कालच एका विलक्षण जोगायोगाला सामोरा गेलो.
हो हो जोगा योगाचा अर्थ सांगतो जुळवलेला योग आणि नंतर आपोआप आलेला योगायोग.
त्याचे असे झाले नातेवाइकांमधील एक एका दूरच्या नातेवाईकांची एकसष्ठी कार्यक्रम होता.पुण्याच्या दक्षीण भागात. अनायसे लेकाला दिवाळीची सुट्टी मग त्याला एखादा सिनेमा दाखवावा हा कार्यक्रम झाल्यावर.त्या अनुषंगाने राहुल सिनेमाग्रुहात तिकिटे आरक्षीत केली आणि सक्काळी व्हाया (तुळशीबाग: फक्त चहा पावडर खरेदी व लेकासाठी चाम्डी कंबरपट्टा - पक्षी बेल्ट )खरेदी करून.
अता कार्यक्र्माची वेळ सकाळी दहाची आणि कार्यक्रम स्थळी मी , मुलगा आणि उत्सवमुर्ती कुटुंब इतकेच होतो. हळूहळू शिस्तीत (आणि सुस्तीत) उपस्थीती वाढू लागली.मधल्या वेळात जर कार्यक्रम लवकरच म्हणजे १-३० पूर्वी आटोपला तर शाळूसोबती
(ज्यांचे बरोबर गेल्याच महिन्यात तब्बल ३३ वर्षांनी भेट झाली आणि त्यांचेबरोबर स्नेहसंमेलनात सहभागी झालो)
त्यातल्या काही नगांना भेटण्याचा मानस होताच.
कसंकायप्पा क्रिपेने माहीती पाठवून (गडावर वार्ता) कळविली आणि मी कार्यक्रम च्या सभाग्रुहात स्थानापन्न झालो.
जुजबी बोलण्यानंतर विरंगुळ्यासाठीच मोबल्याचा शोध लागला आहे, या संधीचा पुरेपूर फायदा उचलीत असतानाच.सत्कार मूर्तींच्या गुणगौरवाचा स्मारंभ समारंभ (पक्षी भाषण) सुरू झाले आणि त्यांच्या कन्येच्या वाक्याने मोबल्यातून बाहेर येऊन लक्ष्य देणे भाग पाडले.
"मला बाबांनी कधीही तू मुलगी म्हणून असा दुजाभाव केला नाही,शिक्षणाचे बाबत आणि करिअरचे न बाबत पूर्ण स्वातंत्र्य दिले. रूढार्थाने वेङले वेगळ्या अश्या संस्क्रुत भाषेच्या अभ्यासास प्रोत्साहन दिले आणि खंबीर पाठींबा दिला. त्यामुळेच पुढे मी संस्कृतच्या अध्ययनास वाहून घेतले आणि माझा आवचा विषय शिकविण्याचे ध्येय पुरे करू शकले"
त्यानंतर पोटपूजा करून मोर्चा शाळू सोबत्यांच्या परिसराकडे वळविला, फोना फोनी करून दोन मोहरे मिळविले दोन स्थानभ्रष्ठ असल्याने मिळाले नाहीत. त्यांनी मारलेल्या सलगीच्या हाका आणि केलेला प्रेमळ उद्धार पाहून आपला बाप ही "शाळा गिरी" करीत होता याची लेकाला खात्री पटली आणि तो निर्धास्त झाला.(त्याच्याशी दोस्ती आणखी वाढवायला हवी आता).
मित्रांना "मला शिनुमाला जायचेय आणि तेही लेकाला घेऊन हे सांगीतले"(आणी त्यांचे आश्चर्य संपण्यापूर्वीच) आणि अर्ध्या तासाची भेट फक्त दीड तासात संपवली आणि तडक मोर्चा "राहुल"कडे वळविला.
गर्दी आणि दर्दी बर्यापैकी, आपली जागा धुंडाळण्यात नवी पिढी भलतीच स्मार्ट आहे याचा पुनःप्रत्यय आला. आणि आसनस्थ झालो.
पुढील अडीच-तीन तास मंतरलेले.
उभी रेघ :
- भाग दुसरा असला तरी पहिल्या इतकाच (थोडा जास्तच ) सरस.मेलो ड्रामा टाळला आहे
- आपल्याला काय मांडायचे आहे त्याचे लेखकाला आणि दिग्दर्शकाला भान आहे आणि कुठेही गोंधळ संभ्रमावस्था नाही.
- खटकेबाज आणि चुरचुरीत संवाद.
- सर्व व्यक्तीरेखांना न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे.
- "मितवा" सारखी शाहरूखगिरी टाळली आहे.
- संवाद फेकीत अगदी उस्फुर्तता हे बलस्थान.
