हॉप फ्रॉग २

शा वि कु's picture
शा वि कु in जनातलं, मनातलं
8 Nov 2015 - 10:24 am

एका बारीक पण धारदार आवाजाने शांतता भंग पावली.तो आवाज घर्षणाने तयार झाल्यासारखा वाटत होता.कुठल्या तरी टणक वस्तुंच्या घर्षणाने.
     उदाहरणार्थ दातांच्या.
जणू कुणीतरी अमानवी त्वेषाने दातओठ खात होतं.
तो आवाज ऐकून राजाच्या मानेवरचे केस उभे राहीले. “ तू-तू तो आवाज का काढतोयस? " राजा हॉप फ्रॉग वर खेकसला.
    बुटका आता बराच सावरल्यासारखा दिसत होता .
“ मी ? मी का बरं ? मी कसा..." तो राजाकडे स्थिरपणे पाहत म्हणाला.
“तो आवाज बाहेरुन आल्यासारखा वाटतं होता. " एका मंत्र्याने आपले निरीक्षण नोंदवले. “एखादा पोपट असावा , बाहेर येण्यासाठी पिंजरा खरवडत असेल."
“खरयं" राजा म्हणाला ( राजाला त्या विचाराने खूप बरे वाटले.)
अचानक हॉप फ्रॉग हासला.
त्याने राजाला सांगितले की तो हवी तितकी वाईन प्यायला तयार आहे.राजाने चेकाळून त्याला एक चषक दिला . हॉप फ्रॉगने कुठलाही दुष्परीणाम न दाखवता वाईन गटकली.
” मला एक खेळ सुचला आहे. " तो आनंदाने म्हणाला. “ महाराज जेव्हा मुलीला धक्का देण्यात व्यस्त होते तेव्हा माझ्या डोक्यात ही कल्पना आली.आमच्या भागात हा खेळ सर्रास खेळला जातो , पण इथल्या लोकांसाठी हा नावीन्यपूर्ण अनुभव असेल . पण या खेळासाठी आठ लोकांची गरज आहे आणि..."
   “ झकास ! " राजा योगायोगावर हसत म्हणाला . “ मी आणि माझे सात मंत्री ! लवकर सांग हा काय खेळ आहे ? "
   “ आम्ही या खेळाला ‘ सात बंदिस्त ओरांग-ऊटांग ' म्हणतो.या खेळाचे ‘सौंदर्य' स्त्रियांमध्ये उत्पन्न होणार्या भितीमध्ये आहे. "
“उत्तम ! " राजा आणि त्याच्या मंत्र्यांनी गर्जना केली.
“मी तुम्हाला ओरांग-ऊटांग सारखी वेशभूषा देईन. कुणाला तुमच्यातला फरक जाणवणारही नाही. "
   राजाला आनंदाच्या भरात हॉप फ्रॉगच्या बोलण्यातील उपहास कळला नाही.“ वा वा ! " राजा हसत किंचाळला. “ अजून माहिती दे या खेळाबद्दल ! "
  हॉप फ्रॉग बोलला- “मी तुम्हा सर्वांना साखळीने बांधीन . साखळीच्या खडखडाटाने प्रेक्षकांमधील गोंधळ आणखीनच वाढेल . तुम्ही कल्पनापण करु शकत नाही की समारंभाच्या सभ्य लोकांमध्ये आठ चवताळलेले , लाळ गाळणारे ओरांग-ऊटांग काय गहजब माजवतील ! "
राजाचे मंत्री आनंदाने चित्कारले ! सर्वजण हॉपच्या योजनेसाठी घाईघाईने तयारीला लागले.समारंभाची वेळ जवळ आलेली.
    हॉप फ्रॉगने बनवलेली वेशभूषा अगदी साधी होती. पण त्या भागात ओरांग-ऊटांग आढळत नसल्याने कुणाला तो प्राणी खरोखर कसा दिसतो हे माहीत नव्हते , त्यामुळे या खेळाचा आवश्यक तो परिणाम साधला जाणार होता .बुटक्यानं दिलेले कपडे घातल्यावर खरचं हिंस्र आणि कुरूप प्राण्याचा प्रभाव पडत होता .
   प्रथम राजा आणि मंत्रीमंडळाने घट्ट कपडे घातले.
      एका मंत्र्याने कपड्याच्या कुबट वासाबद्दल क्षीणपणे कुरकूर केली.
      मग त्यावर हॉप फ्रॉगने पारामिश्रीत काळ्या रंगाची परत चढवली.त्यावर भूर्या रंगाचा कापूस चिकटवला. त्यानंतर त्याने कुठूनशी एक लांssब साखळी आणली.ती प्रथम राजाच्या , मग मंत्र्यांच्या कमरेवर आवळली.
   समारंभ एका भव्य सभाग्रुहात होणार होता. त्या सभाग्रुहाच्या मधोमध छतावर सूर्यप्रकाश आत येण्यासाठी विहीरीसारखे तोंड होते.त्या छिद्रातून एक झुंबर लटकत असे . त्यावर मेणबत्त्या लावण्यासाठी नळ्या होत्या . आज मात्र बुटक्याच्या सांगण्यावरून झुंबर काढून टाकण्यात आले होते . टपकणार्या मेणाने पाहुण्यांचे कपडे खराब होतील असे त्याचे म्हणणे होते. भिंतींना लागून ओळीत मशाली लावण्यात आल्या होत्या.
    आठही ओरांग-ऊटांग हॉप फ्रॉगच्या सल्ल्यावरून मध्यरात्रीपर्यंत वाट पाहात थांबले . ( मध्यरात्रीपर्यंत सभास्थान पूर्ण भरून गेले असते .)
  पण जसा बाराचा ठोका वाजला , आठही जनावरं आरोळ्या ठोकत , गुरकावत सभाग्रुहात पोचली.
सभासदांमध्ये तौबा गोंधळ ऊडाला . अनेक स्त्रिया भितीने थिजल्या . जर राजाने सभाग्रुहातील सर्व बाहेर ठेवायचा आदेश दिला नसता तर कुण्या शूर शिपायाने ओरांग-ऊटांगशी लढण्याची संधी सोडली नसती .
  सर्व सभासद दरवाज्याकडे घाई करु लागले . पण राजाने दरवाजे मिटण्याचा हुकूम दिला होता.

