदूबाळ
=))
अॅक्चुअली या कथेतल्या व्हॅम्पचं नाव "आशा" असणार आहे.
9 Dec 2015 - 9:34 pm | अद्द्या
ब्येष्ट . .
येउन्द्या अजून .
9 Dec 2015 - 10:08 pm | एक एकटा एकटाच
एक्साईटमेंट ऑन
क्रमश वाचुन
एक्साईटमेंट ऑफ़
9 Dec 2015 - 10:10 pm | अजया
मोजी आले मिपावर बल लागले.
9 Dec 2015 - 10:54 pm | स्रुजा
लोल
हायवेवर वहाणे दिसत होती चं मी वाचलं हायवेवर वहाणा दिसत होत्या. म्हणलं फार च मोठ्या बुवा या भुत लोकांच्या चपला.. हायवेवर पडलेल्या पण दिसतात ;)
9 Dec 2015 - 10:21 pm | अत्रुप्त आत्मा
9 Dec 2015 - 10:41 pm | चाणक्य
टाका लवकर पुढचा भाग.
9 Dec 2015 - 10:50 pm | इन कम
डरना जरुरी हैं !
9 Dec 2015 - 10:58 pm | जातवेद
पन भ्या नाय वाटलं. भौतेक अॅक्चुअल मदे भुत कसं होतं ते वाचून वाटल. पुढचा भाग टाला लौकर.
10 Dec 2015 - 12:30 am | pacificready
हा मोजी उत्क्रांति चा नेमका कोणता टप्पा आहे ते डॉकिन्स ला पण समजायचं नाही. काय म्हणता घासुगुर्जि?
10 Dec 2015 - 2:13 am | बोका-ए-आझम
अपहरण की खूण होणार आता बहुतेक!
10 Dec 2015 - 7:29 am | मितान
मोजी तुम्ही आलात !!!!!
हा भाग आवडला ! पुढचा कधी ?
10 Dec 2015 - 8:33 am | नाखु
पकावू धागेपर अक्सीर इलाज : जीमोसार्,नीसोकाढा आणि अकुचूर्ण...
10 Dec 2015 - 9:45 am | अत्रुप्त आत्मा
@जीमोसार्,नीसोकाढा आणि अकुचूर्ण... >>
10 Dec 2015 - 10:01 am | प्रमोद देर्देकर
आणि जर राकु असले असते की अजुन एक राकुमलम /राकुचाटण अॅडवले असते.
10 Dec 2015 - 8:36 am | योगी९००
मस्त भाग...आवडला..!! खरंच खरा अनुभव असेल तर खतरनाकच...
इमोजी टच नाय ...पण तरी सुद्दा खुप आवडला..!!
10 Dec 2015 - 9:49 am | टवाळ कार्टा
भारी :)
10 Dec 2015 - 10:03 am | प्रीत-मोहर
वा वा वा. लवकर टाका पुल्डा भाग.
मोजीकथा-फॅन
प्रीमो
10 Dec 2015 - 10:17 am | तिमा
खिडकी जवळ तो उभा असलेला मला दिसला.
असा विरस नका हो करु मोजी! 'खिडकीजवळ ती उभी होती', असं लिहिलं असतं तर जास्त रोमांचक झालं असतं.
बाकी 'इलेक्ट्रॉनिक' हा शब्द अचूक लिहिणारे तुम्ही! वहाने च्या जागी वहाणे लिहिता हे काही हजम नाही झाले. बेअरिंग सुटतंय बरं का.
10 Dec 2015 - 10:55 am | बॅटमॅन
तसं नाय तिर्षिंग्राव, ते उच्चारानुसारी शुद्धलेखन करताहेत.
10 Dec 2015 - 11:58 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तीच उभी पाहिजे होती.
लेखन वाचतोय.
-दिलीप बिरुटे
10 Dec 2015 - 10:19 am | नगरीनिरंजन
वा! मध्येच सामान्य वर्तमानकाळ व मध्येच भूतकाळ असं ऑन-ऑफ करून कथाविषयाला अनुसरून शैली वापरण्याचं व त्यातून वाचकांच्या अंगावर शहारा येईल अशी परिस्थिती निर्माण करायचं कौशल्य वादातीत आहे!
10 Dec 2015 - 10:34 am | कपिलमुनी
मोजीचष्मा काढून वाचला असता तर बर्याच जणाना ही गोष्ट बरी वाटली असती.
पण इथे साहित्यसेवा कोण करायला येतय !
10 Dec 2015 - 11:52 am | संदीप डांगे
no one can simply escape from
I M A G E
10 Dec 2015 - 10:51 am | दमामि
आवडली, पुभाप्र.
10 Dec 2015 - 12:11 pm | खटपट्या
खूप छान !! आगे बढो...
10 Dec 2015 - 12:59 pm | मृत्युन्जय
अगदी खरे सांगायचे तर पहिला भाग चांगला जमला आहे. शेवट मोजी स्टाइलने नाही झाला म्हणजे मिळवली.
10 Dec 2015 - 1:55 pm | जव्हेरगंज
10 Dec 2015 - 2:59 pm | इरसाल
ही कथा मोबाईलवरुन टायपलेलि नाहीए.
म्हणुन ते वर टिंब, खाली टिंब असली सर्कस नाय तं चु क ल्या चु क ल्या सा र खं वा ट तं ना मं ग !
10 Dec 2015 - 3:25 pm | आदिजोशी
(एक भयानक अनुभव) हे वाचकांसाठी