बहरलेल्या ताटव्या, एक कळी उमलू दे
जास्त नाही.. अस्तित्वाला थोडा तुझा बहर दे.
धगधगणार्या विस्तवा, एक निखारा फुलु दे
जास्त नाही.. प्रेमाला थोडी तुझी धग दे.
शहारलेल्या रात्री, एक प्रहर ढळू दे
जास्त नाही.. स्पर्शाला थोडा तुझा शहारा दे.
रंगलेल्या आभाळा, एक छटा खुलू दे
जास्त नाही.. आयुष्याला थोडा तुझा रंग दे.
तेजाळलेल्या पहाटे, एक किरण उधळू दे
जास्त नाही.. मृत्युला थोडे तुझे तेज दे.
प्रतिक्रिया
18 Nov 2015 - 8:30 am | विशाल कुलकर्णी
वाह...
18 Nov 2015 - 8:41 am | अत्रुप्त आत्मा
वाहव्वा! मस्सस्सस्त!
18 Nov 2015 - 10:12 am | मांत्रिक
मस्त आहे!
18 Nov 2015 - 10:47 am | यशोधरा
आवडली.
18 Nov 2015 - 10:51 am | चांदणे संदीप
छानच!
आवडली कविता!
18 Nov 2015 - 11:13 am | ज्ञानोबाचे पैजार
उघडलेल्या बाटल्या, एक लार्ज होऊ दे
जास्त नाही.. चखण्याला थोडा शेंगदाणा दे.
फसफसणार्या सोडुल्याची, वरुन धार येऊ दे
जास्त नाही..चावी साठी कापलेले लिंबू दे.
झिंगलेल्या रात्रीसाठी, एक खंबा ढोसू दे
जास्त नाही.. किक पुरता गोल्ड फ्लेक चा कश दे.
सुवर्णरंगी द्रव्याची, हरेक छटा खुलू दे
जास्त नाही.. थोडासा चीजटोस्ट तरी खाऊ दे.
रंगलेल्या रात्रीची, सकाळ दुपारी होऊ दे
जास्त नाही.. पण न विसरता वेटरला टिप दे.
पैजारबुवा,
18 Nov 2015 - 11:39 am | रातराणी
_/\_
मी वाट पहातच होते :)
18 Nov 2015 - 11:54 am | मांत्रिक
पैजारबुवा दंडवत घ्या..
बाकी कधी 'बसायचं' बोला ;)
18 Nov 2015 - 12:08 pm | बॅटमॅन
हाण्ण तेजायला =)) =)) =))
मूळ कविताही मस्तच.
18 Nov 2015 - 12:56 pm | ज्ञानोबाचे पैजार
मुळ कविता अतिशय आवडली हे सांगायचे राहिलेच.
पैजारबुवा
18 Nov 2015 - 1:07 pm | रातराणी
बस का पैजारबुवा. अब रुलायेंगे क्या बच्चीको?
भावना पोचल्या तुमची प्रतिक्रिया पाहूनच :)
18 Nov 2015 - 2:02 pm | टवाळ कार्टा
टंकायला आलेलो ;)
19 Nov 2015 - 5:55 pm | नाखु
आणि पैजार मधुशाला उत्तम !!
आस्तीक नास्तीक धाग्यांनी कावलेला नाखु
18 Nov 2015 - 11:46 am | सागरकदम
मस्त
विडंबन केले तर चालेल का ?
18 Nov 2015 - 12:08 pm | रातराणी
जरूर! होऊन जौ द्या.
18 Nov 2015 - 2:36 pm | सागरकदम
सपक आणि पांचट विडंबन झालेय
बहरलेल्या धाग्या , एक प्रतिसाद उमलू दे
जास्त नाही.. वाचनाला थोडा तुझा बहर दे.
धगधगणार्या कंपूबाजी , एक ही आणि हि फुलु दे
जास्त नाही.. भांडणाला थोडी तुझी धग दे.
शहारलेल्या खरडवहीत , एक व्यनि पडू दे
जास्त नाही.. धाग्याला थोडा तुझा सहारा दे.
रंगलेल्या भेटीस , एक चर्चा खुलू दे
जास्त नाही.. FONT थोडा तुझा color दे.
फेसाळलेल्य रात्री , एक शतकीधागा उधळू दे
जास्त नाही.. आयडीला थोडे तुझे तेज दे.
18 Nov 2015 - 8:42 pm | रातराणी
नोप. नाय जमल ;)
कंपूद्वेषाला अजून धार येण्यासाठी क्योंकी जुना आयडी कभी णवसदस्य था आणि अवघीची ही कंपूगिरी या मालिका रोज न चुकता पहा असा सल्ला देते.
19 Nov 2015 - 6:43 pm | सागरकदम
प्रत्येक अयशस्वी विडंबना मागे ____ असते
19 Nov 2015 - 8:33 pm | टवाळ कार्टा
अर्र्र्र्र्र्र...अस्स एक्दम नै फुटवायचे...आधी तु त्याच्याशी भांडशील...मग तो तुला तो आव्डायची वाट बघत बस्णार...सुप्प पौव्वर है त्याची ती =))
मला ठिक वाट्ले रे विडंबन :)
19 Nov 2015 - 11:08 pm | सागरकदम
mala ekda tula bhetayche ahe
19 Nov 2015 - 11:32 pm | सागरकदम
@टका
मला ekda bhetayche aahe
20 Nov 2015 - 11:55 am | टवाळ कार्टा
या की...इतके कट्टे होतात मिपाचे
18 Nov 2015 - 12:01 pm | पद्मावति
आहा..सुरेख.
18 Nov 2015 - 12:12 pm | रातराणी
धन्यवाद सर्वांचे!
एक शंका आहे शेवटच्या कडव्यात उधळू दे च्याऐवजी उजळू दे योग्य वाटेल ना?
तेजाळलेल्या पहाटे,एक किरण उजळू दे असं?
18 Nov 2015 - 12:23 pm | बॅटमॅन
नाही. पहाट अगोदरच तेजाळलीय तर किरण उजळू दे असे म्हणण्याची गरज काय? त्याऐवजी जे तेज आहे त्यातला एक अंश इकडे उधळून दे हे जास्ती योग्य आहे.
18 Nov 2015 - 12:43 pm | रातराणी
धन्यवाद! उधळू दे म्हणताना मुक्त कर असाच आशय अभिप्रेत होता. पण कन्फुज्न झालं नंतर.
18 Nov 2015 - 12:25 pm | तिमा
शेफारलेल्या बाटग्या, एकतरी निषेध उमटू दे
जास्त नाही.. तू त्यांतला नाहीस, हे कळू दे
18 Nov 2015 - 8:41 pm | एक एकटा एकटाच
उ त्त म !!!!!!!!!!!!!!
मस्तच आहे.
18 Nov 2015 - 9:14 pm | एस
सुंदर कविता!
19 Nov 2015 - 5:43 pm | शिव कन्या
मस्त जमलेय!
19 Nov 2015 - 6:00 pm | मितान
व्वा ! मस्त कविता !
20 Nov 2015 - 12:15 am | रातराणी
धन्यवाद :)
20 Nov 2015 - 12:26 am | रुपी
छान..