मला आवडलेला विनोद

भंकस बाबा's picture
भंकस बाबा in जनातलं, मनातलं
6 Dec 2015 - 11:33 pm

आपल्या विद्वानाच्या नगरितले नेते कृषिमंत्री होते तेव्हाचि गोष्ट.
एकदा आपले माननीय नेते काही परदेशी सन्माननीय पाहुण्याना भारतातील शेतीशी आधारित जोडधंदे दाखवायला घेऊन गेले. शहराबाहेरील एका मोठ्याशा गोठ्यात शिरुन त्यांनी पाहुण्याना पशुधन दाखवायला सुरुवात केलि. समोर असलेल्या गवळिबुवाची अगदी आपला शाळकरी मित्र असल्याच्या थाटात चौकशी केली. गवळीबुवाच्या पायाला भलेमोठे प्लास्टर पाहून त्यांनी त्याचे कारण विचारले.
गवळीबुवानी सांगितले की दूध काढ़ताना गाईने लाथ मारली.
बस मग काय , कृषिमंत्र्याचे त्या गवळ्याचे बौद्धिक घेणे सुरु झाले.
"अरे त्या गाईला पहल्यान्दा थोपटायचे असते. मग तिच्या मानेखाली थोड़े खाजवायचे, तिच्या बरोबर बोलायचा प्रयत्न करायचा , असे करताना तिच्या पाठीवर थाप मारायची. थोडेसे तिचे कान खाजवायचे. असे केल्याने जनावर कह्यात येते. मग आरामात दूध काढायचे."
एवढे बोलून थांबतील तर ते कृषिमंत्री कसले. त्यांनी गवळ्याच्या हातातील बादली खेचून घेतली व् गवळीबुवा नाही नाही म्हणतांना दूध काढ़ायला बसले . परिणाम काय? एक सांणकन लाथ कृषिमंत्र्याना बसली.
एका पायाने लंगड़ी घालत खजिल स्वरात ते गवळ्याला बोलल," गड्या काहीतरी चुकले बग"
गवळी गालातल्या गालात हसत बोलला," तुम्ही समद बरोबर केले साहेब, फकस्त एकच चूक केलि , ते निवडल ते बैल होत राव!

विनोदविरंगुळा

प्रतिक्रिया

अविनाशकुलकर्णी's picture

7 Dec 2015 - 6:15 am | अविनाशकुलकर्णी

फेसबुकावर मी .."भयानक पी.जे लिहितो..त्या पैकी काहि
.............................................................
१.एक भयानक पी.जे
.............
प्रेमिका :- तु लग्ना नंतर सुद्धा मला असेच प्रेम करशील ?
.
प्रेमी :- हो, जर तुझ्या नव-याने परवांगी दिली तर.---
...........................

एक भयानक पी.जे
..........
शिक्षक : तुमचा मुलगा सिगरेट पितो का ?
.
वडील : काही कल्पना नाही.
.
शिक्षक : अरे ! कमाल करता, तुम्ही कधी विचारलं नाहीत त्याला ?
.
वडील : विचारलं की अनेकदा, पण मला देत नाही ना तो
...................

एक भयानक पी.जे.
........................
भाऊबिजेला यमी ने यमाला ओवाळले व नंतर एक स्वीट डिश दिली खाण्या साठी...
यमाने पहिला घास घेतला..व यमी ने विचारले "कसा झाला आहे पदार्थ"
.
यम म्हणाला.....यम्मी..
..................

एक भयानक. पी.जे
............
२ भुते गप्पा मारत होते ....
.
एक भूत म्हणाले ..समोरून माणूस येत आहे..
.
कश्यावरून माणूस?? भूत पण असू शकते ..दुसरे म्हणाले
.
अरे पायाकडे बघा ना पाय उलटे आहेत..माणूसच आहे .
.............

एक भयानक पी.जे.
.........................
डॉक्टर : माझ्या सेक्रेटरीशी बोलून भेटीची वेळ फिक्स करा.
.
पेशंट जोशी: दोनदा प्रयत्न केला… पण ति दाद देत नाहि.. तिने नकार दिला भेटायला !!
..............

एक भयानक पी.जे.
.......................................
सुनबाई......सासुबाई हि घ्या "डेअरी मिल्क चोकलेट"ची वडी
.
सासुबाई.... नको ग..
.
सुनबाई..... का हो?
.
सासुबाई....अग मला वराति पुढे नाचता येत नाहि
............

एक भयानक पी.जे..
.............................
बायको : अहो ऐकलत का, ???ब~याच दिवसंपासुन
तुमची इच्छा आहे ना,
आज रात्री मी पूरी करणार आहे
.
.
..
.
.
.
.
.
पति..ठिक आहे मी जातो अन श्रिखंड घेवुन येतो
..............

एक भयानक पी.जे.
....................
तो... जर मी कॉफी घेतली तर मला झोप येत नाहि..
.
ति...माझे नेमके उलटे आहे..मी जर झोपले तर मला कॉफी घेता येत नाहि
............

एक भयानक पी.जे.
......................
.
पहिला..माझा एक मित्र आहे त्याचा एक पाय लाकडी आहे त्याचे नाव राजु
.
दुसरा... हो का? मग दुस-या पायाचे नाव काय आहे
.................
१०
एक भयानक पी.जे..
........
तो..मी नाति जपणारा माणुस आहे..

मित्र..अरे वा किति नाति आहेत आपल्याला? व काय वयाच्या आहेत?

भंकस बाबा's picture

7 Dec 2015 - 8:43 am | भंकस बाबा

बढ़िया है भाई

अमृत's picture

7 Dec 2015 - 8:58 am | अमृत

ही ही ही...

जातवेद's picture

7 Dec 2015 - 11:18 am | जातवेद

हा धागा सदाहरीत रहावा हिच म्हातोबा चरणी प्रार्थना.

रिम झिम's picture

7 Dec 2015 - 9:37 am | रिम झिम

एकदम छान

पैसा's picture

7 Dec 2015 - 9:57 am | पैसा

टवाळा आवडे विनोद

असं मी नाय, रामदास स्वामी म्हणून गेलेत.

टवाळ कार्टा's picture

7 Dec 2015 - 11:49 am | टवाळ कार्टा

paisa

वामन देशमुख's picture

7 Dec 2015 - 5:12 pm | वामन देशमुख

टवाळासुद्दधा आवडे विनोद!

