चित्रपट :- नामुमकीन (१९८९)
दिग्दर्शक :- हृषिकेश मुखर्जी
गीतकार :- आनंद बक्षी
संगीतकार :- राहूल देव बर्मन
गायक :- किशोर कुमार
गायिका :- लता मंगेशकर, अनुराधा पौडवाल
अभिनेते :- डॉ. श्रीराम लागू, संजीव कुमार, ओम शिवपुरी, राज बब्बर, विनोद मेहरा
अभिनेत्री :- झीनत अमान
सदर चित्रपट आपल्यपैकी कोणी पाहिला आहे काय? असल्यास तो आपल्याला आवडला का? तसेच हृषिकेश मुखर्जी ह्यांचे इतर अनेक चित्रपट गाजले. (जरी तिकीटबारीवर चालले नसले तरी त्यांच्याबद्दल कुठेना कुठे काहीतरी छापून आले आणि ते चर्चेत तरी राहिले) परंतू या चित्रपटाविषयी फारशी चर्चा होताना कुठे आढळत नाही. याचे कारण काय असावे? या चित्रपटाची संकल्पना परकीय कथेवर आधारित आहे काय?
आपले मत अवश्य मांडावे.
खाली दिलेल्या दुव्यांद्वारे आपण या चित्रपटातील निवडक दृश्ये पाहू शकता.
http://video.google.com/videoplay?docid=-7287263387714343659&q=source%3A...
http://video.google.com/videoplay?docid=7561244743035612188&hl=en
http://video.google.com/videoplay?docid=3857136424503114322&q=source%3A0...
http://video.google.com/videoplay?docid=5630883748230791720&hl=en
http://video.google.com/videoplay?docid=-4856068316524080621&hl=en
http://video.google.com/videoplay?docid=6727384409507969813&hl=en
http://video.google.com/videoplay?docid=3857136424503114322&hl=en
प्रतिक्रिया
21 Dec 2008 - 6:45 pm | सखाराम_गटणे™
क्षमस्व, मी तरी नाही पाहीला.
----
सखाराम गटणे
© २००८,
लेखकाच्या लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
21 Dec 2008 - 7:07 pm | परिकथेतील राजकुमार
एका वाक्यात उत्तरे द्या.
प्रश्न :- नामूमकीन हा चित्रपट कुणी पाहिला आहे काय?
उत्तर :- असे पिक्चर कोणी बघणे णामूमकीण आहे.
प्रश्न :- सदर चित्रपट आपल्यपैकी कोणी पाहिला आहे काय?
उत्तर :- आम्ही फक्त णामूमकीण ह्या चित्रपटाविषयी उत्तरे देण्यास बांधिल आहोत. तरी 'सदर' ह्या चित्रपटाविषयी अभ्यासक्रमा बाहेरील प्रश्न विचारु नयेत. (हुकुमावरुन)
प्रश्न :- या चित्रपटाची संकल्पना परकीय कथेवर आधारित आहे काय?
उत्तर :- आपल्याला स्वदेशी कथेवर आधारलेला एखादा चित्रपट आठवत आहे काय ? (संत तुकाराम , राजा हरिश्चंद्र वगैरे नावे तोंडावर फेकु नयेत. हुकुमावरुन)
सविस्तर उत्तरे द्या.
प्रश्न :- हृषिकेश मुखर्जी ह्यांचे इतर अनेक चित्रपट गाजले. (जरी तिकीटबारीवर चालले नसले तरी त्यांच्याबद्दल कुठेना कुठे काहीतरी छापून आले आणि ते चर्चेत तरी राहिले) परंतू या चित्रपटाविषयी फारशी चर्चा होताना कुठे आढळत नाही. याचे कारण काय असावे?
उत्तर :- (शंका १) जे चित्रपट तिकीटबारीवर चालत नाहित त्यांनाच गाजलेले चित्रपट असे म्हणतात. ह्या चित्रपटाने 'झीनत अमान' ह्या त्या वेळच्या चलनी नाण्याच्या जोरावर पहिल्या आठवड्यात आपले नाणे वाजवुन घेतले असावे, त्यामुळे ह्यास गाजलेला पिक्चर असे न म्हणता आल्याने त्याच्याविषयी कुठलेही 'छापील धंदे' उदयास आले नसावेत.