     मोठ्या शिताफीने  किल्ल्या हॉप फ्रॉगने हस्तगत केल्या होत्या.

जेव्हा  सभेचा गोंधळ वाढला , प्रत्येक जण आपापला जिव चेंगराचेंगरीपासून वाचवण्याचा प्रयत्न करीत होता , तेव्हा ती साखळी जीला नेहमी झुंबर लटकलेले असे ती हळूहळू खाली येऊ लागली , आणि काहीवेळातच जमिनीला टेकली.
   इकडेतिकडे पळून झाल्यावर राजा आणि मंत्री सभाग्रुहाच्या मध्यभागी आले , आणि कुणाला कळायचा आत हॉप फ्रॉगने झुंबराच्या साखळीचे टोक हूकने जोडून टाकले.आणि क्षणभरात झुंबराची साखळी वर खेचून राजा आणि त्याच्या मंत्र्यांना बुटक्याने एकत्र आणले.
  आता सभा बरीच सावरली होती.आता गोलाकार बांधल्या गेलेल्या प्राण्यांना पाहून सर्वांनी गडगडाटी हास्य केले.
    “त्या प्राण्यांकडं मी बघतो ! " हॉप फ्रॉगचा कर्कश्श आवाज सभाग्रुहात घुमला .“काळजी करू नका ! या साल्या प्राण्यांना मी चांगलाच ओळखतो ! मला जरा त्यांच्या चेहर्याकडेकडे पाहू द्या ."
  सरपटत तो भिंतीपाशी गेला आणि तिथून त्याने एक मशाल उचलली . त्याच्या हालचालीत एक गती आली होती , जी पाहून सभासद कोण जाणे का , शहारले .
  तो सरपटत सभाग्रुहाच्या मध्यभागी गेला. एक झेप घेऊन त्याने झुंबराची साखळी पकडली आणि तो काही फूट वर चढून राजाच्या डोक्यापर्यंत आला . जानवरांची डोकी पाहण्यासाठी त्याने मशाल खाली आणली . “मी त्यांना लगेच ओळखेन ! " तो पिसाटल्यासारखा रेकला .
     सर्व जणं ( माकडांसहीत ) हसण्यात दंग होते तितक्यात साखळी अचानक वर उचलली गेली. पोटावर घट्ट झालेली साखळी सोडवण्याची धडपड करणार्या प्राण्यांच्या तोंडासमोर बुटका मशाल नाचवत राहीला , जणू त्यांना ओळखण्याचा प्रयत्न करीत होता.
     अचानक घडलेल्या घटनेमुळे सन्नाटा पसरला. शांततेचा भंग झाला तो एका हळू पण धारधार घर्षणाच्या आवाजाने. तोच आवाज , जो राजाच्या खोलीत आलेला .
      तो आवाज हॉपच काढत होता. दातओठ खाणार्या त्याच्या तोंडातून फेस येत होता. त्याचे डोळे द्वेषाने चमकत होते.
  बडबडत त्याने राजाच्या केसाळ कोटावर मशाल टेकवली. राजा आणि त्याच्या मंत्र्यांना काही क्षणातच ज्वाळांनी वेढले होते. सर्व बघ्ये घाबरून वर पाहात राहीले . त्या प्राण्यांच्या किंचाळ्या कुणालाच ऐकवत नव्हत्या. जळत्या मेणकापडाचा आणि करपणार्या मांसाचा वास पसरला.
    ज्वाळा आता वाढून बुटक्यापर्यंत येऊ लागल्या होत्या.तो माकडासारखा सरसर वर चढला आणि म्हणाला -
“मला कळालं हे कोण आहेत . हा- "
जळणार्या आणि कंठशोष करणार्या राजाकडे त्याने बोट दाखवले .“ एक महान राजा आहे, आणि हे त्याचे तितकेच महान मंत्री. राजा जो एका निरागस मुलीवर हात उचलण्यास बिचकला नाही आणि त्याचे मंत्री जे हसले. आणि मी ? मी केवळ एक गमत्या आहे , आणि ही माझी शेवटची गंमत आहे. "
एवढे बोलून त्याने मशाल राजाच्या डोक्यावर टाकली आणि वरील विवरातून तो नाहीसा झाला.
आठ काळे ,गुलाबी ढिगारे साखळीसोबत झुलताना सभासद भयचकीत होऊन पाहत राहीले.
अशी वदंता आहे की वर ट्रिपेटा तिच्या मित्राची वाट पाहत होती . दोघे स्वदेशाकडे निघाले . त्यांना पुन्हा कोणीही पाहीले नाही.
   