भंकस बाबा's picture

7 Dec 2015 - 1:10 pm | भंकस बाबा

असेच आपले कृषिमंत्री फारिनच्या डेलिगेशनला घेऊन महाराष्ट्रमधील शेती दाखवायला गेले.
वाटेतल्या एका बांधावर बसलेल्या शेतकऱ्यांच्या बाजूला गाड़ी थांबवायला सांगून सगळ्या पाहुण्याना घेऊन शेतकर्याकडे डायरेक्ट गेले.
शेतीवर आमच्या मंत्र्याची हुकूमत हो! मग काय शेतकऱ्याला सल्ले देणे सुरु.
रामराम वैगेरे झाल्यावर त्यांनी शेतकरयाला विचारले ," यंदा या वांग्याची रोपे एकदम तरारूण आली आहेत. सोळा आणे वांगी भेटणार बघा."
"चैक", तंबाखुचि गुळणी संभाळत शेतकरी दादानी मान नकारार्थी हलवली.
"असं कसं , यंदा पाऊस पाणी उत्तम आहे तर वांगी पण चांगलीच आली पाहिजेत."
परत एकदा शेतकरी दादानी नंदिबैलासारखी मान नकारार्थी हलवली, गुळणी टाकायला त्यांच्या जीवावर आले होते.
झाले आपले मंत्री भड़कले. ते तावातावाने बोलू लागले," अरे तुम्हाला खते वापरायला नको,खुरपणी करायला नको, किटकनाशकानी घरातील डास मारतील पण वांग्यावर फवारणार नाहि. मग वांगी कमी झाली की सरकारकडे नुकसान भरपाई तोंड वर करुन मागाल. अरे त्या रोपाना गुरांच्या हाडाचे ख़त घाला मग बघा वांगी कशी भरमसाठ येतील."
आता मात्र शेतकरी दादानी डेलिगेशन मधील कोंडाळे करुन असलेल्या तीन चार मंडळीना बाजूला सारून ग्लासभर पिंक टाकली. घसा खाकरुण ते बोलले," साहेब त्या रोपाना माझ्या हाडाचे खत जरी घातले तरी वांगी लागणार नाही , कारण ती अळुची रोपे आहेत"

अविनाशकुलकर्णी's picture

7 Dec 2015 - 1:30 pm | अविनाशकुलकर्णी

एका समुहासाठी लिहिलेले पी.जे
...............
एक कोब्रा रोज घरी साखरेचा डब्बा पाह्तो आणी झोपतो
.
त्याची भार्या विचारते कि" का रोज साखरेचा डब्बा पाह्ता तुम्ही?"
.
कोब्रा म्हणतो ...अग मला डॉक्टर ने रोज शुगर चेक करायला सांगितली आहे!!!
30 Likes8 Comments
..........................

देब्रा पति......काय मस्त पाऊस पडत आहे मस्त कांदा भजी कर...
.
कोब्रा भार्या....छे रे,,काहितरीच काय? पाऊस पडला कि मी कविता करते...भजी नाहि
.................

कोब्रा भार्या:- तुम्हि सारखे का हसताय?
देब्रा पति :- काहि नाहि .....
कोब्रा भार्या :- खर सांगा मलाच बघुन हसताय ना?
देब्रा पति :- नाहि ग...
कोब्रा भार्या :- मग दुसरे घरात हसण्यासारखे काय आहे?
.............................
कोब्रा भार्या...भाजी आणायला जात आहात..निट भाव करा..तुम्हि मुलखाचे वेंधळे अन भोळे आहात..तुम्हाला कुणी पण फसवु शकते...
.
देब्रा पति... खर आहे.. सुरवात तर तु अन तुझ्या बाबानीच केली ना...

अभ्या..'s picture

7 Dec 2015 - 1:46 pm | अभ्या..

अक्कुकाका देब्रा अहेत.

अविनाशकुलकर्णी's picture

7 Dec 2015 - 2:20 pm | अविनाशकुलकर्णी

ऋग्वेदी

अभ्या..'s picture

7 Dec 2015 - 2:28 pm | अभ्या..

गोत्र राह्यले. ;)
जमदग्नी अन दुर्वास सोडून कोणतेही सांगा. तुम्हाला कधी चिडलेले पाह्यलेच नै हो.

अविनाशकुलकर्णी's picture

7 Dec 2015 - 3:06 pm | अविनाशकुलकर्णी

नाहि रागवत...आवडता समुह..आवडते सदस्य

मित्रहो's picture

7 Dec 2015 - 3:04 pm | मित्रहो

बढीया है.

गॅरी ट्रुमन's picture

7 Dec 2015 - 1:46 pm | गॅरी ट्रुमन

एकदा दोन भूते गप्पा मारत असतात.

पहिले भूत (दुसर्‍याला): काय रे या जगात माणसे असतील का रे?
दुसरे भूतः छे रे काहीतरी अंधश्रध्दा!!

सद्यस्थितीवर आधारित विनोद

To,
My Managers
I'm not feeling safe in intolerant India.
Please send me onsite to any forein country.

:-D

Awsome reply from manager....
I just came to know we have open positions in
Syria, iraq, Afganistan , Pakistan, bangladesh,
iran ,Egypt Turkey,All over Africa ...

Kindly initiate your VISA process for the same.

Employee: Sir, earlier thought was proviked by my wife.
I do not want to leave my country. I love my country. :-)

सकाळी हा धागा बघितला तेव्हा मनात म्हणलं चला बरं झालं. आता व्हॉट्सअ‍ॅप सारखे काहीही विनोद नाही वाचायला लागणार. विनोद कमी अन प्रोपागंडा जास्ती. पण ते त
विनोदी धाग्यावर पण प्रोपागंडा!

सकाळी हा धागा बघितला तेव्हा मनात म्हणलं चला बरं झालं. आता व्हॉट्सअ‍ॅप सारखे काहीही विनोद नाही वाचायला लागणार. विनोद कमी अन प्रोपागंडा जास्ती. पण ते त
विनोदी धाग्यावर पण प्रोपागंडा!

(पण ते तर इथे पण सुरु झालंच...)

भंकस बाबा's picture

8 Dec 2015 - 12:18 am | भंकस बाबा

एकदा एका तलावात हत्ती आंघोळ करत असतो. तिथे एक उंदीर येतो व् त्याला बोलतो.
"ए बाहेर ये"
हत्ती बिचारा बाहेर येतो. तो बाहेर आल्यावर उंदीर बोलतो.
"जा आता परत आत"
हत्ती परत तलावात जातो व अदबीने विचारतो.
"काय झाले उंदीर भाऊ?"
उंदीर गुर्मिने उत्तर देतो.
" काय नाय, माझी चड्डी हरवली होती ,बघत होतो तू घातली आहेस का"

योगी९००'s picture

8 Dec 2015 - 8:37 am | योगी९००

तो यम्मी चा पीजे एकदम आवडला...!!

भंकस बाबा's picture

8 Dec 2015 - 8:05 pm | भंकस बाबा

संता ऑफिसला जायला निघाला होता.
अचानक शर्ट घालताना काहितरी झाले व् संताला हाताची हालचाल बिलकुल करता येइना.
घाबराघुबरा होऊन संता डॉक्टरकडे गेला.
डॉक्टरने तपासणी केली.

आणि संताच्या शर्टमधील शर्टसोबत घातलेला हैंगर बाहेर काढला.

भंकस बाबा's picture

8 Dec 2015 - 10:25 pm | भंकस बाबा

भवानरावाने एक घोडा पाळला होता.
हा घोड़ा एकदा आजारी पडला म्हणजे त्याला संडासला होईना व् तो काही खाइना.
भवानरावानी जनावराच्या डॉक्टरला बोलावले.
डॉक्टरने निदान केले की पोट बिघडल्यामुळे घोड़ा आजारी पडला आहे, पोट साफ़ झाले की तो बरा होईल.
त्यांनी एक गोळी दिली व् घोड्याला सकाळी भरवायला सांगितली.
पण घोडा काहीच खात नसल्याने त्यांनी एक उपाय सांगितला.
एक रबरी नळी घेऊन त्याच्या एका टोकाला घोड्याच्या तोंडात ठेऊन दुसरिकडून गोळी टाकून जोरात फुंकायचे,बस गोळी घोड्याच्या पोटात!
दुसऱ्या दिवशी सकाळी भवानरावाचा घाबरयाघुबरया आवाजातील फ़ोन गुरांच्या डॉक्टरला आला.
"अहो डॉक्टर ते गोळी घेऊन झालेले जुलाब थांबवायचे काही औषध आहे का?"
डॉक्टर बोलले ," अहो होउ देत जुलाब, पोट साफ़ झाले की बरे वाटेल."
"अहो पण जुलाब घोड्याला नाही मला होत आहेत." इति भवानराव.
"ऑ, पण तुम्ही कशाला ती गोळी घेतली?"
कळ आवरत भवानराव बोलले," अहो सकाळी मी घोड्याला गोळी द्यायला गेलो. नळी घोड्याच्या तोंडात घातली,एका बाजूने गोळी ठेवली,आणि मी फुंक मारणार तोच घोड्याने फूंक मारली"

नया है वह's picture

9 Dec 2015 - 4:21 pm | नया है वह

स्थळ : पुणे

एक नवरा त्याच्या बायकोला हॉस्पिटल मधे घेउन जात होता.
.
.
एक माणुसः तुमच्या मिसेस का?
.
.
नवरा: हो..!
.
.
माणुस: प्रेग्नंट आहेत काय?
.
.

