आली लहर केला कहर.

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जे न देखे रवी...
5 Dec 2015 - 5:29 pm

आली लहर केला कहर....... मित्रासाठी आमची एक कविता
=======
आली लहर
केला कहर
होऊदे खर्च
कशाला फिकर?

चंद्रा वाणी मुखडा
काळजाचा तुकडा
ज्वानीचा कहर
इष्काचा बहर

नौ वारी साडी
तंगशी चोळी
नजरेत धार
काळजावर वार

खुदकन हसली
काळजाला डसली
जिवाला घोर
झोपेच खोबरं

धरला हात
घातली मागणी
खुदकन हसली
शुक्राची चांदनी

आई सरपंच.
बाप आमदार
आली लहर
केला कहर
होऊदे खर्च
कशाला फिकर?
अविनाश

प्रेमकाव्य

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

5 Dec 2015 - 5:38 pm | अत्रुप्त आत्मा

अकुं चा धागा sssss

मी पयला!

मांत्रिक's picture

5 Dec 2015 - 9:52 pm | मांत्रिक

दुत्त दुत्त बुवा!!! दुसर्यांना पण देव दे की परतिसाद पैला!!!
अक्कुकाका जियो!!!

तुषार काळभोर's picture

5 Dec 2015 - 5:40 pm | तुषार काळभोर

धरला हात
घातली मागणी
खुदकन हसली
शुक्राची चांदनी

जेपी's picture

5 Dec 2015 - 5:48 pm | जेपी

+1

जव्हेरगंज's picture

6 Dec 2015 - 11:44 am | जव्हेरगंज

खिक्क!
;-)

बिन्नी's picture

5 Dec 2015 - 5:45 pm | बिन्नी

तुमची ही कविता पण आली लहर केला कहर टैअपच आहे.

टवाळ कार्टा's picture

5 Dec 2015 - 6:10 pm | टवाळ कार्टा

तुम्ची स्टुरी भारी...तुम्ची क्विता भारी...च्यामायला अकुंच लय भारी :)

टवाळ कार्टा's picture

5 Dec 2015 - 6:12 pm | टवाळ कार्टा

चायला तो अनुस्वार "च"वर टाकारे कोणीतरी...अर्थाचा अनर्थ झाला टायपिंग मिश्टेकमुळे

दमामि's picture

5 Dec 2015 - 6:13 pm | दमामि

हेच लिहिणार होतो=))

शिव कन्या's picture

5 Dec 2015 - 9:30 pm | शिव कन्या

:) :)

शांताबाईवरून कल्पना ढापली आहे. मी शांताबाई गाण्याचा पूर्ण अभ्यास केला आहे. एका दांडियामधे सलग अर्धातास गायकाल हेच गाणं गातांना ऐकलंय, तस्मात माझ्या इतका अभ्यास कुणाचाच नाही, स्वतःला कवी म्हणवणारे लोक सरळ शांताबाइगाण्यातले शब्द चोरुन इथे लिहितात आणि इथली मंडळी काही बोलत नाहीत म्हनून मी गप्प बसणार नाही.

मुखडा तुकडा, लहर कहर ह्या शब्दांचा अर्थ काय?

नुसतं शब्दामागे शब्द लिहून रेल्वेगाडी करणे म्हणजे आपण फार तीर मारलेत असे जर कवीला वाटत असेल तर त्याने भ्रमाच्या राज्यातून खाली उतरावे. कारण मला ह्या कवीच्या केल्या जाणार्‍या फाल्तू कौतुकचा ज्वलशील राग येत असून मला तो जुन्या खोकल्याप्रमाणे आवरता येत नाहीये. जुन्या खोक्ल्याचा म्ह्णजे मी जुनाच आहे, खोकला ही जुना अहे.

कवीला मुळ गीताची मजा अजिबात कळलेली नाही. त्याने असल्या कविता प्रसवून मला आव्हान देऊ नये.

मी मी मी मी मी मी मी माझे मला माझ्यामुळे मला पाइजे तसे मला पाहा फुले वाहा मी म्हनतो तेच खरे.

- चिवट कापूर

चांदणे संदीप's picture

5 Dec 2015 - 10:20 pm | चांदणे संदीप

लंबरी परतिसाद! =))

पण, मला आवडली कविता! ;-)
Sandy

अविनाशकुलकर्णी's picture

5 Dec 2015 - 10:30 pm | अविनाशकुलकर्णी

कविता २०११ साली लिहिली आहे

पीके's picture

6 Dec 2015 - 6:42 am | पीके

सिध्द करा...

बॅटमॅन's picture

6 Dec 2015 - 4:26 pm | बॅटमॅन

=)) =))

बाकी संक्षी ऊर्फ विवेक ठाकूर आणि आमचे निराकार गाडाव यांची पुनरेकवार लय म्हणजे लयच जुंपणार तर. =))

अविनाशकुलकर्णी's picture

6 Dec 2015 - 4:25 pm | अविनाशकुलकर्णी

.

DEADPOOL's picture

6 Dec 2015 - 5:51 pm | DEADPOOL

Ata purava dila ahe tar, Dangesaheb purava kasa khodatat te pahanyas utsuk!
kavita aavadali!

नाखु's picture

8 Dec 2015 - 10:16 am | नाखु

तर डांगे प्रतीसाद दस नंबरी !

धूप दीप झाला आता कापूर आरती वाला नाखु