सीरिया मधील कलहात रशियाने उडी घेतल्याने आधीच चिघळलेली मध्यपूर्वेतील परिस्थिति स्फोटक बनली आहे . ज्या वेगाने रशियन सैन्य आणि रशिया-समर्थित बंडखोर आयसीस चा खातमा करीत आहेत ते पाहता आजतागायत " अमेरिका म्हणजे जगाचा तारणहार /रखवालदार " या भूमिकेला धक्का बसला आहे . किंबहुना अमेरिकेला खरोखरच इस्लामिक दहशतवाद संपवायची प्रामाणिक इच्छा आहे? की फकी दाणे टाकून कोंबड्या झुंजवत ठेवून तेल-उत्पादक देशांवर आपले व्यापारीक वर्चस्व राखायचे आहे? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे ...
एकीकडे अमेरिका आणि रशिया एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात असतानाच गुंतागुंतीच्या क्षेत्रीय हितसंबंधा मुळे या युद्धाचे स्वरूप अमेरिका विरुद्ध रशिया असे बनेल की काय ? अशी भीती वाटते . त्यातच इस्लामीक राष्ट्रांकडील अण्वस्त्रे दहशतवाद्यांच्या हाती पडणे आणि विश्वायुद्ध भडकल्यास दक्षिण कोरियाची आणि चीनची भूमिका काय असेल ? भारतावर या सगळ्याचा काय ,कसा व किती परिणाम होईल? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात ...
आपणास काय वाटते ? खरोखर तिसरे विश्वयुद्ध होऊ शकते का?
प्रतिक्रिया
25 Oct 2015 - 11:39 pm | प्यारे१
इथली चर्चा वाचल्याशिवाय दोन्ही बाजंकडून काही पावलं उचलली जातील असं वाटत नाही.
बाकी पुतिन यांनी आपला पूर्वज पुतनेचा नक्की कोण याबाबत अनेक मिपाकरांशी ड्यू आयडी बनवून संधान बांधल्याचे समजते.
ओआबामामा आधीपासूनच मिपाकर आहेत.
25 Oct 2015 - 11:57 pm | जव्हेरगंज
:-D:-D:-D:-D:-D
26 Oct 2015 - 10:46 am | टवाळ कार्टा
ठ्ठोsssssss
25 Oct 2015 - 11:42 pm | भंकस बाबा
अमेरिकेला कधीच isis संपावायचे नको आहे. शस्त्र बाजारात अमेरिकेच्या मालाला उठाव या अशा गोष्टीमुळेच मिळतो. ईरान आणि इराक युद्धात अमेरिकेने आपली पोळी चांगलीच भाजुन घेतली होती.आता राशियाने यात उडी मारून अमेरिकेची चांगलीच गोचि केलि आहे. या गोष्टीचा उत्तरार्ध हाच असणार आहे की पूर्ण बेचिराख झालेले इराक व् सीरिया हे देश अमेरिका आणि रशिया पुनर्वसनासाठी वाटून घेतील.तेथील खनिज तेल भारत चीन ला विकतील. अमेरिकन व् रशियन कंपन्याना काम मिळेल आणि आधीच भिकारी झालेले हे देश पुढची १० वर्षे तरी डोके वर काढु शकणार नाही
25 Oct 2015 - 11:44 pm | एस
विश्वयुद्ध या हिंदी शब्दाला मराठीत महायुद्ध असा प्रतिशब्द आहे. पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध इत्यादी.
26 Oct 2015 - 8:08 am | उगा काहितरीच
पण "विश्व" हा पण मराठी शब्द आहे ना ? (उदाहरणार्थ , "हे विश्वची माझे घर") आणि "युद्ध" हा पण मराठी शब्द आहे . मग दोन्ही मराठी शब्द जोडल्यावर हिंदी शब्द कसा बनेल ? (हं ! "विश्वयुद्ध" पेक्षा "महायुद्ध" किंवा "वैश्विक युद्ध" कानाला चांगले वाटते.)
26 Oct 2015 - 12:11 pm | द-बाहुबली
विश्वयुध्द म्हणजे गिनॅमीडवरील एलियन्सचा न्युयॉर्कवर हल्ला होणे.
26 Oct 2015 - 10:40 am | नाव आडनाव
हो.