नवरा: (रागाने) नाही फुटबॉल गिळलाय तिने.. व्हा बाजुला..!

आनंद कांबीकर's picture

9 Dec 2015 - 6:57 pm | आनंद कांबीकर

मुलगा अभ्यास करता करता;
"आई, मी टिव्ही पाहु का?"

"हो, बघ! पण चालु नकोस करु" आई.

विनोद टवाळाला आवडतो, आम्ही टवाळ नाही.

भंकस बाबा's picture

9 Dec 2015 - 9:16 pm | भंकस बाबा

तुमच्या नावातच् विनोद आहे हो!

भंकस बाबा's picture

10 Dec 2015 - 8:41 am | भंकस बाबा

राजधानी एक्सप्रेस फुल्ल स्पीडमधे धावत होती.
रात्रीची वेळ! आजुबाजूला पसरलेली शेते! हलकीशि जाणवनारी थंडी!
अचानक गाडीने रुळ सोडले. तशाच बेफाम वेगात गाडी बाजूच्या शेतातून चालत होती.
सगळे प्रवासी जीव मुठित धरून बसले. काही कळायला मार्ग नाही.
दहापंधरा मिनिटे शेतातून गेल्यावर गाडी परत रुळावर आली.
पुढच्या स्टेशनवर झाडून सारे प्रवासी मोटरमन कड़े जाब विचारायला धावले.
मोटरमनच्या सीटवर संता आरामात बसून शेंगदाने खात होता.
चिडलेल्या प्रवाशानि संताला फैलावर घेतले. गाडी रुळावरून उतरण्याचे कारण विचारले.
संता शांतपणे बोलला," रुळावर मधेच एक माणूस आला होता. मी काय करु?"
"उडवून टाकायचा होता त्याला", सगळे प्रवासी एकसाथ ओरडले.
"एकझ्याटली तेच मी करत होतो, पण साला शेतात पळाला." इति संता.

नाखु's picture

10 Dec 2015 - 9:04 am | नाखु

हा इथे ही आहे.

गॅरी ट्रुमन's picture

10 Dec 2015 - 10:51 am | गॅरी ट्रुमन

इतिहासाच्या तासाला वर्गात झोपलेल्या राजूला उठवून पुरंदरे सरांनी विचारले---"काय रे दिल्लीचे तख्त कोणी फोडले?" राजू डोळे चोळत उठला आणि म्हणाला---"आई शपथ सांगतो सर मी नाही फोडले".

पुरंदरे सरांनी हा किस्सा मधल्या सुट्टीत शिक्षकांच्या खोलीत सांगितल्यावर इतर सर्व शिक्षक हसले. केवळ जोशीबाई हसल्या नाहीत. त्या गंभीर चेहर्‍याने म्हणाल्या---"कोण राजू ना? एक नंबरचा खोडसाळ मुलगा आहे तो. त्यानेच फोडले असेल"!!

गॅरी ट्रुमन's picture

10 Dec 2015 - 11:00 am | गॅरी ट्रुमन

एकदा एक तरूण स्वतःच्या गाडीने मुंबईहून पुण्याला चालला असतो.मधल्या एका हॉटेलात थांबून तो आपले चहापाणी घेऊन परत आपल्या गाडीकडे चालला असतानाच पुण्याहून मुंबईला चाललेल्या एका गाडीतील एक तरूणी उतरते आणि त्या तरूणाकडे बघत म्हणते--"गाढव"!! काहीच ओळख नसलेल्या तरूणीने आपल्याला काही कारण नसताना गाढव म्हटल्याचा त्या तरूणाला खूपच राग येतो आणि तो तिला म्हणतो--"टवळी" आणि आपल्या गाडीत बसून पुण्याच्या दिशेने जायला लागतो.मिनिटभरातच त्याला एक गाढव मरून पडलेले दिसते.

या गोष्टीचे तात्पर्य काय-- तर अनेकदा स्त्रियांना जी गोष्ट सांगायची असते ती त्या अशा पध्दतीने सांगतात की ते पुरूषांना कधीच कळत नाही!!

चला पळतो आता.

अजया's picture

12 Dec 2015 - 10:52 am | अजया

:)

सिरुसेरि's picture

10 Dec 2015 - 1:58 pm | सिरुसेरि

एकदा रात्रीच्या वेळी रेल्वे प्रवासामध्ये एका डब्यामध्ये दोन प्रवासी गप्पा मारत होते . एक प्रवासी दुसरयाला तावातावाने सांगत होता " हे भुत , जादुटोणा हे सर्व खोटे आहे . सगळी अंधश्रद्धा आहे".
त्यावर दुसरा प्रवासी म्हणाला "हो ना, अगदी बरोबर" , आणी अदॄश्य झाला .

कापूसकोन्ड्या's picture

10 Dec 2015 - 4:44 pm | कापूसकोन्ड्या

दोन थापाडे
एकः- आमच्या कडे इतकी थंडी आहे की,हॉटेल मधे वेटरला पाणी आणायला सांगीतले तर तो बर्फ आणतो कारण थंडीमुळे त्याला पाणी बर्फ असे ऐकू येते.
दुसरा:-
हे तर काहीच नाही मी एकदा रात्री बाथरूम ला जाउन आल्यावर येताना बर्फाच्या काठी ने चालत आलो.

सतिश पाटील's picture

10 Dec 2015 - 5:00 pm | सतिश पाटील

एक माणूस डॉक्टरकडे जातो.

एमा - डॉक्टर मला अलीकडे संडासला खूप पातळ येतेय...

डॉ- मग सलीमकडे जात जा , कदाचित कडक येईल...

सुबोध खरे's picture

10 Dec 2015 - 8:13 pm | सुबोध खरे

हा विनोद असाही ऐकला होता
एक माणूस डॉक्टरकडे जातो.
एमा - डॉक्टर मला अलीकडे संडासला नीट होत नाही ...
डॉ -- मग पलीकडे बसा ..

ए मा -- तसा नव्हे डॉक्टर, अलीकडे संडासला पातळ होतं
डॉ- मग सलीमकडे जात जा , कदाचित कडक येईल...