समाप्त

साहित्यिकसमाजमौजमजाभाषांतर

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

8 Nov 2015 - 1:39 pm | पद्मावति

बापरे...मस्तं कथा. आवडली. दोन्हीही भाग छान जमले आहेत.
तुमच्याकडून पुढील लेखनाच्या प्रतीक्षेत आहे.

जेपी's picture

8 Nov 2015 - 5:44 pm | जेपी

बाब्बौ ..
कथा आवडली.
मुळ रचना कुठली आहे हे कळाल तर बर .
पुलेशु

शा वि कु's picture

8 Nov 2015 - 6:13 pm | शा वि कु

हॉप फ्रॉग - एडगर एलन पो
मूळ वाचायची असेल तर गटेनबर्ग वर आहे-
समग्र पो खंड ५

एक एकटा एकटाच's picture

8 Nov 2015 - 7:35 pm | एक एकटा एकटाच

चांगलीय

स्वाती दिनेश's picture

9 Nov 2015 - 3:57 pm | स्वाती दिनेश

वाचताना उत्सुकता वाढली होती, कथा चांगली आहे.
अनुवाद करताना भाषेच्या रचनेची थोडी काळजी घ्यायला हवी होती म्हणजे कृत्रिमपणा टाळता आला असता, असे वाटले.
स्वाती

शा वि कु's picture

9 Nov 2015 - 7:21 pm | शा वि कु

पूढच्या वेळी काळजी घेईन.

धडपड्या's picture

10 Nov 2015 - 4:01 pm | धडपड्या

शब्दश: भाषांतर करण्यापेक्षा, आशय समजाउन घेउन केलेले जास्त रुचले असते.. शब्दश: करण्याच्या भरात बर्याच चूका राहिल्यात... मात्र प्रयत्न नक्किच स्तुत्य... पुढिल लेखनास शुभेच्छा...

काल सविस्तर प्रतिसाद लिहिला होता, पण मोबाईल 'दिङमूढ' झाल्यामुळे प्रकाशित होऊ शकला नाही.

कथा आवडली.

मुक्त विहारि's picture

6 Dec 2019 - 4:55 pm | मुक्त विहारि

एडगर एलन पो, बद्दल माहिती नव्हते.

"पो" ह्यांच्या कथा मराठीत आहेत का?

माझे इंग्रजी कच्चे आहे.

जॉनविक्क's picture

8 Dec 2019 - 9:59 pm | जॉनविक्क

माझे इंग्रजी विंची कोड अन् हॅरी पॉटर वाचूनच सुधारले

शा वि कु's picture

10 Dec 2019 - 10:57 pm | शा वि कु

कुठेतरी पो च्या सर्व लघुकथांचा अनुवादित संग्रह बघितलाय.

मुक्त विहारि's picture

6 Dec 2019 - 4:55 pm | मुक्त विहारि

एडगर एलन पो, बद्दल माहिती नव्हते.

"पो" ह्यांच्या कथा मराठीत आहेत का?

माझे इंग्रजी कच्चे आहे.

आता सांगा इनिगोय यांनी अनुवादित केलेली
आणि
काळी मांजर ही जयंत कुलकर्णी यांनी...

सुचिता१'s picture

8 Dec 2019 - 7:28 pm | सुचिता१

छान!! दोन्ही भाग आवडले. पुलेशु!!!

श्वेता२४'s picture

9 Dec 2019 - 3:44 pm | श्वेता२४

खूप आवडले. पहिल्या भागाची लिंक या भागात देता आली तर पहा.

शा वि कु's picture

10 Dec 2019 - 10:53 pm | शा वि कु

..