26 Oct 2015 - 10:41 am | नाव आडनाव
... बराच विचार केल्यानंतर मला वाटतंय - नाही.
26 Oct 2015 - 10:49 am | नाना स्कॉच
जर तीसरे विश्वयुद्ध वा महायुद्ध वा वैश्विक युद्ध झालेच तर ते काठ्यासोट्याने लढले जाईल, असे माननीय अल्बर्ट अप्पा आइनस्टाइन आमच्या बार मधे बसुन ठीक चवथ्या पेग नंतर (तो ही उधारीत अर्थातच) शेवेचा बकणा भरताना बोलल्या चे स्मरत आहे अंधुकसे
(ग्रहकाभिमुखी) नाना
26 Oct 2015 - 12:44 pm | बॅटमॅन
आजकाल अल्बर्ट अप्पांच्या माथी कुठलेही क्वोट्स मारले जातात असे अभ्राम लिंकन म्हणताना ऐकले होते ब्वा.
बादवे अभ्राम लिंकनचा हातात आयफोन घेतलेला फटू पाहिलात का? उगीच फोटोशॉप फोटोशॉप म्हणायचं काम नाय. तेव्हा फटूशॉपचा शोधच लागलेला नव्हता.
27 Oct 2015 - 7:06 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
तो आयफोनचा फोटो ब्रम्हेसाहेबांनी काढलेला म्हणे आम्रविकाभेटीमधे. त्याची रॉ फाईल आहे म्हणतात अजुन त्त्यांच्याकडे.
26 Oct 2015 - 11:40 am | सामान्यनागरिक
सध्या नाशिक्च्या धरणातुन जायकवाडीसाठी पाणी सोडण्ञावरुन जे रणकंदन चालु आहे ते बघुन महायुद्ध महाराष्ट्रातुनच सुरु होईल असे वाटते !
26 Oct 2015 - 12:04 pm | खटपट्या
तीसरे महायुध्द चालू झालंय..
भारत विरुध्द पाकीस्तान चालू आहे
सीरीया (अमेरीका + सौदी अरेबीया) विरूध्द रशिया चालू आहे
इस्रायल विरुध्द गाझा चालू आहे
चेचन्या विरूध्द कोणाचे तरी चालू आहे
आफ्रिकेमधेही छूट्पूट युध्दे चालूच आहेत.
26 Oct 2015 - 12:41 pm | बॅटमॅन
होणार की. कितव्या लेव्हलवर सुरू होणार तेवढे सांगा.
(काउंटर स्ट्राईक प्रेमी) बॅटमॅन.
26 Oct 2015 - 12:51 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
हेडशॉट रे.
26 Oct 2015 - 12:53 pm | बॅटमॅन
खी खी खी.
(छिद्राग्नीघोषणाप्रेमी) बॅटमॅन.
26 Oct 2015 - 9:46 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
अगदी अगदी. आमी कँपर स्नायपर असल्याने फक्त स्मोक आणि फ्लॅश वर विश्वास असायचा. तस्मात हे वाक्य रेगुलर वापरले जायचे =))
27 Oct 2015 - 3:24 pm | बॅटमॅन
खी खी खी, अगदी अगदी =))
27 Oct 2015 - 3:58 pm | मम्बाजी सर्वज्ञ
तुमचा हा छंद माहिती नवता. मोर्डन वारफेयर खेळता काय? कळप आहे काय तुमचा?
27 Oct 2015 - 5:37 pm | द-बाहुबली
कोणी सिएस अथवा क्वेक खळते काय ? स्टीमवर फ्रेंड म्हणून अॅडवतो. निवांत मॅच खेळु.
27 Oct 2015 - 5:45 pm | अद्द्या
डोटा खेळतो .
कारण तो फ्री आहे . क्वेक पण फ्री असेल तर सांगा. आजच करतो डाउनलोड
28 Oct 2015 - 3:06 pm | द-बाहुबली
अख्खा नाही पण त्याचा डेमो फ्री आहे. आणी त्यामधे मल्टीप्लेअर डेथमॅच वगैरे मोड उपलब्ध्द आहेतच. फक्त मॅप्स अत्यल्प आहेत.
28 Oct 2015 - 11:46 pm | अद्द्या
१५$ च्या आत बाहेर असेल तर काही प्रोब्लेम नाही .
