निरव पावले (अनुवाद-गीतांजली)

लिखाळ's picture
लिखाळ in जे न देखे रवी...
20 Dec 2008 - 4:49 am

नमस्कार,
रविंद्रनाथ टागोरांच्या गीतांजली काव्यसंग्रहातील एका गीताचा स्वैर अनुवाद करायचा प्रयत्न करत आहे.

निरव पावले
तुम्ही ऐकली नाहित का त्याची निरव पावले?
तो येतो, येतो, नेहमीच येतो

प्रत्येक क्षणी प्रत्येक काळी
प्रत्येक दिवशी प्रत्येक रात्री
तो येतो, येतो, नेहमीच येतो

गायली आहेत मी अनेक गाणी मनाच्या विविध स्थितींमध्ये,
परंतु त्यांच्या सुरावटीने नेहमी हेच उद्घोषित केले,
'तो येतो, येतो, नेहमीच येतो'

स्वच्छ सुगंधी वसंतात रानवाटांनी तो येतो
येतो, नेहमीच येतो

आणि पावसाळी गूढ रात्री गडगडाटी ढगांच्या रथातून लखलखत,
तो येतो, येतो, नेहमीच येतो

दु:खाने विद्ध माझ्या काळजावर त्याचीच पावले उमटतात,
आणि त्याच्याच चरणाच्या परीसस्पर्शाने माझा आनंद उजळुन निघतो.

.
.

मूळ कविता :

Silent Steps

Have you not heard his silent steps?

He comes, comes, ever comes.

Every moment and every age,

every day and every night he comes, comes, ever comes.

Many a song have I sung in many a mood of mind,

but all their notes have always proclaimed,

`He comes, comes, ever comes.'

In the fragrant days of sunny April through the forest path he comes,

comes, ever comes.

In the rainy gloom of July nights on the thundering chariot of clouds

he comes, comes, ever comes.

In sorrow after sorrow it is his steps that press upon my heart,

and it is the golden touch of his feet that makes my joy to shine.

अनुवादाचा प्रयत्न कसा वाटला ते कृपया सांगावे.
--लिखाळ.

कविताभाषांतर

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

20 Dec 2008 - 4:57 am | मदनबाण

लिखाळराव मस्तच... :)

मदनबाण.....

"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."

- Indian Armed Forces -

दु:खाने विद्ध माझ्या काळजावर त्याचीच पावले उमटतात,
आणि त्याच्याच चरणाच्या परीसस्पर्शाने माझा आनंद उजळुन निघतो.

व्वा!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मुक्तसुनीत's picture

20 Dec 2008 - 9:34 am | मुक्तसुनीत

तुमच्या भाषांतराने क्षणभर खिळवून ठेवले. अर्थात , ही ताकद टागोरांची , हे खरेच ! पण भाषांतर बावनकशी झालेले आहे .

लिखाळ's picture

20 Dec 2008 - 3:51 pm | लिखाळ

आभारी आहे. अनुवाद करण्याचा पहिलाच प्रयत्न होता. कविता इतकी छान आहे की अनुवाद करुन मिपावर द्यायचा मोह आवरला नाही.
-- लिखाळ.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

अवलिया's picture

20 Dec 2008 - 11:33 am | अवलिया

दु:खाने विद्ध माझ्या काळजावर त्याचीच पावले उमटतात,
आणि त्याच्याच चरणाच्या परीसस्पर्शाने माझा आनंद उजळुन निघतो.

सुंदर....मुक्तसुनीतरावांशी सहमत.

-- अवलिया

अवलियाची अनुदिनी

स्वाती फडणीस's picture

20 Dec 2008 - 12:10 pm | स्वाती फडणीस

:)

लिखाळ's picture

20 Dec 2008 - 3:51 pm | लिखाळ

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार.
-- लिखाळ.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

विसोबा खेचर's picture

20 Dec 2008 - 4:43 pm | विसोबा खेचर

आणि पावसाळी गूढ रात्री गडगडाटी ढगांच्या रथातून लखलखत,
तो येतो, येतो, नेहमीच येतो

लै भारी!

तात्या.

कलंत्री's picture

20 Dec 2008 - 4:53 pm | कलंत्री

अनुवादाची साखळीच येऊ द्या.

चतुरंग's picture

20 Dec 2008 - 6:58 pm | चतुरंग

टागोरांसारख्या महान प्रतिभावंताचा एकेक शब्द म्हणजे सोनं आहे आणि त्याचा तितकाच सुंदर रुपांतरित दागिना तुम्ही घडवलात!
(अजून दागिने येऊदेत.)

(खुद के साथ बातां : रुपांतर छान असलं तरी 'कुठेतरी काहीतरी कमी पडते आहे' असं आधी म्हणणार होतो पण लिखाळरावांची स्वाक्षरी बघितली अन बेत रद्द केला. बरी मेख मारुन ठेवली आहे! ह्.घ्या. ;) )

चतुरंग

धनंजय's picture

22 Dec 2008 - 9:24 am | धनंजय

रवींद्रनाथांच्या कल्पना आणि लिखाळ यांचा अनुवाद, दोन्ही आवडले.

स्वर्णस्पर्शाऐवजी परीसस्पर्श वापरण्याचा निर्णय वेगळा (आणि चांगलाच) आशय प्रकाशित करतो.

(वेगवेगळ्या भारतीय भाषांतील कलाकृतींचा अनुवाद इंग्रजीमार्फत यावा, तसा थेटही यावा असे मनोमन वाटते. रवींद्रनाथांच्या बाङ्ला गीतांचा इंग्रजीत अनुवाद रवींद्रनाथांनीच केला आहे, पण इंग्रजीत बाङ्ला मूलपाठ्याची सर नाही, असे वाचले आहे.)

यशोधरा's picture

22 Dec 2008 - 9:41 am | यशोधरा

भाषांतर बावनकशी झालेले आहे .

हेच म्हणते. सुरेख!

लिखाळ's picture

22 Dec 2008 - 8:12 pm | लिखाळ

प्रतिसादांबद्दल सर्वांना धन्यवाद.

वेगवेगळ्या भारतीय भाषांतील कलाकृतींचा अनुवाद इंग्रजीमार्फत यावा, तसा थेटही यावा असे मनोमन वाटते. रवींद्रनाथांच्या बाङ्ला गीतांचा इंग्रजीत अनुवाद रवींद्रनाथांनीच केला आहे, पण इंग्रजीत बाङ्ला मूलपाठ्याची सर नाही, असे वाचले आहे. -- धनंजय

बरोबर.

-- लिखाळ.
माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.