मित्रहो's picture

10 Dec 2015 - 5:07 pm | मित्रहो

मिरासदारांच्या एका पुस्तकात वाचलेला विनोद
एकदा एडीसन एका दुकानात काही खरेदी करायला गेले. खरेदी झाल्यावर ते तसेच निघून गेले आणि छत्री दुकानात विसरले. तिथल्या मुलाने त्यांना आवाज दिला पण त्यांचे लक्षच नव्हते. नंतर भरपूर पाउस आला. साधारण अर्धा तास पाउस झाल्यावर पाउस थांबला. काही वेळ गेल्यावर एडीसन परत त्याच दुकानात आले, पूर्ण भिजलेले होते.
"मी माझी छत्री य़ेथे विसरलो का?"
"हो मी आवाज दिला पण आपले लक्षच नव्हते. तुम्हाला पाउस आल्यावर छत्रीची आठवण आली का?"
"नाही पाउस संपल्यावर छत्री बंद करायला वर बघितले तर लक्षात आले छत्रीच नाही म्हणून"

भंकस बाबा's picture

10 Dec 2015 - 6:47 pm | भंकस बाबा

नवरा: जानू तू कोणतीही गोष्ट मला शांतपणे सांग,होतं काय की तुझ्या ओवर एक्सआइट मुळे मला जाम टेंशन येते.
त्याच दिवशी संध्याकाळी बायकोचा फोन,
" डार्लिग , तुला काही सांगायचे आहे"
"बोल ना डियर"
" तू मला जी वाढदिवसाला नवीन होंडा सीटी गाडी घेऊन दिली आहेस ना, ती छान काम करते "
" ओ, यू जानू, तू हे मला महिन्यानंतर सांगते आहेस"
" हां ना गड़े, आत्ताच मला कळले की तिचे एयरबैग व्यवस्थित काम करत आहेत."

सस्नेह's picture

10 Dec 2015 - 8:07 pm | सस्नेह

लग्न झालेल्या महिलांचे
एकदा संमेलन भरते !!
त्यात गम्मत म्हणून एक
स्पर्धा जाहीर होते !!
बायकांनी "आपल्या" नवर्याला
"आय लव्ह यु" चा मेसेज पाठवायचा
आणि जिच्या नवर्याकडून सर्वात
भारी रिप्लाय येईल, तिला पहिले
बक्षीस दिले जाईल असे जाहीर केले
जाते !!
सगळ्या जणी पटापट मेसेज
करतात !!
दोनच मिनिटात सगळ्यांना रिप्लाय
येतात !!
त्याचे प्रातिनिधिक रिप्लाय पहा !!!
१) आता काय हवय ???
२) कार ठोकली का पुन्हा ???
३) नंतर बोलतो, मिटिंग सुरु आहे !!
४) ओके !! ओके !!!
५) माझे काही चुकलेय का ???
६) तुझी आई राहायला येणारय
का ग ??
आणि
पुरस्कार प्राप्त रिप्लाय होता
*
*
*
*
*
*
*
*
हा नंबर कुणाचा आहे ???

मीता's picture

14 Dec 2015 - 1:21 pm | मीता

जाम हसले हा जोक वाचून.

भंकस बाबा's picture

11 Dec 2015 - 8:55 am | भंकस बाबा

कोर्टात केस चालू होती. संता आरोपीच्या कठड्यात उभा होता.
फिर्यादिचा वकील: तुम्ही माझ्या अशिलाला जीव जाइस्तोवर मारलेत, हां आरोप खरा आहे का?
संता: होय.
फि.वकील: का मारले?
संता: तो मला डुक्कर बोलला.
फि.वकील: कधी?
संता: सहा महिन्यापूर्वी.
फि.वकील: सहा महिन्यापूर्वी!! आणि तुम्ही त्याला आत्ता मारलेत?
संता: होय?
फि.वकील: आत्ताच का मारले?
संता: ज्या दिवशी मारले त्या दिवशी मी पहल्यान्दा डुक्कर हां प्राणी बघितला.

अमित मुंबईचा's picture

11 Dec 2015 - 11:19 am | अमित मुंबईचा

आयपीएलच्या नव्या मोसमासाठी पुणे संघांची आज घोषणा केली..!

आता IPL चे नियम प्रेक्षकांसाठी पुढील प्रमाणे असतील...

1) चीयर गर्ल्सला पाहून पैसे फेकू नये अथवा पैसे दाखवून इशारे करू नये, त्या चीयर गर्ल्स आहेत बार बाला नाहीत" याची नोंद घ्यावी ( पुणे- मुंबई सुमो चालकांसहसह )

2) चीयर लीडर्सचा उपयोग आम्ही 'फक्त खेळाडूंचे' 'मैदानावरील' मनोबल वाढविण्यासाठी करतो. (सुज्ञास सांगणे न लगे)

3) गल्लीतल्या दुकानाचे,चहा टपरीचे,भजी-वडा-पाव गाड्यांचे,अथवा तत्सम कारणासाठी चीयर लीडर्स मिळणार नाहीत, त्या बाबतीत सूचना क्र.2 वाचावी. हुज्जत घालू नये.

4) महिला बचत योजना,भिशी मन्डळना स्वस्तात बुकिंग करून देणाऱ्या काही टोळ्या कार्यान्वित झाल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे तरी त्यांना पैसे देऊन आपण भुलू नये.अशा कोणत्याही प्रकारचे डिस्काउंट इथे मिळत नाही.

5)चौकार आणि षटकार यांच्यासाठी "पावर प्ले" ची व्यवस्था करण्यात आलेली आहे इतर वेळेस चौकार आणि षटकारांची अवास्तव मागणी करू नये.

6) प्रेक्षकांची गर्दी पाहून कोणत्याही पक्षाच्या नेत्याने भावनाविवश होवून हातात माईक घेवू नये . तुमच्या भावनांचा आम्ही आदर करतो - याबाबत आम्ही दिलगीर आहोत.

7) दगदुशेटचा प्रसाद ,वडापाववर चटणी आणि नो-Ball वर फ्री हीट "एकदाच मिळेल".

8) क्रिकेट फक्त आपल्याला कळते या अविर्भावात खेळाडू ची टर उडवू नये त्या आधी आपण कधी बाप जन्मात क्रिकेटची bat तरी हातात धरली होती का याचा विचार करावा.

9) चुकून माकून पुण्याची टीम IPL जिंकलीच तर तो निव्वळ योगायोग समजावा.

10) आपले म्हणणे सोपे आणि समजेल अश्या पद्धती ने मांडा. उगाच किलष्ट बोलून आणि वैचारिक गोंधळ उडवून वाद निर्माण करण्या करता अपना काही मराठी साहित्य संमेलना चे अध्यक्ष नव्हे , याचे भान ठेवावे "

11) टाळ्या हळू वाजवाव्या ! " एकदा जोरदार टाळ्या होऊ देण्या करता हे काही पल्लवी जोशी चे झी सारेगामा चे मंच नव्हे! "

12) तुम्हाला काय वाटते या पेक्षा थर्ड अम्पायर ला काय वाटते हे जास्त महत्वाचे असते " , म्हणून निकाल देण्या आधीच "जल्लोष " करून आपले हसू करून घेऊ नये!

13) काही संघांच्या मालकीण (उदाहरण प्रीती झिंटा) सत्यनारायणाचा प्रसाद वाटल्या सारखा संघातील प्रत्येक खेळाडूला मिठी मारते आहे हे बघून, प्रसाद मिळेल (म्हणजे एखादी स्त्री आपल्याला मिठी मारेल) या हव्यासा पोटी गुपचूप खेळाडूंच्या पॅव्हेलियन मध्ये जाऊन बसण्याचे धाडस करू नये ..स्टेडीयमच्या बाहेरचा रस्ता दाखवला जाईल.