बघतो
27 Oct 2015 - 6:36 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
मल्टिप्लेअर नाही. मल्टिप्लेअर गेम खेळुन जमाना उलटला राव :(!!! बाकी कॉल ऑफ ड्युटी ४: मॉडर्न वॉरफेअर १,२ आणि ३ चा मोठा पंखा आहे मी.
27 Oct 2015 - 6:47 pm | मम्बाजी सर्वज्ञ
क्याप्टन, MW3 online खेळता काय? तुमचा आय डी काय आहे?
27 Oct 2015 - 6:50 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
नाही. मल्टिप्लेअर गेम खेळुन कैक वर्षं झाली आता. शेवटचा खेळलेला गेम म्हणजे बहुतेक सी.एस. १.६.
27 Oct 2015 - 6:54 pm | मम्बाजी सर्वज्ञ
मला इथे नवीन धागा कसा टाकायचे ते सापडत नाही आहे नाही तर काढला असता.
कुणी मल्टी प्लेअर खेळणारे असतील तर संपर्क साधा. क्याप्टन साहेब तुम्ही कधी ओंन लाईन यायचे ठरवलेच तर जरूर कालवा. मी भरपूर खेळतो. भारतीय (मराठी जमली तर अजूनच भारी) क्लान करून दंगा करायला आवडेल!
27 Oct 2015 - 6:57 pm | मम्बाजी सर्वज्ञ
सांगायचे राहून गेले - मी xbox 360 वर असतो. धागा लेखक माफ करा विषय भरकटला आहे....
27 Oct 2015 - 11:20 pm | डॉ सुहास म्हात्रे
धागा लेखक माफ करा विषय भरकटला आहे....
हायला, इतक्या लवकर ! =)) (हघ्या ;) )
बाकी, तिसरे महायुद्ध व्हिडिओ गेमसारखेच लढले जाईल असे तज्ञ म्हणताहेत :)
28 Oct 2015 - 7:00 pm | शलभ
पॉईंट आहे..:)
27 Oct 2015 - 7:03 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
ctrl+F दाबा.
त्या सर्च विंडो मधे "लेखन करा" हे शब्द पेस्ट करा आणि एंटर दाबा.
पानावरच्या उजव्या भागामधल्या लेखन कराच्या लिंककडे घेउन जाईल हायलाईटर. तिथुन नवा धागा टाकता येईल.
27 Oct 2015 - 7:27 pm | मम्बाजी सर्वज्ञ
सापडले! धन्यवाद!!
31 Oct 2015 - 2:27 pm | महासंग्राम
कोणी Sniper Ghost Warrior खेळलं आहे का , गेम आहे ३र महायुद्ध झाले स्नायपर वाल्यांचा खूप मोठा सहभाग राहणार आहे.
अवांतर : Jude Law चा 'Enemy at गातेस' पाहिला का मस्त चित्रपट आहे तो.
31 Oct 2015 - 5:57 pm | अद्द्या
खेळलोय . .
आता आठवण करून दिलीत. .
डीवीडी शोधून काढावी लागेल परत
31 Oct 2015 - 9:49 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
खेळलोय. स्नायपर घोस्ट वॉरियर आणि स्नायपर एलिट्स २,३ ह्या प्रचंड आवडीच्या गेम आहेत.
26 Oct 2015 - 1:01 pm | चित्रगुप्त
समजा झाले तिसरे मेगायुद्ध. तर ते कसे होईल ? त्यात समोरासमोर दोन पार्ट्या असतील किंवा कसे ? खिस्ती विरुद्ध मुस्लिम असे त्याचे स्वरूप असेल किंवा कसे? कोण्या पार्टीत कोण कोण असतील ? ते किती काळ चालेल ? कोणती अस्त्रे वापरली जातील ? त्याचे परिणाम काय होतील ?