- चित्रपट कथा एखादा "खून" प्रेक्षकांसमूर समोरच झालेला असूनही कथानायक त्याचा कसा रहस्य्भेद करतो त्याची उत्सुकता असते आणि तो चित्रपटात गुंततो तेव्हढीच उत्सुकता नायीका नायकालाच मिळणार हे माहीत असूनही प्रेक्षकांना गुंतवीते.
- आपण नक्की कशाला अवाजवी महत्व देतोय ह्याची नायीकेला "जाणीव" करून देताना नायक कुठलाही "भावनीक-शब्दबंबाळ" आक्रस्ताळी भाव करीत नाही.
- जो काही निर्णय घ्यायचा तो तूच घे, आणि चुकीचा निर्णय घेण्यापेक्षा वेळीच काहीही निर्णय न घेणे हेच जास्त अविचारी+घातक आहे. हे सौम्य शब्दात समजावतो.
- रूढार्थाने एक खलनायक-कौटुंबीक कट कारस्थान-गुलाबी स्वप्ने-कुतरओढ-त्याग असा कुठलाही साचेबंद मसाला वाटलेला नाही.
- आणि तरीही कथा चटपटीत आणि प्रवाही ठेवली आहे.
तिरकी रेघ
- मावशीचे दुख: एका वाक्यात दाखविले आहे. तीच्या आयुष्यातील "एकटेपणा आणि आलेला फोलपणा" पुरेसा ठसला नाही.
- नायीकेचे वडील मुलीला अगदी मित्रासमान वागतात तरी ती कायम त्यांना शेवटपर्यंत अंधारात का ठेवते हे समजत नाही.
- नायकाचे वडील मित्र असल्याने जरा जास्तच मोकळे ढाकळे दाखविले आहेत. ते प्रेक्षकांच्या कितपत पचनी पडतील हे माहीत नाही. (हिंदी सिनेमातील ग्रुहीतके+आचार विचार मराठीत चालत नाहीत असे पूर्वसूरी म्हणतात) आम्हाला माहीत नाही.
- नायीकेचा पूर्वाष्र्श्रमीचा दोस्त कम प्रियकर हाही जरा गोंधळीच दाखविला आहे.
आडवी रेघः
हा सगळ्यांना आवडेलच असं नाही. प्रत्येक मिपाकराला आपली आपली एक (पेट असलेली) मिसळ आवडते. आणि तीला बेंचमार्क धरून तो इतर मिसळींचा दर्जा ठरवीत असतो. एकाला टुकार वाटणारी दुसर्याला अगदी ऑसम वाटू शकते. तेव्हा पहा किंवा पाहू नका. पण मिसळ न चाखताच त्याचा दर्जा/तिखटपणा बद्दल मत बनवू नका.
एकसष्ठीतील भाषण सिनेमातही कानात वाजत होते "मला हवे ते निर्णय स्वातंत्र्य बाबांनी दिले आणि त्या बद्दल मी त्यांची ऋणी आहे"
शिव्या आणि ओव्या स्वागतार्ह आहेत
प्रतिक्रिया
16 Nov 2015 - 6:44 pm | खेडूत
परिक्षण आवडले..
हा शिनेमा पहाणार.
16 Nov 2015 - 8:17 pm | कंजूस
नाखुश्टाइल मिसळ तर्री मारून.
16 Nov 2015 - 8:24 pm | डॉ सुहास म्हात्रे
+१
एकद्म चपखल प्रतिसाद !
16 Nov 2015 - 10:36 pm | एस
सहमत!
16 Nov 2015 - 8:23 pm | प्रचेतस
मस्तच ओ नाखुनकाका.
16 Nov 2015 - 8:39 pm | बोका-ए-आझम
हे परीक्षण मस्त आहे. चित्रपटापेक्षाही!
17 Nov 2015 - 12:05 am | दिवाकर कुलकर्णी
भारी ष्टाईल.
17 Nov 2015 - 1:19 am | रातराणी
मस्त परीक्षण. पहिला खूप आवडलेला. हा पण नक्की पाहणार.
17 Nov 2015 - 6:05 am | रेवती
परिक्षण वेगळ्या ष्टाईलीत असल्याने आवडले. त्याचा एकसष्ठीतील कार्यक्रमाशी थोडासा धागा जुळवल्याने मजा वाटली. चित्रपट कोणता असेल याचा अंदाज बांधलाय. ;)
17 Nov 2015 - 5:53 pm | पीके
हे क्काय? शिर्षकातच तर दिलय नाव... मुंपूमुं..
17 Nov 2015 - 11:07 pm | रेवती
हां हां. आत्ता समजलं. आधी ते कोणत्यातरी ठिकाणाचे नाव वाटले होते, जिथे सगळे मित्र भेटले.