14) हे IPL चे सामने आहे , मराठी साहित्य संमेलन नव्हे ! सामन्यात अपेक्षा भंग झाल्यावर त्याचा राग आमच्या वर काढू नये "

15)चीअर गर्ल्स लागेल त्या गाण्यावर नाचतील. उगाच तमाशा समजून "लावण्यांची" मागणी करू नये

16) षटकार मारल्यानंतर जर चेंडू आपल्याकडे आला तर त्वरित परत करावा. उगाच 'आयपीएलची आठवण' म्हणून घरी घेवून जावू नये.

17)पुणे हे एक सांस्कृतिक शहर होते याची आठवण म्हणून सर्व चीअर लीडर्स नऊ वारी साडी घालून नाचतील तरी इतर ठिकाणच्या सामन्यातील चीअर लीडर्स प्रमाणे कपडे घालून येण्याची गळ घालू नये

18) येथे फक्त सामन्याची तिकिटे मिळतात, चीअर गर्ल्स चे नाव, पत्ते विचारून अपमान करून घेऊ नये तसेच खाण्या-पिण्याची सोय काय? असे अचरटासारखे प्रश्न विचारू नयेत.

19) इथे क्रिकेटचे सामने चालतात, उगीचच तोंडे रंगवून येऊ नये. सामने पाहण्यासाठी येणा-या भगिनींना नम्र विनंती, सभ्य कपडे घालून यावेत, प्रेक्षक सामना पाहण्यासाठी आले आहेत आणि कॅमेरेपण सामन्यासाठीच आहेत.

20) सामना संपल्यानंतर खेळाडूना विश्रांतीची गरज असते,तथा त्यांना सह्या,फोटो अशा किरकोळ कारणासाठी त्रास देऊ नये.

21) चीअर गर्लकडे जीभ बाहेर काढून बघत बसलात, आणि चेंडू लागून डोके फुटले तर आम्ही जवाबदार नाही.

22) चीअर गर्ल्सला शिट्या मारणे, अश्लील हावभाव करणे, डोळे मारणे, चोरून फोटो काढणे अशी वर्तवणूक गंभीर गुन्हा मानंण्यात येऊन कायदेशीर कार्रवाई केली जाईल.

22) इथे आय.टी.वाल्यांना (I.T) कुठलीच सवलत मिळत नाही. उगाच मी तमक्या कंपनीत डीलेवरी मॅनेजर आहे म्हणून दंगा करू नये. तुम्ही "त्यापलीकडे" कुठलीही डीलेवरी देऊ शकत नाही, हे लक्षात घ्यावे.

24) कृपया तिकीटाचे सुटे पैसे द्यावे, नाहीतर तिकीट मिळणार नाही आणि कृपा करून हजाराच्या नोटा आम्हाला दाखवू नका.

25) IPL हि एक निव्वळ करमणूक आहे. संघ हरल्यास उगीच भावूक होवू नये.

26) हे क्रिकेटचे मैदान आहे, कुस्त्यांचा फड नव्हे..! तुमच्या शिट्ट्या, आरड्या-ओरड्याने चेकाळून आमचे फलंदाज चौकार-षटकार अजिबात मारणार नाहीत..! कुठल्या चेंडूवर किती धावा घ्यायच्या हा निर्णय सर्वस्वी आमच्या फलंदाजाचा राहील!

27) आपला संघ हरत आहे असे वाटल्यास प्रेक्षकांपैकी कोणीही फलंदाजी अथवा गोलंदाजी साठी जाण्याचा हट्ट करू नये.

28) IPL नाव मराठी करावे....मध्यंतरात खो-खो चा सामना आयोजित करावा, चीअर गर्लनी नौ-वारी साडी नेसावी अशा मागण्या मान्य केल्या जाणार नाहीत.

29) प्रेमी जोडप्यांसाठी महत्वाची सूचना, हा झेड ब्रिज नाही आणि सामन्याचे थेट प्रक्षेपण चालू आहे ( पालकानो लक्ष द्या) याची नोंद घ्यावी.

30) कॅमेरा आपल्याकडे वळवला आहे अस समजून वेडे वाकडे चाळे करू नये...वेडे वाकडे चाळे करताना कोणी आढळल्यास सरकारी पाहुणचार खायची तयारी ठेवावी.

हा धागा मिपाकर छोटा डॉन यांनी लिहिला होता. कुणीतरी लिंक द्या रे.

मार्मिक गोडसे's picture

12 Dec 2015 - 4:35 pm | मार्मिक गोडसे

ही हवी आहे का?

भंकस बाबा's picture

12 Dec 2015 - 10:20 am | भंकस बाबा

संताच्या दोन्ही गालाला बैंडेज बघुन बंटाने विचारले, "काय झाले भाऊ?"
" आज सकाळी मी इस्त्री करत होतो तेवढ्यात एका हरामखोराने फ़ोन केला .गड़बडित मी इस्त्री कानाला लावली", संता बैंडेज कुरवाळत बोलला.
"अरे मग दुसऱ्या गालाला काय झाले?"
"मी गाल भाजला म्हणुन डॉक्टरकडे पळतच होतो, तेव्हढयात त्या हरामखोराने परत फ़ोन केला."

जव्हेरगंज's picture

13 Dec 2015 - 9:20 pm | जव्हेरगंज

एक नाग सापाला म्हणाला,
"काय रे सापड्या?"

मग साप त्या नागाला म्हणाला

"काय रे _______?"

ओळखा!

मग साप त्या नागाला म्हणाला

"काय रे, सरांकडे नेऊन सोडू का?"

योगी९००'s picture

14 Dec 2015 - 9:31 am | योगी९००

हाच जोक मी एका फेमस जुळ्या भावांच्या नावाने ऐकला होता..

नाव आडनाव's picture

14 Dec 2015 - 9:51 am | नाव आडनाव

शाळेत असतांना असा विनोद समोर झालाय - एकाचं आडनाव "सुतार" होतं आणि दुसर्‍याचं "भोस".

जयन्त बा शिम्पि's picture

13 Dec 2015 - 9:29 pm | जयन्त बा शिम्पि

नागड्या !