26 Oct 2015 - 1:06 pm | कैलासवासी सोन्याबापु
विश्वयुद्ध क्र ३,
सुरु झाले आहे किंवा त्यादृष्टीने ठिणग्या पडणे हे दूसरे विश्वयुद्ध संपून वसाहतवाद संपला तेव्हापासुन सुरूच आहे, त्याला जोड़ मिळाली आहे ती धार्मिक कट्टरवाद नामे भयानक प्रकाराची, ज्यावेळी ९/११ झाले त्यानंतर बुश सारख्या माणसाला नवे युद्ध पेटवायची संधीच मिळाली एकार्थाने, त्याने सुरु केलेला कार्यक्रम (बहुतेक इनफिनिट जस्टिस) ला क्रिस्चियन धार्मिक रंग आहेच नाही म्हणले तरी थोडा,
विश्वयुद्ध क्रमांक ३ चे स्वरुप,
द्वितीय विश्वयुद्ध संपत आले तेव्हा एक नवे युद्धतंत्र विकसित होत होते त्याला आज आपण "शहरी युद्ध" किंवा Urban Warfare असे म्हणतो, माझ्यामते तिसऱ्या विश्वयुद्धात सर्वांकष अणुयुद्ध असे काही होणार नाही, अन "battle strictly on border only" असेही काही होणार नाही, तर हे युद्ध घराघरात अन गलोगल्ली लढले जाईल असे वाटते, सद्यस्थिती मधे सीरिया संघर्ष किंवा "ऑपरेशन एरिन" (मोगादिशु रेड्स) मधे सुद्धा ह्याच शहरी युद्धाचे ते टेक्स्ट बुक एग्जाम्पल होईल असेच होते, त्यातही अर्बन वारफेयर एंड कन्वेंशनल लोकलाईज्ड़ कनफ्लिक्ट असे स्वरुप जास्त असेल ह्या युद्धाचे असे मला वाटते
(स्वल्पानुभव आधारित वैयक्तिक मत)
26 Oct 2015 - 1:07 pm | नाव आडनाव
बिलराव क्लिंटनजी (/ गॅरीराव ट्रुमनजी) यांचं मत काय आहे? शेवटी तेच (म्हणजे हामेरिकेचे राष्ट्राध्यक्ष) डायरेक्टली / इनडायरेक्टली ठरवणार ना तिसरं महायुद्ध कधी करायचं ते :)
26 Oct 2015 - 2:11 pm | याॅर्कर
एवढे हुशार प्रधानमंत्री मोदी यांना अमेरिका काय आहे?हे अजून उमगले नाही कि काय? असा प्रश्न पडतो.
अमेरिकीची नीयत कधीच चांगली नव्हती आणि होणार ही नाही.भारत अमेरिकेपुढे उगाचच हात पसरतोय असेच म्हणावे लागेल.अमेरिका कोणाला वर येवू देत नाही,हे त्यांचे कायमचे धोरण आहे.हेरगिरी करणे,पाळत ठेवणे हे धंदे अमेरिकेचे! अमेरिका या जगावर अघोषित मालकी हक्क सांगते, हे न उमजणारा मुर्खच म्हणावा लागेल.
म्हणून रशिया आणि चीन हे अमेरिकेचे खरे स्पर्धक आहेत, ते अमेरिकेला फार जुमानत नाहीत.
भारत-पाक युद्ध व्हावे ही अमेरिकीची इच्छा आहे.इतरत्र भांडणे चालू असताना आपण स्वतः लोणी खावे, हे लक्षण अमेरिकेचे!
आणि रशियाची ही निडर भूमिका कौतुकास्पद आहे,पण भारताने रशियासोबत संबंध कमी केलेत याचे वाईट वाटते.
असो, फार विचारमंथन झाले
26 Oct 2015 - 2:26 pm | मदनबाण
10 Signs We Are Headed Into World War III
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- जान ओ बेबी... ;)
26 Oct 2015 - 2:40 pm | चित्रगुप्त
बापरे.. मग आता आपण वर्षभराचे डाळ-तांदुळ-गहू-सर्पणाला कोळसा-लाकडे भरून ठेवायला सुरूवात करायची का?
तिसर्या मेगायुद्धात जैविक-अस्त्रे आणि कृत्रिम उपग्रहांचे स्थान महत्वाचे असेल ना?
वर्षभराचे सामान भरून ठेवण्यावरून मजेदार सिनेमा आठवला: 'सारे जहां से महंगा' (संजय मिश्र)
https://www.youtube.com/watch?v=ynYDEmZO5U4
26 Oct 2015 - 3:07 pm | मदनबाण
मग आता आपण वर्षभराचे डाळ-तांदुळ-गहू-सर्पणाला कोळसा-लाकडे भरून ठेवायला सुरूवात करायची का?