हे असं समजत नै हो कधीकधी........................
17 Nov 2015 - 3:38 pm | बॅटमॅन
परीक्षण छानच, पण बघेन असे वाटत नाय. पुणे मुंबैचे तेच ते तेच ते कवतुक पाहून बोर झाला पहिला पार्ट.
17 Nov 2015 - 6:29 pm | अन्या दातार
तसंही पैल्या पार्टात लघुगुरु डोक्यात गेला होता.
17 Nov 2015 - 11:08 pm | रेवती
अगदी अगदी. लघुगुरु! तसाही तो ज्याम कॉपी मारतो म्हाग्रुची.
17 Nov 2015 - 11:11 pm | सतिश गावडे
कुठल्याशा मुलाखतीत लघुगुरुने "मी आणि मुक्ता मराठीचे शाहरुख आणि काजोल आहोत" असं म्हटल्याचे आठवते.
काकाश्रींचे चित्रपट परिक्षण एकदम खुसखुशीत आहे.
18 Nov 2015 - 12:39 am | बॅटमॅन
लघुगुरू =)) =)) =))
17 Nov 2015 - 6:48 pm | मित्रहो
परीक्षण जाम आवडले. चित्रपट जेंव्हा बघायचा योग येइल तेंव्हा नक्की बघनार.
17 Nov 2015 - 6:57 pm | यशोधरा
बघणारे. स्वजो त्रासदायक आहे (महागुरुंसारखाच) पण बाकीची मंडळी तालेवार आहेत, त्यांच्यासाठी.
17 Nov 2015 - 10:36 pm | पीके
मग त्या शिरीयाली नगा बगत जाउ....
बाकी म्हाग्रू आणि स्वजो नसते तर म्हरटी शिनूमा कुठं अस्ता कौ ठाव?
17 Nov 2015 - 10:58 pm | पैसा
आवडलं.
18 Nov 2015 - 3:22 am | प्रभाकर पेठकर
प्रतिसादकांच्या सहाय्याने कुठला चित्रपट हे समजले आणि परिक्षण पचनी पडले अन्यथा डोक्यावरुन गेले असते. असो.
18 Nov 2015 - 8:34 am | विशाल कुलकर्णी
मस्त लेख...
शिर्षकावरून थोड़ा गैरसमज झाला, मला वाटले ऐन पंचविशीत नाखुशेटनी एकसष्ठी उरकुन घेतली की काय? ;)
18 Nov 2015 - 9:00 am | एक सामान्य मानव
कथानक समजले. विशेष काही वाटत नाही. खुसखुशीत संवाद व ठीकठाक कथा ह्यासाठी स्वप्नील जोशीला सहन करणे आणि वरून १००० रु दक्षिणा जरा जास्तिच होतयं. बॅट्मॅननी म्हणल्याप्रमाणे पुणे-मुंबई हा विषय जरा जास्तिच चघळला जातो. बाकिच्या महाराष्ट्रातही लोक्स राहतात व त्यांना ह्या सगळ्यात का रस असावा?
आणि पुणे-मुंबईच का? बार्शी-नागपूर किंवा कणकवली-औरंगाबाद का नाही?
18 Nov 2015 - 9:36 am | अभिजीत अवलिया
एकदम सुंदर परिक्षण. एक वेळ महागुर्गुरू परवडले पण स्वप्नील जोशी ह्यांना सहन करणे शक्य नसल्याने चित्रपट पाहिला जाणार नाही.
18 Nov 2015 - 3:58 pm | नाखु
प्रतीसादकांचे वाचकांचे आभार.
रूढार्थाने परीक्षण नाही. पण तरीही मी हा सिनेमा "मुंबई पुणे मुंबई" फक्त दिग्दर्शकासाठी पाहिला ( सतीश राजवाडे) आणि त्याची "अग्निहोत्र" मालीकाही खूप आवडली होतीच (अगदी वेळेवर मालीका संपविण्यात माहीर माणूस)
दुसरे "लघुगुरू" बाबत सहमत ही आणि असहमतही.
सहमत तो स्व प्रतीम प्रेमात आहे आणि "मानस पुत्र" आहेच म्हागुरूंचा त्याने जास्तच लाडेलाडे रोल+अभिनय करतो.
पण लगामी चाप दिग्दर्शक असलाअ तर सुसह्य असतो.
जाता जाता वरील परीक्षणामध्ये नाव न टाकल्याने गोंधळ झाल्यास दिलगीरी व्यक्त करतो.
ज्यांनी पाहिला त्यांनी तर काही खटकणार्या/आवडणार्या बाबी सांगाव्यात.
आप्लाच पिटातील प्रेक्षक
नाखुस सिनेमावाला