जयन्त बा शिम्पि's picture

13 Dec 2015 - 10:00 pm | जयन्त बा शिम्पि

नागड्या वरुन एक आठवले . महाभारतात दुर्याधन आणि भीम यांचे द्वंद युध्द ठरले असते. मुलाची काळजी वाटुन , गान्धारी ने आपल्या मुलास - दुर्योधनास - निरोप पाठविला की उद्या सकाळी माझ्याकडे ये , पण अंगावर कोणतेही वस्त्र न घालता ये. मी, लग्न झाल्यापासुन माझ्या डोळ्यांवर काळी पट्टी बांधली आहे. ती मी तुझ्यासाठी काढेन, त्यामुळे त्याच्या पुण्याईमुळे तुला पाहताच, तुझे सर्व अंग वज्रासारखे कठीण होईल, मग भीमापासुन तुला काहीही होणार नाही. त्याप्रमाणे दुर्याधन निघाला. " नागडा " ! ! पण , वाटेत त्याला किसन देवांनी बरोबर गाठलेच. विचारणा केली. दुर्योधनाने खरे तेच सांगुन टाकले ! त्यावर किसन देव म्हणाले, " अरे वेड्या , आई झाली म्हणुन काय झाले ? आईसमोर नागडा लहान होता तेव्हा ठीक होते , आता तु मोठा झाला आहेस. कमीत कमी ही फुलांची माळ तरी कमरेभोवती असु दे " असे म्हणुन किसन देवाने आपल्या गळ्यातील फुलांची माळ दुर्योधनास दिली. त्यालाही ते पटले आणि त्याने कमरेभोवती ती माळ गुंडाळली. गांधारी कडे पोहोचला. गांधारी ने विचारले, " बाळ , आलास काय ? " बाळाने उत्तर दिले, ' होय माते ." पुन्हा गांधारीने विचारले, ' माझी सुचना लक्षात आहे ना ? ' दुर्योधन ' होय , माते ' आणि त्यानंतर गांधारीने डोळ्यांवरची पट्टी काढली. दुर्योधनाकडे पहाताच गांधारी म्हणाली, " घात झाला रे पोरा, घात झाला . " दुर्योधनास काही कळेचना. त्यावर गांधारी म्हणाली, "वाटेत तुला कोणी भेटले होते कां ? ' दुर्योधनाने झालेला प्रकार सांगितला. त्यावर गांधारी म्हणाली,'
" देख, वह नटवर, तुझे फुलोंकी माला दे गया, जिंदगीके फुल तेरे चुनके ले गया !
मेरा क्या है दोष ईसमें , मै तो सच्ची रह गयी, जिस जगह पर्दा किया , वोह जगह कच्ची रह गयी !
आता यात विनोद कुठला आला ? असे काही विचारणारे विचारु शकतील. पण दुर्योधनाला किसन देवांनी कसे हातोहात बनविले, त्याची ष्टोरी सांगावीशी वाटली, म्हणून टंकीले.

अत्रे's picture

14 Dec 2015 - 2:32 pm | अत्रे

एल्.एल्.बी. चा वर्ग-

प्राध्यापक: जर तू एखाद्याला संत्रे देणार असशील तर काय सांगशील..?

विद्यार्थी: हे घे संत्रे.

प्राध्यापक: अरे असं नाही. वकिली भाषेत सांग.

विद्यार्थी: मी स्वतः पूर्ण शुद्धीत आणि कोणत्याही दबावाशिवाय, हे फळ ज्याला संत्रे असे म्हटले जाते, ज्यावर माझा पूर्ण मालकी हक्क आहे, ज्याचे साल, रस, बियांसहित आपणास देत आहे. त्याचबरोबर हे संत्रे फ्रीजमध्ये ठेवून देण्याचा, कापण्याचा, सोलून खाण्याचा किंवा रस काढून पिण्याचा हक्क आपणास देत आहे. आपण इतरही एखाद्या व्यक्तीला हे फळ त्याचे साल, रस, बियांसहित अथवा त्याशिवाय हस्तांतरित करण्याचा अधिकारही मी आपल्याला देत आहे. मी याद्वारे हे घोषित करतो की, या संत्र्यासंदर्भात यापूर्वीचे कोणत्याही प्रकारचे भांडण, वादविवाद याची संपूर्ण जबाबदारी माझीच असेल. यानंतर या फळाशी माझा काहीही संबंध नसेल..!

प्राध्यापक: आपले चरणकमल कुठे आहेत..?

भंकस बाबा's picture

15 Dec 2015 - 8:43 pm | भंकस बाबा

एका उंच इमारतीत काम चालु होते.
अचानक एका मजुराकडून एक फरशि निसटली व् खाली उभ्या असलेल्या दुसऱ्या मजुराच्या कानाचा अख्खा तुकडा घेऊन गेली . तो मजूर बेशुद्ध झाला. ताबडतोब त्याला हॉस्पिटलमधे हलवण्यात आले.
हॉस्पिटलमधे तातडीने त्याच्या कानावर शस्त्रक्रिया करण्यात आली. आठ तासांच्या अथक परिश्रमानंतर तो तूटलेला कान जशाचा तसा लावण्यात डॉक्टरांना यश आले.
इथे बाहेर मुकादम हॉस्पिटलचे बिल पाहून हाशहुश् करत होता.
तो मजूर शुद्धिवर आल्यावर डॉक्टरांनी त्याला विचारले की सर्व ठीक आहे ना.
मजुराने घाबरा चेहरा करत कानाला हात लावला व् अगम्य अशा भाषेत बडबडू लागला.
आता मात्र मुकादमाचे धाबे दणालले. कानाने जर ऐकू येत नसेल तर त्याला मोठी नुकसान भरपाई द्यावी लागली असती.
तो मजूर केरळी असल्यामुळे त्याची भाषा कोणाला कळत नव्हती. शिवाय हॉस्पिटलमधे कोणी केरळी नव्हते.
बांधकामाच्या साइटवरुन एका हिंदी जानणाऱ्या केरळीला बोलावण्यात आले.
त्याने त्या अपघातग्रस्त मजुराला केरळी भाषेत विचारले.
परत तसाच घाबरा चेहरा करत, कानाला हात लावत त्या मजुराने उत्तर दिले.
बाहेर येऊन त्या दुभाश्याने भाषांतर करून सांगितले,
" वो काम कर रहा था तबी उसके कनपट्टी पे बीड़ी रखा था। वो बीडीच उसको मिल नही रहा है।"

जॉनी लिवर कडून

भंकस बाबा's picture

20 Dec 2015 - 9:21 am | भंकस बाबा

रशियामधे तीन भारतियाना अमली पदार्थाचा व्यापार करण्याबद्दल पकडण्यात आले.
या गुन्ह्यासाठी रशियामधे एकच सजा, मृत्युदंड, म्हणजे गिलोटिनखाली मान उडवणे.
या तिघात होता एक हिन्दू, एक मुस्लिम व एक शिख.
सजेच्या आदल्या दिवशी हिन्दुला त्याची अंतिम इच्छा विचारण्यात आली.
हिंदुने गीता वाचन्याची इच्छा व्यक्त केली.कम्युनिस्ट रशियन सैनिकानि त्याची प्रथम खिल्ली उडवली पण गीता उपलब्ध करून दिली.
रात्रभर हिन्दू कैदी गीतापठन करत होता.
दुसऱ्या दिवशी गिलोटिनखाली त्याला ठेऊन खटका ओढला असता गिलोटिनचे पाते त्या कैद्याच्या मानेपासून दोन इंचावर अडकले. नियमानुसार त्या कैदयाला सोडून देण्यात आले.
मुसलमान कैद्याने कुराण मागितले. त्याला कुराण देण्यात आले.
रात्रभर कुराणपठण करून सकाळी त्या कैदयाला गिलोटिनखाली जेव्हा ठेवण्यात आले तेव्हा आधीची पुनरावृत्ति झाली. गिलोटिनचे पाते कैद्याच्या मानेपासून दोन इंचावर अडकले. त्याला पण सोडून देण्यात आले.
तिसऱ्या दिवशी रशियन सैनिकानी सरदारजिला स्वतःहून विचारले की तुला ग्रन्थसाहिबां पाहिजे का?
सरदारजीचे उत्तर, " ओय, ओ ग्रंथसाहिब छोड़ ,पहले तेरा वो ब्लेड ठीक कर।"

जव्हेरगंज's picture

23 Dec 2015 - 9:12 pm | जव्हेरगंज

खिक्क!

हा भारीय!!

रुस्तम's picture

23 Dec 2015 - 9:35 pm | रुस्तम

हा हा हा

हसू आलं...पर साला मरेगा अब!