हा.हा.हा... तुम्ही अमेरिकेत असाल तर नक्कीच करा... ;)
बाकी इथे डाळीचे स्टॉक करायला आम्ही विसरलोच बघा !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- जान ओ बेबी... ;)
26 Oct 2015 - 3:22 pm | द-बाहुबली
आत आपण ही सुसंधी पकडून वर्षभर फक्त जुसिंग करायचे अन पोट सपाट ठेवायचे ;)
26 Oct 2015 - 3:29 pm | चित्रगुप्त
मेगायुद्ध सुरू झाले की भाज्या-फळे कुठून मिळणार? १२०० वर्गफुटाच्या जमिनीवर झोपडीत राहणारे एकवेळ जमिनीतून काही उगवू शकतील. पण फ्लॅटात राहणारांनी काय करायचे ? म्हणून गहू-तांदूळ खाऊन शरीरात चरबी सठवून ठेवायची.
26 Oct 2015 - 3:34 pm | मदनबाण
ज्युस पिवानु मिपा सर्फ करावानु मज्जा नी लाईफ ! ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- जान ओ बेबी... ;)
26 Oct 2015 - 8:25 pm | उगा काहितरीच
ओ साहेब , विश्वयुद्धात सर्व्हर पण उडवतात म्हणे ? ( मला तर माझ्या coc अकाउंटची चिंता लागुन राहिलीये )
27 Oct 2015 - 2:25 am | दिवाकर कुलकर्णी
मला पक्क आठ्वतय, आईन्स्टाइन काका चिवड्याचा बकाना भरताना नाई कै ते डॉन्ड्रप ला शांपू
लावताना म्हन्हाले हुते कि तिसरी लड़ाई कशी व्हील कुनाच्या बा लाबी सांगता न्हाइ यायची पर त्याच्या
म्होरची मातुर दगडान टक्कुर फोड़ुन हुइल मी सोताच्या कानानं ऐकलय
27 Oct 2015 - 6:13 pm | असंका
वा!! एक्दम अश्मयुग येणार म्हना की परत!
27 Oct 2015 - 3:02 pm | मदनबाण
सिरीया बरोबरच आता लक्ष देउया साउथ चायना सी आयलंड्सकडे... ;)
US navy warship defies Beijing to sail past South China Sea islands
China warns US Navy after ship sails by Chinese-built island
U.S. tests China as destroyer sails through disputed islands
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- A China twist: Why are malls closing if consumption is rising?
29 Oct 2015 - 7:11 am | मदनबाण
As China Warns Of War With US Over South China Sea, Australia Debate Naval Patrols In Support Of Freedom Of Navigation
Australia delays naval exercise with China amid South China Sea escalation
Australia Considering South China Sea Sail-Through
Indo-Pacific security links: South China Sea, Asian missile race, Abe abroad and more
US and Chinese navy chiefs to discuss South China Sea tensions – US official
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Truly Madly Deeply :- Savage Garden
27 Oct 2015 - 3:18 pm | पगला गजोधर
नही कुछ है होता…. और कुछ भी होना ।
तो गाओ खुशिसे, बजाकरके विना ।।
27 Oct 2015 - 6:52 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
एकदा होउन जाउ दे तेज्यायला. त्यानिमित्ताने जगाची इकॉनॉमी जरा बुस्ट अप होईल. -_-
28 Oct 2015 - 4:18 pm | कपिलमुनी
पूर्वीचे चिंतोपंत "द्या २-४ अणुबाँब टाकून" असे म्हणायचे त्याची आठवण झाली
28 Oct 2015 - 6:45 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
तु टेक्नॉलॉजीचा इतिहास किती वाचतोस माहिती नाही पण एक गोष्ट सांगतो. जगातल्या मेजर शोध युद्ध संशोधनातुन लागलेले आहेत. आधी युद्धात आणि नंतर विधायक कार्यामधे वापर सुरु झाला.
30 Oct 2015 - 11:05 am | कपिलमुनी
माझा प्रतिसाद पहिल्या वाक्यासाठी होता
29 Oct 2015 - 11:11 am | अविनाशकुलकर्णी
हा आयसीस खुप कृर आहे असे वाचुन आहे..