(शंका २) हृषिकेश मुखर्जी + डॉ. श्रीराम लागू, संजीव कुमार, + झीनत अमान हे णामूमकीण 'भरीत' बघुन त्या काळच्या चित्रपट समिक्षकांच्या हातावरुन वारे गेले असावे !!
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
20 Sep 2009 - 8:20 pm | चेतन सुभाष गुगळे
या चित्रपटाविषयी परिकथेतील राजकुमाराने कल्पना केल्याप्रमाणे 'ह्या चित्रपटाने 'झीनत अमान' ह्या त्या वेळच्या चलनी नाण्याच्या जोरावर पहिल्या आठवड्यात आपले नाणे वाजवुन घेतले असावे' असे काही मला वाटत नाही. एक तर हा चित्रपट १९८९ सालचा आहे असे ह्याच्या प्रमाणपत्रावरून कळते व त्या काळी मी चित्रपटांची अत्यंत उत्सुकतेने माहीती घेत असे व त्या काळी झीनत अमान हे चलनी नाणे नव्हतेच मूळी. तो माधुरी, श्रीदेवी व जूही यांचा काळ होता. असो, तर मुद्दा हा की झीनत अमान च्या नावावर चित्रपट चालवणे शक्य नव्हते.
चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com
20 Sep 2009 - 10:06 pm | चेतन सुभाष गुगळे
वर उल्लेख केल्याप्रमाणे ह्या चित्रपटाचे साल जरी १९८९ असले तरी तो १९८९ ला प्रदर्शित झाल्याचे मला तरी आठवत नाही. मी हा चित्रपट प्रथम पाहिला तो १९९३ च्या डिसेंबर महिन्यात दूरदर्शनच्या राष्ट्रीय प्रसारणात. त्या काळी दूरदर्शनवर दर शनिवारी सायंकाळी हिन्दी चित्रपट दाखविला जाई. परंतू ११ डिसेंबर १९९३ च्या त्या शनिवारी काही अपरिहार्य कारणामुळे चित्रपट अचानक सायंकाळच्या ऐवजी दुपारी दाखविण्यात आला. ही बाब आधी जाहीर न केल्यामुळे अनेक जण तो पाहू शकले नाहीत. मी घरात त्यावेळी एकटाच असल्याने कंटाळलो होतो व त्यामुळे टीव्ही लावला तर चित्रपटाचे प्रमाणपत्र दाखवले जात होते. पुढे चित्रपट संपेपर्यंत टीव्ही समोरची नजर ढळली नाही.
हृषिकेश मुखर्जींनी एक अगदी अशक्य वाटणारी कथा सादर केली होती. या कथेने मला अगदी भारावून टाकले. हा चित्रपट इतरांना कसा वाटला हे जाणण्यासाठी अतिशय उत्सुक होतो. पण नंतर मला कळले की प्रसारण ठरलेल्या वेळे अगोदर झाल्याने तो माझ्या माहितीतल्या कुठल्याच व्यक्तिने बघितला नव्हता. त्यानंतर हा चित्रपट पुन्हा एकदा तरी बघायचाच असे मी ठरवले आणि माझ्या प्रयत्नांना ११ वर्षांनी यश आले. २००४ मध्ये मला या चित्रपटाची VCD मिळाली. त्यानंतर मी स्वत: हा चित्रपट कुटूंबियांसमवेत पुन्हा बघितला त्याचप्रमाणे परिचयातील इतर अनेकांना दाखविला. सर्वांनाच तो फ़ार आवडला. इतका अप्रतिम चित्रपट आपल्या पाहण्यात कसा आला नाही तसेच या चित्रपटाविषयी काहीच चर्चा ऐकण्यात / वाचण्यात कशी आली नाही यावर सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले.
चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com