शान्तिप्रिय's picture

21 Dec 2015 - 3:02 pm | शान्तिप्रिय

भिकारी( सिग्नलवर ): पाच रुपये का सवाल है बाबूजी.
...............................
...............................
...............................
...............................
...............................
...............................
कारवाला : पूछ ले| मुझे हर सवाल का जवाब आता है|

शान्तिप्रिय's picture

21 Dec 2015 - 3:02 pm | शान्तिप्रिय

भिकारी( सिग्नलवर ): पाच रुपये का सवाल है बाबूजी.
...............................
...............................
...............................
...............................
...............................
...............................
कारवाला : पूछ ले| मुझे हर सवाल का जवाब आता है|

नूतन सावंत's picture

21 Dec 2015 - 9:33 pm | नूतन सावंत

विन्या पत्रीमध्ये रात्री उशिरापर्यंत 'रम'ला.लॅचकीने दर उघडून,दिवान्न्खान्यातच कपडे चेंग करू,,हळूच दर उघडून बेडरूममध्ये शिरला.बिछान्यात शिरणार इतक्यात बेडरुमच्या घड्याळातली कोकिला ओरडू लाग,"कुक् कुक, कुक् कुक,कुक् कुक, कुक् कुक"...
पहाटेचे चार वाजले होते.
अचानक विन्याच्या डोक्यातलं विचारचक्र गरगरलं.कोकिला चार वेळा 'कुक् कुक' करणार,त्यानंतर आपण बेडमध्ये शिरणार,म्हणजे आपण पहाटेपर्यंत बाहेर उलथलो होतो,हे बायकोला सहज कळणार.ती तमाशा करून घर डोक्यावर घेणार.हे टाळायला हवंय.क्षणार्धात त्याच्या डोक्यात ट्यूब पेटली,'आपणच कोकिळेचा आवाज काढून रात्रीचे १२ वाजवले तर?'
तेव्हा चौथ्या 'कुक् कुक' नंतर विन्याने पुढचे आठ 'कुक् कुक'केले आणि तो बिछान्यात शिरला.
बायकोने विचारलंच,"किती वाजलेत?"
"बाराच तर वाजतायत आताशी",असं म्हणून विन्या गाढ झोपून गेला.
दुसऱ्या दिवशी सकाळी बायको म्हणाली,"हे घड्याळ दुरुस्तीला न्यायला हवंय."
"का ग",विन्याने विचारलं.
"अरे,काल मध्यरात्री या घड्याळातली कोकिळा बिघडली होती.चारवेळा व्यवस्थित 'कुक् कुक'केल्यावर ती 'ओह शिट म्हणाली.नंतर तीनवेळा 'कुक् कुक'केल्यावर तिने घसा खाकरला.आणखी तीनवेळा 'कुक् कुक'केल्यावर ती कॉर्नर टेबलाला अडखळली.आणि शेवटचे दोन 'कुक् कुक'केल्यावर तर ती चक्क शिंकली!!!!!!!!!!!!!"

रुस्तम's picture

23 Dec 2015 - 9:35 pm | रुस्तम

मस्तच..

बोका-ए-आझम's picture

24 Dec 2015 - 7:38 am | बोका-ए-आझम

एक माणूस एकदा एका सर्कसमध्ये नोकरी मागायला गेला.
सर्कस मालक - काय करु शकतोस तू?
माणूस - पक्ष्यांची नक्कल करु शकतो!
मालक - हॅ!हे असे पक्ष्यांची नक्कल करणारे पैशाला पासरी आहेत माझ्याकडे!
माणूस - म्हणजे मला नोकरी मिळू शकत नाही?
मालक - नाही!

माणूस खिडकीतून उडून गेला.

माणूस खिडकीतून उडून गेला. (??)

Smiley
..

मराठी कथालेखक's picture

24 Dec 2015 - 11:05 am | मराठी कथालेखक

आज एका बसच्या मागे एक मोठा विनोद वाचायला मिळाला
"BSNL जबरदस्त आणि विश्वसनीय मोबाईल नेटवर्क"

तुम्हाला त्यातला कॉपी मॅटर लक्षात राह्यला हाच मोठ विनोद आहे.
आम्हाला फक्त दिपिका लक्षात राहते. सध्या सोडले वाटते बीसेनेल तिने.
अ‍ॅक्सिस बँकेत दिसते आजकाल.

मयुरMK's picture

24 Dec 2015 - 11:51 am | मयुरMK

.

भंकस बाबा's picture

24 Dec 2015 - 4:22 pm | भंकस बाबा

राजीव गांधिनी पक्षासाठी अध्यादेश काढला.
सर्व कॉंग्रेस मधील नेत्यांना इंग्रजी आलेच पाहिजे. आणि महिन्याच्या शेवटी स्वतः राजीवजी सर्वाची परीक्षा घेणार.
मग काय सगळ्याची एबीसीडी पासून सुरुवात झाली.
पंधरा दिवसानंतर झैलसिंगच्या घरी राजीवजी गेले असता त्यांनी या आदेशाबद्दल चिंता व्यक्त केलि.
झैलसिंगनी याचे कारण विचारले.
राजीवजीनी सांगितले की मी बुटासिंगला इंग्लिशच्या अभ्यासाच्या प्रगतिबद्दल विचारले की कसे चालले आहे. बुटासिंगने सांगितले की आता मला ए टू झेड व्यवस्थित येतात. मी त्याला बोललो की बोलून दाखव. तर तो बोलला ,कोणती बोलू? कैपिटल लेटरवाली की स्मॉल लेटरवाली. हे भगवान काय होणार या देशाचे? काय पागल माणूस आहे.
झैलसिंग हसत बोलले ,बुटासिंग ना लहानपणापासुन अस्साच वेडेपणा करतो . कधी काय बोलायचे हेच त्याला कळत नाही. पण एक विचारू साहेब? त्याने त्या दिवशी कोणती एबीसीडी बोलली? कैपिटलवाली का स्मॉलवाली?

भंकस बाबा's picture

26 Dec 2015 - 10:17 pm | भंकस बाबा

भाजीवालीकडून एका मॉड मुलींने भाजी घेतल्यावर तिला भाजीवालीने विचारले,
"बाई , तुम्ही डब्बल ग्रेजुएट दिसताय!"
"अय्या, तुम्ही कसं ओळखल?" भारी लाडिक चेहरा करुन ती मुलगी उत्तरली.
निर्विकार चेहऱ्याने भाजीवाली बोलली," मी तवांच् ओळखला तुम्ही डब्बल ग्रेजुएट असणार,जवां तुम्ही पैलान्दा टामाटे घेतले मग त्यावर भोपळा ठेवला."

भंकस बाबा's picture

28 Dec 2015 - 8:56 am | भंकस बाबा

संतासिंग पार्टीत विनोद ऐकल्यावर तीनदा हसतो.
पहिल्यांदा जेव्हा पार्टीत सगळे हसतात म्हणुन!
दुसऱ्यांदा जेव्हा तो घरी जातो व त्याला तो विनोद कळतो म्हणुन!
तिसऱ्यांदा जेव्हा त्याला कोणीतरी तो विनोद काय होता हे समजावून देते तेव्हा!

ऑफिसमध्ये प्रमोशनसाठी मुलाखती सुरू असतात. बाळू पाटलाचा नंबर येतो.....