ति लोक्स मुंडकी वगैरे उडवतात...
त्याण्ची प्रेरणा घेत पुण्यात एकाने बायकोचे मुंडके उडवले व ते घेवुन तो रस्त्यात फिरत होता...
हा आयसीस खुप कृर आहे असे वाचुन आहे..
29 Oct 2015 - 11:37 am | अभ्या..
हो ना अकुकाका. वाचून फार प्रेरणा घेतात लोक्स.
तुमचे परमेशवराचे सुखद चमत्कार वाचायला द्यायला पाहिजेत खरेतर. ;)
29 Oct 2015 - 10:07 pm | तुडतुडी
भंकस बाबा म्हन्तायेत ते बरोबर वाटतंय असं म्हणायचं होतं हो
29 Oct 2015 - 11:23 pm | टवाळ कार्टा
काय ठरलं मग? कधी करायचे सुरु?
30 Oct 2015 - 2:44 am | प्यारे१
अरे यार प्रोजेक्टचं टेंडर फ़ायनल करायचं आहे. पुढच्या आठवड्यात पण नाही जमायचं. त्यापुढच्या आठवड्यात दिवाळी. नंतर लग्नाच्या वाढदिवसाला असलं काही नको,बायको मारेल. डिसेम्बर मध्ये सगळे क्रिसमस आणि न्यू इयर. जानेवारी पहिल्या नको दुसऱ्या आठवड्या आधी बोलू नकोस अज्जीबात.
31 Oct 2015 - 5:25 pm | मुक्त विहारि
मी पण बघायला येणार...
31 Oct 2015 - 5:43 pm | टवाळ कार्टा
मी पॉपकॉर्नचे दुकान लावणार
31 Oct 2015 - 6:08 pm | प्यारे१
घ्या. हे आले लढाईच्या आधी राजीनामा देणारे शेंदाड शिपाई.
तुम्च्या भरवश्यावर जानेवारी दुसरा आठवडा बोललो तर..... आता नवं कुणी रिक्रूट करावं लागेल, ट्रैन करावं लागेल... . ऑल मुसळ वेन्ट इन्टू द केर.
30 Oct 2015 - 1:32 am | 'पिंक' पॅंथर्न
मी तुनळी वर रोज "X22 Report " असा एक साधारण ४० ते ४५ मिनिटाचा एक न्युज रिपोर्ट बघत/ऐकत असतो. हा रिपोर्ट "इकॉनॉमिकल कोलॅप्स" आणि "जीओपोलिटीकल न्युज" अशा दोन भागात असतो. रिपोर्ट सांगणारा " हाय माय नेम इज डेव्ह..... " अशी सुरुवात करुन अगदी जगाच्या कानाकोप-यातील घडामोडी सांगत असतो. त्या बातम्या आणि त्या डेव्हचे ते त्वेषाने सांगने ऐकुन रोज हा रिपोर्ट संपता संपता कदाचित तिसरे महायुद्ध सुरु होईल काय असं वाटायला लागतं. गेली दोन वर्षे हा रिपोर्ट मी रोज ऐकत आहे. पण एकंदर एकुणच परिस्थिती दिवसेदिवस स्फोटक बनत चालली आहे याची खात्री मात्र होते..
कालचा रिपोर्ट हा तिस-या महायुद्धजन्य परिस्थितीवर भाष्य करणाराच होता...
https://youtu.be/BMg92QkDoTM
30 Oct 2015 - 6:50 am | मदनबाण
अजुन एक त्याचा चॅनल आहे तो म्हणजे :- X22Report Spotlight
मी सुद्धा काही काळा पासुन हा महाशय काय सांगतो ते अधुन मधुन सांगतोय ते ऐकत असतो.
त्या बातम्या आणि त्या डेव्हचे ते त्वेषाने सांगने ऐकुन रोज हा रिपोर्ट संपता संपता कदाचित तिसरे महायुद्ध सुरु होईल काय असं वाटायला लागतं.
हा.हा.हा... हे मात्रं खरंय. ;)
काल त्याचे X22Report Spotlight मधले काही रिपोर्ट ऐकले, ते उत्तम वाटले आणि इथे दिले.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Get Down :- Backstreet Boys