बॉस : बाळू पाटील आपण सर्वात पहिली तुझी इंग्रजीची टेस्ट घेऊयात. मी जे शब्द बोलेन तु त्याच्या विरूध्दार्थी म्हणजे Opposite शब्द सांगायचास.

बाळू पाटील : ओके सर. विचारा प्रश्न.

बॉस : Good
बाळू पाटील : Bad

बॉस : Come
बाळू पाटील : Go

बॉस : Ugly
बाळू पाटील : Pichhli.

बॉस : Pichhli??
बाळू पाटील : Ugly.

बॉस : Shut Up!
बाळू पाटील : Keep talking.

बॉस : Now stop all this...
बाळू पाटील : Then carry on all that.

बॉस : अरे गप्प बस..., गप्प बस... गप्प बस...
बाळू पाटील : अरे बोलत रहा, बोलत रहा, बोलत रहा...

बॉस : अरे यार...
बाळू पाटील : अरे शत्रू...

बॉस : Get Out.
बाळू पाटील : Come In.

बॉस : My God.
बाळू पाटील : Your Devil.

बॉस : shhhhhhh....
बाळू पाटील : hrrrrrr....

बॉस : माझ्या बापा..... गप्प बस जरा.
बाळू पाटील : माझ्या मुला... बोलत रहा.

बॉस : You are rejected.
बाळू पाटील : I am selected.

बॉस : देवा तुमचे चरण कुठे आहेत.
बाळू पाटील : वत्सा माझे डोके इथे आहे.

बॉस : बाप रे, कोणत्या वेड्याशी गाठ पडली माझी.
बाळू पाटील : आई गं, कोणत्या हुशार व्यक्तीशी गाठ पडली तुझी.

बॉस : साल्या, उचलून आपटेन तुला.
बाळू पाटील : भावजी, पालथा करून उचलून घेईन तुम्हाला.

मग बॉसने वैतागून बाळू पाटीलला एक झापड मारली.
बाळू पाटीलने बॉसला दोन झापड मारल्या.

बॉसने मग चार झापडा मारल्या.....
मग तर बाळू पाटीलने बॉसला मारून मारून बेशुध्दच केले.

त्यानंतर बाळू पाटील स्वतःशीच म्हणाला.......... साहेब उद्या शुध्दीवर आले की, त्यांना निकाल विचारतो. तसे तर त्यांच्या सर्वच प्रश्नांची उत्तरे मी बरोबर दिली आहेत असे मला वाटते.

भंकस बाबा's picture

21 Feb 2016 - 8:50 pm | भंकस बाबा

बंटीच्या घरचा नळ गळत होता. त्याने त्यासाठी प्लम्बरला बोलावले.
प्लम्बर आला,पण नेमके त्याचवेळी बंटिला जरूरी कामासाठी बाहेर जायचे होते.
बंटिने प्लम्बरला सुचना दिली की काम करून तो निघुन गेला तरी चालेल फ़क्त घरातील कोणत्याही वस्तुला हात लावू नको, कारण घरात एक रोट्वीलर आहे. तो काहि करणार नाही, पण एखाद्या वस्तुला हात लावला तर फाडून खाइल. एरवी तो घराच्या एका कोपर्यात पडून राहील, पण हो घरात एक पोपट पाळलेला आहे , त्याच्याशी मात्र अजिबात बोलू नको.
इतके बोलून बंटी जायला निघाला . जाताजाता परत एकदा त्याने वॉर्निग दिली की पोपटाशि अजिबात बोलू नको.
थोड्या वेळाने प्लम्बरचे काम संपले. तो जायला निघाला. बंटिने सांगीतल्याप्रमाने रोट्वीलर अगदी शांत झोपुन होता. जाताना अचानक पोपट बोलला ए मिथुन. प्लम्बरने ते ऐकले व् बोलला माझे नाव मिलिंद आहे. तोच परत पोपट बोलला अरे गाढ़वा मिथुन आमच्या कुत्र्याचे नाव आहे.
प्लम्बर चिडला व् बोलला मुर्ख पोपटा गप्प बस नाहीतर मुंडी पिरगळून टाकिन.
आता पोपट चिडला व् बोलला 'कम ऑन मिथुन , कैच हिम'

भंकस बाबा's picture

27 Jul 2016 - 4:09 pm | भंकस बाबा

एका घरात रात्री एक चोर घुसला,
घरात कोणीच नव्हते ,चोराने एक मंद उजेडाचा टॉर्च लावला व् घरातील किमती सामान शोधू लागला,
तोच एका कोनाडयातुन आवाज आला,
"पांडुरंग सगळे बघत आहे"
चोर घाबरला व् आवाजाच्या विरुद्ध दिशेला एका पलंगाआड लपला,
थोडा वेळ सर्वत्र शांतता पसरली,
चोराने अंधारात टॉर्च मारला,
परत आवाज आला,
"पांडुरंग सर्व बघत आहे"
आता चोराने आवाजाच्या दिशेने टॉर्चचा उजेड फेकला,
तिथे एक पोपट दिसला,
चोराने विचारले की तू हे बोललास का?
पोपट कर्कश आवाजात बोलला होय,
आता चोर निर्धास्त होऊन बाहेर पडला व् बोलला
"नाव काय तुझे"
" मला आग्यावेताळ बोलतात" पोपटाने गुर्मीने उत्तर दिले,
चोर हसत बोलला,
" हे कोण मुर्ख लोक आहेत जे पोपटाचे नाव आग्यावेताळ ठेवतात?"
पोपट कॉय कॉय करत बोलला,
" हे तेच मुर्ख लोक आहेत जे घरात वाघ पाळतात,त्याला घरात मोकळा सोडतात, आणि त्याचे
नाव पांडुरंग ठेवतात आणि गमतीची गोष्ट अशी की हि मुर्ख लोक आज पांडुरंगाला खायला घालायला
विसरली आहेत"

सरल मान's picture

27 Jul 2016 - 5:38 pm | सरल मान
सरल मान's picture

27 Jul 2016 - 5:40 pm | सरल मान
सरल मान's picture

27 Jul 2016 - 5:40 pm | सरल मान
सरल मान's picture

27 Jul 2016 - 5:42 pm | सरल मान
सुंड्या's picture

27 Jul 2016 - 10:59 pm | सुंड्या

एक बाई एका म्हातारीला- "आग बाई या वयात सुद्धा कपाळावर 'टिकली', नशीबवान आहात"
म्हातारीचे मार्मिक उत्तर- "अगं टाकल्या टिकला म्हणून 'टिकली' टिकली!!"

नरेश माने's picture

20 Aug 2016 - 1:55 pm | नरेश माने

गुरूजी : सुखकर्ता दु:खहर्ता ही आरती कोणी लिहिली आहे?
बंड्या : दर्शन म्हात्रे.
गुरूजी : काय?....... कशावरून?
बंड्या : आरतीत स्पष्ट म्हटलंय..... दर्शन म्हात्रे मन कामनापुर्ती.
:
:
गुरूजी अवाक.............. थोड्यावेळाने....

बंड्या : आता मला सांगा... दर्शन म्हात्रेच्या वडीलांचे नाव काय?
गुरूजी : नाही माहिती... सांग तूच.
बंड्या : हेळा.
गुरूजी : कसं काय?
बंड्या : पांडुरंगाची आरती.... दर्शन हेळा म्हात्रे तया होय मुक्ती जयदेव जयदेव.....
:
:
:
:

गुरूजी आता पंढरपुरच्या वारीला गेलेत.